हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आता सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलेल्या मागणीनुसार EVM आणि VVPAT मशीनची पडताळणी करण्यात येणार आहे. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यांची हीच मागणी मान्य करण्यात आली आहे.
सुजय विखे पाटील यांच्या मागणीनंतर केंद्रावर मशीनची मेमरी रिकामी करणपणा मतदान प्रक्रिया म्हणजेच मॉकपोल राबवली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे 4 जूनला लोकसभा निवडणुकीसाठी मजमोजणी पार पडल्यानंतर विखे पार्टी यांनी 10 जून रोजी अहमदनगर मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याबाबतचा मागणी अर्ज जिल्हा निवडणूक विभागाकडे केला होता.
त्यांनी केलेला हा अर्ज मान्य झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनेच्या आधारावरच ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी होणार आहे. या तपासणीमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्यास त्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. परंतु सध्या तरी आपली मागणी मान्य झाल्यामुळे सुजय विखे पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रत्नागिरीचं राजकारण शिवसेना या शब्दाभोवती सुरू होतं आणि शिवसेना या शब्दापाशीच येऊन थांबतं… आकडेवारीच बोलायची झाल्यास एकूण पाच मतदारसंघ असणाऱ्या या जिल्ह्यात शिवसेनेकडे चार तर अजित पवार गटाकडे अवघी एक जागा आहे… पक्ष फुटीमुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यात प्रत्येकी 2 आमदार विभागले गेले असले तरी इथला सामान्य, कडवा आणि निष्ठावान शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत आहे… म्हणूनच की काय कोकणातील लोकसभेला दोन्ही जागा महायुतीनं जिंकल्या असल्या तरी रत्नागिरीच्या पाचीच्या पाची विधानसभा मतदारसंघातून हे ठाकरे गटाच्या उमेदवाराला लीड मिळालेलं आहे… त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटातील विद्यमान आमदारांची धाकधूक चांगली वाढली असावी… अगदी तोंडावर आलेल्या या विधानसभेला शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदासंघातील अटीतटीच्या लढती नेमक्या कुठल्या आहेत? नेमक्या कुठल्या शिवसेनेच्या बाजूने रत्नागिरीकर विधानसभेचा कौल देतायत? जिल्हयातील कोणत्या दिग्गजांची आमदारकी सध्या रेड झोन मध्ये आहे? त्याचाच हा आढावा…
पहिला मतदारसंघ येतो तो लांजा-राजापूर-साखरपा… दगडाला शेंदूर फासून त्याला मतदान करा म्हणून शिवसेनेने आवाहन केल्यास त्याला देखील मतं मिळतील आणि विजय मिळेल, असा शिवसेनेसाठी सेफ, हक्काचा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बालेकिल्ल्यांपैकी एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे लांजा-राजापूर-साखरपा…या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे उपनेते राजन साळवी आमदार आहेत… ठाकरेंसोबत असणाऱ्या साळवेंनी(with) सलग तीन टर्म या मतदारसंघातून बाजी मारत राजापूरवर कायम भगवा फडकवत ठेवलाय… शिंदे गटात फूट पडूनही लोकसभेला या मतदारसंघाने ठाकरेंच्या उमेदवाराला तब्बल 21 हजारांचं लीड दिलं होतं… हा आकडा स्पष्ट सांगतोय की येणाऱ्या विधानसभेला ठाकरेंचे साळवी राजापूर मतदारसंघातून आरांत विजयाचा चौकार मारतायत… स्थानिक रिफायनरीवरील भूमिका, कुणबी समाजाची मतं या मतदारसंघात यंदा निर्णायक ठरणार आहे… बाकी शिंदे गटाकडून किरण सामंत यांनी निवडणूक लढण्याची भाषा बोलून दाखवल्यामुळे इथून लढत अटीतटीची होईल.. बाकी काँग्रेसने केलेला दावा खोडून काढता आला तर राजन साळवी यांची आमदारकी सध्या तरी सेफ झोन मध्ये दिसतेय….
दुसरा मतदारसंघ रत्नागिरी विधानसभा…राजकारणातलं अचूक टाइमिंग साधायला ज्यांना जमलं ते शिवसेनेच्या उदय सामंत यांचा हा मतदारसंघ… कोकणात शिवसेना वाढण्यात ज्यांचा काही हातभार राहिला त्यात सामंत यांचेही नाव येतं… पण त्यांची राजकारणातील एंट्री मुळात राष्ट्रवादीतून झाली होती…(uday samant) 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते दोन टर्म आमदार राहिले… पुढे 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं… आणि इथून त्यांच्या राजकारणाने ग्रिप पकडली.. युती, महाविकास आघाडी, महायुती या सगळ्या सत्ता बदलाच्या काळात ते कॅबिनेट मंत्री पदावर राहिले… याच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला… फ्रंटला जरी उदय सामंत दिसत असले तरी त्यांचे बंधू किरण सामंत आणि वडील अन्ना सामंत यांच्या तगड्या जनसंपर्काच्या जोरावर सामंत बंधू संपूर्ण कोकणावर काही प्रमाणावर होल्ड ठेवून आहेत… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला ठाकरे गटाच्या उमेदवाराला मतदारसंघातून दहा हजारांचं लीड भेटल्याने सामंत यांची आमदारकी धोक्यात आलीये… असं म्हणता आलं तरी सामंत बंधूंनीच लोकसभेला ठाकरेंना मदत केली असल्याची चर्चा मतदार संघात होत असते… तरीही गद्दार विरुद्ध खुद्दार या लाईनवर होणाऱ्या रत्नागिरीच्या निवडणुकीत सामंतांच्या विरोधात ठाकरे गटाकडून उदय बने, प्रदिप उर्फ बंड्या साळवी,राजेंद्र महाडिक यांची देखील नावं उमेदवारीसाठी समोर येतायत… असं असलं तरी सामंत यांचं पारडं सध्यातरी मतदारसंघात जड दिसतय…
तिसरा मतदारसंघ पाहूया तो दापोलीचा…रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे आमदार आहेत. अर्थात दोघेही पितापुत्र सध्या शिंदे गटात असल्यानं दापोली विधानसभेचं स्थानिक गणितं बरीच बदलली आहेत. शिवसेनेचे सूर्यकांत दळवी यांना या मतदारसंघानं 1990 पासून विधानसभेत पाठवलं… पण 2014 ला दळवींना पराभवाची धूळ चारत राष्ट्रवादीचे संजय कदम इथून निवडून आले… 2019 ला मात्र संजय कदम यांचं आव्हान मोडीत काढत शिवसेनेचं तरुण नेतृत्व रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांना आमदारकीचा गुलाल लागला… सध्या तरी योगेश कदम यांना कुणी सक्षम विरोधक आहे असं म्हणता येणार नाही. योगेश कदम यांनी निधी देखील चांगला आणला आहे. गावच्या पायवाटेपासून ते नळपाणी योजनेपर्यंत त्यांनी कामं केली आहे. कदाचित इतक्या प्रमाणात आलेला निधी हा पहिलाच असावा….सध्या राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शिवबंधन हाती बांधल्यामुळे इथे दोन कदमांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळेल… त्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला दापोली मतदारसंघातून 8 हजाराचं लीड भेटल्याने यंदा कदम पितापुत्र यांच्या राजकारणावर टांगती तलवार आहे एवढं मात्र नक्की…
चौथा मतदारसंघ आहे तो गुहागरचा…शिवसेनेत बंडाळी केलेल्या नेत्यांना आपल्या भाषणातून झोडपून काढणाऱ्या ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर जाधवांचा हा मतदारसंघ…रामदास कदम, विनय नातू आणि भास्कर जाधव यांच्यात लढत झाली. त्यावेळी नातूसकट रामदास कदमांना या ठिकाणाहून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळेपासून भास्कर जाधव यांनी याच मतदार संघातून आपला दबदबा कायम ठेवला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि अनेक मंत्रिपद याच मतदारसंघातील आमदारकीवर त्यांनी भूषवली. मात्र २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी शिवसेनेत घरवापसी केली…त्यातही शिवसेनेच्या फुटीनंतर तर भास्कर जाधव यांनी ठाकरे गटातील स्पेस भरून काढला…सध्या तरी गुहागरमधून भाजप तर्फे विनय नातू हे नाव समोर येत असलं तरी ते तितके सक्रीय दिसून येत नाही. त्यांच्या वडिलांची पुण्याई आणि नाव ही त्यांची जमेची बाजू आहे. पण, सद्यस्थितीत त्यांचं म्हणावं तसं लक्ष गुहागरच्या विधानसभा मतदारसंघात नाही. भास्कर जाधव यांना आपल्या मुलाकरता देखील प्रयत्न करायचे आहेत… भास्कर जाधव यांची शिवसेनेतील नाराजी, स्थानिक पातळीवर राणेंशी घेतलेला पंगा आणि विकासाला मतदारसंघाला लागलेली खीळ पाहता या गोष्टी जाधवांना मायनस मध्ये घेऊन जातात… पण तरीही सध्यातरी भास्कर जाधव यांचं मतदारसंघातील पारडं जड दिसतंय…
पाचवा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो चिपळूणचा…जिल्ह्यात भगव्याचा झंझावात असताना केवळ चिपळूण हा मतदारसंघ 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. त्या ठिकाणी सध्या अजित पवार गटाचे शेखर निकम हे आमदार आहेत… शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या चिपळूण मध्ये शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांचा पराभव करत निकमांनी हा गड आपल्याकडे खेचून आणला…सध्याच्या घडीला शेखर निकम यांना आव्हान नाही. निकम यांनी आपला मतदारसंघ चांगला बांधला आहे. घराघरात त्यांचा संपर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यापेक्षा शेखर निकम ही व्यक्ती म्हणून देखील त्यांच्या पाठिशी लोकं आहेत….सध्या चिपळूणमध्ये शिवसेनेमध्ये गटबाजी आहे. अशा वेळी 2019 मध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर देखील सदानंद चव्हाण सक्रिय दिसून आले नाहीत… संपर्क कार्यालायही नसल्यानं ग्रामीण भागातील सर्वसामान्य शिवसैनिकांचा स्थानिक नेत्यांशी संपर्क ही तुटलाय… थोडक्यात निकमांचा पराभव करणं महाविकास आघाडीला सध्यातरी अवघड दिसतंय…तर अशी होती रत्नागिरी जिल्ह्यातील पाच हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघांचा संभाव्य लढतीचा आढावा… बाकी लोकसभेला कोकणात मायनस मध्ये गेलेल्या ठाकरेंना विधानसभेला तरी यश येईल का? कोकणातील दिग्गज नेत्यांपैकी नेमकी कुणाची आमदारकी धोक्यात आहे असं तुम्हाला वाटतं? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीच्या बँकेमधील एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मान्सून धमाका ठेव योजना (BOB Monsoon Dhamaka Deposit Scheme) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या ठेवीवर जास्तीत जास्त व्याज देण्यात येईल. बँक ऑफ बडोदाने आपली ही मान्सून धमाका ठेव योजना २ कालावधी साठी आणली आहे. एक म्हणजे 333 दिवसांसाठी, त्याअंतर्गत ग्राहकांना ठेवीवर 7.15% व्याज दर ऑफर करण्यात येईल तर दुसरी आहे ती म्हणजे ३९९ दिवसांसाठी, त्याअंतर्गत ग्राहकांना 7.25% व्याज दर देण्यात येईल. जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर 0.50% अधिक व्याजदर देण्यात येईल. बँक ऑफ बडोदाची मान्सून धमाका ठेव योजना 3 कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ ठेवींसाठी सुरु करण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री संजय मुदलियार यांनी म्हंटल की, “बँक ऑफ बडोदा मान्सून धमाका ठेव योजना सुरू केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे, ज्या अंतर्गत ग्राहक त्यांच्या बचतीवर जास्तीत जास्त व्याजदर मिळवू शकतात. हे दोन कालावधींमधील निवड करण्याची संधी देखील ग्राहकांना करते. ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याजदर मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. मान्सून धमाका ठेव योजना ऑनलाइन किंवा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन उघडता येते.
दरम्यान, बँक ऑफ बडोदा ही भारतातील आघाडीची बँक आहे. भारत सरकारची कमाल मालकी हिस्सेदारी ६३.९७% आहे. जगभरात बँक ऑफ बडोदाचे जवळपास 165 कोटी ग्राहक असून एकूण 17 देशांमध्ये 70000 हून अधिक शाखांच्या माध्यमातून बँक आपल्या ग्राहकांना सेवा देत असते. यासोबतच,बँक तिच्या विविध डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे सर्व बँकिंग उत्पादनांच्या सुलभ आणि सोयीस्कर सेवा देखील प्रदान करत आहे. आपल्या विविध ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि त्यांच्या सर्व बँकिंग व्यवहारांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Fasting Dhokla : आज सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आषाढी एकादशी ही पूर्ण वर्षातली सर्वात मोठी एकादशी असते. या एकादशीला उपवास केला जातो . या उपवासाला साबूदाण्याची खिचडी, भगर, उपवासाचे पापड असे पदार्थ खाल्ले जातात. मात्र तुम्ही वारंवार उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी हटके पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत. होय …! आम्ही ज्या उपवासाच्या पदार्थाबद्दल बोलत आहोत तो पदार्थ म्हणजे उपवासाचा ढोकळा. चला तर मग जाणून घेऊया हा उपवासाचा ढोकळा (Fasting Dhokla) कसा बनवायचा.
साहित्य (Fasting Dhokla)
भगर शाबू मीठ दही इनो
कृती (Fasting Dhokla)
सर्वप्रथम 200 ग्रॅम भगर आणि 100 ग्रॅम साबुदाणे घ्या व दोन्ही पदार्थ वेगवेगळे वाटून घ्या साबुदाणा (Fasting Dhokla) व्यवस्थित बारीक दळून घ्या.
आता हे दोन्ही पदार्थ एकत्र करा. यामध्ये पाणी आणि दही घाला.
बॅटर बनवता येईल अशा पद्धतीने गरजेनुसार पाणी आणि दही तुम्हाला मिसळायचं आहे.
आता या मिश्रणामध्ये एक टीस्पून आल्याची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे.
आता या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या.
त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
बॅटरची व्यवस्थित कन्सिस्टन्सी हवी असेल तर यामध्ये एक टेबलस्पून तेल घाला आणि पंधरा मिनिटांसाठी हे बॅटर तुम्ही झाकून ठेवा.
आता एका भांड्याला व्यवस्थित ग्रीस करून त्याला तेल लावून घ्या. दुसरीकडे पाणी उकळण्यासाठी ठेवा पाणी उकळलं की थोड्यावेळासाठी गॅस मंद आचेवर ठेवा.
ढोकळ्याच्या बॅटरमध्ये इनो घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यानंतर ढोकळ्याचे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या इनो घातल्यानंतर वेळ न घालवता लगेचच ढोकळ्याचा बॅटर ढवळून घ्या.
त्यानंतर हे मिश्रण वाफवण्यासाठी ठेवून द्या.
दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे मिश्रण वाफवायचे आहे.
आता ढोकळा शिजल्यानंतर तो बाहेर काढून घ्या. त्याचे चौकोनी काप करा
फोडणी देण्यासाठी एका भांड्यामध्ये तेल गरम करा. त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेली हिरवी, मिरची घाला. ही फोडणी तुम्हाला ढोकळ्यावर (Fasting Dhokla) ओतायची आहे आणि ढोकळा सर्व्ह करायचा आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडीकडून उभे असलेले शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. एकीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर निवडून आले तर दुसरीकडे जयंत पाटील (SKP Jayant Patil) कसे काय पडले? मविआमधून दगाफटका झाला का? यावरुन बरेच तर्क-वितर्क अजूनही सुरु आहेत. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जयंत पाटील यांच्या पराभवाचे कारण सांगितलं. आमच्यात कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त स्ट्रॅटेजीमुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला असं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवार आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विधान परिषदेत महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी कशी फसली ते सांगितलं. माझ्याकडे १२ मतं होती. शेकापच्या उमदवाराला पाठिंबा द्यावा असं आम्हाला वाटत होतं. कारण, लोकसभा निवडणुकीत सीपीआय, सीपीएम, शेकाप आमच्या सोबत होते . त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. पण विधान परिषद आणि विधानसभेत त्यांना मदत करू असं सर्वांनी मान्य केलं . त्यामुळे जयंत पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. काँग्रेसची मते जास्त होती. त्यांनी उमेदवार दिले. शिवसेना ठाकरे गटाकडे सुद्धा थोडीफार मते होती मात्र ती पुरेशी नव्हती तरीही त्यांनी उमेदवार दिला.
