Sunday, December 21, 2025
Home Blog Page 585

Google ची मोठी कारवाई!! लाखो मोबाईल ॲप्स बंद करणार

Google Action

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगल एक मोठं कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कमी दर्जाचे आणि नॉन-फंक्शनल ॲप्स गुगल प्ले स्टोअर वरून काढून टाकण्यात येणार आहेत. असे ॲप्स काढून टाकण्यासाठी Google ने 31 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत दिली आहे. सध्या गुगल प्ले स्टोअरवर असे ॲप्स उपलब्ध आहेत, जे सध्या काम करत नाहीत. तसेच, काही ॲप्स अतिशय खराब गुणवत्तेत येतात, ज्यामुळे वापरकर्त्याचा अनुभव खराब होतो. याचमुळे अशा अँपना कायमच बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.

खरं तर कंपनीने स्पॅम आणि मिनिमम फंक्शनैलिटी धोरण अपडेट केले आहे, जेणेकरून ॲपची गुणवत्ता आणि त्याचा अनुभव सुधारता येईल. Google च्या नवीन पॉलीसी नुसार, कमी सामग्री असलेले आणि योग्यरित्या डिझाइन न केलेले ॲप्स काढून टाकले जातील. यामध्ये फक्त टेक्स्ट ॲप्स, सिंगल वॉलपेपर ॲप्स यांचा समावेश आहे. हे ॲप्स नीट इन्स्टॉल होत नसल्याच्या तसेच तसेच इंस्टॉलेशनवर क्रॅश असल्याच्या तक्रारी गुगल कडे आल्या होत्या. याशिवाय जे अँप यूजर्सना सर्वोत्तम आनंद देऊ शकले नाहीत असेही अँप गुगल कडून प्ले स्टोअर वरून हटवण्यात येतील .

Google ने आपल्या धोरण अपडेट दरम्यान सांगितले की, कोणतेही ॲप हे स्थिर, प्रतिसाद देणारे आणि यूजर्सना चांगला अनुभव देणार असावं. गुगल प्ले स्टोअरवर लिस्टेड असलेले अँप्स चांगल्या क्वालिटीचे असावे. यापूर्वी सुद्धा 2023 मध्ये, Google ने धोरण उल्लंघनाच्या आरोपाखाली Google Play Store प्लॅटफॉर्मवरून 22.8 लाख ॲप्स काढून टाकले होते. तसेच, 200,000 ॲप्सचे सबमिशन रद्द करण्यात आले.

पवार- ठाकरेंवर टीका करणाऱ्या अमित शहांना संजय राऊतांनी धु- धु धुतलं; म्हणाले, गुजरातचा एक व्यापारी…

sanjay raut on amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार हे भ्रष्ट्राचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह (Amit Shah) यांचा जोरदार समाचार घेतला आहे. अमित शाह याना गृहमंत्री म्हणायला आम्हाला लाज वाटते अशा शब्दात संजय राऊतांनी अमित शहांवर हल्लाबोल केला. शरद पवारांचं कौतुक मोदींनीच केलं आहे… तुमची त्यांना पुरस्कार दिला. मग मोदी आणि अमित शहा यांच्यात भांडण आहे का? असा सवालही संजय राऊतांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल घाणेरड्या भाषेत वक्तव्य करून निघून जातो हा या महाराष्ट्राबद्दल किंवा मराठी नेत्यांबद्दल द्वेष आहे त्या द्वेषाला फुटलेली उकळी आहे. शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे सर्वजण अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. ज्यांच्यामुळे पवार साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सर्वजण आता आपल्या सोबत आहेत हे अमित शाह याना माहित नाही का? असा सवाल संजय राऊतांनी केला.

शरद पवार यांच्या सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल मोदी सरकारनेच पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्य पुरस्कार त्यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा शरद पवार यांचं कौतुक केलं आहे, पवारांचं बोट धरूनच मी राजकारणात आलो असेही मोदी म्हणाले होते. आज अमित शाह त्याच शरद पवारांवर टीका करत आहेत याचा अर्थ मोदी आणि शहा यांच्यात भांडण झालंय, मतभेत झालेत असा टोला संजय राऊतांनी लगावला.

यावेळी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंवरील टिकेचाही खरपूर समाचार घेतला. आम्ही तुमच्यासारखं पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाऊन आलो नाही, पाकिस्तानात जाऊन जीनांच्या कबरीवर फुले उधळणारे आम्ही नक्कीच नाही असा टोला राऊतांनी लगावला. या देशातील राष्ट्रवादी मुस्लिमांची बाजू मांडणं यात काय चूक नाही. देशात अनेक संघर्षाच्या काळात मुस्लिमानीही बलिदान दिले आहे. पण महारष्ट्रातील पराभव अमित शाह यांच्या जिव्हारी लागला आहे म्हणून ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत असं संजय राऊतांनी म्हंटल.

.. ही वाघनखे उद्याच्या विधानसभेत यांच्याच कोथळ्यात घुसतील! ठाकरे गटाचा शिंदे सरकारला इशारा

sanjay raut on mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारनं लंडनमधील म्युझियममध्ये असणारी वाघनखं महाराष्ट्रात आणली. पण ती वाघनखे शिवाजी महाराजांचीच आहेत का? असा प्रश्न काही इतिहासकार व विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे सामना अग्रलेखातून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्याच्या लाचारमिंधे-फडणवीसांच्या हाती वाघनखे शोभत नाहीत. वाघनखे आणूनही गुजरातचे व्यापारी मुंबई – महाराष्ट्र लुटतच आहेत व या लोकांनी शिवछत्रपतींना वेठीस धरून वाघनखांची जत्रा भरवली आहे. ही वाघनखे उद्याच्या विधानसभेत यांच्याच कोथळय़ात घुसतील! असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

महाराष्ट्रात फसवणुकीचे राजकारण कोणत्या थरापर्यंत पोहोचले आहे त्याचे उदाहरण म्हणजे लंडनहून आणलेली वाघनखे इतिहासकारांची मते वाघनखांच्या बाबतीत वेगळी आहेत व ती समोर आली आहेत, पण इतिहासाशी ‘ओ’ की ‘ठो’ संबंध नसणाऱ्यांच्या हाती राज्याची सूत्रे असल्याने त्यांनी इतिहासाचे विडंबन चालवले आहे. मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी सर्वच बाबतीत इतिहास पुसण्याचे ठरवले आहे. शिवरायांच्या शौर्यगाथेत वाघनखांना महत्त्व आहेच, पण चोरांचे सरकार व नकली सरदार म्हणतील तीच वाघनखे खरी हे मान्य करता येणार नाही. मिंधे व फडणवीस या दुकलीने महाराष्ट्राचा इतिहास पिसाळ-खोपडय़ांच्या मानसिकतेने मांडायला घेतला आहे. त्यामुळे त्यांना कावळय़ांना मोर व कोल्हय़ांना वाघ ठरविण्याची घाई झाली आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पोटात वाघनखे खुपसल्याने त्यांचे विव्हळणे संपलेले नाही

मुख्यमंत्री मिंधे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वाघनखांचे महत्त्व कसे कळणार ? तर फडणवीस यांची बालबुद्धी ही “विरोधकांची नियत नकली आणि बुद्धीही नकली,” असे म्हणण्यापलीकडे सरकली नाही. मुळात वाघनखे नकली असे कोणीच म्हणत नाही, पण ‘चोरांच्या मनात चांदणे’ तसे मिंधे-फडणवीसांचे झाले आहे! ही वाघनखे खरेच शिवरायांनी वापरलेली आहेत काय? असा प्रश्न इंद्रजित सावंत यांच्यासारख्या इतिहास संशोधकांनी विचारलाव सावंत यांनी त्यांच्या शंकेला पूरक असे पुरावे लोकांसमोर मांडले. त्यात मिंधे-फडणवीस यांना मिरच्या झोंबायचे कारण काय? मुळात ज्या राज्यकर्त्यांनी शिवरायांच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीचरणी गहाण टाकला आहे व जे रोज उठून दिल्लीस मुजरे झाडत आहेत त्यांना शिवरायांच्या वाघनखांची उठाठेव करण्याचा नैतिक अधिकार उरला आहे काय? असा सवाल सामनातून कऱण्यात आला.

मिंधे – फडणवीस, अजित पवार हे नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवराय आणि अमित शहा यांना संभाजीराजे समजत आहेत, पण महाराष्ट्र हा खऱ्या शिवरायांचा भक्त आहे. त्यामुळे गुजरातच्या व्यापारी राज्यकत्यांपुढे तो झुकणार नाही. शिवरायांनी सुरतेवर स्वारी का केली? याचा ज्वलंत इतिहास मिंधे-फडणवीसांनी चाळला पाहिजे. गुजरातचे व्यापारी राज्यकर्ते आज मुंबई-महाराष्ट्र लुटत असताना मिंधे-फडणवीस त्यांच्या बोटांच्या नखांनी साधे डोके खाजवायला तयार नाहीत, तेथे यांनी शिवरायांच्या वाघनखांवर बोलावे हे गमतीतेच आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई गुजरातच्या उद्योगपतींना आंदण दिली जात असतानाही ज्यांच्या बोटांची नखे शिवशिवत नाहीत ते आता वाघनखांवर प्रवचने झोडत आहेत. महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे, मराठी स्वाभिमानाची माती करणाऱ्यांचे बूट चाटणाऱ्या नकली वाघांनी ‘वाघनखे’ आणली व त्या वाघनखांसाठी राजकीय जत्रा भरवली. तलवार आणि वाघनखांनी इतिहास घडविला जातो. नुसती तलवार, वाघनखे इतिहास घडवीत नाहीत. तलवारीची मूठ व वाघनखे ज्याच्या हाती ती मूठ, तो हात इतिहास घडवतो. राज्याच्या लाचारमिंधे-फडणवीसांच्या हाती वाघनखे शोभत नाहीत. वाघनखे आणूनही गुजरातचे व्यापारी मुंबई – महाराष्ट्र लुटतच आहेत व या लोकांनी शिवछत्रपतींना वेठीस धरून वाघनखांची जत्रा भरवली आहे. ही वाघनखे उद्याच्या विधानसभेत यांच्याच कोथळय़ात घुसतील!

Yoga During Menstruation | मासिक पाळीत योगा करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ञांचे मत

Yoga During Menstruation

Yoga During Menstruation | योगा, व्यायाम हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे आपण योगा आणि व्यायाम दररोज केला पाहिजे. परंतु मासिक पाळीमध्ये अनेक महिलांनी व्यायाम आणि योगा करू नये, असे अनेकजण म्हणतात. कारण या काळात जास्त पोट दुखी देखील होत असते. परंतु तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मासिक पाळीत (Yoga During Menstruation ) तुम्ही हलक्या स्वरूपाचा व्यायाम करणे. तुमच्या शरीराला फायदेशीर ठरू शकते. तुम्ही जास्त व्यायाम करण्याऐवजी अगदी लहान सहान योगासने आणि व्यायाम करू शकता.

मासिक पाळीच्या काळात योगासने करण्याचे फायदे | Yoga During Menstruation

मासिक पाळीत मलासन, तितलीयासन, धनुरासन यासारखे योगासन करणे फायदेशीर ठरते. यामुळे वेदना आणि क्रॅम्प्सची समस्या कमी होते. योगा व्यतिरिक्त, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायाम केल्याने देखील मासिक पाळी दरम्यान होणारी मूड स्विंगची समस्या दूर होते. या आसनांच्या मदतीने अंतर्गत अवयवांची योग्य प्रकारे मालिश केली जाते, ज्यामुळे वेदना तर दूर होतातच पण या काळात अनेक महिलांना पचनाशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांना त्यातही फायदा होतो. हातपाय दुखणेही कमी होते.

मासिक पाळी दरम्यान कोणती काळजी घ्यावी?

  • मासिक पाळीचे पहिले दोन-तीन दिवस योग करणे टाळावे.
  • खूप कठीण आसने करू नका, फक्त आरामदायी आसने करा.
  • सराव करताना ताण देऊ नका.
  • पाठ, पोट आणि मान दुखत असेल तर योगा करू नका.
  • जास्त रक्तस्त्राव होत असला तरी योगासने करणे टाळावे.
  • शिर्षासन, सर्वांगासन किंवा कोणतीही उलटी आसने, कपालभाती आणि भस्त्रिका यांसारखी आसने मासिक पाळीत करू नयेत.
  • मासिक पाळीत योगासने फक्त तज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि देखरेखीखाली करा.

