हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. साध्या रेल्वेगाड्यानंतर वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन, वंदे भारत साधारण रेल्वे अशा नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेल्या रेल्वेगाड्या रुळावर धावू लागल्या. लांबच्या प्रवासासाठी खिशाला परवडत असल्याने आणि महत्वाचे म्हणजे प्रवास आरामदायी असल्याने ग्राहकांची सुद्धा रेल्वे प्रवासाला चांगली पसंती पाहायला मिळत आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरु असून येत्या वर्षभरात वंदे भारत स्लिपर ट्रेन (Vande Bharat Sleeper Train) सुद्धा रुळावर धावताना आपल्याला दिसेल. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रात धावेल. हि ट्रेन पुणे आणि नागपूर या २ शहरांना जोडेल.
नागपूर ते पुणे दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन (Vande Bharat Sleeper Train) सुरु करण्याच्या हालचाली वेगाने सुरु आहेत. नागपूर हुन पुण्यात अनेकजण शिक्षण आणि नोकरीसाठी येत असतात. त्यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. अनेकदा रेल्वेचं कन्फर्म तिकीट न मिळाल्याने प्रवाशांना खासगी गाड्यांची जावं लागत. सध्या नागपूरवरुन बिलासपूर आणि नागपूर-इंदूर मार्गावर वंदे भारत ट्रेन आहे. परंतु ही ट्रेन चेअर कार आहे. तर पुणे शहरातून नागपूरसाठी थेट वंदे भारत ट्रेन नाही. मात्र आता वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे या मार्गावर आणखी एक रेल्वेगाडी सुरु होणार आहे.
वंदे भारत स्लीपर कोचची वैशिष्ट्ये – Vande Bharat Sleeper Train
वंदे भारत स्लीपर ट्रेन मध्ये 16 कोच असणार आहेत. एसी 3 टियरचे 11 कोच, एसी 2 टियरचे 4 कोच, एसी फर्स्टचा एक कोच असणार आहेत. या ट्रेनमधून 823 व्यक्ती प्रवास करु शकणार आहे. त्यात एसी 3 टियरमध्ये 611, एसी 2 टियरमध्ये 188 तर एसी 1st मध्ये 24 जण प्रवास करु शकतील. वंदे भारतमधील स्लीपर इंटीरिअर अधिक चांगले केले गेले आहे. ट्रेनमध्ये एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी स्वयंचलित दरवाजे असतील. मोबाइल फोन चार्ज करण्यासाठीही उत्तम तंत्रज्ञान दिले जाईल आणि डब्यात सेन्सर लाईट बसवले जातील. जे प्रवासी दिव्याच्या जवळ असतील तेव्हा आपोआप लाईट लागेल अन्यथा ते बंद राहतील.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन टर्म आमदार राहिले… भाजपला मतदारसंघात बेस बनवून दिला… निष्ठा राखली… पण शेवटी पदरी पडली निराशाच… ही खंत आहे उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांची… 2019 ला तिकीट कापल्यामुळे भालेराव उदगीरच्या राजकारणात मागे राहिले… आणि राष्ट्रवादीचे स्टॅंडिंग आमदार संजय बनसोडे यांचं राजकारण पहिल्याच टर्ममध्ये इतकं मोठं झालं… की भालेरावांना पक्षासोबतची निष्ठा बाजूला ठेवून अखेर शरद पवारांची तुतारी हाती घ्यावीच लागली… आणि याच एका गोष्टीमुळे उदगीरच्या येणाऱ्या विधानसभेला इंटरेस्टिंग वळण आलंय…. संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव अशी आमदारकीला लढत होणार असल्याचं जवळपास फिक्स झालं असून दोघांनाही इथून जिंकण्याचे सध्या फिफ्टी-फिफ्टी चान्सेस आहेत… त्यामुळे भालेराव 2019 मध्ये झालेल्या तिकीट कापून झालेल्या अपमानाचा वचपा यंदा काढणार का? की संजय बनसोडे सत्तेच्या जोरावर पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणणार? तेच क्लियर कट सांगतोय…
मुस्लिम बहुल असणाऱ्या उदगीरवर तसा आर्य समाजाचा मोठा प्रभाव… इथं उमेदवार कोण असतो? यापेक्षा तो कोणत्या जातीचा असतो? यावर उदगीरच्या राजकारणाची समीकरणे ठरतात… मतदार संघाची नव्यानं आखणी करण्यात आल्यानंतर उदगीर अनुसूचित जातीसाठी राखीव झाला… आणि तेव्हापासूनच तो भाजपचा बालेकिल्ला मानला जाऊ लागला… कर्नाटक – तेलंगणा या राज्यांना जोडून असल्यामुळे उदगिरीची संस्कृती संमिश्र आहेच… पण त्यापेक्षाही जास्त या मतदारसंघावर हिंदुत्वाचा मोठा पगडा पाहायला मिळतो… राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेलं काम मतदारसंघात खोलवर झिरपलय… संघाचा स्ट्रॉंग केडर बेस असल्यामुळेच भाजपला उदगीरची जागा सेफ झाली… सुधाकर भालेराव यांनी 2009 आणि 2014 ला लागोपाठ दोन्ही निवडणुकांत आमदारकीचा गुलाल उधळून उदगीरमध्ये भाजपला चांगला जम बसवून दिला… पण भाजपमध्ये सारं काही आलबेल नव्हतं… पक्षांतर्गत नाराजी, धुसपुस, गटबाजी वाढली होती… याचा फटका हमखास 2014 ला बसणार अशी चिन्ह होती… पण मोदी लाटेनं तारुण नेलं… आणि सलग दुसऱ्यांदा भालेराव आमदार झाले…
भालेरावांना भिडणं अवघड आहे हे माहीत असूनही राष्ट्रवादीकडून संजय बनसोडे हे प्रत्येक टर्मला त्यांना भिडत होते…. 2009, 2014 असे सलग दोन पराभव पचवूनही बनसोडेंनी हार मानली नाही… याउलट जनतेशी असणारा कनेक्ट त्यांनी वाढवत नेला… लोकांच्या अडीनडीला, दुःखाला धावून जाणारा माणूस म्हणून त्यांची इमेज इस्टॅब्लिश झाली…आणि अशातच उजाडली 2019 ची रणधुमाळी… अर्थात स्टॅंडिंग खासदार असल्यामुळे युतीकडून भाजपच्या सुधाकर भालेरावांनाच तिकीट मिळणार हे जवळपास कन्फर्म होतं… पण इथेच मोठा ट्विस्ट झाला.. भाजपने भालेरावांचं तिकीट कापून अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली… यामुळे नाराज झालेल्या भालेरावांनी अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला… पण अखेर समजूत काढण्यात आल्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली… पण कणाकणानं राजकारण मजबूत करत आणलेल्या संजय बनसोडेंनी या टर्मला मात्र भाजपला दणका दिला… आणि दणक्यातच आमदारकी खेचून आणली…
अर्थात भालेराव नाराज असणं, भाजपमधील अंतर्गत गटातटाच राजकारण यामुळे पक्षाने स्वतःच्या हाताने मतदार संघातील राजकारणावर धोंडा पाडून घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही… पण संजय बनसोडे आमदार झाले काय की लागलीच उदगीर मतदारसंघ फ्रंटला आला… ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री…. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दादांसोबत गेल्यानंतर महायुतीत क्रीडामंत्री पदाचा कारभार सध्या बनसोडे सांभाळतायत…. एवढेच काय तर परभणीचं पालकमंत्रीपदाची जबाबदारीही खांद्यावर असल्यानं संजय बनसोडे या नावाला आपोआपच वजन प्राप्त झालं… महायुतीतील नेत्यांकडून आणि खास करून दादांकडून त्यांना बरीच ताकद देण्यात आली…. सरकारमधील त्यांची वाढलेली पत पाहता येणाऱ्या विधानसभेला कितीही आपटली तरी संजय बनसोडेंनाच उदगीरचं तिकीट मिळणार हे ध्यानात आल्यानं शेवटपर्यंत भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या सुधाकर भालेरावांनी अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हातात घेतली… त्यामुळे महायुती वर्सेस महाविकास आघाडी…घड्याळ वर्सेस तुतारी… संजय बनसोडे वर्सेस सुधाकर भालेराव अशीच लढत उदगीरमध्ये पाहायला मिळणार, अशी सध्या स्थिती आहे….
विद्यमान आमदार बनसोडे साहेबांचं रिपोर्ट कार्ड पाहायचं झालं तर पहिल्याच टर्ममध्ये सत्तेत राहिल्याने त्यांनी अनेक विकास कामांसाठी भरीव निधी उदगीरमध्ये आणला… अनेक कामं मंजूर करून ती सध्या पाईपलाईनमध्येही आहेत… पण रस्त्यांची झालेली चाळण, रोजगाराच्या शोधात स्थलांतर करणारे बेरोजगारांचे लोंढे, धान्याचे कोठार असूनही प्रक्रिया उद्योगांची असणारी कमतरता, रस्ते – पाणी – वीज – आरोग्य या सगळ्याचीच हेळसांड असल्याने आमदारांना प्रचाराच्या काळात या प्रश्नांवरून जनतेला तोंड द्यावं लागणार आहे… सर्वात महत्त्वाचं म्हणजे उदगीरला जिल्हा बनवण्याचं जे मतदारांना स्वप्न दाखवलं होतं, त्याचं पुढे काय झालं? यावरही जनता बनसोडेंची खरडपट्टी केल्याशिवाय राहणार नाही….
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदगीर मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला चार हजारांचं लीड मिळालय… त्यामुळे काठावर का होईना, पण बनसोडे सेफ झोन मध्ये आहेत… बाकी मुस्लिम – दलित मतं, शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूती आणि भाजपची अंतर्गत अस्वस्थता हे सगळं सुधाकर भालेराव यांच्याच पथ्यावर पडणार आहे… त्यामुळे घड्याळाकडून संजय बनसोडे तर तुतारीकडून सुधाकर भालेराव असा अटीतटीचा, फिफ्टी-फिफ्टी सामना उदगीरच्या जनतेला पाहायला मिळणार आहे….बाकी उदगीरमध्ये बनसोडे आमदारकी कायम ठेवतात की भालेराव डावलण्यात आल्याचा वचपा काढणार? हे येत्या काळात पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहेच… ऐकून विश्लेषणावरून उदगीर चा आमदार कोण होईल? तुम्हाला याबद्दल काय वाटतं?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटलांनी कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. खास करून देवेंद्र फडणवीस, प्रविक दरेकर , प्रसाद लाड यांच्यासारखे भाजप नेते जरांगे पाटलांच्या निशाणावर आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपसाठी अडचणीत ठरत असून महाविकास आघाडीला फायदेशीर ठरत आहे. मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला शरद पवार-उद्धव ठाकरे तयार आहेत का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीला कोंडीत पकडलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील बालेवाडी येथे भाजपचे महाअधिवेशन सुरु आहे. यावेळी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी फडणवीस म्हणाले, आज अनेक समाज एकमेकांसमोर उभे आहेत आणि दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की, हे समाज एकमेकांसमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ शकतो. म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करतायेत. माझा मनोज जरांगे पाटलांना सवालच नाहीये. माझा सवाल उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे की, मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याकरता तुमचं समर्थन आहे का ते तुम्ही स्पष्ट करा.
फडणवीस पुढे म्हणाले, मराठा समाजातील जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे. निवडणुका येतील आणी जातील एखादे सरकार बनेल, राहणार नाही, सरकार येतात आणि जातात. पण, समाज एकसंघ राहिला पाहिजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून एखाद्या निवडणुकीत तुमची पोळी भाजली जाईल, पण एकदा का समाजामध्ये दुफळी निर्माण झाली तर किमान तीन पिढ्यातील दुफळी तुम्हाला दूर करता येत नाही अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. तसेच शरद पवार साहेब चार वेळा स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी केला.
Maharashtra Dam Water Storage | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्याचप्रमाणे आता सगळे नदी, नाले आणि धरणे देखील भरलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणे 10 टक्के भरलेली आहेत. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे.
जलसंपदा विभागाने एक अहवाल दिला आहे. त्यानुसार आता राज्यातील धरणांमध्ये आता 36. 7 टक्के एवढा पाणीसाठाउपलब्ध आहे. यातील केवळ छत्रपती संभाजी नगरमध्ये 15.26 टक्के पाणी शिल्लक आहे. कोकण विभागात सध्या मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे कोकणातील धरणांमधील पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. अनेक धरणे ही आता 50% पर्यंत पोहोचलेली आहे. यातील सूर्या, धामणी हे धरण 50.67% भरलेली आहेत. तर अप्पर वैतरणा हे धरण 37.50% भरलेले आहे.
