Monday, December 22, 2025
Home Blog Page 597

Ashadhi Ekadashi : एकादशीनिमित्त भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडी पंढरपूरला रवाना

Ashadhi Ekadashi : संपूर्ण राज्यभरात उद्या दिनांक 17 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला जात असतात. एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून एस टी महामंडळाच्या तसेच रेल्वे विभागाकडून देखील विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने वारकरी, भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी (Ashadhi Ekadashi) रवाना झाले. याबाबतची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

यावेळी जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी आज मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्टेशन येऊन अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खडसे यांनी गाडीची शिफारस (Ashadhi Ekadashi) केली होती. त्यानुसार या गाडीला मान्यता मिळाली आणि आज (16 ) अखेर दु.01.30 वा ही गाडी पंढरपूर साठी रवाना झाली. यावेळी खासदार रक्षा खडसे त्यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून या गाडीला रवाना केले.

हे “विशेष आषाढी रेल्वे” गाडी उद्या दि.17 रोजी सकाळी 3.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. तर उद्याच रात्री 10.30 वा पंढरपूर येथून परतीच्या प्रवासाला निघणार असुन, दि.18 रोजी भुसावळ येथे परत येणार आहे. सदर अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीचे रक्षा खडसे यांच्या मार्फत एकूण जनरल तिकिटांची स्वखर्चाने खरेदी करण्यात आली असून, सदर सुविधा वारकऱ्यांसाठी (Ashadhi Ekadashi) मोफत करण्यात आली आहे. यावेळी खडसे आणि इतर आधिकऱ्यानी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांशी प्रत्यक्ष संवाद साधून मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना केले.

महाराष्ट्र हादरलं!! निर्दयी आईने मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर दिले चटके

Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्राला हादरवून सोडेल अशी अंगावर काटा आणणारी घटना नुकतीच मुंबईतील (Mumbai) गोवंडी परिसरात घडली आहे. याठिकाणी एका निर्दयी आईने तिच्या पोटच्या पोरीला अंगावर चटके दिले आहेत. 9 वर्षीय मुलीने बिछान्यामध्येच लघवी केल्यामुळे निर्दयी आईने कोणताही विचार न करता मुलीच्या पाठीवर, मांड्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर चटके दिले. यामुळे मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. या महिलेविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 9 वर्षीय चिमुकलीने बिछान्यामध्ये लघवी केल्यामुळे आईचा राग अनावर झाला होता. या रागामध्ये तिने मुलीला गंभीररित्या चटके दिले. एवढेच करून न थांबता महिलेने गॅसवर एक भांडे गरम केले. यानंतर त्याच भांड्याने मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर चटके दिले. हा सर्व प्रकार घडत असताना मुलीचे वडील कामावर गेले होते. आईने दिलेल्या चटक्यांमुळे मुलगी वेदनेने व्हिवळू लागली, ओरडू लागली. त्यामुळे शेजारचांही संशय आला. त्यांनी विचारणा केली तर महिलेने शेजारच्यांना शिवीगाळ केली.

तसेच हे आमचे कौटुंबिक प्रकरण आहे, तुम्ही यात लक्ष घालू नका असेही सांगितले. त्यामुळे शेजारच्यांनी आपत्कालीन 100 क्रमांकावर कॉल करून लक्षात आलेला सर्व प्रकार पोलिसांना कळवला. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मुलीला झालेल्या जखमा पोलिसांनी पाहिल्या. यानंतर त्यांनी शेजारच्यांच्या तक्रारीच्या आधारावर आईच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच ताबडतोब मुलीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या सर्व घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान, संबंधित मुलगी आपल्या आईसह आणि सावत्र वडिलांसोबत गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहत होती. आरोपी महिलेला पहिल्या पतीपासूनच दोन मुली आहेत. तर दुसऱ्या पतीपासून दोन मुले आहेत. या सर्व घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहेत. तर, पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ११८(१), ११५(२) अशा विविध कलमांअंतर्गत आईच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mhada Lottery : स्वप्नातलं घर पूर्ण होणार ! म्हाडाच्या ‘या’ मंडळाची आज सोडत

Mhada Lottery : सध्याच्या महागाईच्या जमान्यात सर्वसामान्यांसाठी घर घेणं ही काही साधी गोष्ट राहिली नाही. मात्र सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करते. म्हणूनच म्हाडाच्या लॉटरीसाठी अनेक जण वाट पाहत असतात. म्हाडा मार्फत नवीन घर घेणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर समोर आली आहे. म्हाडाच्या छत्रपती संभाजी नगर मंडळाच्या अक्षरी छत्रपती संभाजी नगर शहर एकूण 1113 घर आणि 361 भूखंडासाठी सोडत निघणार आहे. दिनांक आज 16 जुलै रोजी ही सोडत निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहामध्ये ही सोडत निघणार आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 4754 अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. तसंच अनामत रकमेस सह 3989 अर्ज प्राप्त झाल्याचे सुद्धा माहिती आहे या घरांमध्ये पंतप्रधान आवास योजना म्हाडा गृहनिर्माण योजना सर्वसमावेशक योजनेच्या घरांचा समावेश आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी 425 घरे , म्हाडा गृहनिर्माण योजनेसाठी 20% घरे, सर्वसमावेशक योजनेसाठी 798 घरे, तसेच 361 भूखंड आहेत.

कोणत्या भागांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या आखतारी मध्ये छत्रपती संभाजी नगर शहर, जिल्हा लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनांच्या घरांचा समावेश करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी सांगितले की, म्हाडाची सोडत ही अत्यल्प, अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठी आहे. तर भूखंड हे सर्व उत्पन्न गटातील लोकांसाठी आहेत. नवीन संगणकीय प्रणाली द्वारे ही सोडत होत आहे. या पद्धतीत नोंदणीकरण आणि अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतर पुढे अर्जदार प्रक्रियेत सहभागी होत विजेता घोषित झाल्यानंतर अर्जदारास सूचना पत्र पाठवले जाणार आहेत. तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरत्या स्वरूपात बेकार पत्र पाठवले जाणार आहे.

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा!! SC, ST, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार

prakash ambedkar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. SC , ST , ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या 25 जुलैला दादर चैत्यभूमी इथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हि यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्याला जाईल. छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेतून प्रकाश आंबेडकर यांनी याबद्दल घोषणा केली आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी वर्सेस मराठा हा श्रीमंत मराठ्यांनी लावलेला वाद आहे. जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलनाची सुरुवात केली आहे. दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व मराठा नेते राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत राजकीय पक्षांची भूमिका काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला केला आहे. सामंजस्याने तोडगा काढायचा असेल तर श्रीमंत मराठ्यांचे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जोपर्यंत भूमिका मांडत नाही, तोपर्यंत तोडगा निघणार नाही असेही आंबेडकरांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, काही ओबीसी संघटनांची मागणी होती की आपण वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतोय ती गावो गावी गेली पाहिजे. त्यामुळे, या सामाजिक संघटनांना घेऊन 25 तारखेला दादर चैत्यभूमी येथून आपण आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात करणार आहोत. 26 जुलै या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. त्यामुळे त्याच दिवशी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रेचला सुरुवात होईल. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना या जिल्ह्यात ही यात्रा निघणार आहे. यानंतर 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे या यात्रेची सांगता होईल अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

फक्त 5 रुपये भरून मिळणार अनलिमिटेड कॉल्स आणि डेटा; पहा काय आहे नवीन ऑफर??

Jio Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या जिओकडून नवनवीन प्लॅनस् ऑफर केले जात आहेत. नुकताच जिओने (Jio Plans)एक भन्नाट प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनअंतर्गत तुम्हाला दिवसाला फक्त 5 रूपये भरून अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएसची सेवा मिळेल. या प्लॅनची वैधता 336 दिवस आहे. त्यामुळे या प्लॅनचा तुम्ही संपूर्ण वर्षभर लाभ घेऊ शकता. तसेच या प्लॅनमुळे तुमचे पैसे ही वाचतील. यामुळेच हा प्लॅन नेमका काय आहे याविषयी जाणून घ्या.

जिओकडून लॉन्च करण्यात आलेला हा प्लॅन 1899 रुपयांचा आहे. म्हणजेच या प्लॅनअंतर्गत तुम्हाला दररोज फक्त 5 रुपये भरून तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि एसएमएस मिळतील. मात्र, यामध्ये उपलब्ध डेटा फक्त 24 जीबी आहे. परंतु सध्या जे लोक कमी किमतीमध्ये अनलिमिटेड कॉलिंग डेटा आणि मेसेज मिळतील असा प्लॅन शोधत आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला पर्याय ठरेल.

खरे तर यापूर्वी या प्लॅनची किंमत 1599 अशी होती. मात्र 3 जुलैपासून रिचार्जच्या किमती वाढल्यामुळे आता याच प्लॅनची किंमत 1899 रुपये इतकी झाली आहे. म्हणजेच हा प्लॅन गेल्या तीन जुलैपासून महागला आहे. तुम्ही जर या प्लॅनची सरासरी किंमत मोजली तर ती दररोज 5 रुपये दराने उपलब्ध आहे. म्हणजेच रिचार्ज केल्यानंतर तुम्ही दररोज फक्त पाच रुपयांमध्ये डेटा आणि अनलिमिटेड कॉलचा लाभ घेऊ शकता.

दरम्यान, जिओच्या वापरकर्त्यांना मिळणाऱ्या व्हॅल्यू प्लॅन्सची किंमत आता 189 रुपये, 479 रुपये आणि 1899 रुपये इतकी आहे. यामध्ये सर्वात जास्त वैधता असलेला प्लॅन हा 1899 रुपयांचा आहे. या प्लॅनचाच दररोजचा खर्च फक्त 5.6 रुपये आहे. त्यामुळेच हा प्लॅन ग्राहकांना सर्वात जास्त परवडत आहे. जिओ आपल्या इतर प्लानमध्ये देखील अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा देत आहे. परंतु या प्लॅनच्या किमती वेगवेगळया आहेत.

Ashadhi Ekadashi : राज्यातील पहिल्या बसस्थानक कम यात्री निवासाचे पंढरपूरात होणार लोकार्पण

Ashadhi Ekadashi : संपूर्ण राज्यामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव उद्या दिनांक 17 जुलै 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने पंढरपुरामध्ये दरवर्षी लाखो भाविक उपस्थित होत असतात. यावेळी भाविकांच्यासाठी पंढरपूरला येण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या आणि एसटी बसेस ची सोय केलेली असते. मात्र तरी देखील ही सोय अपुरी पडते. म्हणूनच महाराष्ट्र शासनाकडून पंढरपुरात बस स्थानक कम यात्री निवास बांधण्यात आलं असून याचे लोकार्पण उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या बस स्थानक कम यात्री निवासाचं नाव हे ‘चंद्रभागा नगर पंढरपूर बस स्थानक’ असं ठेवण्यात आले आहे. उद्या दिनांक 17 जुलै 2024 रोजी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे. शिवाय यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या जागेवर हे राज्यातलं पहिलं भव्य असं 34 फलाटांच स्थानक आणि त्याला जोडूनच एक हजार यात्रेकरू (Ashadhi Ekadashi) एकाच वेळी राहतील असं यात्री निवासाचा लोकार्पण उद्या केलं जाणार आहे.

काय आहेत वैशिष्ट्य ? (Ashadhi Ekadashi)

  • एसटी महामंडळाकडून आपल्या 11 हेक्टर जागेवर 34 फलाटांचं अतिभव्य बस स्थानक निर्माण करण्यात आलं आहे.
  • या बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आलं असून या निवासामध्ये एकावेळी एक हजार यात्रेकरू राहू शकतील अशी सोय करण्यात आली आहे.
  • याशिवाय एसटी कर्मचारी आणि यात्रेकरूंसाठी दोन सुसज्य अशी उपहारगृह देखील (Ashadhi Ekadashi) इथे बांधण्यात आले आहेत.
  • एसटी महामंडळाचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असून या प्रकल्पासाठी 33 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे.

दुसरी एक विशेष बाब म्हणजे आषाढी आणि कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातील सर्व ठिकाणी एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. इथे एसटीच्या सुमारे 500 कर्मचाऱ्यांचे राहण्याची सोय करण्यात आली असून याबरोबर 1000 यात्रेकरू देखील (Ashadhi Ekadashi) राहतील असं भव्य यात्री निवास येथे बांधण्यात आले आहे. ज्याचे ल्पकारपण उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

पंढरपूर ला 5000 विशेष बस

एसटी महामंडळाकडून पंढरपूर ला 5000 विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून ( Ashadhi Ekadashi 2024) एसटी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असं आवाहन देखील एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

…. म्हणून RCB चा संघ कधीच IPL जिंकला नाही; नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

RCB Parthiv Patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ये साला कप नामदे… यंदा आयपीएल आम्हीच जिंकणार असा विश्वास रॉयल चॅलेंजर बंगळुरूचे (Royal Challenger Bangalore) चाहते नेहमीच करत असतात . मात्र दरवर्षी त्यांच्या पदरी निराशाच पडते. तस बघितलं तर आरसीबी हा प्रचंड फॉलोअर्स असलेला संघ, चिन्नास्वामी स्टेडियमवर सुद्धा प्रत्येक सामन्यावेळी प्रेक्षकांची गर्दी आणि पाठिंबा, विराट कोहली, एबी डिव्हिलिअर, ग्लेन मॅक्सवेल यांसारखे दिग्गज खेळाडू संघात असूनही आरसीबीचा संघ आत्तापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर करू शकला नाही. यामागे एक-दोन नव्हे तर अनेक मोठी कारणे असू शकतात. मात्र याच दरम्यान, माजी खेळाडू पार्थिव पटेल (Parthiv Patel) ने बंगळुरू संघाच्या ड्रेसिंग रूम मधील खरं सत्य बाहेर आणत आत्तापर्यंत आरसीबी आयपीएल का जिंकू शकली नाही तेच सांगितलं आहे.

पार्थिव म्हणाला की आरसीबी लीगमध्ये कधीही संघ म्हणून खेळला नाही. विराट कोहली असो की ख्रिस गेल किंवा एबी डिव्हिलियर्स असो सर्वांची वयक्तिक कामगिरी चांगली राहीली. संघ सुद्धा याच खेळाडूंच्या अवतीभवती सतत राहिला. मी सुद्धा आरसीबीकडूनही खेळलो आहे, या फ्रँचायझीमध्ये स्टार्सना नेहमीच प्राधान्य दिले जात होते. यात मला संघभावना दिसली नाही. मी जेव्हा या फ्रँचायझीमध्ये होतो तेव्हा संघ म्हणजे फक्त विराट, गेल आणि डिव्हिलिअर्स हेच होते. आरसीबी मध्ये संघ संस्कृती कधीच नव्हती, त्यामुळे त्यांना आजपर्यँत आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही असं स्पष्ट मत पार्थिव पटेलने व्यक्त केलं.

दरम्यान, आयपीएल इतिहासातील सर्वात कमनशिबी संघ म्हणून रॉयल चॅलेंजर बंगळुरूकडे बघावं लागेल. कारण आयपीएलच्या सुरुवातीपासून त्यांच्याकडे जॅक कॅलिस, तिलकरत्ने दिलशान, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, ब्रेन्डन मॅकल्म, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, डेल स्टेन यांच्यासारखे खेळाडू होते. मात्र तरीही आयपीएल जिंकण्यात या संघाला एकदाही यश आलं नाही. आत्तापर्यंत या लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नेहमीच खराब खेळ केला असे सुद्धा म्हणता येणार नाही. आरसीबीने ३ वेळा आयपीएल मध्ये अंतिम फेरी गाठली, परंतु दुर्दैवाने तिन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या लीगमध्ये, बंगळुरूचा संघ 8 वेळा ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलाय तर 6 वेळा प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यश मिळवले होते, परंतु त्यांना एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही.

