हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचा अपघात झाल्याची (Pandharpur Bus Accident) दुर्दैवी घटना आज मुंबई-पुणे महामार्गावर घडली. या अपघात ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर ट्रॅव्हल बस ही डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होती. मात्र याचवेळी मध्यरात्री ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळली आणि दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी होते. त्यातील ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवलीहुन एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. त्याच दरम्यान, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
#WATCH | Mumbai | Four people died and several others were injured after a bus collided with a tractor and fell into a ditch near the Mumbai Express Highway. All the injured were admitted to the nearby MGM Hospital: Pankaj Dahane, DCP Navi Mumbai Police
यंदाची आषाढी एकादशी १७ जुलै रोजी आहे. याच निमित्ताने आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी डोंबिवली मधून हे सर्व भाविक मोठ्या उत्साहाने पंढरपूरच्या दिशेने जात होते. परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. आषाढी एकादशीला राज्यभरातून वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला जात असतात. ज्यांना दिंडीने जाणे शक्य होत नाही, ते भाविक बस आणि रेल्वेने पंढरपूर गाठतात. लाखोंची गर्दी आषाढीला पंढरपूरला होत असते आणि विठुरायाचा गजर सर्वत्र दुमदुमत असतो.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केदारनाथ हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देतात. राजधानी दिल्लीमध्ये देखील आता केदारनाथ मंदिराची पायाभरणी सुरू झालेली आहे. आणि त्या पायाभरणी करण्यावरूनच अनेक वाद देखील निर्माण झालेले आहे. केदारनाथ मंदिराच्या पुजारांकडून ही पायाभरणी करण्याला कडाडून विरोध होत असताना. दुसरीकडे ज्योतिमठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी दिल्लीतील केदारनाथ मंदिर उभारण्यात देखील विरोध केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याचा मुलामा देण्याच्या कामात देखील घोटाळा होत असल्याचा आरोप केलेला आहे. केरदारनाथ मंदिरातून तब्बल 228 किलोचा सोनं गायब झालेले आहे. आणि याचा हिशोब कोण देणार? असे देखील त्यांनी विचारलेले आहे.
यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले की केदारनाथमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा घोटाळा झालेला आहे. हा मुद्दा उपस्थित का केला नाही. केदारनाथमध्ये घोटाळा केल्यानंतर आता दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बांधले जाईल. तेथे पुन्हा एकदा घोटाळा होईल.असा आरोप देखील त्यांनी मांडलेला आहे.
मागील वर्षी केदारनाथ मंदिरामध्ये एका पुजाऱ्याने सोन्याच्या मुलामा लावण्याच्या कामांमध्ये तब्बल 125 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. त्याने सोन्याऐवजी पितळीचा मुलांना केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आलेला होता. परंतु मंदिर समितीने हा आरोप फेटाळून लावला. याबाबत देखील शंकराचार्य यांनी त्यांचे मत मांडले ते म्हणाले की, केदारनाथमध्ये तब्बल 228 किलोचा सोनं गायब झालेले आहे. त्याबाबत कोणत्याही प्रकारे कुठेही तपास केलेला नाही. परंतु यासाठी कोण जबाबदार असणार.
Bullet Train: भारत सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट. या प्रोजेक्टचे काम वेगाने सुरु असून आतापर्यंत झालेल्या कामाचा व्हिडीओ NHSRCL ने X वर शेअर केला आहे. चला जाणून घेऊया या प्रोजेक्टच्या अपडेटबद्दल
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर 508 किलोमीटरच्या मार्गावरील 12 स्थानकांवर बांधण्यात येणार आहे. गुजरातमध्ये साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा आणि वापी येथून आठ (08) स्थानके असतील आणि महाराष्ट्रात बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई येथून चार (04) स्थानके (Bullet Train) असतील.
काय असतील सुविधा (Bullet Train)
बुलेट ट्रेनच्या सर्व स्थानकांवर बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे. गुजरातमधील सर्व 8 स्थानकांवर पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून सुपरस्ट्रक्चर बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. कॉरिडॉरवरील स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सर्व आधुनिक आणि प्रगत सुविधा आणि सुविधा असतील. तिकीट आणि प्रतीक्षा क्षेत्र, बिझनेस क्लास लाउंज, नर्सरी, टॉयलेट, स्मोकिंग रूम, इन्फॉर्मेशन बूथ, रिटेल सेंटर्स आणि सार्वजनिक माहिती आणि घोषणा यंत्रणा असतील. याव्यतिरिक्त, ऑटो, बस आणि टॅक्सी यासारख्या चांगल्या, वेगवान आणि त्रास-मुक्त कनेक्टिव्हिटीसाठी सर्व मूलभूत वाहतूक मोड्ससह एकत्रीकरणाद्वारे काही स्थानके वाहतूक केंद्र म्हणून विकसित केली जातील.
