Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5808

सनी लियोनीने १० किलो वजनाचा शर्ट घालून केला खास वर्कआऊत; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपली फिगर टिकवण्यासाठी अभिनेत्री सनी लिओनीने वर्कआउट दरम्यान तिच्या व्यायामाची व्याप्ती वाढविली आहे. वास्तविक, अलीकडेच तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने १० किलो वजनाचा शर्ट घातलेला दिसत आहे. या आपल्या नवीन इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये सनीने हा शर्ट घालून आपल्या मुलाला स्ट्रॉलर मध्ये बसवून जॉगिंग करताना दिसत आहे.

१९ लाख वेळा पाहिले गेलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे की, “वजनी वर्कआउट, १० किलो अतिरिक्त वजन घेऊन स्ट्रॉलरला ढकलत मी जॉगिंग करते आहे. लॉकडाउन लाइफ.”


View this post on Instagram

 

Weighted workout shirt 10kgs of extra weight while I’m running and pushing a stroller. Lol lockdown life!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on May 9, 2020 at 9:13pm PDT

सनी लिओनीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे आणि त्यावर ते लाइक्स आणि कमेंट्सही करत ​​आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत २० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

सनीने सोमवारी आपल्या तीन मुलांसह निशा, नोहा आणि अशरसोबतचे एक छायाचित्र शेअर केले. यासाठी कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “सर्व मातांना मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यात आपली मुले हेच आपले प्राधान्य आहे. डॅनियल आणि मला आमच्या मुलांना तिथे नेण्याची संधी मिळाली जिथे कोरोना विषाणू पासून सुरक्षित राहतील. आई तुझी आठवण येते आहे. मदर्स डेच्या शुभेच्छा!”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मनमोहन सिंग यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला..

नवी दिल्ली । दोन दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांना अचानक ताप आला तसेच अस्वस्थही वाटू लागलं होतं. त्यामुळे तात्काळ दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नव्या औषधांची रिअक्शन झाल्याने मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली होती, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, खबदारी म्हणून डॉक्टरांनी मनमोहन सिंग यांची कोरोनाची टेस्ट सुद्धा घेतली. दरम्यान, त्यांच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट असून त्यांचा टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मनमोहन सिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असून एम्समध्ये कार्डिओथोरॅसिक विभागात डॉक्टरांच्या पथकाखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम मनमोहन सिंग यांची देखभाल करत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. २००९ मध्ये मनमोहन सिंग यांच्यावर एम्समध्येच कोरोनरी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आंतरराष्ट्रीय नर्स डेनिमित्त विराट कोहलीने नर्सेसचे मानले आभार म्हणाला,”या कठीण काळात साथ दिल्याबद्दल धन्यवाद”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराने झगडत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देशाने स्वत:ला लॉकडाऊनमध्ये टाकले आहे आणि शाळा-कार्यालयापासून ते संपूर्ण क्रीडा विश्‍व थांबले आहे. परंतु डॉक्टर व परिचारिका हे मात्र सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णालयात जात आहेत. आज आंतरराष्ट्रीय नर्स डे आहे, या निमित्ताने भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्व परिचारिकांना या कठीण परिस्थितीत साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

विराट कोहलीने एक ट्विट केले आहे की, “अशा आव्हानात्मक वेळी आपल्या निःस्वार्थ सेवा, समर्पण आणि दयाळूपणाबद्दल आपले आभार. आपण सर्वजण एकत्रितपणे जल्लोष करूयात.”

भारतातील कोरोनाव्हायरस संक्रमित रुग्णांचा आकडा हा ७१ हजारांच्या पुढे गेला आहे. यापैकी २३ हजाराहून अधिक लोक आता बरे झाले आहेत तर २३१० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाउननंतर ही परिस्थिती आहे, जर हा लॉकडाऊन उघडला गेला तर हा साथीचा रोग लवकर पसरण्याची शक्यता आहे.

 

भारतीय पंतप्रधान पीएम मोदी मंगळवारी म्हणजेच रात्री आठ वाजता देशाला पुन्हा एकदा संबोधित करतील, कदाचित यावेळी ते लॉकडाऊन ४.० वरही चर्चा करतील.

उल्लेखनीय आहे की अलीकडेच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीला सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला चेज मास्टर म्हटले होते. एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, “सचिन तेंडुलकर हा मी आणि विराट कोहली या दोहोंसाठी एक आदर्श मॉडेल आहे. त्याने ज्या काळात फलंदाजी केली आणि आपल्या काळात अशी बरीच कामगिरी केली की तो तरूणांसाठी नेहमीच एक उत्तम उदाहरण आहे. कोहलीनेही असे म्हंटले आहे की सचिन तेंडुलकरने या खेळामध्ये एक स्टँडर्ड सेट केले आहे. “

परंतु तरीही रन चेज करताना विराट कोहली सचिन तेंडुलकरपेक्षा वरचढ असल्याचे डिव्हिलियर्सला वाटते. एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या टीम आरसीबीकडून खेळतो, म्हणून त्याने विराट कोहलीला अगदी जवळून फलंदाजी करताना पाहिले आहे.

