हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली बॉम्बस्फोटाबाबत (Delhi Blast) नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणांमधील सूत्रांनुसार, या दहशतवादी कटाचा सूत्रधार डॉ. उमर होता, ज्याने एकट्याने हा स्फोट घडवून आणला आणि डिसेंबरमध्ये २६/११ च्या मुंबई हल्ल्यांप्रमाणेच देशाच्या राजधानीत दहशत माजवण्याचा हेतू होता. मात्र हे प्रकरण फक्त एवढ्यापुरतच मर्यादित नाही. कारण लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या काही तास आधी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. ज्यामध्ये तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करण्यात आली. या हल्ल्याचा कट मागील काही दिवसांपासून रचला जात होता.
जैश कडून फंडिंग – Delhi Blast
कोणताही दहशतवादी हल्ला करायचं म्हंटल कि त्यासाठी पैशाची गरज हि लागतेच. मग स्फोटके बनवणे असो वा रेकी करणं असो, फंड असल्याशिवाय इतकी मोठी कामे होत नाहीत. अशावेळी हे डॉक्टर दहशतवादी सापडले त्यांना पैसे कोणी पुरवले याचा तपास यंत्रणांनी केला. यावेळी काही धक्कादायक माहिती समोर आली. डॉ. शाहीन सईद ही थेट जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरच्या संपर्कात होती. तिला जैश या दहशतवादी संघटनेकडून फंड मिळत होता.
दहशतवाद्यांचा तुर्की प्रवास –
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तपासात असे दिसून आले आहे की मुख्य आरोपी डॉ. उमर आणि त्याचा सहकारी डॉ. मुझम्मिल गनई यांनी अलीकडेच तुर्कीला प्रवास केला होता. त्यांच्या पासपोर्टमध्ये तुर्कीहून इमिग्रेशन स्टॅम्प सापडले होते. आरोपींनी आयईडी (इम्प्रूव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसेस) बनवण्यासाठी २० क्विंटलपेक्षा जास्त एनपीके (नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम) खत खरेदी केले. डॉ. उमर आणि इतर सहकाऱ्यांनी संयुक्तपणे या कटासाठी २० लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा केली. Delhi Blast
दरम्यान, अटक केलेल्या आठ संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मॉड्यूलने दिल्लीतील चार महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती. लाल किल्ला, इंडिया गेट, कॉन्स्टिट्यूशन क्लब आणि गौरी शंकर मंदिर याठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता.










