Sunday, December 21, 2025
Home Blog Page 584

Union Budget 2024 | 2024 च्या अर्थसंकल्पात चमकणार शेतकऱ्यांचे नशीब? ‘या’ योजनांची होऊ शकते घोषणा

Union Budget 2024

Union Budget 2024 | 2024 चा अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै 2024 रोजी सादर करणार आहे. मोदींच्या या अर्थसंकल्पावर देश आणि जगाच्या नजरा देखील आहेत. परंतु या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) नक्की काय होईल होणार आहे. त्याचप्रमाणे कोणती पदे निराशाजनक होतील आणि कोणत्या क्षेत्रांना चालना मिळेल? हे पाहणे बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष देखील यावर्षीच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेले आहे.

यावर्षी पीएम मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. त्यानंतरच त्यांनी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जारी करण्यात या फाईलवर देखील सही केलेली आणि काही दिवसातच शेतकऱ्या बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता देखील मिळाला. परंतु आता या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) शेतकऱ्यांना सरकारकडून आणखी जास्त अपेक्षा आहे. यावेळी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हा 6000 ऐवजी 8 हजार रुपये वार्षिक होईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

पीएम किसान योजना | Union Budget 2024

शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपये दिले जातात, ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावर पाठवली जाते. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. आता शेतकऱ्यांना वर्षाला आठ हजार रुपये दिले जातील, अशी अपेक्षा आहे. हे पैसे शेतकरी शेतीसाठी घेतात.

कृषी उपकरणांवर सवलत

शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर सूट मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. उपकरणांवर लावण्यात आलेल्या जीएसटीविरोधात शेतकरी संघटना सातत्याने आंदोलन करत आहेत. त्यानंतर आता उपकरणांवर कमी GST दर किंवा अधिक सबसिडी मिळण्याची आशा आहे.

कमी व्याजात जास्त पैसे | Union Budget 2024

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कृषी कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली जाऊ शकते. सध्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज 7% व्याजदराने मिळते, ज्यामध्ये 3% सबसिडीचा समावेश आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना हे कर्ज ४ टक्के व्याजदराने मिळते. महागाई आणि कृषी खर्चात वाढ पाहता सरकार कर्ज मर्यादा वाढवू शकते.

Gold Price Today : सोने- चांदी पुन्हा स्वस्त!! आजचे भाव इथे पहा

Gold Price Today 22 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदीदार ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आज सोमवार २२ जुलै २०२४ रोजी सोने- चांदीच्या किमती (Gold Price Today) पुन्हा एकदा कोसळल्या आहेत. मागील २ दिवसात सोने चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. आजही हाच ट्रेंड कायम राहिला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 72759 रुपयांवर व्यवहार करत आहे. आधीच्या तुलनेत या किमती मध्ये ११३ रुपयाची घट झाली आहे तर दुसरीकडे चांदीच्या किमती सुद्धा 543 रुपयांनी स्वस्त झाल्या असून एक किलो चांदीचा भाव 89125 रुपये इतका आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव ७३०१८ रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमती (Gold Price Today) खाली गेल्याचे पाहायला मिळालं. १२ वाजून ३० मिनिटांनी सोन्याच्या किमतीने ७२७३० रुपयांचा निच्चांक गाठला. त्यानंतर या किमती थोड्या वर गेल्या. सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 72759 रुपयांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे गुड रिटर्न नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६७७०० रुपये आहे, तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ७३८५० रुपये आहे. तुम्ही मिस्ड कॉलद्वारे सुद्धा सोन्या-चांदीची किंमत तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 67,700 रुपये
मुंबई – 67,700 रुपये
नागपूर – 67,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 73,850 रूपये
मुंबई – 73,850 रूपये
नागपूर – 73,850 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

PM Kisan Sanman Nidhi Yojana | PM किसान सन्मान निधी योजनेच्या नावाखाली होतोय मोठा फ्रॉड; शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

PM Kisan Sanman Nidhi Yojana

PM Kisan Sanman Nidhi Yojana | शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा, त्याचप्रमाणे त्यांना योग्य प्रमाणात शेती करता यावी, यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यात सरकारकडून पंतप्रधान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) ही योजना चालवली जाते. ही योजना खूप लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. चार महिन्यांच्या अंतरांनी तीन समान हफ्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाते. परंतु आता या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पंतप्रधान संबंधी योजनेच्या नावाखाली एक लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नये. असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आलेली आहे.

ही एक प्रकारची शेतकऱ्यांची फायबर फसवणूक केली जात आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर त्यानंतर शेतकऱ्याचा संपूर्ण मोबाईल आणि सिम कार्ड देखील हॅक होते. समोरील व्यक्ती मोबाईल्स आणि सिम कार्डचा ताबा घेतो. आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.अन्यथा त्यांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसू शकतो.

सध्या सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. परंतु आता शेतकऱ्यांबाबत देखील घडायला लागलेले आहेत. अशा प्रकारची कोणतीही फसवणूक जर शेतकऱ्यांची झाली असेल, तर त्यांनी 9330 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार दाखल करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधीचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्ही थेट गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही या योजनेबद्दलची सविस्तर माहिती घेऊ शकता.

Travel : ‘या’ भागात साकार होणार नवे महाबळेश्वर ; MMRDC चा मोठा प्लॅन

Travel : सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगा , आजूबाजूला असणारी हिरवळ, पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे अशा निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरला येत असतात. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात प्रचलित आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे पर्यटक भेट देण्यासाठी येत (Travel) असतात. मात्र पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता आता साताऱ्यातच नवे महाबळेश्वर साकार करण्यात येणार आहे.

एका ठिकाणी होणारी गर्दी दुसऱ्या ठिकाणी वळवण्यासाठी नवे महाबळेश्वर साकारण्यात येणार आहे. यासाठी कोयना बॅक वॉटर च्या भागातील 37 हजार हेक्टर क्षेत्र पाहण्यात (Travel) आले आहे.

सातारा जिल्ह्यातल्या पाटण, जावळी आणि सातारा या तीन तालुक्यांमध्ये 52 गावांमध्ये हे नवीन महाबळेश्वर निर्माण करण्यासाठी प्रस्तावित आहे. पाटण तालुक्यातल्या कराड चिपळूण रस्त्यापासून जावळी खोऱ्यातील कसबे, बामनोली आणि सावरी गावपर्यंतच्या क्षेत्रामध्ये ते विस्तारलेले (Travel) असेल.

नवीन महाबळेश्वर जिथे साकारण्यात येणार आहे तिथला हा परिसर सह्याद्री डोंगररांगांच्या उत्तर दक्षिणेला समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवर आहे. या भागातून सुळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या वाहतात यामुळे हा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि हिरवागार आहे त्याच सोबत घनदाट जंगलं वन्यजीव धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देणगीदेखील या भागाला लाभलेली आहे. त्यामुळेच हा परिसर नवीन महाबळेश्वर (Travel) साकारण्यासाठी निवडण्यात आला आहे

नवीन महाबळेश्वर साकारण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (MMRDC) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून 2019 मध्ये नियुक्ती केली. मध्यंतरी करोनामुळे या प्रकल्पाचे काम रखडले गेले होते. मात्र आता त्याला पुन्हा एकदा गती मिळण्याची चिन्ह आहेत. हा प्रकल्प साकारण्यात येण्यासाठी पुढील तीन वर्षाचा कालावधी लागेल अशी माहिती (Travel) एमएसआरडीसी च्या एका व्यवस्थापकाने दिली आहे.

महाबळेश्वर हा परिसर निसर्गरम्य आणि ऐतिहासिक सुद्धा तितकाच आहे. नवा महाबळेश्वर साकारण्यात आल्यामुळे 52 गावातील पर्यटन स्थळ आणि ऐतिहासिक ठिकाणी शोधून त्यांचा विकास केला जाणारा असून त्या ठिकाणी पर्यटक आणि इतिहास प्रेमी कशा पद्धतीने आकर्षित होतील याची काळजी घेतली जाणार आहे. या भागात रस्त्यांचे जाळे सुधारले जाणार असून कृषी पर्यटन रिसॉर्ट देखील विकसित केले जाणार आहे. याशिवाय ज्या ठिकाणची जैवविविधतेचे संरक्षण करणे गरजेचे आहे अशा संवेदनशील ठिकाणी जागांचे संरक्षण देखील करण्यात (Travel) येणार आहे.

