Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5807

तुर्कीच्या ‘या’ अभिनेत्रीला पाकिस्तानी का करतायत ट्रोल

वृत्तसंस्था । भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेकदा अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. आता पाकिस्तानी प्रेक्षकांनी याच कारणावरून एका तुर्की अभिनेत्रीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.एसरा बिल्गिच असं या तुर्की अभिनेत्रीचं नाव असून ती पाकिस्तानी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. यामागचं कारण म्हणजे, एसराने सोशल मीडियावर स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर केला. याच गोष्टीवर पाकिस्तानातील काही लोकांनी आक्षेप घेतला. इस्लामच्या शिकवणीची आठवण करून देत एसराला योग्य पद्धतीचे कपडे घालण्याचा सल्ला त्यांनी सोशल मीडियावर दिला.

पाकिस्तानातील ट्रोलर्स एसरा बिल्गिचला सभ्य कपडे घालण्याचा सल्ला देत आहेत. याआधीही अनेक पाकिस्तानी अभिनेत्री ऑनलाइन ट्रोलच्या शिकार झाल्या आहेत. त्यांच्या कपड्यांवरून अभिनेत्रींना अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. याचमुळे अनेक अभिनेत्रींनी सोशल मीडियावर अकाउंटवर कमेन्टचं सेक्शन पूर्णपणे बंद केलं.


View this post on Instagram

“ Sunset on the boat “ by Omer Sedat Yenidogan. ‘19

A post shared by Esra Bilgiç (@esbilgic) on

दरम्यान, भारतात लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांच्या मागणीवरून रामायण, महाभारत यांसारख्या अनेक पौराणिक मालिकांचं पूर्नःप्रक्षेपण होत आहे. अशाच पद्धतीने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही लोकांना धर्माचं ज्ञान देण्यासाठी तुर्कीची इस्लामी मालिका ‘दिरिलिस अर्तुगरल’चं उर्दू व्हर्जन ‘अर्तुगरल गाजी’चं पीटीव्ही वाहिनीवर प्रसारण सुरू केलं. पाकिस्तानमध्ये ही मालिका मोठ्या प्रमाणात पाहिली जात आहे. या मालिकेत एसरा बिल्गिचने हलीमा सुल्तानची व्यक्तिरेखा साकारली आहे.


View this post on Instagram

 

Duygu için @duyqudurukancici ????

A post shared by Esra Bilgiç (@esbilgic) on

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ; जाणुन घ्या आजचा भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतीत होत असलेली किंचितसी चढउतार अजूनही चालूच आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने (आयबीजेए) मंगळवारी सकाळी सोन्याचा नवीन दर जाहीर केला आहे. त्यानुसार आज सोन्याच्या किंमती कालपेक्षा किरकोळ वाढलेल्या आहेत. मंगळवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ४६,००४ रुपये तर चांदीची किंमत ही ४३,०६० रुपये किलो इतकी झाली आहे.

सोमवारी सायंकाळी केलेल्या एका ट्विटनुसार २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति ग्रॅम ४५७९ रुपये होते. आयबीजेएच्या म्हणण्यानुसार, सोमवारी संध्याकाळी २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ४४०८ रुपये तर १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ३६४८ रुपये इतकी होती.

Gold Bullion Bars- Buy Gold Bullion Bars Sale | coins-auctioned

खरं तर, सोमवारी जागतिक पातळीवरील कमकुवत संकेतामुळे सोन्याच्या वायद्यात किंचित घट नोंदली गेली. सोने हे ०.०५ टक्क्यांनी घसरून ४५,७८९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याच वेळी चांदीच्या दरातही किंचित वाढ झाली आहे. सोमवारी वायदा बाजारात चांदी ही ०.५७ टक्क्यांनी वधारली.जर तुम्ही सामान्य ग्राहक असाल तर तुम्हाला आयबीजेएने नमूद केलेल्या किंमतीवर दागदागिने खरेदी करण्यासाठी वेगळा मेकिंग चार्ज आणि ३% जीएसटी द्यावा लागेल.

सोमवारी सोन्याच्या भावात घसरण झाल्यामुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जून डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव २३ रुपयांनी किंवा ०.०५ टक्क्यांनी घसरून ४५,७८९ रुपयांवर आला. त्याचप्रमाणे ऑगस्ट डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव ४९ रुपये किंवा ०.११ टक्क्यांनी घसरून ४५,००८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव ०.४२ टक्क्यांनी घसरून १,७०६.७० डॉलर प्रति औंस झाले.

Let's prepare for the next big bull run in Gold. | Tradimo News

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

डॉ. मनमोहन सिंह यांना रूग्णालयातून मिळाली सुट्टी

नवी दिल्ली । देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर मनमोहन सिंह यांना दोन दिवसापूर्वी अचानक छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. आज मंगळवारी उपचारानंतर मनमोहन सिंह यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप आणि छातीत दुखू लागल्याने 87 वर्षीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रविवारी संध्याकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

डॉ. मनमोहन सिंह यांना कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. मात्र चिंता करण्याचं कारण नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जात होतं. उपचारादरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची कोरोनाची तपासणी देखील करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची 2009 मध्ये कोरोनरी बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यावेळी जवळपास 14 तास ही शस्त्रक्रीया सुरु होती.

मनमोहन सिंह रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच सर्वांनीच त्यांची प्रकृती ठिक व्हावी यासाठी प्रार्थना सुरु केली होती. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. देशातील बड्या राजकीय नेत्यांनीही ट्वीट करुन मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अमेरिकेत ८० हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत कोरोना विषाणूच्या साथीमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही ८० हजारांच्या पुढे गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने नुकतीच याबाबत माहिती दिली. कोविड -१९ च्या या संसर्गामुळे अमेरिकेत आतापर्यंत एकूण ८०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे, असे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अ‍ॅण्ड इंजिनियरिंगने (सीएसएसई) सोमवारी जाहीर केलेल्या एका आकडेवारीत म्हटले आहे.

वृत्तसंस्था शिन्हुआने सीएसएसईच्या हवाल्याने सांगितले की, “देशात आतापर्यंत एकूण १३ लाख ४४ हजार ५१२ लोकांना या साथीच्या आजाराने ग्रासले आहे. या सर्वांना कोविड -१९ चा संसर्ग झाला आहे. “अमेरिकेतील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम हा सर्वाधिक न्यूयॉर्क या राज्यात झालेला आहे.

कोविड -१९ संसर्गाची इथे एकूण ३ लाख ३७ हजार ५५ रुग्ण असल्याची नोंद झाली असून त्यात २६ हजार ६८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. सेंटर फॉर सिस्टम सायन्स अ‍ॅण्ड इंजिनियरिंगने जारी केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की न्यू जर्सीमध्ये ९ हजार ३४० मृत्यू, मॅसेच्युसेट्समध्ये ४ हजार ९७९ आणि मिशिगनमध्ये ४ हजार ५८४ मृत्यू झाले आहेत.

How Coronavirus Spread From Patient Zero in Seattle - Bloomberg

ब्रिटनमध्येही विनाश
ब्रिटनमध्येही कोरोनाचा कहर कायम आहे. गेल्या २४ तासात तिथे २५० हून अधिक लोक मरण पावले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे ३२ हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे तसेच गेल्या २४ तासात यूकेमध्ये या संसर्गाची जवळपास ४००० प्रकरणे घडली आहेत. यासह येथे कोरोना संसर्गाच्या प्रकरणांची संख्या सुमारे २ लाख १९ हजार इतकी झाली आहे.

ब्रिस्टल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार ब्रिटनमध्ये अजूनही सुमारे सात लाख लोक या विषाणूमुळे आपला जीव गमावू शकतात. अभ्यासात असेही म्हटले आहे की मंदी, दारिद्र्य आणि दुर्लक्ष झाल्यास हा आकडा आणखीही वाढू शकतो.दुसरीकडे, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हा लॉकडाऊन संपवण्यासाठी तीन फेजवाला अंतिम एक्झीट प्लॅन आखला आहे, त्यामुळे लोक प्रचंड संतापले आहेत.

Death toll from coronavirus up in Iran

इटली मध्ये काही प्रमाणात कमी झाली प्रकरणे
इटलीमध्ये नवीन प्रकरणांची संख्या कमी झाली आहे, परंतु अद्यापही तिथे परिस्थिती सामान्य झाली नाही आहे.कोरोनामुळे या देशात ३०,७३९ लोकांचा बळी गेला आहे. त्याचवेळी,२ लाख २० हजार लोकांना या आजाराची लागण झाली आहे.

