Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 609

Gallstones | पित्ताशयातील खडे कशामुळे होतात ? जाणून घ्या कारणे आणि उपचार

Gallstones

Gallstones | आजकाल पित्ताशयातील खडे ही एक सामान्य समस्या बनत चाललेली आहे. जगातील कितीतरी लोकांना ही समस्या उद्भवत असते. या स्थितीमध्ये तुमच्या पित्ताशयामध्ये लहान आकाराचे काही खडे तयार होतात. ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास देखील होतो. परंतु याबाबत अनेक गैरसमज देखील आहे. पित्त आणि मूत्राशया हा तुमच्या यकृताखालील एका अवयव आहे. ज्यामध्ये पित्त साठवले जाते आणि सोडले देखील जाते. पित्ताचे खडे (Gallstones) आणि किडनी स्टोन हे खूप वेगळे असतात. हे खडे कॅल्शियमऐवजी कोलेस्ट्रॉलपासून बनले जातात. त्यामुळे त्यांची लक्षणे देखील वेगळी असतात. त्याला पित्ताशयाचा खडा असे म्हणतात पित्ताच्या आत असलेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्याने पित्ताक्षराचे प्रमाण कमी असते.

पित्तामध्ये कोलेस्ट्रॉल आणि इतरही रासायनिक द्रव्य असतात. या सगळ्यांमध्ये जेव्हा असमतोल निर्माण होतो. तेव्हा पित्ताशयाचे खडे तयार होतात. बहुतेक वेळा पित्तामधील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, तेव्हा हे खडे तयार होतात.

पित्ताशयातील खड्यांची लक्षणे | Gallstones

पित्ताशयामध्ये खडे तयार झाले की, पोटात तीव्र वेदना होतात. त्याचप्रमाणे पोटातून डाव्या खांद्याकडे आणि पाठीकडे ह्या वेदना जातात. जेवल्यानंतर जेव्हा तुम्ही चरबीयुक्त पदार्थ म्हणजे असतील तूप असे पदार्थ खाता. तेव्हा या वेदना जास्त वाढतात पोटात टोचल्यासारखे वाटते. जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता, तेव्हा देखील वेदना होतात. पित्ताशयाच्या खड्यांमुळे छातीत दुखणे, छातीत जळजळ होणे, अपचन होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, उलट्या, ताप, मळमळ यांसारखी लक्षणे दिसतात.

पित्ताशयातील खड्याची कारणे

जेव्हा शरीरात गरजेपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल निर्माण होते. तेव्हा ते अतिरिक्त कोलेस्ट्रॉल क्रिस्टल होते आणि पुढे जाऊन त्याचे खडे तयार होतात.

जोखमीचे घटक कोणते ? | Gallstones

ज्या व्यक्तीचे वय 40 पेक्षा जास्त आहे. त्यांना पित्ताशयाच्या खड्यांचा जास्त धोका उद्भवतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांना पित्ताशयातील खड्यांची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे अतिरिक्त लठ्ठपणा असलेल्या व्यक्तीला देखील पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर जास्त चरबीयुक्त जेवण, उच्च कोलेस्ट्रॉलचे जेवण खात असाल, तरी देखील पित्ताशयातील खड्यांची निर्मिती होते. तसेच मधुमेह, यकृत्याचे आजार आणि रक्त विकार असणाऱ्या व्यक्तींना देखील पित्ताशयाचे खडे होतात.

यावर उपचार काय ?

हे कोलेस्ट्रॉलचे खडे विरघळण्यासाठी काही ठराविक औषधे देखील दिली जातात. परंतु ही औषधे दरवेळी प्रभावी ठरतील, याची खात्री नाही. त्याचप्रमाणे पित्ताशयातील खड्यांसाठी सगळ्यात सामान्य उपचार म्हणजे पित्ताशयाची शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी पित्ताशय काढून टाकने हाच एक पर्याय असतो.

PF Intrest Rate | PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ; व्याजदरात झाली 0.8 टक्के दराने वाढ

PF Intrest Rate

PF Intrest Rate | खाजगी नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची EPFO खाते असते. याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना असे म्हणतात. यामध्ये कर्मचाऱ्याचा दर महिन्याच्या पगारातील काही रक्कम ही EPFO खात्यात जमा केली जाते. आता या सदस्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता केंद्रीय अर्थमंत्रालयाने PF वरील (PF Intrest Rate) ठेवींवर व्याजदरात वाढ करण्यास मंजुरी दिलेली आहे. PF वर आता 8.25 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

फेब्रुवारीमध्येच EPFO यांनी 2023- 24 या वर्षासाठी 8.25% व्याज देण्याची घोषणा केली होती. परंतु आता अर्थ मंत्रालयाने या घोषणेस मंजुरी देखील दिलेली आहे. एक्सवर EPFO कडून याबाबत माहिती देखील शेअर करण्यात आलेली आहे 2023- 24 या आर्थिक वर्षासाठी PF वरील व्याजदर 0.10% दराने वाढ करण्यात आलेली आहे.

याआधी PF (PF Intrest Rate) वरील व्याजदर हे 8.15% एवढे होते. परंतु आता त्यामध्ये वाढ करून 8.25 टक्के एवढा करण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयांकडे देखील पाठवला होता. आणि त्यालाच त्यांनी मंजुरी दिलेली आहे. त्यांना वर्षातून एकदाच व्याज दिले जाते. हे व्याज त्यांना आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्च रोजी दिले जाते.

Pune Real Estate : पुण्याच्या इतिहासातील सर्वाधिक महागडी डील ! 37 कोटींना विकलं गेलं घर

Pune Real Estate : मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राचा विचार करता मुंबई मध्ये घरांची किंमत सर्वात जास्त आहे. मात्र त्या पाठोपाठ पुण्यात सुद्धा घरांच्या किंमतीत सर्वात जास्त वाढ झाली आहे. पुण्यामध्ये घरांच्या मागणीतही वाढ झाली आहे. आयटी सिटी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आलिशान घरांना मागणी आहे. शहराचा पसारा आणि जागेंचे दर हे सातत्याने वाढताना दिसत आहेत. सध्या पुण्यामध्ये घर घ्यायच झाल्यास त्याची किंमत 50 लाख ते 1 कोटींच्या आसपास आहे. अशातच पुण्यामधील एक मोठी प्रॉपर्टी डील सध्या चर्चेचा विषय बनली आहे. पुण्याच्या इतिहासातील ही सर्वात महागडी डील ठरली आहे. पुण्यामध्ये तब्बल 37 कोटींना (Pune Real Estate) एक पेंट हाऊस विकलं गेलं आहे. चला जाणून घेउया या डील बाबत अधिक माहिती…

आता पुण्यामध्ये हे पेंट हाऊस कुठे आहे? तर हे पेंट हाऊस बंद गार्डन येथील ‘लोढा वन’ येथे आहे. हे पेंट हाऊस 12000 स्क्वेअर फुटांचे आहे आणि रेरा मध्ये नोंदणी नुसार या पेंट हाऊसची प्रती स्क्वेअर फुट किंमत ही 28 हजार ते 29 हजार रुपये अशी मोजण्यात आलेली आहे. हे पेंट हाउस तब्बल 37 कोटींना विकलं गेलं आहे. बांधकाम व्यवसायिक क्षेत्रात मोठे नाव असलेल्या लोढा बिल्डर्स साठी (Pune Real Estate) मार्कोटेक डेव्हलपर्स च्या माध्यमातून या घराची विक्री करण्यात आल्याची माहिती आहे.

पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी डील (Pune Real Estate)

तसे पाहायला गेल्यास मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांमध्ये म्हणजे एप्रिल 2022 ते आतापर्यंत पुण्यामध्ये अशा प्रकारची एकूण 32 घरं विक्री केली गेली आहेत ज्या घरांची किंमत दहा कोटींपेक्षा अधिक होती. याबाबतची माहिती त्यांच्या करारनाम्यावर दिली गेली होती. पुण्याच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात महागड्या घराची किंमत ही 18.5 कोटी रुपये इतकी होती. आता हा विक्रम मोडला असून नोंदणी नंतर रेरानुसार लोढा वन बंड गार्डन येथील पेंट हाऊस साठी प्रतिस्केअर फुट 28 हजार ते 29 हजार रुपयांचा दर मोजण्यात आला असून या प्रॉपर्टीची विक्री ही 37 कोटी रुपयांना झाली आहे. कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रिकात म्हटलं आहे की या स्तरावरील प्रॉपर्टीचा (Pune Real Estate) हा सर्वाधिक दर आहे. 37 कोटींच्या या पेंट हाऊसला ‘एम्परर पॅलेस’ असं नाव देण्यात आला आहे.

कोणत्या सुविधा? (Pune Real Estate)

पुण्यामध्ये असणारी जमिनीची कमतरता आणि लक्झरीस घरांची मागणी या दोन्ही बाबी लक्षात घेता लोढानं बंडगार्डन इथं लक्झुरिअस प्रोजेक्ट आणला आहे. यामध्ये अनेक लक्झरी सुविधा देखील देण्यात आलया आहेत. खाजगी टेरेस, स्विमिंग पूल देखील देण्यात (Pune Real Estate) आले आहेत. तसेच लोढाचे खाजगी हॉस्पिटलिटी सर्विस देखील या प्रोजेक्टमध्ये देण्यात आली आहे.

