Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 640

DCGI Substandard Medicines | DGCI च्या चाचणीत 50 औषधे निकृष्ट दर्जाची; यादीत प्रसिद्ध मेहेंदी कंपनीचाही समावेश

DCGI Substandard Medicines

DCGI Substandard Medicines | आजारी पडल्यावर अनेक लोक हे डॉक्टरकडे न जाता घरातील औषधे खातात किंवा मेडिकलमधून औषधे आणतात. या औषधाने आपण पूर्णपणे बरे होणार आहोत, असा डोळे झाकून विश्वास ठेवून लोक ती औषधे घेतात. परंतु हीच औषधे आता जीवघेणी ठरू शकतात. कारण आता ड्रॅग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI Substandard Medicines) औषधांच्या तपासणीमध्ये 50 औषधे ही निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले आहे.

ही निकृष्ट दर्जाची असलेली 50 औषधे देशातील वेगवेगळ्या ठिकाणी विक्री होत आहे. आणि लोक देखील ही औषधे विकत घेत आहेत. तसेच त्याचे सेवन देखील करत आहेत. तपासणीमध्ये निकृष्ट दर्जाची जी औषधे सापडली आहे. त्यामध्ये पॅरासिटॅमॉल 500 बीपी पॅरासिटॅमॉल 500, बीपीचं टेल्मीसारटन, कफटीन कफ सीरप, क्लोनाजेपेम, डिक्लोफेनेक, मल्टिविटॅमिन आणि कॅल्शियमच्या गोळ्यांच्या समावेश आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार डीजीसीआयने (DCGI Substandard Medicines) त्यांच्या रिसर्चमध्ये केसांना लावण्यात येणारी हिना मेहंदी देखील घातक असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे कॉस्मेटिक कॅटेगिरीमध्ये हिना मेहंदीची गुणवत्ता कमी झाली आहे. अशी देखील या तपासामध्ये आढळून आलेले आहेत

भारतामध्ये मुलांना खोकला झाल्यावर कफ सिरप मोठ्या प्रमाणात दिले जाते. परंतु या सिरपमुळे काही मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील प्रदेशात घडलेल्या आहे. त्यानंतर या औषधाची सॅम्पल घेण्यात आले. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून या औषधाचे सॅम्पल घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर हे औषध निकृष्ट दर्जाचे असल्याचे देखील सिद्ध झालेले आहे.

कॉन्सिटपेशनसाठीच लेक्टोलूज सॉल्यूशन, ब्लड प्रेशरसाठीच टेलमिसाटन आणि अम्लोडिपाईन, ऑटो इम्यून डिसीससाठी डेक्सामेथासोन, सोडियम फॉस्फेट, गंभीर इन्फेक्शनसाठी वापरण्यात येणारं क्लोनाजेपाम टॅब्लेट या औषधांचा देखील निकृष्ट दर्जाच्या औषधांमध्ये समावेश केलेला आहे. या औषधांच्या सेवनाने आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

पचनाच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल, तर आहारात करा ‘या’ 5 पदार्थांचा समावेश

Spices

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण दिवसभरात काय खातो? काय पितो? या सगळ्या गोष्टीचा आपल्यापासून जास्त परिणाम होतो. पचनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या आली, तर पोट फुगणे, पोटामध्ये गॅस तयार होणे, त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता यांसारख्या परिणामांना सामोरे जावे लागते. आणि पोट साफ न झाल्यामुळे दिवसभर चिडचिड होते. तसेच काही खावेसे देखील वाटत नाही. परंतु तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागतो.

आपण काय खातो या गोष्टीकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर योग्य प्रमाणात आणि चांगले जेवण केले, तर तुम्हाला पचनाच्या संबंधित काही समस्या येणार नाही. परंतु तुम्हाला जर पचनाशी संबंधित काहीही समस्या असतील, तर त्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून त्या समस्या दूर करू शकतात. आता याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

बडीशेप

बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे शरीरातील घाण काढून टाकण्यासोबतच शरीराचे पोषण करते. तुम्ही भाजी, डाळी, रोटी-पराठा मिक्स करून खाऊ शकता किंवा जेवणानंतर खाऊ शकता, दोन्ही पद्धती फायदेशीर आहेत.

