Monday, December 22, 2025
Home Blog Page 596

अजितदादांना शरद पवारांचा दे धक्का! पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांना पक्षप्रवेश

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा धक्का दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांनी आज शरद पवारांच्या उपस्थित त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये दादा गटाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह वीस माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. खरं तर पिंपरी चिंचवड हा अजितदादांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र याच गडाला आता सुरुंग लावण्याचे काम शरद पवारांनी केलं आहे. पवारांच्या या खेळीने दादा गटाला विधानसभेत पिंपरी- चिंचवडमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे.

काल (मंगळवारी) या सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले होते. त्यानंतर आज सर्वानी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत या सर्वांनी प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे आदीसह १५ ते १६ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. तर शरद पवारांनी पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये येत दादा गटाला हादरा दिल्याची चर्चा पुण्यात जोरात सुरु आहे.

कोणकोणत्या नेत्यांनी केला शरद पवारांच्या गटात प्रवेश?

अजित गव्हाणे- शहराध्यक्ष
राहुल जाधव – कार्याध्यक्ष
हनुमंत भोसले – माजी महापौर
वैशाली घोडेकर – माजी महापौर
समीर मासुळकर – माजी नगरसेवक
पंकज भालेकर – माजी नगरसेवक
समीर वाबळे – माजी नगरसेवक
गीता मंचरकर – माजी नगरसेवक
वैशाली उबाळे – माजी नगरसेवक
शुभांगी बोऱ्हाडे – माजी नगरसेवक
विनया तापकीर – माजी नगरसेवक
संगीता ताम्हाणे – माजी नगरसेवक
रवींद्र सोनवणे – (पती, माजी नगरसेविका दिवंगत पौर्णिमा सोनवणे)
यश साने – पुत्र, दिवंगत नगरसेवक दत्ता साने
वसंत बोऱ्हाटे – माजी नगरसेवक
संजय नेवाळे – माजी नगरसेवक
प्रवीण भालेकर – माजी नगरसेवक
निवृत्ती शिंदे – माजी अध्यक्ष, शिक्षण मंडळ

Central Railway Bharti 2024 | मध्य रेल्वे अंतर्गत नवीन भरती सुरु, 10 पास उमेदवार देखील करू शकतात अर्ज

Central Railway Bharti 2024

Central Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन येत असतो. अशातच आम्ही एक आणखी संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता रेल्वे अंतर्गत (Central Railway Bharti 2024) शिकाऊ उमेदवार या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 2424 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

महत्त्वाची माहिती | Central Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 2424 जागा
  • अर्ज शुल्क – 100 रुपये
  • वयोमर्यादा – 15 – 24 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक पात्रता – 10वी पास, ITI
  • वेतनश्रेणी – 7 हजार रुपये दरमहा

अर्ज कसा करावा ? | Central Railway Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 15 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Viral Video | आता पाणीपुरी खाण्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही, बाजारात आले ऑटोमॅटिक मशीन

Viral Video

Viral Video | भारतामध्ये स्ट्रीट फूड्स खूप प्रसिद्ध आहेत. प्रत्येक ठिकाणाचे वेगवेगळे स्ट्रीट फुड्स आहेत. आणि ते खाण्यासाठी नेहमीच लोक येत असतात. यामध्ये पाणीपुरीचे नाव सगळ्यात पहिल्या स्थानी येते. भारतामध्ये पाणीपुरी खूप प्रसिद्ध आहे. सगळेच लोक आवडीने ही पाणीपुरी खातात. विशेषता संध्याकाळच्या वेळेला पाणीपुरी खाणाऱ्या लोकांची खूप जास्त गर्दी असते. अशावेळी एक पाणीपुरीची प्लेट तयार होईपर्यंत बाकीच्या लोकांना उभे राहावे लागते. आणि त्यांना कंटाळा देखील येतो. परंतु आता असे होणार नाही. कारण बाजारामध्ये सध्या एक स्वयंचलित पाणीपुरी मशीन आलेली आहे. अलीकडेच बेंगलोरच्या एचएसआर लेआउटमध्ये स्थापित केलेला स्वयंचलित पाणीपुरी व्हेंडिंग मशीनने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे.

