Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5820

भारताने ‘असा’ दाखवाला पाकव्याप्त काश्मीरवर आपला हक्क; पाकिस्तानचा तिळपापड

नवी दिल्ली । संपूर्ण जग कोरोनाशी मुकाबला करत आहे अशा संकटातही भारत-पाक संघर्ष अजून पेटतच आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर अजूनही तणाव असून पाकच्या कुरापती याही काळात सुरु आहेतच. त्याला थेट मैदानावर भारताने चोख प्रत्युत्तर दिलंच. पण अनेकदा लढाई मैदानाच्याबाहेरही खेळली जाते. कदाचित म्हणूनच आणखी एका नव्या माध्यमातून भारताने पाकव्याप्त काश्मीरवरचा आपला दावा बळकट केला आहे.

भारतीय वेधशाळा देशातल्या विविध भागांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर करते. त्यात शुक्रवारपासून त्यांनी पाकव्याप्त काश्मीरचाही उल्लेख सुरु केला. मुजफ्फराबाद, गिलगिट, बल्टिस्तान या जागांचा स्वतंत्र उल्लेख आयएमडीने सुरु केला आणि त्यावरुन तिकडे पाकिस्तानचा जळफळाट व्हायला सुरुवात झाली. भारताचं हे पाऊल बेकायदेशीर असून याआधीही त्यांनी असे नकाशे आणण्याचा निरर्थक प्रयत्न केल्याची टीका पाकिस्तानकडून सुरु झाली.

कलम 370 रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीर राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित भाग बनवण्यात आले. तेव्हापासूनच हा उल्लेख सुरु केल्याचं आयएमडीचं म्हणणं आहे. फक्त आधी हा उल्लेख प्रादेशिक हवामान वृत्तात यायचा. आता मात्र आयएमडीच्या नॉर्थ वेस्ट वेदर झोनमध्येही त्यांचा स्वतंत्र उल्लेख सुरु केला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर रोज प्राईम टाईममध्ये हे वेदर बुलेटिन दाखवलं जातं. लवकरच खासगी चॅनेलही वेदर बुलेटिनमध्ये पीओकेचा उल्लेख करतील असं माहिती आणि प्रसारण खात्याने म्हटलं आहे.

काश्मीर खोऱ्याचा अंदाज देताना आयएमडीकडून आधी जम्मू काश्मीर असाच उल्लेख असायचा. पण आता जम्मू काश्मीर, लडाख, मुजफ्फराबाद, गिलगिट बल्टिस्तान असा तपशीलवार उल्लेख सुरु झाला. मुजफ्फराबाद हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतं. तर गिलगिट, बल्टिस्तान हे भाग पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या बळकावल्याचा भारताचा आरोप आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तांची कराडला भेट

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी शनिवारी कराडला भेट दिली. यावेळी आयुक्त म्हैसकर यांनी शासकीय विश्रामगृहात प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेऊन काही महत्वपूर्ण सूचनाही केल्या आहेत.

https://hellomaharashtra.in/maharashtra-news/how-karad-corona-patients-reached-upto-57-karad-corona-news/

कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. एकट्या कराड तालुक्यात कोरोनाचे तब्ब्ल ८६ रुग्ण आत्तापर्यंत सापडले आहेत. त्यामुळे पाहणी करण्यासाठी आयुक्त म्हैसकर यांनी कराड शहराला भेट दिली असल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी कृष्ण हॉस्पिटल ला भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच मलकापूर येथील अहिल्यानगरमधील कंटेनमेंट झोनची त्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Shekhar Sinh

दरम्यान, आयुक्त म्हैसकर यांनी सर्व अधिकाऱ्यांची कराड विश्रामगृह येथे आढावा बैठक बोलावली होती. सदर बैठकीत आयुक्त म्हैसकर यांनी कृष्णा रुग्णालय, कराड उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असणारे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, पोलीस कर्मचारी यांच्या कार्यपध्दतीची माहिती घेतली.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.” 

धक्कादायक! मशरुम खाल्ल्याने ६ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मेघालयातील पश्चिम जेंटिया हिल्स जिल्ह्यातील दुर्गम गावात सहा लोकांचा मृत्यू झालेल्या विषारी मशरूमची ओळख अमानिता फेलो म्हणून झाली आहे. शनिवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की याला सामान्यतः ‘डेथ कॅप’ मशरूम म्हणतात.

गेल्या महिन्यात, अमलरेम नागरी उपविभागामध्ये भारत-बांग्लादेश सीमेजवळील लमीन गावच्या सहा जणांचा मशरूम खाऊन मृत्यू झाला होता.त्यांनी ते जवळच्याच जंगलातून तोडून आणले होते. मृतांमध्ये एक १४ वर्षाची मुलगीही होती.

राज्य आरोग्य सेवा संचालक डॉ. अमन वॉर यांनी पीटीआय-शी बोलताना सांगितले की, या वन्य मशरूमची ओळख अमानिता फालोइड्स म्हणून झाली आहे, ज्यामुळे यकृताचे थेट नुकसान होते. ते म्हणाले की,हा विषारी मशरूम त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यावर याची पुष्टी झाली आहे. मशरूम खाल्ल्यानंतर तीन कुटुंबातील किमान १८ लोक आजारी पडले.यावर ज्येष्ठ डॉक्टर म्हणाले की विषारी मशरूम खाल्ल्यानंतर उलट्या, डोकेदुखी आणि शुद्ध हरपणे यासारकाही लक्षणे आढळतात. ते म्हणाले की, आजारी पडलेल्या गरोदर महिलेसह इतर बरेचजण आता बरे झाले आहेत आणि घरी गेले आहेत.हे खाल्ल्यानंतरही लोक यातून वाचू शकतात,मात्र त्याचे किती प्रमाणात सेवन केले यावर सर्वकाही अवलंबून आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

बदली होताच प्रविण परदेशींचा रजेसाठी अर्ज

मुंबई । मुंबई महापालिका आयुक्तपदावरून शासनाने पायउतार केल्यानंतर प्रविण परदेशी यांनी रजेसाठी सरकारकडे अर्ज केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ई-मेलद्वारे परदेशी यांनी सरकारकडे रजेसाठी अर्ज केला आहे. परदेशी यांची बदली नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदी झाली होती.  प्रविण परदेशींनी नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर रजेचा अर्ज केला. दरम्यान, परदेशी यांच्या जागी राज्य शासनातर्फे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी इक्बाल सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परदेशींनी केलेला अर्ज अद्याप स्वीकारला गेलेला नाही. तसेच आज आणि उद्या मंत्रालयाला सुट्टी आहे, त्यामुळे परदेशींचा रजेचा अर्ज सोमवारी स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. परदेशी यांच्या बदलीमागे मुख्य सचिव अजय मेहता आणि त्यांच्यात असलेले मतभेद कारणीभूत असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर मुंबईतील हाताबाहेर जाणारी कोरोनाची स्थिती, प्रशासनात नसलेला समन्वय, आरोग्य व्यवस्था सुधारण्यात आलेलं अपयश, लॉकडाऊनबाबत काढलेले वेगवेगळे आदेश यावरून मुंबईत गोंधळाच वातावरण आहे.

त्यातच सायन रुग्णालयात रुग्णांच्या वॉर्डमध्ये कोरोनाचे मृतदेह ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मुंबई महापालिका आणि राज्य सरकावर जोरदार टीका होऊ लागली. परदेशींच्या बदलीचे हे तत्कालीन कारण ठरलं. आता नाराज असलेल्या परदेशींनी रजेसाठी अर्ज टाकला, त्यापुढे ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकार आणि प्रशासनात समन्वय नसल्याचे आढळून आले. यावरुन राज्य सरकारवर विरोधकांनी टीका देखील केली. या पार्श्वभुमीवर प्रविण परदेशी यांची बदली करण्यात आली. कोरोना काळात समन्वय पालिका प्रशासनाकडू समन्वयाचा अभाव दिसला. आरोग्य सेवा सुधारण्यात अपयश दिसले. महापालिका रुग्णालयांमधील गैरसोयींबद्ल अनेक तक्रारी समोर आल्या. यासाठी आयुक्तांना जबाबदार धरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अहमदाबाद सील; भाजपने केरळ, दिल्ली सरकारला मागितली मदत..हे कसले गुजरात माॅडेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या सहा दिवसांत गुजरातमध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू हे गेल्या सहा दिवसांतील आहेत.त्यामुळे झालेल्या एकूण मृत्यूची संख्या ही ६ मे रोजी ३९६ वर पोहचली आहे अशातच केंद्र सरकार आणि माध्यमांचे लक्ष हे सातत्याने बंगालवर केंद्रित झाले होते.

जर आपण गेल्या काही दिवसांपासून टीव्ही चॅनेलवरच्या बातम्या काळजीपूर्वक पाहत असाल तर आपल्याला हे जाणवेल की बंगालमध्ये कोरोनाशी सामना करण्यास ममता बॅनर्जी यांचे सरकार कसे अपयशी ठरले आहे हेच अगदी ठळकपणे दाखविण्यात येत होते. परंतु त्याच्या तुलनेत गुजरातमधील अहमदाबादच्या परिस्थितीबद्दल मात्र कोणीही काहीही सांगण्यास तयार नव्हते.

Total lockdown in Ahmedabad to curb Corona spread - The Financial ...

आज अहमदाबादची परिस्थिती अशी आहे की रुग्णालयात येण्याच्या ३० मिनिटांतच बरेच रुग्ण हे मृत्युमुखी पडत आहेत.अशा परिस्थितीमुळेच औषधे आणि दूध वगळता परिसरातील इतर सर्व दुकाने ही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय काल रात्री घेण्यात आला आहे.

यासंदर्भातील बातम्यांचा शोध घेतल्यास अहमदाबाद महानगरपालिकेला यासाठी जबाबदार धरले जात आहे.अहमदाबाद महानगरपालिकेच्या निर्णयानंतरही जिल्ह्यातील लोकं सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास विसरले आहेत आणि दुकानांवर प्रचंड प्रमाणावर गर्दी करत आहेत. लोक सर्व काही व्यवस्थित झाल्यासारखे रस्त्यावर फिरत आहेत.

Corona, Gujarat, Crosses 2000 Positive Cases, Ahmedabad - Corona ...

ही संपूर्ण चूक ‘अहमदाबाद महानगरपालिकेनेच केलेली आहे तसेच केंद्रातील मोदी सरकारची आणि राज्यातील भाजपा सरकारची यात कोणतीही चूक नाही, अशाच पद्धतीने बातमी वेबसाइटवर सादर केली जात आहे.होम डिलिव्हरी, स्विगी आणि झोमॅटो यासारख्या सेवांवरही बंदी घातली गेली आहे, परंतु आतापर्यंत या सेवा कशा कार्यरत होत्या याबाबदल न्यूज चॅनेल्सही आता सांगत आहेत.

अहमदाबादची परिस्थिती इतकी बिकट आहे की या संपूर्ण शहर हे कोरोनाव्हायरसच्या जखडत अडकले आहे.येथे आतापर्यंत कोरोनाचे ४ हजार ७४६ रुग्ण समोर आले आहेत, अहमदाबादमधील संसर्गाचे हे प्रमाण राष्ट्रीय दरापेक्षा दुप्पट आहे.शहरात सुमारे २० हजार लोकांना क्वारंटाईन ठेवले आहे तर २९८ लोक मरण पावले आहेत. शहरातील १००० खाटांची क्षमता असणारी ९ खाजगी रुग्णालयेही ताब्यात घेण्यात असून सर्व खासगी दवाखाने, नर्सिंग होम तसेच रुग्णालये हे पुढील ४८ तासात उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि तसे न केल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील असेही या आदेशात सांगण्यात आले आहे.

Ahmedabad crosses 250 cases, most from clusters | Ahmedabad News ...

गुजरातमधील एकूण प्रकरणांपैकी ७० टक्के प्रकरणे ही एकट्या अहमदाबादमधील आहेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरात सगळीकडे जवळपास कर्फ्यू लावण्यात आलेला आहे.शहरात निमलष्करी दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले आहे. अहमदाबादमध्ये निमलष्करी दलाच्या ३८ कंपन्या रस्त्यावर गस्त घालत आहेत. त्यापैकी ४ बीएसएफ तर १ सीआयएसएफ कंपनी या केंद्राने पाठविल्या आहेत.

इकडे स्थिती इतकी बिकट झालेली आहे की दिल्ली येथील एम्स रुग्णालयातील तीन तंज्ञाना लवकरच अहमदाबादला विशेष विमानाने पाठविण्याची तयारी केली जात आहे.अशा वाईट परिस्थितीत गुजरातला ढकलणे हि केवळ आणि केवळ भाजपाच्याच राज्य व केंद्र सरकारचीच जबाबदारी आहे असे बोलले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाावामुळे जगातील विकसित देशांमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. भारतात तशी वेळ येणार नाही, असे तुर्तास वाटते. तरीही आपण संपूर्ण देशात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

शनिवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे की, “इतर विकसित देशांप्रमाणे आपल्याकडे परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता आम्हाला वाटत नाही. मात्र तरीही गंभीर परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने आम्ही पूर्ण तयारी केली आहे” अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या देशात कोरोनाचा मृत्यूदर ३.३ टक्के इतका आहे. तर कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २९.९ टक्के इतके आहे. हे चांगल्या परिस्थितीचे द्योतक आहे. याशिवाय, सध्याच्या घडीला कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची कालावधी (डबलिंग रेट) ९.९ दिवस इतका आहे. गेल्या तीन दिवसांचा विचार करता हा कालावधी ११ दिवसांचा झाल्याची माहितीही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.

गेल्या २४ तासांमध्ये देशात ३३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ५९ हजार ६६२ इतकी झाली आहे. यापैकी ३९ हजार ८३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर १७ हजारहून अधिक लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. देशातील ४२ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्यामुळे ही सुद्धा प्रोत्साहनपर बाब ठरत आहे. नागरिकांनी स्वयंशिस्तीचं पालन केल्यास परिस्थिती बऱ्याच अंशी सुधारू शकते. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा वाढला असून तो १२ दिवसांवरून आता १० दिवसांवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये केंद्राची पथके सातत्याने पाहणी करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी दिली.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

SBI ला झटका! ४११ करोड रुपयांचा चूना लाऊन ‘या’ कंपनीचा मालक भारतातून फरार

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) ११ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामदेव इंटरनॅशनल असे फसवणूक केलेल्या कंपनीचे नाव असून कंपनीचे मालक भारतातून फरार झाले असल्याचे समजत आहे. सदर प्रकार उघड झाल्यानंतर या कंपनीचे मालक देशातून पळून गेले आहेत. सीबीआयने अलीकडेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. एसबीआयने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यापूर्वीच ते देश सोडून पळून गेले असल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

एसबीआयच्या तक्रारीवरून या लोकांविरोधात गुन्हा दाखल
पश्चिम आशियाई देश आणि युरोपियन देशांना बासमती तांदूळ निर्यात करणार्‍या कंपनीविरूद्ध तसेच त्याचे संचालक नरेश कुमार, सुरेश कुमार आणि संगीता यांच्याविरोधात सीबीआयने नुकतीच एसबीआयच्या तक्रारीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी एसबीआयची १७३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप एसबीआयने केला आहे.

कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये हि बँक पण आहे सामील
एसबीआयने तक्रारीत म्हटले आहे की, कंपनीकडे करनाल जिल्ह्यात तीन राईस गिरण्या, आठ सॉर्टिंग आणि ग्रेडिंग युनिट आहेत. कंपनीने सौदी अरेबिया आणि दुबई येथे व्यवसायासाठी आपली कार्यालये देखील उघडली आहेत. एसबीआय व्यतिरिक्त ज्या बँकांनी या कंपनीला कर्ज दिले आहे त्यांच्यामध्ये कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि कॉर्पोरेशन बँक यांचाही समावेश आहे.

लॉकडाऊनमुळे छापे पडले नाहीत
अधिकाऱ्यांनी सांगितले की कोरोना व्हायरसमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अद्याप या प्रकरणात कोणतेही छापे घालण्यात आलेले नाहीत. या प्रकरणातील आरोपींना बोलावण्याची प्रक्रिया तपास यंत्रणा सुरू करणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी तपासात सामील झाले नाहीत तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. एसबीआयच्या तक्रारीनुसार, २७ जानेवारी २०१६ रोजी या कंपनीचे खाते नॉन परफॉर्मिंग एसेट्स (एनपीए) झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! मुंबईत २ पोलिसांवर माथेफिरूने केला कोयत्याने हल्ला

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले केले जात असल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या असून त्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. असाच एक हल्ल्याची घटना पहाटे मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे घडली. हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला हटकल्याने या माथेफिरू तरुणाने गस्तीवरील दोन पोलिसांवर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत. करण प्रदीप नायर असं या माथेफिरूचं नाव आहे. तो ब्रीच कँडीच्या सिल्व्हर ओक इस्टेटमध्ये राहतो. हल्लेखोर माथेफिरुला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस उपनिरीक्षक शेळके हे आज मध्यरात्री दीड वाजता मरीन ड्राइव्ह येथे नाकाबंदीच्या ड्युटीवर होते. यावेळी त्यांना प्राणसुखलाल मफतलाल हिंदू स्विमींग बाथ अँड बोट क्लब येथे नायर हातात कोयता घेऊन फिरत असल्याचं दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवून हटकण्याचा प्रयत्न केला असता नायरने तेथून पळ काढला. त्यामुळे या दोन्ही पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता नायरने त्यांच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला.

या हल्ल्यात कदम यांच्या खांद्याला तर शेळके यांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच डिसीपी संग्रामसिंग निशानदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी पोलिसांना तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी नायरला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नायर हा कृषी विषयातील पदवीधर आहे. तो मध्यरात्री कोयता घेऊन घराबाहेर का आला होता? याचाही तपास पोलीस करत आहेत. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी या घटनेवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. लॉकडाऊनच्या काळात जीव धोक्यात घालून दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही. कुणाचीही अशी अरेरावी कदापिही खपवून घेतली जाणार नाही, आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल, असं सांगतानाच मनोधैर्य खचू देऊ नका, असं आवाहन देसाई यांनी पोलिसांना केलं आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

नोकरी गेली तरी घाबरू नका! मोदी सरकारची ही योजना आपल्याला देईल पुढील २ वर्षांसाठी पगार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहे. यामुळे बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे तर कुठेतरी वेतन कपात केली जात आहे. या संकटात असे कोणतेही उद्योग नाही आहेत जेथे लोकांच्या नोकर्‍यावर संकट आलेले नाही. बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपातही सुरू केली आहे. आपल्याला देखील नोकरी संबंधित समस्या येत असल्यास,ही बातमी आपल्यासाठीच आहे. वास्तविक, केंद्र सरकारची ही एक योजना आहे ज्या अंतर्गत बेरोजगार झाल्यास कर्मचार्‍यास पुढील २४ महिन्यांसाठी पैसे मिळतील.चला तर मग या योजनेबद्दल जाणून घेऊयात ..

Atal Bimit Vyakti Kalyan Yojna Scheme Eligibility & Registration ...

दोन वर्षे आर्थिक मदत
मोदी सरकारच्या या योजनेचे नाव आहे ‘अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजना’ या योजनेंतर्गत आपली नोकरी गेल्यास सरकार आपल्याला पुढील दोन वर्षे आर्थिक मदत करत राहील.ही आर्थिक मदत दरमहा दिली जाईल. बेरोजगार व्यक्तीला हा लाभ गेल्या ९० दिवसांच्या त्याच्या सरासरी उत्पन्नाच्या २५ टक्के इतकाच दिला जाईल. या योजनेचा फायदा ईएसआयसी बरोबर विमा उतरवलेल्या आणि दोन वर्षाहून अधिक काळ नोकरी केलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांनाही मिळू शकेल. याशिवाय या योजनेसाठी आपला आधार क्रमांक तसेच बँक खाते हे डेटा बेसशी जोडणे आवश्यक आहे.

Atal Bimit Vyakti Kalyan Yojana 2019-20

या योजनेसाठी अशा प्रकारे नोंदणी करा
जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सर्व प्रथम ईएसआयसी वेबसाइटवर जाऊन अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेसाठी नोंदणी केली पाहिजे. योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण या लिंकवर क्लिक करून मिळवू शकता:

www.hellomaharashtra.in

या लोकांना योजनेचा लाभ घेता येणार नाही
ज्या लोकांना चुकीच्या आचरणामुळे कंपनीतून काढून टाकले गेले आहे त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय जे कर्मचाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल झालेले आहेत किंवा ज्यांनी सेवानिवृत्ती घेतली (व्हीआरएस)आहे त्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

बोनस सोडा! यंदा पगार कपात होण्याची खासगी कंपनी कर्मचाऱ्यांवर वेळ

नवी दिल्ली । खासगी कंपनीत वर्षभर काम केल्यानंतर प्रत्येक नोकरदारवर्ग मे महिन्याच्या अखेरीपासून पगारवाढ आणि बोनसची वाट पाहत असतो. आपल्या कामाचं कौतुक हे या पगारवाढ आणि बोनसमधून कर्मचाऱ्यांना कंपनी देत असते. पण आता सगळ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना येत्या काळात मोठा शॉक देण्याच्या तयारीत आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता खासगी कंपन्या पगारवाढ आणि बोनस कपात कण्याच्या विचारात आहेत.

काही कंपन्यांचा असा विचार आहे की, पुढील २ ते ३ वर्षांकरता असा नियम बनवला जावा ज्यामध्ये पगारवाढ आणि बोनस दिला जाणार नाही. कंपनी आपल्या पद्धतीने नियम बनवण्याच्या तयारीत आहे. महत्वाची बाब म्हणजे कंपन्यांनी केंद्र सरकारला असं सुचवलं आहे. कंपन्यांची ही गोष्ट जर केंद्र सरकारने मान्य केली तर हा नियम लवकरच लागू होऊ शकतो. काही कंपन्यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांची भेट घेतली. एम्पॉयर्स असोसिएशनने गंगवार यांना काही गोष्टी सुचवल्या. तसेच सरकारला विनंती केली की, २ ते ३ वर्षांकरता कर्मचारी कायद्यात सूट द्यावी. कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि बोनस द्यावा लागणार नाही.जो पगार या २ ते ३ वर्षांत कर्मचाऱ्यांना दिला जातो तो यापुढे कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीच्या अंतर्गत ग्राह्य धरावा.

काम करण्याचा कालावाधी होऊ शकतो १२ तासांचा
पगारवाढ आणि बोनस न देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना काम करण्याचा कालावधी १२ तासांचा करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. कर्मचाऱ्यांसोबत होणाऱ्या वादात डिस्प्यूट ऍक्टमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात यावी. तसेच कारखाना चालवण्यासाठी ५०% कर्मचाऱ्यांना अनुमती द्यावी. लॉकडाऊन संपल्यानंतर एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची परवानगी द्यावी. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत पीएफच्या योजनेचा फायदा कंपन्यांना सर्वाधिक दिला जावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे. या योजनेत सरकार कर्मचारी आणि कपंन्यांच हिस्सा जमा करते. कंपनी चालवण्यासाठी सरकारने मदत करावी. तसेच विजेच्या पुरवठ्याकरता सब्सिडी देण्यात यावी.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”