Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 638

Vodafone Idea | Airtel, Jio नंतर आता VI चा दणका; कंपनीचे रिचार्ज प्लॅन महागले

Vodafone Idea

Vodafone Idea | सगळ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्जचे दर वाढवलेले आहेत. त्यामुळे आता देशातील कोट्यावधी लोकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. याआधी जिओ आणि एअरटेलने त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे. अशातच आता देशातील सर्वात मोठी तीन नंबरची दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडियाने (Vodafone Idea) देखील त्यांचे मोबाईल दर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कंपनीने त्यांचे प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही मोबाईल टेरिफ 10 ते 21 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे नवीन दर 4 जुलैपासून लागू होणार आहेत. आता आपण वोडाफोन आयडियाचे दर किती वाढणार आहेत ते पाहूया.

कोणत्या प्लॅनसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील? | Vodafone Idea

  • आता तुम्हाला 179 रुपयांच्या प्लॅनसाठी 28 दिवसांसाठी 199 रुपये द्यावे लागतील. हे 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 SMS देते.
  • कंपनीने 28 दिवसांसाठी दररोज 1 GB डेटा असलेल्या प्लॅनची ​​किंमत 269 रुपयांवरून 299 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
  • 299 रुपयांच्या प्लॅनची ​​(28 दिवस, 1.5GB डेटा प्रतिदिन) आता 349 रुपये मोजावे लागतील.
  • 319 रुपयांचा प्लॅन (1 महिना, 2GB डेटा) आता 379 रुपये लागेल.
  • 479 रुपयांचा प्लॅन (56 दिवस, 1.5GB डेटा) आता 579 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.
  • 539 रुपयांच्या प्लॅनची ​​(56 दिवस, 2GB डेटा) किंमत आता 649 रुपये असेल.
  • कंपनीने 84 दिवसांच्या कालावधीसह 1.5 GB प्रतिदिन प्लॅनची ​​किंमत 859 रुपयांपर्यंत वाढवली आहे, जी आतापर्यंत 719 रुपये होती.
  • कंपनीने 84 दिवसांसाठी दररोज 2GB डेटाचा प्लॅन 839 रुपयांवरून 979 रुपयांपर्यंत वाढवला आहे.
  • 84 दिवसांसाठी 459 रुपयांचा प्लॅन आता 509 रुपयांचा झाला आहे. यामध्ये 6GB डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि 300 SMS उपलब्ध आहेत.
  • 365 दिवसांसाठी 1799 रुपयांचा प्लॅन आता 1999 रुपयांचा आहे. यामध्ये 24GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 SMS यांचा समावेश आहे.
  • Vodafone Idea ने आपल्या 365 दिवसांच्या वार्षिक प्लॅनची ​​किंमत 3499 रुपयांपर्यंत वाढवली आहे, जी आतापर्यंत 2,899 रुपये होती. यामध्ये दररोज 1.5GB डेटा मिळणार आहे.
  • डेटा ॲड-ऑन प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने 1 GB डेटाची किंमत 19 रुपयांवरून 22 रुपये आणि 6 GB डेटाची किंमत 39 रुपयांवरून 48 रुपयांपर्यंत वाढवली आहे. या प्लॅनची ​​वैधता 1 आणि 3 दिवसांची आहे.

पोस्टपेड प्लॅन दर

  • पोस्टपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, आता तुम्हाला 401 रुपयांच्या प्लॅनसाठी 451 रुपये मोजावे लागतील.
  • 501 रुपयांच्या प्लॅनसाठी 551 रुपये द्यावे लागतील.
  • तसेच 601 रुपयांच्या फॅमिली प्लॅनसाठी 701 रुपये द्यावे लागतील.
  • 1001 रुपयांच्या फॅमिली प्लॅनसाठी तुम्हाला 1201 रुपये द्यावे लागतील.

जिओ आणि एअरटेलने वाढ केली आहे

गेल्या गुरुवारी रिलायन्स जिओने मोबाइल दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 28 जूनच्या सकाळी एअरटेलने दरात वाढ केली आणि आता शुक्रवारी रात्री व्होडाफोन आयडियानेही मोबाइलचे दर महाग केले आहेत. टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये 12.5 टक्क्यांनी 25 टक्के वाढ केली आहे.

हे नवीन दर 3 जुलै 2024 पासून लागू होतील. Jio ने त्यांच्या 19 प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत, ज्यापैकी 17 प्रीपेड आणि 2 पोस्टपेड आहेत. प्रीपेड प्लॅनमध्ये एअरटेलचे दर 11% ते 21% आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये 10% ते 20% वाढले आहेत, एंट्री लेव्हल प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 11% ते 199 रुपये प्रति महिना वाढली आहे, जी आधी प्रति महिना 175 रुपये होती.

