Monday, December 22, 2025
Home Blog Page 5834

कर्नाटक सरकारने मजुरांच्या परतीचे दोर कापले; बंद केल्या ‘श्रमिक ट्रेन’

बंगळुरू । कर्नाटकातील बांधकाम व्यावसायिकांनी राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकमध्ये तातडीनं श्रमिक रेल्वे रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे, श्रमिकांना कर्नाटकात राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मुख्य म्हणजे, याआधी घरी जाणाऱ्या कामगारांकडून कर्नाटक सरकारनं तिकिटाचे पैसे वसूल केले आहेत.

या श्रमिक रेल्वे कर्नाटकची राजधानी बंगळुरूहून प्रवासी मजुरांना आपल्या राज्यात पोहचवण्यासाठी नियोजित करण्यात आल्या होत्या. परंतु, मंगळवारी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची एक बैठक पार पडली. त्यानंतर श्रमिक विशेष रेल्वे पाठवण्यात येणार नाहीत, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकलाय. त्यामुळे, करोनाच्या धास्तीनं आपल्या घरी जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मजुरांना कर्नाटकमध्येच राहण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही.

मजुरांना स्वगृही पाठवण्यासंदर्भात नेमणूक करण्यात आलेले नोडल अधिकारी एन. मंजुनाथ प्रसाद यांनी सरकारच्यावतीने रेल्वेला एक पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये ६ मे रोजी सकाळी ९ वाजता, दुपारी १२ वाजता आणि दुपारी तीन वाजता बिहारमधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये उत्तरेकडील राज्यांमधील हजारो कामगार अडकून पडले आहेत.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या अधिकाऱ्यांबरोबर मंगळवारी संध्याकाळी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर येडियुरप्पा यांनी इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच रेड झोन वगळता इतर सर्व ठिकाणी उद्योग-व्यवसाय, गृहनिर्माण आणि औद्योगिक कामकाज सुरु करण्याची गरज असल्याचे मतही येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं होतं. इतर राज्यांमधील कामगार हे घाबरुन आपल्या राज्यात परत जात आहेत. अशा कामगारांना थांबवण्याची गरज असल्याचे मतही येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं होतं.

“लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर कामगारांना काम देण्यास सुरुवात केली आहे असं मला क्रेडाईच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मागील दिड महिन्यापासून कोणतेही काम झालेले नसताना बांधकाम व्यवसायिकांनी मजुरांना पगार आणि अन्न दिल्याची माहिती मला या अधिकाऱ्यांनी दिली,” असंही येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं. यानंतर त्यांनी कामगारांना राज्या सोडून न जाण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळेच या बैठकीनंतर राज्य सरकारने परराज्यात जाणाऱ्या ट्रेन रद्द करण्याची मागणी केल्याची टीका होत आहे.

प्रवासी मजुरांकडून वसूल केले तिकिटाचे पैसे
कर्नाटक सरकारनं घरी परतणाऱ्या मजुरांकडून पैशांचीही वसुली केलीय. बंगळुरूहून दानापूरसाठी प्रत्येक प्रवाशाकडून ९१०, बंगळुरू ते जयपूरसाठी ८५५ रुपये, हावडासाठी ७७० रुपये, हटियासाठी ७६० रुपये, भुवनेश्वरसाठी ६६५ रुपये, चिकबनवाडा ते लखनऊसाठी ८३० रुपये तर मलूर ते बरकाकनासाठी ७९० रुपये मजुरांकडून वसूल करण्यात आले. तसंच ३० रुपये सुपरफास्ट तर २० रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात आलं. श्रमिकांचं बसचं भाडंही आकारण्यात आलं. यातील प्रत्येक प्रवाशाकडून १३० ते १४० रुपये घेण्यात आले. हे प्रवास भाडं आगाऊ घेण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांचं ट्विट
‘मजुरांना आपल्या घरी न जाण्यासाठी समजावण्याचे निर्देश मंत्र्यांना देण्यात आले आहेत’ असं ट्विट बी एस येडियुरप्पा यांनी बांधकाम व्यावसायिकांसोबत झालेल्या बैठकीनंतर केलंय. तर श्रम विभागाचे सचिव कॅपन मणिवन्नन यांनी ‘आता लॉकडाऊन हटवल्यानंतरच मजूर आपली घरी जाऊ शकतील. आम्ही त्यांची योग्य ती काळजी घेऊ’ असं ट्विट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.’

