Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 610

भूस्खलनामुळे 2 बस नदीत वाहून गेल्या; 63 प्रवासी बेपत्ता

Nepal Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेपाळमध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना (Nepal Bus Accident) घडली, मध्य नेपाळमधील मदन-आशीर महामार्गावर दरड कोसळल्याने दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. या दोन्ही बस मध्ये मिळून तब्बल 63 प्रवासी प्रवास करत होते. नदीतील जोरदार प्रवाहामुळे बस वाहून गेल्याचे सांगण्यात येत असून, सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. नेपाळच्या पंतप्रधानानी मदत आणि बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नेपाळमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु असून नाले, नदी दुथडी भरून वाहत आहेत. याच दरम्यान, आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. मदन-आश्रित महामार्गावर हि दरड कोसळून भूस्सखलन झालं आणि यामध्ये दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही बसमध्ये बस चालक आणि कंडक्टरसह एकूण 63 जण प्रवास करत होते. बचावकार्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मात्र परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत.

चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, बसेस महामार्गावरून जात असताना भूस्खलनाने त्या नदीत गेल्या. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही बसमध्ये बस चालक आणि कंडक्टरसह एकूण 63 जण प्रवास करत होते. बचावकार्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मात्र परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी सर्व सरकारी यंत्रणांना बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा शोध आणि सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.

Immunity Booster Drinks | पावसाळ्यात सिझनल फ्लूचा बळी व्हायचे नसेल, तर हे इम्युनिटी बूस्टर ड्रिंक्स नक्की प्या

Immunity Booster Drinks

Immunity Booster Drinks | पावसाळा हा ऋतू सगळ्यांना खूप जास्त आवडतो. परंतु पावसासोबत अनेक आजार देखील येतात. पावसामध्ये अनेक विषाणूंची वाढ होते. त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास होतो. पावसाळ्यामध्ये विषाणू आणि बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त वाढते. आणि त्यामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होते.

त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्या जेवनाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात विशेषतः बाहेरचे खाणे टाळावे. ज्या पदार्थांमधून तुम्हाला जास्त शक्तीप्रदान होते. असे पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही पेयांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होईल. आणि तुम्ही कमी आजारी पडाल. याला इम्युनिटी बूस्टर ड्रिंक (Immunity Booster Drinks) देखील म्हणतात.

मध, आले आणि लिंबू चहा

पावसाळा येताच चहामध्ये मध, आले आणि लिंबू घालून प्यायला सुरुवात करा. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल आणि मौसमी आजारांपासूनही तुमचे संरक्षण होईल. हे करण्यासाठी, चहाच्या भांड्यात पाणी गरम करा, त्यात चहाची पाने घाला, उकळी आली की त्यात आले, लिंबू आणि मध घाला, गॅस बंद करा आणि गरम प्या.

कहवा बदाम | Immunity Booster Drinks

पावसाळ्यात कहवा खाणे खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती तर मजबूत होतेच, शिवाय हंगामी आजारांशी लढण्यासही मदत होते. हे करण्यासाठी एका पातेल्यात पाणी उकळून त्यात वेलची, लवंगा, दालचिनी आणि केशर टाका. आता त्यात ग्रीन टी बॅग आणि मध टाका आणि थोडा वेळ उकळू द्या. आता एका कपमध्ये बदामाचे तुकडे टाका आणि काहवा गाळून प्या.

लिंबूपाणी

पावसाळ्यात लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. हे करण्यासाठी एका ग्लासमध्ये थंड पाणी घ्या आणि त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. आता त्यात मध घालून सेवन करा

आवळा रस | Immunity Booster Drinks

पावसाळ्यात आवळ्याचा रस देखील फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्वचेच्या संसर्गापासूनही बचाव होतो.

विधानपरिषदेसाठी आज मतदान!! जागा 11 अन उमेदवार 12… कोण मारणार बाजी?

vidhan parishad election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडणार आहे. मागील काही दिवसांपासून या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे कारण एकूण ११ जागांसाठी यावेळी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे नेमका कोणाचा बळी जाणार? आणि कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदान हे गुप्त पद्धतीने होणार असल्याने फोडाफोडीचे राजकारण बघायला मिळू शकते. त्यामुळे या निवडणुकीत पराभूत होणारा १२ वा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता लागली आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. तर शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने याना संधी देण्यात आली आहे तर अजित दादा गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीबाबत सांगायचं झाल्यास, काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सातव, शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना संधी देण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा असेल. त्यामुळे महाविकास आघाडीला आणखी ४ ते ५ जागांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गटाने आपापल्या आमदारांना विविध हॉटेलमध्ये ठेवले आहे. या सर्व आमदारांना मतदान कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचे याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणाची ताकद किती?

महाविकास आघाडीबाबत सांगायचं झालयास, राष्ट्रवादी शरद पवार – 12, उद्धव ठाकरे शिवसेना – 15 + 1 शंकरराव गडाख म्हणजेच 16 आणि काँग्रेस – 37 अशी एकूण 65 मते आहेत. महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक मतांची गरज पडेल. छोट्या पक्षांमधील बहुजन विकास आघाडी – 3, समाजवादी पक्ष – 2, एमआयएम – 2 , मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी – 1, शेतकरी कामगार पक्ष – 1 हे पक्ष महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकतात.

महायुतीबाबत सांगायचं झाल्यास, राष्ट्रवादी (अजित पवार) 41, भाजपा – 103 आणि शिवसेना – 38 आमदार महायुतीकडे आहेत. त्यानंतर देवेंद्र भुयार आणि संजयमामा शिंदे यांचा दादा गटाला पाठिंबा आहे. तर रवी राणा , महेश बालदी, विनोद अग्रवाल, प्रकाश आवाडे, राजेंद्र राऊत, विनय कोरे आणि रत्नाकर गुट्टे यांचा भाजपला पाठिंबा आहे. तर शिंदे गटाला सुद्धा 10 आमदारांचा पाठिंबा असून यामध्ये नरेंद्र भोंडेकर , किशोर जोरगेवार , लता सोनवणे , बच्चू कडू , राजकुमार पटेल, आशीष जैसवाल , गीता जैन, मंजुळा गावीत, चंद्रकांत निंबा पाटील आणि राजू पाटील यांचा समावेश आहे. म्हणजेच महायुतीकडे एकूण 201 आमदारांची ताकद आहे.

Travel : निसर्गाचा चमत्कार; उलट्या दिशेने वाहतो धबधबा, व्हिडीओ पहाच

Travel : पावसाळा म्हंटलं की ट्रेकिंग , उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या भेटी , चिंब भिजणं , थंड्गार वातावरणात गरमागरम भजी चा आस्वाद घेणं हे सगळं आपसूक येतंच. अशाच प्रकारचा पावसाळा अनुभवण्यासाठी तरुणाई पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असते. मात्र यंदाच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लोणावळा आणि ताम्हिणी घाटात पर्यटक वाहून गेल्याच्या घटना घडल्या त्यामुळे शासनाकडूनही पर्यटन स्थळांवर काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. अर्थातच ते योग्यच आहेत पण सर्व नियम पाळून सुरक्षितरित्या आपण पावसाळी पर्यटनाचा (Travel) नक्कीच आनंद घेऊ शकतो. म्हणूनच आम्ही आज तुम्हाला अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. जे ठिकाण अतिशय लोकप्रिय असून निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल.

आम्ही बोलत आहोत सडावाघापूर येथील उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याबद्दल… खर तर धबधबा म्हटलं की उंचावरून खाली कोसळणारं पाणी हे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. मात्र निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा की साताऱ्यातलया एका धबधब्याचं पाणी हे उलट्या दिशेने वाहतं. पावसाळ्यातला हाच नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी या ठिकाणी (Travel) होत असते.

साताऱ्यातला हा उलटा धबधबा नेमका कुठे आहे ? साताऱ्यातील तारळे पाटण रोडवर सुमारे 14 किलोमीटरवर असणाऱ्या (Travel) सडावाघापूरला हा उलटा धबधबा आहे. या पॉईंटला रिवर्स पॉईंट असं सुद्धा म्हटलं जातं.

