Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5818

टेस्ट क्रिकेटचे उदाहरण देऊन अनिल कुंबळेने कोरोना विषाणूचा पराभव करण्याचे केले आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने शनिवारी सांगितले की, आम्हाला कोरोनाव्हायरस या साथीला एखाद्या कसोटी सामन्याप्रमाणे घ्यावे लागेल आणि संपूर्ण देशाला त्याविरुद्ध एकत्रितपणे लढावे लागेल आणि जिंकूनही द्यावे लागेल. माजी लेगस्पिनर कुंबळेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

We take a look at some of Anil Kumble's best performances.

कुंबळेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “जर आपल्याला या कोरोनोव्हायरस साथीविरोधात लढायचे असेल तर त्यासाठी आपण संपूर्ण देशाला एकत्र केले पाहिजे. हे एका कसोटी सामन्यासारखे आहे. कसोटी क्रिकेट सामने पाच हे दिवसांचे असतात. परंतु ते बराच काळ चालतात.”

तो म्हणाला की, “कसोटी क्रिकेटमध्ये दोन डाव असतात, परंतु यामध्ये आणखीही काही असू शकतात. त्यामुळे पहिल्या डावात आपण बरीच आघाडी घेतलीये हे पाहून आनंदी होऊ नका कारण दुसरा डाव कदाचित आपल्यासाठी कठीण असू शकतो.”

 

माजी कर्णधार पुढे म्हणाला, “आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. फक्त पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावरच ही जिंकता येणार नाही. आपल्याला हा सामना एकत्रित येऊन जिंकण्याची गरज आहे.”

कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत भारतात १९०० लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील लॉकडाउन हे २४ मार्चपासूनच लागू आहे आणि ते पुढे १७ मे पर्यंत सुरूच राहतील.

10 Wickets in a Cricket Match by Anil Kumble ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच? काँग्रेसनं उतरवला पहिला उमेदवार मैदानात, २ जागांसाठी आग्रही

मुंबई । विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस दुसरा उमेदवार लवकरच जाहीर करेल, असं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. काँग्रेस २ जागांवर ठाम असल्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार नाहीत, असंच चित्र सध्या दिसत आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने ४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर शिवसेना २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जणांना उमेदवारी देणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी २-२ जणांना उमेदवारी दिली तर काँग्रेस एकच उमेदवार उतरवेल, अशी चर्चा होती, पण काँग्रेस २ उमेदवारांसाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीनं पाचचं उमेदवार दिले तर निवडणूक बिनविरोध होईल, ६ उमेदवार दिल्यास मात्र मतदानाची वेळ येणार आहे. काँग्रेस दुसऱ्या जागेसाठीही आग्रही आहे. त्यासाठी वाटाघाटीही चालू आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या चारही उमेदवारांनी फॉर्म भरला. भाजपने प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित केली आहेत. शिवसेनेने ही दोन्ही नावं निश्चित केली असली, तरी त्यांची अधिकृत घोषणा मात्र अजून झालेली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याचा चर्चा आहेत. विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. ११ मे हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, तर १४ मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. ९ पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर मात्र विधानपरिषद निवडणुका होणार, हे अटळ आहे.

दिग्गजांऐवजी काँग्रेसनं दिली एका युवा नेत्याला उमेदवारी
विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये नसीम खान, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडनं अखेर जालन्याचे युवा नेते राजेश राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसकडून अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती, मात्र पक्षानं त्याऐवजी एका युवा नेत्याला संधी दिली आहे. राजेश राठोड हे जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. एनएसयूआयपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव म्हणूनही ते संघटनेत काम करत आहेत.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

एका व्यक्तीला रस्त्यावर सापडला एलियन सारखा दिसणारा विचित्र प्राणी,जाणून घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक माणूस स्ट्रॉ चा वापर करून एका विचित्र दिसणार्‍या प्राण्याला खाऊ घालत आहे. या व्हिडिओद्वारे असा दावा केला गेला होता की त्याला हा विचित्र दिसणारा प्राणी रस्त्यावर पडलेला आढळला आहे आणि त्याचे काय करावे हे त्याला कळाले नाही. या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती हा प्राणी एलियन असल्याचे सांगत आहे.मात्र, जेव्हा हा व्हिडिओ काही तज्ञांपर्यंत पोहोचला तेव्हा एक वेगळेच सत्य समोर आले.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, ट्विटरवर लोक या प्राण्याची तुलना नेटफ्लिक्सवरील ‘स्ट्रेंजर थिंग्स’ या मालिकेत दाखविलेल्या विचित्र खलनायक डेमोगॉर्गनशी करत आहेत. व्हिडिओमधील हा प्राणी खूपच लहान आहे आणि तो खूपच विचित्र दिसत आहे. हे एखाद्या प्राण्याच्या लहान मुलासारखे दिसते. काही लोक ‘वेणम’ चित्रपटाशी संबंधितही गोष्टीही सांगत आहेत.मात्र या काही कमेंट्समध्ये काही जाणकार लोक त्याला पक्ष्याचे पिल्लू देखील म्हणत आहेत.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,या व्हिडिओमध्ये पाहिले गेलेले पिल्लू हे गोल्डियन फिंच नावाच्या पक्ष्याचे आहे. लिव्हरपूल युनिव्हर्सिटीच्या एनीमल बिहेवियर रिसर्चर क्लॉडिया हॉफमन म्हणतात की गोल्डियन फिंच नावाचा हा पक्षी सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करतो, म्हणून त्याची मुलं थोडी वेगळी दिसतात. या पक्ष्याला बर्‍याच भागात लाईव्ह टॉर्च असे देखील म्हणतात. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधक कसंद्रा टेलरच्या मते पिल्लाच्या चेहऱ्याभोवती विचित्र खुणा केल्यामुळे त्याचे वय कळून येते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ‘ट्रान्सपोर्ट’ उद्योगाची चाकं वेगानं फिरती राहणं गरजेचं

थर्ड अँगल | स्नेहल मुथा

कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना विशेषतः छोट्या वाहतूक कंपन्यांना परिवहन पुरवठा साखळीच्या रिंगणात बरेच धक्के खावे लागत आहेत. त्यांची कमाई धूसर होत चालल्याचे चित्र आहे, मात्र खर्चाचं प्रमाण वाढतच आहे. अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसचे (एआयएमटीसी) सरचिटणीस, नवीन गुप्ता यांच्या मतानुसार, अशी शक्यता आहे की , ‘जवळपास ८५% छोट्या कंपन्यांपैकी असंघटित क्षेत्राने व्यापलेल्या कंपन्या या दिवाळखोरीमुळे आणि हप्त्यांमुळे प्रणालीमधून काढल्या जाऊ शकतात. छोट्या वाहनांच्या तांड्याचे चालक हे मुळात १ ते ५ ट्रक आणि ट्रेलरचे मालक असतात. कधी कधी ड्राइव्हर स्वतःच मालक असतात. वाहन खरेदीवर मोठी रक्कम गुंतवल्यामुळे व्यवसाय हा पूर्णतः क्रेडिट वर अवलंबून असतो. ट्रक हे बहुधा हप्त्यावर असतात, मालकाला दर महिन्याला जवळपास ३०,००० ते ७०,००० हजार रुपये हप्ता भरावा लागतो. या सर्वांबरोबरच अनेक प्रकारचे कर, फी आणि विमा असतात.’ नाशिकमधील एका मालवाहू गाडीचे मालक म्हणतात, विमा आणि हप्त्याची अंतिम मुदत जवळ येत आहे, वाहनांच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे कमावलेली सगळी रक्कम खर्च होत आहे. सरासरी एक ट्रक महिन्याला ३ फेऱ्या करतो, एका फेरीला साधारण १,६०,००० रुपये खर्च असतो, ज्यामधून डिझेल, टोल, चेक पोस्ट फी आणि पगार दिले जातात. यातून अंदाजे ३०,००० नफा होतो. म्हणजे या सर्वातून ९०,०००रु नफा होतो ज्यातून हप्ता आणि कार्यालयाची देखभाल हे खर्च होतात. जर ५०% पेक्षा कमी फेऱ्या झाल्या तर आर्थिक अस्थिरतेला सुरुवात होते. नवीन गुप्ता म्हणतात, ‘जरी सरकारने अनावश्यक वस्तू हलविण्यावर आणि त्यांच्या हप्त्यांवर थोडी शिथिलता दिली असली तरी प्रत्येकालाच त्याचा फायदा होईल असे नाही.’ 

हप्ते लांबणीवर टाकणे हा दिलासा नाही – कर्जदारांना थोडा दिलासा देण्यासाठी आरबीआयने हप्त्यांना तीन महिन्यांची सुट्टी जाहीर केली आहे. तथापि व्याज जमा करून घेणे सुरु राहील आणि त्यावर अतिरिक्त व्याजदेखील आकारले जाईल. विशेषतः वाहन कर्जासाठी, हा ३ महिन्यांचा स्थगिती कालावधी तुलनेने आताच्या व्याजाच्या रकमेपेक्षा  महागडा असेल. नागपूरमधील ४ ट्रकचे मालक किरण ठाकूर सांगतात, ‘थोडासा दिलासा देण्यासाठी करण्यात आलेली ही घोषणा येणाऱ्या महिन्यात खूप वेदनादायक ठरणार आहे.’ ते पुढे म्हणतात, ‘सरकारने याचे नियमन केले आहे, मात्र याच्या छुप्या कलमांची माहिती देण्यात ते अयशस्वी ठरले आहेत, माझ्या फायनान्सरने कॉल करून मला याची माहिती दिली आहे. मी यावर स्पष्टीकरण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे पण आतापर्यंत त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.’ फलटण येथील आणखी एक छोटे वाहतूक व्यावसायिक योगेश शिंदे सध्या दर महिन्याला १,२५,००० रु हप्ता भरतात. ३ महिन्यांच्या दिरंगाईच्या मुदतीवर त्यांना १.५% अधिक व्याज द्यावे लागेल. विशेषतः चालक कमी मालक असणाऱ्या अशा वाहतूक व्यावसायिकांना फायनान्सरचे कॉल म्हणजे धोका बनत आहेत. आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील ताडीपल्लीगुड्डम या ठिकाणी अशी एक घटना घडली. ड्राइव्हर कमी मालक असणाऱ्या एकाने फायनान्सरने निर्माण केलेला दबाव आणि त्याच्या सततच्या मागे लागण्याने आत्महत्या केली. 

लॉकडाऊन व्यवस्थित काम करत आहे का? – आतापर्यंत निर्बंधांवर शिथिलता दिली आहे पण ती व्यवस्थित कमी होत आहे का ? हा प्रश्न आहेच. ही सूट मिळूनही सामान्यतः १५-२०% वाहतुकीसाठी पुन्हा दबाव आहे. रस्त्यावर केवळ आवश्यक वस्तू किंवा पूर्वी भरलेले आणि अडकलेले ट्रक आहेत, असे नवीन कुमार सांगतात. याचा अर्थ अद्याप नियमित वाहतुकीचा वेग कमी आहे. आतासाठी उत्पादन केंद्रे आणि गोदामे बंद असल्याने ताजा माल भरणे अडचणीचे झाले आहे. कारखाना आणि वाहतूक व्यावसायिक यांच्यामधले एजन्ट विकास यांच्या मते, ‘१५ एप्रिल पासून आतापर्यंत ७-८ ट्रक भरले आहेत जे पूर्वी महिन्याला ७०-८० असत.’ जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक तरीही चांगले काम करत आहेत. पण अनावश्यक वस्तूंचे ट्रक पूर्वीसारखेच स्थिर आहेत. आणखी एक कारण म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याइतके ड्राइव्हर उपलब्ध आहेत, मनुष्यबळाच्या अभावामुळे काम करण्यात अडथळे येत आहेत. विम्याची अंतिम मुदत येत आहे, वार्षिक परमिटची मुदतही वाढवण्याची गरज पडणार आहे.

ड्राइव्हरची गरज – उपलब्ध ड्राइव्हर हे आधीच काम करत असलेले किंवा स्वतः मालकच आहेत. माझे साधारण २० मालवाहू गाड्यांच्या ड्राइव्हरांशी बोलणे झाले पैकी ११ जण त्यांच्या घरी होते. मनुष्यबळ उपलब्ध न होण्याचे कारण म्हणजे ड्राइव्हर लोकांची काम करण्याची इच्छाशक्ती नाही हे आहे. ट्रक ड्राइव्हर विजय भाटिया यांनी सांगितले, ‘एकदा बाहेर गेल्यावर पोलीस आणि ग्राम पंचायत आम्हाला परत येण्याची परवानगी देणार नाहीत, म्हणून माझ्या घरचे ही  मला जाऊ देत नाहीत. मालक मला कामावर ये म्हणून कॉल करत आहेत पण माझ्याकडे कोणताच पर्याय नाही आणि पगारही कापला जात आहे.’ अशीच अवस्था योगेश यांची आहे, ‘गावकरी आरोग्य केंद्रांना तक्रार करतात आणि मग पोलीस लक्ष घालतात. प्रत्येक ट्रिप नंतर घेतलेल्या उपाययोजनांचे व्हिडीओ करून मी पोलीस आणि ग्राम पंचायत सदस्यांकडे पाठवतो.’ जरी ड्राइव्हरना परत कामावर जायचे असले तरी त्यांना गावावरून परत जाण्यासाठी वाहतूक उपलब्ध नाही.

दुसरे कारण म्हणजे सक्तीचा अलगाव. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरून आंबे घेऊन जाणाऱ्या वाहतूक मालक, चालकांच्या परिस्थितीविषयी सांगताना प्रकाश गवळी म्हणतात, ‘त्यांना ७ दिवस अलगावमध्ये ठेवण्यात आले होते, आधीच कमी कामगार आहेत आणि असे केले तर काम कसे करणार? मागच्या महिन्यात शिरवळमध्ये महाराष्ट्रातील ४६ ड्राइव्हरना अलगाव मध्ये ठेवण्यात आले होते. ज्यापैकी ३५ मालवाहू वाहतूक ड्राइव्हर आहेत. नियम शिथिल झाल्यामुळे आणि कोरोना विषाणूची चिन्हे नसल्यामुळे त्यांना आता परत पाठविले पाहिजे.’ ऑटोमोबाईल इंजिनिअर मणी वर्धाराजन म्हणतात, ‘एका महिन्यापेक्षा अधिक काळ झाला मी माझ्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला होता, त्यांनीही वाढलेल्या संचारबंदीमुळे पास जारी केला होता. मी कोणत्याही कारणाशिवाय या ३५ चालकांसह शिरवळमध्ये अडकलो’ अगदी आता स्थलांतरितांना प्रवासाची परवानगी दिली असली तरी त्यांच्या दळणवळणासाठी काही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत वाहतूक व्यावसायिक कशी हालचाल करतील. संचारबंदी आणि सरकारचे नियम समजू शकतो, पण विसंगती आणि समन्वयाचा अभाव या अनेकांच्या तक्रारी आहेत. खंडाळ्याचे तहसीलदार आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या समन्वयाने या कामगारांना संचारबंदी नियम शिथिल झाल्यानंतर त्यांच्या राज्यात सुखरुप पोहचवण्यात आलं आहे.

संचारबंदीच्या नावाखाली होणाऱ्या चुकीच्या गोष्टी – गृह मंत्रालय मार्गदर्शक तत्त्वे जारी करीत आहेत पण खालच्या स्तरावर ती कागदावर आहेत तशी नाहीत. नवीन गुप्ता सांगतात, ‘कधी कधी राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस अधिकाऱ्यांनाच अपडेट झालेल्या नियमांची माहिती नसते.’ ड्राइव्हरना परवानगी मागितले जाते आणि ते अडकतात. संघटना किंवा मालक पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले की प्रकरण सुटते. अशीही प्रकरणे आहेत की जास्त वेगाच्या कारणाने ड्राइव्हरकडून दंड आकारला गेला आहे. अनावश्यक वस्तूंसाठी परवानगी पत्र नसल्याने चलन केले जात आहे. उर्से टोल नाका इथे अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत, ड्राइव्हरला २०,००० रु दंड आकारण्यात आला होता, नंतर भ्रष्टाचारविरोधी पथकाने लक्ष घातल्यानंतर या ड्रायव्हरचा त्रास कमी झाला. टोल नाके देखील उघडले असून ते मालकांकडून टोल घेत आहेत. महाराष्ट्रातील खबाले ट्रान्सपोर्टचे मालक सुरज खबाले यांनी सांगितले, ‘अहमदाबाद ते सातारा या एका ट्रिप मध्ये एकूण १३,००० रुपयांचा टोल भरावा लागतो. शिथिलतेच्या आधी टोल नाके बंद होते आणि आता ते उघडले आहेत. ना- नफा, ना तोटा अशा छोट्या व्यवसायातील नफा टोलमुळे कमी होत आहे. चोरी आणि दरोडे हे वेगळेच चित्र आहे. विजय यांच्या म्हणण्यानुसार, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीदरम्यान इंधन चोरी आणि वस्तूंच्या दरोडयांना सामोरे जावे लागते आहे. विजय यांच्या गाडीतील १० ते १२,०००रुपयांचे इंधन लुटले गेले आहे. अशाच समस्या इतर चालकांनाही भेडसावत आहेत. प्रवासाच्या मार्गातच या चोरीच्या घटना होत असल्याने त्यांना पोलिसांकडे तक्रारही करता येत नाही. 

भरणे आणि उतरवणे (loading and unloading) – माल भरणे आणि उतरवणे हे संपूर्ण वाहतूक उपक्रमातील छोटेसे काम आहे. असं असलं तरी त्याचीही थोडी समस्या उद्भवलीच आहे. या साथीच्या परिस्थितीत ग्राहक माल भरण्यासाठी अधिक किंमत आकारत असल्याने छोटीशी बचतही आवश्यक झाली आहे. पूर्वी हमाल लोक एका टनाच्या वाहतुकीसाठी ७० ते ८० रु घ्यायचे आता ते तिसऱ्या पार्टीकडून १०० ते ११० रु आकारतात. हे कदाचित जास्त महत्वाचे वाटणार नाही पण जेव्हा सांख्यिकीरीत्या प्रमाण जास्त असेल आणि काम कमी असेल तर रोख रक्कम आणि शिल्लक यांच्या संतुलनात मोठी तफावत दिसून येते. आणि हे ना-नफा परिस्थितीकडे झुकते. एआयएमटीसीच्या नेत्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या बैठकीत वरील मुद्दे केंद्रीय राज्य परिवहनमंत्री सतेज ज्ञानदेव यांना उद्देशून सांगितले. एआयएमटीसीकडून वाहतूक व्यावसायिकांसाठी ‘बचाव पॅकेज’ ची मागणी केली आहे. त्यामध्ये विमा, इतर वैधानिक अनुपालन, टोल कराचे निलंबन यांची अंतिम मुदत सहा महिने पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे. आतासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे निर्देश दिले आहेत. एकूण काय, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हे अर्थव्यवस्था धावती ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या गाड्यांची चाकं फिरली तरच बऱ्याच गोष्टी तात्काळ सुरळीत होणार आहेत.

स्नेहल मुथा या मुक्त पत्रकार असून त्यांना वाचन, प्रवास आणि लिखाणाची आवड आहे. त्यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. संपर्क – 9146041816

मंदिरात पूजा करणार्‍या भाजप नेत्याला केरळ मध्ये अटक; लाॅकडाऊनच्या उल्लंघनाचा ठपका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन लागू केलेला आहे तसेच सरकारने सर्व प्रकारच्या सभांनादेखील बंदी घातलेली आहे. दरम्यान, केरळमधील सार्वजनिक ठिकाणी गर्दी रोखण्यासाठी लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते आणि मंदिरप्रमुखांसह पाच जणांना नुकतेच अटक करण्यात आली आहे. मंदिरातील धार्मिक विधीवेळी मंदिर प्रमुखांनी जमाव गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एरुमापट्टी पोलिसांनी शुक्रवारी इरुमापट्टी येथील पाझीओतमुरी येथे भागवत सप्ताह आयोजित करताना लॉकडाउनच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपच्या प्रदेश इकाईचे नेते ई. चंद्रन, गोपी, सुदानन, नारायणन आणि रामन यांना शुक्रवारी अटक केली. द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इरुमापट्टी येथील नरसिंह मंदिरात शुक्रवारी सकाळी सुमारे १०० लोक भागवत कथा पठण करीत होते.

पोलिसांनी सांगितले की, मंदिरात भगवत कथा चालू होती. दरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आणि इतर काहीजण हे पळून गेले.ते म्हणाले की अटक केलेल्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही मंदिर बंद झाले नव्हते तसेच लोक दररोज प्रार्थना करण्यासाठी मंदिरात येतच होते.

केरळमध्ये शुक्रवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाचे फक्त एकच प्रकरण समोर आले आणि त्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन म्हणाले की कोविड -१९ च्या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये सध्या संसर्ग झालेल्या १६ लोकांवर उपचार सुरू आहेत. विजयन पुढे म्हणाले की, राज्यात संसर्ग पुन्हा सुरू न होऊ देण्यासाठी नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

शाळेच्या ‘फी’मध्ये वाढ केल्यास कडक कारवाई; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा

मुंबई । लॉकडाऊनमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे शाळांनी जादा फी आकारू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातचं आता शाळा सुरू झाल्यावर मुलांची फी कशी भरायची असा प्रश्न सर्वसामान्य पालकांच्या समोर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना दिलासा देणारा निर्णय वर्षा गायकवाड यांनी हा घेतला आहे. खासगी शाळांनी जादा शुल्क आकारल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षण मंत्र्यांनी दिला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, ”की ज्या खाजगी शाळा पालकांकडून ज्यादा शुल्क आकारतील अशा शाळांवरती कार्यवाही करू. त्याचबरोबर दरवर्षी शैक्षणिक वर्ष १५ जूनला होतं. याही वर्षी १५ जूनलाच शाळा सुरू करण्याचा मानस आहे. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता यावर पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर खासगी शाळांनी शुल्क वाढवू नये, पालकांना सोयीचे पडेल तशा पद्धतीने टप्प्यांमध्ये शाळांनी पालकाकडून शुल्क घ्यावे, अशी सूचना देखील त्यांनी केली. कारण यावर्षी कोरोनामुळे पालकांची परिस्थिती नाजूक असल्याने शाळांनी हा निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, येत्या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ न करण्याचे निर्देश राज्य शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत. राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्यानं काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची सक्ती करीत आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाकडे अनेक शाळांच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. या तक्रारांची दखल घेत शासनाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करुन नये, असे निर्देश दिले आहेत.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

क्वारंटाईन मध्ये असलेल्या व्यक्तीच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथील ४० वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या बामणोली येथील दादासो अण्णा फोंडे यांच्यासह कुटुंबियांना संस्था कॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. घर बंद असल्याचा फायदा घेऊन काही अज्ञात चोरट्यानी बंद घर फोडून सोन्या चांदीच्या दागिन्या सह रोक रक्कम ३३ हजार असा एकूण ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास केली आहे. याची फिर्याद बामणोलीचे पोलीस पाटील शिवाजी कल्लाप्पा चिनमुरे यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीसात दिली आहे.

दादासो फोंडे यांना कुटूंबा सहित 30 एप्रिल रोजी संस्था कॉरंटाईन करण्यात आले आहे. फोंडे यांच्या घरामध्ये मुंबईवरून त्याची बहीण भाऊजी आणि दोन भाचे आले होते. त्या मधील त्याची बहीण भाऊजी आणि त्यांच्या नात्यातील वाघमोडेनगर मधील 17 वर्षीय मुलीस कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आल्याने फोंडे यांच्या कुटुंबाला संस्था कॉरंटाईन करण्यात आले आहे. घराला कुलूप घालून फोंडे यांनी घर सोडले होते. बंद घर आहे याचा फायदा उचलत काही अज्ञात चोरट्यानी पाळत ठेवली होती.

दिनांक 30 एप्रिल रात्री 10 वाजल्या पासून ते 6 मे संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर फोडी करून मुद्देमाल लंपास केला आहे. याचा उलघडा बुधवार संध्याकाळी झाला. फोंडे यांच्या घराच्या काडीला टॉवेल गुंडाळलेला शेजाऱ्याला दिसला. घरात कुणीही नसताना हा टॉवेल आला कसा याच्या संशयाने शेजाऱ्यांनी फोंडे यांना फोन वरून हकीकत सांगितली. त्याच बरोबर बामणोलीचे पोलीस पाटील शिवाजी चिनमुरे यांना बोलावून घेतले. माहिती मिळताच पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. काडीला लावलेला टॉवेल काढला असता घराला कुलुप न्हवते.

बाहेच्या घरातील लोखंडी कपाट आणि स्वयंपाक खोलीतील लाकडी कपाट उघडलेले आणि अस्ताव्यस्त झाले होते. फोंडे यांना व्हिडीओ कॉलिंग करून हकीकत दाखवली असता बाहेच्या कपाटातील रोख रक्कम 33 हजार रुपये आणि स्वयंपाक खोलीतील लाकडी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 63 हजारांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केल्याचे निदर्शनास आले. याची फिर्याद पोलीस पाटील शिवाजी चिनमुरे यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू; तिसर्‍या मजल्यावरुन खाली पडल्याने अंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राजस्थानमधील बीकानेरमध्ये सेल्फीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी तिने तिच्या फ्लॅटच्या तिसऱ्या मजल्यावर चढून सेल्फी घेत होती. त्याच वेळी तिचे संतुलन बिघडल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी नेट असतानाच तिचा मृत्यू झाला. बीकानेरच्या सुजनादेसरच्या गंगा रेसिडेन्सीमध्ये हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे कुसुम तंवर ही तिचा पती कमल तंवर यांच्यासह गंगा रेसिडेन्सी येथे फ्लॅटच्या देखभालीसाठी आली होती. यावेळी ती रेसिडेन्सीच्या तिसर्‍या मजल्यावर पोहोचली आणि छतावर मोबाईलद्वारे सेल्फी घेत होती. त्याच वेळी संतुलन बिघडल्यामुळे ती खाली पडली.यांनतर गंभीररित्या जखमी झालेल्या कुसुमला तिचा नवरा आणि जवळच्या लोकांनी बीकानेर येथील पीबीएम हॉस्पिटलच्या ट्रोमा सेंटरमध्ये तातडीने नेले, तेथे गेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच गंगाशहर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.

कोविद -१९ चा नमुनाही घेण्यात आला असल्याची माहिती सीआय गंगाशहर अरविंद भारद्वाज यांनी दिली. तपासणी अहवालानंतर मृतदेहाचे पोस्टमार्टम करून ते कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाईल. कमल तंवर यांनी गेल्या वर्षीच हा फ्लॅट खरेदी केल्याचे सांगितले जात आहे आणि शनिवारी तो साफसफाईसाठी पत्नीसमवेत फ्लॅटवर आला होता.

येथे बीकानेर जिल्ह्यातील जसरसर पोलिस स्टेशन परिसरातील बिल्नियासर गाव परिसराच्या उप-आरोग्य केंद्राच्या क्वार्टरमध्ये शुक्रवारी रात्री बीकानेरच्या बिल्नियासर गावात झुंझुनूंच्या एएनएम आणि त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली. जसरसरचे एसएचओ उदयपाल सिंह यांनी सांगितले की, ३५ वर्षीय सुमन बिल्नियासर गावच्या उप-आरोग्य केंद्रात एएनएम म्हणून कार्यरत होती. ती आपल्या ११ वर्षांच्या मुलासह येथे सरकारी क्वार्टरमध्ये राहत होती. तिचा नवरा सुरेश सुमारे दोन महिन्यांपूर्वीच झुंझुनूंहून आला होता.

प्राथमिकरित्या शुक्रवारी रात्री दोघा पती-पत्नीमध्ये वाद आढळून आले आहे. यावेळी रागाने पतीने आपली पत्नी आणि मुलाची बेदम मारहाण करून हत्या केली आणि त्यानंतर आपणही फाशी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मृताच्या कुटूंबियांना याबाबतची माहिती दिली आहे. पोलिस सध्या आसपासच्या लोकांची विचारपूस करत आहे आणि त्यांचे कुटूंबिय येण्याची वाट पहात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

५ वर्षांच्या मुलाला भेटण्यासाठी पुण्याहून कोल्हापूरला निघालेल्या अभियंता पती पत्नीचा अपघातात मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील आशियाई महामार्गावर उब्रंज नजीक भोसलेवाडी येथे शनिवारी (दि.9) रोजी पहाटे 3.45 च्या सुमारास झालेल्या कार अपघातात पतीपत्नी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमित आपाजी गावडे वय (३८) व  डॉ. अनुजा अमित गावडे वय (३५) असे अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

हे दाम्पत्य पुण्याहून कोल्हापूरला मुलांना आणण्यासाठी जात असताना कारवरील ताबा सुटल्याने कार रस्तालगतच्या डिव्हायडरला धडकली आणि सातारा लेनवर पलटी झाली. त्यामुळे हे पतिपत्नी जागीच ठार झाले. अपघातात मृत पावलेला तरुण पुणे येथे एका आयटी कंपनीत अंभियंता म्हणून कामाला असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातानंतर चालक गाडीमध्ये अडकला होता. कटावणीच्या साह्याने दार तोडुन त्याला बाहेर काढण्यात आले. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइन कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलिम देसाई, रमेश खुणे व उब्रंज पोलिस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य केले. अपघाताने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

औरंगाबादच्या घटनेनंतर पवारांनी लावला थेट रेल्वे मंत्र्यांना फोन, केली ‘ही’ मागणी

मुंबई । औरंगाबाद येथे मजुरांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर या मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. पवारांनी थेट रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना फोन करून या मजुरांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे. आपण याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधला असल्याचे पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातू ही माहिती दिली.

आपल्या गावाकडे जाण्यासाठी अनेक मजूर महाराष्ट्रात अडकून पडले आहेत. त्यांना गावाला जायचे असल्याने हे लोक पायी चालत आहेत. त्यामुळे या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करावी. महाराष्ट्र सरकारने या मजुरांसाठी बस वाहतुकीची व्यवस्था केली आहे. त्यामुळे तुम्हीही जास्तीत जास्त रेल्वे गाड्या सोडाव्यात, अशी मागणी शरद पवार यांनी गोयल यांच्याकडे केली असून गोयल यांनीही मजुरांसाठी अधिकाधिक रेल्वे सोडण्याचं आश्वासन दिलं आहे.

पवार यांनी राज्यातील मजुरांच्या समस्येबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली. दरम्यान, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यातील नागरिकांना स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयात लक्ष घालावं आणि हा प्रश्न मार्गी लावावा, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”