हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND Vs SA World Cup Final) या २ संघात होणार आहे. रात्री ८ वाजता बार्बाडोस येथे ही फायनल मॅच खेळवण्यात येईल. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यंदातरी वर्ल्डकप जिंकावा अशी इच्छा क्रिकेट प्रेमींची आहे. भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडू दमदार फॉर्मात असले तरी विराट कोहलीच्या बॅटमधून अजूनही धावा निघाल्या नाहीत हि टीम इंडिया साठी चिंतेची बाब आहे. मात्र आजच्या अंतिम सामन्यात विराट शतक मारेल आणि भारतच यंदाचा T20 विश्वचषक जिंकेल अशी मोठी भविष्यवाणी इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरने केली आहे.
मॉन्टी पानेसरने एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हंटल कि, विराट कोहली (Virat Kohli) आज दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात शतक मारेल. तसेच भारतीय संघ T20 विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकेल असाही विश्वासही त्याने व्यक्त केला. मॉन्टी पानेसरची भविष्यवाणी खरी ठरली तर याच्यापेक्षा मोठा आनंद भारतीय क्रिकेट चाहत्यांना नसेल. विराट कोहली सध्या खूपच खराब फॉर्म मध्ये असला तरी आजच्या सामन्यात त्याने तुफानी खेळी करावी अशी इच्छा टीम इंडियाच्या पाठिराख्यांची असेल.
T20 विश्वचषक 2024 मध्ये कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने आतापर्यंत सहा डावांत 11 च्या मामुली सरासरीने केवळ 66 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही केवळ 100 राहिला आहे. विराट यंदा रोहित सोबत सलामीला येत आहे. मात्र आयपीएल मध्ये त्याने ज्याप्रमाणे आरसीबीला दमदार सलामी दिली त्याच प्रकारचा खेळ खेळण्यास त्याला पूर्णपणे अपयश आलं आहे. आजच्या अंतिम सामन्यात तरी कोहलीची बॅट तळपेल आणि भारताचा विजय होईल अशी इच्छा अपेक्षा त्याच्या चाहत्यांची असेल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2009 चा अपवाद वगळला तर दौंडमध्ये फक्त आणि फक्त राहुल कुल हाच फॅक्टर निर्णायक ठरला… पक्ष बदलले.. नाईलाजाने भूमिका बदलाव्या लागल्या.. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले… पण द़ौंडवरची आपली पकड राहुल कुल यांनी किंचीतही सैल होऊ दिली नाही… होय मी बोलतोय राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात यांच्यातील राजकीय वैराबद्धल… मी बोलतोय दौंड विधानसभा मतदारससंघातील राजकीय संघर्षाबद्धल… येणाऱ्या विधानसभेला राहुल कुल आणि रमेश थोरात एकमेकांच्या आमने – सामने असणारयत, हे तर फिक्स आहे. सलग दोन टर्म आमदार असणाऱ्या राहुल कुल यांना कोंडीत पकडण्याचा थोरातांनी अनेकदा प्रयत्न केले… पण अखेर सरशी झाली ती कुल यांचीच… त्यामुळे येणाऱ्या आमदारकीला दौंडमध्ये नेमकं कोण जिंकतंय? दौंडच्या जनतेच्या मनातील आमदार कोण होतोय? त्याचाच घेतलेला हा आढावा…
