Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 607

Salt Bath Benefits | पाण्यात एक चमचा मीठ टाकून अंघोळ केल्याने; शरीराला मिळतात आश्चर्यकारक फायदे

Salt Bath Benefits

Salt Bath Benefits | जेवणामध्ये मीठ ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. मिठाचे प्रमाण कमी जास्त झाले, तरी जेवणाची चव बिघडते. जेवणाला अधिक चविष्ट बनवण्याचे काम मीठ करते. त्याचप्रमाणे शरीरासाठी देखील महत्त्वाचे आहे. परंतु खाण्या व्यतिरिक्त मिठाचे इतरही अनेक फायदे आहे. ज्यामुळे तुमच्या शरीर निरोगी होते. तुम्ही जर तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मिठाचा वापर केला, तर तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. खारट पाण्याने शरीराला (Salt Bath Benefits) अनेक फायदे होतात मिठाच्या पाण्यामुळे त्वचेपासून ते सर्दी खोकल्यापर्यंत अनेक समस्या दूर होतात. आता मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने, कोणते फायदे होतात? हे आपण जाणून घेणार आहोत.

स्नायू शिथिल करणारे | Salt Bath Benefits

गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकून आंघोळ केल्याने स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो. त्यामुळे दिवसभराचा थकवा निघून जातो. विशेषत: झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास झोप चांगली लागते.

सर्दी आणि खोकला निघून जाईल

गरम पाण्यात दोन चमचे मीठ टाकून आंघोळ केल्याने ताप, खोकला, सर्दीपासून आराम मिळतो. यामुळे नाक आणि घशाचे संक्रमण दूर होण्यास मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर

पाण्यात एक चमचा मीठ टाकून आंघोळ केल्याने खाज, एक्जिमा आणि त्वचेशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो.

रक्ताभिसरण वाढते.

गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकून आंघोळ केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे स्नायूंमध्ये रक्ताभिसरण वाढू शकते.

वजन कमी

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील अतिरिक्त पाणी निघून जाते ज्यामुळे जास्त चरबी जाळते, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय थकवाही कमी होतो.

मानसिक शांती | Salt Bath Benefits

रोज गरम पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने मानसिक शांती मिळते, तणाव दूर राहतो.

PM Modi In Mumbai : पंतप्रधान मोदी आज मुंबईत!! विविध प्रकल्पांचे करणार लोकार्पण

narendra modi mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत येणार आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तब्बल 29 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. यामध्ये मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव- मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा समावेश आहे. याचबरोबर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचेही भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो.

मुंबईत आपल्याला मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होतायत आणि प्रवासाला जास्तीचा वेळही जातोय. हि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेतले असून हा प्रकल्प चार टप्प्यांत पूर्ण केला जात आहे. या गोरेगाव फिल्मसिटी-खिंडीपाडापर्यंतच्या बोगद्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. याच कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल. सर्व उदघाटनानंतर मोदी गोरेगाव येथील नेसकसेन्यतर

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प:

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा हा भारतामधील शहरी भागातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे.
हा बोगदा बांधताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता अबाधित ठेवत काम केलं जाणार आहे.
प्राण्यांच्या सुरक्षित विहारासाठी पशूपथाची निर्मिती
या बोगद्यामधून सिग्नल रहित आणि विना थांबा प्रवास करता येणार आहे.
बोगद्याच्या उभारणीसाठी 16 हजार 600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
ठाणे-बोरिवलीदरम्यान प्रवासाचा वेळ 1 तासाने कमी होणार.
दोन्ही महत्वाच्या शहरांमधील अंतर केवळ 12 मिनिटांवर येणार.
या मार्गावर दररोज किमान 1 लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज.
कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे 22 हजार 400 टनांनी घट होणार
मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाचीही बचत होणार

Neem Benefits | केसातील कोंडा आणि पिंपल्स होतील कायमचे गायब; असा करा कडुलिंबाचा वापर

Neem Benefits

Neem Benefits | कडुलिंब ही एक औषधी वनस्पती आहे. कडुनिंबाचे झाड, त्याची पाने, फळे, फांद्या सगळ्याच खूप औषधी असतात. त्यामुळे प्राचीन काळापासून कडुलिंबाला खूप महत्त्व आहे. अनेक लोक कडुलिंबाचा वापर करतात. केवळ आरोग्यासाठीच नाही, तर केस आणि त्वचेसाठी देखील कडुलिंबाचा खूप मदत होते. कडुलिंबामध्ये एंटीबॅक्टरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. जे त्वचेला आणि केसांना संसर्गापासून वाचवतात. कडूलिंबाची (Neem Benefits) पाने, साल आणि बिया ही तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात वापरता येते. जसे की कडुलिंबाचे तेल बनवता येते. कडूलिंबाची पेस्ट बनवता येते. याचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला त त्वचा आणि केसांसंबंधित अनेक फायदे मिळतील. आता ते कोणते फायदे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

त्वचा संक्रमण दूर होते | Neem Benefits

कडुनिंबातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म विविध संक्रमणांशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे याचा उपयोग पिंपल्स, एक्जिमा आणि डागांवर होतो. कडुलिंबाची पेस्ट बनवून लावल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.

त्वचेतील पाणी धरून ठेवतात

कडुनिंबाच्या पानांच्या पेस्टमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आढळतात जे कोरडी आणि तेलकट त्वचा मऊ आणि तेलमुक्त ठेवण्यास मदत करतात. हे त्वचेतील अतिरिक्त सीबम काढून टाकते आणि छिद्र उघडते, ज्यामुळे मुरुमांची समस्या दूर होते.

अँटी-एजिंग गुणधर्म

कडुलिंबात व्हिटॅमिन सी, कॅरोटीनॉइड्स आणि अल्डीहाइड्स असतात जे त्वचेला नेहमी तरुण ठेवण्यास मदत करतात.

सूज कमी होते

कडुलिंबाची पाने आणि तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेची जळजळ, सूज आणि खाज सुटते.

केसांसाठी फायदेशीर | Neem Benefits

कडुलिंबाच्या तेलाचा वापर केल्याने केस गळणे कमी होते आणि ते मजबूत होण्यास मदत होते.

कोंडा समस्या दूर होते

कडुलिंबाच्या तेलाचा वापर केल्याने केसांची खाज किंवा कोंडा ही समस्या दूर होते. याशिवाय, हे केसांचा कोरडेपणा कमी करून त्यांना मऊ आणि चमकदार बनवू शकते.

गद्दारांवर थेट कारवाई करणार, विधानपरिषदेत मते फुटल्याने नाना पटोले आक्रमक

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2024) काँग्रेसची मते फुटल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते योग्य रीतीने त्यांच्याकडे ट्रान्सफर न झाल्याचा फटका जयंत पाटलांना बसला. काँग्रेसची एकूण ३७ मते होती, मात्र त्यातील ८ मते फुटल्याचे स्पष्ट झालं आहे तर दुसरीकडे अजित पवार गटानेच यातील ५ मते फोडल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. या एकूण सर्व प्रकारानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) चांगलेच आक्रमक झालेत. ज्या कोणी आमदारांनी गद्दारी केली ते आम्हाला समजलं आहे. पक्ष त्यांच्यावर थेट कारवाई करेल असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, मागच्या विधानपरिषद निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी काही बदमाश आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं होतं. मात्र तेव्हा ते आमदार कोण होते? याचा पत्ता लागला नव्हता. यावेळी आम्ही व्यूरचना आखली होती. या व्यूरचनेत काही बदमाश आमदार अडकले आहेत. त्यांच्याबाबत आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आहे. ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात काम केलं आहे, अशा लोकांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल. त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा कुणी तसं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

मते नेमकी फुटली कुठं?

काँग्रेसकडून फक्त प्रज्ञा सातव या एकमेव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पण त्यांचे ३७ आमदार आहेत. प्रज्ञा सातव २५ मतांनी विजयी झाल्या. त्यामुळे काँग्रेसची १२ मते शिल्लक होती. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे १५ आमदार असताना मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली होती. पण एका मतासाठी त्यांना दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून राहावं लागलं. प्रज्ञा सातव यांच्या दुसऱ्या पसंतीची ३ मते मिलिंद नार्वेकरांना पडली आणि ते विजयी झाले. मात्र उर्वरित मते महाविकास आघाडीचेच उमेदवार असलेल्या जयंत पाटलांना मात्र मिळाली नाहीत. जयंत पाटील याना फक्त १२ मते पडली, ती सुद्धा शरद पवारांच्या आमदारांचीच … बाकी मतांची जुळवाजुळव झाली नाही. याउलट अजित पवारांकडे ४२ आमदारांचे संख्याबळ असताना त्यांच्या दोन्ही उमेदवारांना मिळून ४७ मते मिळाली. म्हणजेच दादा गटाला ५ मते जास्त मिळाली ती काँग्रेसची आहेत असं बोलल जातंय.

Pune News : काऊंटडाऊन सुरु ; पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलची मंत्री मोहोळ यांनी केली पाहणी

Pune News : येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलची सेवा सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचा आढावा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (१२) घेतला. यानंतर त्यांनी ” हे टर्मिनल पुण्याच्या विकासाचे साक्षीदार आहे” अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्यासोबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्यासह विमानतळाच्या विविध विभागांचे (Pune News) अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी गेल्या दहा वर्षांत पुणे शहराला मिळालाय . नवे टर्मिनल हे पुण्याच्या विकासाचे साक्षीदार असून, पुणे शहरातील हे विकासपर्व पुढेही सुरू राहील.

दरम्यान नवी टर्मिनल सुरू करण्यासाठी अतिरिक्त सीआयएसएफ जवानांची आवश्यकता होती. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्याला तातडीने परवानगी देण्यात आली. न सीआयएसएफचे जवान पुणे (Pune News) विमानतळावर दाखल झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन टर्मिनलचे कामकाज सुरू (Pune News) करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त 222 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कर्मचाऱ्यांना मंजुरी दिली आहे.यावर्षी मार्चमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 423 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधलेल्या 51,595 चौरस मीटर टर्मिनलचे लोकार्पण केले. तरीही, अधिक CISF कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण झाली नव्हती , ज्यामुळे उदघाटन झाल्यानंतरही याची सेवा सुरु होण्यास विलंब विलंब झाला. मात्र आता अखेर याची सेवा सुरु होणार आहे.

टर्मिनल 2 च्या नवीन जोडणीमुळे या विमानतळाची प्रतिवर्षी सोळा दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची क्षमता (Pune News) असेल. एक देशांतर्गत उड्डाणांसाठी आणि दुसरी आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी.

Viral Video : हजारो फुटांवर उंच कपल गेले डेटवर ; व्हिडीओ पाहून धडकीच भरेल

Viral Video : रोमँटिक डेटवर जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोडीदारासोबत एका सुंदर क्षणाचे साक्षीदार व्हायचे असते. पण हे क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेक जण स्वतःच्या आयुष्याची आणि जोडीदाराच्या आयुष्याचीही पर्वा करत नाहीत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हजारो फूट उंचीवर हवेत लटकून एक जोडपे डेटिंग करीत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर (Viral Video) तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे रेल्वे स्टेशनवर डेटसाठी गेलेले दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे जोडपे एका हलत्या जेवणाच्या टेबलावर दोरीच्या साहाय्याने हवेत लटकत आहे. व्हिडिओमध्ये हे जोडपे दोरीच्या साहाय्याने हजारो फूट उंचीवर हवेत लटकत असून यांच्या मध्ये एक टेबल आहे. अशा स्थितीत हे कपल पूर्णपणे आरामात बसलेले दिसत आहे. तर या व्हिडिओतल्या (Viral Video) मुलीने मात्र टेबलाला घाट पकडले आहे. तिथे उभे असलेले लोक त्यांचा व्हिडिओ बनवत आहेत. जर तोल थोडासाही बिघडला असता तर हे जोडपे थेट दरीत पडू शकले असते. अशी धोकादायक डेट तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया (Viral Video)

हा व्हिडिओ avioneta_divertida नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत 61.5 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तर या व्हिडिओला दीड लाखांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. यावर यूजर्स (Viral Video) विविध प्रकारच्या कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले…कोण वेड्यासारखे ओरडत आहे? आणखी एका युजरने लिहिले… लोक काहीही करायला कसे वेडे असतात. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…हे त्याचे शेवटचे जेवण असू शकते.

पोस्ट ऑफिसची खास योजना!! 5 लाख रुपये गुंतवल्यास मिळणार 10 लाख रूपये; येथे करा अर्ज

post office scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य आणि केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या योजनांचा (Post Office Scheme) देखील सर्वात जास्त समावेश असतो. कारण पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये चांगला परतावा दिला जातो. आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. या योजनेतून तुम्हाला दुहेरी फायदा मिळेल. तसेच या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट पैसे मिळतील. त्यामुळे ही योजना नेमकी कोणती आहे?? त्याचा लाभ कसा घ्यावा?? याविषयी जाणून घ्या.

5 लाख रुपये गुंतवल्यास 10 लाख मिळणार

सध्या पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Yojana) योजना सर्वात जास्त लोकप्रिय ठरत आहे. ही योजना सर्वात प्रथम भारतीय टपाल विभागाने 1988 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती. त्यामुळे या योजनेला किसान विकास पत्र योजना असे नाव देण्यात आले आहे. परंतु कोणताही भारतीय नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो. जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 9.5 वर्षांनंतर 10 लाख रुपये मिळतील. सध्या या योजनेतील व्याजाची रक्कम 7.5 टक्के आहे. तर योजनेचा लॉक इन कालावधी 2.6 वर्षे म्हणजेच 30 महिने आहे.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात?

किसान विकास पत्र योजनेचा लाभ 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतो. जर एखादया अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर या योजनेत गुंतवणूक केल्यास पालकांना त्याच्या नावाने नियोजन पत्र घ्यावे लागेल.
तसेच या योजनेमध्ये दोन व्यक्ती एकत्र अर्ज करू शकतात. यामुळे याचा फायदा त्या दोन्ही व्यक्तींना होईल.

योजनेसाठी कसा अर्ज करता येईल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमधून फॉर्म घेऊ शकता. तुम्हाला हा फॉर्म भरून तो कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा लागेल. तुम्ही दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी आणि ठराविक रक्कम जमा केल्यानंतर तुम्हाला किसान विकास पत्र प्रमाणपत्र जारी केले जाईल. तसेच या संबंधित तुम्हाला ई-मेल देखील पाठवला जाईल.

Maharashtra MLC Elections: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर; 12 मधील ‘या’ उमेदवाराचा पराभव

Maharashtra MLC Elections

Maharashtra MLC Elections| राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच महाराष्ट्र विधान परिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या 11 जागांसाठी राजकीय पक्षांचे 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. या बारा उमेदवारांमध्ये महायुतीचे सर्वच म्हणजेच नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव या विजयी झाल्या आहेत. (Maharashtra MLC Elections) तसेच ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले आहेत. परंतु शेकापचे जयंत पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे.

विजयी उमेदवारांची यादी (Maharashtra MLC Elections)

1) पंकजा मुंडे
2) परिणय फुके
3) सदाभाऊ खोत
4) अमित गोरखे
5) योगेश टिळेकर
6) शिवाजीराव गर्जे
7) राजेश विटेकर
8) कृपाल तुमाने
9) भावना गवळी
10) प्रज्ञा सातव
11) मिलिंद नार्वेकर

पराभव झालेला उमेदवार

जयंत पाटील यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.

दरम्यान,विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने 9 उमेदवार उभे केले होते. यामध्ये पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांचा समावेश होता. तर शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने याना संधी देण्यात आली होती. आणि अजित दादा गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे निवडणुकीच्या रिंगणात होते. दुसरीकडे महाविकास आघाडीबाबत सांगायचं झाल्यास, काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सातव, शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना संधी देण्यात आली होती. गुप्त मतदान असल्याने कोणाची विकेट जाणारा याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं होते.

Beauty Hacks : हळद खुलवेल सौंदर्य ; पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा घरगुती हेअरमास्क

Beauty Hacks : आपल्याला माहितीच आहे की हळदी अत्यंत गुणकारी आहे हळदीचा समावेश हा रोजच्या आहारात नेहमीच केला जातो पण त्याऐवजी हळदी ही उत्तम अँटी बॅक्टेरियल घटक म्हणून काम करते. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, हळदीमुळे पचनक्रिया सुधारते. हळदीचा वापर करून तुम्हाला पांढरे केस काळे करण्यास मदत होईल. केसांना तुम्ही हळदीचे काही मास्क लावलेत तर तुमचे केस हळूहळू काळे होण्यास मदत होतील. हे पॅक (Beauty Hacks) कशा पद्धतीने लावायचे आहेत चला पाहूया

हळद आणि खोबरेल तेल (Beauty Hacks)

या दोन्हीचा वापर करताना सगळ्यात आधी तुम्हाला कच्च्या हळदीचे दोन तुकडे घ्यायचे आहेत. हे तुकडे बारीक करून घ्या. आता एका भांड्यामध्ये खोबरेल तेल घ्या आणि ते गॅसवर ठेवा हे तेल थोडं गरम करा आणि त्यामध्ये बारीक केलेली हळद घाला. त्यानंतर हे मिश्रण थोडेसे कोमट असतानाच 15 ते 20 मिनिटे केसांना तुम्ही लावून ठेवा आणि नंतर केस धुवा आठवड्यातून एकदा केसांना अशी हळद लावल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात.

हळद आणि कोरफड

हळदीप्रमाणेच कोरफड ही अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. हा उपाय करण्यासाठी एक चमचा हळद आणि थोडं कोरफड जेल एक कप पाण्यामध्ये मिसळा. हे मिश्रण तुम्हाला एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचे आहे. त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या केसांच्या मुळापासून टोकापर्यंत स्प्रे करायचा आहे. हे किमान तासभर असंच मिश्रण तुमच्या केसांना राहू द्या आणि त्यानंतर केस धुवून स्वच्छ करा. हे केस काळे होण्यास (Beauty Hacks) मदत करते आणि केस चमकदार सुद्धा बनवते.

अंडी आणि हळद (Beauty Hacks)

अंड्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण हे सर्वाधिक असतं त्यामुळे अंड्यांचा समावेश आहारात केला जातो. जर तुमच्या शरीरामध्ये आवश्यक प्रोटीन असेल तर केस सुद्धा मजबूत बनतील हा हेअर पॅक बनवण्यासाठी दोन अंडी दोन चमचे मध आणि दोन चमचे हळद ही व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर हा हेअर मास्क अगदी स्कॅल्प पासून केसांच्या टोकाला लावायचे आहे आणि नंतर हा मास्क थोड्या वेळाने धुवून टाकायचे आहे. हा पॅक जर तुम्ही आठवड्यातून एकदा केसांना लावला तर पांढरे केस काळे होऊ (Beauty Hacks) लागतात.

हळद आणि दूध

पांढरे केस काळे करण्यासाठी हळदीचा शाम्पू तुम्ही बनवू शकता हा शाम्पू बनवण्यासाठी दोन चमचे हळद, एक चमचा मध आणि थोडे दूध मिसळा केस धुण्यासाठी ही पेस्ट वापरा हे हेअर मास्क म्हणूनही डोक्याला लावता येतो 20 ते 25 मिनिटे केसांवर (Beauty Hacks) ठेवल्यानंतर हे धुवा. कोंडा दूर करण्यासाठी आणि पांढरे केस काळे करण्यासाठी याचा प्रभावी उपयोग होऊ शकतो.

BSNL SIM Port : तुमचं सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचंय? मग ‘ही’ सोप्पी प्रोसेस पहाच

BSNL SIM Port Process

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिओ, एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी ३ जुलैपासून मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चाप बसत आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेला सामान्य माणूस आता मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतींनी घाईला आला आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात असून यामधून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण देशी टेलिकॉम कंपनी BSNL चे सिम कार्ड खरेदी करत आहेत किंवा आपलं आहे ते कार्ड मध्ये BSNL मध्ये पोर्ट (BSNL SIM Port) करत आहेत. तुम्ही सुद्धा तुमचं सिम बीएसएनएल मध्ये पोर्ट करण्याच्या विचारात असाल तर यासाठी सोप्पी पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तस पाहिले तर बीएसएनएलचा रिचार्ज प्लॅन हा इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्त असल्याने सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांसाठी वरदान ठरू शकतो. BSNL च्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांपासून ते 365 दिवसांपर्यंत असते. यामध्ये ग्राहकांना इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देण्यात येतेय. हि गोष्ट खरी आहे ज्याप्रमाणे BSNL ला Airtel, Jio किंवा Vodafone Idea सारखं फास्ट नेटवर्क मिळत नाही, परंतु पैशाच्या बाबतीत बीएसएनएल नक्कीच परवडणारे सिमकार्ड आहे. त्यामुळे सध्या अनेक ग्राहक त्यांचे सिमकार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट करत आहेत. (BSNL SIM Port)

अशाप्रकारे तुमचा नंबर BSNL मध्ये पोर्ट करा – BSNL SIM Port

तुमचा सध्याचा सिम नंबर BSNL वर पोर्ट करण्यासाठी, तुम्हाला सर्वात आधी 1900 वर एसएमएस पाठवावा लागेल.
त्यासाठी PORT_XXXXXXXXXXXX (फोन नंबर) 1900 वर “एसएमएस करा.
तुम्हाला आता एसएमएसद्वारे एक युनिक पोर्टिंग कोड (UPC) मिळेल.
हा पोर्टिंग कोड 15 दिवसांसाठी वैध असतो.
यानंतर बीएसएनएलचे ग्राहक सेवा केंद्र किंवा किरकोळ विक्रेत्याला भेट देऊन पोर्टसाठी अर्ज करू शकता.
सिम पोर्टसाठी ग्राहकाचा अर्ज भरावा लागेल.
यानंतर तुम्हाला बीएसएनएल सिम कार्ड दिले जाईल.