Indian Railway : रेल्वेने नियम केले कडक ! वेटिंग तिकिटाबद्दल मोठी अपडेट आली समोर

Indian Railway : भारतीय लोक रेल्वेने प्रवास करणे अधिक पसंत करतात. त्यामुळे बहुतांश रेल्वेला मोठी गर्दी पहायला मिळते. अशावेळेला आरक्षित केलेल्या डब्ब्यांमध्ये देखील इतर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. मात्र लवकरच रेल्वेकडून नियम कडक केले जाणार असून त्यामुळे घुसखोरांना आळा बसणार असून रिझर्वेशन करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.

भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवाशांच्या सोयीशी संबंधित नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका लाखो रेल्वे प्रवाशांना बसणार आहे. 1 जुलैपासून वेटिंग तिकिटांवर प्रवास करण्याबाबत रेल्वेने कठोर निर्णय घेतल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. आता कोणत्याही प्रवाशाने नियम मोडल्यास त्याच्यावर केवळ दंडच होणार नाही तर टीटी त्याला मध्यभागी खाली उतरवेल, असे रेल्वेने म्हटले आहे. यासाठी ट्रेनमध्ये तिकीट तपासणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाही कडक आदेश देण्यात येणार आहेत.

वेटिंग तिकिटांवर आरक्षण डब्यातून प्रवासाला बंदी

रेल्वेने आता वेटिंग तिकिटांवर आरक्षण डब्यातून प्रवास करण्यास पूर्णपणे बंदी घातली असल्याचे बोलले जात आहे. म्हणजे तुमचे तिकीट वेटींग असेल तर तुम्ही एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करू शकत नाही. जरी तुम्ही स्टेशन खिडकीतून तिकीट ऑफलाइन खरेदी केले असेल तरी. आता या प्रकारच्या तिकिटावरही रेल्वेने आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास बंदी (Indian Railway) घातली आहे. आरक्षित डब्यांमध्ये कन्फर्म तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय लागू करण्यात आला असला, तरी वेटिंग तिकिटांवर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. मात्र, याबाबत रेल्वेकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

काय सांगतो नियम ? (Indian Railway)

भारतीय रेल्वेचा नियम आहे की जर एखाद्या प्रवाशाने स्टेशनच्या खिडकीतून वेटिंग तिकीट घेतले असेल तर तो आरक्षित डब्यातूनही प्रवास करू शकतो.
जर एखाद्याकडे एसीचे वेटिंग तिकीट असेल तर तो एसीमध्ये प्रवास करू शकतो आणि जर त्याच्याकडे स्लीपर तिकीट असेल तर तो वेटिंग तिकिटावर स्लीपर डब्यात प्रवास करू शकतो. तथापि, ऑनलाइन खरेदी केलेल्या तिकिटांवर (Indian Railway) आगाऊ प्रवास करण्यावर निर्बंध आहे, कारण ऑनलाइन तिकीट वेटिंग सोडल्यास आपोआप रद्द होतात.

काय आहे रेल्वेचे म्हणणे ? (Indian Railway)

वेटिंग तिकिटावर प्रवास करण्यावर बंदी ब्रिटिश काळापासून लागू नसून त्याचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रेल्वेचा स्पष्ट नियम आहे की जर तुम्ही खिडकीतून तिकिट खरेदी केले असेल आणि ते वेटिंगमध्ये (Indian Railway) राहिले तर ते रद्द करा आणि पैसे परत मिळवा. असे करण्याऐवजी प्रवासी डब्यात चढून प्रवास करतात. परंतु, प्रवाशांच्या सोयीचा विचार करून सध्या फारसे कडकपणा आणला जात नाही.

AIATSL Vacancy 2024 | मुंबई AIATSL अंतर्गत मोठी भरती सुरु, अशाप्रकारे करा अर्ज

AIATSL Vacancy 2024

AIATSL Vacancy 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. नेहमीच आम्ही तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इयर इंडिया इयर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIATSL Vacancy 2024) अंतर्गत विविध पदांसाठी सध्या भरती निघालेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. ही भरती तब्बल 1049 पदांसाठी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा.

पदाचे नाव | AIATSL Vacancy 2024

ही भरती ग्राहक सेवा कार्यकारी वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी या पदांसाठी होणार आहे.

एकूण रिक्त जागा

या भरती अंतर्गत एकूण 1049 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क | AIATSL Vacancy 2024

या भरतीचा अर्ज करताना तुम्हाला 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Indian Railway : ट्रेनचे तिकीट 2 मिनिटांत होईल कन्फर्म ; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Indian Railway : आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण भारतभर रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. त्यामुळे बहुतांश लोक हे परवडणारा आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. परंतु अनेकदा जर तुमचे प्लान काही अचानक ठरले असतील तर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी प्रॉब्लेम होतो. विशेषतः सुट्टीच्या हंगामामध्ये वेटिंगवर अनेक प्रवासी असतात. मात्र रेल्वे कडून अशा प्रवासांसाठी खास सोय करण्यात आली असून अगदी काही साध्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळू शकतं. त्यामुळे तुमचे प्लानिंग (Indian Railway) मात्र खराब होणार नाही हे नक्की. चला तर मग पाहूया हे रेल्वेचे कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं

भारतीय रेल्वेकडून आयत्यावेळी हमखास प्रवासासाठी तात्काळ तिकीटची सुविधा दिली जाते. या सुविधेनुसार आपला प्रवास आदल्या दिवशी तात्काळ कोटातून तिकीट काढून हमखास कन्फर्म तिकीट काढू शकतो. हे तात्काळ तिकीट कसं काढायचं? या तात्काळ (Indian Railway) तिकीट बुकिंग ची ठराविक वेळ दिलेली असते त्याच वेळेत हे तिकीट काढावे लागते.

  • सर्वात आधी तिकीट बुकिंग साठी तुम्हाला आय आरसीटीसी ची वेबसाईट (Indian Railway) उघडायची आहे.
  • त्यानंतर होमपेज च्या बाजूला उजव्या कोपऱ्यात मेनूचा पर्याय दिसेल इथे तुम्ही लॉगिन करून घ्या.
  • त्यानंतर तिकीट बुक वर क्लिक करा
  • त्यानंतर फॉर्ममध्ये तुम्ही प्रवास सुरू करणाऱ्या बोर्डिंग स्टेशनचं नाव टाका त्यानंतर तुमच्या डेस्टिनेशन च नाव TO या कॅटेगरीच्या मध्ये टाका.
  • त्यानंतर Tatkal पर्यायाला सिलेक्ट करा. हा बाय डिफॉल्ट General वर सेट असतो.
  • त्यानंतर प्रवासाची तारीख टाका, डिटेल्स टाकल्यानंतर (Indian Railway) सर्चवर क्लिक करा.
  • त्यानंतर त्या मार्गाने जाणाऱ्या अनेक ट्रेनची नावे दिसतील
  • त्यानंतर तुम्हाला ज्या ट्रेनमध्ये ज्या श्रेणीची तिकीट काढायची त्यावर क्लिक करुन बुक नाऊवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला प्रवाशाची वैयक्तिक माहिती टाकावी लागेल.
  • तात्काळ तिकीट काढताना वेग दाखविणे गरजेचे आहे. जर तुम्ही मास्टर लिस्ट (Indian Railway) आधी तयार करुन ठेवली असेल तर तुम्हाला तपशिल भरायला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही एका क्लिकवरच पॅसेंजर समाविष्ट करु शकता.
  • त्यानंतर इतर तपशील भरावा, कॅप्चा टाकावा, मोबाईल नंबर टाकावा, त्यानंतर तुम्हाला (Indian Railway) पेमेंट करण्यासाठी सांगितले जाईल, त्यानंतर तुम्ही पेमेंट करावे. त्यानंतर तुमचे तात्काळ तिकीट बुक होईल.