काँग्रेसकडे 37, आमच्याकडे 12 आणि शिवसेनेकडे 16 मते होती. काँग्रेसकडे जेवढी मते होती. त्यांनी दोन आणि एक नंबरचं मत कुणालाही देऊ नये असं मत होतं. काँग्रेसने निवडून येण्यासाठी सर्व मते घ्यावी आधी दोन नंबरची मते 50 टक्के मते शेकाप आणि ठाकरे गटाला द्यावी. एक नंबरची मते अधिक होती आणि ही मते सर्व ट्रान्सफर होतील. तेवढी मते दोन नंबरला जातील. दोन नंबरच्यांनी पहिलं मत ठाकरेंना द्यावं. आणि ठाकरेच्या दोन नंबरने पहिलं मत शेकापला द्यायला असं माझं गणित होतं. मात्र हे गणित मान्य झालं नाही. त्यामुळे शेकापचे जयंत पाटील पडले. यामधेय कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त स्ट्रॅटेजीमुळे पडले” असं उत्तर शरद पवारांनी दिले.
My EPF Money | जे लोक सरकारी नोकरी करतात. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना सरकारकडून पेन्शन देखील मिळत असते. परंतु खाजगी नोकरी करणाऱ्यांना असे पेन्शन मिळत नाही. त्यामुळे खाजगी नोकरी करणारे लोक हे ईपीएफओमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना ही पेन्शन दिली जाते. ही एक सेवानिवृत्तीची योजना आहे. याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना असे देखील म्हणतात. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांची दर महिन्याला त्यांच्या कमाईतील 12 टक्के रक्कम ही ईपीएफओ खात्यामध्ये जमा केली जाते. त्याचप्रमाणे कंपनीच्या ठेवीने देखील वतीने देखील ठेवी केल्या जातात.
तुम्हाला जर ईपीएस अंतर्गत पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी यामध्ये जवळपास 10 वर्ष गुंतवणूक करणे गरजेचे असते. म्हणजेच कर्मचाऱ्यांची नोकरी दहा वर्षापर्यंत असणे गरजेचे असते. तर जास्तीत जास्त पेन्शन पात्र सेवा ही 35 वर्षे एवढी लागते. तर आता आपण नक्की काय आहे जाणून घेऊया.
पेन्शन फॉर्मुला | My EPF Money
ईपीएसमध्ये मिळणारी पेन्शन ही एका सूत्राच्या आधारे मोजली जाते हे सूत्र ईपीएस = सरासरी वेतन × पेंशनेबल / पेन्शनयोग्य सेवा. या ठिकाणी सरासरी पगार म्हणजे बेसिक पगार + डीए याची गणना बारा महिन्यांच्या आधारावर केली जाते. यामध्ये जास्तीत जास्त पेन्शन सेवा ही 35 वर्षाची आहे.
पेन्शन योग्य वेतन जास्तीत जास्त 15 हजार रुपये एवढे असते. यामध्ये पेन्शनचा काही भाग हा दरमहा होतो. 15 नोव्हेंबर 2095 नंतर जे लोक संघटित क्षेत्रात काम करतात. त्या कर्मचाऱ्यांना हा फॉर्म्युला लागू होणार आहे. या आधीच्या कर्मचाऱ्यांना याबाबतचे वेगळे नियम देखील आहे. परंतु सध्याची वेतन रचना आणि महागाईचा दर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पेन्शनसाठी सरासरी वेचण्याची कमाल मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी देखील कर्मचारी संघटना सातत्याने केली करत आहेत.
