Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 644

जामनेर ते मुक्ताईनगर… जळगावात भाजप- शिवसेनेच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय

Jalgaon Assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव.. आणि जळगावचं राजकारण.. म्हणजे जाळ अन् थुर संगटच.. गिरीश महाजन, एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील, मंगेश चव्हाण यांसारखी राजकीय मंडळीच्या राजकारणाचा पायाच जळगावात पक्का झाला… अनेक अटीतटीच्या लढती याच जळगावात आपल्याला पाहायला मिळतात… भाजपचे संकटमोचक याच जिल्ह्यात असल्याने येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असणार आहे.. तर दुसरीकडे मशाल आणि तुतारीलाही जिल्ह्यात मोठा साॅफ्ट कॉर्नर मिळतोय.. त्यामुळे जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत काय होईल? भाजप, तुतारी की मशाल, जळगावात आमदारकीला कोण भाव खाऊन जातंय? त्याचाच घेतलेला हा आढावा..

यातला पहीला मतदारसंघ पाहुयात तो जामनेरचा… भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन या मतदारसंघाचे बाहुबली आमदार आहेत, असं म्हणायला हरकत नाहीत… याच मतदारसंघातून ते १९९५ पासून सलग निवडून येतायत.. अनेक विरोधक आले, गेले पम आमदार कायम राहीले, गिरीशभाऊ… याच जामनेरच्या आमदारकीच्या जीवावर ते मंत्री झाले, महाराष्ट्राच्या राजकारणात उठबस वाढली.. एवढंच नाही तर फडणवीसांच्या खास मर्जीतले संकटमोटक म्हणून नावारुपास आले… पण याच संकटमोचकाला जामनेरमध्ये घेरण्याचा प्लॅन महाविकास आघाडीने आखलाय… २०१९ ला राष्ट्रवादीच्या संजय गरुड यांनी महाजनांना फाईट दिली होती पण तेच भाजपमध्ये आल्याने आता शरद पवारांच्या तुतारीकडे तीन पर्याय आहेत… एक म्हणजे २०१४ ला राष्ट्रवादी पार्टीकडून लढत दिलेले दिगंबर पाटील.. दुसरे म्हणजे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दिलीप खोडपे आणि तिसरं नाव म्हणजे अजितदादा गटात असणाऱ्या २००४ पासून विधानसभेचा तयारी करणाऱ्या पण प्रत्येक वेळेस डावलण्यात आलेल्या बंगालसिंह चितोडीया यांचं… राष्ट्रवादीनं या तिन्ही नावांचा मध्यंतरी नुकताच सर्वे केला असून जो कुणी महाजनांना चितपच करु शकतो त्याच्या हातात शरद पवारांची तुतारी येईल, अशी माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळतेय..

दुसरा मतदारसंघ आहे चोपड्याचा… शिवसेना शिंदे गटा असणाऱ्या लता सोनवणे या चोपड्याच्या विद्यमान आमदार. जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या घरकुल घोटाळ्या प्रकरणात नाव आल्यानं चंद्रकांत सोनवणे यांना २०१९ ची निवडणूक लढवता आली नव्हती, त्यामुळे त्यांच्या पत्नी आमदार लता सोनवणे यांनी निवडणुक लढवत राष्ट्रवादीचे जगदीश वळवी यांच्या विरोधात त्यांनी यशस्वी लढत दिली होती… पण घरकुल प्रकरणात सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानं चंद्रकांत सोनवणेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून ते उमेदवार असतील ते कन्फर्म आहे… त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चंद्रकांत बारेला हे इच्छुक आहेत… तर सध्या अजित पवार गटात असणारे माजी आमदार जगदीश वळवी हे निवडणुकीच्या तोंडावर तुतारी फुंकण्याची दाट शक्यता आहे… त्यांचाही जनाधार मोठा असल्याने आघाडी त्यांच्या नावाचा विचार करु शकते…

तिसरा मतदारसंघ येतो तो रावेरचा…काँग्रेसचे शिरीष चौधरी रावेरचे विद्यमान आमदार.. त्यांच्या विरोधात भाजपकडून लढत दिलेले हरिभाऊ जावळे यांचे निधन झाल्यानं महायुतीकडून या जागेसाठी इच्छुकांची गर्दी वाढलेय… मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादन करण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या या मतदारसंघात २००९ मध्ये गिरीश चौधरी यांनी अपक्ष निवडणुक लढली होती… मात्र २०१४ मध्ये भाजपच्या हरिभाऊ जावळे यांनी त्यांचा पराभव करत मतदारसंघावर पकड बनवली… पुन्हा २०१९ मध्ये काँग्रेसकडून चौधरींनी निवडणुक लढवत भाजपला चितपट केलं… येणाऱ्या निवडणुकीतही शिरीष चौैधरी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून लढण्याऐवजी आपला मुलगा धनंजय चौधरी याला लाँच करु पाहतायत… पण याला कितपत यश येईल हा नव्या संशोधनाचा विषय. बाकी प्रहारच्या अनिल चौधरींचीही मतदारसंघात चांगली ताकद आहे. पण आघाडी सध्यातरी या मतदारसंघात प्लसमध्ये दिसतेय…