5 out of 8 Bullet Train stations in Gujarat have achieved rail level slab casting. Here is the latest report on Bullet Train stations construction from Gujarat. Read more here https://t.co/zTBojKwkAcpic.twitter.com/48RK9Q0iGD
व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार वापी, बिलीमोरा, सुरत, आनंद आणि अहमदाबाद या पाच स्थानकांनी त्यांच्या रेल्वे स्तरावरील स्लॅबचे बांधकाम पूर्ण केले आहे. वापी, बिलीमोरा, सुरत, आणंद आणि अहमदाबादमध्ये कॉन्कोर्स लेव्हल आणि रेल्वे लेव्हल (Bullet Train) स्लॅब पूर्ण झाले आहेत.
इतर स्थानकांसाठी (Bullet Train)
भरुच: 425 मीटरपैकी 350 मीटर रेल्वे लेव्हल स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे.
वडोदरा : पहिल्या मजल्याच्या स्लॅबच्या कास्टिंगचे काम सुरू आहे.
साबरमती: सर्व नऊ पहिल्या मजल्यावरील स्लॅब पूर्ण झाले आहेत, आणि नऊपैकी तीन कॉन्कोर्स लेव्हल स्लॅब पूर्ण झाले आहेत.
या स्थानकांच्या बांधकामातील जलद प्रगती भारताच्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पातील (Bullet Train) एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे, ज्याने प्रवाश्यांना वर्धित कनेक्टिव्हिटी आणि जागतिक दर्जाच्या सुविधांचे आश्वासन दिले आहे.
JioTag : अनेक लोकांना आपल्या वस्तू वारंवार विसरण्याची सवय असते. खासकरून प्रवासात आपल्याकडून गोष्टी विसरल्या जातात. मात्र अशा लोकांसाठी आता खुशखबर आहे. jio Tag हा छोट्याशा डिव्हाइसच्या मदतीने तुम्ही हरवलेल्या वस्तूंचा सहज शोध घेऊ शकता. नक्की काय आहे हे डिव्हाईस ? ते कसे काम करते ? याची किंमत किती आहे ? चला जाणून घेऊया…
जिओने नुकतेच आपले ब्लूटूथ ट्रॅकिंग डिव्हाइस JioTag भारतात लॉन्च केले आहे. Apple च्या AirTags ला टक्कर देण्यासाठी हे उपकरण आणण्यात आले आहे. JioTag एक लहान, परंतु शक्तिशाली ब्लूटूथ डिव्हाइस आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या वस्तू सहजपणे शोधण्यात मदत करते. कोणत्याही गोष्टीला JioTag संलग्न करू शकतात आणि त्याचे ठिकाण पटकन ट्रॅक करू शकतात. Jio.com च्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्याची किंमत 749 रुपये आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करू शकता.
नक्की काय आहे JioTag ?
जिओ टॅग हे एक लहान पण शक्तिशाली ब्लूटूथ ट्रॅकिंग डिव्हाइस आहे, जे स्मार्टफोन आणि ॲपच्या मदतीने ट्रॅक केले जाऊ शकते. JioTag वापरकर्त्यांना त्यांच्या वस्तू सहज शोधण्यात मदत करते. बॅग, वॉलेट किंवा की चेन असो, वापरकर्ते JioTag कोणत्याही गोष्टीशी संलग्न करू शकतात आणि त्याचे स्थान पटकन ट्रॅक करू शकतात. हा टॅग विविध रंगात उपलब्ध असून त्याचे वजन ९.५ ग्रॅम आहे. ते 20 मीटर घरामध्ये आणि 50 मीटर घराबाहेर उपकरणाचा शोध घेऊ शकते.
हे साधन अशा लोकांसाठी खूप उपयुक्त आहे जे परदेशात प्रवास करतात आणि बर्याचदा वस्तू गमावतात. तसेच तुम्ही तुमच्या आवडत्या पाळीव प्राण्यांवर (कुत्रा, मांजर) वापरू शकता. तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांना टॅग करून त्यांचा मागोवा घेऊ शकता. Jio Tag खरेदी केल्यावर एक दोरी आणि एक्स-रे बॅटरीसह येतो.
कसे करते काम ?
JioTag खरेदीवर एक वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. JioTag JioThings ॲपच्या संयोगाने कार्य करते. तुम्ही ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. यात एक डबल-टॅप वैशिष्ट्य देखील आहे जे ट्रिगर केल्यावर, वापरकर्त्याचा फोन सायलेंट मोडवर सेट केला असला तरीही वाजतो. JioTag वापरकर्त्यांनी वॉलेट, की किंवा इतर आयटम यासारखी टॅग केलेली वस्तू सोडल्यास त्यांना अलर्ट करते. JioTag मध्ये बदलण्यायोग्य बॅटरी आहे. यात ब्लूटूथ सक्षम गमावलेला आणि सापडलेला ट्रॅकर देखील आहे.
