Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5816

पंढरपूरात शेतकऱ्यांना मोबदला न देताच पालखी मार्गाचे काम सुरु; शेतकऱ्यांनी रोखले काम

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर ते आळंदी या पालखी मार्गाचे काम सुरु झाले आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथील शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला न देताच काम सुरु केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी दत्तात्रय काळे यांनी आज जमिनीचा मोबदला मिळावा. या मागणीसाठी रस्त्याचे काम रोखले आहे.

लाॅकडाऊन सुुरु असतानाही रस्त्याची कामे सुरु झाली आहेत. पालखी मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाली नाही. मोबदला न देताच जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या शेतातून काम सुरु केले आहे.

आज पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोबदला मिळावा. या मागणीसाठी हे काम रोखले आहे. दत्तात्रय काऴे या शेतकऱ्याची चार गुंठे जमिन या कामासाठी संपादन केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून ते पैसे मिळावेत. यासाठी ते अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवत आहेत. अशातच आता पैसे न देताच काम सुरु केले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अचलपुरात सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण; अमरावती जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७९ वर

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालूक्यातील ४२ वर्ष वयोगटातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर व्यक्ती परसापूर या गावातील रहिवासी असून शनिवारी त्याचा नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झालेला होता. आज त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सदर इसम हा पोटाच्या कॅन्सरने आधिच ग्रस्त होता. त्यासाठी च्या चाचण्याही सदर इसमाने केलेल्या होत्या. त्याला पूढील उपचारासाठी नागपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच सदर व्यक्तीचे घश्यातील स्त्रावाचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. आज त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून तो व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कोरोनाचा हा पहिलाच रुग्ण असून यामुळे आता अचलपूर येथील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आता ज्या परीसरात सदर व्यक्ती राहत होती तो परिसर प्रशासनाने सील केला असून परीवारातील सदस्य व शेजारील संपर्कात येणार्‍यांचा प्रशासनाकडन शोध घेतला जात आहे. अतिसंपर्कात आलेल्या निकटवर्तीयांचे घश्याचे नमूने घेण्याचे काम ऊपविभागीय अधिकारी संदीप अपार ,तहसीलदार मदन जाधव यांच्या नेत्रुत्वात आरोग्य अधीकारी कर्मचारी करत आहेत.

दरम्यान, अचलपूर प्रशासनातर्फे परसापूर गाव सील करण्यात आलेलं आहे. संबंधीत व्यक्ती अमरावती येथील ज्या २ रुग्णालयात ऊपचार घेत होते तेथील संपर्कात आलेल्यांना सुद्धा शोधण्याचे काम प्रशासन करत आहे. मात्र अचलपूर तालूक्यात कोरोनाचा व्यक्ती मृत पावल्याने आता प्रशासनासह अचलपूर तालूक्यासाठी ही अतीशय चींतेची बाब आहे.

परसापूर येथील व्यक्ती ही पोटाच्या आजाराने ग्रस्त होती. अमरावती मधील खाजगी रुग्णालयामधे सुद्धा त्यांनी ऊपचार घेतले आहेत. तेथील संपर्कातील व्यंक्तींचा सुद्धा शोध घेन्यात येईल. तर परसापूर येथिल त्यांचे घर परीसर सील करण्यात आलेला आहे. लवकरच संपर्कातील व्यक्तिंना विलीगीकरण कक्षात पाठवीन्या येणार आहे. अशी माहिती संदीपकुमार अपार, उपवीभागीय अधीकारी, अचलपूर यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आईपण !

