Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 643

Vande Bharat Express : सुसाSSS ट …! राज्यातील पहिली सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ सुरु होणार ‘या’ तारखेपासून

Vande Bharat Express : स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ भारतात अनेकांच्या पसंतीला उतरली आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास देणारी ट्रेन म्हणून ही ट्रेन लोकप्रीय आहे. वंदे भारताच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबरी आहे. लवकरच मुंबई ते अहमदाबाद ही पहिली सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस 160 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे. तसे पाहायला गेले तर राज्यातील इतर ट्रॅकवर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे स्पीड हे जवळपास 130 किलोमीटर प्रति तास आहे.. मात्र मुंबई ते अहमदाबाद रूटवर धावणारी सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ही 160 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे.

एका इंग्रजी माध्यमाच्या रिपोर्टनुसार, मुंबई अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ही 15 ऑगस्ट पासून 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे. रेल्वे बोर्डाने मुंबई ते वडोदरा डिव्हिजनला 30 जून पर्यंत आवश्यक काम पूर्ण करण्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच कन्फर्मेट्री ओसिलोग्राफ कार चालवण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत. तसे पाहायला गेले तर मुंबई ते अहमदाबाद हे 491 किलोमीटरचे अंतर वंदे भारत एक्सप्रेस ने (Vande Bharat Express) पाच तास 15 मिनिटात कापता येते मात्र गतीमध्ये आणखी वाढ केल्यास 30 मिनिटांची बचत होणार आहे.

काय असेल वेळ? (Vande Bharat Express)

या रूट वरून सध्या वंदे भारत ट्रेन चालवल्या जातात एक ट्रेन रविवारी आणि दुसरी वंदे भारत बुधवारी सोडून इतर 6 दिवशी वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जातात. मुंबई अहमदाबाद रूट वर जाणारी ट्रेन क्रमांक 22 92 अहमदाबाद मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस अहमदाबादहून सहा वाजून दहा मिनिटांनी रवाना होते आणि अकरा वाजून 35 वाजता मुंबई सेंट्रल इथे पोहोचते. ही ट्रेन सकाळी 11:35 वाजता मुंबई सेंट्रल ला पोहोचण्याच्या आधी वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली अशा काही स्थानकांवर थांबते. परतीच्या प्रवासामध्ये ट्रेन क्रमांक 22 961 सेंट्रल मुंबई अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मुंबई सेंट्रल हून 15:55 वाजता रवाना होते आणि 21:25 बसा अहमदाबाद मध्ये पोहोचते. या ट्रेनमध्ये बडोदरा, सुरत, वापी आणि बोरवली अशी स्थानक येतात.

स्टेट बँक ऑफ इंडियात 150 रिक्त जागांसाठी भरती जाहीर; पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख पहा

State Bank of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तुम्हाला एका चांगल्या बँकेत नोकरी करायची आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (State Bank of India) ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेतंर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरीत अर्ज करावा. तसेच शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती जाणून घ्यावी.

शैक्षणिक पात्रता काय??

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत फायनान्स ऑफिसरच्या एकूण 150 जागा भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागांवर काम करून ठेवणाऱ्या तरुणांनी येत्या 27 जून 2024 पर्यंत अर्ज करावेत. भरती प्रक्रियेच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी. यासह अर्जदार उमेदवाराकडे आयआयबीएफने दिलेले फॉरेक्समधील प्रमाणपत्र असायला हवे.

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क किती??

लक्षात घ्या की भरती प्रक्रियेत वयोमर्यादेची अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित उमेदवाराचे वय 23 ते 32 दरम्यान असायला हवे. यात प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीत सूट देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. प्रथम अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे शॉर्टलिस्टिंग होईल. महत्वाचे म्हणजे रिक्त जागांसाठी 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. पर्यंत प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही. या भरती संबंधित माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर ही देण्यात आली आहे.

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; पहा कोणी केली मागणी?

AJIT PAWAR BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरं इंजिन लागलं आणि महायुतीचे बळ वाढलं. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपशेल अपयश आलं आणि पराभवच खापर एकमेकांवर फोडण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांना (Ajit Pawar) महायुतीत घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता तर थेट भाजप नेत्यानेच अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

भाजपची शिरूर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला आमदार राहुल कुल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको असं भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे.

अजित पवारांनी सुभाष बाप्पू, योगेश दादा या तिघांवर अन्याय केला. हे तिघेही मंत्री झाले असते. अनेकांना महामंडळ मिळाले असते. अजितदादा असतील तर ही सत्ता आणि ही खुर्ची नको. अजितदादांसाठी सत्ता आणायची का? असा सवालही भाजपतो कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. ज्या राष्ट्रवादीचा आम्ही दहा वर्षापासून विरोध करतोय तीच राष्ट्रवादी आता सोबत घेतली आहे. त्याच राष्ट्रवादीच्या अजित दादांनी तुम्ही आमच्या बोकांडी बसवलं आहे. विधानसभेला अजितदादा सोबत असतील आणि सत्ता मिळणार असेल तर ती सत्ता आपल्याला नकोय अशी असं म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली.

विधानसभेच्या 8 आमदारांनी दिला राजीनामा!! नार्वेकरांकडून नावे जाहीर

rahul narwekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज सकाळी 11 वाजल्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यानंतर सर्वात प्रथम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, अशा सर्व आमदारांची नावे सभागृहात वाचून दाखवली. हे सर्व आमदार लोकसभा निवडणूक निवडून आल्यानंतर संसदेत गेले. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजनामा द्यावा लागला आहे. यात एकूण 8 आमदारांचा समावेश आहे. हे आमदार नेमके कोणते आहेत? पाहुयात.

राजीनामा दिलेल्या आमदारांची नावे

राजू पारवे – २४ मार्च २०२४
निलेश लंके – १० एप्रिल २०२४
प्रणिती शिंदे – १० जून २०२४
बळवंत वानखेड – १२ जून २०२४
प्रतिभा धानोरकर – १३ जून २०२४
संदीपान भुमरे – १४ जून २०२४
रविंद्र वायकर – १४ जून २०२४
वर्षा गायकवाड – १८ जून २०२४

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 7 आमदार लोकसभेवर निवडून गेले आहेत. यावेळी विधानसभेचे 13 आणि विधानपरिषदेचे 2 अशा 15 आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. यातील सात आमदारांचा विजय झाला. तर 8 आमदार पराभूत झाले. पराभूत झालेल्या आमदारांमध्ये सुधीर मुनगंटीवार, राम सातपुते, मिहिर कोटेचा, यामिनी जाधव, विकास ठाकरे, रवींद्र धंगेकर, शशिकांत शिंदे, महादेव जानकर यांचा समावेश आहे.

असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करा; नवनीत राणांचे राष्ट्रपतींना पत्र

asaduddin owaisi navneet rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AIMIM चे हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेत असताना जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. ओवैसी यांच्या या नाऱ्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांनी निषेध व्यक्त करत ओवैसी यांच्यावर निशाणा साधला. ओवैसी यांनी दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणीही सध्या जोर धरत आहे. या एकूण सर्व घडामोडीत आता भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उडी घेतली असून ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. त्याबाबतचे पत्र नवनीत राणा यांनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे.

नवनीत राणा यांचं पत्र जसच्या तस

आदरणीय महोदय,

26/06/2024 रोजी, श्री असरुद्दीन ओवेसी यांनी संसद सदस्य म्हणून शपथ घेतली ते 09 हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांनी लोकसभा सभागृहात जय पॅलेस्टाईनची घोषणा केली. पॅलेस्टाईन हा एक परदेशी देश आहे ज्याचा कोणत्याही भारतीय नागरिकाशी किंवा भारतीय संविधानाशी संबंध नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम 102 नुसार, संसदेच्या कोणत्याही सदस्याने इतर कोणत्याही राष्ट्राप्रती आपली निष्ठा किंवा दृढनिश्चय दर्शविल्यास किंवा त्याने असे कृत्य केल्यास त्याचे संसद सदस्यत्व नाकारले जाऊ शकते. श्री असरुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर लगेचच जय पॅलेस्टाईनचा नारा देऊन या राष्ट्राप्रती आपली निष्ठा आणि भक्ती दाखवली आहे, जे संविधानाचे उल्लंघन आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठीही घातक ठरू शकते.