रशियाची परिस्थिती बिकट आहे
रशियामध्येही कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे. येथे कोरोनाची प्रकरणे ही २ लाखांपेक्षा अधिक झाली आहेत. तसेच २ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यात आत्तापर्यंत ८१९ पोलीस कोरोनाबाधित, ७ जणांचा मृत्यू – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । कोरोनाच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या पोलिसांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आत्तपार्यंत ८१९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करुन आत्तापर्यंत ४ कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

त्याचवेळी लॉकडाउनच्या काळात पोलिसांवर झालेल्या २१२ हल्ल्यांच्या घटनांमध्ये आतापर्यत ७५० जणांवर कारवाई करत अटक करण्यात आली आहे. तसेच लॉकडाउनच्या काळात अवैध वाहतुकीच्या १२९१ प्रकरणांची या काळात नोंद केली असल्याचेही देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं. सध्या राज्यात २ लाख ५८ हजार ७९२ जण क्वारंटाइन आहेत. त्यापैकी ६६२ जणांनी क्वारंटाइनच्या नियमांचा भंग केला आहे अशीही माहिती देशमुख यांनी दिली आहे.

तसेच राज्य सरकारने ४ हजार १९ मदत केंद्र करोना रुग्णांसाठी उभी केली आहेत. या केंद्रांमध्ये ३ लाख ८८ हजार ९४४ स्थलांतरित मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे असंही देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

महिलेने ५०० कि.मी. पायी चालल्यानंतर एका झाडाखाली दिला बाळाला जन्म

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात एका परप्रांतीय महिलेने मध्य प्रदेशपासून ५०० कि.मी. अंतर प्रवास करून एका झाडाखाली बाळाला जन्म दिला. सदर महिलेसह आणखी एक डझन लोक अनेक दिवसांपासून मध्य प्रदेशातील धार येथून चालत होते आणि ५२० कि.मी. अंतरावर गेल्यानंतर तिला सोमवारी बालाभेत गावात बाळंतपणाचा त्रास झाला.

प्रवासाला निघाली तेव्हा ती साडेआठ महिन्यांची गरोदर होती. तिचा नवरा तंतु यांनी सांगितले की, त्याची पत्नी राजबेट्टी प्रवासादरम्यान घेतलेल्या एका लहान ब्रेकमध्ये स्वयंपाक करीत होती, तेव्हा तिला बाळंतपणाचा त्रास सुरू झाला आणि नंतर तिने तिथेच असलेल्या झाडाखाली एका लहान मुलीला जन्म दिला. तिचा नवरा आणि त्यांच्या गटातील काही इतर महिलांनी तिला मदत केली.

ते म्हणाले की, स्थलांतरितांचा हा समूह धार जिल्ह्यातील प्रीतमपूर भागातून ललितपूरमधील त्यांच्या गावी जात होता. कोरोनोव्हायरसच्या उद्रेकामुळे देशव्यापी लॉकडाऊनमुळे ते ज्या कारखान्यात काम करत होते तो बंद झाला होता.

बल्लभ गावच्या प्रमुखांना या महिलेची माहिती मिळताच त्यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून (पीएचसी) वैद्यकीय पथकाला बोलावले. या पथकाने आई आणि नवजात मुलाला त्वरित वैद्यकीय मदत पुरविली आणि नंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले.

ललितपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रताप सिंह म्हणाले, “आमचे वैद्यकीय पथक तेथे पोहोण्यापूर्वीच या महिलेने एका स्वस्थ मुलीला जन्म दिला होता. नंतर, आई आणि नवजात शिशू या दोघांनाही घटनास्थलाहून वैद्यकीय सहाय्य आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आणण्यात आले. ते दोघेही आता सुरक्षित आहेत आणि त्यांना रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहे. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशात या राज्यांत पुढच्या २४ तासांत येणार वादळ; हवामान खात्याचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांत अवकाळी पाऊस आणि धूळीचे वादळही सुरु आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, येत्या २४ तासांत जयपूर, दौसा, नागौर, अजमेर, श्रीमाधोपूर, अलवर, भरतपूर, करौली आणि धौलपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ३५ किमी / तास वेगाने या वादळाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी सतर्कतेचा इशारा देखील जारी केला आहे.

हवामान विभाग
धुळीच्या वादळाचा इशारा
जयपूर, दौसा, नागौर, अजमेर, सवाई माधोपूर, अलवर, भरतपूर, करौली आणि धौलपूर जिल्ह्यांतही हवामान विभागाने धुळीच्या वादळाचा इशारा दिला असून लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सोमवारी दिल्ली-एनसीआरमध्ये वादळ व जोरदार वाऱ्या सह देशातील अनेक राज्यांत काही ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे, पुढील तीन दिवस हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये अशाच प्रकारचे वातावरण राहण्याची भीती व्यक्त केली आहे.

आयएमडी
दिल्लीतील हवामान आज कोरडे राहील
आयएमडीच्या म्हणण्यानुसार दिल्लीत आज हवामान कोरडे राहील परंतु देशातील अनेक राज्यांत मात्र येत्या चोवीस तासांत हवामानाची परिस्थिती खराब होण्याची शक्‍यता आहे. असे म्हटले जाते की देशात बर्‍याच ठिकाणी गारपीटीसह पाऊस व वादळाची शक्यता आहे आणि यावेळी वारा देखील ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वाहू शकतो.

 

राजस्थान आणि गुजरातमध्ये वादळ येऊ शकते
अलर्ट जारी केला
आयएमडीने हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय सब-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, उत्तर ओडिशा, अंदमान आणि निकोबार, जम्मू काश्मीर, लडाख, राजस्थान, किनारी आंध्र प्रदेश, अंतर्गत तमिळनाडू येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, तर राजस्थान तसेच गुजरातमधील लोकांना वादळाचा सामना करावा लागू शकतो. आहे, तर लोकांना अधिक सतर्क राहण्यास सांगितले गेले आहे.

‘डस्ट स्टोर्म’ ही हवामानासंबंधी आपत्ती आहे
‘डस्ट स्टोर्म’ म्हणजे काय ?
‘डस्ट स्टोर्म’ कोरड्या हवामान आणि अर्ध-रखरखीत प्रदेशात होणारी हवामान आपत्ती आहे ज्यात कोरड्या पृष्ठभागावरुन जोरदार वारा सुटल्याने वाळू आणि घाण वाहते तेव्हा धुळीची वादळे उद्भवतात, ही प्रक्रियेत मातीला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नैसर्गिकरित्या नेले जाते. शहरी भागात ‘डस्ट स्टोर्म’ हा शब्द वापरला जातो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

लॉकडाउनमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकीत; महामंडळाला हवेत ३०० कोटी

मुंबई । लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात सध्या अविरतपणे परप्रांतीय मजूर, विद्यार्थी यांची ने आण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार मात्र धोक्यात आहेत. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला ३०० कोटींची मदत द्या, नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल-मे महिन्यांचे पगार देणं कठीण होईल, अशी मागणी इंटकने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, हे ३०० कोटी रुपये मिळाले नाहीतर एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणे कठिण होऊन बसणार आहे, अशी चर्चा एसटी कामगारांमध्ये सुरु आहे.

राज्य परिवहन कर्मचा-यांचे दर महिन्याला वेतन अदा करण्यासाठी सुमारे २५० कोटी रूपये लागतात. त्यामुळे रा.प. महामंडळाकडे कर्मचा-यांच्या वेतनाकरीता पुरेशी रक्कम उपलब्ध नाही. सरकारने एसटी महामंडळास ३०० कोटी रुपये द्यावेत नाही तर कर्मचाऱ्यांचं वेतन करणेही अशक्य आहे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस या संघटनेनं केली आहे.

