Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 612

विधानसभेला कमी जागा घेतो पण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री कायम ठेवा; दादांची भाजपला अट??

ajit pawar vidhan sabha seats

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागलं असून त्यादृष्टीने जागावाटपावर चर्चा केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ३ प्रमुख पक्ष असल्याने जागावाटपावरून अनेकदा तेढ पाहताना मिळतोय. मात्र याच दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेला महायुतीत (Mahayuti) कमी जागा लढवण्याची तयारी दाखवल्याचे वृत्त समोर येत आहे. एकवेळ जागा कमी लढवू, पण नंतर सत्ता आल्यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ही दोन्ही मंत्रीपदे कायम ठेवा अशी दादांची अट असल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रात याबाबत बातमी आहे.

विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यामध्ये भाजप १२० ते १४० जागा लढवण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा मिळू शकतात. राज ठाकरेंची मनसे जर महायुतीत सामील झाली तर त्यांच्यासाठी सुद्धा १२ ते १४ जागा सुटू शकतात. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळं महायुतीच्या जागावाटपात पक्षाला दुय्यम स्थान मिळण्याची शक्यता आहे. वस्तुस्थिती लक्षात घेऊन अजित पवार यांनीही जागावाटपाच्या मुद्द्यावर तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे. महायुतीच्या नेत्यांमधील नुकत्याच झालेल्या बैठकींची माहिती असलेल्या एका भाजप नेत्याने सांगितले की, महायुतीचा विजय झाल्यास उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदी कायम राहू, असे आश्वासन मिळाळ्यास जागांच्या बाबतीत तडजोड करण्यास अजित पवार तयार आहेत. जर

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत सांगायचं झालयास, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष प्रत्येकी 95 जागा लढवतील अशी शक्यता आहे. यामध्ये ज्या भागात ज्या पक्षाची ताकद जास्त आहे त्याठिकाणी त्या त्या पक्षांना जास्तीच्या जागा सोडण्यात येतील. उदाहरणार्थ, उद्धव ठाकरेंना मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात जास्त जागा मिळतील, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनुक्रमे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केल्याचे समजते.

… तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल; सामनातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

EKNATH SHINDE AND RAJESH SHAH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील हिट अँड रन प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला पोलिसांनी तीन दिवसांनी अटक केली. मिहीर शाहाचे वडील राजेश शाहा (Mihir Shah) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेना गटाचे उपनेते आहेत. त्यामुळे अपघाताला राजकीय वळण लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे ‘मिंधे सरकार’ म्हणजे गुन्हेगारांनी गुन्हेगारांना वाचविण्यासाठी चालविलेले सरकार आहे, याविषयी आता कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. पोलिसांनी मिहीर शाहच्या फाशीची मागणी न्यायालयात करायला हवी तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल असं सामना अग्रलेखात म्हंटल आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

महाराष्ट्राचे ‘मिंधे सरकार’ म्हणजे गुन्हेगारांनी गुन्हेगारांना वाचविण्यासाठी चालविलेले सरकार आहे, याविषयी आता कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. गुन्हेगार निर्ढावले आहेत व त्यांना कायद्याची भीती अजिबात राहिलेली नाही. पोलीस आयुक्त, फौजदार फक्त गणवेश घालण्यापुरतेच उरलेले आहेत आणि राज्याच्या गृहमंत्र्यांची अवस्था एखाद्या बुजगावण्यासारखी झाली आहे. वरळी ‘हिट ॲण्ड रन’ गुन्हय़ातील आरोपी मिहीर शहाला मुंबई पोलिसांनी तीन दिवसांनी अटक केली. मिहीर शाहाने एका निरपराध महिलेची भररस्त्यावर हत्या केली आहे. नशेच्या अंमलाखाली त्याने आलिशान गाडी भरधाव चालवून कावेरी नाखवा यांचा निर्घृण पद्धतीने बळी घेतला. कावेरी नाखवांना शंभर मीटरपर्यंत फरफटत नेले. नाखवा यांचे पतीही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी मिहीर शहा पळून गेला. मिहीरच्या बापाचे राजकीय वजन आहे व तो थेट मुख्यमंत्र्यांच्या आतल्या गोटातला हस्तक असल्याने पोलिसांवर प्रचंड दबाव हा असायलाच हवा. पोलिसांनी मिहीरला त्वरित पकडले असते तर वैद्यकीय चाचणीत त्याने नशा केल्याचे सिद्ध झाले असते. पण तीन दिवसांनी आरोपी पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे त्याची नशेखोरी पोलीस सिद्ध करू शकतील काय? अर्थात जुहूतील एका पबमध्ये या मिहीरने दारू ढोसली व तो ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचे सीसी टीव्ही फुटेज समोर आले आहे.

मिहीर शहा याने एका निरपराध महिलेस चिरडून मारले. हा अनवधानाने घडलेला अपघात नसून आरोपीने दारू पिऊन केलेला सदोष मनुष्यवध आहे. बिघडलेल्या बापजाद्यांची ही बिघडलेली कार्टी रस्त्यावरील सामान्य माणसांना किडय़ामुंग्यांसारखी चिरडून पुढे जातात व आपल्या गाडीखाली कोणी तरी जिवाच्या आकांताने तडफडतो आहे याचे भानही त्यांना नसते. अशा प्रकरणातले आरोपी जामिनावर सुटतात व पुढे या खटल्यांचे काय होते ते कधीच कुणाला कळत नाही. भररस्त्यावर एका महिलेचा केलेला खून पचवून ढेकर द्यायची क्षमता आरोपी मिहीर शहा व त्यांच्या कुटुंबात आहे. आरोपीच्या पिताश्रींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यामुळेच तो मुख्यमंत्र्यांच्या आतल्या गोटात वावरतो. मुख्यमंत्री व त्यांच्या कार्यालयातून पोलीस स्टेशनला सरळ फोन जातात व समर्थक गुन्हेगारांना वाचवा अशा सूचना केल्या जातात. आता म्हणे या राजेश शहा नावाच्या ‘महात्म्या’ला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षातून काढून टाकले आहे. गुन्हा एवढा ढळढळीत असताना या महाशयांना पक्षातून काढण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी 60 तास घेतले. महाराष्ट्राचे सरकार हे केवळ श्रीमंत व गुन्हेगारांसाठीच काम करत आहे. तसे नसते तर कावेरी नाखवा यांचा खून करणाऱ्या मिहीर शहाच्या बापाला जामीन मिळालाच नसता. या राजेश शहाने आपल्या खुनी पोराला पळून जाण्यासाठी मदत केली व पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तरीही खुन्याचा बाप जामिनावर सुटतो हा चमत्कार मिंधे सरकारमध्येच घडू शकतो. मृत कावेरी नाखवा यांची मुलगी व पतीचा आक्रोश बधिर सरकारपर्यंत पोहोचेल काय?

कावेरी नाखवा यांचे पती सांगतात, “अपघात झाला तेव्हा मी आरोपीला गाडी थांबविण्याची विनवणी करीत होतो. मी त्याच्या गाडीच्या बोनेटवर जोरात हात आपटला तरीही त्याने गाडी थांबवली नाही व तो माझ्या पत्नीला तसाच फरफटत पुढे घेऊन गेला. गरीबांना या जगात कोणी वाली नाही.” कावेरीचे पती प्रदीप नाखवा यांचा हा आकांत आहे. मुख्यमंत्री राजकीय फायद्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेचे ढोल वाजवीत फिरत आहेत. पण त्यांच्याच आतल्या गोटातील गुन्हेगाराने कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीची हत्या केली. तिला चिरडून मारले व आता बहिणीच्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वरळीच्या ‘हिट ॲण्ड रन’ घटनेने मुंबईच्या रस्त्यावर माणुसकी चिरडून मेली. मुंबईतील धनाढय़ांना जणू संवेदनाच उरलेली नाही. या घटनेतील मृत कावेरी नाखवा या प्रख्यात मराठी कलावंत जयवंत वाडकर यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. आरोपीस वाचवण्यासाठी प्रकरण मॅनेज होतेय असा आरोप वाडकर यांनीही केला आहे. मात्र अशा प्रसंगी मुंबईतील मराठी नटनटय़ा मंडळही गप्पच बसून राहते. मिंधे सरकारला जाब विचारण्याची हिंमत कुणात दिसत नाही, कारण सगळेच मिंधे झाले आहेत. कुणाला बक्षिसे, कुणाला बिदाग्या दिल्या गेल्या असल्याने त्यांच्या ओझ्याखाली कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीच्या किंकाळया विरून गेल्या. आरोपी मिहीर शहाचा गुन्हा हा सदोष मनुष्यवधाचा आहे. पोलिसांनी त्याच्या फाशीची मागणी न्यायालयात करायला हवी तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल असं म्हणत ठाकरे गटाने शिंदेंवर निशाणा साधला आहे.

Expressway News : मुंबई -गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक ; काय आहे पर्यायी मार्ग ?

Expressway News : मुंबई गोवा महामार्गावरून जर तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण दिनांक 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही काही कामानिमित्त मुंबई गोवा महामार्गावरून (Expressway News) प्रवास करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यादरम्यान पर्यायी मार्गाची उपलब्धता करून देण्यात आली आहे चला जाणून घेऊया नक्की काय आहेत पर्याय मार्ग?

मुंबई ते गोवा या महामार्गावर (Expressway News) तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉग दोन टप्प्यांमध्ये असणार आहे हा ब्लॉग सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत असेल तर दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत पुन्हा हा ब्लॉक असणार आहे या कालावधीमध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आणि गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.

काय आहे ब्लॉकचे कारण? (Expressway News)

मुंबई गोवा महामार्गावरच्या जवळी पुई येथील म्हैसदरा इथं पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे गर्डर बसवण्यात येणार आहेत त्यासाठी हा ब्लॉग घेणं गरजेचं होतं म्हणून हा ब्लॉक 11 ते 13 जुलैला घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक एकूण दोन टप्प्यांमध्ये घेतला (Expressway News) जाणार असून या कालावधीमध्ये या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येईल.

काय आहे पर्यायी मार्ग (Expressway News)

पर्यायी मार्गानुसार वाकण फाटा इथून भिसे खिंड- रोहा- कालाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल. तर वाकण फाटा येथून पाली रवाळजे -कोलाड किंवा पाली- रवाळजे- निजामपूर -माणगाव वरून मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करता येईल. याशिवाय खोपोली- पाली- वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली -रवाळचे- कोलाड किंवा पाली- रवाळजे- निजामपूर -माणगाव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून (Expressway News) मार्गस्थ करता येईल.

तर गोव्यावरून मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग (Expressway News) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार कोलाड येथून कोलाड- रोहा- भिसे खिंड- वाकण फाटा किंवा नागोठणे वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावर येत आहे. तर कोलाड इथून रवाळजे – पालीवरून वळवून वाकड -पाली खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. कोलाड येथून रवाळजे- पाली- वाकण फाटावरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. हे पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. सर्व प्रवाशांनी या कालावधीमध्ये या मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MahaRERA : महारेराकडून 628 प्रकल्पांवर कारवाई , केला 72 लाखांचा दंड वसूल

MahaRERA : महाराष्ट्रातील 628 गृहनिर्माण प्रकल्पांवर कठोर कारवाई करत, महारेराने त्यांना जवळपास 90 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पांच्या मालकांनी महारेरा (MahaRERA) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या जाहिरातींमध्ये RERA नोंदणी क्रमांक आणि QR कोड प्रकाशित केला नाही. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कोणत्या शहरातून किती दंडाची वसुली ? (MahaRERA)

या कारवाईतून आतापर्यंत 72.35 लाख रुपये वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई विभागातील 312 प्रकल्पांवर 54.25 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, त्यापैकी 41.50 लाख रुपये आतापर्यंत (MahaRERA) वसूल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुणे परिसरातील 250 प्रकल्पांवर 28.30 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, त्यापैकी आता 24.75 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तर नागपूर विभागातील 66 प्रकल्पांवर 6.35 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 6.10 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

विकासक करतायत नियमांचे उल्लंघन (MahaRERA)

महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) कायदा 2016 लागू केला होता आणि त्याअंतर्गत महारेराची स्थापना करण्यात आली होती. असे असतानाही विकासक नियमांचे उल्लंघन करून नोंदणी क्रमांक आणि क्यूआर कोड न देता जाहिरात करत आहेत. महारेराने (MahaRERA) या प्रकरणी ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) चीही मदत घेतली आहे. जरी ASCI च्या सहकार्यामुळे उल्लंघन करणाऱ्यांची ओळख पटवण्यात मदत झाली असली तरी, सोशल मीडियावर उल्लंघनाचे प्रमाण खूप जास्त आहे हे चिंताजनक आहे. महारेराने ऑगस्ट 2023 पासून विकासकांना प्रकल्पाची तपशीलवार माहिती देणे बंधनकारक केले आहे.

महारेरा नोंदणीशिवाय जाहिरात करता येणार नाही (MahaRERA)

महारेरा चे चेअरमन अजोय मेहता यांनी सांगितले की, कोणताही गृहनिर्माण प्रकल्प प्रवर्तक त्याच्याकडे महारेरा (MahaRERA) नोंदणी क्रमांक नसल्यास त्याच्या प्रकल्पाची जाहिरात करू शकत नाही. याशिवाय महारेराने 1 ऑगस्टपासून अशा जाहिरातींसोबत QR कोड छापणेही बंधनकारक केले आहे जेणेकरून घर खरेदीदारांना एका क्लिकवर प्रकल्पाविषयी महत्त्वाची माहिती मिळू शकेल. असे असतानाही काही प्रकल्प प्रवर्तक या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना दिसत असून, त्यांच्याविरुद्ध आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्त्यात तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी (7th Pay Commission) वाढ केली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ वरुन ५० टक्के झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वर्षातून दोनदा दिला जातो. याबाबतच आज शासन आदेश काढण्यात आला आहे. यात १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला असल्याचे सांगितले आहे.

शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे हा महागाई भत्ता शासकीय, निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी या सर्वांना मिळणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून अशा सहा महिन्यांच्या थकबाकीसह कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता दिला जाईल. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदात दुपटीने वाढ झाली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतरच राज्य सरकारने देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (7th Pay Commission) वाढ केली आहे.

आतापर्यंत महागाई भत्त्यात झालेली वाढ (7th Pay Commission)

दरम्यान, यापूर्वी १ जानेवारी २०२३ रोजी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. तेव्हा ४२ टक्के महागाई भत्ता देण्याचा आदेश काढण्यात आला होता. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये हा महागाई भत्ता पुन्हा वाढवण्यात आला नाही. पुढे २३ नोव्हेंबर २०२३ रोजी महगाई भत्ता वाढवण्यात आला. तेव्हा महागाई भत्ता ४२ वरून ४६ टक्के करण्यात आला होता. आता सरकारने पुन्हा एकदा या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. हा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात आला आहे.

Moto G85 5G : 12GB RAM सह Moto ने लाँच केला 5G मोबाईल; या दिवशी विक्रीसाठी खुला

Moto G85 5G launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Motorola ने भारतीय बाजारात G सिरीज अंतर्गत आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Moto G85 5G असं या स्मार्टफोनचे नाव असून हा मोबाईल २ व्हेरिएन्टमध्ये सादर करण्यात आलाय. 12GB RAM, 50MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स तुम्हाला या मोबाईल मध्ये पाहायला मिळतील. चला तर मग मोटोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये नेमके काय फीचर्स आहेत? त्याची स्पेसिफिकेशन काय आणि किती रुपयात तुम्ही तो खरेदी करू शकता याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात….

6.67 इंचाचा डिस्प्ले –

Moto G85 5G मोबाईल मध्ये 120 Hz रीफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा फुल-HD+ 3D कर्व्ह डिस्प्ले देण्यात आलाय. या डिस्प्लेला 1600 nits पीक ब्राइटनेस आणि 240 Hz टच सॅम्पलिंग रेटचा सपोर्ट असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण मिळतेय. कंपनीने या नव्या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर बसवला असून मोटो हा मोबाईल 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

कॅमेरा – Moto G85 5G

Moto G85 5G मध्ये पाठीमागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय ज्यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाईड अँगलचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP चा फ्रंट कॅमेरा बसवण्यात आलाय. मोबाईल मध्ये पॉवर साठी 5000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33W टर्बोचार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Moto G85 5G च्या 8GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 17,999 रुपये आहे. तर 12GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये आहे. मोटोचा हा मोबाईल निळ्या, हिरव्या आणि ग्रे रंगात उपलब्ध असून 16 जुलै रोजी दुपारी 12 वाजता पहिली विक्री सुरु होईल. प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वरून तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

, Moto G85 5G 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे.

Health Tips : दातांवरील पिवळेपणा मुळापासून होईल गायब ; वापरून पहा ही ‘होममेड टूथपेस्ट’

Health Tips : आपल्याकडे असं म्हटलं जातं की “फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन” आणि पहिलं इम्प्रेशन हे तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या स्माईल वरून ठरतं आणि जर तुम्ही स्माईल करत असताना तुमचे पांढरे शुभ्र चमकदार दात असतील तर तुमची स्माईल तुमच्या व्यतिमत्वात भर टाकते. म्हणूनच पांढरे शुभ्र दात तुमच्या इमेज मध्ये वेगळीच छाप (Health Tips) उमटवतात.

पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लाइफस्टाईल ही पूर्णपणे बदलाली असून त्यानुसार खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या दातांवर होतो. परिणामी दात हे (Health Tips) पिवळे दिसायला लागतात. खास करून सिगरेट आणि तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये दातावर पिवळा थर जमा झालेला दिसतो. वैद्यकीय भाषेत याला प्लाक असं म्हणतात. हा प्लाक म्हणजे एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. जो दातांमध्ये अडकलेल्या अन्नामुळे आणि लाळे मुळे तयार होत असतो.

तसे पाहायला गेले तर प्लाक हा नुकसानकारक नसतो पण हा जर दातांवर जास्त (Health Tips) दिवस राहिला तर दात कमजोर होतात. हिरड्यांच नुकसान होतं आणि परिणामी तोंडाला वास येणं, दात किडन, हिरड्या कमजोर होणं, हिरड्यांमधून रक्त येणे अशा समस्या निर्माण होऊ लागतात. म्हणूनच अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर आणि लेखक डॉक्टर जोसेफ मार्कोला यांनी दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी खास उपाय सांगितला आहे.

हा उपाय आपल्याला घरच्या घरी करता येणार आहे आणि तुम्ही वापरत असलेल्या पेस्टमध्ये भरमसाठ (Health Tips) केमिकल्स वापरलेले असतात जी तुमच्या आरोग्यासाठी चांगली नसतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला होममेड टूथपेस्ट कशी बनवायची? हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

ही होम मेड पेस्ट बनवण्यासाठी खोबऱ्याचं तेल, बेकिंग सोडा, चिमूटभर हिमालयन मीठ आणि पेपर मेंट ऑइल चे काही थेंब असे साहित्य (Health Tips) आपल्याला लागणार आहे.

आता ही पेस्ट बनवण्यासाठी सर्वात आधी खोबऱ्याचं तेल, बेकिंग सोडा, मीठ आणि पेपर मेंट ऑइल हे सर्व जिन्नस एका वाटीमध्ये घ्या. हे जिन्नस चांगले मिक्स करून घ्या. सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी हे मिश्रण दातांवर चांगल्या प्रकारे घासा. हा उपाय तुम्ही बरेच दिवस करून पहा. त्यामुळे तुमचे दात चमकदार दिसतील (Health Tips)

मोदी सरकारचा मोठा निर्णय!! महिला IRS अधिकाऱ्याला लिंग आणि नाव बदलण्यास परवानगी

M Anusuya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकताच अर्थ मंत्रालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या काळात पहिल्यांदाच मंत्रालयाने एका वरिष्ठ महिला IRS अधिकाऱ्याला त्यांचे नाव आणि लिंग बदलण्याची परवानगी दिली आहे. एम अनुसूया (M Anusuya) असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून ते हैदराबादच्या सीमाशुल्क उत्पादन आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (CESTAT) च्या मुख्य आयुक्त कार्यालयात सह आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. एम अनुसूया यांनी आपले नाव आणि लिंग बदलण्याची परवानगी मागितली होती. यालाच मोदी सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून एम अनुकथिर सूर्य असे ठेवले आहे.

सर्वात प्रथम 2013 साली सूर्या यांनी चेन्नईमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. यानंतर त्यांना 2018 मध्ये उपायुक्तची जबाबदारी देण्यात आली. त्या गेल्याच वर्षी हैदराबादमध्ये पोस्टिंगवर रुजू झाल्या होत्या. त्यांच्यासाठी लिंग बदल शस्त्रक्रिया करणे प्रचंड आव्हानात्मक होते. यासाठी लागणारा खर्च ही अधिक होता. तसेच, या संपूर्ण प्रक्रियेसाठी परवानगी सर्वात जास्त अवघड काम होते. कारण की, लिंग बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी कायदेशीर परवानगी काढावी लागते.

महत्त्वाचे म्हणजे, त्यासाठी प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर या अर्जावर कायदेशीर प्रक्रिया होत असते. तसेच, एकदा एखाद्या व्यक्तीने लिंग बदलण्याचा निर्णय घेतला की त्याला प्रतिज्ञापत्राचा मसुदा तयार करावा लागतो. या पत्रात लिंग बदल घोषित करावा लागतो. ही सर्व प्रक्रिया करण्यासाठीच त्यांना मोदी सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे एम अनुसूया यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय लिंग आणि नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करता आली आहे.

मुस्लिम महिलांनाही पोटगी मागण्याचा अधिकार असणार!! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकताच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुस्लिम महिलांसंबंधी (Muslim Women) एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामध्ये न्यायालयाने “मुस्लिम महिलांना देखील पतीकडून पोटगी (Claim Maintenance) मागण्याचा अधिकार” असल्याचे सांगितले आहे. ‘फौजदारी प्रक्रिया संहितेच्या’ कलम 125 नुसार पतीकडून घटस्फोटीत मुस्लिम महिला पोटगीची मागणी करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे कित्येक मुस्लिम महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाचे म्हणजे, तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला एका मुस्लिम व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. या याचिकेवरच बुधवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 नुसार घटस्फोटित पत्नी पतीकडून पोटगीची मागणी करु शकते, असे सांगितले आहे. त्याचबरोबर न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने दाखल झालेली याचिका फेटाळून लावली आहे.

या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नागरथना यांनी म्हणले की, कलम 125 हा सर्व महिलांना लागू होईल. ज्या अंतर्गत त्या पोटगी मागू शकतात. पुढे खंडपीठाने म्हटले की, “देखभाल करणे विवाहित महिलांचा हक्क आहे आणि तो सर्व विवाहित महिलांना लागू होतो, मग त्यांचा धर्म कोणताही असो.” दरम्यान, तेलंगणा उच्च न्यायालयाने मोहम्मद अब्दुल समद यांना त्यांच्या घटस्फोटित पत्नीला दरमहा 10,000 रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. याविरोधातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु त्यांचीही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर हल्लाबोल; सभागृहात विखे पाटील आक्रमक

sharad pawar vikhe patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळ अधिवेशनात आज सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळाले. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आलेल्या सर्व पक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. त्यानंतर हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत उचलून धरला. त्यातच भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil ) यांनी नाव न घेता थेट शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होवूनही त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता आला नाही असा आरोप विखे पाटलांनी करताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात आक्रमकपणे भाषण करत शरद पवारांवर सडकून टीका केली. चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने कधी मराठा आरक्षणावर ब्र काढला नाही. कधी मोर्चात दिसले नाहीत. त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता आला नाही, त्यांनी कधीच मराठ्यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आमचं आवाहन आहे, या आरक्षणाचं नेमकं शत्रू कोण आहेत ते ओळखावं आणि त्यांना गावबंदी करावं असं म्हणत विखे पाटलांनी पवारांवर हल्लाबोल केला.

ते पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रुपांतर केलं. सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं. पण महाविकास आघाडीच्या काळात त्यांचे मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर होते. त्यामुळे ते आरक्षण गेलं. मात्र लोकांना झुलवत ठेवणे हे विरोधकांचे काम आहे. फक्त समाजा-समाजात दुही माजवायचे काम विरोधक करत आहेत त्यामुळे जरांगे पाटलांनी ओळखलं पाहिजे तुमचे शत्रू कोण आहेत? असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.