धबधबा उलट्या दिशेने कसा वाहतो ? (Travel)

आता हा धबधबा नेमका उलट्या दिशेने कसा वाहतो ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा धबधबा हा डोंगरदऱ्यांच्या मध्ये आहे. येथे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग इतका जास्त असतो की धबधब्यातून खाली येणार पाणी खाली जाण्याऐवजी उलट्या दिशेने वरती वाहतं एवढेच काय तुम्ही एखादी वस्तू इथे या दरीतून खाली सोडली तर ती सुद्धा या वाऱ्याच्या वेगाने वरती येते. आणि हाच नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची खास गर्दी इथे नेहमी होत असते. मात्र यंदाच्या वर्षी लोणावळ्याची घटना घडल्यानंतर जवळपास राज्यातल्या सर्वच पर्यटन स्थळांवर (Travel) काही अटी नियम तर काही ठिकाणी बंदी सुद्धा घातली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तुम्ही हा धबधबा पाहायला जाणार असाल तर सतर्क मात्र रहा.

सध्या सोशल मीडियावर या धबधब्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही पर्यटक गेलेले आहेत. त्यांनी कंपाउंड मधून खाली दरीमध्ये झाडाच्या फांद्या टाकलेल्या दिसत आहेत. पण या फांद्या उलट्यावरती येताना दिसतात एवढंच काय काठी सुद्धा टाकली असता तरी सुद्धा ती उलटी येताना दिसते. त्यानंतर व्हिडिओमध्ये पुढे आपल्याला उलट्या प्रवाहाने विरुद्ध दिशेने (Travel) वाहणारा धबधबा पाहायला मिळतो आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नितेश राणेंची चौकशी होणार; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

Nitesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिशा सालियन मृत्यूप्रकरणी (Disha Salian Case) एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये आता भाजप पक्षाचे नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची चौकशी करण्यात येणार आहे. नितेश राणे यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. कारण की, दिशा सालियनने आत्महत्या नसून हत्या करण्यात आली आहे असा दावा राणे यांनी केला होता. यावरूनच आता त्यांची चौकशी केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नितेश राणे यांनी म्हटले होते की, दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, त्यासंबंधी पुरावे देखील माझ्याकडे आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानंतरच मुंबई पोलिसांनी निलेश राणे यांच्या चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता या चौकशीत नितेश राणे कोणते पुरावे पोलिसांना देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नितेश राणे याचा दावा

दरम्यान, “दिशा सालियान प्रकरणात माझ्याकडे पुरावे आहेत. त्या हिंदू मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाला. याची सगळी माहिती माझ्याकडे आहे, सीसीटिव्ही फुटेज, रजिस्टरचे कागद फाडण्यात आले. मी पोलिसांना सगळी माहिती देण्यासाठी तयार आहे. मी मुंबई पोलीस आणि SIT समोर सगळे पुरावे देणार आहे” असा दावा स्वतः नितेश राणे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर या प्रकारणाला नविन फाटे फुटले आहेत.

IRCTC : करा अयोध्या – चित्रकूट तीर्थयात्रा ; IRCTC ने आणले आहे जबरदस्त टूर पॅकेज

IRCTC : भारतीय संस्कृतीमध्ये देवधर्म तीर्थस्थान यांना खूप मोठे महत्त्व आहे. जर तुम्ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे कडून आयोध्या ते चित्रकूट असा प्रवास करण्यासाठी खास टुर पॅकेज आयोजित करण्यात आले आहे.

आय आर सी टी सी कडून हे नियोजन करण्यात आले असून या टूर पॅकेज मध्ये तुम्हाला आयोध्या नंदिग्राम सीतामढी जनकपुर बक्सर वाराणसी प्रयागराज शृंगवेरपूर आणि चित्रकूट अशी सर्व क्षेत्र बघायला मिळतील. चला तर जाणून घेऊया ही यात्रा (IRCTC) नेमकी कशी असेल आणि रेल्वे मार्फत काय सुविधा देण्यात येतील?