देशाची एकता आणि अखंडता राखणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे, संसद सदस्य असूनही श्री असरुद्दीन ओवेसी यांनी या कर्तव्याचे खुलेआम उल्लंघन केले आहे, हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. कलम 102 1(m) नुसार, जर कोणत्याही व्यक्तीने इतर कोणत्याही राष्ट्रासाठी आपली निष्ठा किंवा दृढनिश्चय व्यक्त केला, तर तो संसद सदस्य म्हणून काम करू शकत नाही. त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की, श्री असरुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत केलेले हे विधान हे देशविरोधी कृत्य आहे जे भारत देशाची एकता, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षेसाठी घातक ठरू शकते. कृपया कलम 103 नुसार भारतीय निवडणूक आयोगाचे मत मागवून या प्रकरणाची चौकशी करून श्री असरुद्दीन ओवेसी यांचे संसद सदस्यत्व नाकारण्यात यावे.

धन्यवाद!
तुमची
सौ. नवनीत रवी राणा (माजी खासदार अमरावती)

Travel : भेट द्या रघुवीर घाटाला ; अनुभवा पावसाळ्यातील खरे निसर्गसौंदर्य

raghuvir ghat

Travel : आकाशातून कोसळणाऱ्या जलधारा , आजूबाजूला मस्त हिरवळ आणि धुक्यांची दाट चादर … हे चित्र अनुभवयाला निसर्ग प्रेमी पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या महाराष्ट्राला निसर्गाचं अतुलनीय देणं लाभलं आहे. हा निसर्गसंपन्न महाराष्ट्र पावसाळ्यात अधिकच सुंदर होतो. तुम्ही देखील रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मस्तपैकी पावसाळी पर्यटनाला जायचा प्लॅन करीत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका अप्रतिम ठिकाणाबद्दल (Travel) सांगणार आहोत जिथला पावसाळी अनुभव म्हणजे निव्वळ अविस्मरणीय… चला जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल …

आम्ही ज्या ठिकाणाबद्दल सांगत आहोत हे ठिकाण म्हणजे रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाट हा घाट 12 किलोमीटरचा असून याची उंची ही समुद्रसपाटीपासून 760 मीटर आहे. कोकणातून रघुवीर घाटाला जात असताना एका बाजूला सुंदर हिरवेगार डोंगर आणि भाताची लावण तुम्हाला पावसाळ्यामध्ये पाहायला मिळेल. घाटाला जात असताना काळाकुट्ट डांबरी रस्त्यावरून आजूबाजूची हिरवळ पाहणं हे नेत्र सुखद असते यात (Travel) शंका नाही.

लाला रंगाचे खेकडे (Travel)

तर खेड मार्गे तुम्ही या घाटाकडे येत असतात तेव्हा बीजगर हे गाव लागतं त्या ठिकाणी 375 वर्षांपूर्वीच प्राचीन शिवपार्वती काळकाई मनाई मंदिर असून हा परिसर खूप पाहण्यासारख्या या मार्गे जेव्हा तुम्ही घाटावरती जाल तेव्हा तुम्हाला निसर्गाची किमया पाहायला मिळेल. या ठिकाणी काळा दगडांवर तुम्हाला लाल रंगाचे खेकडे नक्की पाहायला मिळतील.

रघुवीर घाटावर एक अद्भुत असं दृश्य तुम्ही पाहू शकता डोंगर रांगांमध्ये एक लांब अशी डोंगराची माची आहे. हे पाहण्यासाठी आतपर्यंत रेलिंगची सुविधा करण्यात आलेली आहे. या रेल्वेमध्ये बसायला पेपर ब्लॉकचा फुटबॉल बांधलेला आहे आधार तुम्ही थेट दरीत जाण्याचा अनुभव घेऊ शकता. शिवाय याच मार्गावरून तुम्ही महाबळेश्वरला सुद्धा जाऊ शकता या ठिकाणी असलेल्या सिंधी गावातील खिंडदेखील खूप पाहण्यासारखे व या ठिकाणी (Travel) असलेले अनेक स्पॉट फोटो घेण्यासाठी उत्तम आहेत.

धबधबे आणि धुक्यांची चादर (Travel)

सुंदर डोंगर रांग आणि त्यातून वाहणारे छोटे छोटे धबधबे हे तुमचे मन मोहून टाकतील आणि चिंब भिजण्यासाठी सुद्धा हे ठिकाण उत्तम आहे. हे ठिकाण रत्नागिरी आणि सातारा यांना जोडणार आहे आणि खेड तालुक्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. या घाटाच्या बाजूला खोपी नावाचं गाव आहे आणि खोपि धरणाच्या वरच्या बाजूला उंचीवर घाट मार्ग आहे. या घाटात पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे, थंडगार वातावरण आणि धोक्यांची दाट चादर ही पर्यटकांना नेहमीच भुरळ (Travel) घालत राहते.

Shocking Video : कॅमेऱ्यात कैद झाला निसर्गाचा प्रकोप; तरुणी रील बनवताना अचानक पडली वीज; पहा शॉकिंग व्हिडीओ

Shocking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) सोशल मीडियावर विविध रिल्स बनवणाऱ्यांचा नुसता सुळसुळाट झाला आहे. ज्याला त्याला रील बनवण्याचं वेड लागलं आहे. अशातच पावसाळा सुरु होताच बरेच लोक अजब गजब व्हिडीओ बनवताना दिसू लागले आहेत. दरम्यान, अशीच एक तरुणी पावसात भिजत मस्त रील बनवत होती आणि अचानक घराच्या पत्र्यावर वीज पडल्याचा एक अत्यंत शॉकिंग व्हिडीओ व्हायरल होतो आहे. निसर्गाला दयामाया नसते.. एकदा रुद्र रूप घेतलं का मग माणसाचं काही खरं नाही… हेच काय खरं!! याची पूर्ण प्रचिती या व्हिडिओतून येते आहे.

व्हायरल व्हिडीओ (Shocking Video)

पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य दहा पटीने वाढते यात काहीच शंका नाही. पण पावसाळ्यात अनेकदा वीज कोसळण्याच्या घटना घडतात आणि यामध्ये वित्तहानी तसेच जीवितहानी झाल्याच्या बऱ्याच घटना आजपर्यंत तुमच्याही कानी पडल्या असतील. निसर्गाच्या चक्रापुढे माणसाचं काय चालणार? एकीकडे घराघरात वीजेचा वापर होत असला तरी जी वीज थेट आकाशातून कोसळते ती कुणालाही भस्म करण्याचे सामर्थ्य ठेवते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत असाच रुद्र निसर्गाचा प्रकोप कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडीओ बिहारमधला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, छान पाऊस पडत आहे. आल्हाददायक वातावरण झाले आहे. अशा वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत एक तरुणी गच्चीवर नाचत रील शूट करतेय. (Shocking Video) इतक्यात विजांचा मोठा कडकडाट होतो आणि घराच्या पत्र्यावर वीज कोसळताना दिसते. सुदैवाने या घटनेत वीजेचा मारा थेट तरुणीवर झाला नाही. त्यामुळे तिचा जीव वाचला. मात्र, वीज पडताच तरुणी इतकी घाबरते की, पळतच जाते. हे दृश्य इतकं भयानक आहे की, क्षणभर डोळ्यासमोर अंधार येतोय.