या स्वयंचलित पाणीपुरी मशीनची पोस्ट @benedictgershom नावाच्या आयडीसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर (Viral Video) केली गेली आहे, ज्यामध्ये पाणीपुरीच्या स्टॉलवर एक वेंडिंग मशीन बसवलेले दिसत आहे आणि एक महिला तिथे उभी आहे. स्टॉलवर वेगवेगळ्या फ्लेवरचे पाण्याचे अनेक नळ होते.

हे व्हेंडिंग मशिन बसवण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्वच्छता आणि पाण्याची चव निवडण्याचे स्वातंत्र्य, म्हणजेच येथे कोणीही आपल्या आवडीचे पाणी गोलगप्पामध्ये टाकून खाऊ शकतो, तर सामान्यतः लोक गोलगप्पा वाले म्हणतात. भैया आम्हाला त्याच्याकडून सर्व काही मागायचे आहे.

ही मजेशीर पोस्ट (Viral Video) आतापर्यंत एक लाखाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे, तर शेकडो लोकांनी पोस्टला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेक वापरकर्त्यांनी पोस्टच्या टिप्पणी विभागात अशा स्वयंचलित व्हेंडिंग मशीनबद्दल त्यांच्या शंका देखील शेअर केल्या आहेत.

…त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे, हे मी मानतो; आषाढीनिमित्त राज ठाकरेंचं ट्विट चर्चेत

Ashadhi Ekadashi 2024 raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) संपूर्ण पंढरपूर नगरी विठुरायाचा गजराने दुमदुमत आहे. विठ्ठल विठ्ठल!! जयहरी विठ्ठल अशा जयघोष सर्वत ऐकायला मिळत आहेत. विठुरायाच्या दर्शनाला राज्यभरातून लाखो भाविक पंढरीला गेलेत. एकूणच आज संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्वाना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरेंनी भलीमोठी पोस्ट करत विठ्ठलाचे महत्व, वारकऱ्यांची विठुरायाबद्दलची ओढ, आणि सध्या महाराष्ट्र्र वाढलेला जातीपातीचा मुद्दा यावर रोखठोक भाष्य केलं आहे.

राज ठाकरे यांचं ट्विट जसेच्या तस

आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. ‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं.

देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो. पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो. जेंव्हा अगदी ७, ८ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेंव्हा मात्र भीती वाटते.

मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही. म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !

100 KM पेक्षा जास्त रेंजसह बाजारात आली नवी Electric Scooter; किंमत किती पहा

_iVOOMi Jeet X ZE new varient

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २-३ वर्षांपासून भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोल- डिझलच्या खर्चातून सुटका करण्यासाठी ग्राहकवर्ग इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती देत आहे. याशिवाय इलेक्ट्रिक गाड्या दिसायला सुद्धा आकर्षक असल्याने खास करून तरुणाईला या गाड्यांची चांगलीच भुरळ पडत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी iVOOMi ने भारतीय बाजारात Jeet X ZE स्कुटर नव्या व्हेरिएन्टमध्ये लाँच केली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर 100 किमी पेक्षा जास्त अंतर पार करेल असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. आज आपण या स्कुटरचे खास फीचर्स आणि किमतीबाबत जाणून घेऊयात…..

63 किमी टॉप स्पीड

कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3 kwh बॅटरी पॅक बसवला आहे. हि बॅटरी अंडरबोन फ्रेमपासून बनवण्यात आली असून तिच्यावर 5 वर्षांची वॉरंटी दिली आहे. हि बॅटरी एकदा पूर्णपणे चार्ज केली तर मग हि इलेक्ट्रिक स्कुटर 100 किलोमीटर पर्यंत रेंज देते. iVOOMi च्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इको मोड, रायडर मोड आणि स्पीड मोड असे ३ मोड देण्यात आलेत. यामधील इको मोडमध्ये जास्तीत जास्त वेग रेंज 170 किमी आहे. तर राइड मोडमध्ये रेंज 140 किमी आणि स्पीड मोडमध्ये 130 किमी आहे. गाडीच्या टॉप स्पीड बाबत सांगायचं झाल्यास, 63 किमी/ प्रतितास इतके टॉप स्पीड या इलेक्ट्रिक स्कुटरच्या माध्य्मातून मिळतं. अन्य फिचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये स्मार्ट स्पीडोमीटर, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि मेसेज नोटिफिकेशन, ट्रिप डेटा, एसओसी अलर्ट यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत.

किंमत किती?

या नव्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Jeet X ZE च्या नव्या व्हेरिएन्टची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीपासून ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत या स्कुटरची डिलिव्हरी सुरू होईल. फेस्टिव्ह सीझनच्या सुरुवातीला डिलिव्हरी होत असल्याने कंपनीला मोठा फायदा होऊ शकतो.

Yoga | ‘या’ 3 योगासनांनी सुधारेल रक्ताभिसरण; चेहऱ्याची चमक वाढण्यासोबतच होतात ‘हे’ फायदे

Yoga

Yoga | आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होणे. खूप गरजेचे असते. रक्ताभिसरण योग्य नसले, तर शरीरा संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. पचनसंस्था खराब राहते. त्यामुळे चेहऱ्यावर देखील चमक येत नाही. केसांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी तुम्ही काही योगासनांच्या मदतीने तुमचा रक्तभिसरण सुधारू शकता. योगा (Yoga) करणे हे अनेक समस्यांवरचा उपाय आहे. तुम्ही केवळ रोज 15 ते 20 मिनिटे व्यायाम केला, तरी तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. आणि सुंदर देखील दिसू शकता. आता हे योगासन कोणते आहेत? हे आपण जाणून घेऊया.

सर्वांगासन | Yoga

हे आसन केल्याने संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो. यामुळे चेहरा आणि केसांची समस्या दूर होते. पचनाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. हे आसन केल्याने चेहऱ्याकडे रक्ताभिसरण होऊन दीर्घकाळ तरूण आणि सुंदर राहण्यास मदत होते.

हलासना

चेहरा आणि पाचक अवयवांमध्ये रक्ताभिसरण वाढवण्यासाठी हलासनाचा सराव करा. थायरॉईडच्या रुग्णांसाठीही हे आसन खूप फायदेशीर आहे. हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. या आसनाचा रोज थोडा वेळ सराव केल्याने चेहऱ्याची चमक वाढू लागते. गॅस, अपचन, फुगवणे यांसारख्या समस्याही निघून जातात, पण पाठ आणि मान दुखत असल्यास सराव करू नका.

हेडस्टँड | Yoga

चेहरा आणि केसांमध्ये रक्ताभिसरण वाढवण्यासाठी शीर्षासनाचा सराव खूप फायदेशीर आहे. यामुळे मेंदूला आवश्यक प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो, एवढेच नाही तर पचन अवयवही निरोगी राहतात. मात्र, हे आसन करणे थोडे कठीण आहे. भिंतीचा आधार घेऊन हे आसन करण्याचा सराव करा. जास्तीत जास्त वेळ या आसनात राहण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला फायदा होईल.

हार्दिक पंड्या नव्हे तर ‘हा’ खेळाडू भारताचा नवा T20 कर्णधार? BCCI कडून नाव निश्चित?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या या निर्णयानंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असेल याबाबत चर्चा रंगली आहे. सध्याचा भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्याकडेच आपोआप भारतीय संघाची धुरा दिली जाईल असं बोललं जात होते. मात्र यात आता नवा ट्विस्ट आला आहे. टीम इंडियाचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) नाव आता कर्णधार पदाच्या शर्यतीत पुढे येत आहे. नवनिवार्चित प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे दोघेही सूर्यकुमार बाबत सकारात्मक असून यामुळे हार्दिक पंड्याचा गेम होण्याची शक्यता आहे.

2026 साली पुढचा T20 विश्वचषक आहे. त्यामुळे भारतीय संघाला आत्तापासूनच संपूर्ण संघबांधणी करावी लागणार आहे. यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे तो म्हणजे कर्णधार.. जो कोणी आत्ता कर्णधार जाईल त्याला 2026 च्या T20 वर्ल्डकप पर्यंत योग्य रीतीने संघ तयार करावा लागणार आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. याआधीही त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सने सुद्धा रोहित ज्या जागी हार्दिकची कर्णधार म्हणून निवड केली होती. या एकूण सर्व अनुभवांमुळे हार्दिक पांड्याला टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा मजबूत दावेदार मानलं जात होते. मात्र यामध्ये आता सूर्यकुमार यादवचे नाव समोर आल्याने आणखी ट्विस्ट आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर आणि अजित आगरकर हे दोघेही कर्णधार पदासाठी सूर्यकुमार यादवबाबत सकारात्मक आहेत. कारण मागील काही वर्षापासून अनेकदा दुखापतींनी त्रस्त असलेला दोन वर्षांनंतर भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापर्यंत किती सामने खेळेल हे कोणीच सांगू शकत नाही असं या दोन्ही खेळाडूंना वाटतं. याबाबत हार्दिकशी चर्चाही झाली असल्याचे एका रिपोर्टमधून सांगण्यात आला आहे. संघात स्थिरता निर्माण करण्यासाठी दीर्घकाळ पर्याय निश्चित करणं गरजेचं असल्याचे गंभीर आणि आगरकर याना वाटत. त्यामुळे ऐनवेळी हार्दिक ऐवजी सूर्याच्या गळ्यात सुद्धा कर्णधारपदाची माळ पडू शकते.

Ladka Bhau Yojana : ‘लाडकी बहीण’नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा 10 हजार रुपये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

laadka bhau yojana eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आणि मुलींसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा महायुती सरकारकडून करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकार कडून केली जाणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर विरोधकांनी मात्र भावासाठी कोणती योजना का आणली नाही असा उलट सवाल केला होता. या पार्श्वभूमीवर आता लाडक्या भावासाठी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये, तर पदवीधर युवकांना दरमहा दहा हजार रुपये मिळू शकतात.

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा १,५०० रुपये, म्हणजेच वर्षाला १८ हजार रुपये दिले जातील. याशिवाय त्यांना दरवर्षी ३ गॅस सिलेंडर मिळणार आहेत. मात्र आमच्या या निर्णयानंतर विरोधकांनी लाडक्या भावांचं काय? असा सवाल आम्हाला केला. परंतु आमचं लाडक्या भावावर सुद्धा लक्ष्य आहे.

लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला 8 हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप (Apprenticeship) करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी सुद्धा मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर (कुशल कामगार) तयार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघेल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Weather Update | आजही पावसाचा हायअलर्ट जारी; पुढील 12 तास मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update

Weather Update | गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. घाट परिसरात देखील अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभाग देखील रोज पावसाबद्दलच्या अंदाज सांगत आहेत. अशातच आता हवामान विभागाने आज म्हणजे 17 जुलै 2024 रोजी पावसाचा (Weather Update) अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर मध्य महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

त्याचप्रमाणे सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, राजगड या जिल्ह्यांमध्ये देखील आज अती मुसळधार पावसाचा (Weather Update) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे या विभागाला ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये देखील मागील काही दिवसांपासून पावसाचा तडाका लागलेला होता. या ठिकाणी देखील आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान हे 29 अंश सेल्सियस ते किमान तापमान 25° c एवढे असणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे आजही विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे कोकणात देखील पुढील तीन ते चार दिवस सलग अती मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणी हवामान विभागाने येल्लो अलर्ट देखील दिलेला आहे. परंतु मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची चांगली सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील लोक हे पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न; विठ्ठलाच्या गजरात पंढरी दुमदुमली

Ashadhi Ekadashi 2024 eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।आज आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बळीराजा सुखी होऊ दे. त्याच्या जीवनात समृद्धी येउदे असं साकडं विठुरायाकडे घातलं. आजच्या पूजेला मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.

या पूजेनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी विठ्ठलाकडे नेहमी जनतेसाठी बळीराजासाठी मागणं मागत असतो. बळीराजा सुखी होऊ दे. चांगला पाऊस होऊ दे, चांगल पिक येऊ दे. बळीराजाच्या जीवनात समृद्धी होउदे . या राज्यातील जनता सुखी होऊ दे. राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे असं मागणं देखील मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज सळीकडे भक्तीमय वातावरण झालं आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशिर्वादाने राज्याचा कारभार सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं साकडं आपण विठुरायाला घातलं अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आज खरं म्हणजे सगळ्यांना आपली पूजा चालू असताना देखील मुखदर्शन बंद केले नाही. ते चालू ठेवलं कारण शेवटी अठरा अठरा तास आपले वारकरी रांगेमध्ये उभे राहतात आणि त्यांना पांडुरंगाचे दर्शन घ्यायचं असतं. पण आपल्या शासकीय पूजेमध्ये दर्शन बंद केले जायचे. पण गेल्यावर्षीपासून आपलं मुखदर्शन देखील सुरु ठेवलं. व्हीआयपी लोकांपेक्षा वारकऱ्यांना पहिले प्राधान्य देण्याचं काम आपण केलंय”, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले.