Monday, December 22, 2025
Home Blog Page 5872

पाकिस्तानमधील कोरोनाच्या प्रसारासाठी मौलानाने ‘स्त्रियांच्या आचरणाला’ ठरवले जबाबदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमधील कोरोनाच्या प्रसारासाठी ‘महिलांचे निर्लज्जपणाचे आचरण’ आणि विद्यापीठांद्वारे तरुणांना दिले जाणारे ‘अनैतिक शिक्षण’ जबाबदार आहे असे मत मांडणारे प्रसिद्ध धार्मिक नेते मौलाना तारिक जमील याचा नागरी समाज, मानवी हक्क आणि महिला संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. मात्र,त्याला पाठिंबा देणारेही बरेच लोक आहेत. मौलाना तारिक जमील याच्या धार्मिक उपदेशांना पाकिस्तान तसेच भारतातही मोठ्या प्रमाणावर ऐकले जाते. तो पाकिस्तानमधील धार्मिक नेत्यांमध्ये उच्च स्थानी आहे, म्हणून काही दिवसांपूर्वी कोरोनाविरूद्ध निधी जमा करण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान आणि इतरांशी केलेल्या संभाषणात तो बोलला होता आणि सर्वांनी त्याच्या नेतृत्वात कोरोनापासून मुक्ती मिळावी म्हणून देवाची प्रार्थना केली. होती.

आपल्या भाषणात मौलाना जमील म्हणाले की, ‘जर देशाविरूद्ध खोटे बोलले जात असेल, बेईमानी केली जात असेल, जेथे मुली नाचत असतील आणि कमी कपडे घालत असतील तर कोरोनासारखा आपत्ती आली पाहिजे.’ त्यांनी मीडियावर खासकरुन देशात खोटे पसरवण्याचा आरोप केला. नंतर मीडिया वर घेतलेल्या आक्षेपावर तो म्हणाला की मी माध्यमांकडे माफी मागतो, त्याची जीभ घसरली आहे पण महिलांवरील टिप्पण्यांवर तो काहीही बोलला नाही.

महिलांविषयी मौलानाच्या टीकेवर डॉनने आपल्या संपादकीय मध्ये असे लिहिले आहे की, या जागतिक साथीच्या रोगासाठी महिलाच जबाबदार आहेत,असे त्याचे म्हणणे हे केवळ माहितीचा अभावच नाही तर चिथावणीखोर देखील आहेत.हे विधान अत्यंत त्रासदायक आहे, केवळ ते महिलाविरोधी भावनांशी संबंधित आहे. मौलाना यांनी याविषयी माफी मागावी.

यावर पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे की मौलाना जमील यांचे हे विधान पूर्णपणे अस्वीकार्य आहे. अशा उच्च व्यासपीठावरील गोष्टी समाजात आधीपासूनच उपस्थित असलेल्या स्त्रियांविरूद्ध दुराग्रहाची भावना मजबूत करतात.

पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी यांनी मौलाना यांच्या वक्तव्याचे नाव न घेता निषेध केला. ते म्हणाले की, महिलांवरील असे हल्ले स्वीकार्य नाहीत. हे म्हणणे फक्त हास्यास्पद आहे की कोरोना महामारीचे कारण स्त्रियांच्या स्लीव्हलेस घालणे हे आहे. घटनेत महिलांना बर्‍याच संघर्षाने त्यांचा हक्क मिळालेला आहे.त्या ते गमावू शकत नाही.मानवाधिकार कार्यकर्ते निदा अली म्हणाल्या की ज्या काळात लॉकडाउनमधील महिला समुदायाची सुरक्षा शोधत आहेत, तेव्हा सरकार टीव्हीवर मौलाना जमीलला आणते जे महिलांना अशा मोठ्या साथीचा दोषी मानतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

१० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल – खासदार सुप्रिया सुळे

मुंबई । लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. लॉकडाउनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊन कधी पर्यंत चालणार याबाबत अनिश्चतता असताना विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत हवालदिल झाले आहे. दरम्यान, येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आज त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

“सध्या लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बोनस वेळ मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवावा. येत्या १० मे पर्यंत परीक्षांबाबत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. मंत्री उदय सामंत यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे. ते यावर काम करत आहेत आणि लवकरच सर्वांसमोर चित्र स्पष्ट होईल,” असं सुळे यावेळी म्हणाल्या.