किती भयानक आहे हे…

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया X हँडलवर sdcworldoffl नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘बिहारच्या सीतामढीमध्ये एक मुलगी रील व्हिडिओ बनवत होती. तेव्हा अचानक आकाशातून वीज कोसळली. सुदैवाने वीज पडण्यापासून ती तरुणी बचावली’. (Shocking Video)सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून अनेक नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘किती भयानक आहे हे’. तर अन्य एकाने म्हटले, ‘रिलच्या नादात काय झालं असत.. विचारही करवत नाही’.

Trekking Video : माझ्या राजा रंsss!! 86 वर्षीय आजोबांनी एका दमात सर केला रायरेश्वर; Video पाहून भरेल उर

Trekking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Trekking Video) आपल्या महाराष्ट्राला भव्य असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील अनेक किल्ले पहायला मिळतात. हे किल्ले आजही शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. यापैकी एक किल्ला म्हणजे किल्ले रायरेश्वर. या किल्ल्यावर अनेक गडप्रेमी आणि शिवभक्त कायम येत असतात. अशाच एका ८६ वर्षीय आजोबांनी हा किल्ला एका दमात सर केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमचाही उर अभिमानाने भरून येईल.

८६ वर्षीय आजोबांनी एका दमात सर केला रायरेश्वर (Trekking Video)

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात स्थित असलेला किल्ले रायरेश्वर सर करणे काही सोप्पी गोष्ट नाही. पुणे जिल्ह्यात भोरवरून २७ किलोमीटर अंतरावरील हा किल्ला ट्रेकर्सच्या यादीतील टॉप किल्ल्यांपैकी एक आहे. जो सर करतेवेळी भल्याभल्यांना घाम फुटतो, अशा किल्ल्यावर कायम शिवभक्तांची गर्दी असते. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका ८६ वर्षांच्या आजोबांनी हा केला सर केल्याचे दिसत आहे. ते म्हणतात ना, वय आणि धाडस यांचा काहीही संबंध नसतो. आलं मनात केलं जोमात.. असं काहीस या आजोबांचं गणित.

धोतर, सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी असा आजोबांचा पेहराव आणि किल्ला चढताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेला उत्साह पाहून तरुणांनाही लाज वाटेल. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक तरुण या आजोबांशी संवाद साधतोय. त्याने आजोबाना विचारले, ‘तुमचे वय किती आजोबा?’ (Trekking Video) त्यावर आजोबा म्हणाले, ‘८६’. यावर तरुणाने म्हटले, ‘८६ वय आहे तरीपण..’. तर आजोबा म्हणाले, ‘तरीपण चढायचं’. पुन्हा तरुण म्हणाला, ‘आम्ही ८६ वयापर्यंत चढणार का?’ यावर बोलताना आजोबा म्हणाले, ‘मेहनत केली का बालपण मग कुठून चढणार. मी १०० -१०० बैठक काढायचो’. यावरून आजोबांच्या ऊर्जेचा आणि उत्साहाचा पुरा अंदाज येतोय. आजोबांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांच्या जिद्द अन आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे.

महाराजांचं नुसतं नाव घेतलं तरी…

हा व्हायरल व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डल sahya.veda नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कुठून येते एवढी स्फुर्ती, अन् कुठून येते येवढे धाडस, वयाची ८० पालटली तरी येवढा उत्साह, अन् आवाजात तेवढीच दणकेबाजी, फक्त आणि फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यामुळेच..’. या व्हिडिओवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. (Trekking Video) यांपैकी एकाने लिहलं आहे की, ‘आपण चढू ना.. पण तोवर जगलो पाहिजे इतकंच. ही जुनी हाडे आहेत. आपली पिढी ५८ व्या वर्षी जरी वर चढली तरी फार झाले’. तसेच आणखी एक युजरने लिहिलंय, ‘भावा.. छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेतलं तरी एक नवी स्फूर्ती, चेतना आणि उत्साह येतो’.