Jio Tag बद्दल बोलायचे झाले तर त्याची अचूकता Apple Air Tag पेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा आहे की सध्या ते बाजारात सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम उत्पादन घेऊन आले आहे आणि आगामी काळात ते Apple Air Tag पेक्षा चांगले आणि चांगले काम करेल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सात मतदारसंघ, दिग्गज नेते, दोन वेळा मुख्यमंत्रीपद, आणि काँग्रेसची अनेक राजकीय घराणं ज्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिली तो यवतमाळ जिल्हा… २०१४ च्या मोदी लाटेत मात्र काँग्रेसचा हा बालेकिल्ला भुईसपाट झाला… कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा ते शेतकरी आत्महत्यांचा शाप लागलेला जिल्हा अशी दोन विरुद्ध टोक पाहायला मिळणाऱ्या यवतमाळमध्ये राजकारण बदललं.. पक्ष बदलले.. पण प्रश्न, परिस्थिती तशीच राहीली… बाकी लोकसभेच्या निवडणुकीत यवतामाळनं भिडू बदललाय.. त्यामुळे विधानसभेला पुसद पासून उमरखेड पर्यंत हायव्होल्टेज असणाऱ्या सात विधानसभा मतदारसंघांचा निकाल कसा लागतोय? यवतमाळ जिल्ह्यात यंदा सात आमदार नेमके कोण होतायत.. जिल्ह्याचा कौल कुणाच्या बाजूने जातोय.. त्याचाच हा क्लिअर कट आढावा…
पहिला मतदारसंघ आहे तो वणीचा… वणीचे सध्याचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे संजीव रेड्डी बोदकुलवार… २०१४ च्या मोदी लाटेत बोदकुलनवार यांनी भाजपला या मतदारसंघात त्यांनी पहिल्यांदा कमळ फुलवून दिलं.. २०१ ९ मध्येही काँग्रेसच्या वामनराव कासावार यांना पाणी पाजत बोदकुलनवार यांनी आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवली.. यवतमाळ जिल्ह्यात असणारा हा मतदारसंघ मात्र लोकसभेला चंद्रपूर मतदारसंघात येतो… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला भाजपचा स्टॅडींग आमदार असतानाही वणीतून काँग्रेसच्या धानोरकरांना तब्बल ५० हजारांच्या आसपास लीड मिळालं.. यावरुन येणाऱ्या विधानसभेला वणीत काँग्रेसच्या विजयाचे चान्सेस वाढले असून बोदकुलनवार यांच्यासाठी हा रेड सिग्नल असणारय… एका बाजूला कोळसा तर दुसऱ्या बाजूला कापूस म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट गोल्ड.असूनही या मतदारसंघात सूतगिरणी उद्योग नाही. ज्या सूतगिरण्या सुरु झाल्या, त्या बंद पडल्या आहेत… त्यामुळे रोजगाराच्या, शेतीच्या अवतीभोवती इथली निवडणुक फिरताना यंदा दिसू शकते.. बाकी कुणबी समाज वणीत एक्स फॅक्टर समजला जातो. हा समाज कुणाच्या बाजूने राहतो, यावर इथला निकाल अवलंबून असतो.. सध्यातरी काँग्रेसचे वामनराव कासावार यांच्या विजयाचे चान्सेस वणीत वाढले आहेत..
दुसरा मतदारसंघ पाहुया तो राळेगावचा… आदिवासींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघा काँग्रेसच्या डाॅ. वसंत पुरके यांनी १९९५ मध्ये या मतदारसंघातून विधानसभेची एन्ट्री मिळवली ती कायमचीच.. त्यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सब कुछ पुरके… आणि सब कुछ काँग्रेस… असंच समीकरण चाललं होतं.. पण काँग्रेसचा हा बालेकिल्ला ढासळला तो २०१४ साली… भाजपच्या अशोक उइके यांनी भाजपकडून हा मतदारसंघ स्वत: च्या ताब्यात घेतला.. आणि राळेगावात कमळ फुललं.. छोट्या-मोठ्या गावात त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि आपुलकीची भाषा यामुळे राळेगावात उइकेंचं राजकीय वजन वाढलं… त्याच्याच जीवावर त्यांनी २०१९ लाही वसंत पुरकेंना मात देत उइकेंनी आपला गुलाल कायम ठेवला.. त्यामुळे मतदारसंघात भाजपची पाळंमुळं चांगली घट्ट रुजली गेलीयेत.. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला राळेगावमध्ये मशालीला लीड मिळाल्यानं उइकेंची आमदारकी रेड झोनमध्ये गेलीय.. यंदाही पुरके वर्सेस उइके अशी कडवी लढत राळेगावात पाहायला मिळणार आहे..