गुंजवणी ते विमानतळ, पुरंदरच्या विधानसभेला ‘हे’ मुद्दे निर्णायक ठरतील

Purandar assembly 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विमानतळावरुन बरंच राजकारण झालं.. गुंजवणीचं पाणी बघता बघता घसा कोरडाच राहीला… आमदार आले.. बदलले… पण पुरंदरच्या समस्या तशाच राहील्या… बारामतीसारख्या पाणीदार तालुक्याला लागूनच असणाऱ्या पुरंदर विधानसभेला पाण्यावीना मात्र कोरडंच राहावं लागलं.. तालुक्याचा विकास कमी असला तरी मतदारसंघात राजकारणाला बरीच श्रीमंती आहे… दिगंबर दुर्गाडे, अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव अशा डझनभर स्थानिक नेत्यांची नावं देता आली तरी इथलं मुख्य राजकारण चालतं ते दोन नावांभोवती… पहिलं संजय जगताप (Sanjay Jagtap) आणि दुसरं म्हणजे विजयबापू शिवतारे (Vijay Shivtare) … या दोघांच्यातला आमदारकीसाठीच्या खुर्चीचा विस्तव आपण पाहीला असेलच… विजयबापूंच्या राजकारणाला पाणी पाजत गेल्या टर्मला संजय जगतापांनी गेली विधानसभा खेचून आणलीच… यंदा विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यासमोर पुन्हा एकदा विरोधात विजबापू शिवतारेंचं चॅलेंज असणार आहेच. त्यामुळे पुरंदरात यंदा वारं कुणाच्या बाजूने फिरतंय… जगताप आणि शिवतारे यांची खरी ताकद किती? पुरंदर विमानतळ आणि गुंजवणीच्या पाण्याचा विधानसभेवर कसा प्रभाव पडेल? पुरंदरचा यंदा आमदारकीच्या गुलालाचा मानकरी कोण? याचाच हा ग्राऊंड रिपोर्ट…

विजयबापू पुरंदरच्या राजकारणातील सुरवातीला वन मॅन शो.. राजकारण करायचं तर फक्त शिवतारेंनी ही लाईन मतदारसंघात पक्की झाली होती.. २००९ आणि २०१४ ला सरळ सरळ संजय जगतापांचा पराभव करत विजयबापू बिग फिश बनले होते. २०१४ नंतरच्या मंत्रीमंडळात तर थेट जसलंपदा मंत्रीचं राज्यमंत्रीपद मिळाल्यानं पुरंदरकरांच्या अपेक्षा चांगल्याच वाढल्या.. शिवसेनेचा आणि त्यातही शिवतारेंना मानणारा एक स्ट्राँग केडर बेस त्यांनी तयार केला आणि वाढवला.. पण या सगळ्यात निर्णायक ठरला तो गुंजवणीचा पाणीप्रश्न… खरंतर अनेक आश्वासन देऊनही आणि त्यात त्याच खात्याचं मंत्रीपद असूनही शिवतारेबापूंना गुंजवणीचा पाणी प्रश्न निकाली काढता आला नाही.. थोडक्यात जनतेच्या मनात प्रचंड नाराजी होती. त्याचं उत्तर २०१९ च्या निकालात जनतेनं दाखवून दिलं. आणि शिवतारेंना बाजूला सारत जनतेनं संजय जगतापांना निवडून दिलं…

जगतापांच्या मागच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीकडे पाहीलं तर म्हणावं असं मोठं काम त्यांनीही केलं नसलं तरी मतदारसंघात छोटीमोठी कामं त्यांच्यामार्फत झाली आहेत.. त्यात लोकांच्या मर्जीशिवाय पुरंदर विमानतळ होऊ देणार नाही, हा घेतलेला स्टँड जगतापांना फायद्याचा राहीला..फक्त सरकारनं पाणी नाही आणलं तरी मी माझ्या पैशावर पाणी आणीन, असं निवडणुक प्रचारात आत्मविश्नासानं सांगणाऱ्या जगतापांना हा शब्द काही पाळता आलेला दिसत नाहीये.. पण मतदारसंघातली जनता आता या गुंजवणीच्या पाण्याला कंटाळली आहे.. लोकांनी हे पाणी मिळेल, अशी अपेक्षाच या राजकारणी मंडळींमुळे सोडून दिली आहे. गुंजवणीची द्राक्ष आंबट असं म्हणत काही अपवाद वगळता जनतेनं स्वत: ला एडजस्ट करुन घेतलंय. थोडक्यात ज्या गुंजवणीच्या आणि विमानतळाच्या प्रश्नावर मागची १५ वर्ष राजकारण झालं ते प्रश्न येत्या विधानसभेला मात्र जास्त प्रभाव टाकणार नाहीत, अशी अवस्था सध्या मतदारसंघाची होऊन बसलीय…

