Monday, December 22, 2025
Home Blog Page 5873

फलटन येथील एकाला कोरोनाची लागण, चार दिवसांपूर्वी पुण्याहून आला होता गावी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

फलटण येथील एका युवकाची कोरोना चाचणी पोझिटिव्ह आली असून तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अमोद गडीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या ३६ वर गेली आहे. सदर युवक चार दिवसांपूर्वी पुण्याहून फलटणला आला होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशातील स्वागचे नमुने पुनबे येथे तपासणी करता पाठवण्यात आले होते. आज पुणे येथीप बी.जे. मेडिकल काॅलेज कडून त्याचा अहवाल प्राप्त झापा असून तो कोरोना पोझिटिव्ह असल्याचे कळवण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदरचा कोरोना पॉझिटिव्ह तरुण शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी पुण्यावरुन फलटण येथे आला होता. सदर २८ वर्षीय तरुणाला ताप व खोकला येत असल्याने तो घरी न जाता उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी त्याचा स्वॅब घेऊन BJMC ला तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. सोमवार दिनांक २७ एप्रिल रोजीच्या अहवालामध्ये सदर व्यक्तीची चाचणी कोविड१९ साठी पाॅझिटिव्ह आली आहे. सदर तरुण तब्बल १७ जणांच्या संपर्कात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. सदर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला पुढील उपचारासाठी सिव्हील हाॅस्पीटल, सातारा येथे पाठविण्यात आले आहे. बाधित व्यक्ती फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालय वगळता इतर कोणत्याही नागरिकांच्या संपर्क न आल्याचे दिसून येत नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.

दरम्यान, सातारा जिल्हा आता कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनत आहे. कराड आणि जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडले आहेत. कराड, पाटण, जावळी येथीप काोरोना प्रभावीत काही गावे पुर्णपणे सील करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आता फलटण वासीयांनाही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. कोविड-१९ विषयी पूर्वी दिलेल्या मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार साबणाने हात धुणे इ. सारख्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असून बाहेरगावावरुन आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासनास देणे आवश्यक आहे. याशिवाय स्थानिक व बाहेरगावावरुन आलेल्या आणि खोकला, ताप इ. लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घेणे आवश्यक आहे असे आव्हान उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.

कोरोना इम्पॅक्ट | आशा सेविकांना टाळ्या आणि इन्शुरन्सपेक्षा ‘योग्य’ पगाराची ‘जास्त’ गरज आहे.

लढा कोरोनाशी | स्नेहल मुथा

२२ मार्च रोजी, जनता कर्फ्युदिवशी सरकारने विनंती केल्याप्रमाणे भारतीयांनी कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी अग्रभागी असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आशा (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कर्मचारी) कर्मचारी त्यापैकीच एक आहेत, ज्या सरकारतर्फे covid-१९ चा सामना करण्यासाठी अग्रभागी काम करत आहेत. आशा सेविकांनी सरकारचं काम हलकं केलं असलं तरी सरकार मात्र आशा सेविकांच्या समस्या सोडविण्यात पुन्हा एकदा चुकलं आहे. कोरोना विषाणूने पुन्हा एकदा आपलं लक्ष आशा कर्मचाऱ्यांच्या विभागाकडे आणि असमानतेकडे वेधले आहे. आशा कर्मचाऱ्यांना महिन्याला २ ते ३००० रु मानधन मिळते. कोरोना विषाणूच्या काळात त्यामध्ये सरकारकडून अतिरिक्त १००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या हिशोबाने सद्यस्थितीत आशा कर्मचाऱ्यांच्या जीवनाचे प्रतिदिन मूल्य १०० रुपये झालं आहे. एका दिवशी किमान २५ ते कमाल ४० घरांचं सर्वेक्षण करण्याचं काम आशा सेविका करतात, म्हणजे त्यांना एका घरामागे ३ ते ४ रुपये मिळतात. महाराष्ट्रात जवळपास ७०,००० आशा सेविका कोरोना विषाणूचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात काम करत आहेत. निर्मला माने या आशा सेविकेच्या म्हणण्यानुसार, ‘आम्हांलाही घराबाहेर जायची बिल्कुल इच्छा नसते, पण कोरोना विषाणूपेक्षा मोठा असलेला भुकेचा विषाणू आहे, जो मारण्यासाठी आम्हाला काम करावंच लागणार आहे. माझ्या आयुष्याची किंमत केवळ ३० रु प्रतिदिन असली तरी थोडेफार पैसे मिळवण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.’ निर्मला काशीळमध्ये राहतात. त्यांना कामासाठी बाहेर जावे लागते कारण त्यांचे पती काम करू शकत नाहीत. घरातील चार लोकांच्या व्यवस्थित जगण्यासाठी त्यांनी दिवसभरात ४० लोकांशी संवाद साधण्याचा धोका पत्करला आहे. यातूनही तिला मिळणारं आहे ते केवळ पोटापाण्याचं भागवता येईल एवढंच..!! निर्मलासारख्याच अनेक आशा सेविका आहेत, ज्या सकाळी बाहेर पडतात. पुढे जाऊन अलगावमध्ये राहणाऱ्या आणि समुपदेशन करता येईल अशा लोकांना भेटण्यासाठी घरोघरी जातात.