ईपीएसच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीला वयाच्या 58 व्या वर्षी पेन्शन मिळते. परंतु त्या व्यक्तीला गरज असेल तर 58 व्या वर्षाच्या आधीच देखील ही पेन्शन मिळू शकते. याला अर्ली पेन्शन हा पर्याय आहे. ज्या अंतर्गत 50 वर्षानंतर तुम्हाला ही पेन्शन मिळण्यास चालू होते. जेवढ्या लवकर तुम्ही हे पैसे काढाल तेवढ्या लवकर तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी 4 टक्के पेन्शन कपात मिळेल.
Home Guard Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण महाराष्ट्रात एक मोठी भरती चालू होणार आहे. गृह विभागामार्फत ऑगस्ट महिन्यामध्ये ही भरती राबवली जाणार आहे ही. भरती होमगार्ड (Home Guard Recruitment 2024 ) या पदासाठी राबवलेली जाणार आहे. या पदासाठी तब्बल 9700 रिक्त जागांची भरती होण्याची शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्रमध्ये अनेक सण तोंडावर आलेले आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुका देखील आलेल्या आहे.या सगळ्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस दलावर अतिरिक्ततानी येणार असल्याने होमगार्ड ची गरज असते. त्यामुळे ही होमगार्डची भरती होणार आहे.
येत्या 15 ऑगस्टपासून या होमगार्डच्या भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. होमगार्डचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रहिवासी ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातच हा अर्ज करता येणार आहे.
भत्ता कसा मिळतो ? | Home Guard Recruitment 2024
होमगार्डची निवडणूक हे सणवार निवडणुकीच्या काळात पोलिसांसोबत केली जाते. यामध्ये त्यांना प्रतिदिन 700 ते 1000 रुपये उपहार भत्ता दिला जातो. त्याचप्रमाणे 35 रुपये किसाभक्ता आणि 100 रुपये भोजन भत्ता दिला जातो. तसेच साप्ताहिक कवयतीसाठी 90 रुपये भत्ता दिला जातो होमगार्डमध्ये 3 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना पोलीस वनविभाग अग्निशमन दलात 5% आरक्षणास मंजुरी देखील आहे.
शैक्षणिक पात्रता
होमगार्ड या पदाचा अर्ज करण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे असते.
वयोमर्यादा
20 ते 50 वर्षे वयोगटातील नागरिक या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे या भरतीचा अर्ज करण्यासाठी पुरुषांची उंची ही 162 सेंटीमीटर एवढी असावी लागते, तर महिलांची उंची ही 150 cm एवढी असावी लागते.
Maharashtra Kharif Sowing | राज्यात सध्या खरीप हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या देखील पूर्ण झालेल्या आहेत. खरीप हंगामामध्ये शेतकरी अनेक प्रकारची पिके घेतात. ज्या भागात पाऊस जास्त असतो, त्या भागात खरीप हंगामात शक्यतो भाताचेच पीक घेतले जाते. त्याचप्रमाणे पाऊस कमी असलेल्या भागांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके या हंगामात घेतली जाते. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात खरीप हंगामातील जवळपास 80.90% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.
मागील वर्षी पेक्षा यावर्षी खरीप हंगामातील (Maharashtra Kharif Sowing) पेरण्याचे प्रमाण जास्त आहे. कारण मागील वर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी होते. परंतु अचानकच अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने, खरीप हंगामातील पेरण्या शेतकऱ्यांनी पूर्ण केलेले आहेत.
सोयाबीनची 15 टक्के पेरणी पूर्ण
खरीप हंगामातील सोयाबीन हे एक प्रमुख पीक आहे. सोयाबीनची लागवड आणि शेतकरी करतात. परंतु मागील वर्षी सोयाबीनची पेरणी खूप कमी प्रमाणात झाली होती. परंतु यावर्षी तब्बल 115 टक्के पेरणी झालेली आहे. 47 लाख 70 हजार एकोणपन्नास हेक्टरवर सोयाबीनची ही पेरणी झालेली आहे.