कांचन कुल काही बाहेरच्या नाहीत, त्या आपल्या घरच्याच आहेत… मी राहुलला आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. राहुलला घड्याळमध्ये यायला लावा, उद्या मंत्री करतो. लोकसभेला सुनेत्राताईंचा प्रचार करण्यासाठी एकाच स्टेजवरुन राहुल कुल यांना अजितदादांनी दिलेला हा शब्द. हा फक्त शब्द नव्हता पण ही सुरुवात होती दौंडच्या राजकारणातील नव्या सुरुवातीची… राष्ट्रवादी अजित पवार आणि राहुल कुल यांच्यातील राजकीय विस्तव या लोकसभेच्या निम्मिताने विझला.. राहुल कुल यांनीही सुनेत्राताईंचं अगदी प्रामाणिकपणे काम केलं… दौंडमधून कुल अजितदादांना लीड देऊ शकले नाहीत हा भाग वेगळा पण कुल अजितदादांच्या जवळच्या गोटात जाऊन बसलेत… अर्थात अजितदादा गटात मोठ्या विश्नासाने आलेल्या रमेश थोरात यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे… कारण विद्यमान आमदार असणाऱ्या राहुल कुल यांचं तालुक्यातला कनेक्ट चांगलाच वाढलाय.. त्यात भाजपनंही कुल यांना वारंवार ताकद देत कुल यांच्या पॉलिटीकल फेसला तालुक्यात बेस मिळवून दिलाय… त्यामुळे ज्याचा आमदार त्याला तिकीट असाच फॉर्मुला ठरला तर राहुल कुल हेच महायुतीचे आमदारकीचे उमेदवार असतील, हे कन्फर्म आहे.. त्यामुळे दादांचा शिलेदार आणि कुल यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या माजी आमदार रमेश थोरात यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याशिवाय सध्यातरी दुसरा पर्याय राहीलेला नाहीये…
खरंतर राहुल कुल यांना राजकीय वारसा मिळाला तो त्यांचे वडील सुभाष कुल यांच्याकडून.. १९९० साली ते पहिल्यांदा दौंडमध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आले… यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहीलं नाही…यानंतर दौंडवर कुल कुटूंबाचा आमदारकीवर एकहाती दबदबा राहीला. सुभाष कुल त्यांच्या पत्नी रंजना कुल आणि पुढे मुलगा राहुल कुल हे निवडणुका लढत गेले.., जिंकत गेले.. अपवाद फक्त २००९ चा… २००९ ला राहुल कुल यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुक लढवली पण अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांनी त्यांचा दारुण पराभव केला. कुल कुटूंबातला हा पहिलाच राजकीय पराभव.. यानंतर शरद पवारांनी विजयी उमेदवार रमेश थोरात यांना पक्षात घेतलं आणि मग सुरु झाला थोरात विरुद्ध कुल हा न संपणारा राजकीय संघर्ष… राहुल कुल हे यानंतर पवार घराण्यापासून फटकून राहीले.. २००९ च्या पराभवाचा वचपा त्यांनी २०१४ च्या विधानसभेला काढलाच… थोरातांचा पराभव करत ते रासपच्या तिकीटावर पराभूत झाले… पुढे २०१९ ला तर भाजपच्या तिकीटावर त्यांनी सलग दुसऱ्यांदा थोरातांना मात दिली पण हा त्यांचा निसटता पराभव राहीला.. थोरात अवघ्या ६७३ मतांनी पराभूत झाले… राहुल कुल २०१९ ला काठावर पास झाले असले तरी त्यांनी यातून धडा शिकत तालुक्यात बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली…
पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत पक्ष सत्तेत असल्यानं कुल यांनी मतदारसंघात विकासकामांचा सपाटा चालवला… पण त्यांना अडचणीत आणलं ते थोरात यांनीच… भीमा सहकारी साखर कारखान्यावर आर्थिक विस्कळीतपणा आणि 500 कोटींच्या मनी लाँडरिंगच्या आरोपांनी त्यांना चांगलच जाम केलं.. हाच मुद्दा पकडत रमेश थोरात यांनी तालुक्यात कुल यांची कोंडी केली.. गंभीर आरोप केले… कुल यांच्या विरोधात वातावरण बनवलं… पण अजितदादाच महायुतीत आल्यानं आता त्याच कुल यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करायची वेळ आली… हे कमी होतं की काय म्हणून अजितदादांनी थोरातांपेक्षा राहुल कुल यांच्या बाजूने लोकसभे्च्या निवडणुकीत साॅफ्ट कॉर्नर दाखवल्यानं थोरातांसाठी सध्या इकडे जाऊ की तिकडे जाऊ अशी परिस्थिती निर्माण झालीय…
करंट स्टेटसमध्ये पाहायला गेलं तर दोन्ही नेत्यांकडे निष्ठावन कार्यकर्त्यांची मोेठी फळी आहे… यापूर्वीच्या ग्रामपंचायतीपासून ते खासदारकीच्या निवडणुकीला कुल – थोरात गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.. त्यांनी अनेक मानसिक आणि आर्थिक ताण सहन केले.. पण यात सर्वात जास्त कुणाचं नुकसान झालं असेल तर ते थोरातांच्या कार्यकर्त्यांचं… कारण तालुक्यात सर्वाधिक काळ सत्ता ही कुल घराण्याकडे राहिली… आमदार कुल ज्यापक्षात जातात त्या पक्षात त्यांचा कार्यकर्ता एकदिलाने जातात.. कुलही कार्यकर्त्यांना पाठबळ देत राहतात.. पण दुसरीकडे थोरात गटाला तालुक्यात सुरुंग लागला आहे.. थोरातांच्या कार्यकर्त्यांनी कुल गटात उड्या मारल्या आहेत.. त्यात थोरातांनी केलेल्या अनेक राजकीय तडजोडीमुळे ते बॅकफुटला फेकले गेले आहेत… त्यात महायुतीत भाजपने दिलेल्या पाठबळामुळे यंदा राहुल कुल यांच्यासाठी आमदारकी सोपी राहील, असं चित्र आहे.. तर दुसरीकडे दोन्ही टर्मला कडवं आव्हान देणाऱ्या अजितदादांच्या थोरातांसाठी मग अपक्ष निवडणुक लढवण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही… आता उरतो प्रश्न तो महा विकास आघाडीचा.. तर शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या नावाची उमेदवारीसाठी बरीच चर्चा आहे… आता यात थोरातांनी तुतारीची वाट धरली तर राजकारण फिरु शकतं.. पण हे जमून येईल, हे सध्यातरी अवघड दिसतंय… त्यामुळे दोन वर्ष आव्हान देऊनही यंदाही थोरातांची आमदारकीची वाट बिकटच दिसतेय.. तर दुसरीकडे कुल यांच्यासाठी सध्यातरी राजकारण प्लसमध्ये दिसतंय..
HDFC Bank | HDFC बँक ही देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा देत असते. त्याचप्रमाणे या सुविधांमध्ये वेळोवेळी बदल देखील करत असते. अशातच स्वतः एचडीएफसी बँकेने त्यांचे क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहे. बँकेने बदललेले हे नियम 1 ऑगस्ट 2024 पासून लागू होणार आहे. क्रेडिट कार्ड चार्ज करण्याच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केलेली आहे. आता या एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या (HDFC Bank ) नियमांमध्ये काय बदल होणार आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
भाडे व्यवहार | HDFC Bank
हे भाडे व्यवहार भरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या व्यवहाराच्या रकमेवर 1 टक्के शुल्क आकारले जाईल. प्रति व्यवहारांवर त्यांना 3 हजार रुपयांपर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
इंधन व्यवहार
इंधन व्यवहारावर 15 हजारापेक्षा कमी व्यवहारांवर कोणतेही जास्त शुल्क आकारले जाणार नाही. परंतु 15000 वरील जे व्यवहार असतील, त्यांच्या संपूर्ण रकमेवर 1 टक्का शुल्क आकारले जाणार आहे.
उपयुक्तता व्यवहार
उपयुक्तता व्यापाराच्या 50 हजारापेक्षा कमी व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. परंतु 50000 वरील व्यवहारांवर 1 टक्का शुल्क आकारले जाईल
शैक्षणिक व्यवहार
कॉलेज, शाळाच्या वेबसाईटद्वारे किंवा त्यांच्या पीओसी मशीनद्वारे थेट पेमेंट शुल्कमुक्त असणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या ॲप्स द्वारे केलेल्या व्यवहारांवर 1 टक्का शुल्क आकारले जाणार आहे.
ईएमआय प्रक्रिया शुल्क | HDFC Bank
कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाइन स्टोअरमध्ये ईएमआय पर्यायच लाभ घेतल्यावर 299 पर्यंत ईएमआय प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहेत.
इतर बदल
याशिवाय, HDFC बँक त्यांच्या Tata Neu Infinity आणि Tata Neu Plus क्रेडिट कार्डमध्ये 1 ऑगस्ट 2024 पासून बदल लागू करेल. 1 ऑगस्ट 2024 पासून, Tata New Infinity HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना Tata New UPI ID वापरून केलेल्या पात्र UPI व्यवहारांवर 1.5% NewCoins मिळतील.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. बार्बाडोस येथे रात्री ८ वाजता फायनल मॅच सुरु होईल. आत्तापर्यंत अनेकदा भारताला वर्ल्डकपने चकवा दिला आहे. मागच्या वर्षी २०२३ मध्येही ५० ओव्हरच्या विश्वचषकात भारताला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं होते. त्यामुळे आता तरी वर्ल्डकपचा दुष्काळ संपवावा आणि कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकप ट्रॉफी उचलावी अशी इच्छा प्रत्येक भारतीयांची असेल. याच दरम्यान, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने रोहित शर्माबाबत (Rohit Sharma) केलेलं विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. ७ महिन्यांत रोहितच्या नेतृत्वाखाली दोन फायनल हरल्यास तो कदाचित बार्बाडोस समुद्रात उडी घेईल असं गांगुली गमतीने म्हणाला.
सौरव गांगुली शुक्रवारी कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला, ‘विश्वचषक जिंकण्यासाठी तुम्हाला येथे 8-9 सामने जिंकावे लागतील. विश्वचषक जिंकल्याने अधिक सन्मान मिळतो. मला वाटत नाही की रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वाखाली 6-7 महिन्यांत दुसऱ्या विश्वचषकाच्या अंतिम पराभवाचा सामना करू शकेल. सात महिन्यांत त्याच्या नेतृत्वाखाली दोन फायनल हरल्यास तो कदाचित बार्बाडोस महासागरात उडी घेईल, असं सौरव गांगुली गंमतीत म्हणाला. रोहितने आत्तापर्यंत पुढे येऊन संघाचे उत्कृष्ट नेतृत्व केलं आहे. त्याने फलंदाजी सुद्धा चांगली केली आहे, फायनल मध्येही त्याचा हा फॉर्म कायम राहील असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला.
यावेळी गांगुलीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाबाबत सुद्धा भाष्य केलं. पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणे ही दक्षिण आफ्रिकेसाठी मोठी संधी आहे. ‘दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी हा मोठा क्षण आहे. असं गांगुली म्हणाला. विचार करा कि, एक असा संघ जो 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत आणि विश्वचषक फायनल खेळण्यासाठी त्याला 32 वर्षे लागली, त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे असं सौरव गांगुली म्हणाला.
Vegetable Price | भारतीय नागरिकांच्या जेवनामध्ये पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. यामध्ये चांगले पोषणतत्व देखील असतात. परंतु आजकाल भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांवर होत आहे. गेल्या एक ते दोन आठवड्यात भाज्यांचे भाव (Vegetable Price) हे दुपटीने वाढलेले आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना आता भाजी खाणे देखील परवडत नाही.
पिकाचे नुकसान | Vegetable Price
यावर्षी तापमान वाढ खूप जास्त होती. आणि पावसालाही मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारामध्ये नीट पोहोचत नसल्याने त्याची आवक देखील कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे अत्यंत कडक उन्हानंतर आता पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे भाजीपाला लवकर खराब होत आहे. सध्या कांदे, बटाटे, टोमॅटो यांसारख्या भाज्यांच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.