मराठवाड्याला पाण्याची प्रतीक्षा
मराठवाड्यात जास्त पाऊस पडत नाही. या ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात जास्त वाढ झालेली नाही. जायकवाडीचा पाणीसाठा अजूनही 5 टक्क्यांनी पेक्षा जास्त झालेला नाही. अजूनही मराठवाड्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यातील जायकवाडी हे धरण 4.13% भरलेले आहे. त्याचप्रमाणे निम्न दुधना हे धरण 6.27% भरलेले आहे. येलदरी हे धरण 30.9% भरलेले आहे. तर पैनगंगा हे धरण 39.55 टक्के भरलेले आहे.
पुणे विभागातील धरणे किती भरली?
पुणे भागात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे धरण साठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील प्रमुख धरणे 50% पेक्षा जास्त भरलेली आहे. यातील डिंभे हे भरण 24.49% भरलेले आहे. पानशेत हे धरण 51.67% धरलेले आहे. खडकवासला हे धरण 70.24 टक्के भरलेले आहे. चाक समान हे धरण 25.190% भरलेला आहे. तर निरा देवघर हे धरण 34.12 टक्के एवढे भरलेले आहे.
ITBP Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलो होतो. ती म्हणजे इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल (ITBP Bharti 2024) या पदाच्या एकूण 143 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याप्रमाणे 28 जुलै 2024 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. तसेच 26 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा.
महत्त्वाची माहिती | ITBP Bharti 2024
पदाचे नाव – कॉन्स्टेबल
पदसंख्या – 143 जागा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 28 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख –26 ऑगस्ट 2024
शैक्षणिक पात्रता – दहावी पास
अर्ज कसा करावा ?
त्या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
26 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.
Indian Navy Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय नौदल अकादमी (Indian Navy Bharti 2024)अंतर्गत नागरी बी आणि सी या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 741 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 2 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा.
महत्त्वाची माहिती | Indian Navy Bharti 2024
पदसंख्या – 741 जागा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क –
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस- 295 रु.
SC/ST/PWD/ESM/स्त्री – शून्य
वयोमर्यादा -18 – 27 वर्षे
अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2024
अर्ज कसा करावा ? | Indian Navy Bharti 2024
या भरतीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
2 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केदारनाथमधून (Kedarnath News) एक मोठी बातमी समर येत आहे. गौरीकुंड-केदारनाथ पादचारी मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील ३ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण जखमी झाले आहेत. यातील २ भाविक हे महाराष्ट्रातील आहेत. आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून भाविकांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास आपत्ती नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की केदारनाथ यात्रा मार्गावर दरड (Kedarnath Landslide) कोसळली. यात्रेकरू गौरीकुंड-केदारनाथ पादचारी मार्गावर केदारनाथच्या दर्शनासाठी जात होते. परंतु अचानक चिरबासाजवळील टेकडीचा काही भाग खचला आणि दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनेक यात्रेकरू जमिनीखाली गाडले गेले. माहिती मिळताच एनडीआरएफ, डीडीआर, वायएमएफची पथके घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथकाने ढिगाऱ्यातून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. बाकी आठ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत मृत पावलेल्या भाविकांमधील २ भाविक हे महाराष्ट्रातील आहेत. किशोर अरुण पराते (३१, रा. नागपूर महाराष्ट्र), आणि सुनील महादेव काळे (२४, रा. जालना महाराष्ट्र) अशी या दोन्ही भाविकांची नावे आहेत. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातारण तयार झाले आहे. दरम्यान, गौरीकुंड ते केदारनाथ असा १६ किलोमीटर अंतराचा पायी मार्ग आहे. याठिकाणी सातत्याने भूस्खलनाच्या घटना घडत असतात. खास करून पावसाळ्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असते. मागच्या वर्षी अशाच प्रकारच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच हा मार्ग जोखमीचा म्हटला जातो.
Anger Issue | राग ही एक अतिशय सामान्य भावना आहे, जी आपणा सर्वांना वारंवार जाणवते. राग ही सामान्यतः नकारात्मक भावना मानली जाते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, आपले शरीर आपल्याला उड्डाण किंवा लढा प्रतिसाद म्हणून असे वाटते. मात्र, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हाही आपल्याला राग येतो तेव्हा आपल्या शरीरात काही हार्मोन्स बाहेर पडतात, ज्याचा आपल्या हृदयावरही परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर त्यामुळे होणारे नुकसान आजच जाणून घ्या.
डॉ. बिमल छाजर (एम्सचे माजी सल्लागार आणि SAAOL हार्ट सेंटर, नवी दिल्लीचे संचालक) स्पष्ट करतात की राग येणे ही एक अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे, परंतु जर राग वारंवार किंवा जास्त होत असेल तर ते चिंतेचे कारण असू शकते. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपले शरीर तणावाचे संप्रेरक सोडते आणि आपले हृदय तणावग्रस्त होते. त्यामुळे हृदयाला इजा होण्याचा धोका वाढतो.
रागामुळे हृदयाचा त्रास होऊ शकतो का? | Anger Issue
जलद हृदयाचे ठोके – जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा ॲड्रेनालाईन हार्मोन सोडला जातो, ज्यामुळे तुमचे हृदय वेगाने धडधडते आणि रक्तदाब वाढतो. यामुळे, हृदयावर खूप नको असलेला दबाव असतो. रक्तदाब वाढतो – खूप राग येणे किंवा वारंवार राग येणे यामुळे रक्तदाब वाढतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या खराब होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. सूज- रागामुळे शरीरात सूज येऊ लागते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जळजळ झाल्यामुळे, रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होण्यास सुरुवात होते, जे हृदयविकाराचे मुख्य कारण आहे. खराब जीवनशैली- रागामुळे, लोकांमध्ये धूम्रपान, मद्यपान किंवा अति खाण्याची सवय लागू शकते, जी व्यक्ती सामना करण्याची यंत्रणा म्हणून वापरते. या सर्व गोष्टी कोणत्या ना कोणत्या प्रकारे हृदयाला हानी पोहोचवतात.
रागावर नियंत्रण कसे ठेवायचे?
डॉ. सुखबिंदर सिंग सिबिया (कार्डिओलॉजिस्ट आणि सिबिया मेडिकल सेंटर, लुधियानाचे संचालक) म्हणतात की रागामुळे हृदयाचे नुकसान होऊ शकते तसेच स्ट्रोक, चिंता आणि नैराश्य यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
ट्रिगर ओळखा – तुम्हाला कशामुळे राग येतो याकडे लक्ष द्या. हे समजून घेऊन तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवू शकता आणि त्या गोष्टी टाळण्याचाही प्रयत्न करू शकता.
दीर्घ श्वास घ्या – जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा दीर्घ, दीर्घ श्वास घ्या. यामुळे तुमची मज्जासंस्था शांत होईल आणि तुमचा राग कमी होईल.
व्यायाम- व्यायामामुळे एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो. व्यायामामुळे तणाव आणि राग दोन्ही कमी होतात.
विश्रांती तंत्रांचा अवलंब करा – ध्यान, योग किंवा प्रगतीशील स्नायू शिथिल तंत्रे तुम्हाला शांत राहण्यास आणि राग कमी करण्यास मदत करू शकतात.
बोला – जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला पुन्हा पुन्हा राग येत आहे, तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी किंवा एखाद्या थेरपिस्टशी याबद्दल बोलू शकता, जो तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करू शकेल.
समस्या सोडवा- तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार असेल तर त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि पुन्हा पुन्हा राग येण्याची समस्याही कमी होईल.