तिसरा मतदारसंघ येतो तो यवतमाळचा… यवतमाळ विधानसभेचा इतिहास बघता 1962 झाली जांबुवंतराव धोटे हे या मतदारसंघाचे पहिले आमदार… त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची जी मागणी लावून धरली होती, त्याचा सेंटर पाँइंट हा मतदारसंघच राहीला… 2004 साली भाजपचे मदन येरावार हे या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 2009 साली पुन्हा काँग्रेसने बाजी मारली. त्यावेळी काँग्रेसचे निलेश पारवेकर यांनी विधानसभेचे मैदान काबीज केलं. पारवेकर यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली त्या 2013 च्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नंदिनी निलेश पारवेकर यांनी मदन येरावार यांचा पराभव केला. त्या यवतमाळ विधानसभेच्या महिला आमदार झाल्या. त्यानंतर यवतमाळचे राजकीय वातावरण पुन्हा बदललं आणि 2014 मध्ये भाजपच्या मदन येरावार यांनी अटीतटीच्या लढतीत आमदारकी पुन्हा आपल्या ताब्यात घेतली.. भाजपच्या पहिल्या कार्यकाळात येरावार यांना मंत्रीपद मिळालं… २०१९ ला पुन्हा एकदा येरावार यांनीच निवडणुक जिंकली असली तरी काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांचा अतिशय निसटत्या मतांनी या निवडणुकीत पराभव झाला होता… त्यात या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या पारड्यात पडलेलं लीड पाहता इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच होऊ शकतो.. विद्यमान आमदार येरावार यांच्याविरोधातील एन्टीइन्कबन्सी.. आणि लोकसभेला बॅकफुटला गेलीली मतं पाहता काँग्रेसकडून मांगुळकर तर शरद पवार गटाकडून विधान परिषदेचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी दंड थोपाटले आहेत… स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार आघाडीकडून बाजोरिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन तेच विजयाचा गुलाल लावतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय..
चौथा मतदारसंघ दिग्रसचा… शिवसेनेचे संजय राठोड यांचा दिग्रस हा एकहाती बालेकिल्ला… २००४ ला माणिकराव ठाकरेंचा तर २००९ ला तेव्हाच्या काँग्रेसमधील संजय देशमुखांचा मोठ्या लीडने पराभव करत ते आमदार झाले.. हाच सिलसीला २०१४, २०१९ लाही कायम ठेवत दिग्रसमध्ये सब कुछ राठोड अशी परिस्थिती निर्माण झाली… त्यांची मतदारसंघातील लोकप्रियता, जनसंपर्क आणि इजी टू एक्सिस असणं या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्यांना सध्यातरी कडवी फाइट देईल, असा विरोधकच राहीलेला नाहीये… बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं… 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली… पण पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण… त्यावरुन मंत्रीपदाचा राजीनामा… मीडियामध्ये झालेली बदनामी… आणि शिवसेना फुटीत घेतलेला सहभाग या सगळ्यात राठोडांच्या इमेजला पुरते धक्के बसले… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघातूनही त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी लीड मिळवून देता आलं नाही… सध्या संजय देशमुख खासदार आहेत.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला दिग्रसधून महाविकास आघाडीकडून अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.. माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र राहुल ठाकरे यांना राठोडांच्या विरोधात मविआकडून उमेदवारी मिळण्याचे चान्सेस आहेत, पण मतदारसंघातील बंजारा समाजाचं हक्काचं मतदान राठोडांच्या पाठिशी राहत असल्यामुळे त्यांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी आघाडीला इथली स्थानिक जातीय समीकरण पाहून उमेदवारी देण्याचा विचार करावा लागणार आहे, एवढं मात्र नक्की…
पाचवा मतदारसंघ येतो तो पुसदचा… माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक या पुसदच्या दोन सुपुत्रांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या नेतृत्वात राज्याने हरितक्रांती तसेच जलसंधारणच्या माध्यमातून विकासाची पावलं टाकली… याच नाईक घराणं आणि पुसदकरांची अशी एक राजकीय नाळ जुळली ती कधीच तुटता तुटली नाही… राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर नाईकांनी घड्याळ हाती बांधल्यानंतर पुसदचं राजकारण काँग्रेस टू राष्ट्रवादी असं शिफ्ट झालं… 2004, 2009 आणि 2014 या वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने मनोहर नाईक यांना भक्कम पाठिंबा दिला. आघाडी सरकार मध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा सांभाळलं… मात्र वर्चस्वाच्या लढाईतून काकांना म्हणजे मनोहर नाईकांना निलय नाईक यांनी राजकीय आव्हान दिलं.. भाजपात जाऊन काकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या.. पण मनोहर नाईकांनी मतदारसंघावरची आपली आणि राष्ट्रवादीची पकड तसूभरही कमी होऊ दिली नाही… पण २०१९ च्या निवडणुकीत राजकारण तिसऱ्या पिढीपर्यंत येऊन पोहचलं.. भाजपकडून निलय नाईक तर राष्ट्रवादीकडून मनोहर नाईकांचे सुपुत्र इंद्रनिल निवडणुकीच्या रिंगणात उतरले… पण इंद्रनिल नाईकांनी पहिल्या निवडणुकीत दणक्यात विजय मिळवून पुसदमधील राष्ट्रवादीची ताकद सगळ्यांना दाखवून दिली.. पण महाराष्ट्राच्या राजकारणात एकामागून एक ट्विस्ट मागच्या दोन वर्षात बघायला मिळाले.. अर्थात त्याचे धक्के नाईक कुटूंबापर्यंत जाऊन पोहचले… राष्ट्रवादीच्या फुटीत मनोहर नाईक यांच्या घरातही उभी फूट पडली विद्यमान आमदार इंद्रनिल नाईक यांनी अजितदादा गटाची वाट धरली.. पण या निर्णयाने नाराज होत त्यांचे सख्खे बंधू ययाती नाईक यांनी शरद पवारांसोबतच राहणं पसंद करुन विधानसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवलीय.. त्यामुळे २०१९ ला चुलत भावांच्यात बघायला मिळालेली निवडणुक आणखीन काट्याची होत दोन सख्ख्या भावांच्यात पाहायला मिळेल.. निलय नाईक यांना विधानपरिषदेवर घेतल्यानं इंद्रनिल विरुद्ध ययाती हा पुसदमधील सर्वात हायव्होल्टेज निवडणुक मतदारांना पाहायला मिळणार आहे… नाईक कुटूंबाच्या वर्चस्वाच्या लढाईसोबत मतदारसंघातील जनता कोणत्या राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे? याचा फैसलाही या मतदारसंघातून होणार असल्यानं दोन्ह पवार पुसदच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतील, एवढ मात्र नक्की…
सहावा मतदारसंघ येतो तो उमरखेडचा… यवतमाळ जिल्ह्यातला असणारा हा मतदारसंघ लोकसभेला मात्र हिंगोलीत येतो… विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रादेशिक विभागांना जोडणाऱ्या या मतदारसंघाची खासीयत म्हणजे मागील ५० वर्षात मतदारसंघात एकदा निवडून आलेला आमदार पुन्हा रिपीट झालेला नाहीये.. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले त्यावेळी भाजपचे राजेंद्र नजरधने यांनी काँग्रेसच्या विजय खडसे यांचा पराभव केला… तर 2019 मध्ये काँगेसच्या विजय खडसे यांचा पराभव करत नामदेव ससाणे सध्या विद्यमान आमदार आहेत… स्वच्छ भारत मिशन घोटाळ्याचा आरोप, मराठा समाजाकडून होणारा विरोध पाहता यंदाही भाजप चेहरा बदलीचा कार्यक्रम उमरखेड मध्ये करणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे… बाकी महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेलं उमरखेड मधील लीड पाहता यंदा भाजपची या मतदारसंघातील आमदारकी सध्या तरी रेड झोन मध्ये दिसतेय…
सातवा आणि शेवटचा मतदारसंघ आर्णी…भाजपचे संदीप धुर्वे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार… 2019 मध्ये भाजपने स्टॅंडिंग आमदार राजू तोडसाम यांना आमदारकीचं तिकीट नाकारलं होतं… त्यांचे वायरल झालेले अनेक व्हिडिओ, त्यांच्या दोन बायकांमध्ये झालेली हातापायी आणि इतर आरोप ही भाजपसाठी निवडणुकीत डोकेदुखी ठरली असती… म्हणूनच माजी आमदार असणाऱ्या संदीप धुर्वे यांना तिकीट देऊन त्यांना भाजपने विद्यमान आमदार बनवलं… मागच्या दोन्ही टर्मला केळापूर आर्णी मतदारसंघातून भाजपच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी लढत दिली… पण त्यांना पराभवाचा धक्का बसत भाजपने आपला गड शाबूत राखला… त्यामुळे यंदा तरी मोघेंना भाजपला नमवत आमदार होता येईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) आज आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे. या बँकेने त्यांच्या मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्सवरील कर्जाच्या दरांमध्ये (MCLR) मध्ये 10 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. ही वाढ आता काही ठराविक टेन्योरच्या एमसीएलआरवर लागू असणार आहे. महत्वाचे म्हणजे, आजपासून बँकेने कर्जदरात वाढ केल्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि MCLR शी संबंधित इतर कर्जांचा EMI वाढणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने आपल्या MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स) मध्ये बदल केले आहेत. या बदलाअंतर्गत, MCLR हा 5 ते 10 अंकांनी वाढवण्यात आला आहे. याचाच अर्थ MCLR 0.05 टक्क्यांवरून 0.10 टक्के झाला आहे. SBI ने MCLR मध्ये वाढ केल्यामुळे विविध कर्ज उत्पादने महाग होणार आहेत. यामुळे लाखो ग्राहकांवर व्याजाचा बोजा वाढेल. तसेच त्यांना जास्त ईएमआय भरावा लागेल.
दरम्यान, SBI ने एका महिन्याच्या MCLR बेंचमार्कवर आधारित व्याजदर 5 बेस पॉईंट्सनी 8.35 टक्क्यांनी वाढवला आहे. तर 3 महिन्यांच्या MCLR बेंचमार्कवर आधारित व्याजदर 10 बेस पॉइंट्सने 8.40 टक्क्यांनी वाढवला आहे. याशिवाय 6 महिने, एक वर्ष आणि 2 वर्षांसाठी MCLR वर आधारित व्याजदरातही प्रत्येकी 10 बेस पॉईंटने वाढ केली आहे. या वाढीनंतर 6 महिन्यांसाठी MCLR वर आधारित व्याजदर 8.75 टक्के एका वर्षासाठी 8.85 टक्के आणि 2 वर्षांसाठी 8.95 टक्के झाला आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल रिचार्जनंतर आता ऑनलाईन पद्धतीने जेवण खाणे सुद्धा महागले आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्स Zomato आणि Swiggy ने त्यांच्या दरात 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. स्वतःच पोट भरणेही आता खिशाला परवडणार राहिलेलं नाही. परंतु हे वाढलेले शुल्क फक्त दिल्ली आणि बंगलोर या २ शहरातच पाहायला मिळेल. इतर ठिकाणी मात्र आधीचे शुल्कच लागू होतील.
कसे आहेत नवे शुल्क?
झोमॅटो आणि स्विगी वापरकर्त्यांकडून दिल्ली आणि बंगलोरमधील प्रत्येक ऑर्डरवर 6 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क आकारले जाईल. यापूर्वी हेच शुल्क 5 रुपये होते. खरं तर या दोन दोन्ही लोकप्रिय ऑनलाइन फूड ऑर्डरिंग कंपन्यांनी मागील वर्षी प्लॅटफॉर्म फी सुरू केली होती. सुरुवातीला कंपन्यांनी फक्त प्रति ऑर्डर 2 रुपये शुल्क ठेवले होते मात्र वर्षभरातच टप्प्याटप्याने हा शुल्क त्यांनी 6 रुपयापर्यंत नेला आहे. फूड ऑर्डरिंग क्षेत्रावर झोमॅटो आणि स्वीगी या दोनच कंपन्यांचा वरचष्मा आहे. मार्केटमधील एकूण हिस्स्यांपैकी झोमॅटोचा वाटा 55 टक्के आहे तर स्विगीचा वाटा 44 टक्के आहे. म्हणजेच काय तर एकूण मार्केटपैकी या दोन्ही कंपन्यांचा वाटा 99 टक्के आहे.
यापूर्वी सुद्धा स्विगी आणि झोमॅटोने अनेक वेळा दर वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला, स्विगी आणि झोमॅटोने निवडक वापरकर्त्यांसाठी प्लॅटफॉर्म शुल्क 10 रुपये वाढवले होते, जे 3 रुपयांपेक्षा खूप जास्त आहे. तथापि, वापरकर्त्यांकडून कधीही 10 रुपये आकारले गेले नाहीत. वापरकर्त्यांना 10 रुपये शुल्क दाखवण्यात आले होते, परंतु सवलतीनंतर 5 रुपये आकारण्यात आले. एप्रिलच्या सुरुवातीला, स्विगी आणि झोमॅटोने काही बाजारपेठांमध्ये प्रति ऑर्डर 4 रुपये ते 5 रुपये शुल्क वाढवले होते. त्यामुळे सातत्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आली आहे.
Travel : तुम्हाला अनेकदा परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असेल. मात्र बऱ्याचदा व्हिसा मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पण तुम्हाला माहित आहे का ? जगभरातल्या काही देशांमध्ये जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची आवश्यकता नाही. तुम्ही व्हिजा शिवाय येथे (Travel ) जाऊ शकता. येथील प्रदेश फिरू शकता. चला तर मग जाणून घेऊया हे देश कोणते आहेत ?
भारत जगभरातील पासपोर्टच्या यादीत 80 व्या स्थानावर पोहोचला आहे आणि आता भारतीय नागरिक व्हिसाशिवाय जगातील 62 देशांमध्ये प्रवेश करू शकतात. हेन्ले पासपोर्ट इंडेक्स, 2024 च्या नवीन अहवालानुसार, भारतीय पासपोर्टची शाखा वाढली आहे आणि आता यामुळे, भारतीयांना जगातील 62 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळणार आहे. आजच्या लेखात आपण अशा १० देशांच्या (Travel ) बाबतीत जाणून घेणार आहोत.
भूतान (Travel )
भारताच्या शेजारचा देश म्हणजे भूतान. भारतीयांना इथे जाण्यासाठी व्हिसाची गरज भासत नाही. 14 दिवसांपर्यंत तुम्ही इथे बिना व्हिजा राहू शकता. येथील प्रदेश अतिशय सुंदर आहे. या देशाला ‘लँड ऑफ द थंडर ड्रायव्हर’ असं म्हटलं जातं. इथले अनेक बर्फाच्छादित डोंगर आणि सुंदर असे नैसर्गिक प्रदेश तुम्हाला पाहायला मिळतील.
नेपाळ
जिथे जगातला सर्वात उंच असा एव्हरेस्ट आहे तो देश म्हणजे भारताचा शेजारी नेपाळ. जर तुम्ही नेचर लवर आणि एडवेंचर लवर असाल तर तुम्ही या ठिकाणाला अवश्य भेट देऊ शकता. इथे अनेक प्राचीन अशी मंदिरे देखील आहेत. भारतीयांना इथे भेट (Travel ) देण्यासाठी व्हिसाची गरज लागत नाही.
मॉरिशस (Travel )
मॉरिशसला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज भासत नाही. सुंदर बीच, अतिशय स्वच्छ पाणी आणि सुंदर लोकेशन्स नी मॉरिशस परिपूर्ण आहे. सोलो ट्रिप किंवा ग्रुप ट्रिप साठी देखील हा एक उत्तम प्लॅन असू शकतो. भारतीय नागरिक 90 दिवसांसाठी बिना व्हिजा मॉरिशस मध्ये राहू शकतात.
केनिया
एक जानेवारी 2024 रोजी केनिया देशाने टुरिझम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय पासपोर्ट होल्डर साठी विजा फ्री ट्रायल करण्याची घोषणा केली होती. येथे तुम्ही 50 पेक्षा जास्त नॅशनल पार्क ना भेट देऊ शकता. 90 दिवसांसाठी भारतीयांना इथे व्हिसा फ्री (Travel ) देण्यात आला आहे.
थायलंड
सर्वात सुंदर आशियाई देशांपैकी एक देश म्हणजे थायलंड. जगभरातून अनेक पर्यटक इथे दरवर्षी भेट देत असतात. सुंदर बीचेस, स्वादिष्ट जेवण आणि परिपूर्ण संस्कृती यासाठी थायलंड प्रसिद्ध आहे. हे एक परिपूर्ण ट्रॅव्हल डेस्टिनेशन मानलं जातं. ताज्या (Travel ) मिळालेल्या माहितीनुसार 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत थायलंडमध्ये भारतीयांसाठी विजा फ्री एन्ट्री आहे.
डोमिनिका (Travel )
या ठिकाणी तुम्ही सहा महिने व्हिसा शिवाय राहू शकता. एक सुंदर असे बेट असून इथं Morne Trois Pitons National Park सुद्धा आहे. याशिवाय इथं तुम्ही ज्वालामुखी सुद्धा पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला यावर्षी परदेशी टूर करायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
कतार
मिडल इस्ट देशांमध्ये सगळ्यात दमदार इन्फ्रास्ट्रक्चर असलेला देश म्हणजे कतार. कतारची राजधानी दोहा जगभर प्रसिद्ध आहे. इथल्या गगनचुंबी इमारती तुम्हाला नक्कीच आकर्षित करू शकतील. याशिवाय 2022 मध्ये फिफा वर्ल्ड कप फुटबॉल च (Travel )आयोजन सुद्धा इथे करण्यात आलं होतं भारतीय लोक इथे 30 दिवसांपर्यंत व्हिसा शिवाय राहू शकतात.
श्रीलंका (Travel )
भारताच्या जवळचा देश असलेला श्रीलंका जिथे तुम्ही व्हिसाशिवाय जाऊ शकता. भारत आणि श्रीलंकेचा एक ऐतिहासिक नातं आहे.
सेशेल्स
सुंदर बीचेस अंडरवॉटर स्पोर्ट्स सुंदर असे समुद्र खालील जग तुम्हाला पाहायचे असेल तर हा देश परफेक्ट आहे. तसे (Travel ) पाहायला गेल्यास इथे अतिशय शांत असा माहोल असतो भारतीय लोकांसाठी 30 दिवसांपर्यंत इथे व्हिसा फ्री ठेवण्यात आला आहे.
Bussiness Idea | ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असतो. परंतु शेतीला जोडून अनेक जोड व्यवसाय केले जाते. त्यातील पशुपालन हा एक प्रमुख व्यवसाय आहे. पशुपालन करताना जनावरांच्या खाद्याला खूप जास्त पैसे लागतात. पशुपालनाच्या व्यवसायात जेवढा खर्च असतो, त्यातील 70 टक्के खर्च हा फक्त त्यांच्या चाऱ्यावर निघून जातो. त्यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सहसा परवडत नाही.
त्याचप्रमाणे कधीकधी जनावरांना चांगल्या दर्जाचा चारा देखील मिळत नाही. याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि अर्थातच दूध उत्पादनावर होतो. त्यामुळे जर जनावरांचे दूध उत्पादन चांगले पाहिजे असेल, तर त्यांच्यासाठी चांगला आणि संतुलित चारा असणे खूप गरजेचे आहे. यासाठी आता अनेक लोक हा पशुखाद्याचा व्यवसाय देखील चालू करत आहेत.
पशुखाद्य निर्मिती व्यवसायामध्ये काय महत्त्वाचे? | Bussiness Idea
पशुखाद्य निर्मिती व्यवसायामध्ये देखील तुम्हाला चांगले नियोजन करणे गरजेचे असते. यामध्ये कच्च्या मालापासून लागणारी सामग्री आवश्यक असणारे मजूर वाहतुकीचे साधन यांसारख्या गोष्टींचा पुरवठा असणे गरजेचे आहे. तसेच ही यंत्रसामग्री तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी विजेचे देखील गरज असते. त्यामुळे विजेची तुम्हाला सोय करावी लागते. त्या विजेवरही तुमचा खूप जास्त खर्च होतो.
जर तुम्हाला हा खर्च वाचवायचा असेल, तर तुम्ही सोलार पॅनलच्या माध्यमातून देखील हा खर्च वाचू शकता. या पशुखाद्याची साठवण करण्यासाठी तुम्हाला जवळपास 2000 ते 2500 चौरस फूट जागेची गरज असते. या जागे पैकी 1000 ते 1500 चौरस फूट जागा ही यंत्रांना लागते. तर उरलेली 900 ते 1000 फूट जागा ही कच्चामाल ठेवण्यासाठी लागते. यामध्ये तुम तुम्ही तांदूळ, गहू, हरभरा, मका, सोयाबीन यांसारखा कच्चामाल शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकता तुम्हाला स्वस्त दरामध्ये हा माल मिळेल. त्याच प्रमाणे या व्यवसायांमध्ये (Bussiness Idea) तुम्हाला हा चारा विकण्यासाठी वाहतूक लागते. त्याचप्रमाणे वीज पशुखाद्य पॅकिंग करण्यासाठी देखील खर्च लागतो.
भांडवल किती लागेल?
तुम्हाला जर एखादे पशुखाद्य निर्मिती युनिट सुरू करायचे असेल, तर तुम्हाला 10 ते 20 लाख रुपये खर्च येतो. परंतु आता केंद्र सरकारच्या माइक्रो फूड इंडस्ट्रीज अपग्रेटेड या योजनेच्या माध्यमातून पशुखाद्य तयार करण्याच्या युनिट स्थापन करण्यासाठी तुम्हाला 35 टक्याचे अनुदान देखील मिळते. हे पशुखाद्य विकण्यासाठी तुम्हाला जीएसटी नोंदणी करणे गरजेचे आहे. तुमचे तयार झालेले पशुखाद्य एखादा ब्रँड नावाने विकत असाल, तर तुम्हाला ट्रेडमार्क आणि त्यासोबत आयएसआय स्टॅंडर्ड नुसार बीआयएस प्रमाणपत्र घ्यावे लागते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोल्हापूरमधील विशाळगड (Vishalgad) परिसरात झालेल्या अतिक्रमणाविरोधात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. यामुळे त्यांच्यासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी काही अज्ञातांनी विशाळगड येथील अतिक्रमणांविरोधात परिसरात तोडफोड केली होती. यामुळे तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली. याप्रकरणीच पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काहींना अटकही करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे यांनी पुढाकार घेत रविवारी ‘चलो विशाळगडचा नारा’ दिला होता. रविवारी त्यांच्यासह अनेक शिवभक्त विशाळगडावर गेले होते. याच दरम्यान काही अज्ञातांनी येऊन गावांमध्ये धुडगूस घातला. तसेच स्थानिकांवर हल्लाही केला. एवढेच करून न थांबता घरांची, वाहनांची तोडफोड केली. यात अज्ञातांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत अनेक गावकरी जखमी झाले. ज्यामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला.
या सर्व घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनेकांना ताब्यात घेतले. तसेच, अनेकांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर संभाजींनराजेंनी आज शाहूवाडी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांसोबत चर्चा केली. पुढे घडलेल्या प्रकारानंतर संभाजींनराजेंनी x वर पोस्ट करत म्हणले की, “काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा.”
काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी…
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 15, 2024