चौथा मतदारसंघ आहे तो भुसावळचा… २००९ च्या पुनर्चनेनंतर अनुसुचित जातींसाठी राखिव झालेला हा मतदारसंघ.. भाजपचे संजय सावकारे इथले विद्यमान आमदार. भुसावळच्या आमदारकीला उमेदवार कोणतेही असेना पण इथे मुख्य लढत असते ती गिरीश महाजन गट विरुद्ध एकनाथ खडसे गट अशी… संजय सावकारे हे खडसे गटाचे मानले जातात… त्यामुळे खडसे यांनी पुन्हा भाजपवापसी केल्यामुळे सावकारेंच्याच नावावर महायुतीकडून पुन्हा शिक्कामोर्तब होणारय , हे जवळपास कन्फर्मय. लेवा पाटील समाजाचं मतदारसंघातील असणारं वर्चस्व पाहता यंदाही ते आमदारकीचा गुलाल लावतील, असं बोललं जातंय… पाचवा मतदारसंघ पाहुयात तो जळगाव शहरचा… भाजपचे सुरेश भोळे इथले विद्यमान आमदार… सलग दोन टर्म ते भाजपकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतायत…मात्र रखडलेली विकासकामं आणि एन्टीइन्कबन्सीचा फटका त्यांना यावेळी बसू शकतो, असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनीही व्यक्त केलंय. जळगाव शहरच्या माजी महापौर जयश्री महाजन या मशालीच्या चिन्हावर भोळेंच्या विरोधात निवडणुक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे… त्यामुळे भोळे विरुद्ध महाजन अशी लढत झालीच तर निकालात जयश्री महाजन भाजपला पराभवाचा धक्का देतील, असं मतदारसंघात बोललं जात आहे…

सहावा मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीणचा… शिवसेना शिंदे गटाचे पहिल्या फळीतील नेते गुलाबराव पाटील यांचा हा मतदारसंघ… जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यात गुलाबराव पाटलांना यश मिळालं… खरंतर जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर असा पारंपारिक सामना रंगत असून या दोघाही नेत्यांचा ग्रामीणवर चांगला होल्ड आहे… महायुतीत यंदाही ही जागा शिवसेना शिंदे गटातील उमेदवार गुलाबराव पाटील हेच उमेदवार असतील.. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीत ही जागा कुणाला सुटणार, यावर इथली बरीच समीकरण आहेत सध्या शिवसेना ठाकरे गटातील गुलाबराव वाघ यांच्या नावाची आमदारकीसाठी चर्चा आहे.. तर दुसरीकडे शरद पवार गटातील गुलाबराव देवकर हे देखील पाटलांच्या विरोधात शड्डू ठोकू शकतात.. आघाडीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी फेस टू फेस लढत घेण्याचा निर्णय झालाच. तर देवकरांकडे मशालीच्या चिन्हावरही निवडणूक लढवण्याचा ऑप्शन असू शकतो.. पण गुलाबराव वाघ यांचा नेमका काय स्टँड असेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे… बाकी अँन्टीइन्कबन्सी, शिवसेनेतील बंडखोरीला साथ आणि ठाकरे – पवारांच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वातावरण या सगळ्यांचा विचार करता यंदा गुलाबराव पाटील यांना पराभवाचा धक्का बसू शकतो…

सातवा मतदारसंघ येतो तो अमळनेरचा… राष्ट्रवादी अजित पवार गटात असणारे अनिल पाटील हे सध्या अमळनेरचे विद्यमान आमदार. भाजपच्या शिरीष चौधरी यांचा पराभव करत त्यांनी २०१९ ची निवडणूक जिंकली होती. अमळनेर मतदारसंघाला स्वत: चा असा ऐतिहासिक व सामाजिक वारसा लाभला आहे… साने् गुरुजींचं वास्तव्य असो, मंगळग्रह मंदिर असो वा विप्रो सारखी कंपनी अमळनेर प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला भुरळ घालतो… दरवेळी वेगळा उमेदवार निवडून देण्याची परंपरा या मतदारसंघात आहे… २००९ ला आयत्या वेळी उमेदवारी दाखल करून अपक्ष आमदार साहेबराव पाटील यांंनी गुलाल उधळला.. २०१४ ला शिरीष चौधरी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले… पण २०१९ ल चौधरी यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवूनही जनतेनं परेंपरेप्रमाणे निकाल फिरवला आणि निकाल राष्टवादीच्या अनिल पाटील यांच्या बाजूने लागला. महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनाच सुटण्याची शक्यता जास्त आहे.. तर माजी आमदार बी. एस. पाटील हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी शरद पवार गचात प्रवे्शळ केल्यामुळे इथं अजितदादांचं चांगलंच टेन्शन वाढणार असल्याचं सध्यातरी दिसतंय… यासोबत शिरिश चौधरीही शरद पवार गटाच्या संपर्कात असून तिकीट कुणाला सुटणार, यावर इथली लढत आणखीन स्पष्ट होण्याची चिन्ह आहेत…

आठवा मतदारसंघ येतो पाचोरा विधानसभेचा.. समाजवादी , प्रजासमाजवादी आणि काँग्रेस पक्षांचा विचारांचा पगडा असलेल्या पाचोरा मतदारसंघ. निवडणुकीमध्ये सातत्याने एकाच पक्षाला कधीही साथ न देणारा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख. 2014 च्या निवडणुकीत मोदींचा देशभर झंझावात असताना मतदारसंघाने भाजप उमेदवाराला झिडकारत शिवसेना उमेदवार किशोर पाटील यांना निवडून देत भाजपाला धक्का दिला. पुढे युतीच्या काळात राष्ट्रवादीच्या दिलीप वाघ यांचा पराभव करत किशोर पाटील सलग दुसऱ्यांदा पारोऱ्यातून निवडून आले…सध्या ते शिवसेना शिंदे गटात असल्याने त्यांच्याविरोधात आघाडी मास्टरस्ट्रोक खेळू शकते. तो म्हणजे आर. वो. तात्यासाहेब यांच्या कन्या वैशाली सुर्यवंशी यांची ठाकरे गटाकडून उमेदवारी कन्फर्म समजली जातेय… निर्मल सिड्स उद्योगच्या माध्यमातून तालुक्यात त्यांनी बरीच रोजगारनिर्मिती केली आहे.. त्यामुळे पाचोऱ्यातही येणाऱ्या विधानसभेला गद्दार विरुद्ध खुद्दार असा अटीतटीचा संघर्ष पहायला मिळू शकतो..