मान्सूनच्या पावसात घट
उन्हाळ्यात भाज्यांचा तुटवडा भासणे ही बाब सर्रास असली तरी यंदा टंचाई तीव्र झाली आहे. याचे कारण म्हणजे संपूर्ण देशात सामान्य तापमान ४ ते ९ अंश सेल्सिअस राहिले आहे. एवढेच नाही तर या वेळी मान्सूनचा पाऊसही उशिराने येत असल्याने पिके वाढवण्यात अडचणी येत आहेत. या हंगामातील पावसात १८ टक्के तूट आहे.
भाज्यांचे दर कमी होऊ शकतात
मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, उष्मा आणि कमी पाऊस यामुळे भाजीपाला आणि फळांच्या पिकांवर परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यास ही समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे भाज्यांचे दरही कमी होऊ शकतात
दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाज्यांचे भाव वाढले | Vegetable Price
टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ दक्षिणेकडील राज्यांमध्ये झाली आहे. कडक उन्हामुळे आणि मान्सूनचे उशिरा आगमन यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले असून, कडक उन्हामुळे भाजीपाला खराब होऊ लागला असून, त्यामुळे त्यांच्या भावात वाढ होत असल्याने हा प्रकार घडत आहे. मात्र येत्या आठवडाभरात चांगला पाऊस झाल्यास भाजीपाल्याचे दर कमी होण्याची आशा आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यापासून पुण्यातील वातावरण आणि एकूण सामाजिक परिस्थिती चांगलीच बिघडली आहे. ड्रग रॅकेट, पोर्शे कार अपघात, आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार या एकूण सर्व घटनानी शिक्षणाचे माहेरघर समजणारे पुणे चांगलेच हादरलं आहे. त्यात आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. एका 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवल्याने (Pune Tanker Accident) खळबळ उडाली आहे. सकाळी साडे सहाच्या सुमारास हि घटना समोर आली. त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? पालकांचे आपल्या मुलांवर लक्ष्य नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सकाळी साडे सहाच्या सुमारास वानवडी येथे भरधाव टँकरनं सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. आश्चर्याची बाब म्हणजे अवघ्या 14 वर्षांचा मुलगा टँकर चालवीत होता. अतशिय अवजड टँकर अवघ्या 15वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून अल्पवयीन चालकाला पकडून ठेवलं होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी हे दुचाकीवरून जात होते. तर त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या काही मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले. या अपघातानंतर टँकर चालक पळून जावू नये म्हणून नागरिकांनी अल्पवयीन मुलाला पकडून ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असूनअधिक तपास सुरू आहे. पोलीस टँकरचा मूळ मालक, महिंद्रा बोराटे याला देखील चौकशीसाठी बोलावणार आहेत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने काल 28 जून रोजी विधानभवनात आपला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकार कडून अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून जनतेला खुश केलय. येत्या ३-४ महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘मी काही नवखा नाही’, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारवर निशाणा साधलाय. खिशात ७० रुपये असताना १०० रुपये खर्च कसे करणार? असा सवाल पवारांनी राज्य सरकारला केला आहे.
शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी शिंदे सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या मोठमोठ्या घोषनांबद्दल विचारलं असता, विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. ज्या गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टी अर्थसंकल्पात आहेत, असे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? असा खोचक सवालही शरद पवार यांनी केला. खरं तर हा हा अर्थसंकल्प फुटला आहे. काल अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत अर्थसंकल्पात काय काय येणार आहे, ते छापून आलं होते असं पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 पैकी 31 जागा जिंकल्या. त्यामुळे राज्य सरकारने आमचा धसका घेतला आहे. मोदींनी राज्यात 18 सभा घेतल्या. पण सभा घेतलेल्या 14 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. मोदीच्या कामावर जनता खुश नाही, लोकसभेला जसा निकाल लागला त्याचप्रमाणे विधानसभेचं चित्र असेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
MahaPareshan Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी अंतर्गत एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 2623 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. (MahaPareshan Bharti 2024) हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करावे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | MahaPareshan Bharti 2024
पदाचे नाव – विद्युत सहाय्यक
पदसंख्या – 2623 जागा
वयोमर्यादा – 18 – 38 वर्ष
अर्जशुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवार- 500रु.
BC, EWS, अनाथ उमेदवार- 250 रु.
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024
वेतन – 15 हजार ते 17 हजार
अर्ज कसा करावा ? | MahaPareshan Bharti 2024
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करताना सगळे कागदपत्र अपलोड करणे गरजेचे आहे.
31 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासारख्या अगोदरच अर्ज करा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर अपघाताचे (Samruddhi Mahamarg Accident) सत्र सुरूच आहे. काल रात्री सुद्धा समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले. जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक ३५१ वर हा भीषण अपघात झाला. नागपूरकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आर्टिगा कारला राँग साईडने येणाऱ्या लिफ्ट डिझायर कारने धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. जखमींना तातडीने प्रथम जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढे छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले.
कसा झाला अपघात ? Samruddhi Mahamarg Accident
याबाबत अधिक माहिती अशी कि, ईरटीका कार (क्र. एमएच. ४७. बीपी .५४७८) हि नागपूरहून मुंबईला निघाली होती. तर स्विफ्ट डिझायर कार तिच्या विरुद्ध दिशेला जात होती. नागपूरहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आर्टिगाला राँग साईडने येणाऱ्या सिफ्टची धडक बसली. हि धडक इतकी भीषण होती कि, दोन्ही गाड्या महामार्गावरचे बॅरिकेड मोडून थेट खाली पडली. दोन्ही कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या भीषण (Samruddhi Mahamarg Accident) अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजते.
पघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या मदतीने बचाव कार्य करत दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.या अपघातातील सर्व मृत प्रवाशांचे मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय डॉ. उमेश जाधव यांनी दिली.
Farmers | आजकाल शेती करण्यासाठी नवनवीन उपकरणे, तंत्रज्ञान जरी उपलब्ध असले, तरी सर्वसाधारण शेतकरी हा मात्र शेती करण्यासाठी तितका सक्षम नाही. त्याचप्रमाणे शेती जरी नीट केली, तरी निसर्गाचे चक्र असे फिरतात की, त्याच्या संपूर्ण धान्याची नासाडी होते. यामुळे त्यांना आर्थिक फायदा होत नाही. आणि घेतलेले कर्ज त्याचप्रमाणे इतर सगळ्या गोष्टींचा विचार करून अनेक शेतकरी आजकाल आत्महत्या करायला लागलेले आहेत.
राज्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmers) नवनवीन योजना आणल्या. परंतु तरीदेखील शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणे सरकारला काही जमलेले नाही. 1986 साली यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्येची पहिली नोंद झाली. यावेळी साहेबराव करपे पाटील यांनी त्यांच्या पत्नीसह आत्महत्या केल्याची नोंद आहे. आणि तेव्हापासून या आत्महत्या चक्राला सुरुवात झालेली आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याच्या संकेत वाढ होत चाललेले आहेत.
चार महिन्यातील आकडेवारी चिंताजनक | Farmers
2024 मध्ये केवळ चार महिन्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी ही खूप चिंताजनक आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात राज्यात जवळपास 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्याचप्रमाणे 235 आत्महत्या ह्या जानेवारीत झालेले आहे. याचप्रमाणे फेब्रुवारी 208 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. मार्चमध्ये 215 तर एप्रिलमध्ये 180 शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्याची नोंद समोर आलेली आहे. चार महिन्यांचा विचार केला तर दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलेले आहे.
अमरावती विभागात सर्वाधिक आत्महत्या
आतापर्यंत अमरावती विभागात सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. अमरावती विभागात 383 आत्महत्या झालेल्या आहे. त्याचप्रमाणे संभाजीनगर विभागात 264 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, तर नागपूर विभागात 84 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे.
आर्थिक मदतीसाठी प्रतिक्षा
सरकारने आत्तापर्यंत 104 शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे 62 शेतकऱ्यांनी आत्महत्याची प्रकरणी फेटाळण्यात आलेली आहे. तसेच 605 शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू झालेली आहे.