हिंग

जेवणात हिंग टाकल्याने जेवणाची चव तर वाढतेच पण त्याचे फायदेही वाढतात. गॅसची समस्या दूर करण्यासाठी हिंगातील कार्मिनेटिव्ह तत्व खूप प्रभावी आहे. याव्यतिरिक्त, ते पाचक एंजाइम सक्रिय करते.

सेलेरी

सेलरीमध्ये फायबर देखील असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. त्यात थायमॉल देखील असते, जे पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर करते.

हळद

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असते, जे आतड्यांसंबंधी जळजळ दूर करण्यासाठी प्रभावी आहे, ज्यामुळे पचन सुधारते.

जिरे

पचनाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी फक्त थोडेसे जिरे पुरेसे आहे. यामुळे गॅस, ब्लोटिंग, ॲसिडिटी अशा अनेक समस्यांपासून आराम मिळतो

SSC Recruitment 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 8326 जागांची भरती सुरु; येथे करा अर्ज

SSC Recruitment 2024

SSC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टाफ (SSC Recruitment 2024) या पदासाठी अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे या भरती अंतर्गत एकूण 8326 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांना या तारखे अगोदरच अर्ज करावे लागणार आहेत आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

निवड कशी होणार | SSC Recruitment 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मल्टिटास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांच्या परीक्षेचे आयोजन केले आहे. या विद्यार्थ्याची सरकारच्या वेगवेगळ्या विभागात नियुक्ती केली जाते. यामध्ये लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी देखील असते. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होते. आणि मग उमेदवाराची निवड केली जाते.

पगार किती मिळणार?

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर उमेदवाराला दर महिन्याला 18000 ते 22 हजार रुपये दरम्यान पगार मिळतो.

शैक्षणिक पात्रता काय? | SSC Recruitment 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 दरम्यान असणे गरजेचे आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

YouTube Shorts Features | आता इंटरनेटशिवाय घ्या यूट्यूब शॉर्ट्सचा आनंद, कंपनीने आणले खास फीचर

YouTube Shorts Features

YouTube Shorts Features | Youtube हा एक खूप मोठा आणि सगळ्यांचा आवडता प्लॅटफॉर्म आहे. अनेक युजर्स हे youtube चा वापर मोठ्या प्रमाणात करतात. आता युट्युब त्यांच्या प्रीमियर यूजरसाठी एक खास वैशिष्ट्य आणत आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्हाला इंटरनेट शिवाय ऑफलाइन देखील youtube शॉर्ट्सचा आनंद घेता येणार आहे.

Youtube चे अनेक वैशिष्ट्य (YouTube Shorts Features) सध्या येत आहे. आणि त्यावर ते चाचणी देखील करत आहे. यावर आता आपोआप शॉर्ट्स डाउनलोड देखील करता येणार आहे. त्यामुळे youtube युजर्सला कोणत्याही अडचणीशिवाय youtube व्हिडिओचा आनंद घेता येणार आहे.

अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली नसते. त्यामुळे हे शॉर्ट स्मार्टफोनवर डाऊनलोड होत नाहीत. आणि युजरला त्याचा चांगला अनुभव देखील घेता येत नाही. 5 जुलैपर्यंत निवडक प्रीमियर खात्यांसह याची चाचणी केली जाणार आहे.

जंप अहेड वैशिष्ट्य कसे वापरावे? | YouTube Shorts Features

जंप अहेड वैशिष्ट्य वापरण्यास अतिशय सोपे आहे, तुम्हाला फक्त व्हिडिओवर डबल-टॅप करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला ‘जंप अहेड’ बटण दिसेल जे तुम्हाला जिथे जायचे आहे तेथे घेऊन जाईल. या वैशिष्ट्यासाठी प्लॅटफॉर्म एआय आणि व्ह्यूअरशिप डेटा वापरत आहे. व्हिडिओच्या उजव्या बाजूला ‘जंप अहेड’ बटण पाहण्यासाठी वापरकर्ते व्हिडिओच्या उजव्या बाजूला डबल-टॅप करू शकतात.

पिक्चर-इन-पिक्चर वैशिष्ट्य येत आहे

याव्यतिरिक्त, कंपनीने सांगितले की ते शॉर्ट्समध्ये पिक्चर-इन-पिक्चर वैशिष्ट्य आणत आहे. प्रीमियम अँड्रॉइड वापरकर्त्यांना मल्टीटास्किंग करताना व्हिडिओ पाहण्यासाठी हे खूप मदत करू शकते. दरम्यान, YouTube ने सांगितले की ते Android वापरकर्त्यांसाठी AI असिस्टंटची देखील चाचणी करत आहे. जे तुम्हाला व्हिडिओशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे देईल. एवढेच नाही तर तुमचा प्लेबॅक अनुभव खराब न करता सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात.

Airtel Hikes Prices | सर्वसामान्यांना इंटरनेट वापरणे पडणार भारी! जिओनंतर एअरटेलनेही वाढवले ​दर

Airtel Hikes Prices

Airtel Hikes Prices | भारतामध्ये लाखो लोक रोज इंटरनेटचा वापर करतात. परंतु आता युजरसाठी हा इंटरनेट डेटा चांगलाच महाग झालेला आहे. देशातील रिलायन्स जिओनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यानंतर आता भारती एअरटेलने देखील त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनचे दर (Airtel Hikes Prices) वाढवलेले आहे. आता एअरटेलनेही त्यांच्या टेरिफ दरात वाढ केलेली आहे. एअरटेलचे हे नवीन दर देखील 3 जुलै 2024 पासून संपूर्ण भारतात लागू होणार आहे. आता जगभरात डेटा प्लॅन महाग होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता हा एक मोठा भुर्दंड बसणार आहे

बेसिक अमर्यादित प्लॅन्स | Airtel Hikes Prices

एंट्री-लेव्हल प्लॅन, ज्याची किंमत आधी 179 रुपये होती, त्याची किंमत आता 199 रुपये आहे, जी 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएससह 2GB डेटा देते.
6GB डेटासह 84 दिवसांचा प्लॅन 455 रुपयांवरून 509 रुपयांपर्यंत वाढला आहे. 24GB डेटा देणाऱ्या वार्षिक प्लॅनची किंमत 1799 रुपयांवरून 1999 रुपयांपर्यंत वाढली आहे.

दिवसाचा डेटा प्लॅन

28 दिवसांसाठी 2GB/दिवस प्लॅन 265 रुपयांवरून 299 रुपयांपर्यंत वाढला आहे.
लोकप्रिय 2GB/दिवस योजना 299 रुपयांवरून 349 रुपयांपर्यंत वाढली आहे
ज्या वापरकर्त्यांना अधिक डेटा हवा आहे त्यांच्यासाठी 2GB/दिवस प्लॅनची किंमत आता 359 रुपयांवरून 409 रुपयांपर्यंत वाढली आहे.
2GB/दिवस ऑफर करणारा डेली डेटा प्लान 399 रुपयांवरून 449 रुपयांपर्यंत वाढला आहे.
2GB/day 56-दिवसांच्या प्लॅनची किंमत आता 579 रुपये आहे, जी पूर्वी 479 रुपये होती.
56 दिवसांसाठी 2GB/दिवस प्लॅन 549 रुपयांवरून 649 रुपयांपर्यंत वाढला आहे.

डेटा ॲड-ऑन | Airtel Hikes Prices

एका दिवसासाठी 1GB ॲड-ऑनची किंमत आता 19 रुपयावरून 22 रुपये झाली आहे
2GB ॲड-ऑन 29 रुपयांवरून 33 रुपयांपर्यंत वाढले आहे.
4GB ॲड-ऑनची किंमत 65 रुपयांवरून 77 रुपयांपर्यंत वाढली आहे.