लोढा वन हा पुण्यातील सर्वात लक्झरीस प्रॉपर्टी पैकी एक आहे. लोढा वन हा पुण्यातील कॅम्प परिसरामधील सर्वात उंच असा टॉवर आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टमध्ये 150 वर्षे जुनी दोन महाकाय वडाचे झाड देखील (Pune Real Estate) आहेत.

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत बदल; आजचे भाव इथे चेक करा

Gold Price Today 12 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शुक्रवार १२ जुलै २०२४ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) बदल बघायला मिळाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आज १० ग्राम २४ कॅरेट सोने 73110 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर एक किलो चांदीचा भाव 93312 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा दर 73,750 आहे, तर १० ग्राम २२ कॅरेट सोने 67,600 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव ७३१४० रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमतीत (Gold Price Today) मोठा चढउतार पाहायला मिळाला. ११ वाजून ७ मिनीटांनी सोन्याच्या किमतींनी ७३०१५ रुपयांची निच्चांकी पातळी गाठली. यानंतर या दरात थोडीफार वाढ पाहायला मिळाली असून सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोने ७३०८२ रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमती थोड्याफार घसरल्या आहेत त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांसाठी हि आनंदाची गोष्ट आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 67,600 रुपये
मुंबई – 67,600 रुपये
नागपूर – 67,600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 73,750 रूपये
मुंबई – 73,750 रूपये
नागपूर – 73,750 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Indian Bank Bharti 2024 | इंडियन बँकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अशाप्रकारे करा अर्ज

Indian Bank Bharti 2024

Indian Bank Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा सगळ्यांनाच फायदा होत असतो. अशातच आता एक नवीन संधी आलेली आहे. ती म्हणजे इंडियन बँक अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 1500 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्रांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा.

महत्त्वाची माहिती | Indian Bank Bharti 2024

  • पदाचे नाव – अप्रेंटिस
  • पदसंख्या – 1500 जागा
  • वयोमर्यादा – 20 – 28 वर्षे
  • अर्ज शुल्क –
  • General/OBC/EWS – 500/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024

अर्ज कसा करावा ? | Indian Bank Bharti 2024

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
  • 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Anant Ambani Wedding: अंबानी यांच्या लग्नसोहळ्यामुळे मुंबईत 3 दिवस वाहतुकीत बदल ; काय असतील पर्यायी मार्ग ?

Anant Ambani Wedding: आज दिनांक 12 जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह प्रसिद्ध उद्योगपती एन्कोर हेल्थकेअर सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्यासोबत होणार आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या भव्य अंबानी विवाह सोहळ्याच्या (Anant Ambani Wedding) पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 12 ते 15 जुलै दरम्यान ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केली आहे.

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, लग्न समारंभात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आणि इतर हाय-प्रोफाइल पाहुणे उपस्थित राहणार असल्याने अनंत अंबानींच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरजवळ वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात येईल. त्यामुळे आज दिनांक 12 जुलै दुपारी एक वाजल्यापासून ते 15 जुलै मध्यरात्रीपर्यंत (Anant Ambani Wedding) बीकेसी परिसरात वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तर येथील मार्गाला पर्यायी मार्ग सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहेत.

काय असेल वाहतुकीत बदल? (Anant Ambani Wedding)

  • अंबानी चौक ते लक्ष्मी टॉवर जंक्शन पर्यंतचा लतिका रस्ता वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आलेला आहे.
  • कौटिल्य भवन ते अमेरिकन कन्सुलेट पर्यंत अवेन्यू 3 रोडवर एकेरी वाहतूकीची सुविधाही असेल.
  • भारत नगर, वन बीकेसी वि वर्क्स गोदरेज येथून येणारी वाहतूक जिओ कन्वेंशन सेंटर गेट क्रमांक २3 वर प्रतिबंधित असणार आहे. येथून वाहतूक युएस कॉन्सुलेट,एमटीएनएल जंक्शन कडे जाईल.
  • अमेरिकन दूतावास, जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बीकेसी कनेक्टर कडे जाताना एमटीएनएल जंक्शन (Anant Ambani Wedding) कडून येणारी वाहतूक सन टेक बिल्डिंग इथं थांबवण्यात आली आहे.
  • कुर्ला जंक्शन, एमटिएनएल जंक्शन, प्लेटिना जंक्शन,डायमंड जंक्शन येथून धीरूभाई अंबानी चौकातील (Anant Ambani Wedding) बीकेसी कनेक्टर कडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. या भागात लग्नासाठी आमंत्रित केलेल्या लोकांचीच वाहन इथं प्रवेश करू शकतील.
  • पर्यायी मार्ग म्हणून कुर्ला एमटीएनएल जंक्शन, प्लेटिना जंक्शन, डायमंड जंक्शन इथून येणारे वाहन चालक नाबार्ड जंक्शन येथून डावीकडे वळून डायमंड गेट क्रमांक आठ मधून पुढे जातील.
  • शिवाय पर्याय म्हणून वन बीकेसी कडून येणारी वाहने लक्ष्मी टॉवर जंक्शन, डायमंड गेट क्रमांक आठ, नाबार्ड जंक्शन येथून डावीकडे वळू शकतात. डायमंड जंक्शन पासून उजवीकडे वळून धीरूभाईअंबानी चौकातून बीकेसी कडे जाता येईल.
  • लक्ष्मी टॉवर जंक्शन, धीरूभाई अंबानी स्क्वेअर, अवेन्यू लेन 3 ,इंडियन ऑइल पेट्रोल पंप, डायमंड जंक्शन ,हॉटेल ट्रायडेंट कडून कुर्ला एमटीएनएल कडे जाणाऱ्या वाहतुकीवर बंदी असणार आहे. लग्नासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्या वाहनांनाच इथे परवानगी (Anant Ambani Wedding) असणार आहे.

रोहित- विराट नव्हे तर ‘हा’ आहे भारताचा सर्वश्रेष्ठ फलंदाज; अँडरसनने स्पष्टच सांगितलं

James Anderson on Sachin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडकडून आपली १८८वी आणि शेवटची कसोटी खेळणारा दिग्गज जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) महान फलंदाज म्हंटल आहे. स्काय स्पोर्ट्स’शी बोलताना अँडरसन म्हणाला कि सचिनविरुद्ध माझा काही विशिष्ट गेम प्लॅन होता हे मला आठवत नाही. एकदा का सचिन मैदानावर आला कि हाच विचार करायचो कि आता आपण खराब चेंडू टाकू शकत नाही. कारण तो सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे.

अँडरसन म्हणाला, त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने महान भारतीय फलंदाज सचिनविरुद्ध गोलंदाजी करण्याचा सर्वाधिक आनंद घेतला. अँडरसनने भलेही सचिनला ९ वेळा बाद केले असेल पण तो सचिन विरुद्ध कोणताही प्लॅन निश्चित करू शकला नाही. सचिन तेंडुलकर भारताचा महत्त्वाचा खेळाडू होता. जर तुम्ही त्याला भारतात बाद केले तर मैदानाचे संपूर्ण वातावरणच बदलत होते इतकी त्याची विकेट खूप मोठी असायची असं अँडरसन म्हणाला. तुम्ही नेहमी तुमची सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करता आणि आशा करता तो सरळ चेंडूवर चुकेल. इंग्लंडमध्ये तो बॅटने एक किंवा दोनदा चेंडूला स्पर्श करायचा पण साधारणपणे मी त्याला लवकर एलबीडब्ल्यू आऊट करण्याचा प्रयत्न करत होतो असं अँडरसन म्हणाला. .

दरम्यान, अँडरसनने भारताविरुद्धच्या 39 कसोटी सामन्यांमध्ये 149 बळी घेतले, भारताविरुद्ध त्याने तब्बल ६ वेळा वेळा एकाच डावात ५ बळी घेतले. तर दुसरीकडे सचिनची बॅट सुद्धा इंग्लंड विरुद्ध नेहमीच तळपली. सचिन आपल्या एकूण कारकिर्दीत इंग्लंडविरुद्धच्या 32 कसोटी सामन्यांमध्ये 51.73 च्या सरासरीने 2,535 धावा केल्या. यामध्ये सात शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. एकूणच काय तर दोन्ही महान खेळाडू एकमेकांविरोधात खूपच चांगलं प्रदर्शन करत होते.

Weather Update | महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह ‘या’ ठिकाणांना ऑरेंज अलर्ट जारी

Weather Update

Weather Update | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दल रोज माहिती देत असते. अशातच आता हवामान विभागाने आज म्हणजे 12 जुलै रोजी होणाऱ्या हवामानाचा अंदाज दिलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे.

विदर्भाला देखील हवामान विभागाने पावसाचा 9Weather Update) इशारा दिलेला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पडणार आहे. तसेच या ठिकाणी वादळी वाऱ्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.bया ठिकाणी अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितलेले आहे.

मराठवाड्यात देखील आज विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई दिल्लीमध्ये आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे येत्या 24 तासात मुंबईत मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे हवामान विभागाकडून ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.

विधानपरिषद निवडणुकीत कोणाला मतदान करणार? बच्चू कडू यांनी सगळंच सांगून टाकलं

Bacchu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election 2024) आज पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे कोणाचा बळी जाणार? कोण विजयी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे. मतांचे एकूण गणित बघितल्यास मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदान हे गुप्त पद्धतीने होणार असल्याने फोडाफोडीचे राजकारण बघायला मिळू शकते. याच दरम्यान, मतदान करण्यापूर्वी प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मीडियाशी संवाद साधत आपण कोणाला मतदान करणार तेच सांगून टाकलं आहे.

बच्चू कडून म्हणाले, आम्ही दोन वर्ष शिंदे साहेबांसोबत आहोत. आताही त्यांच्यासोबत आहे. एकनाथ शिंदेनी मतदारसंघात भरपूर निधी दिला. त्याची जाण ठेऊन आम्ही मतदान करणार आहे. मी माझी गॅरेटी घेतो. मी स्वत: आणि राजकुमार पटेल आम्ही दोघे शिंदे साहेबांसोबत जाऊन मतदान करणार आहोत. भावना गवळी आणि कृपाल तुमाने या दोघांना आम्ही मतदान करणार. दोघे विदर्भाचेच आहेत असं बच्चू कडू यांनी सांगितलं. एकनाथ शिंदेचे दोन्ही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील, आमचं एकही मत फुटणार नाही. मात्र इतरांचे मला सांगता येत नाही” असेही बच्चू कडू यांनी म्हंटल.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. तर शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने याना संधी देण्यात आली आहे तर अजित दादा गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीबाबत सांगायचं झाल्यास, काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सातव, शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना संधी देण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा असेल. त्यामुळे महाविकास आघाडीला आणखी ४ ते ५ जागांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

Ajawin Water | वजन कमी करण्यासाठी ओवा करेल झटपट मदत; अशाप्रकारे करा सेवन

Ajawin Water
Ajawin Water

Ajawin Water | लोकांची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे लोकांच्या अनेक शारीरिक समस्या देखील बदललेल्या आहेत. या बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा हा अनेक रोगांचे मुख्य कारण बनलेले आहे. लोकांची बैठे जीवनशैली त्याचप्रमाणे स्ट्रीट फूड जास्त प्रमाणात खाणे. ज्यामुळे लोकांच्या शरीरावर परिणाम विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे लोकांचा लठ्ठपणा दिवसेंदिवस वाढतच आहे.

एकदा लठ्ठपणा वाढला की, लठ्ठपणासोबत अनेक आजार देखील येतात. त्यामुळे अनेक लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रयत्न करत असतात. वजन कमी करण्यापेक्षा वजन नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे असते. परंतु जिम करणे किंवा डायट करूनही अनेक लोकांचे वजन नियंत्रणात येत नाही. आता यावर नक्की काय करावे हे सुचत नाही. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहोत.

तुमच्या देखील वजन खूप वाढले असेल, किंवा पोटाची चरबी जास्त वाढली, असेल तर तुम्ही दररोज ओव्याचे पाणी (Ajawin Water) पिऊ शकता. ओव्याचे पाणी पिणे हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार असे अजून आलेली आहे की, ओव्यामध्ये ऍक्टिव्ह एन्झाईम असते पचनासाठी उत्तम असणाऱ्या गॅस्ट्रिक ज्यूस तयार करते. त्यामुळे आपली चयापचेक क्रिया देखील खूप चांगली होते.

त्याचप्रमाणे तुम्ही जेवणानंतर एक चिमूटभर ओवा खाल्ला आणि त्यावर जर कोमट पाणी पिले, तर तुमची पचनक्रिया देखील खूप चांगली होते. ओवयमध्ये अनेक घटक असतात. तसेच पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. आणि खूप देखील लागत नाही. त्यामुळे आपले वजन देखील कमी होते.

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही दररोज ओव्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही एक टीस्पून ओवा (Ajawin Water) रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. रात्रभर भिजवलेले हे पाणी सकाळी उकळा आणि कोमट झाल्यानंतर त्यात तुम्ही दिवसाची सुरुवात हे पाणी पिऊन करू शकता. त्यानंतर तुमचे वजन अगदी महिन्याभरातच कमी होईल.