Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 615

BSNL Recharge Plan | BSNL चे नेट चालणार रॉकेट स्पीडने; कंपनीने लॉन्च केला 1000 GB डेटाचा खास प्लॅन

BSNL Recharge Plan

BSNL Recharge Plan | मागील काही दिवसापूर्वी देशातील लोकप्रिय टेलिफोन कंपन्या Jio, Airtel आणि VI यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्या ग्राहकांना देखील चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे अनेक युजर हे BSNL वापरण्यावर भर देत आहेत. अनेक टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL पूर्ण तयारी केलेली आहे. BSNL आपल्या ग्राहकांना अतिशय कमी दरामध्ये रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देत आहेत. आज आम्ही तुम्हाला या कंपनीच्या ब्रोडबंड ब्रँड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला तब्बल 1000 GB सुपरफास्ट इंटरनेट मिळणार आहे.

1000 GB डेटा मिळेल | BSNL Recharge Plan

कंपनीच्या भारत फायबरमध्ये अनेक क्लास त्यांनी दिलेले आहेत. यामध्ये ग्राहकांना खास सुपरफास्ट इंटरनेट देखील दिले जाते. BSNL साठी 329 रुपयांच्या फायबर ब्रॉड ब्रँड प्लॅनमध्ये ग्राहकांना 25 MBPS च्या वेगाने 1000 GB डेटा ऑफर केला जातो. त्याचप्रमाणे 399 रुपयांच्या भारत फायबर ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 30 MBPS स्पीडने 1400 जीबी डेटा दिला जातो. हे प्लॅन खास करून ग्रामीण भागातील युजरचा विचार करून बनवलेले आहेत. या प्लॅनची वैधता 30 दिवसांसाठी असणार आहे.

कंपनीच्या बेसिक ब्लड बँक ग्राहकांसाठी 2 प्लॅन त्यांनी उपलब्ध केलेले आहेत. 249 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये युजरला 50 BMPS च्या वेगाने 10 GB मिळतो. त्याचप्रमाणे डेटा संपल्यानंतर 2 MBPS च्या स्पीडने अमर्यादित डेटा वापरता येतो. याचप्रमाणे 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 25 MBPS च्या स्पीडमध्ये 20 GB डेटा दिला जातो. तसेच युजर्सला दोन MBPS स्पीडने अमर्यादित डेटा मिळतो

Gautam Gambhir : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड होताच गंभीरचं खास ट्विट; तुम्हालाही वाटेल अभिमान

Gautam Gambhir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल द्रविड यांच्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची (Gautam Gambhir) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड कऱण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून या पदासाठी गंभीरच नाव चर्चेत होते मात्र याबाबत अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून कऱण्यात आली नव्हती. मात्र काल BCCI ने गौतम गंभीरची निवड जाहीर केली आहे. प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गंभीरने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्न साकार करण्यासाठी मी सर्वकाही पणाला लावेन असं गंभीर म्हणाला.

काय आहे गंभीरचे ट्विट?

‘भारत ही माझी ओळख आहे, देशाची सेवा करणं हे माझ्या आयुष्यातील अभिमानाची बाब आहे. मला संघात वेगळ्या भूमिकेत पुनरागमन केल्याचा अभिमान वाटत आहे. प्रत्येक भारतीयाला हेवा वाटवा हेच माझं ध्येय आहे. 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्न निळी जर्सी परिधान केलेल्या खेळाडूंच्या खांद्यावर आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सर्वकाही पणाला लावेन. ‘, असं गौतम गंभीरने ट्वीट करून सांगितलं आहे.

दरम्यान, गौतम गंभीरच नाव भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच आदराने घेतलं जाते. गंभीरने भारतासाठी 58 कसोटी, 147 वनडे आणि 37 टी20 सामने खेळले आहेत. गौतम गंभीरने कसोटीत 41.95 च्या सरीसरीने 4154 धावा केल्या. तर वनडेत 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत. २०११ आणि २००७ चा विश्वचषक भारताने जिंकला या या दोन्ही वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरनेच मॅच विनिंग खेळी केली होती. त्याने 4 डिसेंबर 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. आयपीएल मध्ये गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर होता. त्याचाच मार्गदर्शनाखाली यंदाची आयपीएल स्पर्धा कोलकात्याच्या जिंकली होती. त्यामुळे आता गंभीरच्या गळ्यात टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Marathwada Vidarbha Earthquake : मोठी बातमी!! मराठवाडा, विदर्भात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

Marathwada Vidarbha Earthquake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात आज पहाटे भूकंपाचे धक्के (Marathwada Vidarbha Earthquake) बसले. मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून 13 किमीवरील दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी सकासकाळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरलं आहे.

भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल- Marathwada Vidarbha Earthquake

याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवारी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल एवढी होती. अनेक ठिकाणी घरांना भेगा गेल्याची माहिती देखील समोर येत आहे. अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक भीतीनेघाबरून घराबाहेर आली . परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भुकंपाचा हा धक्का जाणवला आहे. हींगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचा (Marathwada Vidarbha Earthquake) दावा नागरिकांकडून केला जातो आहे.

मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून 14 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाची धक्के जाणवल्याने नागरिक घाबरून होऊन घराबाहेर पडले. जयपूर, टनका, सोंडा, सावळी कृष्णा या परिसरात हा भूकंप झाला.

Weather Update | पुढील 5 दिवस असे असणार पावसाचे वातावरण; कोकणात पावसाचा जोर कायम

Weather Update

Weather Update | मागील गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई तर एका दिवसातच अति मुसळधार पाऊस पडला आणि शाळा कॉलेजला देखील सुट्टी देण्यात आली. हवामान विभाग (Weather Update) देखील दररोज पावसाबद्दलच्या अंदाज व्यक्त करत असतात. अशातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजेच 10 जुलै रोजी पावसाचा जोर कायम राहील. तर गुरुवारपासून पाऊस काही ठिकाणी कमी होणार असल्याचे सांगितलेले आहे.

त्याचप्रमाणे हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार कोकणातही आज अनेक ठिकाणी पाऊस कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे या विभागांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्याचप्रमाणे ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस आज होणार आहे. त्यामुळे या ठिकाणांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे. या ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट या विभागांना देण्यात आलेला आहे.

तसेच सांगली, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यात देखील काही ठिकाणी आज जोरदार पाऊस बरसणार आहे .त्यामुळे या भागांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.

उद्यापासून अनेक ठिकाणी पावसाचा (Weather Update) जोर कमी होणार आहे. तरी देखील कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे इतर काही जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

गुरुवारपासून मात्र राज्यातील काही ठिकाणचा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तरी देखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घाटात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शनिवारी कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस वाढणार आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय!! या खेळाडूंना मिळणार थेट सरकारी नोकरी

State Govern

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने जागतिक पातळीवर खेळणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता जागतिक पातळीवर पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंची थेट शासन सेवेत नियुक्ती करण्यात येणार आहे. या खेळाडूंची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात येईल. सरकारच्या या निर्णयाचा लाभ ऑलिम्पिक स्पर्धा, पॅराऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा खेळाडूंना होणार आहे. ज्यांनी अशा स्पर्धांमध्ये पदक मिळवले आहे.

सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पुरवणी मागण्या आणि वित्तनियोजन विधेयकावर देखील चर्चा झाली. या बैठकीतच जागतिक पातळीवरील खेळाडूंसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या एका निर्णयामुळे विविध खेळात चांगली कामगिरी करू इच्छिणाऱ्या तरुणांना फायदा होणार आहे. कारण, आता स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंच्या हातामध्ये शासकीय रोजगार असणार आहे.

दरम्यान, नुकतेच राज्य सरकारने विश्वविजेता टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिल्याबद्दल 18 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. यासह टीम इंडियामधील मुंबईच्या चार खेळाडूंना एक कोटी रुपयांचे देखील बक्षीस जाहीर केले. हे बक्षीस जाहीर केल्यानंतरच राज्य सरकारने घेतलेल्या बैठकीत जागतिक पातळीवरील खेळाडूंसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Kitchen Tips: पावसाळ्यात आवर्जून खा रानभाज्या ; चरबी होईल कमी, इतर रोगांवरही गुणकारी

Kitchen Tips: भारतीय आहारपद्धती ही ऋतूनुसार परिपूर्ण आहे. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात आरोग्यासाठी ज्या भाज्या चांगल्या असतात त्या भाज्या त्या – त्या सिझनला मिळत असतात. पावसाळ्यात सुद्धा उत्तम प्रकारच्या काही रानभाज्या येत असतात. विशेष म्हणजे या भाज्या केवळ या पावसाळ्याच्या २-३ महिन्यातच येत असतात. या भाज्या आरोग्यासाठी खूप उत्तम असतात. चला जाणून घेऊया या भाज्या कोणत्या आहेत ? त्यामध्ये कोणती पोषक तत्वे असतात ? या भाज्या खाताना कोणती काळजी घेतली पाहिजे ? चला जाणून घेऊया…

रानभाज्या आरोग्यासाठी उत्तम

रानभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात लोह, ॲण्टीऑक्सिडंट्स, फायबर असतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते रानभाज्या पावसाळ्यात आवर्जून खाल्ल्या पाहिजेत.

रानभाज्या बनवताना काय काळजी घ्यावी ?

  • रानभाज्या जास्त न शिजवता भाज्यांमधील पोषणतत्त्वे टिकून राहतील अशा पद्धतीने करून खाव्यात
  • रानभाज्या बनविताना पुदिना, कैरी, लिंबू टाकून त्यांची पोषणमुल्ये वाढविता येतात.
  • भाज्यांसोबत चपाती ऐवजी भाकरीसोबत खाणे अधिक आरोग्यदायी असते.

रानभाज्या खाण्याचे फायदे

शेवगा – शेवग्याच्या शेंगा आपण नेहमीच वापरतो मात्र भाजी सुद्धा गुणकारी असते. मधुमेह, हृदय, संधीवात, बद्धकोष्ठता असा त्रास कमी करण्यासाठी शेवगा उपयुक्त ठरतो.

अंबाडी – ही भाजी नावाप्रमाणे आंबट असते. भाजीतून व्हिटॅमिन ए, लोह, झिंक, भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे ही भाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच अशक्तपणा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

करटोली – ही भाजी म्हणजे कडू न लागणाऱ्या कारल्याचा दुसरा प्रकार म्हणू शकतो. या भाजीत प्रोटीन्स, लोह, ॲण्टीऑक्सिडंट्स, फायबर मोठ्या प्रमाणावर मिळतात. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे.

अळू – भाजीतून व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम मिळते. ही भाजी हृदयरोगाचा, कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.

Garden Tips : जास्वंदीला फुलं येत नाहीत ? चहा पत्तीचा करा अशाप्रकारे वापर

Gardening Tips

Garden Tips : आपलं सुंदर घर असावं आणि आपल्या घरात छोटासा का होईना सुंदर बगीचा असावा असं सगळ्यांनाच वाटतं मात्र आता जमिनीची कमतरता असल्यामुळे फ्लॅट सिस्टीम घरांमध्ये सुंदर बाग बनवणं शक्य नसलं तरी बाल्कनी मध्ये विविध प्रकारची झाडं लावून तुम्ही तुमच्या बागेची स्वप्न पूर्ण करू शकता. पण अनेकदा घरामध्ये नर्सरी मधून झाडे आणली की ती काही वेळ त्याला फुलं येतात मात्र त्यानंतर मात्र त्याला फुलं येणं बंद होऊन जातं. खास करून जास्वंदीच्या झाडाबाबत हे होतच होतं म्हणूनच आम्ही आजच्या लेखांमध्ये तुम्हाला जास्वंदीच्या झाडासाठी (Garden Tips) एक असा उपाय सांगणार आहोत ज्याच्यामुळे तुमचा जास्त फुलांनी बहरून जाईल चला तर मग जाणून घेऊया…

झाडांना उत्तम फुलांचा बहर येण्यासाठी काय काळजी घ्यावी हे आधी पाहुयात

पाणी

झाडे चांगली यायची असती तर झाडांना पुरेसं पाणी हे वेळेत द्यायला हवं. पावसाळ्यात झाडांना (Garden Tips) जास्त पाणी घालू नये त्यामुळे त्याची योग्य वाढ होत नाही. सकाळी एकदाच झाडांना पाणी द्या त्यानंतर पाणी देण्याची गरज नाही.

सूर्यप्रकाश (Garden Tips)

पाण्याबरोबरच सूर्यप्रकाशाची सुद्धा मोठी गरज झाडांना भासते. झाडांना सात ते आठ तास सूर्यप्रकाश लागतो. म्हणून शक्यतो बाल्कनीच्या बाहेरच्या बाजूला जास्वंदीचे रोपटे ठेवून द्या. जेणेकरून त्याची योग्य वाढ होईल.

घरगुती जैविक खतं (Garden Tips)

झाडांच्या वाढीसाठी होममेड फर्टीलायझर्स तुम्ही वापरू शकता. यामध्ये चहापत्ती (Garden Tips) केळीची सालं. ग्रीन टी चा उरलेला गाळ खताचे काम करेल. केळीच्या सालीमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात ज्यामुळे झाडाची वाढ उत्तम होते. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि झिंक असतं.

आता झाडांना उत्तम फुलांचा बहर येण्यासाठी केळीची साल सुकवण्यासाठी ठेवा. त्यानंतर मिक्सरच्या (Garden Tips)भांड्यात घालून पावडर तयार करा. एका मोठ्या बॉटलमध्ये एक लिटर पाणी भरा त्यात दोन चमचे चहापत्ती दोन चमचे केळीच्या सालाची पावडर टाकून मिक्स करा. चार तासांसाठी हे मिश्रण तसंच ठेवा त्यानंतर त्यात पाणी मिसळून जास्वंदीच्या झाडातील मातीमध्ये मिसळा या होममेड फर्टीलायझर मुळे तुमच्या जास्वंदीच्या रोपाला सुंदर फुले येतील.

Get Rid Off Snakes : पावसाळ्यात साप घरात येण्याची भीती वाटते ? मग करा ‘हे’ सोपे उपाय

Get Rid Off Snakes : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या पावसाळ्याच्या दिवसात साप घरामध्ये येण्याची भीती असते. पावसामुळे सापांच्या बिळात पाणी शिरत असल्यामुळे साप हे पावसाळ्याच्या दिवसात सुरक्षित जागेच्या शोधात असतात. त्यामुळे मानवी वस्तीत साप हमखास आढळून येतात. शिवाय अनेकदा पुराचे पाणी घरामध्ये शिरते या पाण्याबरोबर देखील साप घरात येतात. शहरामध्ये साप येण्याचे प्रमाण तसे कमी असते. पण शेतालगत असलेल्या घरांमध्ये हमखास साप (Get Rid Off Snakes) आढळून येतात. म्हणूच आम्ही आजच्या लेखात असे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे साप तुमच्या घराच्या आजूबाजूला फिरकणार नाहीत. याबाबतची माहिती एका ऍनिमल वेबसाईटने दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया …

कांदा लसूण पेस्ट (Get Rid Off Snakes)

कांदा आणि लसूण यांचा वास खूप उग्र असतो सापांना हा वास आवडत नाही त्यामुळे साप या वासाच्या आसपास फिरकत नाहीत. हा उपाय करण्यासाठी कांदा आणि लसूण याची पेस्ट करून घ्या ही पेस्ट पाण्यामध्ये मिक्स करा आणि हे पाणी तुमच्या घराच्या (Get Rid Off Snakes) सभोवताली दारं आणि खिडक्यांच्या जवळ शिंपडा यामुळे साप तुमच्या घरापासून लांब राहतील.

सापांना दूर ठेवतील ही झाडे (Get Rid Off Snakes)

तुमच्या घराच्या आसपास लसूण, झेंडू , तुळस कांदा, अशी रोपे लावा या झाडांच्या आसपास त्यांचा असा एक विशिष्ट वास असतो यामुळे साप या झाडांपासून दूर राहतात. तुमच्या गेटजवळ दारं आणि खिडक्यांच्या आसपास ही झाडे लावा जेणेकरून घरामध्ये साप येणार नाहीत.

ब्लिचिंग पावडर


सापांना दूर ठेवण्याचा आणखी एक उपाय म्हणजे ब्लिचिंग पावडर . ब्लिचिंग पावडर पाण्यामध्ये मिसळा आणि हे पाणी तुमचे घर , खिडक्या, गेट अशा भंगांमध्ये शिंपडा. म्हणजे या पावडरच्या वासाने तुमच्या घराच्या आसपास साप फिरकणार (Get Rid Off Snakes) नाहीत.

Naked Resignation म्हणजे काय? याचे फायदे-तोटे काय आहेत?? जाणून घ्या

Naked Resignation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्याच्या पगारांमध्ये वाढ करत नसेल किंवा त्या कर्मचाऱ्याला कंपनीत काम करत असताना अनेक अडचणी जाणवत असतील तर तो कर्मचारी राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ शकतो. या राजनाम्यामध्ये देखील तो विविध प्रकारांचा वापर करू शकतो. जसे की, दुसरी नोकरी मिळण्याअगोदरच कर्मचारी आपला राजीनामा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देऊ शकतो. यालाच Naked Resignation असेही म्हणले जाते. सध्याच्या स्थितीत अनेकजण Naked Resignation देण्यावर कल देत आहेत. त्यामुळेच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत कंपनी सोडायचे असेल तो दुसरी नोकरी लागण्यापूर्वीच Naked Resignation देऊन मोकळा होऊ शकतो. हा पर्याय कर्मचारी तेव्हाच निवडतो ज्यावेळी त्याला तणावपूर्ण कामातून तत्काळ सुटका हवी असते. परंतु असे केल्यामुळे कर्मचारी आणखीन अडचणीत देखील येऊ शकतो. Naked Resignation दिल्यानंतर आर्थिक अस्थिरता, बेरोजगारी, पुन्हा नोकरी शोधण्याचा अडचणी निर्माण होतात.

त्यामुळेच अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याने सर्वात प्रथम आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच, धोरणात्मक नेटवर्क करणे आणि नवीन नोकरी शोधणे गरजेचं आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर कर्मचाऱ्याने राजीनामा दिला तर त्याला पुढील अडचणींना सामोरे जावे लागत नाही. यासह कोणतीही आर्थिक टंचाई जाणवत नाही

MMRCL Recruitment 2024 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत या पदाची भरती सुरु, असा करा अर्ज

MMRCL Recruitment 2024

MMRCL Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत मुख्य दक्षता अधिकारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाची एकूण 1 रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 16 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा आता. या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

महत्त्वाची माहिती | MMRCL Recruitment 2024

  • पदाचे नाव – मुख्य दक्षता अधिकारी
  • पदसंख्या – 1 जागा
  • वयोमर्यादा – 56 वर्ष
  • नोकरीच्या ठिकाणी – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन ईमेल किंवा ऑफलाईन
  • ईमेल करण्याचा मेल आयडी –
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड MMRCL ट्रांझिट ई ब्लॉक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे पूर्व मुंबई 400051
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024.

अर्ज कसा करावा ?

  • हे अर्ज तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने करू शकता.
  • दिलेल्या पत्त्यावर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा
  • 16 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरचा अर्ज करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा