Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 637

Raisin Water | पौष्टिकतेचे भांडार आहे मनुक्याचे पाणी, रोज प्यायल्याने होतात असंख्य फायदे

Raisin Water

Raisin Water | मनुका हे अतिशय फायदेशीर असे ड्रायफ्रूट्स आहे. अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये मनुक्याचा वापर केला जातो. ड्रायफ्रूट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यातही मनुक्यामध्ये अनेक गुणधर्म असतात, त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. तुम्ही जर मनुके रात्रभर पाण्यात (Raisin Water) भिजवून ठेवून ते पाणी सकाळी पिले, तर त्याच्या आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आपण या लेखांमध्ये मनुका रात्रभर भिजवून ठेवला आणि सकाळी ते पाणी पिले, तर त्यामुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात? हे जाणून घेणार आहोत.

मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे | Raisin Water

  • मनुका हे अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात, जे पेशींना फ्री-रॅडिकल नुकसान होण्यापासून वाचवतात आणि त्वचेचे पोषण करतात.
  • फेरुलिक ॲसिड, रुटिन, क्वेर्सेटिन, ट्रान्स-कॅफ्टेरिक ॲसिड, मनुका यांसारख्या संयुगांनी समृद्ध, कॅन्सर, टाइप 2 मधुमेह आणि अल्झायमरपासून संरक्षण करतात. हे खाल्ल्याने अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढते आणि मेंदूचे कार्य सुधारते.
  • मनुका लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो ऑक्सिजन वाहतूक आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करतो. अशा प्रकारे ते लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा सारख्या आजारांना प्रतिबंधित करते.
  • मनुका पाणी प्यायल्याने पोटातील ॲसिडचे प्रमाण नियंत्रित राहते. त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, ते आतड्यांचे कार्य सुधारते आणि पोटात असलेल्या बॅक्टेरियाचे नियंत्रण देखील करते.
  • ते आतड्यांतील बॅक्टेरिया नियंत्रित करून पचनास देखील मदत करतात.
  • मनुका पाणी रक्ताभिसरण सुधारते. यामुळे केसांचे कूप मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते.
  • विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मनुका पाणी देखील एक उत्तम डिटॉक्स पेय आहे.
  • मनुका पाणी एक उत्कृष्ट प्रतिकारशक्ती वाढवणारे आहे.
  • मनुका पाणी केवळ यकृत डिटॉक्स करत नाही तर हाडांची मजबूती देखील वाढवते.
  • मनुका पाणी नैसर्गिक ब्लड क्लींजर आणि ब्लड प्युरिफायर म्हणून काम करते, ज्यामुळे मुरुम दूर होतात आणि त्वचा चमकदार होते. शिवाय, ते वृद्धत्वाची प्रक्रिया देखील मंद करते.
  • मनुका मध्ये असलेली नैसर्गिक साखर जलद उर्जा वाढवण्याचे काम करते.

भारताने सामना कुठं फिरवला? शरद पवारांनी सांगितला टर्निंग पॉईंट

sharad pawar on world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात (IND Vs SA T20 Final) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकप वर आपलं नाव कोरल. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या रोमहर्षक सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. एकवेळ भारत हा सामना हरेल असं वाटलं होते. दक्षिण आफ्रिकेला २२ चेंडूत २६ धावांची आवश्यकता होती, मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करत अभिनंदन केलं तसेच मॅच कुठे फिरली याचा टर्निंग पॉईंट सुद्धा सांगितला.

काय आहे शरद पवारांचे ट्विट?

शेवटचा थरार! १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतरचा अभिमानाचा क्षण. धन्यवाद रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवचा झेल…. अभिनंदन असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे. म्हणजेच सूर्यकुमार यादवने अखेरच्या ओव्हर मध्ये डेव्हिड मिलरचा घेतलेला झेल मॅच चा टर्निंग पॉईंट ठरला असं पवारांनी म्हंटल. शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला 16 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पंड्या ओव्हर टाकत होता तर समोर डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. पहिलाच बॉल मिलरने लॉन्ग ऑन च्या दिशेने हवेत मारला, असं वाटलं कि हा चेंडू सहज सिक्स जाईल, पण सुर्यकुमार यादवे चतुराईने तो कॅच पकडला आणि भारताचा विजय सुनिश्चित झाला.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्याने कोणत्याही परिस्थितीत हा वर्ल्डकप जिंकावा अशी भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा होती. मात्र हेन्री क्लासेनच्या वादळी खेळीने एकवेळ दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २२ चेंडूत २६ धावांची गरज होती. मात्र हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी टिच्चून बॉलिंग करत आफ्रिकेला विजयापासून रोखलं आणि ऐतिहासिक विजय मिळवत वर्ल्डकप चॅम्पियनचा खिताब मिळवला. जसप्रीत बुमराह मन ऑफ द टूर्नामेंट ठरला.

Rice Farming | भातशेती करताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी; उत्पनात होईल भरभराट

Rice Farming

Rice Farming | तांदूळ हे भारतातील प्रमुख पीक आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये तांदळाची लागवड केली जाते. शेतकरी दरवर्षी शेतात कष्ट करून हा तांदूळ लावतात. त्यामुळे जगभरातील लोकांना रोज तांदूळ खायला मिळतो. भात शेती असो किंवा इतर कोणत्याही धान्य असो. परंतु प्रत्येक पिकाचे शेतकऱ्याला संरक्षण करावे लागते. त्याची काळजी घ्यावी लागते. तसेच ते पीक खराब होऊ नये. या गोष्टीची देखील काळजी घ्यावी लागते. आता पावसाळा चालू झालेला आहे. आणि भात लागवड करायला देखील अनेक ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आज आपण भात शेतीची (Rice Farming) काळजी कशाप्रकारे घ्यावी याबद्दल माहिती सांगणार आहोत.

या गोष्टींची काळजी घ्या | Rice Farming

भात शेती ही खरीप हंगामातील एक महत्त्वाची शेती आहे. अनेक राज्यांमध्ये भात पिकाची शेती केली जाते. तांदूळ हे पीक पोष्टिकतेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. संपूर्ण तांदळाचा वापर केला जातो. भारतामध्ये खरीप हंगामात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि झारखंड या ठिकाणी भाताची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

बियाणे शुद्ध करणे आवश्यक आहे

शेतकरी बांधवांनी सिंचनाची साधने चांगली ठेवावीत. कारण भातशेतीसाठी भरपूर पाणी लागते. याशिवाय भाताची मशागत आणि पेरणी ही प्रत्यारोपणाच्या माध्यमातून केली जाते, अशा परिस्थितीत भातपिक जितक्या लवकर लावली जाईल तितक्या लवकर पीक तयार होऊन पिकेल आणि तुम्हाला नफाही लवकर मिळू शकेल. भात लागवडीपूर्वी बियाणे शुद्ध करणे देखील खूप महत्वाचे आहे, बियाणे शुद्धीकरणाने भातशेतीतील नफा वाढू शकतो. त्यामुळे किडीचा धोका टाळण्यासाठी क्लोरो सायपर किंवा इमिडाक्लोप्रिडची फवारणी करणेही अत्यंत आवश्यक आहे. भातशेतीमध्ये बेड तयार केल्यास पिकात वाढ दिसून येते. शेतकऱ्याने आपल्या क्षेत्रानुसार भात पीक व बियाणे निवडावे, जेणेकरून नुकसान होण्याची शक्यता कमी असते.

Rohit Sharma Retirement : रोहित शर्माची T20 मधून निवृत्ती!! भारताला World Cup जिंकवून घेतला मोठा निर्णय

Rohit Sharma Retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला. अतिशय रोमहर्षक आणि थरारक सामन्यात भारताने बाजी मारत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल. एकीकडे चाहते या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीमुळे (Rohit Sharma Retirement) क्रिकेटप्रेमींना मोठं दुःख सुद्धा होत आहे. विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही T20 क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रोहितच्या निवृत्तीबाबत माहिती दिली आहे.

अंतिम सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला होता, “हा माझा शेवटचा सामना होता. निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. मला ती (ट्रॉफी) हवी होती. हे शब्दात मांडणे खूप कठीण आहे. मला हेच हवे होते आणि हेच घडले. मी माझ्या आयुष्यात यासाठी खूप हताश होतो. यावेळी आम्ही मर्यादा ओलांडली याचा आनंद झाला. असं म्हणत रोहित शर्माने T20 मधून निवृत्ती (Rohit Sharma Retirement) जाहीर केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी एकाच वेळी निवृत्ती जाहीर केल्याने भारतीय क्रिकेटला हा मोठा धक्का आहे.

कस आहे रोहितचे T20 करिअर ? Rohit Sharma Retirement

रोहित शर्माने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4231 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये रोहोतच्या नावावर 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 121 आहे. 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता आणि भारतासाठी दोन T20 विश्वचषक जिंकणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.

IRCTC : एक्सप्लोर करा देवभूमी उत्तराखंडचे अद्भुत सौंदर्य; IRCTC ने आणलंय जबरदस्त पॅकेज

uttarakhand

IRCTC : उत्तराखंड हे सुंदरआणि अद्भुत ठिकाण आहे. तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा साहस प्रेमी असाल, उत्तराखंडमध्ये प्रत्येक प्रकारच्या प्रवाशासाठी काहीतरी आहे.जर तुम्ही आत्तापर्यंत उत्तराखंड फक्त चित्रांमध्ये पाहिले असेल, तर आता IRCTC तुम्हाला ते जवळून पाहण्याची संधी देत ​​आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. चला जाणून घेऊया…

ट्रॅव्हल मोड -ट्रेन (IRCTC)

डेस्टिनेशन कवर्ड– अल्मोरा, बैजनाथ, भीमताल, कौसानी, नैनिताल, रानीखेत

काय मिळतील सुविधा ? (IRCTC)

राहण्यासाठी हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.
नाश्ता आणि रात्रीचे जेवण पॅकेजमध्ये उपलब्ध असेल.
तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.

किती आहे शुल्क ?

यामध्ये तुम्ही स्टँडर्ड पॅकेज घेतल्यास तुम्हाला 28,020 रुपये द्यावे लागतील.
डिलक्स पॅकेजसाठी प्रति व्यक्ती 35,340 रुपये शुल्क भरावे लागेल.
मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल.

IRCTC ने ट्विट करून माहिती दिली

IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला देवभूमी उत्तराखंडचा सुंदर नजारा पाहायचा असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.

कसे कराल बुकिंग ?

तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Mhada Mumbai : प्रतीक्षा संपली ! मुंबईसाठी मंडळासाठी ‘या’ महिन्यात निघणार सोडत

Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची (Mhada Mumbai) उपलब्धता करून दिली जाते.

मुंबईत सुद्धा म्हाडा (Mhada Mumbai) कडून घरांची सोडत काढली जाते. मुंबईकरांची घर घेण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मुंबईतील 1900 घरांसाठी जुलै महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून ऑगस्ट मध्ये त्याची सोडत निघणार आहे.

म्हाडा कडून पुणे, मुंबई सह राज्यातील अनेक शहरात घर उपलब्ध करून दिली जातात. स्वस्त दरात व मोक्याच्या ठिकाणी असलेली ही घरं सर्वसामान्यांना परवडतात. म्हाडाच्या (Mhada Mumbai) मुंबई मंडळाने ऑगस्ट 2023 मध्ये मुंबईतील जवळपास चार हजार घरांची लॉटरी काढली होती. यासाठी तब्बल सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते.

ऑगस्ट 2023 मध्ये म्हाडा गोरेगाव, विक्रोळी येथील घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यानंतर या वर्षासाठी म्हाडाची (Mhada Mumbai) लॉटरी कधी प्रसिद्ध होणार याची सर्वांना प्रतीक्षा होती मात्र अखेर आता प्रतीक्षा संपणार आहे माडाच्या मुंबई मंडळांना जवळपास 1900 घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र यंदाच्या घरांसाठी लोकेशनची मात्र माहिती आतापर्यंत समोर आलेली नाहीये.

मुंबईमध्ये गोरेगाव प्रेम नगर येथील तब्बल 322 हायफाय (Mhada Mumbai) घरांची उभारणी करण्यात आलेली आहे. ही घरं 800 ते 1000 स्क्वेअर फुटांची आहेत. ऑगस्टमध्ये निघणाऱ्या सोडतीमध्ये या घरांचाही समावेश करण्यात येणार आहे मात्र या घरांच्या किमती काय असतील हे अद्यापही जाहीर केलेलं नाही

उत्तर प्रदेशात भाजप का हरली? समोर आलं धक्कादायक कारण

BJP UP Lost

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला उत्तर प्रदेशात कमीत कमी ६० जागा तरी जिंकण्याची अपेक्षा होती, मात्र राम मंदिर बांधूनही आणि विकासाचे राजकारण करूनही भाजपला उत्तरप्रदेशात यश मिळालं नाही. २०१९ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात भाजपच्या जागा घटल्या तर दुसरीकडे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीला मात्र मोठं यश मिळालं. जनतेने इंडिया आघाडीला भरगोस मतदान केलं. या पराभवानंतर भाजपने कारणीमासा शोधली. यामध्ये अनेक धक्कादायक कारणे समोर आली आहेत.

शुक्रवारी लखनऊमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचा पराभव झाला त्या जागांचे विश्लेषण करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अहवालात नोकरशाहीने जनतेशी आणि कामगारांना कशी वागणूक दिली आणि अधिकाऱ्यांच्या अंतर्गत हत्येचाही उल्लेख केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेणाऱ्या भाजपच्या विशेष पथकाने हा सविस्तर अहवाल प्रदेश नेतृत्वाला सादर केला आहे. पराभवाची अनेक कारणे या अहवालात देण्यात आली आहेत.