पोस्टपेड प्लॅनमध्ये काय बदल आहेत?

बेस प्लॅन: 40GB डेटा, रोलओव्हर फायदे, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS/दिवस ऑफर करणारा प्लॅन 399 रुपयांवरून 449 रुपयांपर्यंत वाढला आहे.
75GB डेटा असलेल्या प्लॅनची किंमत आता 499 रुपयांवरून 549 रुपयांपर्यंत वाढली आहे.
फॅमिली प्लॅन: दोन कनेक्शनसाठी आधी 599 रुपये किंमत असलेल्या प्लॅनची किंमत आता 699 रुपये आहे, जी रोलओव्हरसह 105GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS/दिवस ऑफर करते. त्याच वेळी, 190GB डेटासह चार कनेक्शनला समर्थन देणाऱ्या फॅमिली प्लॅनची किंमत 999 रुपयांवरून 1199 रुपयांपर्यंत वाढली आहे.

Mazagon Dock Bharti 2024 | माझगाव डॉकमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु; 8 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन आणि महत्त्वाच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती निघालेली आहे. ही भरती अप्रेंटिस (Mazagon Dock Bharti 2024) या पदांसाठी निघाली आहेत. या पदांच्या एकूण 512 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागेल. त्याचप्रमाणे 2 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Mazagon Dock Bharti 2024

  • पदाचे नाव –अप्रेंटिस
  • पदसंख्या – 512 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा –14 – 21 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुलै 2024
  • शैक्षणिक पात्रता – आठवी, दहावी त्याचप्रमाणे आयटीआय पास उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्ज शुल्क – 2,500 – 8,050/ दर महिना

अर्ज कसा करावा ? | Mazagon Dock Bharti 2024

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • यासाठी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • दोन जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी अमोल बाबर यांची बिनविरोध निवड; समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण

Amol Babar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे सुपुत्र अमोल बाबर यांची सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे (Mangesh Survase) यांच्या अध्यक्षतेखाली नवीन संचालकाची नियुक्तीसाठी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अमोल बाबर (Amol Babar) यांची सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अमोल बाबर यांच्या समर्थकांमध्ये जलोषाचे वातावरण आहे.

गेल्या जानेवारी महिन्यात अनिल बाबर यांचे निधन झाले होते. त्यांनी खानापूर तालुका विकास सोसायटी गटातून जिल्हा बँकेचे संचालक पदाची जबाबदारी निभावली होती. मधल्या काळात नवीन संचालकांच्या निवडीसाठी जिल्हा बँकेने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर गुरुवारी नवीन संचालकाची निवड झाली. प्राधिकरणने जिल्हा उपनिबंधक (सहकार) मंगेश सुरवसे यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राधिकृत केले.

महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली होती. यादरम्यान फक्त अनिल बाबर यांचे पुत्र अमोल अनिल बाबर यांचा एकच अर्ज दाखल झाला. यानंतरच अमोल बाबर यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी जाहीर केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

अमोल बाबर हे शिवसेनेचे युवा नेते असून त्यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत समाजकारण आणि राजकारणाची वाट धरली आहे. युवा नेता म्हणून त्यांच्याकडे मतदारसंघातील जनता बघत असते….आता थेट जिल्हा बँक संचालकपदी त्यांची निवड झाल्याने खानापूर आटपाडी मतदारसंघातील जनतेसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.

Travel : निसर्ग बहरलाय…! आवश्य भेट द्या सावंतावडीतल्या ‘या’ अप्रतिम ठिकाणांना

sawantwadi

Travel : महाराष्ट्राला निसर्गसंपन्नतेचा समृद्ध वारसा लाभला आहे. एकीकडे सह्याद्रीच्या सुंदर डोंगररांगा , दुसरीकडे कोकणचा समुद्रकिनारा… पावसाळ्यात या निसर्गाचं रुपडं अधिकच खुलून जातं. डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे , जमिनीवर आलेली दाट धुक्यांची चादर तुम्हाला अप्रतिम अनुभव देतील यात शंका नाही. पावसाळ्यातलं हे मनमोहक रूप तुम्हाला अनुभवायचं असेल तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सावंतवाडीतली काही ठिकाणे सांगणार आहोत जिथे तुम्हाला खरा निसर्ग अनुभवता येईल चला तर मग जाणून घेऊया…

मोती तलाव

सावंतवाडीतील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे मोती तलाव. हा तलाव म्हणजे पर्वतांच्या मध्यभागी वसलेला आहे. पावसाळ्यात इथले निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. पावसाळ्यात या तलावाचे सौंदर्य हे बघण्यासारखं असतं कारण हा तलाव पूर्ण ढगांनी अच्छादित होतो. या तलावाचा सभोवताली हिरवळ असल्यामुळे या पॉईंटला खरंतर रोमँटिक पॉईंट म्हणून सुद्धा संबोधले जाते.

आंबोली धबधबा (Travel)

महाराष्ट्र हा डोंगर रांगांनी आणि हिरवाईन नटलेला असल्यामुळे इथे पावसाळ्यात अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते. पावसाळ्यात डोंगरांमधून वाहणारे धबधब्यांचे पाणी तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल. आंबोली येथील धबधब्याबद्दल सांगायचं झाल्यास हा धबधबा समुद्रसपाटीपासून दोन हजार फुटांपेक्षा जास्त उंचावर असलेला धबधबा आहे. सावंतवाडीच्या आजूबाजूला असलेल्या प्रेक्षणीय ठिकाणांमध्ये हा धबधबा मानला जातो. हा धबधबा डोंगराच्या मधोमध आहे. पावसाळ्यात याचे सौंदर्य हे अद्भुत असते . येथे आणि आजूबाजूच्या भागात धबधबे असल्यामुळे तुम्ही छोट्याशा ट्रेकिंगचा (Travel) सुद्धा अनुभव घेऊ शकता. सावंतवाडी आणि आंबोली धबधबा हे अंतर केवळ 22 किलोमीटरचे आहे.

सावंतवाडी पॅलेस

सावंतवाडीच्या हिस्टॉरिकल प्लेसेस मध्ये भर घालणारे ठिकाण म्हणजे सावंतवाडी पॅलेस. 1755 ते 1803 दरम्यान हा अप्रतिम असा राजवाडा (Travel) बांधण्यात आला, डोंगराच्या माथ्यावर असलेला हा सावंतवाडी पॅलेस परदेशी पर्यटकांच्या सुद्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या महालाभोवती असलेली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. या वास्तूला सुद्धा भेट देण्यासाठी पावसाळा सीजन उत्तम आहे.

Viral Video : मार्केटमध्ये आलीये नवी हेअरस्टाईल; पाहताच तुम्हीही म्हणाल, ‘कुकु..डुकु!!’

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी काहीही करायची जणू प्रथा सुरु झाली आहे. कधी कुणी अतरंगी नाचताना दिसतं, तर कधी कुणी कधी कुणी डायलॉगबाजी करतं, तर कधी कुणी जुगाड करताना दिसतं. इतकाच काय तर सोशल मीडियावर भांडणांचे व्हिडीओ सुद्धा तुफान व्हायरल होतात. एकंदरच काय की, सोशल मीडियावर कधीही काहीही पहायला मिळू शकतं. हे एक असं माध्यम आहे जिथे कोणत्याही विषयांवर चर्चा होऊ शकते. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दिसणाऱ्या तरुणीने केलेली हेअरस्टाईल पाहून तुम्हाला हसू फुटेल.

मार्केटमध्ये नवी हेअर स्टाईल (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी मैदानात उभी आहे. ही मुलगी एका गाण्यावर रील रेकॉर्ड करतेय. मात्र ती जे गाणं म्हणतेय त्यापेक्षा जास्त तिची हेअरस्टाईल लक्ष वेधून घेते आहे. या मुलीने तिच्या केसांना कोंबडासारखा लूक देऊन केलेली ही हेअरस्टाईल पाहून कुणाच्याही तोंडून ‘कुकुडुकु’ येईल. लांबून या मुलीला पाहिलं तर कुणालाही वाटेल की, तिच्या डोक्यावर कोंबडा बसला आहे. पण हा कोंबडा बसला नाहीये तर तिच्या केसात साकारला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया X हँडलवर fewsecl8r नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सध्या मार्केटमध्ये आलेली हेअर स्टाइल. काय नाव देणार?’. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (Viral Video) या व्हिडीओवर अनेक युजर्सने विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलंय, ‘अरे… मुर्गा हेअर स्टाइल’. तर आणखीन एकाने लिहिलंय, ‘हिने केसात कोंबडा पाळलाय’. तसे अन्य एकाने या हेअर स्टाईलला ‘मुर्गा कट’ तर आणखी एकाने ‘कुक्कड स्टाइल’ असे नाव दिले आहे.

Pandharichi Wari 2024 : वारी म्हणजे आनंदसोहळा!! विठूनामात दंग झाले 82 वर्षीय आजोबा; उत्साह पाहून जाल भारावून

Pandharichi Wari 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pandharichi Wari 2024) आजचं पालखी प्रस्थान सोहळा पार पडला असून आता अनेक वारकरी विठूमाऊलीच्या भेटीची ईच्छा घेऊन मार्गस्थ झाले आहेत. अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. आजच संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली आणि विठ्ठलनामाचा गजर करीत कित्येक पाऊले पंढरपुराच्या दिशेकडे वळली. वारी ही केवळ परंपरा नसून ही एक भावना आहे. अभंग गात, फुगड्या खेळत, मुखी विठूमाऊलीचे नाव घेत अनेक वारकरी अनवाणी वारीत दंग झालेले असतात. वारीमध्ये सामील होण्यासाठी वयाचे बंधन नसते आणि याचा प्रत्यय प्रत्येकवेळी येत असतो. सोशल मीडियावर सध्या एका आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यांचे वय पाहता त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे.

वारीत दंग झाले ८२ वर्षीय आजोबा (Pandharichi Wari 2024)

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी निघाले आहेत. पुन्हा एकदा तो भावनिक क्षण अनुभवण्यासाठी सारे सज्ज झाले आहेत. वारीमध्ये वारकऱ्यांचा उत्साह अगदी पाहण्यासारखा असतो. इथे जात, धर्म, वर्ण यामध्ये भेद केला जात नाही. इथे केवळ एकच जात आणि एकच धर्म. तो म्हणजे, ‘भक्ती’. दरम्यान, याच वारीत विठूनामाच्या गजरात दंग झालेल्या एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आजोबांचे वय ८२ असून त्यांचा उत्साह कमालीचा आहे.



या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, हे आजोबा टाळ आणि मृदुंगाच्या तालावर नाचत, इतर वारकऱ्यांसोबत फुगड्या घालत आणि वारीतले वेगवेगळे खेळ खेळत आहेत. यावेळी त्यांची ऊर्जा आणि उत्साह त्यांची माऊलीप्रती भक्ती दर्शवत आहे. (Pandharichi Wari 2024)एखाद्या तरुण युवकासारखा उत्साह दाखवत हे आजोबा वारीमध्ये दंग झाले आहेत. जे पाहणे खरोखरच आनंददायी आहे. अशा या पंढरीच्या वारीत अगदी चिमुकल्यांपासून अशा वयाची ८० पार केलेल्या अनेक वारकऱ्यांची भेट होते.

हा प्रसंग अत्यंत भारावून टाकणारा असतो. जो तो माऊलीच्या गजरात दंग झालेला असतो. अनवाणी पायाने वारीत निघालेला वारकरी ऊन, पाऊस कशाचीही पर्वा न करता जीवाची तमा न बाळगता विठुरायाच्या ओढीने फक्त चालत असतो. वारी म्हणजे आनंद सोहळा आणि या आनंद सोहळ्याचा भाग होणे प्रत्येकाच्या नशिबी नसतं. (Pandharichi Wari 2024) सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या उर्जेला सलाम केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग व्हिडिओंपैकी एक ठरला आहे.