Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 608

संजय रायमुलकर ते आकाश फुंडकर….. बुलढाण्याच्या 3 विधानसभांचा निकाल असा लागतोय

buldana vidhan sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घाटाखालचा आणि घाटावरचा हा बुलढाण्याचा (Buldana) नेहमीचा संघर्ष. खरंतर काँग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या या जिल्ह्याला भाजपने अनेक अंगांनी डॅमेज केलं.. त्यात खामगाव आणि जळगाव – जामोदचे मतदारसंघ भाजपने असे घट्ट विणले की इथं विरोधकांना नो एण्ट्री असं एकूण वातावरण असतं.. संजय रायमुलकर, आकाश फुंडकर आणि जिल्ह्याच्या राजकारणात बीग बी ठरलेले संजय कुटे यांच्या राजकाराचा बेस याच मतदारसंघातून मजबूत झालाय.. त्यामुळे तुपकर इफेक्टमुळे महायुतीच्या बाजूने बुलढाण्याचा निकाल गेला.. असं म्हणलं जात असताना महायुतीचे बालेकिल्ले असणारे मेहकर, खामगाव आणि जळगाव – जामोदचा यंदाचा निकाल कसा लागतोय? बुलढाण्यातील या हायव्होल्टेज लढतीत आमदारकीचा गुलाल कुणाचा… याचंच हे क्लिअर कट एनालिसीस..

पहिला विधानसभा मतदारसंघ पाहुयात तो मेहकराचा… मेहकर विधानसभा मतदारसंघाला शिवसेनेचा प्रतापगड म्हटला जातो.. कारण इथली शिवसेनेची पकड इतकी मजबूत आहे की विरोधक केवळ नाममात्रच राहतात.. या प्रतापगडाचे म्हणजेच मेहकर विधानसभेचे किल्लेदार, आमदार आहेत संजय रायमुलकर.. अनुसुचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात रायमुलकर यांनी सलग तीन टर्म मोठ्या लीडनं आमदारकी आपल्याकडे ठेवून मतदारसंघात नवा विक्रम केलाय..२०१४ ला काँग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे तर २०१९ ला अनंत वानखेडे यांना अस्मान दाखवत मेहकरवर भगवाच फडकवत ठेवला.. विशेष म्हणजे अनुसुचित जातीसाठी मतदारसंघ राखीव असतानाही मावळत्या विधानसभेला वंचितच्या उमेदवाराला इथे फक्त ८००० मतच पदरात पाडून घेता आली.. यावरुन शिवसेनेवर मेहकरची किती मेहरबानी आहे, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको… पण याच रायमुलकरांनी शिवसेनेच्या बंडाळीत शिंदेंची साथ धरल्यानं मेहकर मधला कार्यक्रम चांगलाच गंडलाय. याचच फळ म्हणून ज्या रायमुलकरांनी १५ वर्ष आमदारकी भोगली त्या मेहकरमधून अवघं २७३ मतांचं लीड खासदार साहेब जाधवांच्या पाठीशी आलंय..

हा आकडा सांगतोय, की येणाऱ्या विधानसभेला रायमुलकरांची आमदारकी काठावर आलीय… इथं तुपकरांना मिळालेलं मतदान पाहता आणि त्यांनी मेहकर मधून स्वतंत्र उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेऊन युती आणि आघाडी अशा दोघांचंही टेन्शन वाढवलय…तूपकरांचा हा संभाव्य धोका पाहता रायमुलकरही चांगलेच तयारीला लागलेत… अर्थसंकल्पीय अधिवेशनातून 109 कोटी 74 लाख रुपयांचा भरीव निधी मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर करून आणलाय.. अर्थात अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकीला रायमुरकरांनाही पंधरा वर्षांचा हिशोब द्यायचाय… लोकसभेला तुपकर फॅक्टरमुळे मतदारसंघातून मशाल विझली आणि मत विभाजन प्रतापराव जाधवांच्या पथ्यावर पडलं… त्यामुळे मेहकरमध्ये येणाऱ्या विधानसभेला तुपकरांचा उमेदवार जिंकण्यासाठी लढणार… की मत विभाजनासाठी…याचे चित्र येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…

दुसरा मतदारसंघ येतो तो खामगावचा…2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी खामगावमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत, खामगाव जिल्हा झाला का? खामगाव – जालना रेल्वे महामार्ग झाला का? जिगावाचे काय झाले.. मुख्यमंत्री आले गेले.. अशी मराठीतली तीन वाक्य बोलून भावनिक साद घालत बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या लोकांची मन जिंकली… खामगावकरांनीही मोदींच्या आवाहनाला भावनिक प्रतिसाद देत काँग्रेसच्या असणाऱ्या या बालेकिल्ल्यात आमदारकीचा चेहरा बदलला… आणि भाजपच्या आकाश फुंडकरांच्या स्वाधाीन मतदारसंघ केला.. खरंतर काँग्रेसच्या दिलीप सानंदा यांनी पंधरा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनीधीत्व करत काँग्रेसला जम बसवून दिला होता.. पण २०१४ ला सगळे पत्ते भाजपच्या बाजूने शिफ्ट झाले… २०१४ ला दिलीप सानंदा तर २०१९ ला ज्ञानेश्वर पाटलांना मात देत पुंडकर सलग दोन टर्म आमदार झाले…