शासनाने विविध प्रवास सवलतींसाठी द्यायची रक्कम आणि अर्थसहाय्य दिल्याशिवाय एप्रिल महिन्याचे कर्मचा-यांचे वेतन अदा करणं शक्य नाही अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. एप्रिल आणि मे महिन्याचं वेतन एकाच टप्प्यात देण्याचा सरकारचा आदेश आहे. परंतु, एसटीकडे वेतन देण्यासाठी पैसेच नसल्याने १ मे आणि ७ मे या दिवशी कर्मचारी अधिकाऱ्यांना वेतन देण्यात आलेलं नाही.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मला काँग्रेसकडून ऑफर होती; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

जळगाव । विधानपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसकडून ऑफर होती आणि भाजपच्या ६-७ आमदारांनीही क्रॉस व्होटिंग करण्याची तयारी दर्शवली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मात्र आपण ही ऑफर नाकारली, असा दावाही खडसे यांनी केला. भाजपनं विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट नाकालल्यानं खडसे सध्या पक्ष नैतृत्वावर तीव्र नाराज आहेत. अशातच आपल्याला सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर होती आणि भाजपमधील काही आमदार आपल्या पाठिशी होते असा खडसे यांनी दावा केल्यानं पुन्हा  एका नव्या राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे अशा ज्येष्ठ नेत्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागेल अशी चर्चा असताना त्यांना डावलून भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे खडसे यांनी आपली खदखद प्रसार माध्यमांसमोर जाहीरपणे व्यक्त केली. यावेळी खडसे म्हणाले, ”आम्हाला तिकीट मिळाले नाही याचे दुःख नाही, पण ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षाविरोधात काम केले अशा पक्षाबाहेरून आलेल्या लोकांना तिकीट देण्यात आले. त्याऐवजी माधव भंडारी, मिलिंद पाटील, नीता केळकर, मकरंद देशपांडे, केशव उपाध्ये यांच्यासारखे लोक वर्षानुवर्षे निष्ठेने काम करत आहेत. कधीतरी विधानपरिषद आपल्याला मिळेल या आशेवर ते आहेत. पण निष्ठावंतांना डावलण्यात आले. हा अन्याय आहे,” असे खडसे यांनी म्हटलं.

”गेल्या वेळी राज्यसभेला तिकीट मिळालं नाही तेव्हा आपली विधानपरिषदेवर वर्णी लावली जाईल, असे मला सांगण्यात आले होते. विधानपरिषदेसाठी शिफारस केली गेली तेव्हाही आम्हा तिघांची नावे होती असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात पक्षाने ज्यांची शिफारस केली नव्हती, अशा गोपीचंद पडळकर, रणजीतसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपचडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. निष्ठावंत आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी नाकारण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने आता राजकारण करणे योग्य नाही. पण कोरोनाचा विषय संपल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ,” असा इशारा एकनाथ खडसे यांनी भाजप नैतृत्वाला दिला आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

चिंता काही कमी होईना! देशात करोनाग्रस्तांचा आकडा ७० हजाराच्या पुढे

नवी दिल्ली । भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाही आहे. कोरोनाचा फैलाव गेल्या काही दिवसात वेगात होत असल्यानं कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ६० हजारांची संख्या गाठल्यानंतर आज दोनच दिवसांनी ही संख्या ७० हजारांवर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार ७९३ इतकी झाली आहे. तर सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रातही गेल्या ६ दिवसांपासून रुग्णसंख्या दररोज १ हजाराहून अधिक वाढत आहे.

तामिळनाडूतही कोरोनाचे रुग्ण झापाट्याने वाढत असून गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ७९८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. ही दिवसभरातील राज्यातील सर्वाधिक आहे. मात्र, एकूणच, देशभरात नव्या कोरोना रुग्णांची संख्या रविवारी ४,३०८ इतकी नोंदवली गेली. त्यात सोमवारी घट होत ती ३,६०७ वर आली. राज्यांद्वारे नोंदविलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात आता ७०,७९३ इतके रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात एकूण रुग्णांपैकी जवळजवळ एक तृतीयांश रुग्ण आहेत. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि दिल्ली या ४ राज्यांत भारतातील कोरोना रुग्णांपैकी ६६ टक्के रुग्ण आहेत. गुजरातमध्ये सोमवारी ३४७, दिल्लीत ३१० रुग्ण आढळले. ही संख्या आतापर्यंत आढळलेल्या रुग्णसंख्येहून जास्त आहे. देशातील ११३ वर असलेला मृत्यूदर सोमवारी ८२ वर घसरला होता ही एक समाधानाची बाब. महाराष्ट्रात सर्वाधिकक ८६८ मृत्यू झाले, तर एकट्या मुंबईत ५२८ मृत्यू झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”