आई! या शब्दातच केवढी अफाट शक्ती आहे. त्याग, वात्सल्य, ओढ, प्रेम, आपुलकी सारं काही या एकाच व्यक्तीच्या ठायी. पण मला प्रश्न पडायचा, हे आईपण येतं कधी, जाणवतं कधी? उमलत्या वयात गर्भाशयाची वाढ होत असताना बाईपणाचं वाण आणि आईपणाचं बीज आपल्या पदरात पडतं, की आपण खरंच आई होणार असल्याची चाहूल लागते तेंव्हा, की पहिल्यांदा तो इवलासा जीव आपण छातीशी कवटाळतो तेंव्हा? मला आई होण्याची चाहूल लागली तेंव्हा आईपणापेक्षा दडपण आणि जाबदारीच जास्त वाटत होती. निसर्ग नियमानुसार नऊ महिने सरता माझा मुलगा जन्माला आला. त्याला पहिल्यांदा जवळ घेतल्यानंतर वाटलं काय ही निसर्गाची किमया! नवल आणि नितांत काळजी वाटली. हा जीव संपूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे याची नव्याने आणि अधिक तीव्रतेने जाणीव झाली. खरा प्रवास तर तिथून सुरू झाला.

पुस्तकांमधून मी अनेकदा वाचलंय, गरोदर असतानाच तिला आईपणाचा पाझर फुटला वगैरे वगैरे. इथे तर माझं पोटच पोर, नऊ महिने माझ्या पोटात वाढलेल जन्माला आलं होतं. त्याच्या स्पर्शाने आंतरिक आनंद मिळाला होता खरा. पण ही भावना काही गवसत नव्हती. हळूहळू आमच्या सहवासागणिक आमचं नातं आणखी दृढ झालं. हजार लोकांच्या गर्दीत जेंव्हा त्याचे डोळे मला शोधत होते, अनोळख्याने घेतल्यावर डोळे पाणावत होते, मी दिसताच त्याच्या ओठांमध्ये हसू उमटत होतं , छातीशी कवटाळून मी त्याला अंगाई म्हणत होते तेंव्हा मला गवसलं ‘ते’ आईपण.

वाटतं आईपण सहवासात आहे, स्पर्शात आहे, विश्वासात आहे, कुशीतल्या विसाव्यात आहे, जबाबदारीत आहे. हे आईपण मला जाणवलं तेंव्हा मेंदूत आणि अंतर्मनात साक्षात्कारच शूळ उठलं. जगण्याची नवी उमेद, प्रेरणा मिळाली. प्रसंगांगणिक, संवादागणिक, सहवासागणिक, स्पर्शागणिक ही भावना अधिक खोल आणि परिपक्व होत चालली आहे.
फक्त या आईपणाचं ओझं आणि अडचण मला आणि माझ्या मुलांना वाटू नये एवढी काळजी मात्र मी घेते आहे. कारण काहीही असलं तरी शेवटी आपण आणि आपली मुलं स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेल्या स्वतंत्र व्यक्तीच आहोत….

सौ. ईरा क्षितिज बेलापुरे
फोन – 7588575621

अमेरिकेतून सुटकेसाठी २५,००० भारतीयांनी केली नोंदणी; व्यवस्थित छाननी करुन परवानगी देणार – तरणजीत सिंग संधू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात आपलं घरदार सोडून इतरत्र अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी देशांतर्गत रेल्वे आणि बससेवा तर देशाबाहेरील व्यक्तींसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत परदेशातून हजारो भारतीयांना परत स्वदेशी आणण्यात यश मिळालं आहे. माघारी आणलेल्या सर्वांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

दरम्यान भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंग संधू यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत राहणाऱ्या २५,००० भारतीय लोकांनी आपल्या मायदेशी परतण्यासाठी अर्ज केले आहेत. नागरिकांची व्यवस्थित माहिती घेऊन त्यांना देशातील विविध ठिकाणी पोहचवण्यात येणार असल्याचं संधू म्हणाले आहेत.

भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून अचानक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे आणि विमानसेवा बंद झाल्या. त्यामुळे देशाबाहेर आणि इतर राज्यात असणारे नागरिक हे आहे तिथंच अडकून पडले. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानपरिषदेसाठी ‘या’ दोन नेत्यांची उमेदवारी जाहीर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे तिकीट जाहीर झाले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी ट्वीट करत उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी अनेकदा जाहीर सभेत कौतुक केले असून शशिकांत शिंदे हे पवारांचे निकटवर्तीयपैकी एक मानले जातात. राष्ट्रवादीकडून या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल (९ मे) ट्वीट करत राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी यांना उमेदवारी जाहीर केल्याची माहिती दिली. तर भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे नावे ४ मे रोजी निश्चित झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सातारा जिल्हा कारागृहातील 15 कोरोना संशयित कैदी अज्ञात स्थळी हलवले; पोलिसांचा चोख बंदोबस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोना बाधित कैद्यांच्या संपर्कात असलेले सातारा जिल्हा कारागृहातील १५ कैदी सुरक्षेच्या दृष्टीने अज्ञात स्थळी हलविले आहेत. हे सर्व कैदी पुणे आणि सातारा येथील आहेत. पुण्यात कोरोनाचे प्रमाण वाढल्याने गेल्या महिनाभरापासुन पुणे येथील येरवडा कारागृहातील ४७ हुन अधिक कैदी सातारा कारागृहात आणले होते. यामधील ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण होताच सातारा जिल्हा कारागृहात भितीयुक्त वातावरण तयार झाले होते.

यामुळे सातारा कारागृह प्रशासनाने कोरोनाचा प्रभाव वाढु नये. यासाठी खबरदारी म्हणुन त्या ९ कोरोना बाधित कैद्याच्या संपर्कात आलेल्या कारागृहातील १५ कोरोना संशयित कैद्यांची रवानगी अज्ञात स्थळी केली आहे. यावेळी या कैद्यांना कारागृहातुन बाहेर काढताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासन अतिशय सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरचं इतर कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये. म्हणून त्यांनी कारागृहातील काही कैदी अज्ञात स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गर्भवती महिलेसह जालन्यात कोरोनाचे ३ नवे रुग्ण ; जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ११ वर

जालना प्रतिनिधी । आठवडाभरानंतर जालन्यात तीन नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आता एकुण बाधितांची संख्या ११ झाली आहे. नवीन रूग्णांमध्ये अंबड तालुक्यातील कानड गाव येथील दोन रूग्णांचा समावेश असून जालना तालुक्यातील जामवाडी येथील एका गर्भवतीचा समावेश असल्याची माहिती रविवारी (ता. दहा) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठाडे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात ता.१ मे पर्यंत आठ रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी दोन महिला रूग्णांचा उपचारानंतरचा अहवाल कोरोना निगेटीव्ह प्राप्त झाला. त्यामुळे एका महिलेला सुट्टी देण्यात आली आहे. तर इतर सहा रूग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान रविवारी पुन्हा तीन रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यातील दोन रूग्ण हे मुंबईवरून अंबड तालुक्यातील कानडगाव येथे आले होते. तर गर्भवती महिला जालना तालुक्यातील मौजे कारला येथील असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले आहे.

पारध येथील त्या युवतीचा दुसरा अहवाल पॉझिटीव्ह
गुजरातधून आपल्या कुटुंबियासोबत पारध (ता.भोकरदन) मध्ये आलेली एक सतरा वर्षीय युवती कोरोना बाधीत आढळून आली आहे. उपचारानंतर पाठविण्यात आलेल्या तिच्या दुसऱ्या नमुन्यांचा अहवालही पॉसीटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठाडे यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता अकरावर पोहचली आहे.आज नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तीन रुग्णांपैकी दोन अंबड तालुक्यातील कानडगाव येथील रहिवाशी आहेत ते मुंबईहुन आले असल्याचे समजते तर जामवाडी येथील मूळ रहिवाशी असलेली महिला ही जालना शहराजवळील इंडेवादी येथील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुटखामाफियाच्या शेतातील वाड्यात सापडला अवैध गुटख्याचा मोठा साठा; 15 लाखाचा मुद्देमाल जप्त