स्वतःची काळजी घ्या – निरोगी आहार घ्या, हायड्रेटेड राहा आणि तुम्हाला आवडतील अशा क्रियाकलाप करा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमित देशमुख (Amit Deshmukh) विरुद्ध कोण? हा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय… कारण लातूर शहर विधानसभा मतदारसंघात देशमुखांची घोडदौड रोखण्यासाठी भाजपने अनेक प्लॅन केल्यानंतर आता एक नवा कोरा चेहरा मैदानात उतरवण्याचा डाव भाजप टाकू पाहतोय… विलासराव देशमुखांची खऱ्या अर्थाने लेगसी कुणी चालवली असेल तर ती अमित देशमुखांनीच… तब्बल 15 वर्ष आमदार राहिलेल्या अमित देशमुखांनी लोकसभेलाही काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी भरभक्कम लीड देऊन लातूरात फक्त देशमुख पॅटर्नच चालतो, हे पुन्हा एकदा दाखवून दिलय… पण राजकारण विरोधात असलं तरी भाजपने देशमुखांना खिंडीत गाठण्यासाठी एक नवा चेहरा विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केलीये… पण या चेहऱ्यात लातूरातील देशमुख नावाच्या ब्रँडला चितपट करण्याइतपत धमक आहे का? अमित देशमुखांसाठी यंदाच्या विधानसभेला प्लस-मायनस काय काय असणार आहे? आणि लातूर शहर या विधानसभेचा गेलाबाजार इंटरेस्टिंग इतिहास नेमका आहे तरी काय? त्याचाच घेतलेला हा आढावा…
विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीधर्मातून लातूर शहरातील भाजप कमजोर राहिली… 1995 चा अपवाद वगळता 1980 ते 2009 सलग पाच टर्म विलासरावांनी याच मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व गाजवलं… लातूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रेमापोटीच मुख्यमंत्री होण्याचा मान विलासरावांना अनुभवता आला… पण 2009 ला नव्यानं मतदारसंघ तयार झाल्यानं… आणि विलासराव दिल्लीतल्या राजकारणात ॲक्टिव्ह झाल्यामुळे अमित देशमुखांचं लातूर शहर मतदारसंघातून पॉलिटिकल लॉन्चिंग झालं… 2009, 2014, 2019 अशा सलग तिन्ही निवडणुकीत अमित देशमुखांनी मोठ्या लीडने दणक्यात विजय मिळवला… मुळात अमित देशमुख हे फक्त एका मतदारसंघाचे नाही…तर संपूर्ण जिल्ह्यावर कंट्रोल ठेवणारा काँग्रेसचा चेहरा असल्यानं ते शहरातून आरामात निवडून येतात… या तिन्ही निवडणुकी वेळेस भाजपचे शैलेश लाहोटी यांनी त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला… पण तिन्ही वेळेस काही मोजकी मतं वगळता देशमुखांना त्यांना मानवी अशी तगडी फाईट देता आलेली नाहीये…
त्यात 2014, 2019 या दोन्ही वेळेस लातूरात लोकसभेला भाजपच्या बाजूने वार असतानाही विधानसभेला मात्र अमित देशमुखांना नो चॅलेंज अशी परिस्थिती होती… म्हणजे वाईट काळ असला तरी, लातूरकरांनी नेहमीच विलासरावानंतर अमितभैयांवर विश्वास ठेवला…त्यांना प्रेम दिल… आता तर वार पक्क काँग्रेसच्या बाजूने आहे… सलग १० वर्ष भाजपकडे राहिलेली खासदारकी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काँग्रेसकडे खेचून आणण्यात नुकतच यश मिळाल आहे… अमित भैय्यांच्या मतदारसंघाने…म्हणजेच एकट्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 30 हजार मतांचं लीड काँग्रेसच्या डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी राहिल्याने अमित देशमुख यंदाही आरामात आमदारकीचा चौकार मारतील, अशी परिस्थिती सध्या मतदार संघात आहे…
विद्यमान आमदारांच्या प्लस-मायनस चा विचार करायचा झाला तर विकासाच्या राजकारणावर दिलेला जोर, विलासराव देशमुखांची लेगसी, एमआयडीसी आणि रेल्वेची केलेली कामे हे सगळं अमित देशमुखांना प्लसमध्ये घेऊन जातं… तर शहरातील पाण्याचा रखडलेला प्रश्न, महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकासाचा आराखडा मंजूर नसणं हे देशमुखांना येत्या निवडणुकीत मायनस मध्ये घेऊन जाऊ शकतात, असं म्हणता येऊ शकतं…शहरात मुस्लिम दलित व मराठा समाजाचे मतदान हे कायम काँग्रेसला होत असतं, तसेच यंदा लिंगायत समाजाचे खासदार निवडून गेल्याने यावेळी लिंगायत समाजाचा पाठिंबा देखील काँग्रेसच्याच बाजूने राहू शकतो…मागच्या तीनही वेळेस टक्कर देणारे पारंपारिक प्रतिस्पर्धी शैलेश लाहोटी यांच्या ऐवजी मात्र भाजप नवा चेहरा अमित देशमुखांच्या विरोधात मैदानात उतरवण्याचा विचार करू पाहते आहे… माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांचे सुपुत्र अजित पाटील कव्हेकर यांचं नाव देशमुखांच्या विरोधात कन्फर्म समजलं जातंय… पण चेहरा बदलला म्हणून देशमुखांची मतदार संघातील क्रेझ संपेल, असं म्हणता येऊ शकतं नाही… म्हणजेच काय तर सध्यातरी सगळ्याच अंगांनी अमित देशमुख यांची आमदारकी सेफ झोन मध्ये दिसतेय…
सोयाबीनचं तुरीचं कोठार म्हणून लातूरची ओळख… विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील हे दोन मुख्यमंत्री या जिल्ह्याने राज्याला दिले… त्यामुळे त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातून राजकारणाची गंगा लातूर कडे शिफ्ट केली… शहरासाठी विकासाचं मॉडेल मांडलं… हेच व्हिजन अमित देशमुखही पुढे घेऊन जात असल्याने भाजपला इथं आपला जम बसवण्यासाठी एक्सट्रा एफर्ट घ्यावे लागणार आहेत… अजित पाटील कव्हेकर हे कुठल्या मुद्द्यांना घेऊन देशमुखांच्या विरोधात मैदानात उतरतील? 15 वर्षातील रखडलेल्या कुठल्या कामांकडे बोट दाखवून सपोर्ट आपल्या बाजूने खेचून घेतील? यावरही इथली बरीचशी समीकरण अवलंबून असणार आहेत…नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी सारी यंत्रणा ही देशमुखांनीच लावली होती…याच लातूर शहर आणि ग्रामीण मतदार संघातून त्यांनी निर्णायक लीड हे काळगेंच्या पाठीशी दिलं… लोकसभेतला पराभव भाजपाच्या जिव्हारी लागलेला असणार, यात शंकाच नाही… त्यामुळे आता याचा वचपा काढण्यासाठी अमित देशमुखांच्या विरोधात विधानसभेला कशी खेळी खेळणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…
Iron Rich Foods | आपल्या शरीराला अनेक पोषक तत्त्वांची गरज असते. त्यांपैकी लोह हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरात जर पुरेशा प्रमाणात लाल रक्तपेशी असल्याm तर त्या चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतात. त्यामुळे आपल्या शरीरातील सगळ्या क्रिया योग्य रीतीने पार पडतात. थोडक्यात आपल्या शरीराला तंदुरुस्त राहण्यासाठी चांगले हिमोग्लोबिनची गरज असते. परंतु शरीरात ते हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात ठेवणे. खूप गरजेचे असते.
त्यासाठी आपण चांगल्या अन्नपदार्थांचे (Iron Rich Foods) सेवन देखील केले पाहिजे. आपल्या शरीरात जर लोहाची कमतरता असेल, तर आपल्याला सतत थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, चेहऱ्यावर फिकटपणा येणे. यांसारखे आजारी येऊ लागतात. त्याचप्रमाणे आपले रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होते. तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल, तर तुमच्या आहारात लोहयुक्त (Iron Rich Foods) पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. आता आपण असे काही पदार्थ पाहणार आहोत. ज्यामुळे आपल्या शरीरातील लोहाची पातळी नियंत्रित राहते.
लाल मांस | Iron Rich Foods
लीन मीट किंवा रेड मीटमध्ये भरपूर लोह असते. हे मर्यादित प्रमाणात सेवन करावे, जेणेकरून लोहाचे प्रमाण संतुलित राहते.
मसूर
लिंबू किंवा सिमला मिरची सारख्या व्हिटॅमिन सी सोबत कडधान्यांचे सेवन केल्याने लोह शोषण्यास मदत होते. चण्यामध्येही नॉन-हेम आयर्न आढळते. लोहासोबत, ते प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात, जे आहारात संतुलन राखतात आणि लोहाचे उत्कृष्ट स्रोत मानले जातात.
हिरव्या पालेभाज्या
पालक आणि मेथीच्या पानांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. लोहासोबत, व्हिटॅमिन ए आणि सी देखील त्यात आढळतात, जे नॉन-हेम लोह शोषण्यास मदत करतात.
सुका मेवा
खजूर, अक्रोड आणि अंजीर यांसारख्या सुक्या फळांमध्ये लोहासोबत नैसर्गिक साखर आणि व्हिटॅमिन सी असते. आपण दररोज आपल्या आहारात मर्यादित प्रमाणात त्यांचे सेवन केले पाहिजे.
बिया आणि नट | Iron Rich Foods
भोपळ्याच्या बिया आणि बदाम यांसारख्या काजूमध्ये पुरेशा प्रमाणात लोह आढळते. यामध्ये आढळणारे हेल्दी फॅट्स लोह शोषण्यास मदत करतात.