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “पण मला वैयक्तिकरित्या असे वाटते की जेव्हा धावांचा पाठलाग करतो तेव्हा कोहली सर्वोत्तम असतो. तेंडुलकर प्रत्येक परिस्थितीत चांगला खेळत असे, परंतु धावांचा पाठलाग करण्याच्या दबावात येण्याबद्दल कोहली त्याच्या खूप पुढे आहे. विराट कोहली फलंदाजी करत असताना कोणतेही लक्ष्य सुरक्षित नसते. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

कसलीही आर्थिक मदत न करता मोदी सरकार फक्त राज्यांवर दादागिरी करतंय!- जितेंद्र आव्हाड

मुंबई । कोरोनातून बरे होऊन नुकतेच घरी परतलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. मोदी सरकार कसलीही आर्थिक मदत न करता केवळ राज्यांवर दादागिरी करतंय, असा आरोप त्यांनी केला आहे. ”’कोरोनाशी खरी लढाई फक्त आणि फक्त राज्य सरकारे करत आहेत. याउलट कुठलीही आर्थिक मदत न करता मोदी सरकार अभ्यास पथकं पाठवून राज्य सरकारांवर दादागिरी करत आहे,”’ असा घणाघाती आरोप फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आव्हाड यांनी मोदी सरकारवर केला आहे.

फेसबुकवर लिहलेल्या आपल्या पोस्ट ते पुढे म्हणतात, ”’पंतप्रधान टीव्हीवर येऊन नाट्यमय घोषणा करताहेत. पण प्रत्यक्षात लढाई राज्य सरकारं लढत आहेत. उलट सर्व आर्थिक नाड्या आपल्या ताब्यात ठेवून राज्य सरकारच्या कामकाजाला खीळ घालण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रात यशवंतरा चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रं, जिल्हा परिषदांची रुग्णालयं यांचं भक्कम जाळं निर्माण झाल्यामुळंच आज आपला संघर्ष सुरू आहे. मात्र, आज एक प्रकारचं आर्थिक अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघराज्य पद्धतीचा ढाचा खिळखिळा करून, संसदीय लोकशाही मोडून अध्यक्षीय व्यवस्था आणण्याचा डाव दिसू लागला आहे,”असा थेट आरोप आव्हाड यांनी केला आहे.

Capture123

स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाकडं पाहण्याचा उच्चभ्रूंचा दृष्टिकोन तुच्छतेचा आहे. पण याच उच्चभ्रूंच्या सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पहारा देणारे आणि सर्व नियम पाळून चाचण्या घेणारे सुरक्षा रक्षक हे सुद्धा देशाच्या इतर प्रांतातून आलेले स्थलांतरित आहेत, याचा सोयीस्कर विसर त्यांना पडलेला आहे, असंही आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लाॅकडाउनबाबात होणार मोठी घोषणा? पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता लाईव्ह

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आत वाजता पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी लोकडाऊन चा कालावधी पुन्हा काही दिवस वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या देशात एकूण ७० हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून लोकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करत ही माहिती दिली. आपल्या संबोधनादरम्यान आणखी नवा निर्णय घोषित करतील का, देशातील आर्थिक स्थितीला उभारी देण्यासाठी ते काही उपाय योजना सूचवतील का, किंवा काही ठिकाणी ते लॉकडाउन शिथील करतील का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांच्या संवादादरम्यान मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने घोषित केलेला देशव्यापी लॉकडाउनचा तिसरा टप्पा येत्या रविवारी, १७ मे रोजी पूर्ण होत आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आणि लॉकडाउनबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन आणखी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अभिनेता,मॉडेल-फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणच्या ‘सुपरमॅन पुशअप्स’ने चाहत्यांना केले हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता, मॉडेल-फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणने फिट राहण्यासाठी लोकांना एक नवीन आव्हान दिले आहे. त्याने वर्कआऊटबद्दल एक छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये तो हवेत पुश-अप करताना दिसत आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “तो नवीन हालचाली करण्याचा प्रयत्न करीत आहे. जर तुम्ही प्रयत्न केला तर काळजीपूर्वक करा आणि आपले दात तुटले तर कृपया त्यासाठी मला दोष देऊ नका.”

 

या व्हिडिओवर त्याच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने त्याला ‘सुपरमॅन’ म्हटले आणि दुसर्‍याने कमेंट दिली की, “हे विलक्षण आहे मिलिंद. आपण निश्चितपणे आपल्यातील बर्‍याच जणांना जीवनातील नवीन पैलूंची जाणीव करून देता आहात. आपण फिटनेस आणि पॉझिटिव्ह अ‍ॅटीट्यूडचे दैवत आहात.”

गेल्या महिन्यात मिलिंद यांनी कोविड -१९चे टेन्शन टाळण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी मेडिटेशनची करण्याची सूचना दिली.

 

 

मिलिंदने इन्स्टाग्रामवर लिहिले की, “ऑनलाइन वर इतकी विरोधाभासी माहिती दिली जात आहे. इतकी अनिश्चितता इथे आहे. काही महिन्यांत जग कसे होईल. व्हायरसचे काय होणार. अर्थव्यवस्थेचे काय होईल. त्याबद्दल फारसा विचार करू नका, काळाच्या प्रवाहात वाहत जा. जगाने कसाही आकार घेवोत.आपण तयार राहा. त्यासाठी आपले मन सज्ज असले पाहिजे. मजबूत आणि लक्ष केंद्रित देखील केले पाहिजे. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

विशेष गाड्यांच्या तिकीट बुकिंगबाबतचा रेल्वेने बदलला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली । लॉकडाउनच्या काळात देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारनं विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, आजपासून ही सेवा सुरु होत आहे. यासाठी आयआरसीटीसी या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाइन तिकीट विक्री सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकांवर तिकीट काऊंटर उघडणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते पण सोमवारी रात्री हा निर्णय बदलण्यात आला आहे. काही ठराविक स्थानकांवर ठराविक वर्गासाठी तिकिट काऊंटर सुरु राहणार आहेत. ज्या ठिकाणाहून ट्रेन सुटतील आणि ज्या ठिकाणी पोहोचतील अशा ठिकाणी तिकिट काऊंटर खुली राहणार आहेत.

जनरल प्रवासी या ठिकाणाहून तिकिट घेऊ शकणार नाही. विशेष वर्गासाठी तिकिट काऊंटर खुले राहील असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. विशेष रेल्वे मार्गावर खासदार, स्वातंत्र्य सैनिक यांना ही सुविधा असल्याचे रेल्वेने आपल्या ऑर्डरमध्ये सांगितले आहे. जनरल वर्गाच्या तिकिट या वेबसाईटद्वारेच मिळणार आहेत. दिव्यांग वर्गासाठी ३एसीमध्ये दोन जागा आरक्षित असतील. सध्याच्या आणि माजी खासदारांसाठी १ एसीमध्ये दोन जागा, २ एसीमध्ये चार जागा आरक्षित असतील. रुग्ण, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती तिकिटमध्ये सवलत घेऊ शकतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती सवलत नसेल. सोमवारी ११ मे रोजी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाइन तिकीट विक्री सुरु करण्यात आली होती. त्यानुसार, केवळ तीन तासांत ५४,००० प्रवाशांपैकी ३०,००० तिकिटं बुक झाली. विशेष म्हणजे या बुकिंगमधून रेल्वेला १० कोटींचा महसूल मिळाला. दरम्यान, मुंबई-दिल्ली मार्गावरील १२ ते १७ मे या कालावधीत सुटणाऱ्या गाड्यांसाठीची संपूर्ण बुकिंग फुल्ल झालं आहे.

रेल्वे प्रवासाठी देण्यात आलेल्या काही अटींमध्येच कन्फर्म ई तिकीट असणं अनिवार्य असेल. त्याशिवाय रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय प्रवासाची सुरुवात करतेवेळी आणि प्रवासादरम्यानही सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन गेलं जाण्याची अट नमूद करण्यात आली आहे. निर्धारित स्थानकावर पोहोचल्यानंतर तेथे आरोग्य विभागाच्या आदेशांनुसार सर्व अटीचं पालन करणं प्रवाशांना बंधनकारक असेल. रेल्वेची कँटीन सेवा बंद असेल. शिवाय नेहमी देण्यात येणाऱ्या सुविधा उदा. ब्लँकेट, चादर, उशी या सुविधा पुरवण्यात येणार नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळं सर्व प्रवाशी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर ५० दिवसांनंतर आता या विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत.  खास रेल्वे सेवांअंतर्गत या विशेष रेल्वे गाड्या रुळांवर धावणार आहेत. नवी दिल्लीला जोडणाऱ्या दिब्रूगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदाबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवअनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू ताबी अशा स्थानकांवरुन या रेल्वे सोडण्यात येतील.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कराड, खटाव येथे २ नवीन कोरोनाग्रस्त; सातारा जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १२१ वर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यात एक आणि खटाव येथे एक असे एकूण २ जणांचे कोरोना अहवाल आज पॉजिटीव्ह आले असल्याचे बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे यांनी कळवले आहे. अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

कराड मध्ये एका रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून त्याला बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा झाली असल्याचे समजत आहे. तसेच खटाव तालुक्यातला एक नागरिक ठाण्यावरून प्रवास करून आला आहे. त्याची तपासणी केली असता तो कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.

यामुळे ताज्या आकडेवारीनुसार, सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १२१ वर पोहोचली आहे. तर कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कराड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८८ झाली आहे.

इंग्लंडच्या केव्हिन पीटरसनने केला तमिळ गाण्यावर डान्स;ए.आर.रेहमान यांनी शेअर केला तो मजेदार व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान क्रिकेटचे सर्व कार्यक्रम थांबले असून, यामध्ये खेळाडूंसह कोमेंटरी करणारेही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. कधी खेळाडू त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत चॅट करताना दिसतात तर कधी त्याच्या आयपीएल मधील संघासमवेत.यावेळी खेळाडू त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी आणि त्याच्याशी संबंधित काही मजेदार किस्से सांगताना दिसतात.

पण आजकाल टिकटॉक वरही खेळाडू बरेच अ‍ॅक्टिव झाले आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये टिकटॉकचा ट्रेंड युजवेंद्र चहलने सुरू केला होता. तो सतत नवीन टिकटॉक व्हिडिओ बनवून लोकांचे मनोरंजन करत असतो. आता या मालिकेत त्याच्यासह ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनही सामील झाले आहेत.


View this post on Instagram

 

A post shared by @arrahman on May 11, 2020 at 9:29am PDT

 

केविन पीटरसनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो तामिळ गाण्यांवर नाचताना दिसत आहे. भारतीय गायक ए.आर.रेहमानला हा व्हिडिओ इतका आवडला की त्याने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. तमिळ चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडतोय आणि आतापर्यंत सुमारे चार लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

क्रिकेटमधून निवृत्त झालेला पीटरसन अनेकदा भारतीय क्रिकेटविषयी वक्तव्य करून चर्चेत असतो. अलीकडेच त्याचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला होता की पीटरसनच्या आयपीएल कराराबद्दल त्याच्या संघातील सहकारी खेळाडू ईर्ष्या करीत असे. वॉन म्हणाला होता की, “मला वाटते त्या वेळी खेळाडू खूपच ईर्ष्यावान होते आणि आता ते खेळाडू हे नाकारू शकतील, पण मला वाटते की ती अशी वेळ होती जेव्हा पीटरसनला आयपीएलचा मोठा करार मिळाला होता.”

त्याला उत्तर म्हणून पीटरसन म्हणाला, “आश्चर्य. मी अजूनही चर्चेत आहे तर. मी याबद्दल पुन्हा बोलू नये अशी विनंती करु शकतो. आम्ही सर्व माझ्या कारकिर्दीत आणि अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टींपेक्षा पुढे गेलो आहोत. ज्याच्याबद्दल बोलले जाऊ शकते. आम्ही आत्ता एका कठीण टप्प्यातून जात आहोत जिथे सकारात्मकतेची आवश्यकता आहे. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील १७ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडणार

मुंबई । आर्थर रोड तुरुंगात करोनाची लागण झालेल्या कैद्यांची संख्या वाढत असल्याची दखल घेत राज्य सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीने राज्यभरातील ५० टक्के कैदी/ कच्च्या कैद्यांची सुटका करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकूण सुमारे साडे सतरा हजार (१७,५००) कैदी व कच्च्या कैद्यांना तात्पुरत्या सुटकेचा दिलासा मिळणार आहे.

राज्यभरातील सर्व प्रकारच्या तुरुंगांमध्ये एकूण सुमारे ३५ हजार २०० कैदी व कच्चे कैदी आहेत. त्यापैकी ५० टक्के कैदी/ कच्च्या कैद्यांची तात्पुरती सुटका करण्याचा निर्णय समितीने या बैठकीत घेतला. आजपर्यंत पाच हजारहून अधिक जणांची अंतरिम जामिनावर तर सुमारे सहाशे जणांची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. समितीच्या निर्णयानुसार उर्वरित सुमारे १२ हजार कैदी व कच्च्या कैद्यांचीही येत्या काही दिवसांत सुटका होणार आहे.

तुरुंगांमधील गर्दी कमी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने २३ मार्च रोजी दिले होते. त्याअनुषंगानेच राज्य सरकारने निकष निश्चित करण्यासाठी ही उच्चाधिकार समिती नेमली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमजद सय्यद, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) संजय चहांदे आणि पोलिस महासंचालक (कारागृह) एस. एन. पांडे यांचा समावेश असलेल्या या उच्चाधिकार समितीने सध्याची एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन सोमवारच्या आपल्या पुढील बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.