आता यंदाही हॅट्रीक करण्यासाठी तेच महायुतीकडून निवडणुक मैदानात असतील… बाकी नुकत्याच पार पडलेल्य लोकसभेच्या तिरंगी लढतीत खामगावमधून महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच प्रतापराव जाधवांच्या पारड्यात तब्बल २० हजारांचं लीड असल्याने हीच मत त्यांच्या विजयात निर्णायक ठरली.. याच आकडेवारीवरुन मतदारसंघात आमदारकीला आकाश फुंडकर सेफ झोनमध्ये आहेत, असं म्हणायला हरकत नाही… दुसरीकडे दिलीप सानंदा हे भाजपमध्ये जाण्याच्या मध्यंतरी बऱ्याच वावड्या उठल्या पण लोकसभा उरकताच दिलीप सानंदा एक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत.. कारण खामगावला स्वतंत्र जिल्हा, लाखनवाड्याला स्वतंत्र्य तालुक्याचा दर्जा देण्यासाठी सानंदा यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेत मागणी केली आहे… त्यामुळे घाटाखालची ही सेपरेट आयडेंटीटी, प्रादेशिकतावाद पुढे करत सानंदा यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे… त्यात मतदारसंघात रखेडलेले अनेक विकास प्रकल्प, कॉटन बेल्ट म्हणून ओळख असणाऱ्या खामगावमध्ये दिसणारा शुकशुकाट, चांदीची मोठी बाजारपेठ असणाऱ्या उद्योगाची झालेली अवकळा आणि मतदारसंघातील नागरिकांची रखडणारी प्रशासकीय कामं हे सगळं फुंडकर यांना मायनसमध्ये घेऊन जाणाराय.. पण लोकसभेचा निकाल जैसे थे राहीला तर आकाश फुंडकर यांच्या आमदारकीच्या हॅट्रीकचे चान्सेस सध्यातरी जास्त वाटतायत..

तिसरा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो जळगाव – जामोदचा… जळगाव जामोदमधील काँग्रेसमध्ये निवडणुक लढण्यासाठी एवढे उत्सुक असतात की त्यांच्यातल्या स्पर्धेमुळे भाजपचे संजय कुटे आरामात निवडून येतात, असं एकूण या मतदारसंघाचं गणित.. तसं बघायला गेलं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला… कृष्णराव इंगळे यांच्या पंधरा वर्षांच्या आमदारकीला आव्हान देत २००४ साली संजय कुटे पहिल्यांदा आमदार झाले.. यानंतर सलग पंधरा वर्ष त्यांनी भाजपचा झेंडा मतदारसंघातून खाली पडू दिला नाहीये… विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने या मतदारसंघातून १४ हजारांचं लीड मिळाल्यामुळे जळगाव -जामोद आजही भाजपच्या बाजूने आहे, असं म्हणायला हरकत नाही..

२०१९ च्याही निवडणुकीत काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांच्या विरोधात एकतर्फी लढत देऊन कुटे यांनी तब्बल ३५ हजारांहून अधिकचं लीड घेतलं होतं… महाराष्ट्रात ज्यावेळी भाजपचे सर्वेसर्वा गोपीनाथ मुंडे होते, त्यावेळी भाऊसाहेब फुंडकर हे मुंडेंचे निकटवर्तीय होते. भाऊसाहेब फुंडकरांनीच संजय कुटेंना राजकारणात आणलं आणि फुंडकरांच्या निधनानंतर संजय कुटे बुलडाणा जिल्ह्याचे नेते बनले… जळगाव-जामोद मतदारसंघात ओबीसी समाज प्रभावशाली आहे आणि संजय कुटे याच समाजातून येतात. किंबहुना, भाऊसाहेब फुंडकरांनी हीच सामाजिक गणितं पाहून त्यांना पुढे आणलं, असं बोललं जातं… निवडणुकीचा काळ वगळता ते सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवून असतात, त्यामुळे त्यांच्या इमेजला अद्यापतरी म्हणावा असा डॅमेज पोहचला नाहीये… तगडा प्रतिस्पर्धी नसणं, स्वच्छ प्रतीमा, फडणवीसांचे विश्वासू आणि विकासाच्या राजकारणावर भर देण्याचा प्रयत्न हे सगळं प्लसमध्ये जाणारे पाँईट पाहीले तर सलग पाचव्यांदा जळगाव – जामोदवर आमदारकीचा मोहर उमटवण्याचा रेकाॅर्ड कुटेंच्या नावावर होऊ शकतो..

एकूणच काय, तर बुलढाण्यातील महायुतीत मेहकर वगळता खामगाव आणि जळगाव – जामोद हे दोन्ही मतदारसंघ अजूनही सेफ झोनमध्ये आहेत.. काँग्रेसनं या मतदारसंघात वर्चस्व निर्माण करण्यासाठी फारसे प्रयत्न केलेले नाहीयेत..दुसला लीडरही या जिल्हयावर फारसा प्रभाव टाकत नसल्याने रविकांत तुपकरच या तीन मतदारसंघांच्या राजकारणाला काहीतरी इंटरेस्टींग वळणावर नेऊन पोहचवतील, असंही सध्या वातावरण दिसतंय.. बाकी या तीन विधानसभा मतदारसंघात विधानसभेचं चित्र कसं असेल? ते आम्हाला कमेट बाॅक्समध्ये नक्की सांगा..

Netflix Free Subscribtion | कोणत्याही कंपनीचं सिम असो; ही सोप्पी ट्रिक वापरून फ्रीमध्ये वापरा नेटफ्लिक्स

Netflix Free Subscribtion

Netflix Free Subscribtion | आज-काल अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला वेबसिरीज, सिनेमा त्याचप्रमाणे अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यातील नेटफ्लिक्स हा एक खूप लोकप्रिय असा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सिनेमा, वेब सिरीज त्याचप्रमाणे काही सिरीयल पाहण्यासाठी महिन्याला एक ठराविक रक्कम द्यावी लागते. परंतु आज या लेखामधून आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत की. ज्याच्या मदतीने तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस न देता नेटफ्लिक्सचा आनंद घेऊ शकता.

ओटीटीचा सबस्क्रीप्शन आजकाल अनेक लोकांकडे असते. तुम्ही हे सबस्क्रिप्शनसाठी (Netflix Free Subscribtion) कोणतेही अतिरिक्त पैसे न घेता त्याचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल फोन ठराविक प्लॅनमध्ये रिचार्ज करावा लागेल. टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या त्यांच्या काही प्रीपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स देखील फ्री ऑफर करतात. यासाठी तुम्हाला त्या प्लॅनचा रिचार्ज करावे लागेल. आता ते कोणते प्लॅन आहेत हे आपण जाणून घेऊया.

जिओचा नेटफ्लिक्स फ्री प्लॅन | Netflix Free Subscribtion

रिलायन्स जिओच्या एका प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्सचा फ्री प्लॅन मिळतो. त्याची किंमत 1499 रुपये आहे तसेच दुसरा एका प्लॅनची किंमत 1099 रुपये आहे. या दोन्हींची वैद्यता 84 दिवसाची आहे 1499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर युजरला तर रोज 3 जीबी डेटा मिळतो. तसेच नेटफिक्सचे एक बेसिक सबस्क्रिप्शन देखील मिळते. दुसऱ्या प्लॅनमध्ये 1099 रुपयाच्या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 2 जीबी इंटरनेट डेटा आणि नेटफ्लिक्स मोबाईलचा सबस्क्रीप्शन देखील मिळते.

वोडाफोन आयडिया नेटफ्लिक्स फ्री प्लॅन

वोडाफोन आयडिया ही टेलिफोन कंपनी देखील तुम्हाला त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स फ्री सबस्क्रीप्शन देत आहे. वो डाफोन आयडियाच्या एका प्लॅनची किंमत ही 998 आहे तर दुसऱ्या प्लॅनची किंमत 1399 रुपये आहे. 998 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफिक्स बेसिकचे सबस्क्रीप्शन मिळते. या प्लॅनची वैद्यता 70 दिवसांची आहे तर दुसऱ्या प्लॅनमध्ये म्हणजेच 1399 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला नेटफ्लिक्सचा बेसिक सबस्क्रीप्शन मिळते या प्लॅनची वैद्यता 84 दिवसांची असते.

एअरटेलचा नेटफ्लिक्स फ्री प्लॅन | Netflix Free Subscribtion

नेटफ्लिक्सचे फ्री सबस्क्रिप्शन असणारा एअरटेलचा देखील एक प्लॅन आहे. एअरटेलच्या या प्लॅनची किंमत 1499 रुपये एवढी आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही फ्री नेटफ्लिक्स देखील पाहू शकता. या नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रीप्शनसोबत तुम्हाला दररोज 3 जीबी इंटरनेट डेटा, अनलिमिटेड वाईस कॉलिंग आणि दररोज 100 sms चा फायदा देखील मिळतो.

चंद्रकांतदादा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे; राऊतांच्या विधानाने चर्चाना उधाण

sanjay raut chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ११ जागांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे विधानभवनातं नेत्यांची मांदियाळी बघायला मिळाली. अनेक स्वपक्षीय आणि विरोधी नेते एकमेकांना भेटले, चर्चा झाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांतदादांना बघताच राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या एका विधानाने राजकीय खळबळ उडाली आहे. चंद्रकांतदादा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे असं राऊत म्हणाले. महत्वाची बाब म्हणजे त्याठिकाणी काँग्रेसचे आमदार भाई जगताप हे सुद्धा उपस्थित होते.