लॉकडाऊन उठवण्याबाबत त्या म्हणाल्या, ”देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची आहे. त्यामुळे अनलॉकिंग हळूहळू सुरू झालं पाहिजे हे माझं मत आहे. मौजमजेसाठी किंवा कॅफेत जाण्यासाठी नव्हे तर देश आणि राज्याला उभं करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी लॉकडाऊन शिथिल झालंच पाहिजे, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. लॉकडाऊन घाईघाईत उठवून चालणार नाही.तर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवलं पाहिजे. सांगतानाच लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत काही सूचना असतील तर अवश्य कळवा,” असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मोदीजी पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत- शिवसेना

मुंबई । मोदी यांनी पवारांना आपले गुरू म्हणून घोषित केलेच आहे व पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत हे दिसून आले आहे. सत्तेवर असणे वेगळे व राज्य चालविण्याचा अनुभव असणे वेगळे. त्यामुळे पवारांचा अनुभव याक्षणी महत्त्वाचा असून त्यांनी महाराष्ट्राबरोबरच इतर सर्वच राज्यांना केंद्राने मदत करावी असे सुचवले आहे. कोरोनामुळे वाढलेला खर्च आणि लॉकडाउनमुळे ठप्प झालेलं उत्पन्न अशा कात्रीत सध्या राज्य सरकार अडकलं आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्याकडून विविध पर्यायांचा विचार सुरू असला तरी सर्वाधिक मदार केंद्राच्या मदतीवरच आहे. तशी मागणीही केंद्राकडे करण्यात आली आहे. याच मुद्याकडे शिवसेनेनं केंद्र सरकारचं लक्ष वेधत शरद पवार यांचा सल्ला ऐकण्याचे पंतप्रधान मोदींना म्हटलं आहे. महाराष्ट्रासारखे राज्य केंद्राच्या तिजोरीत मोठी रक्कम भरते. लॉकडाउनमुळे महाराष्ट्राला फटका बसला आहे. त्यामुळे देशाचा आर्थिक कणा असलेल्या महाराष्ट्राला बळकट करण्याचा सल्ला केंद्राला शिवसेनेनं दिला आहे.

नेमकं काय लिहलं आहे सामनाच्या अग्रलेखात

“रिझर्व्ह बँकेतल्या राखीव गंगाजळीस हात लावण्यापर्यंत देशाची अर्थव्यवस्था आधीच ढेपाळली होती. त्यात करोनाचे नवे कारण समोर आले आहे. अशा परिस्थितीत देशभरातील सर्व अर्थमंत्र्यांशीही पंतप्रधानांनी एकदा संवाद साधायला हवा. यापुढे राज्य सरकारांना सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणावरच सर्वाधिक खर्च करावा लागेल. या शर्यतीत बिहार, ओडिशा, आसाम, झारखंड, उत्तर प्रदेशसारखी राज्ये कोठे असतील? केंद्राला सर्वाधिक बजेट याच क्षेत्रांवर खर्च करावे लागेल. त्यामुळे केंद्राला उत्पन्नाचे स्रोत नव्याने शोधावे लागतील. राज्यांचे खिसे कापून केंद्राला आपली बादशाही टिकवता-चालवता येणार नाही. हिंदुस्थान हे संघराज्यातून निर्माण झाले आहे. प्रत्येक राज्याचे स्वत:चे अर्थशास्त्र आहे. ते मजबूत करणे ही जबाबदारी पंतप्रधान म्हणून मोदी यांची आहे. राज्यांना मोडकळीस आणणे म्हणजे देश मोडण्यासारखे आहे. महाराष्ट्रासारखे राज्य तर देशाचा आर्थिक कणाच आहे. हा कणा मोडू नका. पवारांनी तेच सांगितले आहे.

पवारांनी महाराष्ट्राबरोबरच इतर सर्वच राज्यांना केंद्राने मदत करावी असे सुचवले आहे. आजमितीस शरद पवारांइतका राज्य चालविण्याचा अनुभव असलेला दुसरा नेता देशात नाही. अर्थविषयक विचार मांडणारे मनमोहन सिंग आहेत. ते बोलत असतात, पण शरद पवार यांच्या सांगण्यातले वजन आज महत्त्वाचे आहे. एक तर मोदी यांनी पवारांना आपले गुरू म्हणून घोषित केलेच आहे व पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत हे दिसून आले आहे. सत्तेवर असणे वेगळे व राज्य चालविण्याचा अनुभव असणे वेगळे. त्यामुळे पवारांचा अनुभव याक्षणी महत्त्वाचा. नोटबंदी, जीएसटीसारखे निर्णय विद्यमान सरकारने घेतले व अर्थव्यवस्था डबघाईला आली. काळा पैसा परदेशातून आणायच्या आणाभाका 2014 च्या निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांनी घेतल्या होत्या. पण त्या आणाभाका ‘भाकड कथा’ निघाल्याने कोरोनानंतरची हिंदुस्थानची अर्थव्यवस्था म्हणजे कसायाने खाटीकखान्यात ढकललेल्या भाकड जनावरासारखी झाली आहे,” अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारवर टीका करण्याबरोबरच उपदेशही दिले आहेत

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

उमर अकमलवर ३ वर्षांच्या बंदीनंतर भाऊ कामरानने दिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उमर अकमलवर ३ वर्षाची बंदी घातली आहे.यावर उमरचा भाऊ कामरान अकमल याने एक मोठे विधान केले आहे.कामरान अकमलने आपल्या भावावर लादलेल्या ३ वर्षाच्या बंदीला कठोर शिक्षा असल्याचे म्हटले आहे आणि त्याचा विश्वास असा आहे की आपला भाऊ या शिक्षेस नक्कीच आव्हान देईल.

पाकिस्तान सुपर लीग दरम्यान उमर अकमल याच्याशी बुकींनी संपर्क साधला होता, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सोमवारी त्याच्यावर ३ वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. उमरवर फेब्रुवारी महिन्यात दोन प्रकरणात बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम २.४.४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kamran Akmal picks himself and brother Umar in Pakistan's all-time ...

या निर्णयाने आश्चर्यचकित झालेलला माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान म्हणाला, “उमरला दिलेल्या या शिक्षेमुळे मी आश्चर्यचकित झालो आहे. तीन वर्षांची बंदी ही अत्यंत कठोर शिक्षा आहे.तो नक्कीच याविरोधात अपील करेल. “पाकिस्तानकडून ५७ कसोटी,१५३ एकदिवसीय आणि ५८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या कामरानने सांगितले की, इतर खेळाडूंना यापूर्वी अशाच आरोपावरून दिलेली शिक्षा कमी करण्यात आलेली होती.

तो पुढे म्हणाला, “हे निश्चितपणे समजून घेणे आता कठीण आहे कारण पूर्वी इतर खेळाडूंवरही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कमी वेळेसाठी बंदी घातली गेली होती, तर उमरला कठोर शिक्षा देण्यात आली आहे .” कामरानने मोहम्मद इरफान आणि मोहम्मद नवाज यांच्याविरूद्ध केलेल्या कारवाई विषयी सांगताना म्हंटले त्यांनी सट्टेबाजांची माहिती न दिल्याबद्दल या दोन्ही खेळाडूंवर अल्प कालावधीसाठी बंदी घातली गेली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लॉकडाऊन हळूहळू शिथिल झालंच पाहिजे – सुप्रिया सुळे

मुंबई । कॅफेमध्ये जाण्यासाठी किंवा मौजमजेसाठी नव्हे तर देश आणि राज्याला उभं करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी लॉकडाऊन शिथिल केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधताना व्यक्त केलं. यावेळी राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य करतानाच नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.

देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची आहे. त्यामुळे अनलॉकिंग हळूहळू सुरू झालं पाहिजे हे माझं मत आहे. मौजमजेसाठी किंवा कॅफेत जाण्यासाठी नव्हे तर देश आणि राज्याला उभं करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी लॉकडाऊन शिथिल झालंच पाहिजे, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. लॉकडाऊन घाईघाईत उठवून चालणार नाही.तर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवलं पाहिजे. सांगतानाच लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत काही सूचना असतील तर अवश्य कळवा, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं.

यावेळी सुप्रिया सुळे यांना परीक्षांसंदेर्भात सुद्धा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्या म्हणाल्या, ”सध्या राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. लॉकडाउनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल,” अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

RCB चे माइक हेसन परतले स्वगृही,पंतप्रधान मोदींचे मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशामध्ये ३ मे पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे आईपीएल२०२० अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि सध्याचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट डायरेक्टर माईक हेसन हे १ महिन्यापेक्षा जास्त काळ भारतातच अडकले होते पण आता माईक सकुशल आपल्या घरी परतला आहे.

RCB hope to fill barren trophy cabinet with 'bold cricket ...

मंगळवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हेसन यांनी सुखरूपपणे न्यूझीलंडला परतल्याची पुष्टी केली. “मुंबई विमानतळावर जाण्यासाठी बसमध्ये पूर्ण १ दिवस घालवणे व्वा किती आश्चर्यकारक दृश्य आहे,” ते म्हणाले. हेसन यांनी आपल्या ट्विटमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतातील न्यूझीलंड दूतावास, न्यूझीलंडचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकंडा अर्डर्न यांचेही आभार मानले.

 

महत्त्वाचे म्हणजे आयपीएलचा १३ वा हंगाम २९ मार्चपासून सुरू होणार होता, त्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे क्रिकेट डायरेक्टर माईक हेसन हे मार्चच्या सुरूवातीसच भारतात आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय फ्लाइट बंदी असल्याने हेसन यांना भारतातच राहावे लागले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

सिगरेट चोरण्यासाठी पानटपरीवर डल्ला मारणारा चोर कोरोना पॉजिटीव्ह, पोलिसांसह २४ जण क्वारंटाईन

मुंबई । लॉकडाउनमुळे व्यसनी लोकांची चांगलीच फजिती झाली आहे. अशात अनेक ठिकाणी दारूच्या दुकानांमध्ये चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र मुंबईत घडलेल्या अशा एका चोरीमुळे पोलिसांसह, कोर्टाच्या २४ जणांना क्वारंटाईन करावे लागले आहे. सिगरेट करण्यासाठी पाणटपरीवर डल्ला मारणारा चोर कोरोना पॉजिटीव्ह निघाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, सदर २४ वर्षीय तरुण गोरेगाव पश्चिमेला राहतो. त्याच्यावर चोरीचे अनेक छोटेमोठे गुन्हे दाखल आहेत. २० एप्रिल रोजी तो आणि त्याचे दोन मित्र जवळच्याच एका पानटपरीतून सिगारेट चोरण्यासाठी गेले होते. या तिघांनी पानटपरीवाल्यावर चाकूचा हल्ला करून त्याच्याकडील ३५०० रुपयांची रोकड पळवून फरार झाले. हे तिघांनी लूट केल्यानंतर पानटपरीवाल्याने बोंबाबोंब केल्याने दुसऱ्या दुकानदारांनी आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी या तिघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. पानटपरीवाल्याच्या तक्रारीनंतर या चोराविरोधात बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसऱ्या दिवशी त्याला बोरिवलीच्या न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. तेव्हा त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. तळोजा तुरुंगात त्याला आणले असता त्याची करोना टेस्ट झाली नसल्याने तुरुंगाधिकाऱ्याने त्याला तुरुंगात घेण्यास मनाई केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची करोना टेस्ट केली असता त्याला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्याला १४ दिवसांसाठी क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान, त्याला करोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. तो रात्रभर पोलीस कोठडीत होता. त्यामुळे या पोलिस ठाण्यातील पोलीस आणि कोठडीतील कैद्यांसह कोर्टातील दोन स्टाफ आदी २४ जणांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.

जाणून घ्या राज्यातील जिल्हा व मनपानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी; एका क्लीकवर..

मुंबई । महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण रोज कमी अधिक असले तरी साथीवर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. राज्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा आज साडेआठ हजारपार गेला आहे.राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ८हजार ५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ५७७६ (२१९)
ठाणे: ४० (२)
ठाणे मनपा: २९५ (४)
नवी मुंबई मनपा: १३५ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १४५ (३)
उल्हासनगर मनपा: २
भिवंडी निजामपूर मनपा: १४
मीरा भाईंदर मनपा: १२१ (२)
पालघर: २५ (१)
वसई विरार मनपा: १२१ (३)
रायगड: १८
पनवेल मनपा: ४३ (१)
ठाणे मंडळ एकूण: ६७३५ (२३८)
नाशिक: ४
नाशिक मनपा: १९
मालेगाव मनपा: १२३ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ४८(२)
धुळे मनपा: १७ (१)
जळगाव: १८ (४)
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ११ (१)
नाशिक मंडळ एकूण: २४४ (२३)
पुणे:५८ (३)
पुणे मनपा: ९६९ (७४)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: ५९ (५)
सातारा: २९ (२)
पुणे मंडळ एकूण: ११९३ (८७)
कोल्हापूर: ७
कोल्हापूर मनपा: ४
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४७ (२)
औरंगाबाद:१
औरंगाबाद मनपा: ५१ (६)
जालना: २
हिंगोली: ८
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ६३ (६)
लातूर: १० (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ३
लातूर मंडळ एकूण: १७ (१)
अकोला: ११ (१)
अकोला मनपा: १८
अमरावती: १
अमरावती मनपा: २१ (७)
यवतमाळ: ६२
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: १३५ (९)
नागपूर: ४
नागपूर मनपा: १२३ (१)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १३१ (१)
इतर राज्ये: २५ (२)
एकूण: ८५९० (३६९)

लाॅकडाउननंतर विमानप्रवास करण्यासाठी ‘हे’ सर्टिफिकेट आवश्यक! अन्यथा एअरपोर्टवर नो एन्ट्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात सुरु असलेले लॉकडाउन संपल्यानंतर जेव्हा विमानसेवा सुरू होईल, तेव्हा हवाई प्रवासासाठी आपल्याला मास्क, हातमोजे आणि डिस्पोजेबल कॅप्स व्यतिरिक्त डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांचीदेखील आवश्यकता असेल. डॉक्टर, नोकरशहा आणि विमानतळ व विमान कंपन्यांचे अधिकारी यांचा समावेश असलेली टेक्निकल कमिटी लवकरच परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांवर चर्चा करतील. सरकारने यासाठी एक टेक्निकल कमिटी तयार केली आहे,जी हवाई सेवा आणि प्रवाश्यांसाठी चे एक स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) तयार करीत आहे.सध्या सुरु असलेला लॉकडाउन ३ मे रोजी संपणार आहे.तरीही,असे मानले जात आहे की देशातील हॉटस्पॉट्स आणि इतर संवेदनशील भागात हे निर्बंध कायम असू शकतात.

इकॉनॉमिक्स टाइम्सच्या अहवालानुसार ग्रीन झोनसारख्या देशाच्या इतर भागातही निर्बंध कमी करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार जूनपर्यंत व्यावसायिक हवाई प्रवासाला परवानगी नाहीये.मात्र असा विश्वास आहे की टेक्निकल कमिटी फ्लाइट्सच्या मधल्या सीटच्या बुकिंगला परवानगी देऊ शकते. मधली जागा रिक्त ठेवल्यास दोन लोकांमधील सहा फूट सामाजिक अंतर राखण्यास मदत होणार नाही कारण यामुळे दोन प्रवाशांमध्ये फक्त दोन फूट जागाच मिळेल.

सुरक्षित आणि कोरोना वायरस फ्री फ्लाइटला सुनिश्चित करण्यासाठी प्रोटेक्टिव गियर तसेच सर्टिफिकेट देण्यावर आता भर देण्यात आला आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.इटालियन डिझायनर्स एव्हिओइन्टीरियर्सने देखील इकॉनॉमी क्लाससाठी दोन नवीन सीट डिझाइन कॉन्सेप्ट सादर केल्या आहेत. हे डिझाइन अशा प्रकारे डिझाइन केले गेले होते की नवीन आवश्यकतांच्या आधारे दोन प्रवाश्यांमधील सोशल डिस्टेंसिंगची काळजी घेतली जाऊ शकते. या डिझाइनची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये असलेल्या ऑनबोर्ड स्पेसमध्ये फारसा बदल होत नाही.

या कंपनीने रोमच्या प्राचीन देव ‘Janus’ चे नाव या डिझाईनला दिले आहे,ज्याला एका आसनावर दोन बाजूंनी बसण्याची सुविधा असेल आणि ते सहजपणे साफ करता येईल. एअरलाइन्स कंपन्यांनी ही संकल्पना अवलंबल्यास या जागा तयार करण्यासाठी चांगल्या सु​रक्षित मटेरियलचा वापर केला जाईल जेणेकरुन स्वच्छतेची काळजी घेतली जाईल.


ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आकडा वाढतोय! देशातील करोनाग्रस्तांची संख्या ३०,००० जवळ

नवी दिल्ली । दिवसेंदिवस कोरोनाचा विषाणू अनेकांनावर हल्ला करताना दिसत आहे. देशातील कोरोनग्रस्तांच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी आणखी भर पडली. देशात आणखी ९३४ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे हा आकडा ३०,००० काठावर पोहोचला आहे. सध्या देशात २९४३५ करोनाग्रस्त आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. देशभरात २४ तासांमध्ये १,५४३ करोनाचे नवे रुग्ण आढळले. तर देशात एकूण मृत्यू ९३४ इतके झाले आहेत. तसेच आतापर्यंत देशात ६,८६९ रुग्ण बरे झाले.

दुसरीकडे महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण रोज कमी अधिक असले तरी साथीवर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ८ हजार ५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”