 

शारजाह मध्ये ४७ मजली इमारतीला भीषण आग; ७ जण घायाळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी रात्री संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह येथे भीषण आगीमुळे अपघात झाला. अल नहदा, शारजाह येथील निवासी इमारतीत भीषण आगीत सात जण जखमी झाले आहेत. खलिज टाईम्सच्या वृत्तानुसार, या सात जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले, तर इतर पाच जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात नेण्यात आले.

शारजाह सिव्हिल डिफेन्सचे महासंचालक कर्नल सामी अल नकबी यांनी सांगितले की, एबीसीओ टॉवरच्या दहाव्या मजल्यावर रात्री ९.०४ मिनिटांनी ही आग लागली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ताज बंगळूर रेस्टॉरंटच्या शेजारच्या इमारतीत ही आग लागली. मात्र, आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

 

आणखी एका अहवालानुसार या इमारतीत पार्किंगशिवाय ४७ मजले आहेत.जिथे आगीवर नियंत्रण मिळवले आहे आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अहवालात असेही म्हटले आहे की अधिकाऱ्यांनी इमारतीत राहणाऱ्या लोकांना तत्काळ बाहेर काढले.

या शहरात मोठ्या प्रमाणात भारतीय प्रवासी राहतात. त्याच बरोबर, भारतीय लोक निवासी टॉवरमध्ये राहतात की नाही हे समजू शकलेले नाहीये. संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय दूतावासाच्या निवेदनाची आता प्रतीक्षा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर ; कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहचली 349 वर

औरंगाबाद | शहरात मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या 349 एवढी झाली आहे. ज्या भागात रुग्ण सापडले होते. त्या भागात अधिक चाचण्या घेण्याचे धोरण हाती घेतल्याने विषाणू नक्की कोठे आहे, हे समजत आहे. अजूनही कोणाच्या संपर्कातून कोणाला बाधा झाली हे स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे प्रतिबंधित भागातून कोणी बाहेर येणार नाही वा जाणार नाही, याची काळजी घेऊन कोरोना चाचणी वाढवत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 27 रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 349 झाली आहे. यातील 11 जणांचे मृत्यू झाले असुन 24 जण कोरोनामुक्त झाले. तर एक रुग्ण पुन्हा बाधित झाला. यात नव्या भागांतही बाधित आढळायला सुरुवात झाल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.

जयभीम नगर (26), अजब नगर (१), संजय नगर (4), बौद्ध नगर (१) बायजीपुरा 4 , किडकपुरा 5, कैलास नगर 4, बजाजनगर 1, उस्मानपुरा 1 पुंडलिक नगर 3, बेगमपुरा 1 या परिसरात 27 नवे रूग्ण आढळले आहेत. असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले. 27 एप्रिलपासून शहरात दररोज 20 पेक्षा जास्त रूग्ण आढळून येत असल्यामुळे दिवसागणिक करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पत्नीची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या; सात जन्म साथ देणार म्हणत आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका निवृत्त शिक्षकाचा आणि त्याच्या पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडला आहे. पत्नीचा खून आणि पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

डीसीपी पूर्व राहुल जैन यांनी सांगितले की, मंगळवारी जयपूरच्या जवाहर सर्कल पोलिस स्टेशन परिसरातील मालवीय नगरमध्ये पोलिसांना पुलाखाली एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळली.त्याची छाती रक्ताने माखलेली होती. त्याच वेळी त्याच्या खांद्याला गंभीर दुखापतदेखील झाली होती.पोलिसांनी त्याला सवाई मानसिंग रूग्णालयात दाखल केले,उपचारादरम्यानच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्याजवळ सापडलेल्या मोबाइल नंबरच्या आधारे ६५ वर्षीय राजकुमार दुदानीची ओळख पटली,ते मालवीय येथील नगर सेक्टर ११ चे निवासी होते.

पोलिस जेव्हा राजकुमारच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या घराला बाहेरून कुलूप असल्याचे दिसून आले.राजकुमारच्या खिशात एक चावी होती.त्या चावीने कुलूप उघडताच उपस्थित असलेला प्रत्येकजण थक्क झाला.राजकुमारची पत्नी लक्ष्मी हिचा मृतदेह घरात आढळून आला.पलंगावर रक्ताने भिजलेल्या ६३ वर्षीय लक्ष्मीने तिचा हात कापला होता.पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीच्या आधारे असे सांगितले जाते की राजकुमारने आपल्या पत्नीची प्रथम हत्या केली. मग घराला स्वतः बाहेरून कुलूप लावून ते पुलाच्या दिशेने आले, तेथेच त्यालाही एका वाहनाने धडक दिली. वास्तविक परिस्थिती बद्दल अधिक तपासनंतरच जाणून घेता येईल.

३ मे रोजी लिहिलेले पत्र
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राजकुमारजवळ एक पत्रही सापडले आहे.त्यात असे लिहिले आहे की ‘आपण पुढील सात जन्म एकत्र राहू, एकत्र जगू, एकत्रच मरुन जाऊ’. राजकुमार यांच्या पत्रामुळे हत्या व आत्महत्येचे कारण समजू शकले नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. हे पत्रही ३ मे रोजीच लिहिलेले आहे. असे दिसते की त्याच दिवशी महिलेची हत्या झाली असावी.प्रत्येक बाबीच पोलिस बारकाईने तपास करीत आहेत.

प्रिन्स आपल्या आजारी पत्नीची सेवा करायचा
सेवानिवृत्त शिक्षक राजकुमार आणि लक्ष्मी यांना मुले नसल्याचे एसपी महेंद्र शर्मा यांनी सांगितले. लक्ष्मी बर्‍याच दिवसांपासून आजारी होती,राजकुमार तिची बरीच सेवा करत असे. दोघेही घरात एकटेच राहत होते. शेजारी म्हणाले की त्यांच्यात भांडणही झाले नाही. मृताच्या पुतण्याशी संपर्क साधला आहे. त्याच्याकडून या प्रकरणाविषयी अजून माहिती घेण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

६४.५ लाख लोकांना मिळणार वर्षाला ३६ हजार रुपये; तुम्ही पण ‘असा’ घेऊ शकता फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असंघटित क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या तीन पेन्शन योजनांमध्ये आतापर्यंत ६४,४२,५५० लोकांनी नोंदणी केली आहे. ज्यांना आता वार्षिकरित्या ३६ हजार रुपये पेन्शन मिळेल.आपणही या पेन्शन योजनेत नोंदणी करून आपले म्हातारपण सुरक्षित करू शकता. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना (पीएम-एसवायएम), पीएम किसान महाधन (पीएम-केएमडीवाय) आणि स्मॉल बिझिनेस पेन्शन योजना या अशा तीन वर्गांसाठी समर्पित अशा योजना आहे की त्यांना म्हातारपणात कुणापुढेही हात पसरवावे लागणार नाही. म्हणूनच त्यांमध्ये बर्‍याच नोंदी झालेल्या आहेत. आपणही नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.या तीनही योजनांमधील बहुतेक अटी समान आहेत.चला तर मग या तीन योजनांविषयी जाणून घेऊयात.

पीएम श्रमयोगी मानधन योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मार्च २०१९ रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे पीएम श्रमयोगी मानधन योजनेचा औपचारिक शुभारंभ केला. यासाठीची नोंदणी १५ फेब्रुवारीपासून सुरू झाली.दरमहा वेतन आणि असंघटित क्षेत्रातील मजुरांना पेन्शन देण्यासाठीची ही योजना सर्वात मोठी योजना आहे. या योजनेंतर्गत कामगारांना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यावर वर्षाकाठी ३६,००० रुपये पेन्शन मिळणार आहे.

संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ), राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) किंवा राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ईएसआयसी) किंवा आयकर भरणारे सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. महिन्याकाठी १५,००० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठीच ही योजना आहे. ही योजना देशातील सुमारे ४२ कोटी कामगारांना समर्पित केलेली आहे.५ मे पर्यंत ४३,८४,५९५ लोक यामध्ये सामील झाले आहेत.

पीएम किसान मानधन योजना
पीएम मोदी यांनी १२ सप्टेंबर २०१९ रोजी झारखंडमधून ही योजना सुरू केली होती. पण त्याअंतर्गत नऊ ऑगस्टपासून नोंदणी सुरू झाली. पीएम किसान मानधन योजना ही शेतकर्‍यांना समर्पित ही सर्वात मोठी पेन्शन योजना आहे. आतापर्यंत २०,१९,२२० शेतकरी जोडले गेले आहेत, ज्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यावर दरमहा ३००० रुपये पेन्शन मिळणार आहे. सर्व १२ कोटी लघु व सीमांत शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील. लहान आणि सीमांत शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे २ हेक्टरपर्यंत किंवा त्याहून कमी शेती आहे.

या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जर एखादा शेतकरी पंतप्रधान-किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ घेत असेल तर यासाठी त्यांच्याकडून कोणतीही कागदपत्रे घेतली जाणार नाहीत. या योजनेंतर्गत शेतकरी पंतप्रधान-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभामध्ये थेट योगदान देण्यास निवडू शकतात. अशा प्रकारे, त्याला त्याच्या थेट खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

प्रधानमंत्री लघु व्यापारिक मानधन योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ सप्टेंबर २०१९ रोजी झारखंडच्या रांची येथे लहान व्यापाऱ्यांना पेन्शनची आश्वासकता दिली. छोट्या व्यापाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्याचा पुढाकार या प्रधानमंत्री लघू व्यापरी मानधन योजनेंतर्गत घेण्यात आला. त्याअंतर्गत ६० वर्षांच्या वयानंतर त्याला ३६,००० रुपये वार्षिक पेन्शन मिळेल. ही योजना सर्व दुकानदार, स्वयंसेवक आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी असून वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. ईपीएफओ, ईएसआयसी सदस्य आणि आयकर भरणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत ३८,७३५ छोट्या व्यावसायिकांनी त्यात नावनोंदणी केलेली आहे.

निवृत्तीवेतन योजनेच्या सामान्य अटी

(१) तिन्ही योजनांचे वय १८ ते ४० वर्षे असावे.

(२) ईपीएफओ, ईएसआयसी सदस्य आणि आयकर भरणाऱ्यांना लाभ मिळणार नाही.

(३) आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक आवश्यक आहे.

(४) वयानुसार प्रीमियम ५५ ते २०० रुपये असेल.एवढेच पैसे सरकार देईल.

(५) वयाच्या ६० वर्षानंतर, महिन्याला ३,००० रुपये पेन्शन.

(६) नजीकच्या सामान्य सेवा केंद्रात (सीएससी) नोंदणी करता येते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कहर कोरोनाचा; देशभरात २४ तासांत १२६ जणांचा मृत्यू; 2 हजार 958 नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. गंभीर बाब म्हणजे देशात कोरोनाबाधितांची आकडा 50 हजारांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. देशातील सतत वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या देशाची चिंता वाढवणारी आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 49 हजार 391 वर पोहचली आहे. आतापर्यंत देशाभरात 1 हजार 694 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 14 हजार 183 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांत देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशात 2 हजार 958 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 126 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 28.71वर पोहचला आहे. एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक 15 हजार 535 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 617 जणांचा बळी गेला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवाडीत महाराष्ट्र महिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 2 हजार 819 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

तर कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये 6 हजार 245 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गुजरातमध्ये 1381 लोक बरे झाले असून 368 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली कोरोनाबाधितांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर असून 5 हजार 104 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत 64 जणांचा मृत्यू झाला असून 1468 जण बरे झाले आहेत. मध्यप्रदेश 3049, पंजाब 1451, राजस्थान 3158, तमिळनाडू 4058, तेलंगाणा 1096, उत्तर प्रदेश 2880, पश्चिम बंगालमध्ये 1344 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर अरुणाचल प्रदेश 1, दादरा नगर हवेली 1, मणिपूर 2, मिझोराम 1, पदुच्चेरीमध्ये 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. गोव्यात 7 कोरोना रुग्ण होते मात्र ते सातही जण कोरोनामुक्त झाले असून आता गोव्यात एकही कोरोना रुग्ण नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.’

 

खुशखबर! मुंबई, पुण्यात अडकून असलेल्यांची शासन करणार एसटीनं मोफत घरी पाठवणी

मुंबई । कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. राज्यात अंतर्गत प्रवासावर निर्बंध घालत जिल्हा बंदी करण्यात आली. अशा परिस्थितीत मुंबई, पुण्यासारख्या शहरात नोकरी, कामधंदा, शिक्षणासाठी आलेले महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिक अडकून पडले. दरम्यान आता मुंबई, पुण्यासारख्या विविध शहरांमध्ये अडकून असणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता राज्यातच विविध ठिकाणी अडकलेल्या मंडळींनाही घरी जाता येणार आहे. विशेष म्हणजे या मंडळींना त्यांच्या गावी पोहोचवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. याकरता लाल परी, अर्थात एसटीची मदत घेतली जाणार आहे.

राज्यात विविध ठिकाणी असणाऱ्या लोकांना त्यांच्या गावांच्या दिशेने पाठवण्यासाठी  जवळपास १० हजार एसटी बस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन विभाग यासाठीचा खर्च उचलणार आहे. राज्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी २० कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी याबाबतची माहिती दिली. तेव्हा आता महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी एसटीने मोफत जाता येणार.

येत्या दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ज्यामध्ये राज्यातील मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गलेले लोक असतील या सर्वच लोकांना आपल्या घरी जाता येणार आहे. मुख्य म्हणजे कोरोनासाठीची आवश्यक चाचणी करुनच नागरिकांना पुढच्या प्रवासाला जाता येणार आहे. पण, अपेक्षित स्थळी त्यांना प्रवेश मिळणार का, हाच महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रवासासाठी सरकारकडून नियमावलीही जारी करण्यात येणार आहे. एकीकडे परराज्यातील मजुरांना ट्रेनमधून पाठवताना ट्रेनच्या तिकिट शुल्काच्या मुद्द्यावरून वाद सुरु असतानाच राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य सरकार स्वतः तिकिटांचा भार उचलणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.’

 

लॉकडाऊन ठीक आहे पण पुढे काय? सोनिया गांधींची मोदी सरकारच्या धोरणावर टीका

नवी दिल्ली । कोरोनाचा उद्रेक आणि लॉकडाउनबाबत केंद्र सरकारची पुढील रणनीती काय आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे.या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अध्यक्ष राहुल गांधींसह इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

या बैठकीत चर्चा करताना १७ मे नंतर काय होणार? लॉकडाउन कधीपर्यंत सुरू राहणार? लॉकडाउनबाबत मोदी सरकारकडे पुढील रणनीती काय आहे?असे एक ना अनेक प्रश्न सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला विचारले आहेत. या बैठकीत राजस्थान, पंजाब, छत्तीसगड आणि पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केल्याची माहिती दिली. जो पर्यंत व्यापक असे प्रोत्साहन पॅकेज मिळत नाही, तोपर्यंत राज्य आणि देश कसा चालणार, असा प्रश्न राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उपस्थित केला. आम्ही १० हजार कोटी रुपयांचा महसून गमावल्याचेही ते म्हणाले. राज्यांनी अनेकदा पंतप्रधानांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे, मात्र पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले.

सोनिया गांधी विचारत आहेत, त्या प्रमाणे लॉकडाउन ३.० नंतर पुढे काय, सरकारची पुढील रणनीती काय आहे, असे आपणही विचारत असल्याचे सिंग म्हणाले. लॉकडाउच्या तिसऱ्या टप्प्यानंतर रणनीती काय असेल याची मुख्यमंत्र्यांना माहिती असणे आवश्यक आहे असेही ते पुढे म्हणाले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केंद्र सरकारच्या लॉकडाउनबाबतच्या दृष्टीकोनावर टीकेची झोड उठवली. आम्ही दोन समिती तयार केल्या आहेत. एक समिती लॉकडाउनचे एग्झिट प्लान तयार करेल, तर दुसरी समिती आर्थिक पुनरुत्थानाबाबत रणनीती आखेल. मात्र, दिल्लीतील लोक कोणताही अभ्यास न करता झोनबाबतचा निर्णय घेत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

पंजाबप्रमाणे पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्र्यांनीही केंद्रावर टीका केलीय. राज्य सरकारांचा सल्ला न घेताच भारत सरकार झोनचे वर्गीकरण करत आहे, असे पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी म्हणाले. दिल्लीत बसलेले लोक राज्यात काय सुरू आहे हे सांगू शकत नाहीत. झोन ठरवताना कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जात नाही, अशी तक्रार नारायणसामी यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दारुच्या दुकानांबाहेर गर्दी करणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करा!- खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद । देशभरात पुकारण्यात आलेला लॉकडाऊन तिसऱ्या टप्प्यात काहीसा शिथिल करण्यात आला आहे. अपवाद वगळता राज्यातील वाइन शॉप उघडण्यासही सरकारनं परवानगी दिली आहे. ही परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. मद्यपींनी दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्यानं संसर्गाचा धोका वाढला आहे. अशा वेळी दारूच्या खरेदीसाठी रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा, अशी मागणी एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. वाइन शॉप सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली आहे.

‘दारू खरेदी करण्याएवढा पैसा ज्यांच्याकडं आहे ते अन्नधान्यही नक्कीच खरेदी करू शकतात. त्यामुळं वाइन शॉप सुरू होताच दारूच्या दुकानांसमोर रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा,’ अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारकडं केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्या चांगल्या कामाचं आम्ही देखील कौतुक करत होतो. पण आता ते सगळं व्यर्थ गेलं आहे. औरंगाबादमध्ये एकही दुकान आम्ही उघडू दिलं नाही. मग रेड झोनमधील इतर आमदार, खासदार या मृत्यूच्या खेळाला का आमंत्रण देत आहेत. कदाचित ते देखील ‘बेवडे’ असावेत,’ असा संताप जलील यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईमध्ये दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा वाइन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. शेवटी आमची भूमिका योग्य ठरली आहे. मात्र, दोन दिवसात आरोग्याच्या दृष्टीनं नेमकं किती नुकसान झालं असेल माहीत नाही,’ अशी चिंताही जलील यांनी नव्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.

किंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

“सलमान खानने माझ्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारावी”,पाकिस्तानी क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा

मुंबई l माझ्या बायोपिकमध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारावी. अशी इच्छा एका पाकिस्तानी क्रिकेटूने व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपली इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर अस या क्रिकेटपटूच नाव आहे.

शोएब अख्तर याने सलमान खानच्या कामाचं अनेक वेळा कौतुक केलं आहे. शोएब हा सलमानचा खूप मोठा चाहता आहे. म्हणून आपल्या बायोपिकमद्ये त्याने मुख्य भूमिका साकारावी. अस मत त्याने व्यक्त केलं आहे.

साज सादिक या पाकिस्तानी पत्रकाराने ट्विट करत ही माहिती दिली आहे. शोएब अख्तर म्हणाला जर माझ्यावर बायोपिक तयार झाला तर त्यात सलमान खानने मुख्य भूमिका साकारावी अशी माझी इच्छा आहे’, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.