नववा मतदारसंघ आहे तो हायव्होल्टेज मुक्ताईनगरचा…

एकनाथ खडसे यांचा हा बालेकिल्ला. खडसेचं राजकारण वाढलं, रुजलं ते याच मतदारसंघात.. तब्बल सहा टर्म प्रतिनीधीत्व केलेल्य याच नाथाभाऊंना मुक्ताईनगरचं तिकीच मिळेल का, अशी परिस्थिती २०१९ मध्ये उद्भवली होती.. पण पक्षातला विरोध पाहता त्यांनी आपली मुलगी रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरची उमेदवारी मिळवून दिली.. भाजप – शिवसेना युती झाल्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी बंडाळी करत अपक्ष लढत लढवली होती… पण नाथाभाऊंच्या राजकारणाला शह देण्यासाठी पक्षातील आणि पक्षाबाहेरील अनेकांनी रसद पुरवून अपक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडून आणलं… रोहिणी खडसे म्हणजेच एका अर्थाने नाथाभाऊंचा मुक्ताईनगरमध्ये झालेला पराभवाने खडसेंचा बालेकिल्ला ढासळला.. यानंतर त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि पुन्हा त्यांची घरवापसी हा गेलाबाजार इतिहास आपल्याला माहित असेलच. सध्या विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेना शिंदे गटात असल्याने् त्यांची महायुतीकडून उमेदवारी कन्फर्म समजली जातेय… तर रोहिणी खडसे यांची उमेदवारी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आधीच जाहीर केल्यानं रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा इथला अटीतटीचा सामना आपल्याला पहायला मिळू शकतो… नाथाभाऊ यांच्यासाठी मात्र पक्ष की मुलगी, असा बाका प्रसंग मुक्ताईनगरच्या निम्मिताने निर्माण झालाय…

दहावा मतदारसंघ आहे चाळीसगावचा…

गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे भाजपचे मंगेश चव्हाण हे सध्या चाळीसगावचे विद्यमान आमदार आहेत… चव्हाणांना काटशाह देण्यासाठी शरद पवार गटाच्या राजीव देशमुख यांचाही पर्याय महाविकास आघाडीकडे असला तरी त्यांच्या तब्येतीचं कारण पाहता ते निवडणूक लढण्याची शक्यता तशी कमी आहे… त्यामुळे उन्मेश पवार येणाऱ्या विधानसभेला मशालीच्या चिन्हावर चाळीसगावची आमदारकी लढवू शकतात. मंगेश चव्हाण वर्सेस उन्मेश पवार हे दोन कट्टर नेते एकमेकांना भिडल्यास चाळीसगावचा निकाल कुठे झुकेल, हे आत्ताच सांगता येत नाही…अकरावा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो पारोळ्याचा… राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांचा पराभव करत शिवसेनेचे चिमणराव पाटील गेल्या विधानसभेला किंगमेकर ठरले.. अर्थात गिरीश महाजन एन्ड कंपनीच्या प्रयत्नांनी सतीश पाटलांचा हा पराभव झाल्याचं बोललं गेलं… मात्र यंदाच्या विधानसभेला चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील हे महायुतीकडून इच्छुक आहेत… तर त्यांच्या विरोधात सतिश पाटील हे महाविकास आघाडीकडून कडवी झुंज देतील. यंदा पारोळ्यात वारं आघाडीच्या बाजूला असल्याचं सध्यातरी पहायला मिळतंय..तर हे आहेत जळगाव जिल्ह्यातील हायव्होल्टेज ११ विधानसभा मतदारसंघांचा संभाव्य निकाल..

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे-फडणवीस एकत्र; नेमकं काय घडलं?

Thackeray and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र या अधिवेशनापूर्वीच राजकीय घटनांचा जबरदस्त योगायोग पाहिला मिळाला. आज सर्वात अगोदर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेट घडली. त्यानंतर योगायोगाने विधानसभेच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात देखील भेट झाली. या लिफ्टमध्ये प्रवीण दरेकर आणि मिलिंद नार्वेकर सुद्धा होते. याचवेळी लिस्टमध्ये असताना हास्यविनोदीही झाला. या लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं? हे प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, “राजकारणात आपण राजकीय शत्रू असू, पण सदासर्वकाळ शत्रू नसतो. आज विधानसभेच्या सभागृहाकडे जाताना मी लिफ्टमध्ये आत शिरत असताना देवेंद्र आणि उद्धवजी आले, त्यावेळी मिलिंद नार्वेकर हेही सोबत होते. पुढे लिफ्ट सुरू झाल्यानंतर कोणीतरी बोललं, ‘आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं’. यावर ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीस यांना सांगितले की, ‘याला पहिले बाहेर काढा'” त्यानंतर मी (प्रवीण दरेकर) म्हणालो की, “‘तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन. माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? बोलता तसं करा’. त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. या घटनेनंतर आम्ही लिफ्टमधून बाहेर पडलो, उद्धव ठाकरे विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. त्यांची मानसिकता विरोधी पक्षात राहायची आहे, ते सत्तेच्या दिशेने आले नाहीत. आम्ही लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर आमचे वेगळे मार्ग दिसून आले आहेत”

दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये देखील भेट झाली. या भेटीवेळी ठाकरे चंद्रकांत पाटलांना म्हणाले की, बसा गप्पा मारूयात. झाले असे की, “ठाकरे आणि फडणवीस यांची भेट होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात चंद्रकांत पाटील आले होते. तेव्हा दालनात ठाकरे आणि अनिल परब उपस्थित होते. तेव्हाच ठाकरे चंद्रकांत पाटील यांना म्हणाले की, बसा गप्पा मारूयात. पण चंद्रकांत पाटलांनी कामाचे कारण देत काढता पाय घेतला.”

Stunt Video : रील बनवताना उंच गच्चीवरून मारली उडी; जीव वाचला पण मान मोडली

Stunt Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stunt Video) आजच्या आधुनिक जगात मोबाईल, इंटरनेट तरुण पिढीसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतील महत्वाच्या बाबी ठरल्या आहेत. दिवसभरात २४ तासांपैकी किमान २२ तास ही मंडळी मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर घालवतात. आजकाल रिल्सचे वेड इतके वाढले आहे की, लोक प्रसिद्धीसाठी जिवाचीसुद्धा पर्वा करत नाहीत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये हा मुलगा चक्क उंच गच्चीवरून खाली उडी मारताना दिसतोय. जे पाहून तुमची दातखिळीच बसेल.

रीलसाठी उंचावरून मारली उडी (Stunt Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चार मुलं एका घराच्या उंच गच्चीवर उभी आहेत. यातील एक मुलगा चक्क गच्चीवरून खाली उडी मारत रील बनवताना दिसतोय. जेव्हा हा मुलगा उंचावरून खाली उडी मारतो तेव्हा क्षणभर आपलाही श्वास थांबतोय का काय? असेच वाटते. या मुलाने उंचावरून उडी मारल्यानंतरही दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. असे असले तरीही हा मुलगा जेव्हा धाडकन खाली पडतो तेव्हा त्याच्या मानेला मात्र गंभीर दुखापत होते.

https://twitter.com/PalsSkit/status/1805836430729789645

मानेला गंभीर दुखापत

गच्चीवरून उडी मारल्यानंतर जीव बचावला असला तरीही या मुलाच्या मानेला इतकी गंभीर दुखापत झाल्याचे दिसते की, त्याला जागेवरून उठणेही मुश्किल झाले आहे. यावेळी काही मुले धावत येतात आणि त्याला हात देऊन उठण्यास मदत करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. (Stunt Video) हा व्हिडीओ सोशल मीडिया X हॅण्डल PalsSkit नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, ‘जीव गेला तरी चालेल पण रील नको जायला’.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. इतकेच नव्हे तर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करताना आपला संतापदेखील व्यक्त केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, ‘मान मोडली ना त्या मुलाची’. (Stunt Video) तर आणखी एका युजरने लिहले आहे, ‘हे सगळं करायची गरज काय आहे?’, अन्यही एकाने लिहिलंय, ‘सगळं झालं… आता फक्त हेच बाकी राहिलेलं’. आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय, हे किती धोकादायक आहे.. एखाद्याचा जीव गेला असता मग?’

Horrible Video : काला जादू??? रस्त्याच्या मधोमध बसून महिलेचे अघोरी कृत्य; Video पाहून वाटेल भीती

Horrible Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Horrible Video) आजकाल सोशल मीडियावर प्रत्येकजण सक्रिय आहे. सोशल मीडिया जणू आधुनिक काळाची गरज झाली आहे. या माध्यमातून अनेक लोक विविध रिल्स शेअर करून इतरांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. कधी स्टंटबाजी, कधी भन्नाट डान्स तर कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ आपल्याला रिल्समधून पहायला मिळतात. अनेकदा काही व्हिडीओ इतके विचित्र असतात की, आपण स्वप्नातही विचार केला नसेल. असाच एक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक मैल भररस्त्यात एक पूजा मांडून बसली आहे. जिला पाहून अनेकांनी ती जादूटोणा करत असेल, असा अंदाज वर्तवला आहे.

भररस्त्यात महिला करत होती अघोरी पूजा (Horrible Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नीट पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, महिला भरधाव धावणाऱ्या गाड्यांच्या मध्ये रस्त्यात बसून काहीतरी पूजा मांडते आहे. यामध्ये दिसतंय की, या महिलेने रस्त्याच्या मधोमध तीन ठिकाणी आग लावली आहे. शिवाय नारळ आणि इतर काही सामानासह तिने एक रिंगण आखून पूजा मांडली आहे. जी काही सामान्य वाटत नाहीये. आसपासचे वाटसरू तिच्याकडे पाहत आहेत. मात्र, तिला कुणाचीही फिकर नसून ती आपल्या कामात व्यग्र दिसतेय.

https://twitter.com/PalsSkit/status/1805454787821060098

खरंतर, ही महिला इथे नेमकं काय करतेय? हे काही पक्के सांगता येणार नाही. शिवाय हा व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे? कोणत्या रस्त्यावरील आहे? ती महिला कोण आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. (Horrible Video) अनेकांनी हा व्हिडीओ पहिल्यानंतर ही पूजा आहे की जादूटोणा? असा सवाल उपस्थित केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र, ‘या महिलेचे कृत्य अघोरी असून ती जे करतेय त्याला काला जादू म्हणतात’, असा दावा केला आहे. मात्र, हॅलो महाराष्ट्र याविषयी कोणताही दावा करत नाही.

भीतीचे वातावरण

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून शेअर केल्याचे सांगितले जात आहे. हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया X हॅण्डलवर PalsSkit नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. (Horrible Video) या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ताईने पूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे’. तर अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट शेअर केल्या आहेत. एकाने लिहिलं, ‘ही पूजा आहे? जादूटोणा? की आणखी काही?’ तर अन्य एकाने म्हटलंय, ‘ही बाई काला जादु करतेय.. कुणीतरी थांबवा हिला’. तसेच आणखी एकाने म्हटले, ‘कुणीही असं भररस्त्यात काहीही कसं करू शकत? सरकारच लक्ष का नाहीये?’

(हॅलो महाराष्ट्र अंधश्रद्धेशी संबंधित कोणत्याही कृत्याचे समर्थन करत नाही)

रोहित शर्माने इंझमामला सुनावलं; म्हणाला, कधी तरी डोकं वापरा

inzmam rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : टी-20 विश्वचषक 2024 मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर-8 सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) ज्याप्रकारे रिव्हर्स स्विंग मिळाला ते पाहता त्याने नक्कीच चेंडूशी छेडछाड केली असावी असा संशय पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम उल हकने (Inzmam Ul Haq) व्यक्त केल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इंझमामला चांगलंच सुनावलं आहे. आम्ही कुठे आणि कोणत्या परिस्थितीत खेळतोय ते बघा.. कधी कधी डोकं वापरा असं म्हणत रोहितने इंझमामला प्रत्युत्तर दिले आहे.

सेमी फायनलपूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नावर भाष्य केलं. यावेळी रोहितला इंझमाम उल हकने अर्शदीप बाबत केलेल्या आरोपावर विचारलं असता रोहित चांगलाच संतापला. याला मी आता काय उत्तर देऊ? असं म्हणत रोहितने नाराजी व्यक्त केली. जर तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशात खेळत असाल आणि विकेट कोरड्या असतील, तर चेंडू आपोआप रिव्हर्स स्विंग घेतो. आणि फक्त आमच्यासाठीच नाही तर सर्व संघांसाठी बॉल स्विंग होत असतो. त्यामुळे कधी कधी डोकं वापरणंही गरजेचं असतं. विश्वचषक कुठे खेळवले जात आहेत हेही बघावं लागेल. सामने ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये खेळवले जात नाहीयत असं म्हणत रोहित शर्माने इंझमाम उल हकला प्रत्युत्तर दिलं.

इंझमाम नेमकं काय म्हणाला होता?

अर्शदीप सिंग जेव्हा 15 वे षटक टाकत होता तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. बहुतेक चेंडूशी काहीतरी छेडछाड करण्यात आली होती त्यामुळेच अर्शदीपला रिव्हर्स स्विंग मिळाला असं इंझमाम म्हणाला. नवीन चेंडूसाठी इतक्या लवकर रिव्हर्स स्विंग करणे आवश्यक आहे का? याचा अर्थ असा की. १२ व्या-१३ व्या षटकापर्यंत चेंडू रिव्हर्स स्विंगसाठी तयार झाला होता. जर जसप्रीत बुमराहने असे केले असते तर एकवेळेस हे समजू शकलं असते कारण त्याची गोलंदाजी ॲक्शन तशीच आहे, पण अर्शदीपने १५व्या षटकातच चेंडू रिव्हर्स केला याचा अर्थ त्याने काही तरी खास केले. त्यामुळे पंचांनी डोळे उघडे ठेवून नीट लक्ष दिले पाहिजे होते. जर पाकिस्तानी गोलंदाजांनी हे केले असते, तर सगळीकडे खळबळ उडाली असती, असं इंझमाम म्हणाला होता.

Vande Bharat Express : असे काय झाले ? भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसची गती कमी करायला सांगितली

vande bharat express speed

Vande Bharat Express : पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही भरतीच्या पसंतीस उतरली आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास अशी वंदे भारत एक्सप्रेसची ओळख बनली आहे. मात्र काही मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस चे स्पीड कमी करण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. हा निर्णय नक्की का घेण्यात आला ? चला जाणून घेऊया…

कांचनजंगा एक्स्प्रेसच्या दुर्घटनेनंतर, भारतीय रेल्वेने निवडक मार्गांवरील वंदे भारत (Vande Bharat Express) आणि गतिमान एक्स्प्रेससह हायस्पीड ट्रेनचा वेग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा वेग आता ताशी 160 किमी वरून 130 किमी प्रतितास इतका कमी होणार आहे.

काय आहे कारण ? (Vande Bharat Express)

या प्रस्तावात ट्रेन क्रमांक 12050/12049  दिल्ली-झाशी-दिल्ली गतिमान एक्स्प्रेस, ट्रेन क्र. 22470/22469  दिल्ली-खजुराहो-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 20172/20171 दिल्ली-राणी कमलापती-दिल्ली एक्स्प्रेस आणि वनडे ट्रेन क्र. 12002/12001 दिल्ली-राणी कमलापती-दिल्ली शताब्दी एक्स्प्रेसचा वेग कमी करण्याची सूचना केली आहे. काही मार्गांवर ट्रेन प्रोटेक्शन अँड वॉर्निंग सिस्टीम (TPWS) अयशस्वी झाल्यामुळे होणारे धोके कमी करणे हा वेग कमी करण्याचा उद्देश आहे. गतीतील बदलासाठी सुमारे 8-10 इतर ट्रेन्सच्या ऑपरेटिंग शेड्यूलमध्ये बदल करणे आवश्यक आहे जेणेकरून ऑपरेशनल कार्यक्षमता टिकवून ठेवता येईल. बऱ्याच मार्गांवर, वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या आधीपासून 130 किमी प्रतितास वेगाने धावतात.

दरम्यान इंटिग्रल कोच फॅक्टरीचे माजी प्राचार्य आणि वंदे भारत एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) मुख्य यांत्रिक अभियंता शुभ्रांशू यांनी या निर्णयावर टीका केली. द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी सांगितले की, TPWS च्या खराब कार्यामुळे वेग कमी केल्याने सुरक्षेच्या मूलभूत समस्यांना प्रभावीपणे संबोधित केले जाणार नाही. त्यांनी निदर्शनास आणून दिले की कांचनजंगा एक्स्प्रेस अपघातात मालगाडी ताशी 45 किमी वेगाने प्रवास करत होती.

कवच प्रणाली (Vande Bharat Express)

वेग कमी करण्यासोबतच, भारतीय रेल्वेने आर्मर्ड-ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) सिस्टिमच्या स्थापनेलाही वेग दिला आहे. अलीकडेच, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना पुढील पाच वर्षांत ४४,००० किमी रेल्वे ट्रॅकवर कवच प्रणालीची अंमलबजावणी जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी कवच प्रणालीला संरचित मिशन मोडमध्ये लागू करण्याच्या गरजेवर भर दिला.

Gold Price Today : सोन्याचे भाव कोसळले!! ग्राहकांनो, खरेदीची हीच ती वेळ

Gold Price Today 27 may

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदीदार ग्राहकांसाठी आज खुशखबर आहे. भारतीय बाजारात आज सोन्याचे दर (Gold Price Today) कोसळले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) १० ग्राम २४ कॅरेट सोने 70780 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 139 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात सुद्धा 347 रुपयांची घट झाली असून एक किलो चांदी 86555 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव 70760 पयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमती (Gold Price Today) वाढल्याचे पाहायला मिळाले. 9 वाजून 30 मिनीटांनी सोन्याच्या भावाने 70790 nरुपयांचा उच्चांक गाठला. मात्र त्यानंतर सोन्याचा दर कोसळला. 11:30 वाजता सोन्याच्या किमती 70678 रुपयापर्यंत खाली गेल्या. यानंतर थोडीफार वाढ यामध्ये दिसली. सध्या 10 ग्राम 24 कॅरेट सोने 70780 रुपयांवर करत आहेत. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याची किंमत 71,730 रुपये आहे. तर 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 65,750 रुपये आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 65,750 रुपये
मुंबई – 65,750 रुपये
नागपूर – 65,750 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 71,730 रूपये
मुंबई – 71,730 रूपये
नागपूर – 71,730 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

निलंगा ते उदगीर…. लातूरात विधानसभेला कसं चित्र असेल ??

Latur Assembly 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या बालेकिल्ल्याला लातूरात काँग्रेसने सुरुंग लावला… सलग दोन टर्मचे खासदार राहिलेल्या सुधाकर श्रुंगारे यांचा करेक्ट कार्यक्रम करत काँग्रेसचे डाॅ. शिवाजी काळगे यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला पक्षाला पुन्हा मिळवून दिला… हा निकाल इथेच थांबणार नाहीये, तर यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे… लोकसभेच्या निकालाने अनेक दिग्गजांची पाचर बसली असली तरी अनेक इच्छुकांच्या आशाही पल्लवीत झाल्यात… गटातटाच्या राजकारणात निलंग्यापासून ते उदगीरपर्यंत जिल्ह्यात विधानसभेला कोण वरचढ ठरतंय? लातूराचे २०२४ चे ते ६ संभाव्य आमदार कोण? त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा..

यात पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो लातूर शहरचा… लातूर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन शहर व ग्रामीण अशा दोन मतदारसंघात करण्यात आल्यापासूनच लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख हेच यांनीच इथं निर्विवाद वर्चस्व केलं. शहर आणि ग्रामीण हे दोन्ही पट्टे विलासराव देशमुखांच्या दोन चिरंजीवांच्या अधिपत्याखाली येतात. या ठिकाणी वर्षांनूवर्षे काँग्रेसचं वर्चस्व असल्याने खासदारकीसाठीही इथलं मतदान काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने निर्णायक ठरलं… विलासरावांचे बंधू दिलीपराव देशमुख हेच काँग्रेसचे या मतदारसंघातील पडद्यामागील सूत्रधार असतात… लातूरमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहतो.. लातूर शहरातून अमित देशमुख यांच्या विरोधात इथं पारंपारिकत विरोधक असतात ते भाजपचे शैलेंद्र लाहोटी…मागील दोन विधानसभा निवडणुकीत शैलेंद्र लाहोटी यांचा अमित देशमुख यांनी मोठ्या फरकाने पराभव केलाय…. जातीय समीकरणे आणि विलासराव देशमुख यांचा वारसा अमित देशमुख यांची यंत्रणा ही काँग्रेसची जमेची बाजू राहीलीय… यंदाही लोकसभेतील विजय आणि भाजप विरोधी वातावरणामुळे अमित देशमुखांना नो चॅलेंज असंच मतदारसंघातील वातावरण आहे. लातूर शहरात भाजपला चेहरा नसल्यानं इथून कोण उमेदवार असेल, यावर इथली फाईट ठरणार आहे.. पण भाजपकडून माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांचे सुपुत्र अजित पाटील कव्हेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.. पण अमित पाटील २०२४ लाही प्लसमध्ये आहेत एवढं मात्र नक्की…

लातूर मधील दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो लातूर ग्रामीणचा… लातूर ग्रामीण विधानसभामध्ये अमित देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख हे आमदार असून मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सचिन देशमुख हे रिंगणात होते. पण त्यांना अवघी पाच हजार मतं पदरात पाडून घेता आले.. विशेष म्हणजे ग्रामीणमध्ये नोटाला दोन क्रमांकाची मतं असल्यानं यंदाही धीरज देशमुख मतदारसंघात स्ट्राँग पोजिशनमध्ये दिसतायत… यावेळेस भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी विधासभेची तयारी केलीय… यंदा महायुतीकडून रमेश कराड जर उमेदवार असतील तर धीरज देशमुख यांच्यासाठी कडवं आव्हान उभं राहू शकतं… जातीय समीकरण, राजकीय ताकद आणि स्थानिक नेत्यांच्या सहकार्याच्या जिवावर कराड यांची मदार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला लातूर ग्रामीणची लढत रंगतदार होऊ शकते…

आता पाहूयात निलंगा विधानसभा मतदारसंघ…. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर तब्बल ८ वेळा निलंगा मतदार संघातून आमदार राहिले…. मात्र कौटुंबिक वादामुळे त्यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर यांनी 2004 असली भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाजीराव यांनी आपला राजकीय वारसदार अशोक पाटील निलंगेकर यांना घोषित केल्यानं या वादाला तोंड फुटलं होतं… याच निवडणुकीत संभाजी यांनी आपल्या आजोबांचा म्हणजेच शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव यांचा धक्कादायक पराभव केला… पुढे २००९ च्या निवडणूकीत शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी नातवाचा पराभव करत पुन्हा आमदारकी मिळवली. त्यानंतर मात्र पुढील दोन्ही निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकरच निवडून आले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना कामगार व मदत, पुनर्वसन मंत्रिपद मिळालं. आता 2024 च्या विधानसभेत संभाजी पाटील यांना काका अशोक पाटील निलंगेकर याचं आव्हान असेल… त्याचबरोबर काँग्रेसचे युवा नेते असलेले अभय दादा सोळुंके हे सुद्धा काँग्रेसकडून निवडणूकीसाठी इच्छुक आहेत, पण निलंग्यात यावेळी विद्यमान आमदारांच्या विरोधात निकाल जाईल, असा एकूणच ट्रेंड पाहायला मिळतोय…

आता चौथा विधानसभा मतदारसंघ म्हणजे औसा …. जिल्हा जरी लातूर असला तरी लोकसभा निवडणुकीत औसा विधानसभा हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडला गेलाय… यंदाच्या लोकसभेला औसानं तब्बल 30 हजार मतांचं लीड मशालीच्या निंबाळकरांना दिल्याने भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची आमदारकी धोक्यात आलीय… अभिमन्यू पवार यांचे पारंपरिक विरोधक असलेले काँग्रसचे माजी आमदार बसवराज पाटील हेच आता भाजपमध्ये आल्यामुळे अभिमन्यू पवार यांना विरोधक राहिला नाहीये हे स्पष्ट आहे… त्यामुळे ठाकरे गटाकडून माजी आमदार दिनकरराव माने हे यंदा विधानसभेच्या मैदानात दिसतील…. दिलीपराव देशमुख हे दिनकर मानेंसाठी मोठी फिल्डिंग लावतील यात काही शंका नाही. माने विरुद्ध पवार अशी अटीतटीची लढत औसाला यामुळे बघायला लागू शकते… विधानसभेच्या निकालानं आघाडीचं पारड जड झाल्यानं आणि मशालीला मिळालेलं लीड पाहता इथून दिनकरराव माने यांच्या विजयाचे चान्सेस जास्त आहेत…

पाचवा मतदारसंघ येतो तो अहमदपूर – चाकूर विधानसभेचा…. अहमदपूर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. सध्या ते अजित पवार गटात असले तरी लोकसभेसाठी ते महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहिलेत, असं किमान आकडेवारी तरी सांगत नाहीये… बाबासाहेब पाटील यांचा वैयक्तिक जनसंपर्क मोठा आहे. साखर कारखाना, शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून त्यांनी या भागातील स्ट्रॉंग पोलिटिकल नेटवर्क तयार केलंय… अहमदपूरमधून भाजपच्या विनायक जाधव पाटलांनी नुकतीच राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतल्यामुळे अहमदपूर चाकूर मध्ये इंटरेस्टिंग लढत बघायला मिळेल… अहमदपूरात तिसरं नाव येते ते दिलीपराव देशमुख यांचं… २०१९ ला अहमदपूर विधानसभा अपक्ष म्हणून लढवलेल्या देशमुख यांच्या मत विभाजनामुळे भाजप उमेदवार विनायक जाधव यांचा पराभव झाला होता… सध्या दिलीपराव देशमुख हे लातूर लोकसभेसाठीही भाजपचे समन्वयक म्हणून काम पाहत होते… थोडक्यात महायुतीमध्ये अहमदपूरच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपमध्ये तिकिटासाठी कुस्ती होण्याची दाट शक्यता आहे…

आता पाहुयात पालकमंत्री प्रतिनीधीत्व करणाऱ्या उदगीर विधानसभा मतदारसंघाबद्दल… याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे आमदार आहेत. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट, तर उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली… आता युती सरकारमध्ये जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही तेच सांभाळतायत . राष्ट्रवादी पक्षाचा दलित चेहरा म्हणून लातूरमधून बनसोडे उदयास आले आहेत. येणाऱ्या विधानसभेला आता त्यांना उमेदवारी निश्चित आहेच पण संजय बनसोडे यांनी भाजपच्या सुधाकर शृंगारे यांना उदगीर मधून लीड दिली होती … ही लीड विधानसभेलाही कायम राहिली तर संजय बनसोडेंचा विधानसभेचा मार्ग मोकळा असेल, एवढं jमात्र नक्की… एकूणच काय तर लोकसभेतील विजयामुळे काँग्रेसला जिल्ह्यात पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे… त्यामुळे देशमुख कुटुंब आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ताकद लावली तर विधानसभेला महायुतीच्या आमदारांना मोठा फटका बसू शकतो, असं सद्यस्थितीत बोलायला काहीच हरकत नाही…लातूरच्या सहा मतदारसंघांमध्ये 2024 ला आमदार म्हणून कोणते सहा चेहरे निवडून येतील? तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा….

गोदाम बांधण्यासाठी मिळणार 12 लाख 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान; येथे सादर करा अर्ज

Godown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ज्या व्यवसायिकांना आणि शेतकऱ्यांना आपल्या मालाच्या साठवणुकीसाठी गोदाम उभारायचे आहे त्यांना सरकारकडून 12 लाख 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. थोडक्यात सांगायचे, झाले तर, राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान (कडधान्य) व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात 250 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधण्यासाठी खर्चाच्या 50 टक्के अनुदान मिळेल.

येथे करावेत अर्ज

महत्वाचे म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलै पूर्वी आपले अर्ज तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे जमा करावे लागणार आहेत. या अर्थासह सातबारा, आधारकार्ड, बँक खात्याचा आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत. लक्षात घ्या की, या कागदपत्रांमध्ये खोट निघाल्यास किंवा चुकीची माहिती आढळल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही.

दरम्यान, ज्या संघांना किंवा कंपन्यांना बांधकामासाठी परवानगी मिळाली आहे त्यांना गोदामाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर योजनेची रक्कम दिली जाईल. ही रक्कम शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पद्धतीने जमा केली जाईल. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी संघाने आणि कंपन्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे.

Viral Video: फायsssर है फायsssर ! कडेवर मुलाला घेऊन एका हाताने महिलेचा स्टंट

viral video bartender

Viral Video: अनेकदा तुम्ही टीव्ही किंवा सोशल मीडियावर पहिले असेल बारटेंडर अप्रतिम कलाकारी करून दाखवत असतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ व्हायरल सुद्धा होत असतात. पुण्यातील एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ही महिला आपल्या हाताने केवळ बाटल्या फिरवत नाही तर तिच्या कडेवर एक मूलही आहे . ती एका हाताने बाटल्या फिरवून दाखवत आहे. त्यामुळे तिचे हे टॅलेंट सोशल मीडियावर सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे.

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

कविता मेधर असे तिचे नाव असून तिने आपल्या इंट्राग्राम अकाउंट वरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तीने एका हाताने दोन काचेच्या बाटल्यांनी कसरत करताना दिसत आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्या बाळाला धरून आहे.तिने हिरवी सिल्क साडी नेसलेली आहे , एवढेच नाही तर पुढे जाऊन ती एका आग लागलेल्या बाटलीसोबत कसरत करताना व्हिडीओ (Viral Video) मध्ये दिसते. ती जेव्हा आपल्या उलट्या हातावर आग लावलेली बाटली स्थिरावते तेव्हा एका क्षणाला आपली नजर त्या व्हिडिओवर खिळून राहते. ती हे कौशल्य अगदी सहजतेने करते. पुष्पा 2 मधील “अंगारॉन” च्या संगीतावर हा व्हिडीओ (Viral Video) सेट केलेला आहे.

ही तर ‘सुपरवुमन’… (Viral Video)

खरेतर हा व्हिडीओ (Viral Video) 6 जून ला शेअर करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर आतापर्यंत या व्हिडिओला 2. 4 मिलियन लाईक्स आले आहेत. 12 हजाराहून अधिक युजर्सनी यावर कमेंट केल्या आहेत. काही युजर्सनी या व्हिडिओला कमेंट करताना भरभरून कौतुक केले आहे. तर मुलाला घेऊन स्टंट करणे धोकादायक असल्याचे सुद्धा म्हंटले आहे. एक युजरने या महिलेला “सुपरवुमन” म्हंटले आहे. तर दुसऱ्या एक युजरने हे सुपर टॅलेन्ट म्हंटले आहे. तर एका युजर ने “मुलांसोबाबत असा स्टेण्ट धोकादायक” असल्याचे म्हंटले आहे. तर एकाने “टॅलेंटेड मम्मी” शी उपमा या महिलेला (Viral Video) दिली आहे.