Saturday, December 20, 2025
Home Blog Page 5863

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजारच्या दारात, २४ तासात ५९७ नवीन रुग्ण

मुंबई । महाराष्ट्रात करोनाचा कहर कायम आहे. राज्यात आज करोनाचे ५९७ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या दहा हजाराच्या जवळ पोहचली आहे. चिंतेची बात म्हणजे राज्यात काल करोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला होता तर आज ३२ रुग्ण दगावले आहेत. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज करोनाच्या ५९७ नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ९ हजार ९१५ झाली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून आज एकाच दिवसात २०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार ५९३ रुग्णांनी करोनाला हरवण्यात यश मिळवले आहे. हा आकडा वाढावा म्हणून आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे.

तसेच राज्यात ३२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये मुंबईत २६, पुणे शहरात ३, सोलापूरमध्ये १ औरंगाबादमध्ये १ आणि पनवेलमध्ये १ मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये २५ पुरुष तर ७ महिला आहेत. ३२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे १७ रुग्ण आहेत. तर १५ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले आहेत.

अनित्यता हीच एकमेव नित्याची गोष्ट आहे – इरफान खान

इरफान खान यांनी आजारपणात (इंग्लंडमध्ये असताना) लिहिलेल्या आणि पत्रकार अंशुल चतुर्वेदी यांनी इंग्रजीत संपादित केलेल्या लेखाचा कृतार्थ शेवगावकर यांनी केलेला मराठी अनुवाद.

मला तीव्र स्वरूपाच्या न्यूरोइंडोक्राईन कॅन्सरचे निदान होऊन आता काहीसा काळ लोटला आहे. हे नाव माझ्या शब्दसाठ्यामध्ये अगदीच नवीन आहे. हा एक दुर्मिळ आजार आहे. इतर आजारांच्या तुलनेत याविषयी फारशी माहिती आणि अनुभव उपलब्ध नाही. त्यामुळे उपचारांमध्ये खूपच अनिश्चितता आहे. माझा उपचार हा ट्रायल अँड एरर पद्धतीचा उपचार आहे. म्हणजे औषध देऊन मात्रा लागू पडतेय का ते बघायचं. नाही लागू पडली की पुन्हा दुसरं औषध देऊन बघायचं. पुन्हा पुन्हा तेच. आजार होण्याआधी माझ्या आयुष्यात एक वेगळाच खेळ सुरू असतो. “मी एका वेगाने धावणाऱ्या रेल्वेतून प्रवास करत असतो. माझी स्वप्न,ध्येय,भविष्यातील इच्छा-आकांक्षा यात मी रममाण झालेला असतो. अचानक कोणीतरी खांद्यावर हात ठेवतं. मी पाहतो, तर तो टीसी असतो. तो म्हणतो “तुमचं स्टेशन येतंय. उतरा. “माझा गोंधळ उडून मी म्हणतो. “नाही नाही. माझं स्टेशन आलेलं नाहीये.”

“माझं असच झालंय. त्या अचानकपणात मला समजतं की तुम्ही फक्त समुद्राच्या पाण्यात तरंगणाऱ्या लाकडी ओंडक्यासारखे आहात, जो अनिश्चिततेच्या लहरींसोबत वाहवत जातोय आणि तुम्ही त्यावर जिवाच्या आकांताने ताबा मिळवायचा प्रयत्न करताय. या अनागोंदीच्या, धक्क्यांच्या आणि घबराटीच्या वातावरणात जगत असताना आणि दवाखान्यात एक भयंकर उपचार घेत असताना मी माझ्या मुलाच्या कानात पुटपुटतो. “सध्याच्या परिस्थितीत या संकटाला तोंड देण्यासाठी काहीही करून मी माझ्या पायांवर उभं राहावं एवढीच माझी ‘स्वतः’ कडून अपेक्षा आहे. भीतीने माझ्या जगण्यावर विजय मिळवून माझी अवस्था दयनीय करता कामा नये.”

असे मी म्हणतो आणि अचानक प्रचंड वेदना व्हायला सुरुवात होते. वेदना तुम्हाला ऐकून ठाऊक असते, पण आता तिचा स्वभाव आणि तीव्रता तुम्हाला समजते. कशाचाच गुण येत नाही. सांत्वन आणि प्रेरणा या गोष्टी कुचकामी ठरतात. त्या क्षणाला ब्रह्मांड आठवतं. वेदना आणि फक्त वेदनाच. देवापेक्षा प्रचंड मोठी वाटणारी. थकलेला आणि गलितगात्र झालेला मी दवाखान्यात जातो.

माझ्या दवाखान्याच्या समोर लॉर्ड्स मैदान आहे. माझ्या लहानपणीच्या स्वप्नातील “मक्का” होतं ते. प्रचंड वेदना होत असताना मला समोर विवीयन रिचर्ड्सचं हसरं पोस्टर दिसतं. मला त्याबद्दल काहीच वाटत नाही. जणू माझा त्या जगाशी काही संबंधच उरला नाहीये. दवाखान्याच्या वरच्या मजल्यावरच कोमा वॉर्ड आहे. माझ्या दवाखान्यातील रूमच्या बाल्कनीत मी एक दिवस उभा होतो आणि एक चमत्कारीक गोष्ट लक्षात आली. मी अक्षरशः हादरलो. जीवन आणि मृत्यूच्या खेळात केवळ एक रस्ता आहे. एका बाजूला दवाखाना आहे तर दुसऱ्या बाजूला मैदान. ‘अनिश्चितता’ हाच दवाखाना आणि मैदान या दोघांचा स्थायीभाव. या कल्पनेने माझ्या मनाला जोरदार धक्का दिला. माझ्या हॉस्पिटलच्या या चमत्कारिक स्थानाने मला शिकवले की अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. स्वतःच्या क्षमता जाणून घेणे आणि मैदानात टिकून अधिकाधिक चांगला खेळ खेळत राहणे इतकंच मी करू शकतो.

या जाणिवेने मला शरण जायला आणि विश्वास ठेवायला शिकवले. “पुढे काय होईल? हे सगळे मला कोठे घेऊन जाईल ? अजून दोन महीने की चार महिने की 2 वर्षे?? हे सर्व विचार या जाणिवेने बॅकफूटवर जाऊन हळूहळू विरत गेले. माझ्या मनातून नाहीसे झाले.

“स्वातंत्र्य”म्हणजे काय? हे मला नव्याने उमजले. सिद्धी प्राप्त झाल्यासारखे वाटले. जणू जीवनाची चव मी पहिल्यांदाच चाखतोय. जगण्याची अशी जादुई बाजू मी अनुभवली. माझा स्वतःचा जगण्यावरील विश्वास वाढला. जणू त्या विश्वासाने माझ्या प्रत्येक पेशीत प्रवेश केलाय असंच जाणवलं. हा विश्वास किती टिकेल हे वेळ सांगेलच, परंतु आतातरी मला असं वाटतंय.

माझ्या या संपूर्ण प्रवासात जगभरातून लोक मला सदिच्छा देत आहेत, माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. यात ओळखीचे लोक आहेतच, परंतु कित्येक लोकांना तर मी ओळखतही नाही. हे लोक वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या वेळांना माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. या सर्व प्रार्थना एकत्र होऊन माझ्या मनाच्या खोल आतपर्यंत पोहचत आहेत. या प्रार्थना जणू एक मोठा विजेचा स्त्रोत आहेत, जो माझ्या पाठीच्या कण्यातून थेट मेंदूत प्रवेश करतोय. त्या प्रार्थनांचं बीज अंकुरतंय. रुजतंय. त्यांना पालवी फुटतेय,कळ्या येताहेत,त्याची फुलं होताहेत आणि मी त्यांचाकडे पाहत बसलोय. यातील प्रत्येक कळी, पान, फुल तुमच्या एकत्रित प्रार्थनेतून जन्माला आलंय.

लाकडी ओंडक्याला लहरींचा ताबा मिळवायची गरज नसते. निसर्ग तुम्हाला हळूहळू हेलकावे देत तरंगत ठेवतो, हेच खरं !!

लेखन : इरफान खान
इंग्रजी संपादन : अंशुल चतुर्वेदी
मराठी अनुवाद : कृतार्थ शेवगावकर

इरफान खानला चाहत्याचं पत्र; आम्हाला दुख; देऊन तू दुख;तून मुक्त झालास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर असा दिवस आला आहे जो मला कधी पहायचा नव्हता. काल रात्री, तुमची तब्येत ढासळली आणि एक विचित्र भीती मनात निर्माण झाली. गेल्या दोन वर्षांपासून, ज्याला दूर ठेवले गेले होते, ज्याला मन आणि हृदयाच्या अगदी जवळ देखील येऊ दिले नाही,ती भीती अचानक अगदी जवळ आली होती.

मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही मला इतके जवळचे का वाटलात.तुम्ही मला आपले असल्याचे वाटता. मी संध्याकाळपासून आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर पन्नास वेळा गेले.आपले जुने फोटो आणि त्यावरील माझ्या दोन वर्षांच्यापूर्वीच्या कमेंट्स पुन्हा पुन्हा वाचत होते. मी वेडी होते.आपल्याला मोठं मोठे मेसेजेस पाठवत असे.तुम्हांला काहीही होणार नाही,स्टे स्ट्रॉन्ग,आपण परत येता कि नाही आणि काय माहित ! आजही वेडी आहे.आजही मी तुझे जाणे स्वीकारण्यास तयार नाही. आणि कदाचित मी हे कधीच स्वीकारू शकत नाही.

Irrfan Khan off to London for treatment of NeuroEndocrine tumour

तुमची आणि दीपिकाची केमिस्ट्री जादूमय वाटत होती तुझ्यामध्ये एक विचित्र आकर्षण आहे. ‘पीकू’ मधील दीपिका आणि तुझी केमिस्ट्री माझ्यासाठी जादुई होती.आपण फक्त एक रोमँटिक हिरोच्या परिभाषेत बसणारे अभिनेते नव्हता,परंतु तरीही मला खूप रोमँटिक वाटले.आपण किती सहजपणे गोष्टी म्हणायचा.अर्धा अभिनय तर तुझे बेडकासारखे असलेले मोठे डोळेच करायचे. तू बॉलिवूड हिरोची व्याख्याच बदलली आहेस. हिरो हट्टा कट्टा, सिक्स पॅक अ‍ॅब्स वाला,उंच,लांब केस वाढवणारा या सर्व गोष्टी सोडून आपण हिंदी सिनेमाला नवा चेहरा दिला.सिंपल,तुमच्या आमच्या सारखाच दिसणारा, आमच्यातच राहणारा, इरफान आपल्यामधून बाहेर पडलेला आपण आम्हा सर्वांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आपण दररोजच्या जीवनातले विषय किती चांगलय पध्द्तीने हाताळायचा.आआपल्याला घेऊन वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवले गेले. माझ्यासारखे बरेच लोक असे होते की ‘इरफानचा हा चित्रपट आहे, चांगलाच असेल’ असा विश्वास ठेवून चित्रपट बघायचो.

Irrfan Khan suffering from Neuroendocrine Tumour: Get to know What ...

तू आम्हाला कधीही निराश केलेले नाहीस.तू मला खूप काही शिकवलंस, खूप समजावलंस, आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन तू दिलास.काही लोकांना पाहून स्वतःचे भारतीय असल्याचा अभिमान वाटतो, आपण त्यापैकीच एक होता.तुम्हाला जुरासिक पार्कमध्ये पाहून विचित्र वाटले.हॉलीवूडमधील कोणत्याही चित्रपटामध्ये एखादा लहान सीनही करण्यासाठी, जिथे बॉलिवूड कलाकार मरत असत,तिथे आपण हॉलीवूडमध्ये मुख्य भूमिका साकारण्यास सुरुवात केली.आपण कधी कोणत्याही वादाचा भाग नव्हता ना कधीही हिंदू-मुस्लिम वादाचा भाग होता. खान म्हणून खानच्या शर्यतीपासूनही तुम्ही दूर होता. कारण आपल्याला त्या शर्यतीची कधीही गरज नव्हती.आपण वेगळे होता आपण हिंदू किंवा मुस्लिम नव्हता.आपण फक्त एक कलाकार होता.

Indian actor Irrfan Khan, who starred in movies like Slumdog ...

२०१८ मध्ये प्रथमच आपण आपल्या आजाराबद्दल लिहिले होते.लंडनच्या इस्पितळात जात असताना आपण आपल्या भावनिक पोस्टमध्ये लिहिले होते की,किती विचित्र आयुष्य आहे. लॉर्ड्स क्रिकेट मैदान,जे मी लहानपणापासूनच टीव्हीवर पहात वाढलो आहे,त्याच मैदानासमोर माझे रुग्णालय आहे.या ठिकाणी येऊन मला वाईट वाटू शकते असा विचार मी कधीही केला नव्हता.इथे येण्यात काहीच आनंद नाही.येथे बरीच वेदना आहेत,जी वाढतेय आणि मग मला या वेदने शिवाय काहीच वाटत नाही. या रुग्णालयात लॉर्डससमोर असलेल्या या वेदनांच्या दरम्यान मी व्हिव्हियन रिचर्ड्सचा हसणारा चेहरा समोर आणतो.पण आता असे दिसते की ते जग माझे नव्हते.मी प्रवासात आहे मी वेगाने, बरीच मोठी स्वप्ने पाहत आहे,मी आशेने पळत आहे. माझे स्टेशन खूप दूर आहे. मी आनंदी आहे पण अचानक टीसी आला आणि मला ट्रेनमधून उतरण्यास सांगितले.मला धक्का बसला आहे काय होत आहे ते मला माहित नाही.माझे डेस्टिनेशन आल्याचे टीसीने म्हटले आहे.

Irfan khan biography career awards and networth - Highlights India

‘तुमचे मेसेजमध्ये दिसायची जगण्याची इच्छा ‘त्यादिवशी मी खूप रडले. लिहिताना तूझं असं काहीतरी होतं. आपण आपल्या आजाराबद्दल जास्त काही बोलला नाहीत.तुम्ही कमी बोलायचास पण आपले काम जास्त बोलायचे.आपण रुग्णालयात बेडवरुन २०१८ मध्ये आणखी एक पोस्ट लिहिली.आपण भिंतीवर सावली पडलेल्या आपल्या चेहऱ्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.आपल्याला संघर्ष कसा करावा हे माहित होते. तू शेवटपर्यंत लढा देत राहिलास.तुमची जगण्याची इच्छा प्रत्येक संदेशात दिसून आली. वाटत असे मी देवावर विश्वास ठेवत नाही, परंतु जर हे सर्व त्यांच्या हातात असेल तर मी देवाकडे अशी इच्छा करते की काहीतरी घेऊन तुम्हाला आपले आयुष्य तो परत देईल.

Irrfan Khan first ever Indian star to endorse Mastercard | BizAsia ...

कोणत्याही अभिनेत्याच्या जाण्याने मी इतकी रडली नाही जितकी कि आज रडले.कदाचित यानंतर कोणाच्या जाण्याचे एवढे दुःख होणार नाही.मी तुमची कॉमर्शियल अ‍ॅड मनापासून पहायचे.ती नव्हती का सिसका लाइट्स वाली . आता त्यात अमिताभ बच्चन दिसतात. कधीकधी आपण फॅशन डिझायनरसाठी रॅम्प वॉक केलात.हँडसम आणि बॉडी असलेल्या मॉडेल्ससमोर आपणासही सर्वात मोहक वाटलात.एका छोट्याशा खेड्यातील एक मुलगा,ज्याच्याकडे ना हीरो सारखे लुक्स होते ना कुठले महान वडील.इतर कलाकारांच्या तुलनेत तुम्हाला बॉलिवूडमध्ये स्थायिक होण्यास बराच काळ लागला. परंतु अगदी थोड्या वेळातच आपण हॉलिवूडचा प्रवास स्पष्टपणे केला आहे. डोळे बंद करुन देखील लोक आपला आवाज ओळखू शकले. तुमचा आवाज अगदी वेगळा जादूमय होता.आता कुठे आपण या प्रवासाचा आनंद कोठे घेण्यास सुरुवात केलेला आणि त्या टीसीने आपल्याला खरोखरच ट्रेनमधून उतरवले.खूप क्रूर आणि वाईट आहे हा टीसी.

Shocking news Irfan khan is no more among us » NewsRepost

‘तू आता गेला आहेस हे समजून घेऊ शकणार नाही,’तुम्ही गेला आहात,नाही इथेच आहेत,आता आपल्या चित्रपटांची वाट पाहण्याची गरज नाही, आपण सहजपणे गोष्टी सांगण्यास येणार नाही, हे मला समजणार नाही. हे समजणे, विश्वास ठेवणे आणि पटवणे हे माझ्यासाठी सोपे नाहीये. मी हे करू शकणार नाही. मला हे देखील करायचे नाही.हे अंतर भरून काढता येणार नाही.हिंदी सिनेमात दुसरा कोणी इरफान परत होऊ शकेल असे वाटतही नाही.आपण आमच्यासाठी सिनेमाचा अर्थ बदलला होता.आता आपण अर्ध्यातच सोडला आहे.

काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणालात, wait for me! मी तुझी वाट पाहिली इरफान.आम्ही सर्वांनी पाहिली.अजून पाहत राहू.कोणास ठाऊक की पुढच्या कुठल्या स्टेशनवर ट्रेनमध्ये परत चढशील ! मला ही आशा जिवंत ठेवायची आहे.हे सर्व लिहिताना डोळ्यांतून येणारे अश्रू थांबतच नाहीत. माझ्याकडे हे सर्व आहे.

Irfan Khan Rushed To ICU In Mumbai Hospital

(लेखिका- अमृता शेडगे एक स्वतंत्र पत्रकार आणि स्तंभलेखिका आहेत, बर्‍याच टीव्ही चॅनल्ससाठी त्या काम करतात. या ब्लॉगमध्ये लेखिकेने स्वतःचे मत व्यक्त केलेले आहे.)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

म्हणून उद्धव ठाकरेंनी केला थेट मोदींना फोन म्हणाले, जरा समजावा..

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती होणार की नाही, याबाबत सस्पेन्स कायम असतानाच मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना राज्यात राज्यपालांकडून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. ‘कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होणं योग्य नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे,’ अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून ३ आठवडे उलटले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीला राज्यपालांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यातच मुदतवाढ दिल्यावर वैधानिक विकास मंडळांवरील सध्याचे पदाधिकारी कायम ठेवावे, असे पत्र राजभवनने राज्य सरकारला पाठविल्याने हा सरकारच्या कारभारातील हस्तक्षेप असल्याचा आक्षेप मंत्र्यांनी घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या दोनपैकी एकाही सभागृहाचे सदस्य नसल्याने सहा महिन्यांच्या कालावधीत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. त्यानुसार येत्या २८ मेच्या आधी उद्धव ठाकरे यांना विधिमंडळाचे सदस्य व्हावे लागणार आहे. या स्थितीत राज्यपालांच्या कोट्यातील रिक्त जागेवार उद्धव ठाकरे यांची नियुक्ती व्हावी म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ९ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला व तशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली. मात्र, त्यावर राज्यपालांनी कोणताच निर्णय न घेतल्याने राज्यपालांना काल पुन्हा एकदा विनंती करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर राज्यपालांनी तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती घेऊन आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. वास्तविक राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा निर्णय फेटाळल्यावर पुन्हा शिफारस करता येते. अजून तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिफारस अमान्य केलेली नाही. तरीही पुढील कायदेशीर लढाईच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने पुन्हा शिफारस करण्याची खेळी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत राजभवनकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यपाल भाजप नेत्यांच्या कलाने वागत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.

या घटनाक्रमांमुळे राजभवन आणि मंत्रालय यांच्यात दुही वाढत चालली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीवर राज्यपाल काहीच निर्णय घेत नसताना, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीन विकास मंडळांवरून राजभवनने सरकारला पाठविलेल्या पत्रावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. तिन्ही विकास मंडळांची मुदत ३० एप्रिलला संपुष्टात येत आहे. या मंडळांना मुदतवाढ दिल्यावर सध्याची व्यवस्था कायम ठेवावी, असे राजभवनने सरकारला कळविले. म्हणजेच भाजप सरकारच्या काळातील नियुक्त्या कायम ठेवाव्या, असेच राजभवनने सुचविले आहे. त्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ठाम विरोध आहे. यामुळेच सध्याच्या विकास मंडळांची मुदत संपेपर्यंत मुदतवाढीचा निर्णय घ्यायचा नाही, असे सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे. सध्याच्या विकास मंडळांची मुदत संपल्यावर नंतर मुदतवाढीचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

कोरोनाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारने उपाय योजले असतानाच राज्यपाल कोश्यारी यांनी विभागीय आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांची चित्रवाणीसंवादाद्वारे बैठक घेतल्याचा मुद्दाही गाजला होता. राज्यात दोन सत्ताकेंद्रे निर्माण होऊ नयेत, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त के ली होती. मात्र, सध्या तरी राज्यात मंत्रालय आणि राजभवन यांच्यात दुहीचे चित्र दिसते. दरम्यान, राज्यपालांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास राजभवनने नकार दिला. परंतु राजभवनने पत्र पाठविल्याचे सरकारी सूत्राने सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

सोलापूरात कोरोनाबाधितांची संख्या 81 वर, आज नवीन 13 रुग्ण सापडले

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा वाढतच आहे. आज दिवसभरात सोलापूरमध्ये तब्बल 13 नव्या कोरोनाबाधित रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 81 वरती येऊन पोहंचला आहे. आज सापडलेल्या रुग्णांपैकी चार पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज नव्याने सापडलेल्या तेरा रुग्णांमध्ये सोलापुरातील सदर बाजार लष्कर येथील तीन महिला, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधील एक महिला, आंबेडकर नगर माऊली चौकातील एक महिला, शामानगर (बिग बाजार जवळ) येथील एक महिला, कुमठा नाका मार्कंडेय नगर येथील एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथिल तीन पुरुष, पाच्छा पेठ जवळील शनिवार पेठेत एक पुरुष, शास्त्रीनगर मधील एक महिला व एमआयडीसी रोड वरील ताई चौक येथील एका महिलेचा समावेश आहे. आज दिवसभरात 117 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 104 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या एक्क्याऐंशी असून त्यामध्ये 46 पुरुष व 35 महिला आहेत.

आजपर्यंत कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 75 बाधित रुग्ण दाखल असून त्यामध्ये 43 पुरुष व 32 महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आयसोलेशन वार्डातील सोळाशे 24 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी बाराशे 50 जणांची रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. 374 जणांचे रिपोर्ट अद्यापही प्रलंबित आहेत. अकराशे 69 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 81 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

देशात २४ तासात कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू, रुग्णसंख्या ३२ हजारांच्याजवळ

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसताना कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा चिंतेत भर पडत आहे. गेल्या २४ तासाचा आढावा घेतल्यास कोरोनाचे १८१३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील करोनाबाधितांची संख्या ३१ हजार ७८७ इतकी झाली आहे. कोरोनामुळे २४ तासात ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत कोरोनाची लागण होऊन १००८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ७ हजार ७९७ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पाकिस्तानातील हिंदू आमदाराला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका हिंदू आमदारास कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे.अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की,पाकिस्तानमधील सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) मधील सिंध प्रांतातील विधानसभा सदस्य राणा हमीर सिंग यांची कोरोना टेस्ट पॉजिटीव्ह आलेली आहे.राणा हमीर सिंग हे वर्ष २०१८ मध्ये थारपारकर जिल्ह्यातून निवडून आले होते. हमीर जिल्ह्याचे मुख्य शहर असलेल्या मिठी येथील वैद्यकीय व्हेंटिलेटर रूमच्या उद्घाटनप्रसंगी राणा यांनी मुत्तहिदा मजलिस-ए-आमल पक्षाचे प्रांतीय आमदार अब्दुल रशीद यांना भेट दिली असल्याचे थारपारकरांचे उपायुक्त डॉ. शहजाद ताहिर यांनी सांगितले. नंतर त्यांनी रशिदला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले.

यानंतर, राणा हमीरसह राशीदच्या संपर्कात आलेल्या २५ जणांची नमुना तपासणी करण्याचे अधिकाऱ्यांनी ठरविले. ते म्हणाले की, सर्व २६ जणांच्या तपासणीत केवळ राणा हमीरचा अहवालच सकारात्मक आला. राणा हमीर सिंग हा अमरकोटचा २६ वा राणा आहे. १९९० च्या दशकात माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कार्यकाळात त्यांचे वडील राणाचंद्र सिंह यांनी संघराज्यमंत्री म्हणून काम पाहिले. हमीरचा मुलगा कुंवर करणी सिंहचे २०१५ मध्ये जयपूरच्या कानोटा राजघराण्यात लग्न झाले होते.

पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी सांगितले की,सर्व देशभर असलेला कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या १४,८८५ झाली आहे. देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ३२७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अलविदा इरफान! ‘या’ मोजक्या जणांच्या उपस्थितीत इरफानचे पार्थिव ‘सुपुर्द-ए-खाक’

मुंबई । बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या पार्थिवावर अंधेरीतील यारी रोड, वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. इरफानच्या पार्थिवाला सुपुर्द-ए-खाक करताना सिनेसृष्टीतील फार मोजकी मंडळी उपस्थित होती. मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात इरफानच्या पार्थिवाला दफन करण्यात आलं. लॉकडाउनच्या परिस्थितीत फार कमी लोकांना इरफान यांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. चाहते, मीडिया आणि सिनेसृष्टीतील इतर कोणत्याही व्यक्तीला गर्दी करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली नाही.

Irrfan Khan's Funeral: Friends & Family Bid Their Last Goodbyes ...

इरफान खानसोबत बरेच चित्रपट साकारणारे दिग्दर्शक विशाल भारद्वाज, गायक मिका सिंग, कॉमेडियन कपिल शर्मा असे मोजके सेलिब्रिटी अंत्यसंस्कारांवेळी उपस्थित होते. याशिवाय इरफान राहत असलेल्या इमारतीतील त्यांचे शेजारील काही उपस्थित होते.

RIP Irrfan Khan: Vishal Bhardwaj, Tigmanshu Dhulia at Versova ...
 दिग्दर्शक विशाल भारद्वाज

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानभूमीत कुटुंबातील फक्त ५ जणांना आत येण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी त्यांची दोन्ही मुलं बाबिल आणि अयान उपस्थित होते. इरफानचे सर्वात जवळचा मित्र दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया इरफानच्या कुटुंबासोबत रुग्णालयापासून त्याच्या दफनविधी पर्यंत उपस्थित होता.

Funerals News, Articles, Stories & Trends for Today
दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया

 

 

गेल्या काही वर्षांपासून इरफान आजारी आहे. २०१७ मध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी तो परदेशात गेला होता. याबद्दल त्याने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली होती. गेल्या वर्षी २०१९ मध्ये तो भारतात परतलाही. भारतात आल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. मात्र पुन्हा दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली अन् कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात इरफानला दाखल करण्यात आलं. पण आज बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली. इरफान खान यांना न्यूरोएण्डोक्राइन ट्यूमरचा आजार होता. या आजारानच वयाच्या ५३ व्या वर्षी इरफानची प्राणज्योत मालवली.

Irrfan Khan Funeral: Kapil Sharma, Mika Singh Attend Irrfan Khan ...
गायक मिका आणि कपिल शर्मा 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

जेव्हा सौरव गांगुलीने ‘या’ कर्णधाराला मैदानातच चिटिंग करताना पकडले;जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणताही खेळ वादाशिवाय अपूर्ण आहे.क्रिकेटच्या क्षेत्रातही बर्‍याचदा वादांची मालिका चालूच असते.२१ वर्षांपूर्वी जेव्हा आयसीसी क्रिकेट विश्वचषक इंग्लंडच्या भूमीवर खेळला जात होता आणि भारत-दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने होते तेव्हा या सामन्यातही असेच काहीतरी घडले होते, ज्याने कोट्यावधी चाहतेच नव्हे तर सर्व खेळाडू आणि संघांच्या पायाखालची जमीन सरकवली. हे काम त्या काळातल्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक असलेल्या हॅन्सी क्रोन्जेशिवाय इतर कोणी केले नव्हते.त्या दिवशी या कर्णधाराने असे काय केले ?.

असे म्हणतात की यशस्वी होण्यासाठी आपल्याला प्रयोग करणे आवश्यक आहे. आपल्याला केवळ प्रयोगांद्वारेच यश मिळते.१९९९ च्या क्रिकेट विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही असेच काहीसे केले. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक बॉब वूल्मर होते आणि हॅन्सी क्रोन्जे संघाचे नेतृत्व करत होता.या संघाने भारत विरुद्ध १९९९च्या विश्वचषकातील पहिला लीग सामना खेळला होता. बॉब वूल्मरने या सामन्याआधी एक योजना तयार केली होती,जी त्यांनी फ्रान्समधील १९९८ च्या फुटबॉल विश्वचषक विजयातून प्रेरित होती.वूल्मरची कल्पना होती की तो आपल्या संघातील खेळाडूंना एक यंत्र देणार होता, जेणेकरून सामन्यादरम्यान तो त्यांच्याशी संवाद साधू शकेल.यासह, तो सामन्यादरम्यान आपल्या संघाला काही महत्त्वपूर्ण माहिती देऊ शकेल,ज्यामुळे त्यांना जिंकण्यास मदत होईल.

हॅन्सी क्रोन्जे आणि वेगवान गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्ड या संघातील दोन खेळाडूंनी यासाठी सहमती दर्शविली.१५ मे १९९९ रोजी दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात टक्कर झाली आणि टॉस भारतीय कर्णधार अझरुद्दीनने जिंकला आणि अझरुद्दीनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सचिन-गांगुली फलंदाजीला आले. प्रशिक्षक बॉब वूल्मरच्या रणनीतीनुसार दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोन्जे आणि वेगवान गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्डने निर्भयपणे कानात इअरपीस घालून मैदानात प्रवेश केला.

हा सौरव गांगुलीचा पहिला विश्वचषक सामना होता, त्यामुळे त्याचे फलंदाजीकडे लक्ष होते. मात्र, यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्रोन्जेला पाहून त्याला थोडेसे विचित्र वाटले.त्याने पाहिले की क्रोन्जे स्वतःशीच बडबड करत आहे.मग अचानक सौरव गांगुलीला संशय आला की क्रॉन्जे स्वत:शी नसून दुसर्‍याशी बोलत असेल. ड्रिंक ब्रेक होण्यापूर्वी गांगुलीने पंच डेव्हिड शेपर्ड आणि स्टीव्ह बकनर यांच्याकडे याबद्दल तक्रार केली. जेव्हा दोन्ही पंचांनी क्रोन्जेला बोलावले तेव्हा प्रत्येक हादरून गेला.

हॅन्सी क्रोन्जेने कानात इअरफोन घातले होते. यासंदर्भात क्रोन्जे यांना विचारले असता तो म्हणाला की, तो आपल्या प्रशिक्षकाकडून दिशा-निर्देश घेत आहे. त्यावेळी क्रिकेटमध्ये असा कोणताही नियम नव्हता की कोणताही कर्णधार आपल्या कोचशी मैदानावरून इयरफोनच्या माध्यमातून संवाद साधू शकत नाही. जर पंचांना समजले नाही म्हणून त्यांनी मॅच रेफरी तलात अली यांना या विषयावर निर्णय जाहीर करण्यास सांगितले.

मॅच रेफरी तलत अली यांनी आयसीसी मुख्यालयात फोन लावला आणि त्यानंतर हॅन्सी क्रोन्जे आणि अ‍ॅलन डोनाल्ड यांना त्यांच्या कानातून इअरफोन त्वरित काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. हा सामना दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट्सने जिंकला होता, पण सामना संपल्यानंतर माध्यमांत खळबळ एकच उडाली. वास्तविक हंसी क्रोन्जे त्यावेळी एक महान कर्णधार मानला जात होता आणि त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. माध्यमांमध्ये त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक यांनाही माध्यमांकडे माफी मागावी लागली. या विश्वचषकातील वाद असूनही दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट क्रिकेट खेळले पण उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने त्यांचा एका धावेने पराभव केला आणि विजेतेपद जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पाकिस्तानी लोकांचे मत,कोरोनाव्हायरसचा धोका ठरत आहे अतिशयोक्तीपूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील दोन लाखांहून अधिक लोकांच्या मृत्यूमुळे बहुतेक पाकिस्तानी कोविड -१९ ला मृत्यूचा गंभीर धोका मानत नाहीत. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की प्रत्येक पाचपैकी तीन पाकिस्तानीना असा विश्वास आहे की कोरोना व्हायरस जितका अतिशयोक्ती आहे तितकाच धोका आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत देशात कोरोनाने संसर्गित झालेल्या १४५०४ रुग्णांची पुष्टी झाली आहे आणि यामुळे ३१२ लोकांचा बळी गेला आहे.

अशी भीती व्यक्त होत आहे की येत्या काही दिवसांत या देशात हा आजार अधिक गंभीर रूप धारण करू शकेल. असे असूनही, गॅलअप संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मार्चपासून प्रत्येक पाचपैकी तीन पाकिस्तानी लोकांना वाटले की कोरोना विषाणूचा धोका अतिशयोक्तीपूर्ण होतो आहे.

पाकिस्तानियों की...- India TV

या सर्वेक्षणात हा प्रश्न विचारला गेला की, “कोरोना विषाणूचा धोका अतिशयोक्तीपूर्ण झाला आहे का याबद्दल आपण किती सहमत आहात किंवा सहमत आहात याबद्दल कृपया सूचित करा.” याच्या प्रतिसादात,सुमारे ६० टक्के लोक म्हणाले की हा धोका अतिशयोक्तीपूर्ण आहे यावर ते सहमत आहेत.तर,३८ टक्के लोकांनी असे म्हटले आहे की असे नाही, हा धोका तितकाच मोठा आहे,तो ज्या प्रकारे सादर केला आहे.

सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की याची राष्ट्रीय सरासरी ही ६० टक्के असू शकते,परंतु बलुचिस्तान प्रांतामध्ये ८९ टक्के लोक म्हणाले की कोरोनाचा धोका जितका जास्त सांगितला जात आहे तितका तो जास्त नाही आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.