अयोध्या ते चित्रकूट हा प्रवास 9 रात्री 10 दिवसांचा असेल. प्रवासी यासाठी संपूर्ण टूर पॅकेज IRCTC साइटवर बुक करू शकता. ही ट्रेन 5 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीहून सुटणार आहे. ही धार्मिक यात्रा दिल्लीतील सफरदरजंग रेल्वे स्टेशन पासून सुरुवात होणार आहे. या ट्रेनमध्ये एकावेळी 150 प्रवासी प्रवास करू शकतात. रेल्वे पॅकेजच्या अंतर्गत सगळ्यात आधी आपण अयोध्येला (IRCTC) जाणार आहोत त्यानंतर सगळ्यात शेवटी चित्रकुटला जाणार आहोत चित्रकुट नंतर ट्रेन दहाव्या दिवशी दिल्लीमध्ये पुन्हा पोहोचेल. या पॅकेजच्या किमती बद्दल सांगायचं झाल्यास या पॅकेजची सुरुवात 45 हजार 620 रुपये प्रति व्यक्ती पासून होत आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. खाण्यापिण्याची सोय रेल्वे मार्फत केली जाईल.

टूर पॅकेजची खास वैशिष्ट्ये (IRCTC)

पॅकेजचे नाव– श्री राम जानकी यात्रा (CDBG17)
डेस्टिनेशन कवर– अयोध्या, नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, बक्सर, वाराणसी, प्रयागराज, शृंगवरपूर आणि चित्रकूट.
बोर्डिंग/डी-बोर्डिंग पॉइंट– दिल्ली सफदरजंग, गाझियाबाद, अलीगढ, टुंडला, इटावा, कानपूर
किती दिवस – 9 रात्री आणि 10 (IRCTC) दिवस
प्रस्थान तारीख– 5 ऑगस्ट 2024

काय काय पहाल ? (IRCTC)

अयोध्या: रामजन्मभूमी मंदिर, हनुमान गढी, गुप्तार घाट, राम की पायडी
नंदीग्राम: भारत-हनुमान मंदिर आणि भारत कुंड
जनकपूर (नेपाळ): श्री जानकी मंदिर, राम सीता विवाह मंडप, धनुष धाम मंदिर, परशुराम कुंड आणि गंगा सागर तलाव.
सीतामढी (बिहार): जानकी मंदिर आणि पुनौरा धाम
बक्सर: राम रेखा घाट आणि रामेश्वर नाथ मंदिर.
वाराणसी: काशी विश्वनाथ मंदिर, तुलसी मानस मंदिर, संकट मोचन मंदिर आणि गंगा आरती
सीतामढी (उत्तर प्रदेश): सीता संहित स्थळ (सीता माता मंदिर)
प्रयागराज: त्रिवेणी संगम, हनुमान मंदिर आणि भारद्वाज आश्रम
शृंगावेरपूर: शृंगी ऋषी मंदिर
चित्रकूट: गुप्त गोदावरी, राम घाट आणि सती अनुसूया मंदिर

बिहारला विशेष राज्याचा दर्जा नाही मिळाला तर… ; नितीशकुमारांनी वाढवलं भाजपचं टेन्शन

modi nitish kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकप्ल मांडणार आहे. मात्र तत्पूर्वीच NDA चा घटकपक्ष असलेल्या JDU ने भाजपचे टेन्शन वाढवलं आहे. जेडीयूचे नेते आणि मोदी सरकार मधील मंत्री अशोक चौधरी (Ashok Chaudhari) यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारच्या अपेक्षांबाबत मोठं विधान केलं आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा नाहीतर कमीत कमी विशेष पॅकेज तरी राज्याला मिळायला हवे अशी मागणी अशोक चौधरी यांनी केली आहे. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढण्याची चिन्हे आहेत.

केंद्रात भाजपला अपेक्षित असं बहुमत मिळालेल नाही, त्यामुळे नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू या एकेकाळच्या विरोधकांच्या पाठिंब्यावर मोदींचे सरकार टिकून आहे. त्यामुळे सरकारची नड बघून हे दोन्ही मुरब्बी नेते वेगवेगळ्या मागण्या करत आहेत. त्याचाच भाग म्हणजे जेडीयूने बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला आहे. पूर्वी बिहारला विशेष पॅकेज मिळत होते. त्यात केंद्र सरकार 90 टक्के तर राज्य सरकारचा वाटा 10 टक्के होता. आता हे प्रमाण 50-50 असे झाले आहे. बिहारवरील हे ओझे कमी झाले आणि केंद्राने मोठा वाटा उचलला तर विकास होईल असं म्हणत अशोक चौधरी यांनी भाजपच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. आम्हाला विशेष राज्याचा दर्जा मिळत नसेल, परिस्थिती तशी निर्माण होत नसेल, तर किमान विशेष पॅकेज मिळायला हवे पण विशेष राज्याच्या दर्जासाठी प्रयत्न सुरु असल्याचे म्हणत त्यांनी भाजपला कोंडीत पकडलं आहे.

दुसरीकडे विजय कुमार चौधरी यांनीही अशोक चौधरी यांच्या सुरात सूर मिसळत आम्हाला विशेष दर्जा हवा आहे, मात्र काही अडचण असल्यास आम्ही विशेष पॅकेजची मागणी करतो, असे म्हटले आहे. बिहार हे काय भाग्यवान राज्य नाही. मर्यादित संसाधने असूनही नितीश कुमार यांनी संपूर्ण देशाला सांगितले की आमची संसाधने कमी आहेत, परंतु प्रगतीचा वेग कोणत्याही विकसित राज्यापेक्षा कमी नाही असं विजय कुमार चौधरी यांनी म्हंटल.

गंभीरची नियुक्ती करण्यापूर्वी BCCI ने कोहलीला विचारलं पण नाही? चर्चाना उधाण

gautam gambhir virat kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आता टीम इंडियाचा कोच झाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत घोषणा केली. त्यामुळे राहुल द्रविड (Rahul Dravid) नंतर आता गौतम गंभीर भारतीय संघाला कोचिंग करणार आहे. मात्र एका रिपोर्टनुसार, गौतम गंभीरची नियुक्ती बाबत बीसीसीआयने विराट कोहलीशी (Virat Kohli) कोणतीही चर्चा केली नसल्याचे समोर आलं आहे. फक्त कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या यांनाच गंभीरच्या नियुक्तीबाबत माहिती होती. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.

हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बीसीसीआयने गंभीरला मुख्य प्रशिक्षक बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा फक्त रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यालाच लूपमध्ये ठेवण्यात आले होते. या काळात विराट कोहलीशी कोणतीही चर्चा झाली नाही किंवा त्याला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. खरंतर विराट कोहली आणि गंभीर यांच्या नात्यात अनेकदा तणाव निर्माण झाला आहे. अनेकदा मैदानावर दोघांमध्ये खटके उडल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आयपीएल 2024 दरम्यान त्यांच्या नात्यातील दुरावा दूर झाला होता. तरीही गंभीरच्या नियुक्तीबाबत बीसीसीआयने कोहलीला अंधारात का ठेवलं हे कळायला काय मार्ग नाही.

रिपोर्टनुसार, विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशा स्थितीत भविष्याचा विचार करून बीसीसीआयने कोहलीचा सल्ला न घेता गंभीरची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आले की, रोहित शर्माचे वय लक्षात घेऊन हार्दिक पांड्याला लूपमध्ये ठेवण्यात आले होते. कारण रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या टीम इंडियाचा पुढचा कर्णधार असू शकतो. रोहित शर्मा उपलब्ध नसताना त्याने 2022 आणि 2023 मध्ये भारतीय संघाचं टी-20 मध्ये नेतृत्व केलं आहे. मात्र जायबंदी झाल्याने तो टी-20 मधून बाहेर पडला. रोहित शर्मा कर्णधार म्हणून परतल्यानंतर हार्दिकने टी-20 मध्ये उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली. टी-20 वर्ल्ड कपमध्येही तो उपकर्णधार होता.

ठरलं तर!! यादिवशी माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम खात्यावर होणार जमा

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (CM Ladaki Bahin Yojana) घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न असलेल्या 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्यामुळेच आतापर्यंत या योजनेसाठी लाखोंच्या वर अर्ज जमा झाले आहे. तसेच सरकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, हा अर्ज भरल्यानंतर योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याचेच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

योजनेचे पैसे कधी मिळणार??

लक्षात घ्या की, एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, आतापर्यंत ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज भरले आहेत त्यावरच 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच १ ऑगस्ट रोजी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर होईल. त्यानंतर येत्या 14 ऑगस्टपासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर योजनेचे रक्कम जमा करण्यास सुरूवात होईल. म्हणजेच 15 ऑगस्ट पर्यंत राज्याचे सर्व महिलांना योजनेची रक्कम मिळालेली असेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार महिलांना पंधराशे रुपयांच्या आर्थिक मदत करणार आहे. हे पंधराशे रुपये 15 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतील. परंतु जर एखाद्या महिलेने योग्य कागदपत्रे जोडलेले नसतील, किंवा योजनेच्या अर्जामध्ये चुकीची माहिती भरलेली असेल तर त्या महिलेच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे या योजनेचा अर्ज भरताना महिलांनी योग्य माहिती आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता करावी.

Travel : कोकणातला ‘हा’ धबधबा म्हणजे निसर्गाची मुक्त उधळणंच ; पाहताक्षणी टेन्शन विसरून जाल

Travel : कोकण म्हंटल की सर्वप्रथम सुंदर समुद्रकिनारेच डोळ्यासमोर येतात. पण पावसाळ्यात शक्यतो समुद्र खवळलेला असतो सुरक्षेच्या कारणामुळे समुद्राला जाता येत नाही. पण पावसाळ्यात कोकणात बघण्यासारखी अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पर्यटक आवर्जून भेट देतात. कोकणात पावसाळ्यात असंख्य धबधबे प्रवाहित होतात. त्यातील खूप विलोभनीय असलेल्या (Travel ) धबधब्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आम्ही ज्या धधब्याबद्दल बोलत आहोत तो धबधबा म्हणजे सवतकडा धबधबा.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण इथं हा सवतकडा धबधबा आहे. कोकणात पाऊस सुरू झाला की हा धबधबा प्रवाहीत होतो.
सवतकडा धबधबा म्हणजे जवळपास 100 मीटर पेक्षा जास्त उंचीवरून वाहणारा (Travel ) जलप्रपात. तुम्ही जर या धबधब्याच्या पायथ्याशी गेलात आणि नजर वर केलात तर तुम्हाला वरती पाहता येणार नाही कारण उंचावरून पडणाऱ्या पाण्याचे तुषार तुमच्या डोळ्यांवर येत राहतात. येथे जाण्यासाठी थोडीफार जंगलातून वाट काढावी लागते आणि नंतर जे समोर दृश्य दिसते ते दृश्य पाहून तुम्ही नक्कीच आनंदून जाल यात शंका नाही. आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर उंचावरून कोसळणारे पाणी तुमचा सर्व स्ट्रेस, थकवा दूर करेल.

काय काळजी घ्याल? (Travel )

खरंतर एखाद्या नवख्या ठिकाणी जाताना तेथील स्थानिक रहिवाशांची मदत आणि त्यांना त्या स्थळाबाबतची माहिती विचारून घेणं खूप गरजेचं असतं. तुम्ही या धबधब्याला भेट देणार असाल तर आधी तिथे स्थानिक नागरिकांना याविषयी माहिती मिळवून घ्यायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धबधब्याच्या वरील भागात तीव्र उतार असल्यामुळे पाऊस पडला तर काही मिनिटांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात (Travel ) वाहत येते. त्यामुळे अचानक धबधब्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पर्यटक वाहून गेल्याच्या घटना सुद्धा इथे घडलया आहे. त्यामुळे सुरक्षित राहूनच पर्यटनाचा आनंद घेणे गरजेचे आहे.

कसे जाल? (Travel )

रत्नागिरी शहरापासून सवतकडा धबधबा साठ किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यासाठी रत्नागिरी मधून मुंबई, गोवा महामार्गावरून ओणी शहरापासून आत मध्ये 19 किलोमीटर अंतरावर चुनाकोळवण गाव आहे. तिथून धबधब्याकडे जाणारी वाट आहे कच्चे (Travel ) रस्ते पावसाळ्यात वाहणारे छोटे मोठे झरे हे सर्व अडथळे पार करत तुम्हाला या धबधब्याला भेट द्यावी लागेल. तुम्ही जर रेल्वे मार्गे जाणार असाल तर रेल्वे स्टेशन जवळ उतरल्यानंतर तिथून सवतकडा येथे अंतर हे फक्त 26 ते 30 किलोमीटर आहे. पण या रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्या (Travel ) थांबत नाहीत तुम्ही रेल्वे रत्नागिरी स्टेशनला उतरलात तर हायवे ला एसटी महामंडळाच्या बसेस ही येथे येत असतात.