मृत्यूनंतर 45 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला ‘हा’ व्यक्ती; सांगितला धक्कादायक अनुभव

Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा एक नियम आहे. जो व्यक्ती जन्माला येतो त्याला कधी ना कधी मरण हे येतेच. परंतु जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी असा दावा केलेला आहे की, त्यांना मृत्यू आल्यानंतर काही काळानंतर ते पुन्हा जिवंत झालेले आहेत. मेल्यानंतर त्यांना स्वर्ग, नर्क आणि इतर गोष्टी कसे भासले? या सगळ्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आजकाल अशीच एक व्यक्ती चर्चित आहे. त्या व्यक्तीने असं दावा केलेला आहे की, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पण तो पुन्हा जिवंत झाला. त्याने आपला मृत्यू कसा झाला? हे देखील सांगितलेले आहे. आणि एक अनुभव अनोखा अनुभव आलेला आहे.

व्हिन्सेंट टोलमन असे या व्यक्तीचे नाव असून तो अमेरिकेचा रहिवासी आहे. मिररच्या अहवालानुसार, टॉल्मनने धोकादायक बॉडीबिल्डिंग सप्लिमेंटचा ओव्हरडोज घेतल्यावर त्याचा ‘मृत्यू जवळचा अनुभव’ आठवला, पॅरामेडिक्सने त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्याला वाचवता आले नाही आणि त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह पिशवीत टाकला. व्हिन्सेंटने सांगितले की मृत्यूनंतरच्या प्रवासात त्याच्यासोबत ड्रेक नावाचा आत्मा होता, जो त्याला मार्गदर्शन करत होता. त्या आत्म्याने त्याला त्याच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट कर्मांची माहिती दिली.

‘मृत्यूनंतरच्या विश्वाबद्दल जाणून घेणे’

टॉलमन म्हणाले की, त्याने खरोखर वाईटापेक्षा अधिक चांगले केले आहे. त्याने असा दावा केला की त्याच्या चांगुलपणामुळेच त्याला आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली होती, जिथे त्यांनी ‘पृथ्वी एक शाळा आहे’ असे निरीक्षण केले आहे. ती नेहमीच एक क्लासरूम होती, ती कधीही कोर्टरूम नव्हती. अहवालानुसार, ड्रेक नावाच्या त्या आध्यात्मिक मार्गदर्शकाने टॉल्मनला विश्व आणि ते कसे कार्य करते याबद्दल सांगितले.

डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कमिंग होम पॉडकास्टवर त्या दिवसाची आठवण करून देताना, टॉलमन म्हणाले की त्याने वापरलेल्या बॉडीबिल्डिंग सप्लिमेंटचा पुरवठा अमेरिकेत संपला होता, म्हणून त्याने थायलंडमधून शक्तिशाली सप्लिमेंट मागवले, पण त्या दिवशी ते घेतल्यानंतर त्याला विचित्र वाटू लागले. नंतर त्याला चक्कर आल्याने ते बेशुद्ध झाले. त्याला गुदमरल्यासारखे वाटू लागले. नंतर डॉक्टरांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते शक्य झाले नाही आणि नंतर त्यांनी त्याचा मृतदेह एका पिशवीत टाकून त्याला रुग्णालयात नेले.

45 मिनिटांनंतर श्वासोच्छ्वास परत आला

टोलमनच्या म्हणण्यानुसार, तो अधिकृतपणे सुमारे 45 मिनिटे मरण पावला होता, परंतु नंतर त्याने श्वास घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर ते तीन दिवस कोमात राहिल्याने त्यांचे कुटुंबीय रुग्णालयाबाहेर चिंतेत बसले होते. टॉल्मन यांनी सांगितले की या काळात त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शकाने त्यांना वेगळ्या जगात चालण्याची सूचना दिली. त्यानंतर त्याची वाईट कृत्ये आणि चांगली कृत्ये पाहिली. त्यांनी असेही सांगितले की जेव्हा त्यांनी त्यांचा आध्यात्मिक मार्गदर्शक पाहिला तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की ‘तू देव असला पाहिजेस’, परंतु न बोलता त्यांनी टेलिपॅथीद्वारे सांगितले की ‘नाही बेटा, मी देव नाही, मी तुझा मार्गदर्शक आहे’.

आईमुळे पुन्हा जिवंत झालो

टॉलमनचा दावा आहे की दुसर्या जगात एक विचित्र शांतता अनुभवल्यानंतर, आध्यात्मिक मार्गदर्शकाने त्याला एक पर्याय दिला, ज्यानंतर त्याला समजले की त्याच्या अनुपस्थितीचा त्याच्या कुटुंबावर आणि विशेषत: त्याच्या आईवर कसा परिणाम होईल. पुढे काय झाले, टोलमनने तेथून परतण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्याच्या मार्गदर्शकाने त्याला पृथ्वीवर परत पाठवले.

Tomato Rate | दिल्लीत टोमॅटोने केले शतक पूर्ण; पावसामुळे किरकोळ बाजारात वाढ

Tomato Rate

Tomato Rate | जे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन करतात. त्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी टोमॅटोची लागवड केलेली आहे. त्यांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. किरकोळ विक्रीच्या किमती देखील चांगल्या वाढलेल्या आहे. दिल्लीमध्ये टोमॅटोचे दर (Tomato Rate) हे सध्या 100 रुपये किलोच्या पुढे गेलेले आहेत. आणि येत्या काही दिवसातच हे भावा आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

देशाच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे टोमॅटो (Tomato Rate) सगळीकडे वितरित केली जात नाहीये. ज्या भागात जास्त पाऊस पडत आहे. त्या भागातील पावसामुळे शेतकऱ्यांचे विकायचे देखील नुकसान झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहेत. परंतु दिल्लीत किरकोळ किंमत ही सध्या 100 रुपयांच्या किलो गेल्याचे सांगण्यात आलेले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार शनिवारी दिल्लीच्या बाजारामध्ये टोमॅटोचे दर हे 100 रुपये किलोवर होते. तर असंघटित किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दर हे 100 ते 130 रुपये किलो एवढे होते. आणि येत्या काही दिवसातच हे दर आणखी वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

सध्याचे असणारे प्रतिकूल हवामान हे टोमॅटोचे दर (Tomato Rate) वाढण्यामध्ये जबाबदार धरले जात आहे. मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे टोमॅटोचे भाव वाढत आहेत. त्यामुळे बाजारातील टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. दिल्लीमध्ये टोमॅटो सोबतच बटाटे आणि कांद्याच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मागच्या वर्षी देखील टोमॅटोचा भाव खूप वाढला होता किरकोळ बाजारात दिल्लीमध्ये 350 रुपये किलो एवढा पोहचला होता. यामध्ये ग्राहकांची जरी नुकसान होत असले, तरी शेतकऱ्यांना मात्र चांगलाच फायदा होत आहे.

Waterfall Near Pune | वीकेंडला घ्या पुण्याजवळील ‘या’ धबधब्यांचा आनंद; मन होईल एकदम प्रसन्न

Waterfall Near Pune

Waterfall Near Pune | महाराष्ट्राला ज्याप्रमाणे सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचप्रमाणे पर्यटनाचा देखील वारसा लाभलेला आहे. सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. एकीकडे अनेक लोकांना या पावसाचा कंटाळा जरी आला असला, तरी दुसरीकडे मात्र निसर्गात आपल्याला वेगवेगळे प्रकारचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहे. निसर्गाने अगदी सगळीकडे हिरवीच चादर पांगरल्याप्रमाणे हे एक दृश्य दिसत आहे. सगळीकडे नदी, नाले वाहत आहेत. दाट धुके आहे. अशावेळी जर आपण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत निसर्गामध्ये (Waterfall Near Pune) वेळ घालवला, तर तुम्हाला नक्कीच खूप आरामदायी वाटेल.

सध्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मोठ मोठ्या प्रमाणात धबधबे 9Waterfall Near Pune) पाहायला मिळत आहे. धबधबा पाहण्यासाठी अनेक लोक लांब लांब ठिकाणांवरून येत आहे. जर तुम्ही देखील या वीकेंडला धबधबे पाहायला निसर्गात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला पुण्याजवळ अशा काही धबधब्यांबद्दल माहिती देणार आहोत. तिथे गेल्यावर तुम्हाला नक्कीच खूप छान वाटेल.

तामिनी घाट धबधबा | Waterfall Near Pune

तामिनी घाटातील धबधबा अत्यंत सुंदर आहे. पुण्याजवळ अत्यंत कमी अंतरावर तुम्ही या धबधब्याला भेट देऊ शकता. जाताना निसर्गात तुम्हाला अप्रतिम अशी सुंदर झाडे धुके त्याचप्रमाणे पक्षी देखील पाहायला मिळतील. डोंगरावर संपूर्ण तुम्हाला हिरवाई दिसेल. या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे असते. तामिनी घाट धबधबातसेच तुम्ही मुळशी तलावावर देखील जाऊ शकता. पुण्यापासून हे अंतर केवळ 93 किलोमीटर एवढे आहे.

चायनामन्स धबधबा

हा धबधबा महाबळेश्वर जवळ आहे. पुण्याजवळील असलेल्या सुंदर धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे. तुम्ही या पावसाळ्यात या धबधब्याला नक्कीच भेट देऊ शकता. पुण्यापासून साधारणपणे दोन तासात तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. या ठिकाणी फोटो देखील खूप सुंदर येतात. पुण्यापासून याचे अंतर 121 km एवढे आहे.

लिंगमळा धबधबा

हा धबधबा देखील पुण्यापासून अत्यंत जवळ आहे. हा धबधबा जवळपास 500 फूट उंचीवरून खाली कोसळतो. त्यामुळे पहायला हे दृश्य खूपच छान वाटते. त्याचप्रमाणे या ठिकाणी पाण्याचा येणारा आवाज पशु पक्षांचा आवाज तुमचे मन प्रसन्न करतो. तुम्हाला जर एकांतआणि शांततेची अनुभूती घ्यायची असेल, तर तुम्ही या धबधब्याला नक्कीच भेट देऊ शकता. पुण्यापासून हे अंतर 131 km एवढे आहे.

ठोसेघर धबधबा | Waterfall Near Pune

हा धबधबा देखील पुण्याजवळ अत्यंत कमी अंतरावर आहे. हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. धबधब्याच्या सभोवती हिरवागार निसर्ग आहे. त्याचप्रमाणे सुंदर टेकड्या देखील तुम्हाला पाहायला मिळतील. पुण्यापासून हा धबधबा 133 किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

Jio New Recharge Plans | जिओची ग्राहकांना खास भेट; अमर्यादित कॉलिंगसह मिळणार OTT सबस्क्रिप्शन

Jio New Recharge Plans

Jio New Recharge Plans | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच रिलायन्स जिओने (Jio New Recharge Plans ) त्यांच्या टेरीफ रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक बदल केलेले आहे. सध्याच्या सगळ्या प्लॅनची किमती वाढवलेल्या होत्या. परंतु अशातच आता टेलिकॉम कंपनीने ओटीटी बंडलसह नवीन तीन प्लॅन आणलेले आहेत. यात तुम्हाला 329 रुपये 949 रुपये आणि 1049 रुपयांमध्ये चांगले प्लॅन मिळत आहे. हे प्रीपेड प्लॅन्स आहेत. यामध्ये तुम्हाला ओटीटीची देखील सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळत आहे. आता हे प्लॅन नक्की कोणते आहेत आणि तुम्हाला त्याची कशाप्रकारे मदत होणार आहे? हे आपण जाणून घेऊया.

329 रुपयांचा प्रीपेड प्लॅन | Jio New Recharge Plans

जिओचा 329 रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा प्लॅन ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/दिवसासह 1.5GB दैनंदिन डेटा ऑफर करतो. यामध्ये JioSaavn Pro देखील उपलब्ध आहे. जिओ सावन प्रो सबस्क्रिप्शन सक्रिय करण्यासाठी वापरकर्त्यांना जिओ सावन ॲपवर लॉग इन करावे लागेल.

949 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओचा 949 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह ऑफर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्ससाठी दररोज 2GB डेटा रोल आउट केला जातो. यामध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस/दिवसाचा लाभ मिळतो. डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल हे 90 दिवस किंवा 3 महिन्यांसाठी योजनेसह एकत्रित केलेले OTT फायदे आहेत. प्लॅन 5G वेलकम ऑफरचा लाभ घेण्याची सुविधा देखील देते.

1049 रुपयांचा प्रीपेड प्लॅन | Jio New Recharge Plans

ओटीटी सबस्क्रिप्शनसह योजना शोधत असलेल्या अशा लोकांसाठी ही योजना चांगली सिद्ध होऊ शकते. रिलायन्स जिओचा नवीनतम प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह 2GB दैनिक डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/दिवस ऑफर करतो. OTT फायद्यांमध्ये JioTV मोबाइल ॲपद्वारे SonyLIV आणि ZEE5 यांचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G ऑफर देखील उपलब्ध आहे. म्हणजेच, जर दैनिक पॅक संपला तर वापरकर्ते 5G नेटचा आनंद घेऊ शकतील.

BSNL Recharge Plan : BSNL चा भन्नाट रिचार्ज प्लॅन!! दररोज 2GB इंटरनेट अन बरंच काही…

BSNL Recharge Plan 229 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशी टेलिकॉम कंपनी BSNL चे रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) अतिशय कमी किमतीत उपलब्ध असतात. त्यातच ३ जुलै पासून एअरटेल, जिओ सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्याने अनेक ग्राहकानी आपला मोर्चा BSNL कडे वळवला आहे. सध्याच्या महागाईच्या काळात बीएसएनएलचे रिचार्ज ग्राहकांसाठी आशेचा किरण ठरत आहे असच म्हणावं लागेल. तुम्ही सुद्धा बीएसएनएलचे ग्राहक असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका स्वस्तात मस्त आणि खिशाला परवडणाऱ्या रिचार्ज बद्दल सांगणार आहोत.

BSNL चा 229 रुपयांचा रिचार्ज – BSNL Recharge Plan

आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज बद्दल सांगत आहोत तो आहे BSNL चा 229 रुपयांचा रिचार्ज प्लॅन… हा रिचार्ज प्लॅन ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दररोज 2 जीबी इंटरनेट डेटाचा लाभ घेता येतोय. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS ची सुविधा मिळतो. ज्या यूजर्स ना जास्तीत जास्त इंटरनेट वापरयाला लागत अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन नक्कीच परवडणार आहे. बीएसएनएलचा हा एकमेव प्लॅन (BSNL Recharge Plan) आहे तो संपूर्ण ३० दिवसांसाठी आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे याच डेटा पॅक वाला दुसऱ्या कंपनीचा रिचार्ज प्लॅन बीएसएनएल पेक्षा खूप महाग आहे.

BSNL ला TATA ची साथ –

एकीकडे, Jio-Airtel ने आपले रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत, तर दुसरीकडे, BSNL ने सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी TATA सोबत हातमिळवणी केली आहे. टाटाची IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS आणि BSNL यांच्यात 15,000 कोटी रुपयांचा करार झाला आहे, ज्यामुळे भारतातील 4G नेटवर्कमध्ये सुधारणा होईल. 5G नेटवर्कसाठी मैदान तयार केले जाईल. TCS आणि BSNL मिळून भारतातील सुमारे 1000 गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा पोहोचवतील. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना सुद्धा फास्ट इंटरनेट सेवेचा लाभ घेता येणार आहे. आतापर्यंत Jio आणि Airtel सारख्या दूरसंचार कंपन्यांचे 4G नेटवर्कवर वर्चस्व होते, परंतु BSNL च्या या करारामुळे जिओ आणि एअरटेलच टेन्शन वाढण्याची चिन्हे आहेत.

शरद पवार देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी; पुण्यातून अमित शहांचा हल्लाबोल

amit shah sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी शरद पवार (Sharad Pawar)आहेत. जेव्हा जेव्हा राज्यात भाजपचं सरकार आलं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आला मात्र शरद पवार यांचं सरकार आल्यानंतर मराठ्यांचं आरक्षण जातं असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात महाराष्ट्र भाजपकडून अधिवेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.

अमित शाह म्हणाले, शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत. या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलंय तर ते शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. अशी टिका अमित शाह यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही अमित शाह यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा भाजपचं सरकार येतं, मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि जेव्हा-जेव्हा शरद पवार यांचे सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं असा आरोप शाह यांनी केला.

मी हे सगळ विचार करुन बोलतोय. महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकलं. मध्यंतरी शरद पवार यांचं सरकार आलं, मराठा आरक्षण गायब झालं. त्यानंतर आम्ही पुन्हा आलो. आम्ही आतासुद्धा मराठा आरक्षण देण्याचं काम केलं आहे. परंतु शरद पवार यांचं सरकार येईल, तेव्हा मराठा आरक्षण पुन्हा गायब होईल असं म्हणत आरक्षणाच्या मुद्द्यावरून अमित शाह यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. लोकसभेला खोटा प्रचार महाविकास आघाडीने केला मात्र आता माझा कार्यकर्ता हुशार झाला आहे. त्याला तुमच्या खोट्या प्रचाराची जाणीव झाली आहे. आता तुमचा खोटा प्रचार चालणार नाही. 2024 मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.