ज्वारीची 31.2 % पेरणी पूर्ण | Maharashtra Kharif Sowing
ज्वारी देखील खरीप हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. यावर्षी खरीप हंगामात ज्वारीची जवळपास 31.2% पेरणी झालेली आहे. ही पेरणी जवळपास 90 हजार 188 हेक्टरवर झालेली आहे. कोल्हापूर नाशिक विभागात ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
कापसाची पेरणी
यावर्षी खरीप हंगामात नागपूर विभागात जवळपास 96 टक्के क्षेत्रावर कापूस लागला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि पुणे या विभागात 13 ते 20% एवढी कापसाची पेरणी झालेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी एकूण 8 लाख 91 हजार 456 हेक्टरवर यावर्षी कापसाची पेरणी केलेली आहे.
यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत खरीप हंगामात चांगल्या प्रकारे पेरणी झालेली आहे. कोकणात खरीप हंगामा जवळपास 34% पेरणी झालेली आहे. नाशिकमध्ये 84.14 टक्के पेरणी झालेली आहे. पुण्यामध्ये 109.41% पेरणी झालेली आहे. कोल्हापूरमध्ये 103.4% पेरणी झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये 93.50% खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झालेली आहे. लातूरमध्ये 94.38% एवढी पेरणी पूर्ण झालेली आहे. अमरावतीमध्ये 91.8% भरणे झालेली आहे तर नागपूरमध्ये 57.70 टक्के पेरणी झालेली आहे.
हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील वर्सेस लक्ष्मण हाके… कट टू मनोज जरंगे पाटील वर्सेस प्रकाश आंबेडकर… राज्यात आरक्षणाचा मुद्दा गरमागरमीचा झालेला असताना मराठा आणि ओबीसी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत… जरांगे पाटलांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून सरकारला एकीकडे इशारा दिलाय… दुसरीकडे सरकारनं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पण त्याला विरोधकांनी प्रतिसाद दिला नसल्याचं समजतंय… लक्ष्मण हाकेंना सरकारचा शब्द मिळाल्यापासून ते शांत झालेत… त्यामुळे मैदानात फक्त आहेत ते जरांगे पाटील… जरांगे इफेक्ट पुन्हा एकदा महाराष्ट्रात गरम होत असून त्यांच्या शांतता रॅलीला मोठा प्रतिसादही मिळतोय… पण जरांगेच्या ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी आता थेट मैदानात उतरलेत ते प्रकाश आंबेडकर…
आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेत आरक्षण बचाव यात्रा काढण्याची घोषणा करून महाराष्ट्राचे सोशियो पॉलिटिकल डायनामिक्स(text) बदलून टाकलेत… त्यामुळे एकीकडे ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील तर चालू आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचं स्वतंत्र ताट देण्याची भूमिका घेतलेले प्रकाश आंबेडकर आता एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत… त्यामुळे जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मागण्यांचं पुढे काय होईल? आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा नेमकी आहे तरी काय? त्याचाच हा आढावा…
तर छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून प्रकाश आंबेडकरांनी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार असल्याचं आज जाहीर केलं… एसी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षण हक्कासाठी आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनास सुरुवात केलेली आहे, आणि दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, त्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हते. या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय? असा जाबही त्यांनी यावेळेस सर्वच राजकीय पक्षांना विचारला…
आता ही यात्रा नेमकी काय असेल? ते पहा… तर आरक्षणासाठी काम करणाऱ्या काही सामाजिक संघटना आणि वंचित बहुजन आघाडी सोबत मिळून 25 तारखेला दादर चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात होईल… 26 जुलै रोजी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रेला सुरुवात होईल… कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना या जिल्ह्यात ही यात्रा निघणार आहे. 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे या यात्रेची सांगता होईल. या मार्गावरती कॉर्नर बैठका ठेवण्यात येतील… त्यातील मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील…
या यात्रेच्या काही प्रमुख मागण्याही असणार आहेत… ज्यामध्ये
1-ओबीसींच्या आरक्षण वाचलं पाहिजे 2-एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप डबल झाली पाहिजे, 3-ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटीची स्कॉलरशिप तशीच्या तशी लागू झाली पाहिजे 4-घाई गर्दीमध्ये कास्ट फॉर्म इशू करण्यात आला आहे, तो रद्द करण्यात यावा. 5-जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच 6-आरक्षणात एससी एसटी आणि ओबीसींना पदोन्नती मिळाली पाहिजे… अशा एकूण सहा मागण्या घेऊन या संपूर्ण यात्रेचा प्रवास होईल
थोडक्यात काय तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ, शरद पवार, महायुती सरकार, लक्ष्मण हाके यांच्यानंतर आता थेट बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणाला धक्का न लागण्याची…ओबीसी, एससी आणि एसटी आरक्षणाच्या संरक्षणाची… भूमिका घेतल्याने महाराष्ट्राचं सामाजिक, राजकीय वर्तमान ढवळून निघणार आहे… पण आंबेडकरांनी अशी भूमिका नेमकी का घेतली असावी ? व त्याची काही उत्तरही समोर येतात… पहिलं म्हणजे मुळात आंबेडकरांचा पक्षच वंचित, दुर्बल, शोषित सामाजिक घटकांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी काम करत असल्यामुळे आरक्षणावरून सुरू झालेल्या या गोंधळात बाबासाहेबांचे नातू, वंचितचे प्रमुख या नात्याने घेणे क्रमप्राप्त होतं…
दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांची भूमिका अस्थिर दिसली… कधी महाविकास आघाडी… मनोज जरांगे पाटील… फक्त काँग्रेस…आणि तिकीट वाटपाचा घोळ… या सगळ्याचा परिणाम म्हणजे वंचितच्या तब्बल 35 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं… लोकसभेला हात पोळल्यामुळे वंचितला विधानसभा निवडणुकीच्या आधी सोशल इंजीनियरिंग करणं भाग होतं…त्यामुळे ओबीसी, एससी आणि एसटी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणाची भूमिका घेऊन त्यांनी एक मोठं वर्तुळ आखलय… दलित आणि वंचित वोट बँक सोबतच ओबीसी समाजाला आपल्या सोबत जोडून घेण्याचा प्रयत्न या यात्रेतून होऊ शकतो…
खरंतर लोकसभेला संविधान बदलाच्या नरेटीवचा फायदा महाविकास आघाडीला झाला… पण बाबासाहेबांचे नातू या नात्यानं खरतर त्यांनी ही भूमिका तेव्हाच घेतली असती तर ती फायद्याची ठरली असती…पण देर आये दुरुस्त आये… या न्यायानं आंबेडकरांनी संविधानाची भूमिका येणाऱ्या विधानसभेला प्रभावीपणे मांडण्याचा विचार केलेला दिसतोय… सर्वात शेवटचं आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे ही यात्रा ज्या पट्ट्यातून जातेय तिथं साखरपट्टा ते मराठवाडा अशा विविध भागांचा समावेश आहे… त्यामुळे या रूटवरून जाताना तिथलं राजकारण ढवळून काढण्याचा प्रयत्न देखील यात्रेच्या माध्यमातून होऊ शकतो…अर्थात ही गोष्ट जरांगे इफेक्ट कमी करणारी आहे… पॉलिटिकल स्पेस आंबेडकरांच्या बाजूने झुकणारी आहे… त्यामुळे आंबेडकरांच्या या आरक्षण बचाव यात्रेला नेमका किती आणि कसा प्रतिसाद मिळेल? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…
IOCL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही रोज तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्यामुळे अगदी दहावी पास ते इंजीनियरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते.आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL Bharti 2024) अंतर्गत एक भरती चालू झालेली आहे. ही भरती नॉन एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी चालू झालेली आहे. या पदाच्या एकूण 476 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 21 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | IOCL Bharti 2024
पदाचे नाव – नॉन-एक्झिक्युटिव्ह
पद संख्या – 476
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क – 300 रुपये
वयोमर्यादा – 18 – 26 वर्षे
अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख –21 ऑगस्ट 2024
अर्ज कसा करावा ? | IOCL Bharti 2024
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.