Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 616

MMRCL Recruitment 2024 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत या पदाची भरती सुरु, असा करा अर्ज

MMRCL Recruitment 2024

MMRCL Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत मुख्य दक्षता अधिकारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाची एकूण 1 रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 16 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा आता. या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

महत्त्वाची माहिती | MMRCL Recruitment 2024

  • पदाचे नाव – मुख्य दक्षता अधिकारी
  • पदसंख्या – 1 जागा
  • वयोमर्यादा – 56 वर्ष
  • नोकरीच्या ठिकाणी – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन ईमेल किंवा ऑफलाईन
  • ईमेल करण्याचा मेल आयडी –
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड MMRCL ट्रांझिट ई ब्लॉक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे पूर्व मुंबई 400051
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024.

अर्ज कसा करावा ?

  • हे अर्ज तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करू शकता.
  • दिलेल्या पत्त्यावर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा
  • 16 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरचा अर्ज करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

IITM Pune Bharti 2024 | पुण्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु

IITM Pune Bharti 2024

IITM Pune Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांचे पुण्यामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत एक मोठी भरती सुरू झालेली. या भरती अंतर्गत MRFP संशोधन फेलो (IITM Pune Bharti 2024) या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 34 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 10 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर सर्च करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | IITM Pune Bharti 2024

  • पदाचे नाव – MRFP संशोधन फेलो
  • पदसंख्या – 34 जागा
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 28 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराची M.SC पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आणि M. TECH झालेले असणे गरजेचे आहे.
  • मासिक वेतन – 37 हजार रुपये महिना

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
  • 10 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Pune News : पुणेकरांसाठी खुशखबर ! रविवार पासून सुरु होणार विमानतळावरील नवे टर्मिनल

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणेकरांना रविवारपासून म्हणजेच 14 जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्या टर्मिनल ची सेवा अनुभवायला मिळणार आहे. पुणे शहरातल्या (Pune News) आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल आता पूर्ण होत असून सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या X (आधीचे ट्विटर) अकाउंट वरून दिली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार नवी टर्मिनल सुरू करण्यासाठी अतिरिक्त सीआयएसएफ जवानांची आवश्यकता होती. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्याला तातडीने परवानगी मिळाली असून सीआयएसएफचे जवान पुणे (Pune News) विमानतळावर दाखल झाले आहेत.

222 CISF कर्मचाऱ्यांना मंजुरी (Pune News)

मोहोळ यांनी माहिती देताना सांगितले की , “पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल या रविवारपासून कार्यान्वित होणार आहे! CISF कर्मचाऱ्यांच्या आणि इतर तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन टर्मिनल 14 जुलै, रविवारपासून नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. त्यांनी नमूद केले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन टर्मिनलचे कामकाज सुरू (Pune News) करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त 222 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कर्मचाऱ्यांना मंजुरी दिली आहे.यावर्षी मार्चमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 423 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधलेल्या 51,595 चौरस मीटर टर्मिनलचे लोकार्पण केले. तरीही, अधिक CISF कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण झाली नाही, ज्यामुळे त्याचे कार्यान्वित होण्यास विलंब झाला.

मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास (Pune News)

दरम्यान टर्मिनल कार्यान्वित करताना नव्या टर्मिनल च्या पहिल्या प्रवाशाला केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात येणार आहेत. एअर इंडियाच्या प्रवाशाला 14 जुलै रोजी दुपारी एक वाजता बोर्डिंग पास देत नवे टर्मिनल कार्यान्वित केले जाणार आहे. टर्मिनल 2 च्या नवीन जोडणीमुळे या विमानतळाची प्रतिवर्षी सोळा दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची क्षमता (Pune News) असेल. एक देशांतर्गत उड्डाणांसाठी आणि दुसरी आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी.

मी घरी परत आलोय!! उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वसंत मोरेंचा शिवसेनेत प्रवेश

Vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मनसेतून वंचित बहुजन आघाडीत गेलेल्या वसंत मोरे यांनी आज (मंगळवारी) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. यावेळी संजय राऊतसह नगरसेवक, शाखाध्यक्ष, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि इतर मंडळी उपस्थित होत्या. महत्वाचे म्हणजे, वसंत मोरे (Vasant More) यांनी वंचितची साथ सोडल्यामुळे प्रकाश आंबेडकरांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात मनसे पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचा मोठा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा वसंत मोरे यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. आता त्याने उद्धव ठाकरे यांच्या घरात प्रवेश करत शिवबंधन हाती बांधले आहे. त्यामुळे वसंत मोरे यांना उद्धव ठाकरे गटाकडून मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

वसंत मोरे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, ”16व्या वर्षी मी शिवसैनिक झालो होतो. बारावी पास झाल्यावर मी शाखाप्रमुख झालो. माझा राजकीय प्रवास शिवसेनेतूनच सुरू झाला. आता माझा शिवसेनेत प्रवेश झाला नाही तर, मी घरी परत आलो आहे. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश करत आहे. त्यामुळे पक्ष जी जबाबदारी मला देईल ती स्वीकारून प्रामाणिकपणे काम करेन” अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत दिली आहे.

Mumbai local updates : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! मध्य-हार्बर मार्गावरील रेल्वे धावणार उशिरा

Mumbai local updates : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. मुंबईतही रविवारी रात्री आणि सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत झालेल्या पावसामुळे लोकलवर मोठा परिणाम झाला असून सोमवारी ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे काही काळासाठी लोकल स्थगित करण्यात होत्या. नवी मुंबई सह ठाण्याच्या स्टेशनवर सुद्धा ओफिसला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान आज मंगळवारी मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार असून काही ठिकाणी पावसाने उसंत घेतल्यामुळे मुंबईकरांना (Mumbai local updates) दिलासा मिळाला आहे.

दरम्यान आज पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु राहणार आहे. मात्र मध्य आणि हार्बर रेल्वेवर पावसाचा परिणाम(Mumbai local updates) झाला असून या मार्गावरील रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू झाल्या आहेत . मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सध्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. याबाबतची माहिती रेल्वे स्थानकांवर घोषणांद्वारे दिली जाते आहे.

दरम्यान सोमवारी लोकलची व्यवस्था कोलमडल्यामुळे प्रवाशांना (Mumbai local updates) गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. तर हार्बर मार्गावरील वाहतूक ही जवळपास 15 मिनिटं उशिराने सुरू आहे.

पावसामुळे प्रशासन अलर्ट (Mumbai local updates)

राज्यभरात पावसाने दमदार बरसायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे, नवी मुंबई येथे सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुसळधार पावसामुळे पालिका प्रशासनाने कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.

BSNL 28 Day Recharge | BSNL ने आणला 28 दिवसांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, मोफत कॉलिंगसह मिळणार अनेक सुविधा

BSNL 28 Day Recharge

BSNL 28 Day Recharge | सध्या अनेक खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केलेले आहेत. जिओ, एअरटेल आणि आयडियाने देखील त्यांच्या महिन्याच्या पोस्टपेड, प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे. अशातच आता BSNL ने 28 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन केलेला आहे. यामध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग, 2जीबी डाटा देखील मिळणार आहे. BSNL ने 4G सेवा देखील सुरू केलेली आहे. आणि लवकरच ती सर्व राज्यांमध्ये चालू होणार आहे.

इतर टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन महाग केल्यानंतर आता BSNL ने (BSNL 28 Day Recharge) त्यांच्या ग्राहकांसाठी 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत हे प्लॅन आणलेले आहेत. ज्यामध्ये 28 दिवसांची वैधता आहे. यामध्ये तुम्हाला कॉलिंग आणि नेटचा देखील अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे अनेक लोक आता BSNL कडे वळू लागलेले आहेत. आता हे प्लॅन कोणते आहेत हे आपण जणू घेणार आहोत.

BSNL रु. 139 प्लॅन | BSNL 28 Day Recharge

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता 28 दिवस आहे, यामध्ये स्थानिक आणि STD व्हॉईस कॉल्स 28 दिवसांसाठी अमर्यादित उपलब्ध आहेत, यासोबतच, दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे.

BSNL चा 184 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या या रिचार्जमध्ये 28 दिवसांसाठी अमर्यादित लोकल आणि एसटीडी व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत, यामध्ये दररोज 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत.

BSNL चा 185 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 185 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 28 दिवस आहे आणि या प्रीपेड प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉलिंग सुविधा आणि दररोज 1GB डेटा आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत.

BSNL चा 186 रुपयांचा प्लॅन

BSNL चा रु. 186 प्रीपेड प्लॅन सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग सुविधा प्रदान करतो, त्याची वैधता 28 दिवस आहे आणि 1GB डेटा प्रतिदिन, 100 SMS देखील उपलब्ध आहेत.

BSNL चा 187 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता देखील 28 दिवस आहे आणि यामध्ये मोफत कॉलिंग, 1.5GB डेटा प्रतिदिन आणि 100 SMS प्रतिदिन 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे.

BSNL चा 199 रुपयांचा प्लॅन | BSNL 28 Day Recharge

BSNL चा हा सर्वोत्तम प्लॅन आहे, याची वैधता 30 दिवस आहे, यामध्ये युजर कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतो आणि यासोबतच 100 एसएमएस मोफत मिळतात दररोज उपलब्ध आहेत.

Gold Price Today: ग्राहकांसाठी खुशखबर!! सोन्यासह चांदीच्या भावात ही मोठी घसरण

Gold Price Today (1)

Gold Price Today: सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्या-चांदीचे भाव स्थिरावले आहेत. त्यामुळेच भारतातील सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण होताना पाहायला मिळत आहे. कारण की सलग तीन दिवस सोन्या आणि चांदीचे भाव घसरलेले पाहायला मिळत आहेत. आज म्हणजेच 9 जुलै रोजी देखील सोन्या चांदीच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुळे तुम्हाला देखील सोने खरेदी करायचे असेल तर आजचे भाव तपासा.

गुड रिटर्न्सनुसार 9 जुलै रोजी बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 67,100 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासह 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 73,200 रुपयांवर येऊन पोहोचले आहे. तसेच 100 ग्रॅम 22 कॅरेट सोने 6,71,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोने हे 7,32,500 रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकाला सोने खरेदी करणे परवडणार आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 67,100 रुपये
मुंबई – 67,100 रुपये
नागपूर – 67,100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 73,200 रूपये
मुंबई – 73,200 रूपये
नागपूर – 73,200 रूपये

चांदीचे आजचे भाव

9 जुलै रोजी फक्त सोन्याच्या नाही तर चांदीच्या भावात हे घसरण झाली आहे. सराफ बाजारात 10 ग्रॅम चांदीचा भाव 945 रुपयांनी व्यवहार करत आहे. (Gold Price Today) तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 9,450 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 94,500 रूपये अशी आहे.

CNG PNG Price | पावसाच्या नैसर्गिक संकटासह मुंबईकरांना आर्थिक फटका; CNG- PNG झाले इतक्या रुपयांनी महाग

CNG PNG Price | सध्या मुंबईमध्ये जोरदार पाऊस चालू आहे. या अति मुसळधार पावसामुळे मुंबईमधील जनजीवन ठप्प झालेले आहे. शाळा, कॉलेज यांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक गाड्या देखील काही बंद केलेल्या आहेत. या आधीच मुंबईकरांवर एक नैसर्गिक संकटच आहे. आणि त्यात आता पुन्हा एकदा त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. कारण इथून पुढे त्यांच्या खीसाला जास्त कात्री लागणार आहे. कारण आता महानगर गॅस लिमिटेड सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किमतीत वाढ केलेली आहे. हे नवे दर (CNG PNG Price) आजपासून म्हणजेच 9 जुलैपासून अमलात येणार आहेत. सीएनजी हा 1.50 रुपयांनी वाढलेला आहे तर पीएनजी 1 रुपयांनी महाग झालेला आहे. त्यामुळे आता नागरिकांना वाहन चालवण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

नव्या दर्‍यानुसार मुंबईकरांना एक किलो सीएनजीसाठी (CNG PNG Price) 75 रुपये आणि घरगुती पीएनजीसाठी 48 रुपये द्यावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेमध्ये सीएनजीचे दर कमी आहे. तरी देखील आता मुंबईतील बऱ्याच टॅक्सी आणि रिक्षा सीएनजीवर चालत असल्याने प्रवास आता महागणार आहे. त्याचप्रमाणे गृहिणींना देखील आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. कारण गॅस लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजी दरात बदल केलेले आहे.