या रिपोर्टमध्ये असं म्हंटल आहे कि, विधानसभेतील आमदारांच्या निष्क्रियतेमुळे पक्षाचे नुकसान झालं आहे. अनेक आमदार त्यांच्या भागातील लोकसभा उमेदवारांच्या विरोधात होते आणि या वादातूनच पक्षाचे नुकसान झालं. विरोधकांनी संविधानाचा मुद्दा उचलून धरला होता, त्यामुळे अनुसूचित जाती, दलित आणि ओसीबी मतदान बिथरले आणि त्यांनी भाजपविरोधात मतदान केल्याचे रिपोर्ट म्हणून सांगण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील जनता बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांवर आणि अधिकाऱ्यांवर नाराज होती, ती नाराजी इंडिया आघाडीच्या पथ्यावर पडली आणि भाजपला फटका बसला असं अहवालातून म्हंटल आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात 80 जागांपैकी समाजवादी पक्षाने सर्वाधिक 37 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ 33 जागा मिळाल्या. काँग्रेसला ६ जागा, आरएलडीला २, आझाद समाज पक्ष आणि अपना दल (एस) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. तर मायावतींच्या बसपाला खातेही उघडता आले नाही.

Weather Update | येत्या 4 दिवसात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याने दिली माहिती

Weather Update

Weather Update | यावर्षी पावसाने चांगली धुमधडाक्यात महाराष्ट्रात एन्ट्री केलेली आहे. परंतु सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसात खंड पडलेला आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसात पावसात जोरदार पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील केवळ पश्चिम भागात म्हणजेच कोकण, सह्याद्री, पुणे जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी तुरळ स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आता पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रात हवामान कसे असणार आहे हे आपण पाहूया.

29 जून रोजी हवामान | Weather Update

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

30 जून रोजी हवामान

30 जून रोजी अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये दक्षिण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील पावसाची शक्‍यता आहेत.तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पुणे या भागात देखील अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

1 जुलै रोजी हवामान

1 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

2 जुलै रोजी हवामान | Weather Update

2 जुलै रोजी देखील बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या ठिकाणी तुरळ पाऊस पडणार आहे. त्याप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Mazi Ladki Bahin Yojana 2024 | माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या कागदपत्रांची यादी

Mazi Ladki Bahin Yojana 2024

Mazi Ladki Bahin Yojana 2024 | राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे. आताही माझी लाडकी बहिण योजना (Mazi Ladki Bahin Yojana 2024) नेमकी काय आहे? त्याचा लाभ घेण्यासाठी काय काय प्रक्रिया करावी लागते?कोणती कागदपत्र लागतात? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार ? | Mazi Ladki Bahin Yojana 2024

राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील विवाहित,विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिलांना मिळणार आहे.

योजनेची पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे खूप गरजेचे आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला विवाहित,विधवा, घटस्फोटीत किंवा निराधार असली तरच तिला लाभ मिळणार आहे.
  • 21 ते 60 वर्षे होईपर्यंत या योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे बँक खाते असणे गरजेचे आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्र | Mazi Ladki Bahin Yojana 2024

  • योजनेचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • महिलेकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र जन्म दाखला असणे गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे समक्ष प्राधिकार्‍याने दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे.
  • त्याचप्रमाणे बँक खाते, पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • रेशन कार्ड.
  • त्याचप्रमाणे योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र.

अर्ज कसा करायचा ?

  • पात्र असलेल्या महिला या योजनेचा अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करू शकतात.
  • पात्र असलेली महिला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकते.
  • ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र बाल विकास प्रकल्प ग्रामपंचायत वार्ड इत्यादी मधून अर्ज करता येईल.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 | पुणे महापालिकेअंतर्गत मोठी भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची स्वप्न असते. परंतु काही कारणाने ते स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु आता आम्ही तुमच्यासाठी पुण्यामध्ये नोकरी करण्याची एक भन्नाट अशी संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पुणे महानगरपालिके अंतर्गत (Pune Mahanagarpalika Bharti 2024) समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचासाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत. या पदाच्या एकूण 12 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 29 जून हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या आज या भरतीसाठी अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Pune Mahanagarpalika Bharti 2024

  • पदाचे नाव – समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पदसंख्या – 12 जागा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, ला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे 411002
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 दिवस (29 जून 2024)
  • वेतनश्रेणी – 22, 365 रुपये

अर्ज कसा करावा ? | Pune Mahanagarpalika Bharti 2024

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी तुम्हाला अर्ज करून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ द्यायला सविस्तरपणे वाचावी.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा