Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5819

धक्कादायक! अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची तस्करी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

टेम्पोच्या पुढील भागातील काचेवर औषधे आणि अत्यावश्यक सेवेचा कागद चिकटवून कर्नाटकातून क-हाडला जात असलेला तब्बल ८ लाखाचा गुटखा आटपाडी पोलिसांनी पकडला. उंबरगाव येथे तपासणी नाक्यावर बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. चालक ध्रुपचंद प्रेमचंद पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक बजरंग कांबळे यांच्यासह उपनिरिक्षक अजित पाटील, प्रकाश कांबळे, सहाय्यक निरिक्षक सुधीर पाटील, हवालदार नंदकुमार पवार यांनी केली.

याबाबतची माहिती सांगलीच्या अन्न व औषध विभागास देण्यात आली असून फिर्याद घेण्यासाठी दोन दिवस अन्न व औषध प्रशासनाकडे संपर्क सुरू होता. परतू या कार्यालयातून आटपाडी पोलिसांना कोणाताच प्रतिसाद मिळाला नाही. उलट आम्ही फिर्याद दयायची असेल तर आम्हाला येण्या जाण्यासाठी मोटारीची सोय करा असे सांगण्यात आले त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी तपास केला पण गुन्हा दाखल होऊ शकला नाही. लॉकडाऊनच्या पार्श्र्वभूमिवर सांगली आणि सोलापूर जिल्हृयाच्या हद्दीवर उंबरगाव येथे आटपाडी पोलिसांचा तपासणी नाका आहे. सोलापूर सध्या कोरानाबाबतत रेड झोनमध्ये असल्याने जिल्हा बदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्हयातून औषधे असे लिहिलेला कागद काचेवर चिकटवून टेप्मो हा उंबरगाव चेक नाक्यावर आला. हा टेम्पो तपासणीसाठी पोलिसांनी थांबविला. काचेवर औषधे अत्यावश्यक सेवा असे लिहीलेले कागद चिकटविलेले दिसत होते. परंतू त्यावर वाहतुकीचा परवाना देणा-या कोणत्याही अधिकाऱ्याची सही अथवा शिक्का नव्हता. यावरून शंका आल्याने पोलिसांनी टेम्पेातील मालाची पाहणी केली. तेव्हा टेम्पोच्या हौदयामध्ये भुसा भरलेली पेालि आढळून आली. या भुसा पोत्यामागे गुटख्याने भरलेली तब्बल ३१ पोति टेम्पोमध्ये मिळाली. त्यानंतर टेम्पो आटपाडी पोलिस ठाण्याच्या आवारात आणण्यात आला. गुटख्याची पोती टेम्पोतून खाली उतरून पोलिस ठाण्यासमोर ठेवण्यात आली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीने सांगली भाजपात नाराजी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चारजणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिल्ह्यातील व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांचा समावेश आहे. विधानपरिषदेसाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे आणि निता केळकर, दीपकबाबा शिंदे हे निष्ठावंत इच्छुक होते. यंदा निष्ठावंतांना संधी मिळेल याची खात्री असताना पक्षाकडून तिघांनाही डावलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंड करीत बहुजन वंचित आघाडीकडून लढणाऱ्या पडळकरांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील नेते त्यांची नाराजी दूर करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक लागली असल्याने राजकीय पक्षांमध्ये वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीमुळे सांगली जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या जिल्ह्यात भाजपचे एक खासदार आणि दोन आमदार आहेत. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी सांगलीचे गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रविण दटके आणि अजित गोपछडे यांना संधी दिली आहे. विधानपरिषदेमध्ये पडळकरांच्या रुपाने सांगलीला संधी मिळाली. निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना संधी मिळेल, असा विश्वास होता. जिल्ह्यातील काही मंडळींनी वरिष्टांकडे त्याबाबत मागणी केली होती.

जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे, मात्र त्यांचा कालावधी एक वर्षाचा आहे. त्यामुळे देशमुख यांनाच संधी मिळेल, अशी चर्चा होती. याशिवाय जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते व वरिष्टांच्या मर्जीतील प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे यांचेही नाव पुढे आले होते. देशपांडे यांनी त्यासाठी प्रयत्न केला नसला तरी संधी मिळाली स्वीकारणार होते. महावितरणमध्ये संचालिका असलेल्या नीता केळकर या ही विधानपरिषदेसाठी इच्छुक होत्या. मात्र तिघांचाही पत्ता कट झाला.

मुंबईहून सांगलीला आलेल्या तरुणाला भावानेच पोलिसांच्या ताब्यात दिले; तपासणी केली तर कोरोना झालेला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली शहरातील महसूल कॉलनीमध्ये मुंबईतून बेकायदेशीरपणे आलेली एक व्यक्ती कोेरोना पॉझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. जत तालुक्यातील अंकलेमध्येही मुंबईहून आलेल्या एका चाळीसवर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोघेही मुंबईहून सांगलीत बेकायदेशीरपणे आले असल्याची माहिती समोर येत आहे.

सांगलीतील महसूल कॉलनीमध्ये ५ मे रोजी रात्री मुंबईहून ‘तो’ तरुण घरी आला होता, पण पूर्वीपासूनच त्याचे घरच्यांसोबत वाद होते, यामुळे तरुण व त्याच्या भावामध्ये त्याला घरी घेण्यावरुन जोरदार वादावादी झाली. यावेळी त्या भावाने पोलिसांना पाचारण करुन हा तरुण बेकायदेशीरपणे मुंबईहून आल्याचे सांगितले होतेे. त्यानंतर पोलिसांनी त्याला सक्तीने क्वॉरंटाईन केले होते. त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे आता त्या कुटुंबियांसह अनेकांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून बापट मळा परिसर सील करण्यात आला आहे. सायंकाळी उशिरा या ठिकाणी औषध फवारणीची प्रक्रिया सुरु होती.

सदर कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबियांना व नातेवाईकांना आरोग्य पथकाने संस्था क्वॉरंटाईन केले असून त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीतील आठ कोरोना रुग्णांपैकी निगडीतील दोघी कोरोनामुक्त झाल्या होत्या , मात्र त्याचदिवशी पुन्हा दोन रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांची आठ संख्या कायम राहिली. दरम्यान सांगलीतील बाधिताचे दहाजणांचे कुटुंबिय व इतर संपर्कातील आलेल्या ३४ जणांचे क्वारंटाईन करण्यात आले आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९,०६३ वर; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण

मुंबई । राज्यातील कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. त्यामुळे दरोरोज मोठ्या संख्येत कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, आज राज्यात कोरोनाचे आणखी १०८९ रुग्ण वाढले आहेत. तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १९,०६३ वर पोहोचली आहे. आज राज्यात कोरोनाचे १६९ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात आज वेगवेगळ्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले असून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण किती मृत्यू याची आकडेवारी खालिलप्रमाणे. जिल्ह्याच्या नावापुढील संख्या ही त्या भागात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची आहे तर कंसातील संख्या हा मृतांचा आकडा आहे.

मुंबई महानगरपालिका: १२,१४२ (४६२)
ठाणे: १०१ (२)
ठाणे मनपा: ७२४ (८)
नवी मुंबई मनपा: ७१६ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २८४ (३)
उल्हासनगर मनपा: १५
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: १९२ (२)
पालघर: ४६ (२)
वसई विरार मनपा: १९४ (९)
रायगड: ८१ (१)
पनवेल मनपा: १३२ (२)
ठाणे मंडळ एकूण: १४,६४८ (४९७)
नाशिक: ४७
नाशिक मनपा: ६०
मालेगाव मनपा: ४५० (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ८२ (१२)
जळगाव मनपा: १४ (२)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण: ७५७ (३२)
पुणे: ११० (४)
पुणे मनपा: १९३८ (१३२)
पिंपरी चिंचवड मनपा: १२९ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: १७९ (१०)
सातारा: ९४ (२)
पुणे मंडळ एकूण: २४५६ (१५१)
कोल्हापूर: १० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
सिंधुदुर्ग: ५
रत्नागिरी: १७ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ७३ (३)
औरंगाबाद:५
औरंगाबाद मनपा: ४१८ (१२)
जालना: १२
हिंगोली: ५८
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४९५ (१३)
लातूर: २५ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २९ (२)
लातूर मंडळ एकूण: ६१ (३)
अकोला: ९ (१)
अकोला मनपा: ११२ (९)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ७६ (१०)
यवतमाळ: ९५
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ३२१ (२२)
नागपूर: २
नागपूर मनपा: २१० (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २१८ (२)
इतर राज्ये: ३४ (८)
एकूण: १९ हजार ६३ (७३१)

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोमवारपासून गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सुरू; असे नोंदवा नाव

मुंबई । लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागात नागरिक, विद्यार्थी गेल्या मागील काही दिवसांपासून अडकले आहेत. अशा अडकून पडलेल्यांना लोकांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना आपल्या गावाला जायचे आहे, त्यांना सोमवारपासून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही. या सर्वांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली असून एकावेळी एका बसमधून केवळ २२ प्रवाशांनाच गावाला जाता येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. येत्या १७ मेपर्यंतच ही सुविधा असेल असंही त्यांनी सांगितलं.

असे नोंदवा नाव
ज्या लोकांना आपापल्या गावी जायचे आहे त्या लोकांनी २२ जणांची एक यादी करावी. शहरातील लोकांनी ही यादी पोलीस ठाण्यात द्यावी, तर गावातील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी. त्यात त्यांचा मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यात कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी जायचं आहे, याची माहिती नोंदवायची आहे. २२ जणांचा ग्रुप झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकारी त्यांना बस सुटण्याचे ठिकाण सांगतील, त्यानंतर डेपोत येऊन बसमधून गावाला जायचे आहे. प्रत्येकाने आपल्या खाण्यापिण्याची स्वत:च व्यवस्था करावी. सोमवारपासून प्रत्येकाला आपल्या गावी जाता येणार असून त्यासाठी कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही, असं राज्याचे परिवहन अनिल परब यांनी सांगितलं आहे.

प्रवासाच्या अशा असतील नियम व अटी
एसटीत केवळ २२ प्रवाशांनाच बसण्याची परवानगी दिली जाईल. प्रत्येक सीटवर एकच प्रवासी असेल. मास्क लावून आलेल्या प्रवाशांनाच एसटीत प्रवेश असेल. कुणीही पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात परवानगी मिळावी म्हणून गर्दी करू नये. गावाकडे पोहोचल्यानंतर या प्रवाशांची तपासणी करायची की नाही याचा निर्णय संबंधित नोडल अधिकारीच घेतील. राज्यातील कोणत्याही रेड झोन कंटेन्मेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. तसेच कुणालाही कंटेन्मेंट झोनमध्ये सोडलं जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रवासापूर्वी आणि नंतर एसटीचं संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

वैयक्तीक प्रवासासाठी पोर्टल
ज्यांना खासगी वाहनाने वैयक्तिक प्रवास करायचा आहे. त्यांना तशी परवानगी देण्यात येईल. त्यांच्यासाठी सोमवारपासून एसटीचं पोर्टल सुरू होणार आहे. या पोर्टलवरून परवानगी घेतल्यावरच वैयक्तिक प्रवासाला मुभा देण्यात येणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आपल्या मृत्यूच्या बातमीवर अमित शहा म्हणतात…

नवी दिल्ली । काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहयांच्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अशावेळी अमित शाह यांनी या अफवांचे खंडन करत आपण ठीक असल्याचे सांगितलं. अमित शहा यांनी शनिवारी ट्विटवरुन आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन केलं आहे. ट्विटवरुन त्यांनी एक निवेदन पोस्ट केलं असून त्यामधून त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांनाही खडे बोल सुनावले आहे. अमित शाह यांच्या तब्बेसंदर्भात मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर उलट सुलट चर्चा सुरु होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केलं आहे.

आपल्या पोस्ट मध्ये अमित शहा म्हणाले कि, ”मागील काही आठवड्यांपासून माझ्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली अशी सुरुवात करत अमित शाह यांनी कामात व्यस्त असल्याने आपण या अफवांकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. मात्र पक्ष कार्यकर्ते आणि शुभचिंतकांच्या काळजीपोटी आज आपण ठणठणीत असल्याचं मला सांगावं लागत असल्याचेही शाह यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विटवरुन ‘माझ्या तब्बेतीची चिंता करणाऱ्या सर्वांसाठी माझा संदेश’ या कॅप्शनसहीत एक निवेदन ट्विट केलं आहे.

अमित शहांची हीच ती पोस्ट-

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मृत म्हणून मुलाने पुरले, ३ दिवसांनी बाई आली जिवंतपणे बाहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । उत्तर चीनमधील पोलिसांनी तीन दिवसांनंतर एका महिलेला तिच्या थडग्यातून जिवंत सोडवले आहे. या महिलेच्या मुलावर असा आरोप आहे की त्याने आपल्या आईला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिला मेलेले घोषित करून पुरले. तीन दिवसानंतर या महिलेस बेशुद्ध अवस्थेत ताब्यात घेण्यात आले. तिला मातीमध्ये हलकेच दफन करण्यात आले होते. आरोपी व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तिने पोलिसांना सांगितले की २ मे रोजी तिचा नवरा त्याच्या आईला गाडीत घेऊन गेला होता. सायंकाळी जेव्हा उशिरापर्यंत ती घरी परत आली नाही तेव्हा तिला संशय आला.

आरोपी व्यक्तीच्या पत्नीकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आणि त्याच्या आईबद्दल त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणातळे वास्तव समोर आले. आरोपीची ओळख ५८ वर्षीय मा अशी आहे, ज्याने आपल्या ७९ वर्षीय आई वांगला जिवंत दफन केले.

लोकांनी ऐकला एक प्रकारचा आवाज 
आसपासच्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा तो व्यक्ती महिलेला गाडीत घेऊन जात होता, तेव्हा ती विव्हळत होती. यावेळी ती वाचवण्यासाठी मोठ्याने आवाज देत होती. डेली चायना या वृत्तपत्रासह अनेक वृत्तपत्रांनी असे लिहिले आहे की पोलिस खात्याकडून त्यांना या संदर्भात कोणतेही अधिकृत अशी प्रतिक्रिया मिळालेली नाही. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणाची अद्याप त्याची चौकशी सुरू आहे, त्यामुळे त्याविषयी कोणतीही अधिक माहिती देता येणार नाही.

आईच्या देखभालीने तो माणूस कंटाळला होता
चायना डेली या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेला अर्धांगवायू झाला होता आणि तिचा मुलगा आईच्या देखभालीने कंटाळलेला झाला होता. ज्यामुळे त्याने असे पाऊल उचलले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगींना हृदयविकाराचा तीव्र झटका

रायपूर । छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना त्याच्या राहत्या घरी हृदय विकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित जोगी यांचे पुत्र असलेलया अमित जागी यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीप्रमाणे, अजित जोगी आज शनिवारी दुपारी आपल्या राहत्या घरी नाश्ता करत असताना अचानक त्यांची तब्बेत बिघडली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अमित जोगी यांनी सांगितलं.

दरम्यान, छत्तीसगढचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अजित यांचे पुत्र अमित जोगी यांना फोने करून अजित जोगी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी अमित यांनी वडिलांची तब्बेत सध्या ठीक असून चिंता करण्याची गोष्ट नसल्याचे सांगितले. अमित जोगी यांच्याशी बोलताना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्य सरकार प्रत्येक संभव मदत करेल असे आश्वासन दिलं. अजित जोगी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जातात. मात्र, २०१६ मध्ये काँग्रेसमधील मदभेदामुळं त्यांनी जनता कांग्रेस छत्तीसगढ़ (जे) हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. काही काळापूर्वी झालेल्या अपघातात अजित जोगी यांचा एक पाय अधू झाला. तेव्हापासून अजित जोगी हे व्हिल चेअरवर होते.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

…अन गर्भवती महिलेने दिला रस्त्यावरच मुलाला जन्म, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या झेजियांग प्रांतात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक गर्भवती महिला काही कामानिमित्त बाजारात गेली होती आणि परत जात असताना अचानक तिने रस्त्यावरच मुलाला जन्म दिला. या घटनेनंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही संपूर्ण घटना जवळच्याच दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, या महिलेची ही पहिलीच गर्भधारणा होती आणि या घटनेच्या वेळी फक्त तिचा वृद्ध काकाच तिच्यासोबत उपस्थित होता. त्या महिलेने मुलाला जन्म देताच ती रस्त्यावर पडली, त्यानंतर व्हिडिओमध्ये ती महिला रडताना दिसत आहे. यावेळी तेथील आजूबाजूचे काही रहिवासी त्या महिलेला मदत करतानाही दिसत आहेत, तर काही जण संपूर्ण घटना पाहिल्यानंतर निघून गेले. प्रत्यक्षदर्शिनी सांगितले की ही महिला रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करत असताना जवळपास १० वाहनांनी तिला रुग्णालयात नेण्यास नकार दिला.

https://youtu.be/SgZvkRZUlQk

महिला आणि मूल दोघेही सुखरुप आहेत
चीनमधील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार ही संपूर्ण घटना ४ मे रोजीची आहे आणि त्या महिलेचे नाव चेन असे सांगितले जात आहे. चेनने सांगितले की तिला एक मुलगा झाला आहे आणि तो आता पूर्णपणे ठीक आहे. चेनने कबूल केले की त्यावेळी एका क्षणी तिला असे वाटले होते की आता आपल्या मुलाला वाचवणे शक्य नाही.तिने सांगितले की मला काहीच समजू शकले नाही आणि अचानक वेदना सुरू झाल्याच्या १० मिनिटातच माझी प्रसूती झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर बऱ्याच महिलाही कमेंट करत ​​आहेत. एका महिलेने लिहिले की माझ्या प्रसूतीसाठी काही तास लागले, चेन भाग्यवान आहे की हे सर्व काही इतक्या लवकर झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोणत्याही लसीशिवाय कोरोना नाहीसा होईल; डोनाल्ड ट्रम्प यांचा विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगात आत्तापर्यंत अनेक आजार आले आहेत आणि कोणत्याही लसीशिवाय ते निघून गेले तसाच करोनाही जाईल. हे सगळं लगेच घडेल का? तर तसं माझं म्हणणं नाही. मात्र एक वेळ अशी येईल की करोना नाहीसा झालेला असेल. असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. द गार्डियन’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

अमेरिकेत कोरोना मृत्यूंची संख्या ९५ हजार किंवा त्यापेक्षाही पुढे जाईल. अस ही ते म्हणाले. सध्या सगळं जग करोनाचा सामना करतं आहे. जगभरातल्या २०० देशांवर करोनाचं संकट कोसळलं आहे. अनेकांचा या रोगाची लागण झाल्याने मृत्यूही झाला आहे. मात्र तरीही कोणत्याही लसीशिवाय कोरोना नष्ट होईल. असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे ७५ हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. तर १३ लाखांपेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अमेरिका सध्या मोठ्या संकटात आहे. मात्र अस असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी एक सकारात्मक विश्वास व्यक्त केला आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”