आशा सेविका का महत्त्वाच्या ?? – आशा या इतर आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच महत्वाच्या आहेत. त्या कुठल्यातरी ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा समाजात मिसळून अधिक काम करतात, म्हणून त्यांना कायमस्वरूपी कामगार मानले जात नाही. त्या भारतातील दस्तऐवजीकरणाच्या (नोंदी ठेवण्याच्या) समस्या सांभाळतात. गर्भवती स्त्रियांपासून, मुलाचा जन्म आणि गावातील नागरिकांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक तपशिलांचे दस्तऐवजीकरण त्यांच्याकडून केले जाते. कोरोनासारख्या काळात त्या नोंदी ठेवण्याच्या कामामुळेच अधिक महत्वाच्या बनल्या आहेत. आशा सेविका या आरोग्य व्यवस्थापनाचे अधिकारी (नियंत्रक) आणि समाजातील अगदी शेवटची व्यक्ती असणारा सामान्य नागरिक यांच्यातील दुवा आहे. अत्यंत किचकट वाटणारा संवाद हा आशा सेविकांमुळेच पूर्ण होत आहे. त्यांच्याकडून ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत सर्वेक्षण केलं जात आहे. आपला जीव धोक्यात घालून ६ ते ७ तास कडक उन्हात काम करत, घरोघरी जाऊन त्या विचारणा करत आहेत. 

सिटू, नांदेडच्या अध्यक्षा असलेल्या उज्ज्वला सांगतात, ‘एमपीडब्ल्यू’ असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मासिक ५०,००० रु वेतन मिळतं. आणि त्यांच्याच जोडीने काम करणाऱ्या आशा सेविकांना त्यांच्या पगाराच्या १०% रक्कमसुद्धा मिळत नाही. वैद्यकीय अधिकारी हे कधीच तळागळात पोहोचत नाहीत. त्यांच्याकडून केली जाणारी सर्व कार्यवाही ही आशा सेवकांच्या अहवालानुसारच केली जाते. आणि पुढे पाठवली जाते. आशांना सरासरी दोन समस्यांना सामोरे जावे लागते, एक म्हणजे आर्थिक आणि दुसरी म्हणजे त्यांची वैयक्तिक सुरक्षा. दुर्दैवाने याबाबतीत खरंच काहीतरी करावं यासाठी राज्य किंवा केंद्र सरकारने अद्यापही पुढाकार घेतलेला नाही. मोठमोठ्या आकडेवारींनी जनतेला भुलवणाऱ्या केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या १.७० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये आरोग्य सेवकांसाठी ५० लाखांच्या विम्याची तरतूद केली आहे. यातही वरिष्ठ ते कनिष्ठ असे स्तर केले आहेतच. असो. आशा सेविकांच्या वेतनवाढीची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. उज्ज्वला यांच्या मते जगण्याचा प्रश्न असताना न मिळालेले पैसे, मृत्यूनंतर घेणं कुणाला चांगलं वाटणार आहे? कोरोना विषाणूच्या काळात ५०० रु प्रतिदिन वेतन आणि सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझर एवढी माफक मागणीच आशसेविका करत आहेत, त्याच्यावर मात्र कुणीच बोलायला तयार नाही. ५० लाख रुपयांच्या विम्याने आशा सेविकांना कोणताही आनंद दिलेला नाही. कोरोना विषाणूपूर्वीसुद्धा आशा सेविकांना २ लाखांचा विमा देण्यात आला होता, ज्याची सरकारी पुस्तिकेमध्ये कोणतीच तरतूद नव्हती. वार्षिक १२ रु आणि ३३० रु हे त्यांच्या पगारातूनच कपात करून विम्याचा वार्षिक हप्ता भरुन घेतला जातो. सरकारी पॅकेज आपल्यासाठी दिलासादायक आहे का? हाच प्रश्न प्रत्येक आशासेविकेला आजही पडला आहे.

थोडक्यात महत्त्वाचं – ग्रामीण भागामधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण शहरांच्या तुलनेत कमी असल्याने आशा कर्मचाऱ्यांचे काम फायद्याचे ठरले आहे असंच म्हणता येईल. कोरोना काळात तपासणी ही अशी गोष्ट आहे की यांत्रिक मर्यादांमुळे भारताला आतापर्यंत त्याकडे म्हणावं तितकं लक्ष देता आलं नाही. पण याही परिस्थितीत भारतातील प्रत्येक गल्ली आणि घरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वेक्षण हा उत्तम पर्याय असल्याचं आशा सेविकांच्या माध्यमातून सिद्ध झालं आहे. सांगली येथील डॉ अमोल यांच्या म्हणण्यानुसार, एकाच वेळी अनेक लोकांची तपासणी करणे कठीण आहे, पण लोकांना कोरोना तपासणीसाठी शोधणे किंवा कोरोना सकारत्मक प्रकरणांना शोधण्यासाठी सर्वेक्षण हा प्रभावी मार्ग नक्कीच आहे. आशा सेविका हेच काम करत आहेत. जर सर्वेक्षण झाले नसते तर सरकारला पुढची कार्यवाही करणं निश्चितच कठीण गेलं असतं.

सुरक्षेची जबाबदारी ही अपमान करुन घेण्यासाठीच दिलीय? – कोरोना विषाणू प्रतिबंध साखळीतील अविभाज्य भाग असल्याने ते पहिल्यांदा लोकांच्या संपर्कात असतात. आशा कर्मचाऱ्यांना अद्याप वैयक्तिक संरक्षण संसाधने आणि सुरक्षा साधने देण्यात आलेली नाहीत. ६ तासांमध्ये खराब होणारा मास्क आणि एका निर्जंतुकीकरण बाटलीवर त्यांची सुरक्षा अवलंबून आहे. या कालावधीनंतर आशांना सुरक्षेसाठी ओढणीचा तुकडा किंवा पदराचा कोपरा वापरण्यास सांगितल्याचे अहवाल आहेत. स्वतः दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या या सेविका सामाजिक अलगाव सांभाळून 
सामाजिक कसे करू शकणार आहेत? निर्मला यांनी त्यांना केवळ एकवेळ वापरायचे ग्लव्हज देण्यात आल्याची तक्रार केली होती. सुरक्षा साधनं मागणी केल्यावर त्यांना आरोग्य विभागातून राजीनामा देण्यास सल्ला दिल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. सुरक्षेबरोबरच अपमान हा आशा कर्मचाऱ्यांसाठी स्टार्टर पॅक आहे. लोकांकडून त्यांचा अपमान केला जातो. तोंडी अपमान तर शिखरावर आहे. एकीकडे सरकार त्यांच्याकडे पाठ फिरवित आहे आणि दुसरीकडे लोक त्यांना त्रास देत आहेत. अलीकडेच, दोन दिवसांपूर्वी देवणी तालुक्यात, कामावर असणाऱ्या आशा कर्मचाऱ्याला स्थानिकांनी दांडक्याने मारून जखमी करून सोडून दिले. महाराष्ट्रात अशी बरीच प्रकरणे नोंदवली गेली आहेत, पण अद्याप त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतेच उपाय केले गेले नाहीत. आशा कर्मचारी युनियनचे प्रमुख राजेंद्र साठे सांगतात, ‘आशा कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्याची आणि परंत आणून सोडण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. ज्या ठिकाणी आशांचा अपमान आणि छळ होतो अशा कोणत्याच ठिकाणी हे अधिकारी आणि पोलीस त्यांच्यासोबत कधीच आलेले नाहीत.’  

जुन्या जखमा – अशा अमानुष वर्तनाची दोन कारणे आहेत. पहिले जागरूकता नसल्याचे दर्शविते. लोकांची माहिती घेऊन ते जर बाधित असतील तर तसं वरिष्ठांना कळवणे आणि त्यांना सामाजिक अलगावमध्ये ठेवणे ही आशा सेविकांची कामे असल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दुसरी भीती यापूर्वीच्या लागू झालेल्या एनआरसी आणि सीएए प्रकरणांमधूनही निर्माण झालेली आहे. राजेंद्र साठे सांगतात, ‘मुस्लिम वस्त्यांमध्ये आशा  सेविकांना काम करू दिले जात नाही, कारण येथील लोकांना वाटतं की आशा  सेविकांच्या माध्यमातून सरकार त्यांची सर्व माहिती काढत आहे, आणि हे सगळं संपलं की सरकार त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी याचा वापर करेल. ‘एनआरसी आणि सीएए’ प्रकरणाच्या जखमा इतक्या खोलवर झाल्या आहेत की त्याचा परिणाम आशांच्या कामावर दिसून येतो आहे.  ग्रामीण भागात दर १००० लोकांसाठी १ आणि शहरी भागात दर १०,००० लोकांसाठी १ आशा आहे. लॉकडाऊन परिस्थितीत काही लोक त्यांना दारातही उभं करून घेत नाहीत, अशावेळी प्रत्येकाला वास्तव समजावून सांगनं कठीण होतं. सिटूने सरकारला काही पत्रे पाठवली आहेत, पण अद्याप त्याला काही प्रतिसाद मिळालेला नाही. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे सातारा जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम अधिकारी करण जगताप यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘ग्रामीण आरोग्य सुधारणा मोहीम ही आशा कर्मचाऱ्यांशिवाय अपूर्णच आहे. आम्ही त्यांच्या मानधन प्रश्नांविषयी निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. शिवाय अशा अनेक समस्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्नही सुरु आहेच. २००७ पासून ते आतापर्यंत यात अनेक बदल झाले आहेत. लवकरच आहेत त्या समस्यासुद्धा सोडवल्या जातीलच. या कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप हीच सद्यस्थितीत प्राथमिक समस्या आहे. या सेविकांचं काम ‘कर्मचाऱ्यांपेक्षा कार्यकर्ता’ म्हणूनच अधिक होत असलं तरी कोरोनाने यांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे एवढं मात्र नक्की..!!

स्नेहल मुथा या मुक्त पत्रकार असून त्यांना वाचन, प्रवास आणि लिखाणाची विशेष आवड आहे. त्यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला असून त्यांचा संपर्क क्रमांक – 9146041816 हा आहे.

लेखिकेचा संपर्क (whatsapp) – 9527196215 [email protected]

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ८५९० वर, दिवसभरात सापडले ५५२ नवे रुग्ण

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात ऐकून ५५२ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८५९० वर पोहोचली आहे. आज कोरोनामुळे २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊ मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे. २४ तासात ९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

करोना विषाणूचं ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या मुंबईत आज दिवसभरात १५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर ३९५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या आता ५५८९वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनारुग्ण पहा एका क्लिकवर –

मुंबई महानगरपालिका: ५७७६ (२१९)
ठाणे: ४० (२)
ठाणे मनपा: २९५ (४)
नवी मुंबई मनपा: १३५ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १४५ (३)
उल्हासनगर मनपा: २
भिवंडी निजामपूर मनपा: १४
मीरा भाईंदर मनपा: १२१ (२)
पालघर: २५ (१)
वसई विरार मनपा: १२१ (३)
रायगड: १८
पनवेल मनपा: ४३ (१)
ठाणे मंडळ एकूण: ६७३५ (२३८)

नाशिक: ४
नाशिक मनपा: १९
मालेगाव मनपा: १२३ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ४८(२)
धुळे मनपा: १७ (१)
जळगाव: १८ (४)
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ११ (१)
नाशिक मंडळ एकूण: २४४ (२३)

पुणे:५८ (३)
पुणे मनपा: ९६९ (७४)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: ५९ (५)
सातारा: २९ (२)
पुणे मंडळ एकूण: ११९३ (८७)

कोल्हापूर: ७
कोल्हापूर मनपा: ४
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४७ (२)

औरंगाबाद:१
औरंगाबाद मनपा: ५१ (६)
जालना: २
हिंगोली: ८
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ६३ (६)

लातूर: १० (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ३
लातूर मंडळ एकूण: १७ (१)

अकोला: ११ (१)
अकोला मनपा: १८
अमरावती: १
अमरावती मनपा: २१ (७)
यवतमाळ: ६२
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: १३५ (९)

नागपूर: ४
नागपूर मनपा: १२३ (१)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १३१ (१)
इतर राज्ये: २५ (२)
एकूण: ८५९० (३६९)

कोरोनाने भारताचा ‘खरा विकास’ उघडा पाडलाय – तवलीन सिंग

लढा कोरोनाशी | राष्ट्रीय संचारबंदी उठवण्याची ही वेळ आहे का? हा साथीचा आजार इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतात वेगवेगळ्या पद्धतीने का अनुसरण करत आहेत याचे भारतीय शास्त्रज्ञांनी परीक्षण करायची ही वेळ आहे का? आपल्या अगणित आर्थिक समस्या या घडीला त्या चायनीज विषाणूपेक्षा जास्त गंभीर आहेत आणि याचसोबत जगणे शिकण्याची आणि इतर गोष्टींशी व्यवहार करण्याची ही वेळ आहे का? हे असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे नाहीत पण ती लवकर मिळण्याची आवश्यकता आहे. देशभरातील पहिल्या संचारबंदीचा आदेश केव्हा देण्यात आला? मला विश्वास आहे, कदाचित जेव्हा आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे शास्त्रज्ञ आणि साथीचे रोग विशेषज्ञ भारतातील शेकडो हजारो लोक रस्त्यावर मृत्युमुखी पडण्याची शक्यता असल्याची भविष्यवाणी करत होते तेव्हा. त्यांनी हे पटवून देण्यासाठी आपल्याला स्पॅनिश फ्लूची आठवण करून दिली. ज्याचे अर्धे पीडित हे भारतात होते. आता आपण दुसऱ्या संचारबंदीच्या शेवटच्या आठवड्यात आहोत. सध्या असं दिसून येत आहे की त्यांची भविष्यवाणी हा गजर आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही भारतीय लोकांपेक्षा जास्त धोक्यात असण्याची शक्यता आहे. संशयवादी असे म्हणतात की, आपण या साथीच्या रोगाची व्याप्ती स्पष्ट होण्यासाठी जेवढ्या चाचण्या करायला हव्या होत्या तितक्या केल्या नाहीत म्हणून हे होत आहे. शक्यतो..!! पण हेसुद्धा खरे असू शकते की, जर मुंबईतील झोपडपट्टीतील शेकडो लोक दरदिवशी मृत्युमुखी पडू लागले किंवा अगदी ज्या गावात स्थलांतरित लोक पळून गेले आहेत हेही आपल्याला माहित असेल.  