जालना प्रतिनिधी । जिल्ह्यातील राजूर येथे एका गुटखा माफियांच्या वाड्यात गुटख्याचा मोठा साठा सापडला आहे. जालना पोलिसांनी कारवाई करून 9 लाखाचा गुटखा, एक टेम्पो, दोन मोटारसायकलीसह 15 लाख 18 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जालना परिसरातील गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सदर प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आज भल्या सकाळी धडाकेबाज कारवाई करत गुटखामाफियाच्या वाड्यावर धाड टाकली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी आज भल्या सकाळी राजूर शिवारातील भूमकर याच्या शेतातील वाड्यावर मोठ्या फौजफाट्यासह धाड टाकली. यावेळी भूमकर पळून जाण्यात यशस्वी झाला असून अन्य ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तसेच या कारवाईत पिकअप टेम्पोमध्ये (क्र एमएच २१, एक्स- ८३५१) अवैध असलेला गुटखा भरण्यात येत होता. पोलिसांनी वाड्याची झाडाझडती घेतली असताना त्याठिकाणी व टेम्पोत एकूण 9 लाख रुपयांचा गोवा, राजनिवास असा प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. यावेळी गुटखामाफिया पसार होण्यात यशस्वी झाला.

दरम्यान, पोलिसांनी भूमकर याचे अण्णा जगताप, अक्षय मगरे हे दोन नोकर आणि जालना येथून गुटखा खरेदीसाठी गेलेले महंमद तन्वीर मोमीन आणि अहमद रझा अशपाक शेख या दोघांना मोटारसायकलीसह अटक केली. या कारवाईमुळे गुटखमाफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

साताऱ्यातील कॅन्सर पिडीत रुग्ण उपचारासाठी पुण्याला गेला असता सापडला कोरोना बाधित

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मुंबई वरुन प्रवास करुन आलेला 23 वर्षीय युवक व पुणे येथून प्रवास करुन आलेला 8 मे ला विलगीकरण कक्षात दाखल केलेला 36 वर्षीय पुरुष असे एकूण 2 जण कोविड-19 बाधित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे. तसेच सातारा येथील एक कॅन्सर पिडीत उपचारासाठी पुण्याला गेला असता तो कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.

सातारा येथील 50 वर्षीय कॅन्सरपिडीत रुग्ण उपचारासाठी पुणे येथे गेला असता तो कोविड बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने आय. सी. एम. आर. पोर्टलमध्ये सातारा जिल्ह्याच्या यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 3 नवीन कोविड-19 बाधित रुग्णांची नोंद झाली असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

वरील अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 119 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 97, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 20, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मोहम्मद कैफ म्हणतो सौरव गांगुली माझ्यासाठी सर्वोत्तम भारतीय कर्णधार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरव गांगुली हा माझ्यासाठी आजवरचा सर्वोत्तम कर्णधार आहे असे भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने म्हटले आहे. Helo लाईव्हमध्ये गप्पा मारताना कैफने हा खुलासा केला आहे. यावेळी त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. यावेळी सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि एमएस धोनी यांच्यात कैफने गांगुलीला सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवडले.

या वेळी कैफने सांगितले की, इतरांचा खेळ पाहून कधीही स्वत:च्या खेळात बदलू करु नका. यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुम्हचा नैसर्गीक खेळ करणे गरजेचे आहे सचिन की विराट, या प्रश्नावर उत्तर देताना कैफ म्हणाला की सचिन हा माझा रोल मॉडेल असून त्याच्याकडून प्रेरणा घेऊन मी क्रिकेट खेळत आलोय. वेगवान गोलंदाजांमध्ये कैफने झहीर खानला कपिल देव यांच्यापेक्षा वरचे स्थान दिले.

प्रशिक्षकाच्या मुद्यावर कैफने सांगितले की जॉन राइट हे सर्वोत्तम प्रशिक्षक होते. कैफने आपल्या मुलाखतीत म्हटले की, जगात कोरोना विषाणूमुळे होणारी समस्या पाहून मला अतिशय वाईट आहे मात्र सरकारने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे आपल्याला पालन करावे लागेल.