खरं तर संजय राऊत हे भाजपचे टोकाचे विरोधक मानले जातात. केंद्र सरकार असो व राज्य सरकार असो.. सरकारच्या चुकीच्या धोरणावर आवाज उठवण्यात संजय राऊत अग्रेसर असतात. महाविकास आघाडी सरकार असतानाही संजय राऊत भाजपच्या प्रत्येक आरोपांना उत्तरे देत होते आणि प्रत्येक वार स्वतःच्या अंगावर घेत होते. शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतरही राऊतांनी तोफ भाजप आणि एकनाथ शिंदेंवर धडाडत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत… सर्वच भाजप नेत्यांना संजय राऊत शिंगावर घेत असतात आणि महाविकास आघाडीची बाजू भक्कमपणे मांडत असतात. मात्र त्याच राऊतांनी आजच्या मतदानाच्या दिवशी चंद्रकांत पाटलांना परत एकत्र येण्याबाबत विधान केल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

यानंतर आपल्या या विधानानंतर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमच्यातील संवाद राजकीय नव्हता, चहा पिण्यासाठी एकत्र येऊया, असं म्हणायचं होतं, माझी लाईन कधीही चुकत नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले. राजकारणात आम्ही दिल्लीत मोदींना भेटतो, अमित शाह लॉबीत भेटतात. चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री आहेत. आमचे त्यांचं व्यक्तिगत भांडण नाही. ते वैचारिक भांडण आहे असं म्हणत संजय राऊत यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले. तसेच विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

Business Idea | ‘या’ व्यवसायात होईल 10 पट नफा; अशाप्रकारे करा सुरुवात

Business Idea

Business Idea | अनेक लोकांना आजकाल नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. परंतु नक्की कोणता व्यवसाय सुरू करावा? त्यासाठी किती भांडवल लागेल या सगळ्याची त्यांना माहित माहिती नसते. आमच्या लेखांमधून आम्ही नेहमीच तुम्हाला व्यवसायाच्या नवनवीन आयडिया सांगत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशाच एका बिजनेसची आयडिया घेऊन आलेला आहोत. हा एक असा बिजनेस आहे ज्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. तुम्ही मोबाईल टेम्पर्ड ग्लास बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल आहे. जेव्हा लोक मोबाईल खरेदी करतात, तेव्हा सगळ्यात आधी ग्लास बसवतात. त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनला (Business Idea) स्क्रॅच पडू नये. म्हणून टेम्पर्ड ग्लासचा वापर केला जातो. अनेक स्मार्टफोनच्या कंपन्या ह्या फोन खरेदी करताना टेम्पर्ड ग्लास देत नाही. तो वेगळा खरेदी करावा लागतो. जर तुम्ही टेम्पर्ड ग्लास बनवण्याचा व्यवसाय सुरू केला, तर त्यातून तुम्हाला खूप चांगला नफा होईल.

हे टेम्पर्ड ग्लास बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी कच्चा माल लागतो. तसेच एंटीसॉक स्क्रीन प्रोटेक्टर फिल्म आणि ऑटोमॅटिक टेम्पर्ड ग्लास मेकिंग मशीन देखील खरेदी करावी लागते. यामध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले जाते. आणि एप्लीकेशनद्वारे ते कामकरते. तसेच ते टेम्पर्ड ग्लास पॅक करण्यासाठी, विकण्यासाठी आणि पॅकिंगसाठी देखील तुम्हाला साहित्य विकत घ्यावे लागते.

घरी टेम्पर्ड ग्लास कसा बनवायचा ?

प्रगत टेम्पर्ड ग्लास मेकिंग मशीनच्या मदतीने टेम्पर्ड ग्लास बनवणे खूप सोपे आहे. त्यात सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहे. नियंत्रण अनुप्रयोगाद्वारे केले जाते. या मशिनच्या साहाय्याने टेम्पर्ड ग्लास बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम या मशीनमध्ये टेम्पर्ड ग्लास शीट बसवावी लागेल. तुम्हाला मशिन चालू करून ते तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉपला जोडावे लागेल. तुम्हाला या मशीनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कोणताही टेम्पर्ड ग्लास बनवायचा आहे. ॲपमध्ये त्या प्रकारची रचना करावी लागते. ज्यामुळे स्वयंचलित टेम्पर्ड ग्लास तयार होईल. जे तुम्हाला बाहेर काढावे लागेल आणि नंतर ते पॅक करून विक्रीसाठी पाठवावे लागेल.

टेम्पर्ड ग्लास बनवण्याची किंमत

कोणताही व्यवसाय सुरू करताना परवाना घेणे आवश्यक असते. जेणेकरून व्यवसाय सुरू केल्यानंतर कायदेशीर बाबींमध्ये कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. टेम्पर्ड ग्लास बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल. जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर हे मशीन 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असेल. काही किरकोळ खर्च जोडून तुम्ही 1.50 लाख रुपयांपेक्षा कमी खर्चात घरबसल्या सहज सुरू करू शकता.

टेम्पर्ड ग्लास व्यवसायातून किती कमाई होईल?

एक टेम्पर्ड ग्लास तयार करण्यासाठी सुमारे 10-15 रुपये खर्च येतो. बाजारात 100 ते 200 रुपये तर कधी चांगल्या दर्जाच्या नावाखाली त्याहूनही महागात विकली जाते. म्हणजे टेम्पर्ड ग्लास बनवण्याचा खर्च चहाच्या ग्लासाएवढा आहे. एकूणच, एका टेम्पर्ड ग्लासमधून 80 रुपयांपर्यंत सहज कमाई होऊ शकते. आता तुम्ही टेम्पर्ड ग्लास व्यवसायातून किती कमाई करू शकता याचा अंदाज लावू शकता.

फोनमध्ये कोणत्या प्रकारची काच वापरावी?

आजकाल बाजारात प्लॅस्टिक गार्ड, स्क्रीन गार्ड, 2D, 3D, 4D, 5D, 9D, 11D असे अनेक टेम्पर्ड ग्लासेस उपलब्ध आहेत. या सर्वांची किंमत वेगळी आहे. ती काच फोनमध्ये बसवावी. ज्यात अधिक थर आहेत. म्हणजेच ज्या काचेची जाडी चांगली आहे. अधिक लेअर्स असल्यामुळे मोबाईल फोन कुठेतरी पडला तर स्क्रीनवर दाब पडत नाही. मोबाईल स्क्रीन सेव्ह केली आहे. सर्वसाधारणपणे, स्मार्टफोन स्क्रीनसाठी 2.5D ग्लास सर्वोत्तम आहे. यामुळे त्याचे झीज होण्यापासून संरक्षण होते.

Cleaning Hacks : पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर पडलेत रंगाचे डाग ; केवळ एक ट्रिक करील कमाल

Cleaning Hacks : पांढऱ्या शुभ्र कपड्यांचे इम्प्रेशन काही औरच असते. पण कुठेही वावरताना हे पांढरे कपडे घाण होऊ नयेत किंवा त्याला कोणताही डाग लागू नये म्हणून खूप जपावं लागत. मग एखाद्या कार्यक्रमात आपलं लक्ष हे कार्यक्रमापेक्षा आपला पांढरा शुभ्र ड्रेस खराब तर होणार नाही याकडे असतो. पण आपण कितीही आपल्या ड्रेस ला जपलं तरी नकळत डाग लागतोच. मग हे हट्टी डाग जाताजात नाहीत त्यातही रंगांचे डाग खूपच चिवट असतात. मग आपण तो पांढरा शुभ्र ड्रेस (Cleaning Hacks) घालायचाच बंद करतो.

याशिवाय शाळेच्या मुलांचे कपडे सुद्धा पांढरे असतात. त्याची चमक आणि रंग जसाच्या तसा ठेवण्या शिवाय त्यावरचे हट्टी डाग काढणे मुश्किल असते. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात एक भारी फंडा सांगणार आहोत ज्यामुळे पांढऱ्या कपड्यांवरील (Cleaning Hacks) डाग निघून जातील . हा उपाय एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हा उपाय करण्यासाठी इनो आणि लिंबू हे दोन पदार्थ लागणार आहेत. सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये एकदम कडक पाणी घ्या जर तुमच्या कपड्यांना पडलेला डाग हा खूप जास्त गडद आणि मोठा असेल तर कडक पाण्यामध्ये इनोची चार पाकीट टाका. तुमच्या कपड्याच्या डागानुसार तुम्ही ईनोचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्याच गरम पाण्यामध्ये दोन लिंबांचा रस तुम्हाला टाकायचा आहे. आता हे सगळे मिश्रण (Cleaning Hacks) व्यवस्थित हलवून घ्या आणि त्या मिश्रणात तुमचा डाग पडलेला कपडा तीन ते चार तासांसाठी तुम्हाला भिजत ठेवायचा आहे.

तीन-चार तास हा कपडा भिजल्यानंतर कापड पुन्हा एकदा चांगल्या पाण्यात टाका आणि डाग जिथे पडले होते ती जागा हाताने रगडून स्वच्छ करा. जर तुमच्या कपड्यांना ब्रशने घासलेले चालणार असेल तर ब्रश वापरा या नंतर पुन्हा एकदा कपडा (Cleaning Hacks) पाणी बदलून स्वच्छ धुऊन घ्या. रंगांचे डाग हे गायब झालेले दिसतील.

Pune Zika Virus : पुणेकरांची चिंता वाढली!! झिका व्हायरस रुग्णांची संख्या 18 वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची आधी सावध करणारी बातमी आहे. धोकादायक अशा झिका व्हायरसचा धोका (Pune Zika Virus) पुण्यात वाढला आहे. पुण्यात आणखी दोन गर्भवतींना झिका व्हायरसचा संसर्ग झाला असून यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या १८ वर पोचली आहे. या दोन्ही महिला खराडी भागातील आहेत. चिंतेची बाब म्हणजे झिकाचा धोका गर्भवतींना अधिक आहे. एकूण १८ मधील १० गर्भवती महिला आहेत.

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे. ज्या भागात झिकाचा रुग्ण (Pune Zika Virus) आढळत आहे त्या भागातील गर्भवतींची वैद्यकीय तपासणी करण्यावर आरोग्य विभाग लक्ष्य घालत आहे. त्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. गुरुवारी झिका व्हायरसची जे २ रुग्ण आढळले त्यामध्ये एक २५ वर्षीय गर्भवती महिला आहे तर दुसरी महिला ३२ वर्षाची आहे. यातील एक महिला २२आठवड्यांची गर्भवती आहे तर दुसरी महिला १८ आठवड्यांची गर्भवती आहे. या दोघींच्याही ॲनोमली स्कॅन अहवाल चांगले आलेले आहेत. या दोघींना कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत

पुण्यात झिकाचे थैमान – Pune Zika Virus

दरम्यान, पुणे शहरात झिका व्हायरसने थैमान घातलं आहे. आत्तापर्यंत झिकाचे एकूण १८ रुग्ण आढळले असून यामध्ये सर्वात जास्त ६ रुग्ण एरंडवणे परिसरातील आहेत. त्यानंतर पाषाण आणि खराडी भागात प्रत्येकी ३, मुंढव्यात २ तर डहाणूकर कॉलनी, उजवी भुसारी कॉलनी, आंबेगाव बुद्रुक आणि कळस परिसरात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. शहरापाठोपाठ पुण्याच्या ग्रामीण भागात सुद्धा झिकाचा शिरकाव झाला आहे. सासवडमध्ये एका ६५ वर्षीय पुरुषाला झिका व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्याला २४ जूनपासून त्रास होऊ लागला. त्यामुळे सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात आणि नंतर पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्तापर्यन्त पुण्यात ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आलाय त्या परिसरात आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. मात्र दिवसेंदिवस झिका व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला असून यामुळे पुणेकरांची चिंता चांगलीच वाढली आहे.

AAI : भारत विमानतळांची संख्या दुप्पट करणार ; 2047 पर्यंत 300 चा आकडा गाठण्याचे उद्दिष्ट

AAI : भारतामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हवाई मार्गाचा वापर वाढू लागला आहे. प्रवाशांचीही वाढती संख्या लक्षात घेऊन विमानतळांची संख्या वाढवण्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. सध्या आकडेवारीनुसार आठ पट वाढ अपेक्षित असून 2047 पर्यंत विमानतळांची संख्या दुप्पट करून 300 पर्यंत नेण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. याबाबतचा अळवाल मिंटने प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार यामध्ये विमानतळाचे विस्तारीकरण (AAI) आणि नवीन बांधणी यांचा समावेश असेल

अपुऱ्या जागेत ग्रीनफिल्ड विमानतळ बांधण्याचा विचार (AAI)

मसुद्याच्या आराखड्यानुसार, एअरबस A320 आणि बोईंग 737 सारख्या मॉडेल्ससह, अरुंद-बॉडी विमानांना सामावून घेण्यास सक्षम असलेल्या विमानतळांमध्ये अंदाजे 70 हवाई पट्ट्या विकसित केल्या जाणार आहेत. याव्यतिरिक्त, लहान विमानांना सेवा देण्यासाठी सुमारे 40 एअरस्ट्रिप अपग्रेड केले जाऊ शकतात. अहवालात पुढे असे म्हटले आहे की ज्या प्रकरणांमध्ये हवाई पट्टी विकसित केली जाऊ शकत नाही किंवा जेथे 50 किलोमीटरच्या परिघात कोणतेही नागरी विमानतळ अस्तित्वात नाही, तेथे नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ बांधण्याचा (AAI) विचार केला जाईल.

प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता (AAI)

सध्या, भारतात 138 कार्यरत विमानतळ आहेत. अहवालात एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सांगितले आहे की, “यामध्ये ग्रीनफिल्ड विमानतळांचे मिश्रण आणि विद्यमान नागरी परिसरांचा पूर्ण क्षमतेने कार्यरत विमानतळांमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.” AAI च्या राष्ट्रीय विमानतळ विकास योजनेच्या मसुद्यानुसार, वार्षिक प्रवासी संख्या लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे, 2047 पर्यंत 3 अब्ज ते 3.5 अब्ज पर्यंत पोहोचेल, सध्याच्या 376 दशलक्ष वरून. आंतरराष्ट्रीय रहदारी या एकूण 10-12 टक्के असण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, एकूण देशांतर्गत रहदारीची गणना करताना देशांतर्गत प्रवासी संख्या दुप्पट केली जाते, आगमन आणि निर्गमन या दोन्हीसाठी खाते, तर आंतरराष्ट्रीय प्रवासी (AAI) एकदाच मोजले जातात.

प्रस्तावित सुधारणा आणि नवीन विमानतळ (AAI)

अहवालात आणखी एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, “हे अंदाज विविध गृहितकांवर आणि गतिमान घटकांवर आधारित आहेत. हे प्राथमिक मूल्यांकन आहे आणि कोणत्याही कारणामुळे परिस्थिती बदलल्यास संख्या नंतर बदलू शकते. मसुद्यात असे सुचवण्यात आले आहे की सध्या मांडवी (गुजरात), सुलतानपूर (उत्तर प्रदेश), तुरा (मेघालय) आणि छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे असलेल्या हवाई पट्ट्यांचे प्रारंभिक मूल्यमापनाच्या आधारे छोट्या विमानांच्या ऑपरेशनसाठी योग्य विमानतळांमध्ये रूपांतर केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, कोटा (राजस्थान), परांदूर (तामिळनाडू), कोट्टायम (केरळ), पुरी (ओडिशा), पुरंदर (महाराष्ट्र), तसेच अंदमानमधील कार निकोबार आणि मिनिकॉय बेटांवर नवीन ग्रीनफिल्ड विमानतळांची स्थापना करण्याचा प्रस्ताव आहे. निकोबार, अहवालात म्हटले आहे.

जागतिक हवाई वाहतूक

AAI द्वारे केलेल्या प्रारंभिक मूल्यमापनात यूएस आणि चीनमधील विमानतळ कनेक्टिव्हिटीची स्थिती देखील तपासली गेली, जे दोन्ही मोठ्या हवाई प्रवासी बाजारपेठांचा अभिमान बाळगतात आणि वाढत्या उत्पन्नासह वाढत्या प्रवासाचा ट्रेंड दर्शवितात. 2019 मध्ये, चीनचे दरडोई उत्पन्न $10,144 सह प्रति व्यक्ती वार्षिक सरासरी 0.47 ट्रिप होते, तर US मध्ये दरडोई $20,000 च्या GDP सह वार्षिक 1.2-1.3 ट्रिप नोंदवली गेली, असे अहवालात म्हटले आहे. 2047 च्या प्रतिक्षेत, $18,000-20,000 च्या अंदाजे दरडोई उत्पन्नासह, भारत दरवर्षी प्रति व्यक्ती सरासरी एक ट्रिप साध्य करेल, तोपर्यंत संभाव्यतः 3 अब्ज प्रवाशांना सामावून घेईल, असे अहवालात म्हटले आहे.

Government Scheme | सरकारच्या ‘या’ योजनांमधून शेतकऱ्यांना मिळतो आर्थिक लाभ; जाणून घ्या सविस्तर

Government Scheme

Government Scheme | आपल्या भारत देशाला कृषिप्रधान देश असे म्हटले जाते. कारण भारतातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी शेतात अन्न पिकवतो. म्हणूनच सगळे अन्न खाऊ शकतात. परंतु शेती करताना देखील शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यांसमोरील एक मोठे आव्हान आहे. आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे शेती करता येईल. त्याचप्रमाणे त्यांचे उत्पन्न देखील चांगले होणार आहे. अनेक लोकांना केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना ही माहित आहे. परंतु या योजनेशिवाय सरकारच्या (Government Scheme) अशा अनेक योजना आहेत. ज्याचा शेतकऱ्यांना लाभ होतो. आता याच योजनेबद्दल आपण जाणून घेऊया.

किसान क्रेडिट कार्ड योजना

क्रेडिट कार्ड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत करते. क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी शेतीसाठी सहज कर्ज घेऊ शकतात. यातील व्याजदरही खूपच कमी आहे. क्रेडिट कार्ड हा एक प्रकारचा कार्ड आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना क्रेडिट मर्यादा दिली जाते जी ते त्यांच्या कृषी क्रियाकलापांमध्ये वापरू शकतात. शेतकऱ्यांना ही रक्कम ठराविक वेळेनंतर भरावी लागते, जर शेतकरी वेळेवर बिल भरू शकले नाहीत. तर त्यांच्यावर अगदी कमी व्याज आकारले जाते.

पंतप्रधान पीक विमा योजना | Government Scheme

अनेक वेळा शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत अनेकवेळा शेतकऱ्यांचे शेतीत नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेची भेट देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील नुकसानीची भरपाई दिली जाते आणि त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाते. या योजनेची माहिती कोणत्याही शेतकरी सल्लागाराकडून मिळू शकते.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना

शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी सिंचन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. या योजनेंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जातात. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात पाण्याचे स्प्रिंकलर, ठिबक सिंचन यंत्रणा तसेच इतर सिंचन उपकरणे बसवू शकतात. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना सहज मिळू शकतो.

प्रधानमंत्री कुसुम योजना | Government Scheme

खेड्यापाड्यातील विजेची समस्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांना शेती करताना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागू नये आणि शेतांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी शासनाने कुसुम योजना सुरू केली होती. या योजनेत शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाते, त्यासाठी त्यांना अनुदानही दिले जाते. या सोलर पॅनलमुळे शेतकरी सहजपणे वीज निर्मिती करू शकतात आणि उत्पादित वीज विकून उत्पन्नही मिळवू शकतात. या योजनेंतर्गत शेतकरी सौर पंप देखील खरेदी करू शकतात

Suzuki Electric Scooter : Suzuki भारतात लाँच करणार पहिली Electric Scooter; काय फीचर्स मिळणार?

Suzuki Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २ वर्षांपासून भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती पाहायला मिळत आहे. पेट्रोल डिझेलच्या खर्चापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. गर्भकांची वाढती मागणी बघता जवळपास सर्वच वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जगातील आघाडीची कंपनी Suzuki लवकरच आपली पहिली Electric Scooter भारतात लाँच (Suzuki Electric Scooter) करणार आहे. Suzuki कंपनीच्या गाड्या भारतीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. त्यामुळेसुजूकीच्या इलेक्ट्रिक गाडीला सुद्धा ग्राहकांचा चांगला पाठिंबा मिळेल असं बोललं जातंय.

कधी लाँच होणार सुजूकीची इलेक्ट्रिक स्कुटर? Suzuki Electric Scooter

रिपोर्टनुसार, XF091 असं या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव असू शकते. कंपनी या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन सुरू करू शकते. त्यानंतर सुजूकीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर 2025 च्या पहिल्या तिमाहीत लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनी दरवर्षी या स्कूटरच्या 25 हजार युनिट्सचे उत्पादन करू शकते. खास बाब म्हणजे भारतीय बाजारपेठेतील इतर इलेक्ट्रिक स्कूटरप्रमाणे सुझुकीची ही इलेक्ट्रिक स्कूटर (Suzuki Electric Scooter) फिक्स बॅटरी पॅकसह लाँच होऊ शकते.

सुझुकीच्या या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये नेमकी किती पॉवरची बॅटरी असेल? एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ती किती किलोमीटर अंतर पार करेल आणि या स्कुटरचा लूक आणि डिझाईन कस असेल याबाबत कोणतेही डिटेल्स समोर आलेले नाहीत. सुझुकीने वर्षभरापूर्वी ई-बर्गमन स्कूटरची झलक दाखवली होती. ही स्कूटर स्वैपेबल बॅटरी पॅकसह आली होती मात्र भारतात लाँच होणारी स्कुटर मात्र त्यापेक्षा वेगळी असेल असं बोललं जातंय. सध्या भारतीय बाजारात ओला, अथर बजाज कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटर चांगल्याच फॉर्मात आहेत आणि त्यांची विक्रीही जोरदार होत आहे. आता सुजूकीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर भारतात लाँच केल्यानंतर या इतर कंपन्यांना फटका बसू शकतो.

UPI Credit Card | आता बँकेत पैसे नसताना करता येणार शॉपिंग; UPI करणार क्रेडिट कार्डप्रमाणे काम

UPI Credit Card

UPI Credit Card | मोदी सरकारने डिजिटल इंडिया केल्यापासून सगळे आर्थिक व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. देशातील बहुतांश लोक हे UPI चा वापर करून सगळे पेमेंट्स करत असतात. तुमच्या बँक खात्यात किंवा पैसे असतात तेव्हा तुम्ही UPI चा वापर करून तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी विकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे दुसऱ्यांना पैसे पाठवू शकता आणि घेऊ देखील शकता. त्याचप्रमाणे शॉपिंगला गेल्यावरही आजकाल सगळ्या शॉपमध्ये UPI स्कॅनर (UPI Credit Card) असतो. ज्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. परंतु जर आता इथून पुढे तुमच्या खात्यामध्ये पैसे नसले. तरी देखील तुम्ही UPI च्या मदतीने तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी सहज खरेदी करू शकणार आहात.

कारण NPCI RBI च्या मदतीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध केली आहेत. तुम्ही देखील UPI वापरत असा, तर ही सुविधा तुम्हाला तुमच्यासाठी देखील असणार आहे. पहिल्यांदाच UPI युजरसाठी ही एक नवीन सुविधा आलेली आहे. ती म्हणजे आता तुम्ही तुमचे UPI हे क्रेडिट कार्ड (UPI Credit Card) प्रमाणे वापरू शकणार आहात. म्हणजेच तुमच्याकडे पैसे नसेल तरी देखील तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी विकत घेऊ शकणार आहात.

सुविधा कोणाला मिळणार ? | UPI Credit Card

NPCI ने आणलेली ही सुविधा काही निवडक बँकांना मिळणार आहे. यामध्ये तुमचे UPI अकाउंट हे एका क्रेडिट कार्ड प्रमाणे काम करणार आहे. ही सिस्टीम Buy Now, Pay Later यावर आधारित असणार आहे. भारतीय रिझर्व बँकेने काही बँकांनाही सुविधा देण्यासाठी परवानगी देखील दिलेली आहे.

कोणत्या बँकांचा समावेश ?

यूपीसीआयने आणलेली ही सुविधा अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक आणि पीएनबी या बँकांना असणार आहे. केवळ या बँकेचे ग्राहक UPI द्वारे या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहे.

या सुविधेअंतर्गत बँकेकडून तुम्हाला एका मर्यादेपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. बँकेने दिलेल्या मुदतीत हे कर्ज तुम्हाला परत द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे खर्च केलेल्या रकमेचे व्याज देखील तुम्हाला भरावे लागणार आहे. तुम्हाला जर दुकानात काही वस्तू खरेदी करायची असेल, आणि तुमच्याकडे पैसे नसेल, तर तुम्ही या सुविधेचा वापर करू शकता.