स्थलांतरित कामगारांबद्दल बोलत असताना, जर हे लोक त्यांच्या कारखाने, मिठाईची दुकाने, छोटे व्यवसाय आणि बांधकामाच्या ठिकाणी परत गेले नाहीत तर भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान होण्याची आशा नाही. आपल्याला लवकरात लवकर अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याची गरज आहे, पण भारत सरकार कोणतेच नियम बनवून स्वतः काहीच करत नसल्याचे निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. जेव्हापासून अचानक हा साथीचा रोग अति संवेदनशील झाला आहे, तेव्हापासून गृह मंत्रालय अत्यंत कनवाळुरीत्या शांत झाले आहे. म्हणून सर्वप्रथम असा नियम करण्यात आला. असेच व्यवसाय पुन्हा सुरु करण्यात येतील जे कामगारांना त्यांच्या आवारातच ठेवायला तयार आहेत. त्यानंतर आणखी एक हास्यास्पद नियम आला ज्यात म्हटले होते, काम सुरु झाल्यानंतर जर एखाद्या कामगाराला कोरोना विषाणू झाला तर त्याला तुरुंगात टाकले जाईल. हे नियम इतके मूर्खपणाचे होते जे स्पष्ट करतात, केवळ दुर्लक्ष करण्यासाठीच ते बनवले गेले होते. आणि, हे कोण ठरवेल? 

पंतप्रधानांना एका गोष्टीची आठवण करून देण्याची ही योग्य वेळ आहे, ते म्हणाले होते, त्यांच्या कार्यालयातील सुरुवातीच्या काही काळात मी त्यांचे समर्थन केले. ‘सरकारला व्यवसाय करण्यात काही रुची नाही?’ असे ते म्हणायचे ते आठवते. तसेच ज्याचा यावर खरोखरच विश्वास आहे त्याने माझे समर्थन जिंकले आहे. दुर्दैवाने गेल्या सहा वर्षात नरेंद्र मोदींनी जे म्हंटले आहे त्याच्या अर्थाचे एकही चिन्ह सापडले नाही. काही प्रकरणामध्ये अगदी उलटे झाले आहे, कंपनी स्वरूपातला कायदा हा व्यवसायच्या लहानात लहान तपशिलात हस्तक्षेप करू इच्छितो. यात काहीच आश्चर्याची बाब नाही की, भारतातील रोजगार निर्मितीमध्ये कोणतीच वाढ झालेली नाही. पण एकेकाळी  ‘हिंदू वाढीचा दर’  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे आपण परत जात आहोत. पंतप्रधानासाठी त्यांनी एकदा मागे जाऊन त्यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्याची ही एक संधी आहे. नियम, गुंतागुंतीची कागदपत्रांची प्रक्रिया आणि कायद्याची पुस्तिका कचऱ्यात टाकून देऊन, बऱ्याच काळापासून थकीत असणाऱ्या कामगार कायदा आणि जमीन वापरामध्ये बदल करण्याची हीच वेळ आहे. १९९१ मध्ये जेव्हा भारताने आपले सोन्याचे साठे गहाण ठेवले होते आणि अशाच बिकट परिस्थितीत होता तेव्हा त्या पंतप्रधानांनी ज्या सुधारणा केल्या होत्या त्या करण्याची ही वेळ आहे. जेफ बेझोससारखे लोक जेव्हा नव्या गुंतवणुकीच्या आश्वासनासह भारतात येतात तेव्हा त्यांचा अपमान करणाऱ्या मंत्री आणि खुशमस्कऱ्या लोकांना ताब्यात ठेवण्याची ही वेळ आहे. ते असे करतात कारण त्यांना वाटते की, त्यांच्या प्रामाणिकपणाकडे पंतप्रधानांचे लक्ष जाईल, म्हणून त्यांना असे सुचवायचे असते की त्यांना हे बोलणे आवडत नाही आणि हे थांबेल. 

या साथीच्या आजाराने एक असा आरसा दाखवला आहे, ज्यात अगदी स्पष्टपणे आपल्याला आपल्या प्रिय भारतमातेचा चेहरा दिसतो आहे. ती वाईट दिसत आहे. आपल्या सामाजिकीकरणाच्या संकल्पनेचे काय झाले आहे की आपल्या शहरांमध्ये परवडणारी आणि भाडेतत्वारील घरे बांधण्यासाठी आपण सक्षम नाही आहोत? या स्थलांतरित कामगारांच्या डोक्यावर जर एखादे चांगले छप्पर असते तर ते असे त्यांच्या गावी पळून गेले नसते. मुंबईसारख्या शहरात जिथे परवडणारी घरे न मिळणे इतके तीव्र आहे की निम्मे नागरिक हे झोपडपट्टीत राहतात आणि या विषाणूने झोपडपट्टीतच निर्दयतेने मोठ्या प्रमाणात हालचाल केली आहे. जेव्हा लोकांना एकाच छताखाली राहावे लागते तेव्हा आपण त्यांना एकमेकांपासून सामाजिक अलगाव ठेवण्यास सांगण्यात काय अर्थ आहे? जे लोक ओबडधोबड परिसरात राहतात, त्यांच्यासाठी साबण आणि पाणी म्हणजे चैन असते आणि आपण त्यांना दिवसभरात अनेकवेळा हात धुवायला सांगण्यात काय मुद्दा आहे? या एका वेगळ्या आरशात आपण आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या सेवांचे प्रतिबिंब पाहतो आहोत, ज्यात हे लोक खूप निराश आणि अस्वच्छ दिसत आहेत ज्याची आपल्या सर्वांना लाज वाटली पाहिजे. म्हणूनच हा साथीचा आजार श्री नरेंद्र मोदींसाठी त्यांचे परिवर्तन आणि विकास हे शब्द आठवण्याची वेळ आहे. त्या प्रबळ शब्दांना सत्यात उतरवण्याची हीच वेळ आहे.

तवलीन सिंग या द इंडियन एक्सप्रेसमधील स्तंभलेखक आहेत. रविवार दि. २६ एप्रिल रोजीच्या अंकात आलेल्या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. त्यांचा संपर्क – 9146041816 हा आहे.

सावधान! जून, जुलै महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली शक्यता

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णांची संख्या २८ हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवून ३ मे केला आहे. मात्र आता ३ मे नंतर काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून, जुलै महिन्यात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी एस सिंग देव यांनी ही माहिती दिली आहे.

 

पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. त्यानुसार, छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी एस सिंग देव यांनी सांगितलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून, जुलै महिन्यात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता सांगितली. त्यामुळे करोना व्हायरसच बराच वेळ आपल्यासोबत असणार आहे. हे पाहता आण त्यादृष्टीने पुढील धोरण आखणं गरजेचं आहे असं ते म्हणाले आहेत”.

नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना सांगितलं की, “करोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे २० देश यामध्ये भारताबरोबर होते तिथे आज ७ ते ८ आठवड्यांनी भारताच्या तुलनेत १०० पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. आपण योग्य वेळी लॉकडाउनचा निर्णय घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतोय. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे”.

“लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. करोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा” असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. “पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी . मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.” असंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

म्हणून सुंदर पत्नी असूनही पती देतात धोका..

Relationship Goals
Relationship Goals

Hello LoveGuru| पती-पत्नीचे नाते हे खुप गोड असते. प्रत्येक प्रसंगाला ते दोघे मिळून समोरे जातात. परंतु पत्नीकडून कधी-कधी अशा चुका होतात की, ज्यामुळे पती त्यांना धोका देऊ लागतात. त्यांना त्यांच्या पत्नीत इंट्रेस्ट राहत नाही. ते दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात. यामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो आणि शेवटी नाते तुटते. आज आपण असे ६ कारणे पाहणार आहोत ज्यामुळे पती-पत्नीला धोका देतात…

१) पतीला नेहमी वाटते की, त्यांच्या पत्नीने पतीसाठी सजावे, त्यांच्यासोबत गोड-गोड गप्पा कराव्या. परंतु अनेक जबाबदा-या असलेली पत्नी जेव्हा असे करत नाही तेव्हा पती दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात. कारण त्या त्यांना प्रॉपर टाइम देतात आणि त्यांच्या भावनांना समजून घेतात.

२) विश्वासघात करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वैवाहिक जीवनात रोज होणारे भांडणे आहे. जर वैवाहिक जीवनात रोज भांडणे होत असतील तर पतीला वाटते की, आपण विश्वासघात केला तरी चालेल. ते दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात.
couple-cheating

३) जेव्हा पतीला वाटते की, त्यांच्या पत्नीला त्यांची गरज नाही तेव्हा ते दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात. यामध्ये सेक्सचा समावेश देखील होतो. जेव्हा पत्नी पतीला इंग्नोर करते तेव्हा त्यांना धोका देण्यात काही गैर वाटत.

४) अनेक वेळा अशी स्थिती येते की, पतीला कळतच नाही की, त्यांनी कसे काय आपल्या पत्नीला धोका दिला. ते नकळत दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात आणि ती त्यांचे लक्ष ठेवू लागते.

५) जेव्हा पतीला त्यांची गर्लफ्रेंड भेटते तेव्हा तरुण वैवाहिक असल्यावर देखील पत्नीला धोका देतात. कारण त्यांना आपली गर्लफ्रेंड येवढ्या वर्षांनंतर भेटली हे खुप चांगले वाटते.

६) लहानपनी जेव्हा आई-वडील एकमेकांना धोका देत असतील हे पतीने पाहिलेले असेल तेव्हा त्यांना असे करण्यात काहीच गैर वाटत नाही. ते कोणताही संकोच न करता आपल्या पत्नीला धोका देतात.

इतर महत्वाचे –

कामसूत्रानुसार या गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात

सनी लिओनीचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल

काय आहे सनी लिओनीच्या बायोपिकमध्ये

प्रेम केलेल्या आणि न-केलेल्या पाखरानों.. या “लव्ह स्टोरीज” तुम्हाला प्रेमामधली सुंदर गोष्ट उलगडून दाखवतील

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

जगभरात कोरोनाचे रूग्ण सुमारे ३० लाखांपर्यंत, एकट्या अमेरिकेत १० लाख संसर्गित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची लागण किती वेगाने होत आहे याचा अंदाज जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांवरून काढता येतो. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची एकूण संख्या जवळपास ३० दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे आणि यातील जवळजवळ एक तृतीयांश रुग्ण एकट्या अमेरिकेतील आहेत. जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे या विषाणूपासून मुक्त होणाऱ्या लोकांची संख्याही झपाट्याने वाढली असली तरी, विषाणूमुळे आपले प्राण गमावणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढतच आहे.

वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या २९.९५ लाख झाली आहे.या आकडेवारीत ८.७९ लाख लोक असे आहेत जे कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत,परंतु यामुळे आपला जीव गमावणाऱ्या लोकांचाही यात समावेश आहे.

आतापर्यंत जगभरात जितक्या कोरोना विषाणूच्या संसर्ग झालेल्यांची नोंद झाली आहे त्यापैकी एक तृतीयांश रुग्ण एकट्या अमेरिकेतील आहेत.अमेरिकेत सोमवारी सकाळपर्यंत कोरोना विषाणूची एकूण ९.८७ लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर ५५,००० हून अधिक लोक मरण पावले आहेत.मात्र या विषाणूची लागण झाल्यानंतर अमेरिकेत सुमारे १.१९ लाख लोक बरे झालेले आहेत.अमेरिकेतील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सर्वाधिक घटना या न्यूयॉर्कमध्ये झाल्या असून आतापर्यंत सुमारे २.९४ लाख लोकांना संसर्ग झालेला आहे, न्यूयॉर्कनंतर न्यू जर्सीमध्ये १ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

त्यानंतर स्पेन (२.२७ लाख), इटली (१.९८ लाख), फ्रान्स (१.६२ लाख), जर्मनी (१.८८ लाख), ब्रिटन (१.३३ लाख) आणि तुर्की (१.१० लाख) हे आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना संकटात उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावर टांगती तलवार; मंत्रिमंडळाची राज्यपालांना पुन्हा विनंती

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती होणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना राज्य मंत्रिमंडळाने आज पुन्हा एकदा याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विनंती केली. महाराष्ट्रावर अभूतपूर्व असं कोरोनाचं संकट कोसळलं आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे सध्या विधान परिषद किंवा विधानसभा यापैकी एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी याची पूर्तता करावी लागणार आहे. २८ मेपर्यंत त्यांना कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागणार आहे. एकीकडे महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत असताना मुख्यमंत्र्यांपुढे हा मोठा पेच निर्माण झाला आहे.

त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ९ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता व तशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली होती.

सध्या करोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासन जोमाने संकटाचा मुकाबला करत आहे. करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर राज्यपालांनी तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार केला.

येत्या २८ मेपर्यंत त्यांना विधान परिषद किंवा विधानसभा यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागणार आहे. राज्यपालांनी त्यांच्या कोटातील एका जागेवर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस ९ एप्रिल रोजी राज्य मंत्रिमंडळाने केलेली आहे. त्यावर राज्यपालांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांत बरेच खटकेही उडत आहेत. त्यातच आज राज्यपालांकडे करण्यात आलेल्या शिफारशीबाबत पुन्हा एकदा मंत्रिमंडळाने विनंती केल्याने राज्यपाल कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

भारत सरकारचा मोठा निर्णय! बोगस चिनी टेस्ट किट्सची ऑर्डर रद्द

नवी दिल्ली । चीनला देण्यात आलेली कोविड-१९ रॅपिड अ‍ॅंटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठ्याची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. कोरोना व्हायरसची जलदगतीने चाचणी करुन निदान करता यावे, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सच्या खराब दर्जामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरेदीच्यावेळी सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले होते. त्यामुळे एक पैसाही वाया जाऊ देणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काही राज्य सरकारांनी चिनी कंपन्यांकडून मागवण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्समधून चुकीचे निदान होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आयसीएमआरकडून या किट्सचे मूल्यमापन करण्यात आले. या किट्सच्या सहाय्याने चाचणी केल्यानंतर खूप फरक दिसून आला. चिनी कंपन्यांनी जे आश्वासन दिले होते, हे किट्स पूर्णपणे त्याविरोधात आहे असे आयसीएमआरने आपल्या अ‍ॅ़डव्हायजरीमध्ये म्हटले आहे. गुनांझो वोंड्फो बायोटेक आणि जुहाई लिवझॉन डायग्नोस्टिक्स किट्स या दोन कंपन्यांच्या किट्सचा वापर थांबवण्यास सांगितले आहे. चिनी कंपन्यांकडून किट्स विकत घेण्याच्या प्रक्रियेसंदर्भातील फॅक्ट शीटस सुद्धा मंत्रालयाने जारी केली आहे.

या किट्सचा वापर करु नका, हे किट्स पुन्हा त्या कंपन्यांना परत करा असे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. ‘Covid-19 चे निदान करण्यासाठी आरटी पीसीआर गळा/नाक स्वॅब चाचणीच सर्वोत्तम आहे. या चाचणीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्येच व्हायरस असेल तर समजतो’ असे आयसीएमआरने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

चीनवर कुरघोडी करण्यासाठी भारताला हीच ‘ती’ संधी -नितीन गडकरी

मुंबई । कोरोना संकटामुळे जगाच्या नजरेत चीन खलनायक झाला असून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णसंधी असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रसार केल्याने चीनविरोधात जगभरात द्वेष वाढत असताना भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची आर्थिक संधी असल्याचं नितीन गडकरी म्हणाले आहेत. नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

कोरोना संकटामुळे जगाच्या नजरेत चीन खलनायक झाला आहे. भारताला याच संधीचा लाभ घ्यायला हवा. या आर्थिक संकटाला संधीमध्ये बदलून परदेशी गुंतवणुकीचा जास्तीत जास्त आकर्षित करण्यावर लक्ष द्यायला हवे, असं गडकरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. हा मुद्दा पटवून देताना यासाठी त्यांनी गडकरींनी जपानचे उदाहरण दिले. ”जपानने चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केला आहे मला वाटतं आपण यावर विचार करणं तसंच लक्ष देणं गरजेचं आहे. आपण भारतात तशी संधी किंवा परिस्थिती निर्माण करुन दिली पाहिजे. आपण त्यांना मंजुरी तसंच परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी जे काही गरज लागेल ते सर्व देऊ,” असं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

गडकरी यांनी सांगितले की, परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी परवानग्या आणि दुसऱ्या अन्य सुविधांमध्ये वेग आणला जाणार आहे. अर्थ मंत्रालयसह सर्व विभाग आणि आरबीआय कोरोनानंतर अर्थव्यवस्थेमध्ये वेग आणण्यासाठी नीती बनवत आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाची अर्थव्यवस्था ५ खरब डॉलरची बनविण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या काळात आपण १०० लाख कोटींच्या पायाभूत सुविधाही निर्माण करू शकणार आहोत.

चीनने कोरोनाची माहिती मुद्दामहून लपविली का, यावर भारत कारवाई करेल का? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला. यावर गडकरींनी सांगितले की, हा मुद्दा परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान यांच्याशी संबंधीत संवेदनशील विषय आहे. यावर काही सांगणे उचित ठरणार नाही”. “सर्व सरकारी कार्यालयं, खासकरुन अर्थमंत्रालय तसंच आरबीआय करोनाविरोधातील आर्थिक लढाईशी लढत असून वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहेत. तसंच पंतप्रधानांचं पाच ट्रिलियन डॉलरचं स्वप्न पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत,” असं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”