Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 611

TVS ने लाँच केलं Apache RTR 160 चं रेसिंग एडिशन; किंमत किती पहा?

TVS Apache RTR 160 Racing Edition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TVS हि भारतीय ऑटोमोबाईल बाजारातील लोकप्रिय आणि आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. TVS ला मोठा ग्राहकवर्ग लाभला असून कंपनी सतत वेगवेगळ्या गाड्या बाजारात लाँच करत असते. TVS च्या आत्तापर्यतच्या सर्व गाड्यांमध्ये Apache RTR 160 खूपच लोकप्रिय आहे. अतिशय स्पोर्टी लूक असलेली हि बाईक तरुणाईला चांगलीच भुरळ पाडत आहे. आता कंपनीने या बाईकचे नवे रेसिंग एडिशन मार्केट मध्ये लाँच केलं आहे. आज आपण या बाईकचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इंजिन आणि पॉवर –

TVS Apache RTR 160 च्या नव्या रेसिंग एडिशन मध्ये 160cc एअर-कूल्ड इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन 8750 RPM वर 16.04 PS पॉवर जनरेट करते. स्पोर्ट, अर्बन आणि रेन मोड असे ३ मोड देण्यात आले आहेत. या बाईकचे टॉप स्पीड १०७ किलोमीटर प्रतितास इतकं आहे. TVS Apache RTR 160 च्या रेसिंग एडिशनचे खास वैशिष्ट्य म्हणजे हि बाईक मॅट ब्लॅक कलरमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्यामुळे हि बाइक खूपच आकर्षक दिसते.याशिवाय बाईक मध्ये रेस-प्रेरित कार्बन फायबर ग्राफिक्स आणि चमकदार मिक्स अलॉय व्हील मिळतात. अन्य फीचर्स बाबत सांगायचं झालयास बाइकमध्ये डिजिटल एलसीडी क्लस्टर, एलईडी हेडलॅम्प , टेल लॅम्प आणि ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी (GTT) यांसारखे अपडेटेड फीचर्स मिळतात.

किंमत किती?

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, TVS Apache RTR 160 Racing Edition ची किंमत 1 लाख 28 हजार 720 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. टीव्हीएसची हि सर्वात महागडी बाईक सुद्धा तुम्ही म्हणू शकता. या गाडीचे बुकिंग TVS मोटर कंपनीच्या अधिकृत डीलरशिपवर सुरू झाली आहे.भारतीय बाजारात टीव्हीएसची हि नवी स्पोर्ट बाईक होंडा, हिरो आणि बजाजच्या गाडयांना तगडी टक्कर देऊ शकते.

विधानसभेसाठी भाजप इतक्या जागा लढवण्यास इच्छुक; दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांना थेट आदेश

Assembly Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये ही महायुती (महायुती) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) चांगली चुरस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच सूत्रांनी माहिती दिली आहे की, विधानसभा निवडणुकीत भाजप किमान 160 जागा लढण्यासाठी इच्छुक आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी 160-170 पेक्षा कमी जागा लढवू नयेत, असे दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यापेक्षा कमी जागा भाजपकडून लढवल्या जाणार नाहीत.

समोर आलेल्या माहितीनुसार, या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. याचा अंदाज बांधूनच भाजप नेत्यांनी दिल्लीच्या प्रमुख नेत्यांकडे 160 जागा लढवू असा आग्रह धरला आहे. परंतु या आग्रहामुळे शिंदे आणि अजित पवार गटामध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत जर भाजपने 160 जागा लढवल्या तर शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला किती जागा येतील? हा प्रश्न निर्माण होतो.

विधानसभा निवडणुकीमध्ये एकट्या भाजपने 160 जागा लढवल्या तर शिंदे गट आणि अजित पवार गटाकडे ६० किंवा ७० जागा येतात. इतक्या कमी जागांवर लढण्यासाठी हे दोन्ही गट तयार नसतील. महत्वाचे म्हणजे दुसऱ्या बाजूला शून्य कटारे 100 जागा लढवण्याची इच्छा दाखवली आहे तसेच अजित पवार गटाचे देखील अशीच इच्छा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भाजपच्या वाटेला खरंच 160 जागा येतील का हा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर, जागा वाटपामुळे पुन्हा एकदा तिन्ही गटांमध्ये वाद निर्माण होईल का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभेसाठी शरद पवारांचा 225 चा नारा!! काय आहे मास्टरप्लॅन?

sharad pawar vidhansabha

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 225 चा नारा दिला आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २२५ जागा जिंकेल असा दावा शरद पवारांनी केला आहे. आज लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना शरद पवारांनी वरील विधान केलं.

शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३१ जागांवर यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवल्या त्यातील ८ जागा जिंकल्या. हि तर सुरुवात आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी 225 जास्त जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल. राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी त्या सगळ्या सोबत घेऊ.. देशात आपले राज्य प्रगत करूयात असं आवाहनही पवारांनी यावेळी उपस्थितांना केलं.

यावेळी शरद पवारांनी अजित पवार गट आणि सोडून गेलेल्या आमदारांवर सुद्धा निशाणा साधला. ज्यांना जनतेने, पक्षांने मान दिला त्या नेत्यांनी आमचा घात केलाय. उदगीर आणि देवळाली या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिला खरा पण दोन्ही विजयी उमेदवारांनी लोकांचा घात केला. तुम्ही येताना वेगळ्या नावाने मतं मागता आणि जाता दुसरीकडे.. हे लोकांना पटत नाही. ज्यांनी जनतेचा घात केला त्या लोकांना धडा शिकवायचा या भावनेनं अपल्याकडे यायचा निर्णय घेतला त्यांचं स्वागत करतो असं म्हणत शरद पवारांनी सुधाकर भालेराव यांचे पक्षात स्वागत केलं.

Ashadi Ekadashi: आषाढीसाठी ST महामंडळाची भारी स्कीम ; थेट तुमच्या गावातून निघणार गाडी

Ashadhi Ekadashi 2024

Ashadi Ekadashi: यंदाच्या वर्षी 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने प्रशासन चांगलंच सज्ज झालं आहे. याबरोबरच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून सुद्धा विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आलं आहे. सर्वसामान्य नागरिकांना पांडुरंगाचे दर्शन घेता यावं यासाठी विशेष सोय करण्यात आलेली आहे. एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं असून यावर्षी आषाढीसाठी (Ashadi Ekadashi) तब्बल पाच हजार गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. शनिवारपासून या बसेसच्या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

महामंडळाची भारी स्कीम (Ashadi Ekadashi)

एसटी महामंडळांना नियोजित केलेल्या 5000 गाड्यांपैकी 40 पेक्षा जास्त प्रवाशांनी बुकिंग केल्यानंतर थेट त्या गावातून गाडी देण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे. म्हणजे पंढरपूरला तुमच्या गावांमधून जर 40 जणांचा ग्रुप एकाचवेळी जाणार असेल तर एसटीने त्यांच्यासाठी खास सोय केली आहे. त्यांच्यासाठी एसटी दिली जाणार आहे. आतापर्यंत एक हजार तीस गाड्यांचे बुकिंग झालं असून त्या बस आता वारकऱ्यांच्या गावातून थेट पंढरपुरात येणार आहेत.

दरम्यान एसटीच्या प्रवासात 75 वर्षांच्या वरील ज्येष्ठांना मोफत प्रवास मिळणार आहे तर महिलांसाठी (Ashadi Ekadashi) 50 टक्के तिकीट दरात सूट दिली जाणार आहे. शासनाकडून या सवलती एसटीने प्रवास करणारा प्रवाशांसाठी लागू असणार आहेत.

प्रवाशांकरिता सवलती (Ashadi Ekadashi)

13 जुलैपासून एसटी गाड्या ह्या पंढरपूरसाठी निघणार आहेत. 3970 आगारातून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. आतापर्यंत 1हजार 30 गावांमधून एसटी बुक झालेले आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी यंदा 12 ते 15 लाख भाविक (Ashadi Ekadashi) येतील असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर 12000 पोलिसांचा बंदोबस्त तयार करण्यात आला आहे. मागील वर्षी एसटीने 4245 विशेष बस सोडल्या होत्या यांना मात्र ही संख्या वाढवून 5000 गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीबाबत टीम इंडियाचा मोठा निर्णय

Champions Trophy 2025 (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिनी विश्वचषक स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी चॅम्पियन ट्रॉफी (Champions Trophy 2025) पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेची तयारीही सुरु केली असून स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रकही समोर आलं आहे. मात्र टीम इंडिया पाकिस्तानला जाणार कि नाही हा खरा प्रश्न आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलेला नाही. आताही टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही तर श्रीलंका किंवा दुबईत भारतीय संघाचे सामने आयोजित करण्याची मागणी BCCI करू शकते.

मागील अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये एकही द्विपक्षीय सीरीज झालेली नाही. आयसीसी टुर्नामेंट आणि आशिया कपच्या निमित्तानेच भारत आणि पाकिस्तानचा संघ आमनेसामने येत असतात. गेल्या वर्षी आशिया चषकमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत पाकिस्तानातील भारताचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते. यंदाही हीच पद्धत राबवण्यात यावी आणि टीम इंडियाचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत घ्यावेत अशी मागणी बीसीसीआय ICC कडे करण्याची शक्यता आहे.

हायब्रीड मॉडेलच्या आधारे खेळली जाईल Champions Trophy 2025

याबाबत बीसीसीआयच्या सूत्राने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही, परंतु याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल. अशा स्थितीत हायब्रीड मॉडेलवर काम केले जाणार आहे. आशिया चषकाप्रमाणे, भारत आपला सामना संयुक्त अरब अमिराती (UAE) किंवा श्रीलंकेत खेळू शकतो. परंतु यासंदर्भात निर्णय आयसीसी घेईल, परंतु सध्या आम्ही फक्त यावरच विचार करत आहोत. भविष्यात काय होईल ते माहित नाही परंतु सध्या तरी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा हायब्रीड मॉडेलच्या आधारे खेळली जाईल असे दिसते.

2008 पासून भारतीय संघाने कधीही पाकिस्तानला भेट दिली नाही. गेल्या वर्षी तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते की, जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका सुरू करणार नाही. दरम्यान, ड्राफ्ट शेड्यूलनुसार टीम इंडियाला आपले सर्व सामने लाहोरमध्ये खेळायचे आहेत. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांग्लादेश विरुद्ध होईल. दुसरा सामना 23 फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध होईल. ग्रुप स्टेजचा तिसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध 1 मार्चला होऊ शकतो.

Samrudhi Mahamarg : काय सांगता ? वर्षभरातच समृद्धी महामार्गावर भेगा,MSRDC च्या दाव्याचं काय ?

Samrudhi Mahamarg : महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाकडे पहिले जाते. एकूण 701 किलोमीटरचा असलेला हा मार्ग आहे. यापैकी 625 किलोमीटरचा मार्ग (Samrudhi Mahamarg ) आतापर्यंत खुला करण्यात आला आहे. मात्र पहिल्याच पावसात या खुल्या झालेल्या रस्त्याला भेगा पडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे MSRDC च्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

समृद्धी महामार्गाला (Samrudhi Mahamarg ) ह्या भेगा कुठे पडल्या आहेत ? तर छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ 3 सेंमी रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. याबाबतचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एमएसआरडीसीने मोठा गाजावाजा करीत हा रास्ता चांगल्या पद्धतीने बनवला असल्याचा दावा केला होता मात्र पहिल्याच पावसानंतर भेगा पडल्यामुळे त्यांचा हा दावा फोल ठरताना दिसतो आहे. MSRDC ने म्हंटले होते की समृद्धी महामार्ग (Samrudhi Mahamarg ) बनवण्यासाठी एम-40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्षे खड्डे पडत नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या दाव्याचे काय ? असा सवाल सामान्य नागरिकांमधूनही उपस्थित केला जात आहे.

अपघाताची भीती

माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. याशिवाय माळीवाडा एक्सचेंजजवळ मोठ मोठ्या (Samrudhi Mahamarg ) भेगा पडल्या आहेत. तसंच, काही खड्डेदेखील पडले आहेत. त्यामुळं अपघात होऊ शकतात. येथील स्थानिक ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वीच प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही, अशी माहिती समोर येते आहे.

मुंबई ते नागपूर असा 701 किलोमीटर्स चा नियोजित मार्ग आहे. अद्याप हा मार्ग पूर्णपणे सुरु देखील करण्यात आला नाही. तरीदेखील निव्वळ वर्षभराच्या आतच महामार्गाची ही आवस्था झाली आहे. त्यामुळे चालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यापूर्वी देखील खुला झालेला समृद्धी महामार्ग अपघातांच्या मालिकेमुळे चर्चेत आला होता. आता महामार्गावर (Samrudhi Mahamarg ) पडलेल्या भेगा आणि खड्ड्यांमुळे MSRDC च्या कामावर सवाल उपस्थित केले जात आहेत. हा मार्ग बांधून पूर्ण झाल्यावर मुंबई ते नागपूर हे आंतर केवळ 7-8 तासांमध्ये पार करता येणार आहे.

MIT WUPU तर्फे देशात प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांची 3 दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’ 19 जुलैपासून सुरु

first National Scientific Roundtable Conference

पुणे, ९ जुलैः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’(एनएसआरटीसी) विकसीत भारत २०४७ आयोजित करण्यात येत आहे. शुक्रवार, दि. १९ ते रविवार, दि. २१ जुलै या कालावधित ही परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये संपन्न होणार आहे. अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि एनएसआरटीसी चे राष्ट्रीय संयोजक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, १९ जुलै रोजी एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये सायं ४ ते ६ या कालावधीत होणार आहे. यावेळी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय डॉ. जितेंद्र सिंग हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डीएसआयआरचे महासंचालक व सचिव डॉ. सौ. एन. कलई सेल्वी , पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे, मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉ. गणपती यादव आणि मद्रास आयआयटीचे प्रा.टी. प्रदीप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच समारोप समारंभ रविवार, २१ जुलै रोजी सायं. ४ ते ६ या कालावधीत हॉटेल टीप टॉप मध्ये संपन्न होईल. परिषदेच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. ही परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे.

या परिषदेचा मुख्य उद्देश्य भौतिक विज्ञान, जीव विज्ञान आणि अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंवरील अनुभव आणि संशोधनाच्या परिणामांची देवाण घेवाण व आदान प्रदान करण्यासाठी अग्रगण्य शैक्षणिक शास्त्रज्ञ, संशोधक आणि संशोधन विद्वानांना एकत्र आणणे हा आहे. या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सहभागी शास्त्रज्ञ नवीन कल्पना आणि नवीन दिशा मांडतील. यामुळे शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांना विशेषतः नवोदित तरुण पिढीला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्व उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मूलभूत संशोधनाला आधार मिळेल. तसेच हे संशोधन पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळेल. या परिषदेत आंतरविद्याशाखीय तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या नवीन मार्गावर चर्चा केली जाणार आहे. नवीन शोध, विकासाचे नवीन नमुने आणि वितरणाचे नवे मार्ग आणि विज्ञानाला सशक्त बनविण्याचा मार्ग प्रेरित करतील.

गोलमेज परिषद २०२४ मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे एक समान, शाश्वत आणि मानवकेंद्रित यासाठी विकसित भारत अ‍ॅट १०० तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साधने विकसित करून नवीन मार्ग शोधणे आहेे, जो उर्वरित जगासाठी एक आदर्श असेल. या परिषदेत आर्टीफिशियल इंटेलिजेन्ट (कृत्रिम बुद्धिमत्ता), अ‍ॅडव्हॉन्स मटेरियरिल्स अ‍ॅण्ड प्रोसेसिंग, अ‍ॅग्री टेक (कृषी तंत्रज्ञान), बायोटेक्नॉलॉजी (जैव तंत्रज्ञान), क्लाइमेट चेज (वातावरणातील बदल), डिजिटल ट्रान्सफॉर्ममेशन, हेल्थ केअर (आरोग्याची काळजी) आणि सायन्स, सायन्टीफिक टेम्पर अ‍ॅण्ड स्पिरिच्यूलिटी या विषयांवर परिचर्चा होणार आहे.

तीन दिवस चालणार्‍या या गोलमेज परिषदेत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, डीसीएसआयआरचे सचिव व सीएसआयआर महासंचालक डॉ. कलाई सेल्वी, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, डॉ. गणपती यादव, डॉ. शेखर मांडे, अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी, पद्मश्री डॉ. थल्लापाई प्रदिप, प्रा.डॉ. एम.एस. रामचंद्रा राव,  डॉ. रिचर्ड लोबो, प्रा.डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. उमेश वाघमोरे, डॉ. दिपंकर दास शर्मा, डॉ. दिनेश आस्वाल, डॉ. टाटा ए. राव, डॉ. भूषण पटवर्धन, प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे, डॉ. निरज खरे, डॉ. के. सामी रेड्डी,  डॉ. अतुल वर्मा, यूएसए येथील डॉ.अशोक खांडकर, डॉ. सुमित्रे, इस्रोचे वैज्ञानिक डॉ. इलांगवन, आयआयसी बंगलोर चे प्रो.कृपानिधी, प्रो. अनिक कुमार, आयसरचे डायरेक्टर प्रो. अशोक गांगुली, डॉ. रजत मोना, प्रा.दास गुप्ता, डॉ. नाग हनुमैया, समीरचे संचालक डॉ. हणमंतराव, सिडन विद्यापीठाचे प्रा. डॉ. कौस्तुभ दलाल, परड्यू युनिव्हर्सिटी प्रा.सचिन पोळ, डीएसआयआरच्या प्रमुख  डॉ. सुजता चकलानोबिस यांच्या सहित संपूर्ण भारतातून जवळपास १३० वेगवेगळ्या विषयातील शास्त्रज्ञ उपस्थिती दर्शविणार आहेत.  

विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या परिषदेच्या निमित्ताने १३० शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या विषयांवर केलेल्या संशोधनाच्या गोषवाराचे (अ‍ॅबस्ट्रॅक बुक) पुस्तक प्रकाशन करण्यात येईल. ही गोलमेज परिषद  युटूब, फेसबूक, इन्स्टाग्राम वर थेट प्रसारित केले जाईल.आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी, डब्ल्यूपीयूचे सीएओ डॉ. संजय कामतेकर, डॉ. एम.एस. रामचंद्रा राव, डॉ. भारत काळे आणि डॉ.चवली मूर्ती उपस्थित होते.

नवजात मातांमधील ‘ही’ विकृती बाळाच्या जिवावर बेततेय; परंतु यावर कोणीच का बोलत नाही?

postpartum psychosis in moms

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर्मनीतील एका २८ वर्षीय महिलेने तिच्या नवजात मुलीला खिडकीतून फेकल्याची घटना अलीकडे समोर आली कारण तिला वाटले की पोर्शे’मध्ये एक कार्यकारी म्हणून तिचे करिअर बरबाद होईल. यानंतर कॅटरिना जोव्हानोविक नावाच्या या महिलेचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला आहे आणि तिच्यावर क्रूरतेचा शिक्का मारला जात आहे. नवजात मुलाच्या मृत्यूप्रकरणी तिला साडेसात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकारानंतर सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा सुरु आहे. कॅटरिना जोव्हानोविक पोस्ट-पार्टम सायकोसिसने ग्रस्त असेल असं काही यूजर्स सांगत आहेत. हि एक गंभीर मानसिक आरोग्य स्थिती आहे जी नवजात मातांवर प्रभाव टाकत आहे. महत्वाची म्हणजे अशा प्रकारे घडलेली हि काय पहिलीच घटना नाही, या वर्षाच्या सुरुवातीला कोचीमध्ये एका महिलेवर तिच्या नवजात बालकाचा गुदमरून मृतदेह रस्त्यावर फेकल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व घटनांनी मानसिक आरोग्य विकार एखाद्याला स्वतःच्या मुलाला इजा करण्यास भाग पाडू शकतो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रसवोत्तर मनोविकृती ही मानसिक आरोग्य इमर्जन्सी म्हंटली जाते. हे जन्म देणाऱ्या 1,000 महिलांपैकी 1 ते 2 महिलांमध्ये आढळते आणि सामान्यतः जन्मानंतरच्या दिवसांत किंवा 6 आठवड्यांनंतर दिसून येते. प्रसूतीनंतरच्या ब्ल्यूजचा संदर्भ जन्म दिल्यानंतर कमी, डिस्कनेक्ट झालेल्या भावनांना सूचित करतो आणि ते खूप सामान्य आहे (20-25 टक्के स्त्रिया यातून जातात). जेव्हा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ मूड कमी होतो, भूक लागत नाही, झोपेची समस्या निर्माण होते तेव्हा प्रसूतीनंतरच्या नैराश्यला सुरुवात होते. मारे 5-10 टक्के महिलांना या स्थितीचा सामना करावा लागतो. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की 22 टक्के भारतीय माता प्रसुतिपश्चात नैराश्याने ग्रस्त आहेत.

“मुळात ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे ज्यामध्ये जन्मानंतर नैराश्य येते. आता, प्रसूतीपश्चात मनोविकृती ही आणखी गंभीर स्थिती आहे जी स्त्रियांमध्ये घडते ज्यांना गंभीर मानसिक आरोग्य स्थितीचा इतिहास आहे किंवा त्यांच्या कुटुंबाचा इतिहास असू शकतो. जेव्हा मी म्हणतो गंभीर, याचा अर्थ नैराश्यापेक्षा, स्किझोफ्रेनिया किंवा बायपोलर डिसऑर्डरसारखे काहीतरी आहे,” असे डॉ वाधवन म्हणतात. प्रसुतिपश्चात् सायकोसिस सोबत शारीरिक आणि मानसिक तणावपूर्ण जन्म किंवा गर्भधारणा देखील असू शकते.

पोस्ट-पार्टम सायकोसिस समजून घेणे

सोनल चढ्ढा, मानसिक आरोग्य स्टार्ट-अप LISSUN मधील प्रमुख क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, देखील यावर भर देतात की पोस्ट-पार्टम सायकोसिस (PPP) ही एक गंभीर स्थिती आहे जी आईच्या मानसिक स्थितीवर गंभीरपणे परिणाम करू शकते. “क्वचित प्रसंगी, हे धोकादायक वर्तनास कारणीभूत ठरू शकते, ज्यामध्ये स्वतःला किंवा एखाद्याच्या मुलाचे नुकसान होण्याच्या संभाव्यतेचा समावेश होतो. ही लक्षणे आईला अशा प्रकारे वागण्यास प्रवृत्त करू शकतात जी पूर्णपणे चारित्र्यबाह्य आहेत, कधीकधी दुःखद परिणाम होतात असेही चड्ढा म्हणतात. पोर्शच्या एका कार्यकारी अधिकाऱ्याने तिच्या मुलाला खिडकीतून फेकून दिलेले प्रकरण, उपचार न केलेले किंवा खराब व्यवस्थापित पोस्ट-पर्टम सायकोसिसशी संबंधित संभाव्य धोके अधोरेखित करते. अशा घटना, दुर्मिळ असताना, तत्काळ वैद्यकीय हस्तक्षेपाचे महत्त्व अधोरेखित करतात.

​​डॉ अनामिका गुप्ता, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, मणिपाल हॉस्पिटल, बेंगळुरू, म्हणतात की आई तिच्या नवजात बाळाला इजा करते याची कल्पना करणे कठीण असले तरी, जेव्हा आई PPP अनुभवत असेल तेव्हा असे होऊ शकते. सुमारे 4 टक्के प्रकरणांमध्ये, या स्थितीत असलेल्या स्त्रियांमध्ये असे विचार किंवा वागणूक असू शकते ज्यामुळे भ्रूणहत्या होऊ शकते. प्रसूतीनंतरच्या मनोविकाराने ग्रस्त असलेल्या मातांसाठी, त्यांच्या बाळासाठी प्रेम आणि संरक्षणाची सामान्य भावना या आजारामुळे भारावून जाऊ शकते,

काय आहेत या आजाराची लक्षणे ?

भ्रम : वास्तविक नसलेल्या गोष्टी पाहणे किंवा ऐकणे किंवा वास्तविकतेवर आधारित नसलेल्या दृढ विश्वास असणे.

मड बदलणे – मूडमध्ये अचानक बदल, उत्साहापासून ते आंदोलन किंवा तीव्र नैराश्यापर्यंत.

गोंधळ : स्पष्टपणे विचार करण्यात अडचण, अव्यवस्थित विचार किंवा भाषण आणि दृष्टीदोष निर्णय.

विचित्र वर्तन: विनाकारण संशयास्पद किंवा भयभीत वाटणे आणि चारित्र्यबाह्य अशा प्रकारे वागणे.

वेडसर विचार: हेतू नसतानाही, स्वतःला किंवा बाळाला हानी पोहोचवण्याबद्दल सतत विचार.

उपचार कसे करावे?

सोनल चढ्ढा यांच्या मते, पीपीपीला त्वरित आणि सर्वसमावेशक वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता आहे. उपचार योजनेमध्ये सहसा हे समाविष्ट असते:

औषधोपचार: लवकर लक्षणे ओळखून, औषधी मदतीसाठी मनोचिकित्सकाशी संपर्क साधा.

हॉस्पिटलायझेशन: गंभीर प्रकरणांमध्ये, गहन काळजी घेण्यासाठी आई आणि बाळ दोघांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हॉस्पिटलायझेशन आवश्यक असू शकते.

मानसोपचार: यात लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी, स्थिती समजून घेण्यासाठी आणि सामना करण्याच्या धोरणांचा विकास करण्यासाठी मानसिक आरोग्य व्यावसायिकांसोबत काम करणे समाविष्ट आहे.

सपोर्ट सिस्टम: उपचार प्रक्रियेत कुटुंबातील सदस्याना गुंतवून ठेवल्याने अतिरिक्त भावनिक आणि व्यावहारिक आधार मिळू शकतो. प्रसवोत्तर मानसिक आरोग्य समस्या अनुभवणाऱ्या नवीन मातांसाठी सपोर्ट गट देखील फायदेशीर ठरू शकतात.

धोका कमी कसा कराल ?

मानसिक आरोग्याचे निरीक्षण करा: काळजीवाहू, रुग्णालयातील कर्मचारी आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांसाठी नवीन मातांमधील पीपीपीच्या लक्षणांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे.

लवकर हस्तक्षेप: परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लक्षणांची त्वरित ओळख आणि लवकर हस्तक्षेप आवश्यक आहे.

शिक्षण आणि जागरुकता: आई आणि तिचे समर्थन नेटवर्क या दोघांनाही प्रसूतीनंतरच्या सायकोसिसच्या चिन्हे आणि लक्षणांबद्दल शिक्षित केल्यास लवकर ओळख आणि हस्तक्षेप होऊ शकतो.

निरोगी जीवनशैली: पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यासह निरोगी जीवनशैली राखणे, एकूणच मानसिक आरोग्यासाठी योगदान देऊ शकते.

यावर कोणी का बोलत नाही?

“सर्व मानसिक आरोग्य स्थितींप्रमाणे, प्रसूतीनंतरचा मनोविकार हा निषिद्ध विषय आहे आणि लोक क्वचितच याबद्दल बोलतात असं डॉ इशा वाधवन यांना वाटते. रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि अगदी आरोग्य सेवा प्रदाते यांना काळजी आणि भीती वाटते. सोनल चड्ढा सुद्धा याबाबत सहमत असून त्या म्हणतात की या विषयाभोवतीचे मौन त्याच्या दुर्मिळतेचे किंवा क्षुल्लकतेचे प्रतिबिंबित करत नाही तर खुले संवाद आणि जागरुकतेची नितांत गरज अधोरेखित करते. दरम्यान, डॉ अनामिका गुप्ता म्हणतात की प्रसूतीनंतरच्या मनोविकृतीच्या आसपासच्या शांततेत कलंक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सामाजिक निर्णयाच्या चिंतेमुळे आणि त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी, विशेषत: सामाजिक स्वीकृतीला प्राधान्य देणाऱ्या संस्कृतींमध्ये कुटुंबे मानसिक आरोग्याच्या समस्यांवर चर्चा करणे टाळू शकतात. या कलंकामुळे कुटुंबे ही आव्हाने लपवून ठेवू शकतात, जरी ते प्रथमतः अनुभवत असतानाही.

बुलढाणा जिल्ह्यात विधानसभेला ‘या’ आमदारांची जागा धोक्यात दिसतेय

Buldana Assembly 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, बुलढाण्यातील सर्वात जास्त हायव्होल्टेज मतदारसंघांपैकी ही काही प्रमुख नावं… संजय गायकवाड, श्वेता महाले आणि राजेंद्र शिंगणे या महायुतीच्या विद्यमान आमदारांची आमदारकी धोक्यात आल्याचं दिसतंय.. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या राजेश एकडे यांच्यासाठीही वाट सोपी दिसत नाहीये.. आणि या सगळ्यात राजकारणाची धमाकेदार फोडणी आणलीय ती रविकांत तुपकर यांच्या विधानसभेत सर्व जागा घडवण्याच्या घोषणेनं.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघाचा विस्तृत आढावा घेणार आहोतच.. पण त्यातल्या काही महत्वाच्या चार विधानसभांचं राजकीय विष्लेषण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.. यंदा नेमकं आमदारकीचं मैदान कोण मारतंय, इथंपासून ते स्टँडिंग आमदार निकालात आर जातायात या पार.. त्या सगळ्याचा सविस्तर तरिही तितकाच इंटरेस्टींग आढावा..

यातला पहीला येतो तो मलकापूर मतदारसंघ ….. राष्ट्रीय महामार्ग 53 वरून प्रवास करत असाल तर मुक्ताईनगर सोडून मलकापूर तालुक्यात आपली कधी एन्ट्री होते, ते आपल्यालाही कळत नाही… म्हणूनच विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणून मलकापूरची ओळख… भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मलकापुरात १९९५ पासून आजपर्यंत आमदार चैनसुख संचेती निवडणूक लढवत आले… जिंकत आले… त्यांना हरवणं तसं काँग्रेससाठी कठीण काम होऊन बसलं होतं… हाजी रशीद जमादार हे मुस्लिम तर शिवचंद्र तायडे हे मराठा आणि अरविंद कोलते हे लेवा अशा उमेदवारांना समोर करून जातीय प्रयोग करून काँग्रेसने संचेती यांना चितपट करण्याचा प्लॅन आखला… पण संचेती यांनी आपल्या स्कीलने हे प्रयत्न हाणून पाडत आमदारकी आपल्या ताब्यात कायमच ठेवली… विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद सांभाळल्याने त्यांची राजकीय पत आणखीनच वाढली होती.. पण 2019 ला अखेर याला ब्रेक थ्रू मिळाला… भाजपच्या म्हणजेच संचेती यांच्या प्रचारासाठी फडणवीस, स्मृती इराणी, अभिनेता गोविंदा असे बडे खिलाडी प्रचाराच्या मैदानात उतरले होते… पण भाजपची लाट असतानाही मलकापूराने मात्र पहिल्यांदाच काँग्रेसच्या राजेश एकडे यांच्या बाजूने कौल दिला… 25 वर्षात पहिल्यांदाच नांदूर शहराला त्यामुळे विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला मिळालं… मात्र आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी भाजपच्या संचेती यांची डॅमेज झालेली इमेज याचा फायदा यंदाही काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो.. त्यात आपला हा पारंपारिक मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपनेही तगडी फिल्डींग लावल्यामुळे मतदारसंघात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी दोन्ही बाजूला फिफ्टी चान्सेस आहेत.. पण सध्या तरी काँग्रेसचं पारडं मतदारसंघात थोडं उजवं दिसतंय…

दुसरा बुलढाणा विधानसभा …. बुलडाणा तालुका आणि मोताळा तालुका याचा मिळून बनलेला ‘बुलडाणा विधानसभा मतदारसंघ.. घाटाखालचे आणि घाटावरचे असा सुप्त संघर्ष मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळतो… मुळे उमेदवार निवडताना जातीपातीचं राजकारण तर होतंच पण त्याचबरोबर उमेदवार कुठल्या भागातला आहे हे सुद्धा पाहिलं जातं… तब्बल दोन टर्म विजयराज शिंदे यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवत ठेवला… पण २०१४ मध्ये याला धक्का बसला तो हर्षवर्धन सपकाळ यांच्या रुपानं.. काँग्रेसकडून उभ्या असणारे सपकाळ आमदार झाले.. खरंतर चौरंगी झालेली लढत आणि तेव्हा मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या संजय गायकवाड यांना दोन नंबरची मतं मिळाल्यामुळे सपकाळ यांचा विजय सोपा झाला.. यानंतरच्या पाच वर्षात जनसंपर्क, पक्षातील दिल्लीतील वाढेलेलं वजन आणि राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील नेते म्हणून ओळख मिळूनही हर्षवर्धन सपकाळ यांचा २०१९ ला पराभव झाला… कारण शिवसेना भाजप युती, मोदी लाट, वंचित फॅक्टर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शिवसेनेचे संजय गायकवाड निवडून आले.. मनसेतून शिवसेनेत येऊन आमदारकीचा स्पेस खाल्ल्यामुळे विजयराज शिंदे यांना शिवसेनेतून भाजपचं कमळ हाती घ्यावं लागलं.. पण पुन्हा शिवसेना फुटीत शिंदे गट भाजपसोबत आल्याने विजयराज शिंदे यांचं राजकीय अस्तित्व पुन्हा धोक्यात आलं… म्हणूनच लोकसभेला बुलढाण्यातून अर्ज दाखल करुन त्यांनी शिवसेनेची कोंडी कशी केली, हे आपण पाहीलच.. त्यात विद्यमान आमदार गायकवाड यांची बंडाळीमुळे इमेज खराब झाली… त्यांनी केलेल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अनेकदा अडचणीत आले.. त्यात बंडाळीमुळे कोअर शिवसैनिक आजही ठाकरेंच्या बाजूने असल्याचं लोकसभा निकालातूनही दिसल्यानं गायकवाडांची आमदारकी सध्या रेड झोनमध्ये आहे.. त्यात पक्षांतर्गत आणि भाजपमधूनच त्यांच्या आमदारकीला असणारा विरोध येत्या विधानसभेला त्यांना अडचणीचा ठरु शकतो.. त्यात विजयराज शिंदे यांनी पुन्हा शिवसेनेची मशाल हातात धरली तर मतदारसंघातलं वारं महाविकास आघाडीच्या बाजूने फिरु शकतं.. वायरल झालेले मारहाणीचे व्हिडिओ, महायुतीतील मित्रपक्षांना दिलेलं आव्हान आणि मराठा आरक्षणावरून निगेटिव्ह मध्ये जाणार मतदान एकत्रित करून पाहिलं तर यंदा संजय गायकवाड यांनच्यासाठी आमदारकीची वात बिकट आहे, एवढं मात्र नक्की…महाविकास आघाडीकडून ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहीलेले जालिंधर बुधवंत यांनी मतदारसंघात मशालीचा उजेड कमी होऊ दिलेला नाहीये.. त्यामुळे या निष्ठेचं बक्षीस उमेदवारीच्या स्वरुपात त्यांना मिळू शकतं.. डाॅ मधुसुदन सावळे यांचीही आमदारकीची इच्छा लपुन राहीलेली नाहीच. त्यासोबत काँग्रेसकडून जयश्रीताई शेळके यांनीही कोणत्याही परिस्थितीत आमदारकी लढवायचीच.. यासाठी जणू गुडघ्याला बाशिंग बांधलंय.. त्यामुळे मविआसाठी जागावाटपाचा तीढा बुलढाण्यासाठी तरी सध्या कठीण होऊन बसलाय.. आघाडीच्या या बिघाडीत गायकवाडांच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ नये, म्हणजे झालं… असं म्हणायची वेळ सध्या बुलढाण्यात आहे…

तिसरा आणि सर्वात जास्त इंटरेस्टींग चिखली विधानसभा… नागपूरनंतर विदर्भात प्रभावी केंद्र म्हणून चिखली ओळखली जाते. हे जरी खरं असल तरी भाजपचा या मतदारसंघात तीन वेळा विजय वगळता काँग्रेसचंच वर्चस्व बघायला मिळालं. भाजपच्या अंतर्गत बंडाळीमुळे कॉंग्रेसचे राहुल बोंद्रे हे 2009 आणि 2014 निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवू शकले… त्यामुळे 2019 लाही पुन्हा एकदा बोंद्रे जिंकतील असं वाटत असताना भाजपच्या लाटेत आणि तूपकरांनी बोंद्रेच्या विरोधात आघाडी उघडल्यामुळे भाजपचा पंधरा वर्षांचा वनवास संपवून श्वेता महाले यांच्या रूपाने चिखलीत पुन्हा एकदा कमळ फुलले… या अत्यंत चुरशीच्या लढतीत महाले या 6 हजार 851 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला. त्यांना 92 हजार 205 मते मिळाली. तर बोंद्रे यांना 85 हजार 433 मते मिळाली. त्यामुळे 2004नंतर भाजपला या मतदारसंघात प्रथमच विजय मिळविता आला…राज्यातील विविध प्रश्नावर महालेंनी आंदोलन केलं आहे. वीजबिल माफी, ट्रान्सफार्मर आणि लोडशेडिंगमुळे त्रस्त असलेल्यांना न्याय देणं, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्द्यांकडे त्यांनी सतत सरकारचे लक्ष वेधले. कोरोना काळात अकोला आणि बुलडाण्यात लॅब सुरू करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते… कोरोना काळात ग्रामीण भागातील सुमारे 4 हजार गरोदर महिलांना त्यांनी डाळींब, चिकू, केळी, टरबूज, पपई आणि खरबूजचे पॉकेट घरपोच पुरवले…आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय आमदार ठरल्या… करंट स्टेटस बद्धल बोलायचं झालं तर आमदार श्वेताताई महाले पाटील व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीची लढत होईल, अशी चिन्हं आहेत … तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हेदेखील या मतदारसंघातून आपले भवितव्य अजमावू शकतात. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर या मतदारसंघात चौरंगी लढतीचे संकेत आहेत…. पण सध्या तरी श्वेता महाले यांचं पारडं चिखलीमध्ये जड दिसतंय…

शेवटचा पाहुयात सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाबद्धल… स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंची जन्मभूमी अशी ओळख असलेल्या सिंदखेड राजामध्ये विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे… 2019 ला शिवसेनेचे स्टॅंडिंग खासदार शशिकांत खेडेकर यांना धूळ चारत शिंगणे यांनी मतदारसंघात राष्ट्रवादीला बस्तान बांधून दिलं… पण करायला गेलो एक अन् झालं दुसरंच अशी अवस्था सध्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. शशिकांत खेडेकर यांची झालीय. कारण अजितदादांच्या फुटीत शिंगणे सुद्धा महायुतीत आल्यानं आता विद्यमान आमदाराचा फिल्टर लावला तर त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा सुटण्याचे जास्त चान्सेस आहेत… म्हणूनच दादा गटाचे काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार गटान जाण्याची चर्चा सुरू आहे, तसं झालंच तर त्यात पहिला नंबर डॉ. राजेंद्र शिंगणेंचा असावा अशी मनोमन इच्छा डॉ. खेडेकरांना वाटत असावी…बाकी महायुतीकडून केवळ एकटे खेडेकरच इच्छुक आहेत का तर नाही.. तोताराम कायंदे, डॉ. सुनील कायंदे, विनोद वाघ, डॉ. गणेश मांटे, आता नव्याने तयारीला लागलेले योगेश जाधव यांच्या आमदार होण्याच्या इच्छा काही लपून राहिलेल्या नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या भाऊ गर्दीमुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीत चांगलाच जांगडगुत्ता निर्माण झालाय…भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.. विद्यमान आमदार शिंगणे कॅबिनेट मंत्री झाले.. पालकमंत्री झाले.. त्यामुळे विवीध भुमिपुजनावरुन, श्रेयवादावरुन दोघांच्यात बरीच वादावादी झाली…

अर्थात या सगळ्यात खेडेकरांचा जीव गुदमरु लागला.. आपलं राजकारण संपतय की काय अशी भीती त्यांना लागून राहीलेली असताना शिवसेनेत दोन गट पडल्याने खेडेकरांचा श्वास मोकळा झाला आणि त्यांनी राजेंद्र शिंगणेंना आव्हान देण्यासाठी शिंदे गटाची वाट धरली.. पण पुढे अजितदादा युतीत आले आणि त्यांच्या पाठोपाठ शिंगणे देखील.. त्यामुळे खेडेकर यांच्या आमदारकीच्या वाटा आणखीन बिकट झाल्या आहेत.. दुसरीकडे रविकांत तुपकर यांना याच मतदारसंघातून ३० हजारांचं लीड मिळालंय.. त्यात त्यांनी जिल्ह्यातल्या सहाही जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यानं सिंदखेड राजाची तरी परिस्थिती फारशी गुंतागुंतीची होऊन बसलीय.. तर अशी होती बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रमुख चार विधानसभा मतदारसंघांची येणाऱ्या विधानसभेला बघायला मिळणारी राजकीय समीकरणं.. बाकी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा इथलाही प्रमुख सामना असला तरी रविकांत तुपकर इथं किंगमेकरच्या भुमिकेत दिसण्याचे चान्सेस जास्त वाटतायत.. बाकी या चार जागांबद्धल तुमचं काय प्रिडीक्शन आहे, ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा.

मोठी बातमी!! राहुल गांधी 14 जुलैला आषाढी वारीत सहभागी होणार

Rahul Gandhi Ashadhi Wari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होणार आहेत. राहुल गांधी रविवारी म्हणजेच येत्या 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत. अवघा वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपुराकडे जात असताना आता राहुल गांधी सुद्धा या वारीत चालताना आपल्याला दिसतील. राहुल गांधी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतील. राहुल गांधी वारीत वारकऱ्यांशी संवाद साधण्याची सुद्धा शक्यता आहे.

राहुल गांधी यांनी आषाढी वारीत सहभागी व्हावे यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना निमंत्रण दिलेलं होतं. शरद पवार यांनीही राहुल गांधीना वारीचं महत्व पटवून देत या वारीत सहभागी व्हा असं आवाहन केलं होते. अखेर राहुल गांधी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून ते पहिल्यांदाच वारीत सहभागी होणार आहेत. राहुल गांधीं13 किंवा 14 जुलै रोजी वारीत सहभागी होतील असे सांगण्यात येत होते. आता मात्र त्यांच्या या दौऱ्यासाठी 14 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना १४ जुलैला राहुल गांधी वारीत पाहायला मिळतील.

राहुल गांधी यांची पायी वारी हि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरू शकते. एकीकडे भाजप आणि शिंदे गट हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरत असताना राहुल गांधी थेट आषाढी वारीत पायी सहभागी होऊन भाजपच्या हिंदुत्वाला छेद देऊ शकतात. त्यामुळे राहुल गांधी यांच्या या दौऱ्याचे महाराष्ट्र काँग्रेसतर्फे कसे नियोजन केले जाते? याची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे अजित पवार यांनीदेखील 7 जुलै रोजी पालखी सोहळ्यात हजेरी लावली होती.