Monday, December 22, 2025
Home Blog Page 599

Indian Navy Bharti 2024 | भारतीय नौदलात 741 पदांची भरती सुरु; असा करा अर्ज

Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही त्यांच्यासाठी अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय नौदल अकादमी (Indian Navy Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत नागरी (गट बी आणि सी) या पदांच्या रिक्त जागा आहेत. या भरतीच्या एकूण 741 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 2 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी उशीर न करता लवकरात लवकर या भरतीचे अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | Indian Navy Bharti 2024

  • पदाचे नाव – नागरी गट बी आणि सी
  • पदसंख्या – 741
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जशुल्क – 295 रुपये
  • वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑगस्ट 2024

अर्ज कसा करावा ? | Indian Navy Bharti 2024

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना सगळी कागदपत्र व्यवस्थित जोडायची आहेत.
  • 2 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मोठी बातमी!! सुनेत्रा पवार थेट मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतली??

Sunetra Pawar Modi Bag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाचे संकेत मिळत आहेत. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आज अजित पवारांच्या पत्नी आणि दादा गटाच्या खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मोदीबागेत दाखल झाल्या. महत्वाची बाब म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) सुद्धा आज सुप्रिया सुळे यांच्यासह मोदीबागेत आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा खासदार करण्यात आलं. यानंतर प्रथमच आज सुनेत्रा पवारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु आहे. हि भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र छगन भुजबळ यांच्यानंतर सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या भेटीला गेल्यानंतर राज्याचे राजकारण पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भोवती फिरत आहे.

सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये दाखल झाल्या तेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होते. सुनेत्रा पवार साधारणपणे एक तास मोदीबागेत होत्या. एका तासानंतर त्या मोदी बागेमधून बाहेर पडल्या आहेत. मात्र या काळात सुनेत्रा पवार या शरद पवार सुप्रिया सुळे यांना भेटल्या का⁠ याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार अजित पवारांच्या बहिणीला भेटण्यासाठी आल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु या सर्व घटनाक्रमात शरद पवार हे मात्र केंद्रस्थानी दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप पाहायला मिळणार का? या चर्चाना उधाण आले आहे.

Pm Crop Insurance Yojana | पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज करण्याची झाली मुदतवाढ; धनंजय मुंडेने दिली माहिती

Pm Crop Insurance Yojana

Pm Crop Insurance Yojana | सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना आणल्या जातात. यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री पिक विमा योजना. (Pm Crop Insurance Yojana) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा देण्यात येतो. नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्याच्या पिकाची काही नुकसान झाले, तर सरकारकडून त्यांना आर्थिक संरक्षण पुरवले जाते. हा एक रुपयात विमा भरण्याची 15 जुलै ही अंतिम तारीख होती. परंतु अजूनही काही लोकांनी पीक विमा भरलेला नाही. त्यामुळे त्या लोकांनी आता त्यांना पीक विमा भरण्याची मुदत वाढ मिळावी, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना केलेली आहे. त्यामुळे आता त्यांच्या या मागणीनंतर कृषीमंत्र्यांनी पिक विमा भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख ठेवलेली आहे.

सध्या राज्यातील विविध योजना चालू आहेत. आणि त्या योजनांचे अर्ज करण्यासाठी csc केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या सगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्र जोडताना सर्वर डाऊन होत आहे. त्यामुळे अनेक लोकांना पिक विमा भरता आलेला नाहीये. या सगळ्याचा विचार करूनच आता पीक विम्याचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे धनंजय मुंडे देखील याबाबतचा पाठपुरावा करत आहे त्यानुसार सोमवारी संध्याकाळी 1 रुपयात पीक विमा भरण्याचे मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या आभार देखील मानलेले आहे.

त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा भरलेला नाही. त्यांनी 31 जुलैपर्यंत सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. आणि लवकरात लवकर हा पिक विमा (Crop Insurance) भरायचा आहे. पिक विमा भरल्याचा शेतकऱ्यांना आतापर्यंत अनेकवेळा फायदा झालेला आहे. कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यावर आपल्याला सरकारकडून नुकसान भरपाई आर्थिक स्वरूपात मिळते.

iQOO Z9 Lite : 10,499 रुपयांच्या किंमतीत iQOO ने भारतात लाँच केला भन्नाट मोबाईल

iQOO Z9 Lite launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोन निर्माता कंपनी iQOO ने भारतीय बाजारात स्वस्तात मस्त मोबाईल लाँच केला आहे. iQOO Z9 Lite असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. iQOO चा हा मोबाईल 4GB रॅम आणि 6GB रॅम अशा २ पर्यायात येतो. त्यानुसार मोबाईलची किंमत वेगवेगळी आहे . आज आपण या नव्या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…..

डिस्प्ले –

iQOO Z9 Lite मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1612×720 रिझोल्यूशन, 120Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 89.64 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो सपोर्टसह येतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 5G प्रोसेसर बसवला असून iQOO चा हा मोबाईल Funtouch OS 14 आधारित Android 14 वर काम करतो. मोबाईलमध्ये 4GB/128GB स्टोरेज आणि 6GB रॅम/ 128GB स्टोरेज असे २ स्टोरेज पर्याय दिले आहेत.

कॅमेरा – iQOO Z9 Lite

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, iQOO Z9 Lite मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा प्राथमिक कॅमेरा, 2MP चा सेकंडरी कॅमेरा आणि बोकेह कॅमेरा देण्यात आलाय. नाईट, पोर्ट्रेट, पॅनोरमा आणि टाइम-लॅप्स असे अनेक मोड मिळतात. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 15W फास्ट चार्जरला सपोर्ट करते.

किंमत किती?

आता राहिला प्रश्न तो म्हणजे मोबाईलच्या किमतीबाबत, तर iQOO Z9 Lite च्या 4GB + 128GB स्टोरेज व्हॅरिएन्टची किंमत 10,499 रुपये आहे तर 6GB+128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 11,499 रुपये आहे. Aqua Flow आणि Mocha Brown या दोन रंगाच्या पर्यायात हा मोबाईल उपलब्ध असून येत्या 20 जुलैपासून या स्मार्टफोनची विक्री सुरू होईल.

Police Bharti 2024 | आनंदाची बातमी ! महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार 7000 पोलिसांची भरती

Police Bharti 2024

Police Bharti 2024 | 2023 मध्ये राज्यांमध्ये पोलीस भरती झालेली नाही. त्यामुळे आता राज्यामध्ये 2023 मध्ये रिक्त असलेल्या 17471 पोलीस भरतीची सुरुवात झालेली आहे. 1 सप्टेंबर पूर्वी ही भरती पूर्ण होणार आहे त्यामुळे आता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या काळात 7 हजार पोलिसांची भरती होईल. अशी माहिती देखील गृह विभागाकडून देण्यात आलेली आहे.

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत जवळपास 2 वेळा ही पोलीस भरती (Police Bharti 2024) झालेली आहे. शहरात वाढत असलेली गुन्हेगारी त्याचप्रमाणे शहरांचा विस्तार तसेच वाढलेली लोकसंख्या तसेच पोलिसांची गरज लक्षात घेता, हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तसे पाहायला गेले तर मागील अडीच ते तीन वर्षात जवळपास 30 हजार पोलिसांची भरती झालेली आहे. राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता देखील आता वाढवण्यात आलेली आहे. जे नवीन पोलीस शिपाई आहे त्यांचे प्रशिक्षण सप्टेंबर पर्यंत संपणार आहे.

त्या आधी आता 1 सप्टेंबरपर्यंत सध्याची पोलीस भरती (Police Bharti 2024) पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाकडून देण्यात आलेले आहेत. ही भरती तब्बल 14,471 पदांची होणार आहे. आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई 8 जिल्ह्यात चालक शिपाई आणि 5 जिल्ह्यात बँडची लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे. आता उर्वरित जिल्ह्यामधील पावसाची स्थिती पाहता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

आजकाल शहरांचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक लोक शिक्षण घेत नाही. वाईट प्रवृत्तीला जातात. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे वाहनांची संख्या देखील वाढलेली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस संरक्षण कमी पडत आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या विभागांमध्ये यावर्षी पोलीस भरती चालू झालेली आहे.

कोहलीच्या स्वभावामुळेच त्याला कमी मित्र; अमित मिश्राने सांगितला रोहित आणि विराटमधील फरक

amit mishra virat and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) … एकाच नाण्याच्या २ बाजू… भारतीय क्रिकेटमधील दोघेही दिग्गज खेळाडू… दोघांची तुलना करणं तस अवघडच…. जे विराटला जमते ते रोहित करू शकत नाही आणि जे रोहित करू शकतो ते विराटला कधी जमलं सुद्धा नाही… त्यामुळे दोघांत महान कोण यावरून दोन्ही खेळाडूंचे फॅन्स अक्षरश भांडताना सुद्धा आपण बघितलं आहे. मात्र आता भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्राने (Amit Mishra) विराट आणि रोहित या दोघांच्याही स्वभावातील फरक सांगितला आहे. विराट कोहली हा आधीपेक्षा खूप बदलला आहे तर रोहित शर्मा मात्र आधी होता तसाच अगदी साधा आहे असं अमित मिश्राने म्हंटल.

यूट्यूब शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अमित मिश्रा म्हणाला, विराट कोहलीचे भारतीय संघात फारसे मित्र नाहीत आणि ‘फेम आणि पॉवर’मुळे तो बदलला आहे. मात्र दुसरीकडे रोहितला प्रसिद्धी आणि दर्जा मिळाला असला तरीही तो पूर्वीसारखाच आहे. मी रोहित शर्माशी केव्हाही बोलू शकतो आणि त्याच्यासोबत मजा करू शकतो. मात्र कोहली आणि रोहितच्या स्वभावात फरक असल्यामुळे भारतीय संघात विराट कोहलीचे कमी मित्र आहेत असेही अमित मिश्रा याने सांगितलं.

मिश्रा पुढे म्हणाला, एक क्रिकेटर म्हणून मी विराट कोहलीचा खूप आदर करतो, पण आता माझं त्याच्याशी पूर्वीसारखं नातं राहिलेलं नाही. “मी चिकू 14 वर्षांचा असल्यापासून ओळखतो, जेव्हा तो समोसे खात होता, जेव्हा त्याला रोज रात्री पिझ्झाची गरज भासत असे, पण जो चिकू मी ओळखतो आणि कर्णधार विराट कोहली त्यात खूप फरक आहे. विराटला मित्र कमी का आहेत? याचे कारण आहे ते म्हणजे रोहित आणि त्याच्या स्वभावातील फरक…. मी अनेक वर्षांपासून भारतीय संघाचा भाग नाही. तरीही जेव्हा मी रोहितला आयपीएल किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात भेटतो तेव्हा तो नेहमी माझ्याशी विनोद करतो. रोहित काय विचार करेल याचा विचार करण्याची मला गरज नसते.

दरम्यान, अमित मिश्रा हा भारताचा माजी लेग स्पिनर आहे. त्याने भारतासाठी 22 कसोटी आणि 36 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अमित मिश्रणे त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2017 मध्ये खेळला होता. आयपीएलमध्येही त्याची कारकीर्द चांगली राहिली आहे.

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला घरबसल्या ‘अशी’ करा विठ्ठलाची पूजा; पहा शुभ मुहूर्त आणि विधी

Ashadhi Ekadashi 2024 Puja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू धर्मात आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) विशेष महत्व आहे. यंदा आषाढी एकादशी १७ जुलैला साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले असून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. विठुरायाचा भक्तीत संपूर्ण महाराष्ट्र तल्लीन झाला असून सर्वत्र विठुरायाच्या गजर दुमदुमत आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठालाची… असा जयघोष वारकरी करत आहेत. जो मिळेल त्या गाडीने, बसने पंढरपूरला जात आहे. मात्र काही जणांना इच्छा असूनही पंढरीला जाणं शक्य नसत. अशावेळी ज्या लोकांना आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता येत नाही ते लोक घरच्या घरी मनोभावे पूजा करू शकतात. त्यासाठी साहित्य काय लागते? शुभ मुहूर्त कोणता आहे आणि यासाठी विधी काय आहे तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आषाढी एकादशी तिथी (Ashadhi Ekadashi 202)

हिंदू पंचांगानुसार आषाढी शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 16 जुलैला रात्री 8.33 वाजेपासून 17 जुलै रात्री 9.33 वाजेपर्यंत आहे. उदय तिथीनुसार आषाढी एकादशी ही 17 जुलैला साजरी होणार आहे.

पूजेसाठी साहित्य काय लागेल?

विठूरायाची पूजा करण्यासाठी तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, पंचामृत, पाणी, हळद कुंकू,अष्टगंध, बुक्का, नवीन वस्त्र, अगरबती , तांदूळ, सुपारी, केळी, 5 फळं, तुळशी पत्र, गुलाब फल, विडाचे पान इत्यादी साहित्य लागेल. (Ashadhi Ekadashi 2024)

पूजा कशी करावी?

आषाढी एकादशीला उपवास करावा. सकाळी लवकर उठावे, स्नान करुन घरच्या देवाची पूजा करावी.
विठूरायाच्या मूर्तीचे पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर मूर्तीला व्यवस्थित पुसून गुलाल किंवा बुक्का लावावा.
विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा
यानंतर अबीर, गुलाल, तांदूळ, फुले आदी वस्तू अर्पण करा.
उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून विठ्ठलाची आरती करावी.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. हॅलो महाराष्ट्र याबाबत कोणतीही पुष्टी करत नाही)

Dengue Home Remedies | ‘या’ वनस्पतींची पाने डेंग्यूवर आहे रामबाण उपाय; झपाट्याने वाढतात प्लेट्सलेट

Dengue Home Remedies

Dengue Home Remedies | पावसाळा आला की, पावसासोबत अनेक आजार देखील येत असतात. पावसामध्ये डेंगू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. कारण साचलेल्या पाण्यामध्ये डेंगूचे डास निर्माण होतात. डेंगू झाला की, शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते. आणि आपली रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. यामुळे प्रचंड थकवा देखील येतो आणि अशक्तपणा येतो. या डेंगूच्या तापावर वेळेवर उपचार घेणे खूप गरजेचे असते. अन्यथा हा ताप जीवघेणा देखील ठरू शकतो. अशावेळी आपल्याला प्लेटलेट्स वाढवणारे पदार्थ खाणे खूप गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही औषधी वनस्पतींबद्दल त्याचप्रमाणे पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील संख्या लवकर वाढेल आणि तुम्हाला डेंगू पासून आराम मिळेल.

पपईची पाने | Dengue Home Remedies

डेंग्यूपासून आराम मिळवण्यासाठी पपईच्या पानांचा वापर खूप प्रभावी आहे. त्यांच्या वापराने डेंग्यूचा संसर्ग कमी होऊ शकतो. पपईच्या पानांनापाण्याने धुवावे आणि नंतर किमान 1 तास पाण्यात भिजवून ठेवावे. यानंतर, त्यांना बारीक वाटून घ्या आणि नंतर भिजवलेल्या पाण्यात मिसळा आणि गाळून घ्या. डेंग्यू तापाच्या बाबतीत, सकाळी आणि संध्याकाळी एक ग्लास रस प्यायल्याने प्लेटलेटची संख्या वेगाने वाढते.

तुळशीची पाने

डेंग्यूपासून बचाव आणि उपचार करण्यासाठीही तुळशीची पाने वापरली जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिजैविक गुणधर्म असतात, जे डेंग्यूवर उपचार करू शकतात. यासाठी तुम्हाला त्याची काही पाने 2 ग्लास पाण्यात उकळून ते अर्धे होईपर्यंत उकळावे लागतील. यानंतर त्यात २ चिमूट काळी मिरी पावडर टाकून कोमट प्या. यामुळे रोगप्रतिकारशक्तीही झपाट्याने वाढते.

कडुलिंबाच्या झाडाची पाने

कडुनिंबाची पाने, अँटी-पायरेटिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांनी समृद्ध, प्लेटलेटची संख्या वेगाने वाढवण्यास देखील मदत करतात. तुम्ही ते पाण्यात उकळून आणि नंतर गाळूनही सेवन करू शकता. आयुर्वेदिक औषध म्हणून, ते केवळ तापापासून आराम देत नाही तर प्रतिकारशक्ती देखील वाढवते.

मेथीची पाने | Dengue Home Remedies

डेंग्यूच्या उपचारासाठीही मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये असलेले अँटीपायरेटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म डेंग्यू तापापासून आराम देतात आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवतात. अशा स्थितीत मेथीची थोडी पाने घ्या आणि २ ग्लास पाण्यात उकळा आणि एकच ग्लास उरला की थोडे थंड करून गाळून घ्या आणि पाणी प्या.

Weather Update | आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट; IMD ने दिला ईशारा

Weather Update

Weather Update | महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. हवामान विभागाकडून देखील रोज पावसाबाबतचे अंदाज येत आहेत. अशातच हवामान विभागाने आज म्हणजे 16 जुलै रोजी हा पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान विभागाने (Weather Update Update) दिलेल्या माहितीनुसार आज राज्यांमध्ये जवळपास 9 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केलेला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असल्यास घराबाहेर पडा, असे देखील सांगण्यात आलेले आहे.

आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा आहे. त्यामुळे हवामान विभागाने (Weather Update) या जिल्ह्याला रेड अलर्ट देखील जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील आज मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. मध्यमहाराष्ट्रातील घाट भागात देखील तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा देखील येऊ शकतो. या ठिकाणी वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलो प्रतितास एवढा असणार आहे.

त्याचप्रमाणे सांगली, सोलापूर हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने या ठिकाणांना येल्लो अलर्ट जारी केलेला आहे.

Pandharpur Bus Accident : पंढरपूरला जाणारी बस दरीत कोसळली; भाविकांवर काळाचा घाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचा अपघात झाल्याची (Pandharpur Bus Accident) दुर्दैवी घटना आज मुंबई-पुणे महामार्गावर घडली. या अपघात ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर ट्रॅव्हल बस ही डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होती. मात्र याचवेळी मध्यरात्री ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळली आणि दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी होते. त्यातील ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवलीहुन एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. त्याच दरम्यान, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

यंदाची आषाढी एकादशी १७ जुलै रोजी आहे. याच निमित्ताने आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी डोंबिवली मधून हे सर्व भाविक मोठ्या उत्साहाने पंढरपूरच्या दिशेने जात होते. परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. आषाढी एकादशीला राज्यभरातून वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला जात असतात. ज्यांना दिंडीने जाणे शक्य होत नाही, ते भाविक बस आणि रेल्वेने पंढरपूर गाठतात. लाखोंची गर्दी आषाढीला पंढरपूरला होत असते आणि विठुरायाचा गजर सर्वत्र दुमदुमत असतो.