Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 636

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून ‘हे’ इंटरेस्टींग नाव समोर आलंय

MVA Cm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) विधानसभेनंतर सरकार आलं… तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? होय… अगदी विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं नसताना… जागावाटप आणि निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न चांगलाच पेटलाय… 2019 साली सत्तेत येण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला… शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष वैचारिक मत भिन्नता असतानाही एकत्र आले… आणि त्यांनी त्यांचं सरकारही उत्तमरित्या चालवलं… त्यावेळेस मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना… शिवसेनेच्याच येण्यानं हे सरकार बनल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची देणं रास्त होतं… पण शरद पवारांच्या हट्टामुळे ठाकरेंनी पक्षातील चेहऱ्याला पुढे न करता स्वतः मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळली… यानंतर शिंदेंनी घडवून आणलेलं बंड… पक्षात पडलेल्या दोन फुटी.. लोकसभा निवडणुका…

महाविकास आघाडीच्या बाजूने असणारं वारं हे आपण पाहत आहोतच… त्यामुळे आगामी विधानसभेला महाविकास आघाडीला १७० ते १८० जागा जिंकण्यात यश येईल, असं मत राजकीय विश्लेषकही व्यक्त करतायत…त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आलीय ही बॉटम लाईन पकडून चालायचं झालंच तर मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार नेमके कोण असतील? शिंदेंकडून महाविकास आघाडीच्या कोणत्या राजकीय चेहऱ्याकडे मुख्यमंत्री पदाची खुर्ची पास होईल? करंट स्टेटसमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणती राजकीय व्यक्ती परफेक्ट फीट बसू शकते? त्याचाच घेतलेला हा आढावा…

सर्वात आधी बोलूयात शिवसेना ठाकरे गटाबद्दल…. तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शिवसेनेकडून नो डाऊट मुख्यमंत्रीपदासाठी नाव असेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं… या आधीच त्यांनी 2019 पासून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचा अनुभव त्यांच्या पाठीशी राहिलाय… सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदावर असतानाच शिवसेनेची फूट होऊन भाजपच्या मदतीने शिंदे मुख्यमंत्री झाले होते… त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून महाविकास आघाडी शिंदे आणि भाजपाला तगडा मेसेज देऊ शकते… लोकांच्या मनातही महाविकास आघाडी बद्दलचा रिस्पेक्ट वाढू शकतो… त्यात संजय राऊतांनी शिवसेना ठाकरे गटाचाच नोव्हेंबर मध्ये मुख्यमंत्री दिसेल, हे बोलून सीएम पदाच्या खुर्चीसाठी आत्तापासूनच बुकिंग करायला सुरुवात केलीये… त्यामुळे ठाकरेंचेच मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस जास्त वाढतात… राहिला प्रश्न तो केवळ 2019 साली ठाकरे यांना मुख्यमंत्री पद दिल्यामुळे आता हे पद काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात यावं, असा हट्ट धरला जाऊ शकतो… हीच एक गोष्ट शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळण्यासाठी अडचणीची ठरू शकते…

यानंतर पाहूया काँग्रेस कडून मुख्यमंत्रीपदासाठी नेमकं कोण शर्यतीत आहे ते… तर यात सर्वात पहिलं नाव येतं ते नाना पटोले यांचं… काँग्रेसला महाराष्ट्रात जी काही नवसंजीवनी मिळाली त्यात नाना पटोले यांचंही योगदान महत्त्वाचं आहेच… मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीची अपेक्षा त्यांनीही नकळतपणे का होईना अनेकदा बोलून दाखवलीय… त्यात विदर्भात काँग्रेसला लोकसभेला मिळालेलं यश पाहता काँग्रेस विधानसभेलाही उत्तम कामगिरी करेल, असा सध्या अंदाज आहे… असं झाल्यास नाना पटोले यांच्याच नावाचा काँग्रेसकडून सर्वप्रथम विचार केला जाईल… पण राज्यातील पक्षातीलच असणारा स्थानिक नेत्यांशी संघर्ष पाहता ते थोडेसे बॅक फुटला जाऊ शकतात….

यात आणखीन एक नाव ॲड केलं जाऊ शकतं ते म्हणजे सतेज पाटील यांचं… पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पट्ट्यातील काँग्रेससाठीच हे एक महत्त्वपूर्ण नाव… या आधी सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाचा त्यांना अनुभव आहेच… पण प्रशासकीय कामांसोबत राजकीय डावपेच टाकण्यात सतेज पाटील यांचा कुणी हात धरू शकत नाही… कोल्हापूरच्या राजकारणाची हाव जवळपास सर्वच पक्षांना सुटली… त्यांनी तसे प्रयत्नही केले… पण कठीण काळातही हे प्रयत्न हाणून पाडण्याचं काम केलं ते सतेज पाटील यांनी… नुकतीच कोल्हापूर लोकसभेसाठी त्यांनी शाहू छत्रपतींना निवडून आणण्यात महत्त्वाची कामगिरी केली होती… त्यामुळे तरुण, तडफदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जशास तस उत्तर देणारा चेहरा म्हणून काँग्रेसकडून सतेज पाटलांच्या नावाची शिफारस होऊ शकते…

आता वळूयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडे… अगदी कमी कालावधीत शून्यातून उभारलेला आणि लोकसभेला सामोरे जात तब्बल आठ जागांवर दणदणीत विजय मिळवून दाखवण्याची किमया केलेला पक्ष म्हणून सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे पाहिलं जातंय… सहानुभूतीची लाट आणि राजकारणाचे डावपेच माहीत असल्यामुळे तुतारीला विधानसभेलाही जास्तीत जास्त आमदार निवडून आणता येतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे… त्यामुळे अजित पवार गटाला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरला जाऊ शकतो…

तेव्हा यात पहिलं नाव येईल ते अर्थात जयंत पाटील यांचं… शरद पवारांची सगळ्यांनी साथ सोडली… पण जयंत पाटलांनी आपला निष्ठेचा हात कायम शरद पवारांच्या सोबत ठेवला… अगदी त्यांच्या फुटण्याच्या अनेक वावड्या उठल्या पण निष्ठा कशी असते हे सिद्ध करून दाखवलं ते पाटलांनीच… सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांनी फूट पाडल्यानंतर पक्ष उभा करण्यापासून ते प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत फ्रंटला राहून काम करत होते, ते जयंत पाटीलच… प्रदेशाध्यक्षपदाचा प्रदीर्घ अनुभव त्यासोबतच सरकारमध्ये विविध खाती सांभाळण्याचा अनुभव पाहता शरद पवार जयंत पाटील यांच्याच नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्का मारतील हे कन्फर्म समजलं जातंय… बाकी महिला नेतृत्व म्हणून राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याचा विषय आलाच तर सुप्रिया सुळे यांना दिल्लीतून राज्यात लॉन्च केलं जाऊ शकतं… पण त्यासाठी सध्या तरी बऱ्याच अडचणी दिसतायत…तर अशी आहेत मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असणारी महाविकास आघाडीची काही प्रमुख चेहरे… बाकी आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलंच तर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुणाच्या नावाला पसंती द्याल? ते आम्हाला न विसरता कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…

Bank Holiday in July | जुलै महिन्यात बँका किती दिवस बंद? संपूर्ण यादी पहाच

Bank Holiday in July

Bank Holiday in July | उद्या जुलै महिना सुरू होत आहे. त्यामुळे अनेक लोक आता जुलै महिन्याची काही काम करायची आहेत. त्याची तयारी करत असतात. जुलै महिन्यात जर तुम्हाला बँकांचे काही व्यवहार करायचे असेल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण जुलै महिन्यात बँकांना खूप दिवस सुट्ट्या राहणार आहेत. आणि केवळ 12 दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर बँकेची काम करायची असेल, तर त्याचे नियोजन करूनच कामी करा.

सुट्टी आली की बँकांची (Bank Holiday in July) अनेक कामे रखडतात. त्यामुळे जर लोकांना बँकेत काहीच काम करायचे तसेच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे असतील. तर हे सगळे व्यवहार करता येत नाही. बँक बंद असल्यास ग्राहकांना देखील याचा खूप त्रास होतो. बँकांना कधी सुट्टी आहे? या गोष्टीची माहिती आपल्याला आधीच असली पाहिजे. त्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडिया ही दर महिन्याच्या सुरुवातीलाच त्या महिन्यात किती सुट्ट्या असणार आहेत? हे जाहीर करत असते. अशाच आता जुलै महिन्यातील सुट्ट्यांची माहिती आरबीआयने दिलेली आहे आता ही माहिती पाहूया.

जुलै महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार | Bank Holiday in July

  • जुलै महिन्यामध्ये एकूण 12 दिवस सुट्ट्या असणार आहे. त्याचप्रमाणे चौथ्या आणि शनिवारी आणि दर रविवारी सुट्टीचाही समावेश केलेला आहे. स्थानिक सण आणि मोहरममुळे या बँका बंद राहणार आहेत. आता याची माहिती जाणून घेऊया.
  • बेहद्दीन खलम या सणांमुळे शिलॉंगमध्ये 3 जुलै 2024 रोजी बँकेला सुट्टी राहणार आहे.
  • त्याचप्रमाणे 6 जुलै रोजी एमएचआयपी या दिनानिमित्त आईज हॉलमधील बँकांना सुट्टी राहणार आहे.
  • 7 जुलै रोजी रविवार असल्यामुळे सगळ्या बँकांना सुट्ट्या राहणार आहेत
  • 8 जुलै रोजी कांग रथयात्रेनिमित्त इंफाडमधील बँका बंद असणार आहे.
  • 9 जुलै रोजी गंगटोकमध्ये बँकेला सुट्टी असणार आहे. 13 जुलै रोजी दुसरा शनिवार आहे त्याचप्रमाणे 14 जुलै रोजी रविवार असल्याने या 2 दिवस सगळ्या बँकांना सुट्ट्या असणार आहे.
  • डेहरादूनमधील बँका 16 जुलै रोजी हरेलाच्या निमित्ताने बंद असणार आहे.
  • 17 जुलै रोजी अहमदाबाद, पणजी, भुवनेश्वर, चंदीगड, गंगटोक, गुवाहाटी, कोची, इम्फाळ, इटानगर वगळता इतर बँकांना सुट्ट्या असणार आहे.
  • 21 जुलै रोजी रविवारची सगळ्यांना सुट्टी असणार आहे.
  • 27 जुलै रोजी चौथा शनिवार आणि 28 जुलै रोजी रविवार असल्याने सगळ्या बँका बंद असणार आहे.

सुट्ट्यांच्या दिवशी मोबाईल बँकिंग नेट बँकिंग चालू राहणार

आता बँकिंग व्यवस्थित देखील अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत. यानुसार आता ग्राहक सुट्टीच्या दिवशी मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंगद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. तसेच तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर देखील करू शकता.

Weather Update | मुंबईसह कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी; हवामान खात्याने दिली माहिती

Weather Update

Weather Update | सध्या राज्यात विविध ठिकाणी पाऊस चांगलाच चालू आहे. थोड्या विश्रांतीनंतर आता पावसाने पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपात बसायला सुरुवात केलेली आहे. असेच आता हवामान विभागाने आज देखील राज्यात मुसळधार पावसाचा (Weather Update) इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जागी करण्यात आलेला आहे. आज पावसाचे वातावरण कसे असणार आहे. हे आपण जाणून घेऊया.

कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट | Weather Update

हवामान विभागाने दिलेले माहितीनुसार आज कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑलरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

मुंबईचा विदर्भात देखील पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई, पालघर आणि ठाण्यात देखील जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सातारा आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना देखील जारी करण्यात आलेला आहे.

पर्यटन स्थळावर गर्दी | Weather Update

पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेक ठिकाणी धबधबा कोसळत आहे. त्याचप्रमाणे निसर्गाचे सौंदर्य देखील खुललेले आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी जमलेली आहे. महाराष्ट्रातील चिरापुंजी, आंबोली या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. परंतु पावसाचा ऑरेंज कलर जारी केल्याने सगळ्या पर्यटकांना सावधानीने निसर्गाचा आनंद घेण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

सगळे सोयरे अध्यादेश रद्द करावा; प्रकाश आंबेडकर यांच्या मनात ‘हे’ चाललंय

prakash ambedkar aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठ्यांची ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी… आणि त्याला ओबीसींचा होत असलेला विरोध… हे गेल्या एक-दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वास्तव होऊन बसलय… एकीकडे मनोज जरांगे पाटील तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरलीय… सरकारनं दोन्ही बाजूंना शब्द दिलाय, त्यामुळे सरकार कुणाची बाजू लावून धरतंय? हे पाहणं महत्त्वाचं आहेच… पण याच सगळ्या गोंधळात पुन्हा एकदा फ्रंटला आलेत ते प्रकाश आंबेडकर…. लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या आंबेडकरांनी मनोज जरांगेंची भेटही घेतली होती… पण याच आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) लोकसभेनंतर पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाल्यावर लक्ष्मण हाके यांची भेट घेत सगेसोयारे हा अध्यादेश रद्द करण्यात यावा, मागील वर्षभरापासून वाटण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र मागे घेण्यात यावे, अशी पक्षाच्या ठरावाद्वारे मागणी केली… थोडक्यात काय तर आंबेडकरांचे पॉलिटिक्स आता मराठ्यांकडून ओबीसींकडे शिफ्ट झालय… पण मराठा आणि मनोज जरांगे फॅक्टर लोकसभा निवडणुकीला किती निर्णायक ठरलाय, हे माहीत असतानाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका नेमकी का बदलली? वंचितनं ती स्वतः बदलली की कुणाच्या सांगण्यावरून बदलली? वंचितला येणाऱ्या निवडणुकीला मराठ्यांपेक्षा ओबीसी जास्त इम्पॉर्टंट वाटू लागलेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा विरोध करणं वंचितला महागात पडू शकतं का? त्याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडींग…

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काही महत्वाचे ११ ठराव मांडण्यात आले… वंचित बहुजन आघाडीच्या 11 पैकी 2 ठरावामध्ये या प्रश्नावर थेट भूमिका मांडण्यात आली. या ठरावातून त्यांनी सगेसोयरे अध्यादेश रद्द करावा अशी मागणी राज्य सरकारकडं केली. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात देण्यात आलेली ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी अशी मागणी या ठरावात आहे… थोडक्यात वंचितनं मराठा आरक्षणाला अप्रत्यक्ष का होईना विरोध केलाय. एकेकाळी याच जरांगेंच्या आंदोलनाला सपोर्ट करुन त्यांच्यासोबत निवडणुक लढवण्याचा निर्णय घेणाऱ्या आंबेडकरांनी आता मात्र राजकारणाचं वारं पाहत आपली भूमिका बदललीय…पण ही भूमिका बदलण्याची कारण काय? ती थोडक्यात समजून घेऊयात…

लोकसभेच्या निकालात मराठा आरक्षण आणि मराठा समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळाला. त्यात आंबेडकरही जरांगेंच्या पाठीशी उभे राहिल्याने काठावरचा दलित समाजही त्यांच्यापासून लांब गेला. याचा मोठा फटका वंचितला लोकसभा निवडणुकीत बसला. एवढच काय तर निकाल स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा जरांगेंनी आंदोलन सुरू केलं… त्याला प्रतिवाद म्हणून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनानं ओबीसी समाज मोबलाईज झाला… त्यात हाकेंनी सगेसोयरे अध्यादेश काढणं म्हणजे आरक्षणाच्या घटनात्मक आणि संविधानिक चौकटीलाच नख लावण होय, असं नरेटीव हाकेंनी सेट केल्यामुळे आपण अल्पसंख्यांक, बहुजन आणि संविधानाच्या बाजूने आहोत, हे दाखवण्यासाठी आंबेडकरांना मराठा आरक्षणावरची आपली भूमिका बदलावी लागली… त्यात मराठा समाजाला वंचित सोबत घेऊन सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न वर्कआउट होत नाहीये, हे लक्षात आल्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेवरून घुमजाव केला…अर्थात त्यांनी हा निर्णय घेताना सोशल अस्पेक्ट्स् आणि संविधान यांचा सविस्तर ठराव मांडला असला तरी त्याची राजकीय गणित तर मुळात हीच आहेत…एका लाईन मध्ये सांगायचं झालं तर वंचितनं मराठ्यांना लांब ठेवून या पुढच्या राजकारणात नवीन समीकरणांसाठी स्वतःला खुलं ठेवलंय…पण प्रश्न हा पडतोच की या निर्णयामुळे मराठा समाजाचा आंबेडकरांना फटका बसू शकतो का? तर त्याचं उत्तर इतकं सहज सोप्या पद्धतीने देता येऊ शकत नाही…

आधीच आंबेडकरांनी अनेक राजकीय भूमिका बदलून पक्षाला अस्थिर केल आहे… त्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून मारलेला यु टर्न ही सामाजिक कणव नसून येणाऱ्या विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून घेतलेली एक भूमिका आहे, हे ठळकपणे स्पष्ट होतं…त्यामुळे त्यांच्या क्रेडिबिलिटीवर मतदारही शंका घेणार, हे काही वेगळ्या भाषेत सांगायला नको. मी प्रस्थापित नाही तर विस्थापित मराठ्यांच्या बाजूने आहे असं क्लियर कट सांगणाऱ्या आंबेडकरांना आरक्षणाची मागणी करणारा हा विस्थापित मराठा आहे, ही गोष्ट लक्षात आली नाही का? टेक्निकली संविधानिक दृष्ट्या जरी आपण मान्य केलंच की सगेसोयरे अध्यदेश काढता येणार नाही… किंवा मराठ्यांना कुणबींचा दाखला देता येणार नाही… पण असं असलं तरी मराठा समाजाचा एक बहुसंख्यांक भाग आजही विस्थापित आहे…मग वंचित बहुजन आघाडीच्या बहुजन या शब्दामध्ये या विस्थापित मराठ्यांचा समावेश होत नाही का? हे आंबेडकरांना क्लिअर करावं लागेल… केवळ एका विशिष्ट समाजाच्या राजकारणावर तुम्ही फार काळ राजकारण पुढे रेटू शकत नाही… तुम्हाला सत्तेत यायचं असेल तर तुम्हाला बेरजेचं राजकारण करावंच लागतं… वंचितला हे तंतोतंत लागू होतं… वंचितनं हे बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते जमलं नाही…त्यामुळे येणाऱ्या काळात वंचित जरी महाविकास आघाडीचा भाग झाली तरी मराठ्यांची मतं वंचितला ट्रान्सफर होतील, याबाबत जरा शंकाच वाटते…

वंचित पासून फक्त मराठा समाजच दूर जाऊ शकतो यातला भाग नाही…तर निवडणुकीआधी एक आणि निवडणुकीनंतर वेगळी भूमिका घेतल्यामुळे वंचितचा हक्काचा दलित मतदारही पक्षापासून लांब जाऊ शकतो. त्याचा फटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना बसू शकतो. सारासार विचार केला तर येणारी विधानसभा निवडणूक प्रकाश आंबेडकरांसाठी शेवटचा चान्स असल्याचं दिसतं. त्यामुळे येणार प्रत्येक पाऊल आंबेडकरांना जपून टाकावं लागणार आहे, याबाबत नो डाऊट… त्यामुळे मराठा आरक्षणाला आंबेडकरांनी केलेल्या विरोधाने वंचित संपेल असं सरळ सरळ म्हणता येणार नाही… मुळात कुठलाच पक्ष संपत नाही…एकतर तो फुटतो…तुटतो…त्याच्यात गट पडतात…पण पक्ष जिवंत राहतो…अगदी तसंच वंचित या निर्णयाने संपणार नसली तरी पक्षाला यामुळे मेजर लॉस सहन करावा लागू शकतो…आता त्याची किंमत आंबेडकर कशा पद्धतीने चुकती करतात? ते येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेच…

Indian Bank Bharti 2024 | इंडियन बँकेत नोकरीची मोठी संधी; अशाप्रकारे करा अर्ज

Indian Bank Bharti 2024

Indian Bank Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इंडियन बँक (Indian Bank Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 102 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 14 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी यासारख्या अगोदर अर्ज करवा. या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Indian Bank Bharti 2024

  • पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी
  • पदसंख्या – 102 जागा
  • वयोमर्यादा – 22 ते 40 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2024

अर्ज कसा करावा ?

  • तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
  • 14 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ICICI Bank | ICICI बँकेने वाढवले FD वरील व्याजदर! एका क्लिकमध्ये जाणून घ्या

ICICI Bank

ICICI Bank | ICICI बँक ही देशातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना नेहमीच नवनवीन गोष्टींचा लाभ देत असते. अशातच ICICI बँक FD वरील व्याजदर सुधारणा केलेली आहे. या बँकेने 29 जून 2024 पासून त्यांच्या FD व्याजदरांमध्ये सुधारणा केलेली आहे. त्यामुळे तीन कोटींपेक्षा जास्त रुपयांपर्यंतच्या सुधारित व्याजदर लागू होणार आहे. ही बँक जेष्ठ नागरिकांना FD वर ७.७० टक्के व्याजदर देत आहे. तर सामान्य लोकांना FD 7.2% व्याजदर देत आहे. आता आपण ICICI बँकेचे बदललेले नवीन आणून घेणार आहोत.

ICICI बँकेचे नवे FD दर | ICICI Bank

ICICI बँक 7 दिवस ते 29 दिवसांदरम्यान परिपक्व होणाऱ्या FD साठी 3% व्याज दर देत आहे. तुम्हाला 30 दिवस ते 45 दिवसांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या FD वर 3.5% व्याजदर मिळेल. बँक 46 दिवस ते 60 दिवसांच्या कालावधीतील FD वर 4.25% व्याज दर देत आहे.

ICICI बँक

  • 7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
  • 15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
  • 30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी -4 .00 टक्के
  • 46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4 .25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
  • 61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी- 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
  • 91 दिवस ते 120 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5 .25 टक्के
  • 121 दिवस ते 150 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी -5.25 टक्के
  • 151 दिवस ते 184 दिवस: सर्वसामान्यांसाठी – ४.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
  • 185 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
  • 211 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
  • 271 दिवस ते 289 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
  • 290 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
  • 1 वर्ष ते 389 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.70 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.20 टक्के
  • 390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.70 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.20 टक्के
  • 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.70 टक्के
  • 18 महिने ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.70 टक्के
  • 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
  • 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
  • 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.40 टक्के.

रोहित- विराटच्या निवृत्तीने एका युगाचा अंत!! कसं राहिले दोघांचं करिअर?

rohit virat retired

विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) … भारतीय क्रिकेट संघाचे २ महारथी , २ दिग्गज खेळाडू आणि २ अनमोल रत्न…. दोघांचाही खेळ तोलामोलाचा, कोणीच कोणाच्या पुढे नाही आणि मागेही नाही… मोठे फटके मारणे, आपल्या टेक्निकच्या जोरावर मनात येईल तिथे बॉल मारण्यात रोहित पटाईत आहे तर दुसरीकडे आपल्या खेळात सातत्य ठेवण्यात आणि परिस्थिती जाण ओळखून संघासाठी जे काही उपयुक्त आहे ते करण्यात कोहली माहीर आहे. रोहितने २००७ चा T- २० वर्ल्डकप जिंकला होता, तर कोहलीने २०११ चा वर्ल्डकप जिंकला… मात्र दोघेही एकत्रित असं वर्ल्डकप जिंकले नव्हते. मात्र यंदाच्या T- २० वर्ल्डकप जिंकून त्यांनी प्रथमच हा आनंद एकत्रित साजरा केला आणि एकाच वेळी निवृत्ती जाहीर करत T- २० क्रिकेटला अलविदा केला. भारतीय क्रिकेटमध्ये एका युगाचा अंत झाला.

रोहित 2007 पासून आणि विराट 2010 पासून भारताच्या T20 संघाचा भाग आहे. दोघांनी या फॉरमॅटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आणि आता टी-20 चॅम्पियन बनून त्यांच्या करिअरचा शेवट केला. कोहलीने 12 जून 2010 रोजी आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच आपल्या कामगिरीत सातत्य राखणारा कोहली भारताचा नंबर १ चा बॅट्समन ठरला. रोहित, धोनी यांच्यासारखे मोठे फटके मारणं शक्य नसलं तरी आपल्या क्लासीक खेळीच्या जोरावर त्याने भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिलेत. विराटने भारतासाठी 125 टी-20 सामने खेळले असून 48.69 च्या सरासरीने 4188 धावा केल्या आहेत. रोहित शर्मानंतर तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कोहली दुसरा खेळाडू आहे. कोहलीने आपल्या कारकिर्दीत एक शतक आणि 38 अर्धशतके झळकावली. T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 1292 धावा करणारा तो फलंदाज आहे. त्याच्या नावावर टी-20 विश्वचषकात सर्वाधिक 15 अर्धशतकेही आहेत. यंदाच्या संपूर्ण T20 वर्ल्डकपमध्ये कोहलीची बॅट शांत होती. त्यामुळे कोहलीला संघातून काढून टाकण्याची मागणीही केली जात होती, त्यातच त्याचा स्ट्राईक रेट हा सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये जुळत नाही असा दावाही अनेक क्रिकेट विश्लेषक करू लागले. मात्र रोहितने शेवट्पर्यंत विराट कोहलीवर विश्वास ठेवला आणि कोहलीने सुद्धा फायनल मॅच मध्ये कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत मॅचविनिंग खेळी केली.

दुसरीकडे, रोहित शर्मा हा आक्रमक फलंदाज, एकदा जम बसला कि मग सुट्टी नाही… मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू भिरकावण्याची रोहितची क्षमताच त्याला जगातील सर्वात्कृष्ट फलंदाज बनवते. रोहित शर्माने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून आपल्या T20 आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती.आता तर १७ वर्षांनी त्याने स्वतः च्या नेतृत्वाखाली भारताला T20 विश्वचषक चॅम्पियन बनवले आणि चॅम्पियन म्हणूनच निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्माने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4231 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये रोहीतच्या नावावर 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 121 आहे. आत्तापर्यंतच्या सर्वच T20 वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व केलेला रोहित शर्मा हा भारताचा एकमेव खेळाडू ठरला आहे. कर्णधार म्हणूनही रोहित शर्मा यशस्वीच ठरला. रोहितने टीम इंडियासाठी T20 मध्ये कर्णधार म्हणून 50 सामने जिंकले आहेत आणि हा देखील एक विक्रम आहे. आत्तापर्यंत कोणत्याही कर्णधाराने टी20 मध्ये त्याच्यापेक्षा जास्त सामने जिंकलेले नाहीत. आता विराट आणि रोहितने एकाच वेळी टी20 मधून निवृत्ती जाहीर केल्याने भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला असं म्हणावं लागेल.

Monsoon | पावसाळ्यात करताय फिरण्याचा प्लॅन? महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

Monsoon

Monsoon | पावसाला महाराष्ट्रात चांगली सुरुवात झालेली आहे. पावसाळा सुरू झालं की, आपल्याला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते. आणि आपोआपच आपली पावले घराच्या बाहेर वळतात. हिरवा गार निसर्ग, डोंगरावरून वाहणारे धबधबे वेगवेगळ्या प्रकारची फुलं ही माणसाला मोहित करतात. आणि त्यामुळे अनेक लोक पावसाळ्यामध्ये फिरायला जाण्याचे प्लॅन करत असतात. परंतु फिरण्यासाठी नेमके कोणत्या ठिकाणी जावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. कारण बाहेर गेल्यावर तिथे थंड हवेचं अनुभव घेता आला पाहिजे, धुक्यात हरवलेला डोंगर त्याचप्रमाणे रस्त्याने जाताना चहा, कांदा भजी या सगळ्याचा आनंद घेता आला पाहिजे. अशी ठिकाण मिळणं खूप गरजेचे असते. आता आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात सगळा आनंद घेऊ शकता.

लोणावळा खंडाळा | Monsoon

Mansoon

पावसाळ्यामध्ये लोणावळा खंडाळा या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात गर्दी असते. मुंबई आणि पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी ही अत्यंत सोयीचे ठिकाण आहे. या ठिकाणी टायगर पॉईंट, लायन पॉईंट, भुशी डॅम यांसारखे अनेक प्रसिद्ध ठिकाण आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी हिरवागार निसर्ग डोंगरावरून वाहणारे धबधबे यांसारख्या गोष्टी दिसतील.

माथेरान

Matheran

माथेरान हे एक हिल स्टेशन आहे. परंतु पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जास्त गर्दी असते. कारण येथील निसर्ग लोकांना मोहित करतो. या ठिकाणी अनेक पॉईंट्स देखील आहे याचप्रमाणे अनेक डोंगरदर्‍यांचे सुंदर अशी दृश्य तुम्हाला माथेरानमध्ये पाहायला मिळतील. पुणे आणि मुंबईच्या पर्यटकांसाठी माथेरान हे अत्यंत सोयीचे ठिकाण आहे.

माळशेज घाट

Malshej ghat

माळशेज घाट हा देखील पावसाळ्यात फिरण्याचे खूप चांगले ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला अंगावर सरी झेलत दाट धुक्यामध्ये वातावरण पाहायला मिळेल. या ठिकाणी अगदी हिरव्या झाडांमधून रस्ता जातो. या ठिकाणी तुम्हाला अनेक सर्वोत्तम ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे या पावसाळ्यात माळशेजला नक्की भेट द्या.

इगतपुरी

Igatpuri

तुम्हाला जर रस्त्यालगतच धबधबे हिरवागार निसर्ग या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही इगतपुरी या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या. या ठिकाणाला धबधब्याचे माहेर घर असे म्हटले जाते. तसेच इगतपुरीला फॉग सिटी असे देखील म्हटले जाते. या ठिकाणी अनेक गड किल्ले आणि धबधबे देखील आहेत.

भीमाशंकर

Bhimashankar

पावसाळ्यामध्ये भीमाशंकरला देखील अनेक लोक भेटी देतात. कारण या ठिकाणी हिरवा गार निसर्ग, नद्यांचा परिसर आहे. त्याचप्रमाणे अनेक लोक ट्रेकिंग करतात. या ठिकाणी तुम्हाला विविध प्राणी पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे इथे अनेक देवस्थाने आणि हिल स्टेशन देखील आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा वन्य प्राणी शेकरू हा या भागात आढळतो. या भागात तुम्ही निसर्गाचा चांगला आनंद घेऊ शकता.

Vitamin B12 | व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी; आहारात करा ‘या’ ड्राय फ्रूटसचा समावेश

Vitamin B12

Vitamin B12 | आपल्या शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी वेगवेगळे पोषक तत्व गरजेचे असतात. त्यात विटामिन बी 12 हे एक आवश्यक पोषणतत्त्व आहे. ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो. त्याला कोबालमीन असे देखील म्हणतात. विटामिन बी 12 हे रक्त पेशी आणि डीएनएच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. याशिवाय आपल्या हृदयाचे आरोग्य देखील सुधारते, तुमच्या शरीरातील विटामिन बी 12 ची कमतरता असेल, तर थकवा येणे, तोंडावर व्रण येणे विस्मरण, मूड बदलणे, अस्वस्थता, बधिरपणा, मुंग्या येणे, त्वचा पिवळी होणे, केस पातळ होणे यांसारख्या समस्या उद्भवतात उद्भवतात त्यामुळे आपल्या आहारात विटामिन बी 12 (Vitamin B12) चा पुरेशा प्रमनात समावेश करणे खूप गरजेचे असते. विटामिन बी 12 वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट्स खाणे हा एक चांगला पर्याय आहे. आता आपण अशा ड्रायफ्रूट्सबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी 12 असते.

खजूर | Vitamin B12

याला झटपट ऊर्जा देणारे ड्राय फ्रूट्स म्हणतात, कारण व्हिटॅमिन बी 12 सोबत लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस देखील यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे रोजच्या दिनचर्येत त्याचा समावेश करणे आवश्यक आहे.

बदाम

व्हिटॅमिन ई समृद्ध, बदाम देखील व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे. ते खराब कोलेस्टेरॉल कमी करतात आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात.

पिस्ता

व्हिटॅमिन बी 12 सोबत व्हिटॅमिन बी 6 समृद्ध, पिस्त्यात हेल्दी फॅट, फायबर, प्रोटीन, ओमेगा थ्री आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे देखील महत्त्वाचे आहे. हे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन सारख्या संप्रेरकांच्या निर्मितीसाठी देखील उपयुक्त आहेत, ज्यामुळे चांगली झोप येते.

अक्रोड

अक्रोडमध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. त्यात ओमेगा थ्री देखील आढळते. मेंदूच्या आरोग्यासोबतच ते रक्तदाब नियंत्रित करते, कर्करोगाचा धोका कमी करते, खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

काजू | Vitamin B12

व्हिटॅमिन बी12 असलेले काजू पोटातील ऍसिडिटीला प्रतिबंध करतात. दुधासोबत याचे सेवन केल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

मैदानावर झोपला, हात आपटून रडला!! रोहित वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक झाला (Video)

rohit sharma emotional

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले. अतिशय रोमांचक असा या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या यांच्यासह सर्वच खेळाडूंच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली होती. खूप वर्षांनी विश्वचषक जिंकल्याचे समाधान खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसत होते. यादरम्यान, रोहित शर्माने (Rohit Sharma Emotional) केलेली कृती सर्वांच्याच चांगली लक्षात राहील.

रोहित शर्माने विजयानंतर काय केलं?

हार्दिक पंड्याने सामन्यातील शेवटचा चेंडू टाकताच भारताचा विजय झाला. यानंतर रोहित शर्मा मैदानावर झोपला आणि जोरजोरात मैदानावर हात आपटून रडू लागला. यानंतर ज्या खेळपट्टीवर हा सामना पार पडला, त्या खेळपट्टीची माती रोहितने तोंडात घातली आणि वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक झाला. रोहितशिवाय इतर सर्व खेळाडूंना सुद्धा आनंदाश्रू अनावर झाले होते. भारतीय संघासाठी आपल्या देशासाठी हा क्षण अत्यंत भावुक असा होता. आयसीसीने याबाबतचा विडिओ शेअर केला आहे. हा विडिओ पाहताच प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यात पाणी येईल एव्हडं मात्र नक्की.

रोहित T-20 मधून निवृत्त –

दरम्यान, भारताला विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने T20 क्रिकेट मधून निवृत्त्ती जाहीर केली. हा माझा शेवटचा सामना होता. निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. मला ती (ट्रॉफी) हवी होती. हे शब्दात मांडणे खूप कठीण आहे. मला हेच हवे होते आणि हेच घडले. मी माझ्या आयुष्यात यासाठी खूप हताश होतो. यावेळी आम्ही सर्व सीमा पार करून वर्ल्डकप जिंकलो याचा आनंद झाला. असं म्हणत रोहित शर्माने T20 मधून निवृत्ती (Rohit Sharma Retirement) जाहीर केली.

कस आहे रोहितचे T20 करिअर ?

रोहित शर्माने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4231 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये रोहोतच्या नावावर 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 121 आहे. 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता आणि भारतासाठी दोन T20 विश्वचषक जिंकणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.