Monday, December 22, 2025
Home Blog Page 606

वास्तववादी अर्थसंकल्प मांडा, कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर! ‘कॅग’ कडून राज्य सरकारवर ताशेरे

CAG On State Government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महायुती सरकारने अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करत जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला. मात्र महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (Comptroller and Auditor General of India) (कॅग) राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यावरील कर्जाचा बोजा ८ लाख कोटींवर गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांच्या गरजा आणि वाटप केलेल्या संसाधनांचा वापर करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेऊन वास्तववादी अर्थसंकल्प तयार केला पाहिजे, असा सल्लाही कॅगने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

पुरवणी मागण्या, विनियोग तसेच पुनर्विनियोग पुरेशा औचित्याशिवाय प्राप्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अखर्चित राहिल्याबद्दलही अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एकूण तरतुदीपैकी 18.19 टक्के निधी वापरात नाही. वर्षभरात झालेला एकूण खर्च मूळ अर्थसंकल्पापेक्षा सहा टक्के कमी होता आणि पुरवणी अर्थसंकल्प मूळ अर्थसंकल्पाच्या 15 टक्के होता,” असे अहवालात नमूद केले आहे. या अहवालात राज्याच्या जमा आणि खर्चातील तफावत लक्षात घेता महसूली तूट दिसून आली आहे. त्याचवेळी उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याची शिफारश करण्यात आली आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर गेला आहे. कर्जाचे हे प्रमाण राजकोषीय कायद्यातील तरतुदीनुसार 18.14 टक्के अपेक्षित आहे. हे प्रमाण वाढलं आहे. यापूर्वी घेतलेला कर्ज आता फेडावे लागणार आहे. यातूनच सरकारच्या तिजोरीवर अधिक बोजा वाढणार आहे असं कॅगने निदर्शनास माणूस दिले आहे.

दरम्यान, कॅगने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. जयंत पाटील यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल कि, माझ्या अर्थसंकल्पीय चर्चेतील भाषणात मी राज्यात मालमत्ता निर्मिती (Asset creation) होत नसल्याबद्दल राज्याचे लक्ष वेधले होते. नेमकी तीच बाब देशातील सर्वोच्च घटनात्मक यंत्रणा असलेल्या ‘कॅग’ च्या अहवालात मांडली गेली आहे. या भाषणात मी असेही नमूद केले होते की राज्य सरकार बेदरकार पद्धतीने उधळपट्टी करत असून हा अर्थसंकल्प वास्तवापासून दूर आहे, अगदी तेच निरीक्षण महालेखापरीक्षकांनी नोंदवले असून ‘अर्थसंकल्प वास्तववादी असावा’ अशी सूचना केली आहे. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे.

राज्य सरकार वाटत असलेली अनावश्यक अनुदाने कमी करावीत, मालमत्ता निर्मितीकडे लक्ष पुरवावे, वाढीव पुरवणी मागण्या सादर करताना त्याचे समर्थन करता यावे आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यात खर्च करण्याची पध्दत थांबवावी, अशा कडक शब्दांत कॅगने शिंदे -फडणवीस- पवार सरकारला सुनावले आहे. पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल पण वाडवडिलांनी कष्टाने कमावलेले सर्व फुकुन टाकून फक्त आजच्या दिवशी कशी मौजमजा करता येईल, असाच सध्याच्या राज्यकर्त्यांचा राज्य चालवतानाचा दृष्टिकोन आहे असं ट्विट करत जयंत पाटील यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

बँक ऑफ बडोदाअंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; या तारखेपर्यंत करावा लागेल अर्ज

bank of baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कारण, ज्या तरुणांना बँकेमध्ये नोकरी (Bank Job) करायची आहे अशा तरुणांना बँक ऑफ बडोदा आपल्यासोबत काम करण्याचे संधी देणार आहे. यासाठीच बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीचे अधिसूचना काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे हा अर्ज कसा भरायचा? त्याची अंतिम तारीख आहे? याविषयी जाणून घ्या.

अर्जाची अंतिम तारीख

बँक ऑफ बडोदा मध्ये 160 पेक्षा अधिक जागांसाठी तरुणांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी केली जाईल. ज्यामध्ये रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट ॲनालिस्ट, सीनियर मॅनेजर आणि इतर विविध पदांचा समावेश असेल. महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना सहाशे रुपये फी भरावी लागणार आहे. परंतु प्रवर्गातील उमेदवारांना फीमध्ये सूट देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम तारीख 12 जुलै आहे. या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचे अंतिम तारीख यापूर्वी दोन जुलै होती. परंतु आता या तारखेत वाढ करून ती 12 जुलै करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या तरुणांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी bankofbaroda.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. तसेच अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचून घ्याव्यात. यानंतरच हा अर्ज भरून टाकावा.

माझी लाडकी बहीण योजनेनं महाविकास आघाडी धोक्यात आलीय??

mazi ladki bahin yojana

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : लोकसभा निवडणुक झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल असल्याचं बोललं गेलं.. पण महायुतीनं एक मास्टर स्ट्रोक खेळत हे सगळं वारं आपल्या बाजूने फिरवून घेतलं… त्याला कारण ठरली ती एक योजना ती म्हणजे लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) … जेव्हा या योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हापासून ही योजना वाऱ्यासारखी दुर्गम भागात, खेडोपाडी जाऊन पोहचली… सरकारी कार्यालयात, इ सेवा केंद्रात महिलांच्या रांगा लागल्या.. गर्दी झाली.. कागदपत्रांसाठी लयलूट केल्याची बातमीही आली.. विरोधकांच्या टीकांकडे दुर्लक्ष करत सरकारनं नियम – अटी शिथील करत योजनेची अंमलबजावणी करण्याची प्रक्रीया साधी सोपी आणि सर्वसमावेशक केली… पण या योजनेचा इम्पॅक्ट येणाऱ्या राजकारणावर कसा पडेल? लाडकी बहीण योजनेला माता भगिनींचा इतका चांगला रिस्पाॅन्स कसा मिळतोय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभेला या योजनेमुळं शिंदे – फडणवीस – अजितदादा प्लसमध्ये राहू शकतात का? तेच पाहूयात

महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसंच, राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10 टक्के आणि स्त्रियांची टक्केवारी 28.70 टक्के इतकी आहे.’ महाराष्ट्राच्या विधानसभेत नुकत्याच सादर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या शासनिर्णयाची सुरुवातच या वाक्यापासून होते. ‘पुरोगामी राज्य’ अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांच्या परिस्थितीची कबुली दस्तरखुद्द सरकारनेच या आदेशात दिलेली आढळून येते. 28 जून 2024 रोजी राज्याचा अर्थसंकल्पातून या योजनेची घोषणा करताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, महिलांची ही परिस्थिती सुधारण्यासाठीच आम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लागू करत आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, तरुणवर्ग, अल्पसंख्यक समुदायासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली. मात्र, लक्षवेधी योजना ठरली ती ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना…

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून या योजनेचा भरभरून प्रचार करण्यात आला… या योजनेनुसार, राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्याचं सांगितलं जातंय. 26 जानेवारी 2023 पासून मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारने ‘लाडली बहना योजना’ सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1 हजार रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि पर्यायाने शिवराज सिंग चौहान लाडली बहना योजनेचा फायदा झाल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं… अगदी याचप्रमाणे लाडक्या बहीण योजनेतून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार मार्फत दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आलंय…

थोडक्यात हा निर्णय एतिहासिक म्हणावा लागेल.. त्यातल्या त्यात योजनेची अंमलबजावणी करताना येणारी अडचण पाहता महायुती सरकारने लाडली बहीण योजनेच्या अटी शर्ती आणखीनच शिथिल केल्या आहेत. आता domicile चा दाखला नसल्यास जूने रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जन्म दाखला अशी अनेक कागदपत्रे देता येतात. जमीन मालकीच्या अटी सुद्धा काढून टाकण्यात आलेल्या आहेत… योजनेला जास्तीत जास्त सर्वसमावेशक करण्यासाठी हे सगळे प्रयत्न करण्यात आले… या योजनेला मिळणारा पॉझिटीव्ह रिस्पाॅन्स पाहता येणाऱ्या विधानसभेला महायुतीला ही योजना प्लसमध्ये घेऊन जाणारी ठरेल, एवढं मात्र नक्की..

विरोधाच्या अनेक बाजू असल्या तरी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याचा व्यापक विचार डोळ्यासमोर ठेऊन शासनानं घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक केलंच पाहीजे.. फक्त या योजनेचं पिल्लू सोडृन चालणार नाही.. तर ती योजना तडीस नेणं.. त्याची अंमलबजावणी पारदर्शकपणे करण्याची जबाबदारीही सरकारवर असणार आहे… मध्यप्रदेशमध्ये सेम टू सेम या योजनेमुळे भाजपला मोठा फायदा झाला.. पक्ष सत्तेत आला.. त्यामुळे या लाडक्या बहीण योजनेचा फायदा येणाऱ्या काळात महायुतीला मिळणार असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकही सांगतायत.. महिलांचा सन्मान करणारं सरकार या बॉटमलाईन खाली येणाऱ्या विधानसभेला महायुती प्रचार करण्याचे जान्सेस जास्त आहेत.. त्यामुळे आता त्याला काऊंटर करण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे.. बाकी ज्या उद्देशासाठी म्हणजेच महिलांचं आरोग्य आणि आर्थिक स्वातंत्र यासाठी योजना सुरु करण्यात आलीय, तो परपज पूर्ण होईल का? लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा एकदा सत्तेच्या खुर्चीत बसवणारा एक्स फॅक्टर ठरेल का? तुम्हाला काय वाटतं? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…

सरकार पीएम किसान योजनेच्या रकमेत करणार वाढ?? देशातील शेतकऱ्यांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष

pm kisan yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 22 जुलै ते 12 ऑगस्ट 2024 दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरू होणार आहे. यामध्ये 23 जुलै रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे मोदी सरकार या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या घोषणा करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या अर्थसंकल्पातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) रकमेत वाढ करण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या संपूर्ण देशभरामध्ये पीएम किसान योजनेचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत. सध्या या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत केली जात आहे. परंतु आता सरकार ही रक्कम सहा हजारवरून 8 हजार करेल, असे म्हटले जात आहे. कारण या योजनेच्या रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सतत शेतकऱ्यांकडून देखील करण्यात येत आहे. त्यामुळेच या मागणीला विचारात घेऊन केंद्र सरकार रकमेत वाढ करण्याचा विचार करत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील जून महिन्यामध्ये किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी केला होता. या या हप्त्यात सरकारने देशातील लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली होती. सध्या देशातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे रकमेत वाढ करण्याबाबत सरकार देखील विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच सध्या सर्वांचे लक्ष 23 जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.

पंढरपूरमध्ये धक्कादायक प्रकार!! अंगणवाडीतील पोषण आहारात आढळले मेलेले बेडूक

Pandharpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंढरपूरच्या (Pandharpur) एका शाळेमध्ये अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक प्रकार घडला आहे. येथील एका शाळेतील पोषण आहारामध्ये बेडकाचे पिल्लू सापडले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर टीका केली जात आहे. तर पालकांकडून घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. महत्वाचे म्हणजे या घटनेतून मुलांच्या जीवाशी शासनाचा खेळ सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरमधील कासेगाव येथील भुसेनगरच्या अंगणवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंगणवाडी शाळेमध्ये मुलांना पोषण आहार वाटप करत असताना पोषण आहाराच्या पातील्यामध्ये बेडकाचे मृत पिल्लू सापडले. यानंतर अंगणवाडीमध्ये चांगलाच गोंधळाला उडाला. सध्या सोशल मीडियावर देखील या घटनेचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांकडून घडलेल्या प्रकाराबाबत चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मुलांना वाटण्याचा येणाऱ्या पोषण आहारामध्ये एखादा प्राणी आढळण्याची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये विद्यापीठातील होस्टेलच्या मेसमध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या चटणीत जिवंत उंदीर सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना ताजी असतानाच आता पंढरपूरमध्ये पोषण आहारात मेलेले बेडूक सापडले आहे. या कारणामुळे आता शालेय पोषण आहार योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

IRCTC : रेल्वेने आणली आहे केवळ 40 हजारात केरळ पाहण्याची संधी

IRCTC : जर आपण भारतातल्या पर्यटन स्थळांच्या बद्दल बोललो तर या यादीत केरळचा नक्कीच समावेश आहे. नैसर्गिक सौंदर्याने भरलेले केरळ हे केवळ हनिमून जोडप्यांसाठीच नाही तर साहसी आणि निसर्गप्रेमींसाठीही उत्तम ठिकाण आहे. पावसाळा संपताच येथे फिरण्याचा मोसम सुरू होतो. जर तुम्ही केरळला गेला नसाल तर तुम्ही ऑक्टोबरमध्ये जाण्याचे प्लांनिंग (IRCTC) बनवू शकता.

पॅकेजचे नाव– सेलेस्टियल केरळ टूर
पॅकेज कालावधी– 5 रात्री आणि 6 दिवस
प्रवास मोड– फ्लाइट
डेस्टिनेशन कव्हर – कोची, कुमारकोम, मुन्नार, थेक्काडी

या सुविधा तुम्हाला मिळतील (IRCTC)

  • तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइट तिकिटे मिळतील.
  • राहण्यासाठी 3 स्टार हॉटेलची सुविधा उपलब्ध असेल.
  • या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण समाविष्ट केले जाईल.
  • पॅकेजमध्ये प्रवास विम्याची सुविधा देखील समाविष्ट आहे.

प्रवासासाठी एवढी रक्कम आकारली जाईल (IRCTC)

  • या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास केल्यास तुम्हाला 54,300 रुपये मोजावे लागतील.
  • दोन लोकांना प्रति व्यक्ती 41,300 रुपये द्यावे लागतील.
  • तीन लोकांना प्रति व्यक्ती 40,000 रुपये फी भरावी लागेल.
  • तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल. बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 36,100 रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय (IRCTC) तुम्हाला 31,900 रुपये द्यावे लागतील.

IRCTC ने ट्विट करून माहिती दिली (IRCTC)

IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला केरळची हिरवाई आणि नैसर्गिक सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ (IRCTC) शकता.

तुम्ही असे बुक करू शकता (IRCTC)

तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Rohit Sharma At Wimbledon : विम्बल्डनच्या कोर्टवर रोहित शर्माचा जलवा!! हिटमॅनच्या फोटोची जगात चर्चा

Rohit Sharma At Wimbledon

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नुकतंच भारतीय क्रिकेट संघाला T20 विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) संपूर्ण जगात चर्चा सुरु आहे. जिथे जाईल तिथे रोहितचे कौतुक केलं जात आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि दिलदार स्वभावाने रोहित सर्वानाच हवाहवासा वाटतो. सध्या रोहित शर्मा काही दिवस आराम करत आहे. मात्र आपला हा वेळ तो इंग्लडमध्ये घालवत आहे. सचिन तेंडुलकरच्या पाऊलावर पाऊल ठेवत रोहित शर्माही विम्बल्डनचे सामने बघायला इंग्लंडला गेला (Rohit Sharma At Wimbledon) आहे. रोहित शर्माचे सूट- बुटातील फोटो सुद्धा व्हायरल झाले आहेत. मुंबईचा हा राजा विम्बल्डनच्या मैदानातही आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.

स्टेडियममध्ये बसून टेनिस मॅचचा आनंद लुटला – Rohit Sharma At Wimbledon

रोहित शर्माने सेंटर कोर्टवर कार्लोस अल्काराज आणि डॅनिल मेदवेदेव यांच्यातील सेमी फायनलचा सामना पाहिला. आकर्षक असा सूट, गळ्यात टाय आणि काळा गॉगल घातलेला रोहित एखाद्या हिरो प्रमाणे दिसत होता. रोहितने स्टेडियममध्ये बसून टेनिस मॅचचा (Rohit Sharma At Wimbledon) आनंद लुटला. विम्बल्डनं देखील त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरुन रोहितचं स्वागत केलं. रोहित शर्माला क्रिकेट शिवाय टेनिस आणि फ़ुटबाँल या २ खेळांची आवड आहे, त्यामुळे त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा तो टेनिस आणि फ़ुटबाँलचे सामंत बघत असतो.

दरम्यान, रोहित शर्मा च्या नेतृ्त्त्वात टीम इंडियानं 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टीम इंडियानं इतिहास रचला. भारताने वर्ल्डकप जिंकताच संपूर्ण देशाने रोहितला अक्षरशा डोक्यावर घेतलं. मुंबईत सुद्धा रोहित शर्माकडे बघूनच लाखोंचा जनसमुदाय टीम इंडियाच्या स्वागतासाठी गोळा झाला होता. मुंबईचा राजा रोहित शर्मा हा गजर वानखेडे आणि मरीन ड्राइव्ह परिसरात दुमदुमत होता. रोहितने सध्या आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र वनडे आणि कसोटी क्रिकेट तो खेळत राहणार आहे. त्याचे आगामी लक्ष्य पुढील वर्षी होणारी चॅम्पियन ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिपअसेल.

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढीसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या ; ‘या’ स्थानकांचा समावेश

Ashadhi Ekadashi 2024 : येत्या 17 तारखेला आषाढी एकादशी आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात आषाढी साजरी केली जाते. या निमित्ताने पंढरपुरात जाणाऱ्या भाविकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे एसटी आणि रेल्वे कडून देखील प्रवाशांचे मोठी सोय करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या (Ashadhi Ekadashi 2024) पुणे ते मिरज दरम्यान धावणार आहेत. त्यामुळे या मध्यंतरीच्या असलेल्या प्रवाशांसाठी मोठी सोय होणार आहे.

अनारक्षित डेमो आषाढी (Ashadhi Ekadashi 2024)

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त रेल्वे विभागाकडून अनारक्षित डेमो आषाढी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या 12 गाड्या 15 ते 20 जुलै या कालावधीमध्ये धावतील. या गाड्या पुणे- मिरज- पुणे अशा धावतील. ही गाडी पुण्याहून दररोज सकाळी साडेआठ वाजता सुटेल. त्याच दिवशी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी मिरजला पोहोचेल. विशेष गाडी 15 ते 20 जुलै या कालावधीत मिरजहून दररोज दुपारी चार वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि हीच गाडी त्याच दिवशी रात्री अकरा वाजून 55 वाजता पुण्यात पोहोचेल.

स्थानकांचा समावेश (Ashadhi Ekadashi 2024)

या विशेष गाडीला हडपसर, दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, मोडलिंब ,पंढरपूर, सांगोला ,डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमंकाळ, सालगरे आणि आरग हे थांबे असणार आहेत. ही गाडी 10 डब्यांची असेल प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वे कडून करण्यात आला आहे.

पवारांनी डाव टाकला अन शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला; सदाभाऊंचा निशाणा

sadabhau khot sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील (SKP Jayant Patil) यांचा पराभव झाला. शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र २३ मतांचा कोटा जयंत पाटलांना पूर्ण करत आला नाही. त्यांना अवघी १२ मते मिळाली आणि त्याचा पराभव झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे बाकीचे २ उमेदवार काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर मात्र विजयी झाले. या एकूण सर्व प्रकारानंतर रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला, पवारांनी डाव टाकला अन शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला

प्रसारमाध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, जयंत पाटील हे शेकापचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या चळवळी या महाराष्ट्रात उभ्या केल्या. मात्र त्याच जयंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम जाणता राजा म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवारांनी केलं हे आता स्पष्ट झालं आहे. तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार आणू शकता, मग जयंत पाटलांसारख्या लढाऊ माणसाचा घात का केला? याचेही उत्तर शरद पवार आणि महाविकास आघाडीला द्यावं लागेल असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.

ते पुढे म्हणाले, या राज्यात शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचे काम खऱ्या अर्थाने शरद पवारांनीच केला आहे. महाविकास आघाडीवेळी मुख्यमंत्री होताना आणि भाजपची साथ सोडताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात आणि मग जयंत पाटलांच्या उमेदवारीवेळी उद्धव ठाकरेंनी तुमचं का ऐकलं नाही? असा सावळा करत हा सगळा शरद पवारांनी टाकलेला डाव होता आणि या डावात जयंत पाटलांचा बळी गेला असा आरोप सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केला.

दरम्यान, संजय राऊत यांनी मात्र शरद पवारांनी जयंत पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केल्याचे सांगितलं. शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडी मधील एक महत्वाचा घटकपक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये त्यांनी महाविकास आघाडीचे काम प्रामाणिकपणे केलं होते. पवार साहेबानी जयंत पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले मात्र आमच्याकडे जी मते होती त्यातच आम्हाला खेळावं लागलं आणि जयंत पाटलांचा पराभव झाला असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

World Championship of Legends 2024 Final : आज भारत VS पाकिस्तान फायनल!! 17 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार??

World Championship of Legends 2024 Final

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । क्रिकेट रसिकांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. कारण आज भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना (IND Vs PAK Final) होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स या स्पर्धेत (World Championship of Legends 2024) दोन्ही संघानी अंतिम फेरीत धडक मारली असून आज या स्पर्धेचे विजेतेपद कोण पटकवणार याकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष्य आहे. दोन्ही संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असल्याने आजचा सामना रोमांचक होणार यात शंका नाही. परंतु या अंतिम सामन्यामुळे १७ वर्षापूर्वीच्या इतिहासाची आठवण पुन्हा एकदा जागी झाली. कारण २००७ मध्ये T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये हेच २ संघ आमनेसामने होते आणि भारताने ती मॅच जिंकून नवा इतिहास रचला होता. याच इतिहासाची पुनरावृत्ती टीम इंडियाच्या दिग्गजांच्या संघाने करावी अशी इच्छा प्रत्येक भारतीयांची असेल.

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले खेळाडू खेळत असल्याने प्रेक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. भारतीय संघात युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, सुरेश रैना, नमन ओझा, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू सारखे आक्रमक फलंदाज आहेत तर गोलंदाजी विभागात हरभजन सिंग, धवल कुलकर्णी पवन नेगी आणि विनय कुमार आहेत. आत्तापर्यंत संपूर्ण स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये तर युवराज सिंग, इरफान पठाण आणि युसूफ पठाणने वादळी खेळी करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांपासून सावध राहावं लागणार आहे.

दुसरीकडे पाकिस्तानच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, अतिशय दमदार खेळाडूंमुळे हा संघ कागदावर खूपच मजबूत दिसत आहे. युनिस खान, कामरान अकमल, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, मिस्बाह उल हक असे पाकिस्तानच्या इतिहासातील दिग्गज खेळाडू या संघात असल्याने त्यांची फलंदाजी खूपच दमदार वाटतं आहे. तर गोलंदाजीमध्येही अब्दुल रझाक, वहाब रियाज, सोहेल खान सारखे आग ओकणारे गोलंदाज पाकिस्तान कडे आहेत. दोन्ही संघ मजबूत असल्याने कोणीच कोणाला कमी नाही… त्यामुळे आजचा हा अंतिम सामना रोमहर्षक आणि क्रिकेट चाहत्यांना खुश करणारा ठरेल हे मात्र नक्की…