सध्या सिएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ झाली असली, तरी हे इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपेक्षा स्वस्त आहे. गॅस सीएनजीची किंमत मुंबई पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेमध्ये 50 टक्के तर पीएन 17 टक्क्यांनी स्वस्त आहे.

Free Higher Education For Girls | मोफत उच्च शिक्षणासोबत मुलींना परीक्षा शुल्कामध्ये मिळणार 100 टक्के सवलत; शासन निर्णय जारी

Free Higher Education For Girls

Free Higher Education For Girls | आपले सरकार हे मुलींसाठी नेहमीच नवनवीन योजना आणि उपक्रम घेऊन येत असतात. जेणेकरून मुलींना त्याचा फायदा होईल. आणि मुली चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतील. अशातच राज्यातील मुलींसाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग तसेच मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क आता 100% माफ करण्याचा (Free Higher Education For Girls) निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 8 जुलैच्या बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे. याबाबतची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे.

राज्य सरकारने (Free Higher Education For Girls) जो आदेश जारी केला आहे. त्यात असे म्हटले आहे की, नवीन शिक्षक शैक्षणिक धोरणानुसार आता व्यवसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच मुलींना सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नये यासाठी निर्णय घेण्यात आलेले आहेत.

ज्या मुलींचे शैक्षणिक शुल्क परीक्षा शुल्क यामध्ये सवलत द्यायची आहेत. त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे. अशा व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय 6/4 /2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक आणि संस्था पाहिजे या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले आणि मुली यांना सुद्धा लाभ मिळणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी EWS आरक्षणातून प्रवेश घेतलेला आहे. त्यांना राजश्री शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे ईडब्ल्यएस प्रमाणपत्र ऐवजी आई वडील यांचे उत्पन्नावर आधारित सक्षम अधिकारी यांचे यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र देखील महत्त्वाचे आहे. परंतु जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई-वडिलांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र देखील विचारात घेण्यात येणार आहे. शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ हा पहिल्या वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करायची आवश्यकता नाही.

Jio New Recharge Plan | जिओने ग्राहकांसाठी आणले 3 स्वस्त प्लॅन, जाणून घ्या फायदे

Jio New Recharge Plan

Jio New Recharge Plan | रिलायन्स जिओ ही आपल्या भारतातील एक सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे अनेक ग्राहक देखील आहेत. रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असतात. त्यांनी काही दिवसापूर्वीच त्यांच्या रिचार्ज महाग केलेले आहे. कंपनीने त्यांचे प्रीपेड पोस्टपेड आणि डेटा प्लॅन देखील वाढवलेले आहेत. यासोबतच आता कंपनीने पोर्टफोलिओमध्ये देखील काही नवीन प्लॅन आणले आहे. त्या प्लॅनबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.

Reliance Jio | Jio New Recharge Plan

रिलायन्स जिओनी त्यांच्या कॅटलॉगमध्ये काही नवीन प्लॅन आणलेले आहेत. त्याची किंमत 51 रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे हे प्लॅन आपल्यासाठी सर्वोत्तम प्लॅन ठरणार आहे ज्या लोकांना फक्त डेटासाठी रिचार्ज करायचा आहे. त्यांच्यासाठी हे प्लॅन खूप फायदेशीर आहे यामध्ये तुम्हाला फाईव्ह जी डेटा मिळतो.

51 रुपयांचा प्लॅन

51 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 3 gb डेटा मिळतो. याचा स्पीड 4G एवढा असणार आहे. डेटा संपल्यानंतर हे युजर ना 64 Kbps मिळतात. त्याचप्रमाणे तुमचा आधीचा प्लॅन जितके दिवस आहे, तितके दिवस या प्लॅनची वैधता असणार आहे.

101 रुपयांचा प्लॅन | Jio New Recharge Plan

या प्लॅनमध्ये तुम्हाला 4G स्पीड सह 6GB डेटा मिळणार आहे. 151 रुपयांच्या प्लॅनमध्ये 9 GB डेटा दिला जातो . त्याचप्रमाणे तुमच्या आधीच्या प्लॅनची वैद्यता आहे तितके दिवस हा प्लॅन चालणार आहे. रिलायन्स जिओ 5 G डेटा वापरण्याचे नियम देखील बदललेले आहे. पूर्वीप्रमाणे आता सर्वांना अमर्यादित डेटा मिळत नाही