कोणत्या गावांचा समावेश (Travel)

नवीन महाबळेश्वर मध्ये सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, जावळी तालुक्यातील अंधारी, कास, कसबे बामनोली, सावरी, पाटण तालुक्यातील गोशटवाडी, आंबेघर तर्फ, बागलवाडी, सावरघर, चाफोली आदी (Travel) गावांचा समावेश असेल.

WhatsApp चे जबरदस्त फिचर!! आता इंटरनेटशिवाय शेअर करा फाईल्स

WhatsApp Feature People Nearby

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे करोडो यूजर्स आहेत. आपल्या वापरकर्त्यांना चांगला आणि नवनवीन अनुभव यावा म्हणून कंपनी सतत व्हाट्सअप यामध्ये अपडेटेड फीचर्स ऍड करत असते. आताही व्हाट्सअप एका नव्या फीचरवर काम करत आहे ज्यामाध्यमातून मोबाईल मध्ये इंटरनेट नसले तरीही तुम्ही एकमेकांना फोटो, व्हिडिओ तसेच काही फाईल्स शेअर करू शकता. ‘People nearby’ असं या नव्या फिचरचे नाव आहे. एकदा का हे फिचर लाँच झालं कि मग फाईल शेरिंग साठी इंटरनेट ची आवश्यकता लागणार नाही.

WABetaInfo या व्हॉट्सॲपच्या नवीन फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइटने आपल्या रिपोर्टमध्ये या फीचरची माहिती दिली आहे आणि हे फीचर आयफोन यूजर्ससाठी टेस्टफ्लाइट प्रोग्रामद्वारे “24.15.10.70” मध्ये विकसित केले जात असल्याचेही सांगितले आहे. रिपोर्टनुसार, आगामी ‘People nearby’ फीचर iOS वर ॲपच्या भविष्यातील अपडेटमध्ये उपलब्ध होऊ शकते. याआधी, कंपनी एप्रिल 2024 मध्ये Android वर या फीचरवर काम करताना दिसली होती. या फीचरच्या माध्यमातून जवळपासचे यूजर्स इंटरनेट कनेक्शनशिवाय व्हाट्सअप वरून सहजपणे एकमेकाना फोटो, व्हिडिओ, किंवा अन्य डॉक्युमेंट यांसारख्या फायली पाठवू शकतात किंवा घेऊ शकतात.

वैशिष्ट्याच्या स्क्रीन ग्रॅबनुसार, iOS मेकेनिज्म इंटरनेट शिवाय फाइल शेअर करण्यासाठी QR कोड स्कॅन करणे अनिवार्य करू शकते. ज्याठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून फाईल शेअर करणे शक्य नाही अशाठिकाणी हे फिचर नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आजही देशातील अनेक ग्रामीण भागात इंटरनेट ची सुपर फास्ट सुविधा नाही अशावेळी तेथील यूजर्सना व्हाट्सअपच्या या नव्या फीचरमुळे आरामात एकमेकांना फाईल्स शेअर करू शकतात. तसेच ज्यांना इंटरनेट डेटा वाचवायचा आहे अशा वापरकर्त्यांना सुद्धा या नव्या व्हाट्सअप फीचरचा फायद होणार आहे. ‘People nearby’ फिचर Android पासून iOS पर्यंत सर्व प्लॅटफॉर्मवरला सपोर्ट करेल. सध्या हे फिचर सुरुवातीच्या टप्प्यात आहे. हे फिचर कधी यूजर्ससाठी उपलब्ध होईल याबाबत WABetaInfo ने कोणतीही माहिती दिलेली नाही.

RRC CR Apprentice Bharti 2024 | मध्य रेल्वे अंतर्गत 2424 रिक्त पदांसाठी भरती सुरु; 10 वी, ITI पास उमेदवार करू शकतात अर्ज

RRC CR Apprentice Bharti 2024

RRC CR Apprentice Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना आजपर्यंत झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे त्यामध्ये रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती चालू आहे. ही भरती अप्रेंटिस (RRC CR Apprentice Bharti 2024) या पदासाठी चालू आहे. या पदाच्या एकूण 2424 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन हे अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | RRC CR Apprentice Bharti 2024

  • पदाचे नाव – अप्रेंटिस
  • पदसंख्या – 2424 जागा
  • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्ष
  • अर्धशिल्क – 100 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा दहावी पास किंवा आयटीआय पास असावा

अर्ज कसा करावा ? | RRC CR Apprentice Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता .
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
  • 15 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

हार्दिक ऐवजी सूर्याला कॅप्टन का केलं?? गंभीर- आगरकरने सगळंच सांगितलं

gambhir agarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खांद्यावर टीम इंडियाची धुरा दिली. खरं तर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) उपकर्णधार असल्याने तोच टीम इंडियाचा पुढचा कर्णधार होईल असं बोलले जात होते, मात्र ऐनवेळी हार्दिक ऐवजी सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-२० संघाचे कॅप्टन करण्यात आलं त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. मात्र आता प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सूर्याला कर्णधार करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

श्रीलंका दौरा सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोघांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. यावेळी अजित आगरकर म्हणाले, सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले कारण तो योग्य उमेदवारांपैकी एक आहे. आपल्याला सर्व सामने खेळणारा कर्णधार हवा आहे. हार्दिक पंड्या हा आपल्यासाठी महत्वाचं खेळाडू आहे परंतु त्याचा फिटनेस त्याच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक सामन्यात खेळवणे निवड समितीसाठी अवघड बनतं. आम्हाला असा कर्णधार हवा होता जो सर्व सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल. सूर्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत असे स्पष्टीकरण अजित आगरकर यांनी दिले.

शुभमन गिलला उपकर्णधार का केल? याचेही कारण अजित आगरकर यांनी दिले. शुभमन गिल तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे, असे आम्हाला वाटते. गेल्या वर्षभरात त्याने त्याच्यातील गुणवत्ता दाखवली आहे. त्याने कर्णधारपदाचे काही चांगले गुण दाखवले आहेत. आम्ही त्याला जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत असं अजित आगरकर यांनी सांगितले.

दरम्यान, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा याना फॉर्मात असूनही बाहेर का बसवलं? असा प्रश्न केला असता अजित आगरकर म्हणाले, ‘संघातून वगळलेल्या कोणत्याही खेळाडूला खूप वाईट वाटेल. रिंकूकडेच बघा, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी त्याने चांगली कामगिरी केली होती, पण तरीही त्याला संघात स्थान मिळालं नव्हते. आम्ही फक्त 15 खेळाडू निवडू शकतो

BSNL Annual Recharge Plan | Jio, Vi आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी BSNL ने आणला वार्षिक रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या किंमत

BSNL Annual Recharge Plan

BSNL Annual Recharge Plan | जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया टेलिकॉम कंपन्यांनी bमागील काही दिवसांपासून त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवलेल्या आहेत. जवळपास 100 ते 150 रुपयांनी त्यांनी प्रत्येक प्लॅनची किंमत वाढवलेली आहे. परंतु या सगळ्यांमध्ये सध्या बीएसएनएलला मोठ्या प्रमाणात लोक प्रतिसाद देताना दिसत आहेत. बीएसएनएलने (BSNL Annual Recharge Plan)त्यांचे नवीन रिचार्ज प्लॅन देखील लॉन्च केले आहेत. त्यांच्या ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी त्यांनी हे प्लॅन लॉन्च केले आहे. जे जिओ एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. आता हे कोणते प्लॅन आहेत हे आपण जाणून घेऊया.

BSNL चा 2395 रुपयांचा प्लॅन | BSNL Annual Recharge Plan

BSNL चा हा नवीन 2395 रुपयांचा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनची वैधता 395 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डाटा त्याचप्रमाणे अमर्यादित वाईस कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 3G नेटवर्कचा अनुभव घेता येणार आहे. त्याचप्रमाणे 4G नेटवर्क देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

एअरटेलचा 3599 रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा हा 3599 रुपयांचा प्लॅन 365दिवसांसाठी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मिळेल. त्याचप्रमाणे अमर्यादित वाईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ घेता येईल. परंतु हा प्लॅन बीएसएनएलच्या एक वर्षाच्या प्लॅनपेक्षा 50% महाग आहे.यामध्ये तुम्हाला 5G नेटवर्क देखील प्रदान केले जाईल.

जिओचा 3599 रुपयांचा प्लॅन

जिओचा हा 3599 रुपयांचा प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5 जीबी डाटा मिळेल. त्याचप्रमाणे अमर्यादित वाईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील फ्री मिळतील. जिओचा हा प्लॅन देखील बीएसएनएलच्या प्लॅनपेक्षा जास्त महाग आहे.

वोडाफोन आयडियाचा 3699 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडियाने हा 3699 रुपयांचा वार्षिक प्लॅन आणलेला आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 2 जीबी डेटा मिळेल. त्याचप्रमाणे अमर्यादित व्हॉईसकॉलिंग करता येईल. तसेच 100 एसएमएसचा देखील लाभ घेता येईल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 4 G इंटरनेट दिले जाईल.

Benefits Of Cycling | दररोज सायकल चालविल्याने मेंदू आणि हृदयाला होतो फायदा; तज्ज्ञांनी दिला सल्ला

Benefits Of Cycling

Benefits Of Cycling | आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल लोकांचे आरोग्य देखील बिघडत चाललेले आहे. अशा वेळी स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणे खूप गरजेचे असते. यासाठी अनेक लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात. परंतु तुम्ही जिममध्ये न जाता देखील स्वतःला निरोगी ठेवू शकता. त्यासाठी तुम्ही सायकलिंगचा वापर करू शकता. सायकलिंग करणे हा एक खूप चांगला व्यायाम आहे. आज-काल सायकल चालवणे पूर्णपणे बंद झालेले आहेत. लोकांकडे दुचाकी, चार चाकी आलेले आहेत. यामुळे सायकलचा वापर पूर्णपणे बंद झालेला आहे. परंतु सायकल चालवल्याने (Benefits Of Cycling) आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पूर्वीच्या काळी अनेक लोक हे सायकलने प्रवास करायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य देखील तंदुरुस्त असायचे.

सायकल चालवल्याने (Benefits Of Cycling) केवळ तुमच्या शरीराचे नाही, तर मेंदू आणि हृदयाचे कार्य देखील सुरळीत चालते. तुम्ही सायकलचा वापर करून निरोगी राहू शकता. असे डॉक्टरांचे देखील म्हणणे आहे. त्याचप्रमाणे हृदयाला देखील याचा फायदा होतो. याबाबत डॉक्टर आशिष अग्रवाल यांनी सांगितलेले आहे की, जे लोक दररोज सायकल चालवतात त्यांचे हृदय अगदी निरोगी असते. सायकल हा एक प्रकारचा एरोबिक व्यायाम आहे. त्याचप्रमाणे सायकलिंगमुळे हार्ट अटॅकच्या धोका देखील 25 ते 30 टक्क्यांनी कमी होतो. सायकलिंग केल्याने वजन देखील नियंत्रणात येते. त्याचप्रमाणे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होण्यास मदत होते.

ज्यावेळी आपण सायकल चालवतो, त्यावेळी आपले हृदयाचे ठोके वाढतात. आणि त्यावेळी हृदयाला रक्ताचे पंपिंग देखील वाढते. आणि आपल्या शरीरात योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा होतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील कॅलरीज देखील योग्य प्रमाणात बदल होतात. आणि वजन नियंत्रणात राहते तसेच शरीरातील कमी होते.

सायकल चालवणे (Benefits Of Cycling) हे केवळ तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी नाही, तर मानसिक आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असते. यामुळे तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारते, तुमची मानसिक स्थिती देखील सुधारते आणि तुम्हाला तुमची ऊर्जा पातळी वाढते.

Weather Update | राज्याला मुसळधार पावसासह वादळीवाऱ्याचा धोका; ‘या’ विभागांना दिला हायअलर्ट

Weather Update

Weather Update | सध्या संपूर्ण राज्यामध्ये अति मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने देखील अनेक जिल्ह्यांबाबत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अशातच हवामान विभागाने (Weather Update) आज म्हणजे 22 जुलै 2024 रोजी पावसाचा अंदाज कसा असणार आहे? हे सांगितलेले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पुण्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडणार आहे. त्यामुळे आज पुणे विभागाला आज येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे घाट माथ्यावर देखील अति मुसळधार पाऊस पडेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

मुंबईमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे आज देखील मुंबईमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार, असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आज मुंबईमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 22°c असणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह विजा आणि वादळीवारा देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना वाऱ्याच्या संकटाचा देखील सामना करावा लागणार आहे.

त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये देखील अति मुसळधार (Weather Update) पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या विभागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या विभागांना येल्लो अलर्ट जारी केला आहे.