पण करंट स्टेटसमध्ये पाहायचं झालं तर लोकसभेला जगतापांनी तुतारीला मतदारसंघातून लीड मिळवून दिलंय… त्यामुळे यंदाही जगतापांच्या बाजूने वातावरण असल्याचा अंदाज बांधता येऊ शकतो तर दुसरीकडे शिवतारे बापूंनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिल्यानं मतदारसंघातील शिवसेनेचा कार्यकर्त्यांचा कोअर गट फुटला… त्यात बापूंचे अनेक निष्ठावंतांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली.. हे कमी होतं की काय म्हणून लोकसभेला केलेल्या नाराजीनाट्यामुळे आणि बदललेल्या भूमिकांमुळे बापूंना याचा मेजर सेट बॅक बसणार असल्याचं सध्यातरी दिसतंय.. तर दुसरीकडे विद्यमान आमदार जगतापांच्या पाठीशी संस्थात्मक ताकद मोठी आहे.. त्यात आघाडीच्या घटक पक्षांची मतदारसंघातील ताकद पाहता जगतापांच्या पाठीशी यंदाच्या निवडणुकीलाही मोठा बॅकअप राहणार आहे… जगताप यांनी निवडणुकी आधी स्वतची जशी प्रतिमा तयार केली होती तितकी काम या पंचवार्षिकला करता आली नसली तरी आपली प्रतिमा स्वच्छ आणि मतदारसंघात बेरजेचं राजकारण केल्याने यंदाही आमदार जगतापच राहतील, अशी मतदारसंघात चर्चा आहे…

सध्या महायुतीच्या बाजूने अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, दिगंबर दुर्गाडे ही नेतेमंडळी असली तरी त्यांचा मतदारसंघातील प्रभाव ओसरता राहीलाय.. त्यात भाजपमध्ये असणाऱ्या अंतर्गत गटबाजीचा फटका जगतापांच्या पथ्यावर पडणाराय… तर दुसरीकडे महाविकास आघाडीत कॉंग्रेसमध्ये अशी गटबाजी आढळत नाही, इथे पूर्ण पक्ष हा जगतापांच्या कंट्रोल खाली आहे… शरद पवार गटात गटबाजी दिसते खरी पण त्याचा फटका आघाडीच्या उमेदवाराला बसेल, हे सध्यातरी वाटत नाही..थोडक्यात पुरंदरच्या राजकारणाला ३६० अंशात बघीतलं तर जगताप सलग दुसऱ्यांदा आमदारकीचा गुलाल उधळतायत, असं वातावरण आहे.. पण पुरंदर विमानतळाचं काय? गुंजवणीचं पाणी आता ती तालुक्याला मिळणार का? राष्ट्रीय बाजार बनवण्याच्या स्वप्नाचं काय? या जनतेच्या मागण्या आणि समस्यांकडे जगताप आणि शिवतारेंनी थोड्या माणुसकीच्या नजरेनं बघायला हवं एवढीच काय ती अपेक्षा..बाकी पुरंदरचा आमदार म्हणून तुम्हाला यंदा कुणाला पाहायला आवडेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..

OnePlus Ace 3 Pro : 24GB RAM सह लाँच झाला OnePlus Ace 3 Pro; किंमत किती पहा

OnePlus Ace 3 Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड वनप्लसने बाजारात नवीन मोबाईल लाँच केला आहे. OnePlus Ace 3 Pro असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 24GB RAM, 6100mAh बॅटरी यांसारखी अनेक दमदार फीचर्स देण्यात आलेत. सध्या कंपनीने चीनच्या मार्केटमध्ये हा मोबाईल आणला असून येत्या काळात तो भारतातही येऊ शकतो. आज आपण वनप्लसच्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

डिस्प्ले –

OnePlus Ace 3 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा 8T LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2780×1264 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 4500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो. OnePlus Ace 3 Pro मध्ये Adreno 750 GPU सह Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर बसवण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ColorOS 14.1 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. वनप्लसचा हा मोबाईल IP65 रेटिंगसह येतो. म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून मोबाईलला कोणताही कोणताही धोका नाही. याशिवाय सुरक्षेसाठी स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

कॅमेरा –

मोबाईलच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus Ace 3 Pro च्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा बसवण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी साठी स्मार्टफोन मध्ये Dual SIM, 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, Beidou, GPS, GLONASS: G1 आणि Type C पोर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती – OnePlus Ace 3 Pro

OnePlus Ace 3 Pro च्या 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 3,199 युआन (अंदाजे 36,730 रुपये), 16GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3499 युआन (अंदाजे 40,170 रुपये), 16GB + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1629 युआन म्हणजेच 43,610 रुपये आहे. 24GB + 1TB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 4399 युआन (अंदाजे 50,500 रुपये), 16GB + 512GB सिरेमिक स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3999 युआन (अंदाजे रुपये 45,905 रुपये आहे. हा स्मार्टफोन ३ जुलै पासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा मोबाईल टायटॅनियम मिरर सिल्व्हर, ग्रीन फील्ड ब्लू आणि सुपरकार पोर्सिलेन कलेक्शन या तीन रंगांमध्ये खरेदी करता येईल.

Railway News : भुसावळहून पुण्याला सुसाट…! सुरु होणार स्वतंत्र रेल्वे गाडी

Bhusawal

Railway News : मुंबईनंतर पुणे हे महत्त्वाचे शहर बनले आहे. अवघ्या महाराष्ट्रातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी आणि नोकरी धंद्यासाठी येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. राज्यातील इतर भागाप्रमाणेच भुसावळ मधून सुद्धा अनेक नागरिक हे पुण्यामध्ये ये जा करीत असतात. मात्र भुसावळ कडून पुण्याला जाण्यासाठी स्वतंत्र अशी रेल्वे नाही. मात्र आता लवकरच मध्य रेल्वे कडून भुसावळ ते पुणे अशी स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे यासाठीचा (Railway News) प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

हुतात्मा एक्सप्रेस आता अमरावती येथून सुटते त्यामुळे भुसावळ जळगावच्या प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी भुसावळ ते पुणे अशी स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्याची (Railway News) मागणी होत आहे.

भुसावलसह ‘या’ गावांना फायदा (Railway News)

भुसावळ येथील डीआरएम कार्यालयात रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली यावेळी बोलताना डीआरएम इती पांडे यांनी प्रस्तावित भुसावळ ते पुणे या नवीन रेल्वे गाडीची माहिती दिली. ही नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यालयात (Railway News) पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच पुण्यासाठी भुसावळ हून रेल्वेगाडी सुरू होऊ शकेल त्यामुळे भुसावळ सह जळगाव पाचोरा आणि चाळीसगावच्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल असंच पांडे यांनी स्पष्ट केलं.

या बैठकीला वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार तसेच समितीचे सदस्य अनिरुद्ध कुलकर्णी, किरण बोरसे, महेंद्र कुमार, बुरड, दिलीप पाटील किरण राणे आदी उपस्थित होते संबंधित सर्व सदस्यांनी प्रवासी सुविधा वाढवण्याची देखील (Railway News) मागणी केली. याशिवाय प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी नवीन गाड्या चालवणे, जुन्या गाड्यांचा विस्तार करणेथांबे वाढवणे या मुद्यांकडे देखील रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधलं.

SSC MTS Bharti 2024 | 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 8326 जागांची भरती सुरु

SSC MTS Bharti 2024

SSC MTS Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. ती म्हणजे आता SSC, MTS अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत 8326 रिक्त जागांची भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना आज म्हणजे 27 जून 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे 31 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी ह्या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | SSC MTS Bharti 2024

  • पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार
  • पदसंख्या – 8326 जागा
  • नोकरी ठिकाण – भारत
  • अर्ज शुल्क – 100 रुपये
  • वयोमर्यादा –
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 18-25 वर्ष
  • हवालदार – 18 – 27 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 जुन 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024

अर्ज कसा करावा ? | SSC MTS Bharti 2024

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.
  • ३१ जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Sim Port | आता कमी काळात होणार सिम पोर्ट; 1 जुलैपासून लागू होणार नवीन नियम

Sim Port

Sim Port | भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरण अंतर्गत नवनवीन नियम नेहमीच बदलत असतात. अशातच आता सिम कार्ड संबंधित अपडेट देखील आलेले आहे. ती म्हणजे 1 जुलैपासून आता दूरसंचार वापरकर्त्यांसाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे. हा नियम एकदा लागू झाला की, अनेक लोकांना सिम कार्ड पोर्ट करण्यासाठी सात दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. आतापर्यंत तुम्ही सिम कार्ड पोर्ट केल्यानंतर तुम्हाला दहा दिवस वाट पहावी लागणार होती. परंतु आता नवीन नियमानुसार केवळ सात दिवसातच तुमचे सिम कार्ड चालू होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने याबाबत असे म्हणणे आहे की, फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा नियम करण्यात आलेला आहे.

या आधी जर एखाद्या व्यक्तीचा फोन चोरीला गेला तर एफआयआरची प्रिंट दिल्यानंतर लोकांना नवीन सिम कार्ड मिळायचे, परंतु 1 जुलैपासून असा फोन चोरीला गेला तर त्या नवीन सिम साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला सात दिवस वाट पाहावी लागणार आहे. aतसेच ज्यांनी सिम कार्ड बदलले आहे. त्यांनाही मोबाईल नंबर साठी सात दिवस वाट पहावी लागणार आहे.

अनेक वेळा सिम कार्ड (Sim Port) चोरीला गेल्यानंतर तो नंबर ऍक्टिव्ह केल्याच्या दिसून येते. यामुळे फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी आता हे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्याचा फायदा नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना; एकनाथ शिंदेची मोठी घोषणा

Chief Minister Tirtha Darshan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेच्या माध्यमातून सरकार स्वतः ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे. आज राज्य विधिमंडळात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Chief Minister Tirtha Darshan Yojana) सुरू करावी याबाबतची लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली. याला इतर आमदारांनी दुजोराही दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही योजना राज्यात लागू करत असल्याची घोषणा केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाला जाण्याची इच्छा असते, पण आर्थिक स्थिती नसल्याने इच्छा असूनही अनेकजण देवदर्शन करू शकता नाहीत त्यामुळे ही योजना लागू केल्यास ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन करता येईल, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती. या लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना लागू करत असल्याचे म्हटलं. आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण ठरवलं जाईल, नियमावली केली जाईल, खर्च आणि इतर गोष्टी सुद्धा बघू. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवू असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना हि सर्व धर्मीयांसाठी असेल. आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत. आमच्या सरकारने शेतकऱ्यासांठी निर्णय घेतला. वारकऱ्यांसाठीही निर्णय घेतला असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? पवारांच्या उत्तराने चर्चाना उधाण

uddhav thackeray sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात विधानसभा निवडणुकीला ३ महिने बाकी असतानाच महाविकास आघाडीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून वादविवाद सुरु आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं धोक्याचे आहे. लोकांनी उद्धव ठाकरेंचं काम बघितलं आहे, लोकसभेला अनेक घटकांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पाहून मतदान केलं आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर केलं. त्यामुळे खरंच तर महाविकास आघाडीची सत्ता आली तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) याना विचारलं असता पवारांच्या उत्तराने सस्पेन्स आणखी वाढला आहे.

शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस संजय राऊतांनी केलेल्या विधानावरुन, “उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील का?” असा थेट प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. या प्रश्नावर शरद पवारांनी अगदी सावध आणि मोजक्या शब्दात उत्तर दिले. सामुहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे, आमची आघाडी हाच आमचा समुदायिक चेहरा आहे. इथे कोणतीही व्यक्ती देण्याचा प्रश्न नाही असं म्हणत पवारांनी हा प्रश्न टोलवून दिला. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असं पवार थेटपणे बोलले नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स आणखी वाढला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते-

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम बघितलं आहे. लोकसभेतील अनेक घटकांचे मतदान उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे बघूनच झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद महत्व्वाची आहेच मात्र बिन चेहऱ्याचे सरकार अजिबात चालणार नाही असं राऊतांनी सांगितलं. संजय राऊतांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदासाठी समोर केलं होते.

Cumin Water | समस्या अनेक उपाय एक ! ‘हे’ आहेत जिऱ्याच्या पाण्याचे फायदे

Cumin Water

Cumin Water | भारतीय मसाले हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. भारतीय मसाल्यांनी जेवणाची चव वाढते. त्यासोबतच आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात. या मसाल्यांमध्ये अनेक प्रकारे येतात. यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि खास असा मसाला म्हणजे जिरे, जिऱ्यामुळे (Cumin Water ) जेवणाची चव वाढते. त्याचप्रमाणे जेवणाला चांगला सुगंध येतो. या सोबतच आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. उत्तर भारतातील प्रत्येक भाजीमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. अनेक लोक हे जिरे पाण्यात उकळून ते गाळूनही वापरतात. कारण जिऱ्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. जीर्‍याचे पाणी आपल्या पचनक्रियेसाठी खूप फायदेशीर असते. आज आपण जिऱ्याच्या पाण्याने आपले शरीराला नक्की कोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे | Cumin Water

  • जिऱ्याच्या पाण्यात थायमॉल नावाचे रसायन आढळते, जे पचनशक्ती वाढवते आणि ॲसिडीटी, ब्लोटिंग आणि गॅसच्या समस्यांपासून आराम देते.
  • पोटदुखीच्या वेळी वेदनाशामक म्हणून याचा वापर केला जातो.
  • जिरे पाणी लोह आणि आहारातील फायबरचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. रोगप्रतिकारक शक्तीचे सामान्य कार्य राखण्यासाठी जिरे पाण्याचे खूप महत्त्व आहे. हे रोगांशी लढण्याची क्षमता वाढवते आणि पुन्हा पुन्हा आजारी पडणे टाळते.
  • मधुमेहाच्या रुग्णांसाठीही जिरे पाणी खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
  • जिऱ्याच्या पाण्यात असे अनेक पोषक घटक आढळतात, जे केस मजबूत करतात आणि केसांच्या मुळांना पोषण देतात. हे केस गळणे देखील प्रतिबंधित करते आणि केसांचे पातळ होणे कमी करते.
  • जिऱ्याच्या पाण्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि ती ताजीतवानी वाटते. यामध्ये असलेले पोटॅशियम, सेलेनियम, कॉपर आणि मँगनीज त्वचेचे पोषण करतात आणि चमक आणतात.
  • जिऱ्याच्या पाण्यात लिंबू मिसळून ते जीईआरडी (ॲसिड रिफ्लक्स) साठी उत्कृष्ट औषध म्हणून काम करते. हे चरबी जाळते, ज्यामुळे वजन कमी होते आणि शरीर डिटॉक्सिफाय होते.

Seeds for Weight Loss | वजन कमी करण्यासाठी आहारात करा या बियांचा समावेश, महिन्याभरातच दिसेल परिणाम

Seeds for Weight Loss

Seeds for Weight Loss | आजकाल लोकांना लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे जास्त वजन असणे म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण देणे होय. त्यासाठी आपले जीवन निरोगी असणे आणि वजन नियंत्रण असणे खूप गरजेचे आहे. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब देखील करतात. ज्यामध्ये ते व्यायाम करतात. त्याचप्रमाणेआहार देखील बदलतात. परंतु अशा काही बिया आहे ज्याची जर तुम्ही सेवन केले तर तुमचे वजन झपाट्याने कमी होईल. यामध्ये फायबर, प्रथिने, खनिज आणि फॅटी ऍसिड सारखे अनेक पोषक तत्वे असतात. तुम्ही तरी रोज या बियांचा (Seeds for Weight Loss) तुमच्या आहारात समावेश करू शकता. आणि तुमचे वजन कमी होण्यास देखील मदत होईल.

सब्जा सीड्स | Seeds for Weight Loss

सब्जाच्या बिया वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील चरबी कमी होते. तसेच, त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप कमी आहे, जे वजन कमी करण्यात खूप मदत करते. याव्यतिरिक्त, भाज्या ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, ओमेगा -6 फॅटी ऍसिडस्, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोहाने समृद्ध असतात. त्यामुळे हे खाल्ल्याने वजन कमी होते पण शरीरात अशक्तपणा येत नाही.

चिया सीड्स

वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये तुम्ही चिया सीड्सचे नाव खूप ऐकले असेल. कारण त्यात भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे स्नायू तयार होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. म्हणून, वजन कमी करण्यासाठी आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी चिया बियाणे हा एक चांगला पर्याय आहे.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया स्नायूंच्या वाढीसाठी देखील उपयुक्त आहेत, ज्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. हे त्यात असलेल्या झिंकमुळे होते. याशिवाय यामध्ये फायबर देखील असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. हे तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर आहेत.

अंबाडी बिया | Seeds for Weight Loss

वजन कमी करण्यासाठी अंबाडीच्या बिया खूप फायदेशीर मानल्या जातात. यामध्ये फायबर, प्रथिने आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड आढळतात. फायबरमुळे वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होते आणि प्रोटीनमुळे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे अंबाडीच्या बिया वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतात.