Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 645

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय

Chhatrapati Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईनंतर शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar) … पण शिवसेनेच्या फुटीत संभाजीनगरच्या… या बालेकिल्लाला सुरुंग लागला…आणि जवळपास सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिली … यानंतर महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती पाहता संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला उभारी मिळेल, अशी शक्यता होती… लोकसभेलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली… यात चंद्रकांत खैरे यांच्या विजयाचा अंदाज एक्झिट पोल पासून ते सर्वांनीच गृहीत धरला होता…पण निकाल लागला आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर तिकीट मिळालेल्या संदिपान भुमरेंचा छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्चर्यकारकरीत्या विजय झाला…याचाच अर्थ संभाजीनगरच्या जनतेने शिवसेना म्हणून कौल शिंदे गटाला दिलाय…

पण आता खरी कसोटी आहे ती विधानसभेची… संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे तब्बल सहा आमदार आहेत. यातील एक आमदार सोडले तर बाकीचे सर्व पाच आमदार शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे आता संभाजीनगरवर आणि त्याच अर्थाने शिवसेनेवर दावा करायचा असेल, तर या सहा जागांचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे… छत्रपती संभाजी नगरचे कोणते सहा विधानसभा मतदारसंघ शिवसेना कुणाची याचा कौल देणार आहेत? सध्याच्या घडीला शिंदे आणि ठाकरे गटांपैकी नेमके कुणाचे आमदार इथून निवडून येण्याचे जास्त चान्सेस आहेत? त्याचाच घेतलेला हा इंडेप्थ आढावा…

यातला पहिले येतो तो सिल्लोड विधानसभा मतदारसंघ… अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे विद्यमान आमदार… सध्या ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत… 2009 मध्ये काँग्रेस पक्षातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली… उभ 2009 ला काँग्रेसच्या कार्यकाळात ते राज्यमंत्रीही राहिले… पुढे 2014 ला काँग्रेसच्याच तिकिटावर निवडून आल्यानंतर 2019 ला मात्र ते भाजपामध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा झाल्या… फडणवीस, दानवे आणि भाजपतील इतर पक्षांसोबतची त्यांची जवळीक वाढली… काँग्रेस पक्षात राहूनच त्यांनी 2019 च्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंना पंजाचं निर्णायक बहुमत दिलं… स्वतः सत्तारांची इच्छा असतानाही त्यांचा भाजप प्रवेश रखडला… मात्र अखेर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोडची विधानसभा लढवली… आणि जिंकली देखील… त्यामुळे 2019 ते या क्षणापर्यंत एवढाच काय तो त्यांचा शिवसेनेशी संबंध आला… त्यातही शिवसेना फुटीत त्यांनी शिंदेंना साथ दिली आणि मंत्री देखील झाले… पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दानवेंचा प्रचार करूनही ज्या सिल्लोडमधून त्यांना निर्णायक मत पडायची.. त्याच मतदारसंघात ते पिछाडीवर गेले… एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण दानवेंचं काम करतो, पण दानवे आपल्याला विधानसभेला हवी तशी मदत करत नाहीत, असं म्हणून अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना मदत केल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं… विधानसभेच्या तोंडावरच त्यांनी दानवे – सत्तार वादाला पुन्हा नव्याने तोंड फोडलं… आणि महायुतीत मिठाचा खडा टाकला… हे प्रकरण पुढे जाऊन शांत होईलही… सत्तारांना महायुतीकडून उमेदवारी मिळेलही… पण भाजपचे पदाधिकारी यावेळेस त्यांचं काम करतील का? हा मोठा प्रश्न आहे… त्यात एका ओपिनियन पोलनुसार सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून 27 हजार 759 मतांनी पिछाडीवर जातील असा अंदाज आहे… थोडक्यात अब्दुल सत्तारांनी हिंदुत्वासाठी धरलेली शिंदेंच्या शिवसेनेची साथ शेवटी त्यांच्यावरच उलटताना दिसतेय… सत्तारांचा कार्यक्रम करण्यासाठी ठाकरे गटाकडून सिल्लोडच्या जागेची मागणी होऊ शकते… जर मशालीला ही जागा सुटली तर मुस्लिम आणि दलित समाजाची मतं त्यासोबतच ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती लक्षात घेता अब्दुल सत्तारांसाठी सध्यातरी आमदारकीची वाट बिकटच दिसतेय…

दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कन्नड विधानसभा… मराठवाडा आणि खानदेशच्या सीमेवरचा मतदार संघ म्हणजे कन्नड विधानसभा… शिवसेना ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत सध्या इथले विद्यमान आमदार… 2009 पासून सलग दोन टर्म इथे पक्ष बदलला मात्र आमदारकीचा चेहरा काही बदलला नाही तो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांचा… त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उदयसिंग राजपूत यांचा प्रत्येक वेळेस निसटता पराभव होत आला… मात्र 2019 ला निवडणुकीपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कन्नडचं तिकीटही मिळवलं…आणि कन्नडमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवला देखील… हर्षवर्धन जाधव यांनी तेव्हाही कडवी झुंज दिली पण त्यांना राजपूत यांचं लीड तोडता आलं नाही… शिवसेनेच्या बंडात छत्रपती संभाजीनगरमधून सर्वच आमदार शिंदेंना जाऊन मिळाले अपवाद फक्त उदयसिंग राजपूत यांचा… ते ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले… शिंदे गटाकडून त्यांना अनेकदा पक्षात येण्यासाठी ऑफर देण्यात आल्या…जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात आपण शिंदे गटात प्रवेश केला नाही…म्हणून सूड उगवला जातोय, असा आरोप करत राजपूत यांनी डीपीडीसीच्या बैठकीत फाईल भिरकावली… मुख्यमंत्री शिंदेंनी थेट कन्नड विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे नसल्याची खंत व्यक्त करत तो लवकरच ताब्यात घेऊ असं जाहीरपणे बोलूनही दाखवलं होतं…. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला कन्नड सोयगाव मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी काटे की टक्कर पाहायला मिळेल… कन्नडचा विजय फक्त महत्त्वाचाच नाही तर दोन्हीही शिवसेनेसाठी यामुळे प्रतिष्ठेचा ठरू शकतो…

तिसरा मतदारसंघ आहे वैजापूर विधानसभेचा… 1999 ते 2014 दरम्यान झालेल्या चारही लोकसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघाने शिवसेनेच्या पाठीशी आपली भक्कम ताकद उभी केली होती…मात्र 2014 ला युती तुटल्याचा फायदा घेत राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगांवर वैजापूरमधून 4709 मतांनी विजयी झाले होते… पण 2019 ला पुन्हा या मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश बोरनारे निवडून आले… या मावळत्या विधानसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वैजापूर मध्ये मोठा फटका बसला… बोरनारे सध्या शिंदे गटात गेल्यामुळे महायुतीकडून त्यांच्याच नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होऊ शकतो… राहिला प्रश्न महा विकास आघाडीचा… तर राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत विरोधातला उमेदवार कोण? याचं उत्तर आधीच दिलं… विधानसभेच्या आपल्या उमेदवारीवर मोहर उमटवण्यासाठी चिकटगावकर यांनी लोकसभेला खैरेंच्या पाठीशी मोठी ताकद लावली होती… मात्र तरीही ते पिछाडीवर गेले… त्यामुळे शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार रमेश बोरनारे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यातला सामना अटीतटीचा झाला तरी शिंदेंचे आमदार सध्या इथे प्लसमध्ये दिसतायेत…

चौथा मतदारसंघ आहे तो औरंगाबाद मध्य विधानसभा… शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल सध्या इथले विद्यमान आमदार… खरं म्हणजे 2009 ला ही प्रदीप जयस्वाल यांनी शिवसेनेकडूनच औरंगाबाद मध्यवर भगवा फडकवला होता… पण 2014 ला इम्तियाज जलील औरंगाबाद मध्य मधून एमआयएमच्या तिकिटावर आमदार झाले…पण 2019 ला जलील खासदार झाल्याने आणि शिवसेना आणि भाजप युतीमुळे राष्ट्रवादीकडून अब्दुल सय्यद यांनी रिंगणात उतरण्याचं धाडस दाखवलं असलं तरी प्रदीप जयस्वाल यांचा विजय सोपा झाला… शिवसेना फुटीत ते शिंदे गटात गेल्यामुळे आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातून संदिपान भुमरे यांच्या पाठीशी असणारं मतदान पाहता शिवसेनेचा शिंदे गट इथे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे… मात्र लोकसभेतील पराभवानंतर इम्तियाज जलील औरंगाबाद मध्य मधून विधानसभेसाठी उभे राहिले तर इथे खरी लढत ही प्रदीप जयस्वाल विरुद्ध इम्तियाज जलील अशी होण्याचे जास्त चान्सेस आहेत…

पाचवा मतदार संघ आहे औरंगाबाद पश्चिमचा… शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट इथले विद्यमान आमदार. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघातून शिरसाटांनी तब्बल तीन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे… जातीय समीकरणांमध्ये संमिश्र मतदारसंघ अशी औरंगाबाद पश्चिमची ओळख असल्यामुळे शिवसेनेसाठी शहरातील हा सर्वात सेफ मतदार संघ समजला जातो. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचा पराभव करत तब्बल 40 हजारच्या लीडने शिरसाट मावळत्या विधानसभेला निवडून आले होते. मात्र यंदा शिवसेनेची दोन शकले पडलेली असल्यामुळे इमआयएम, ठाकरे गट हे या मतदारसंघातून शिरसाटांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न करतीलच. पण तूर्तास तरी शिरसाटांची गाडी इथे जोरात आहे…

आता पाहूयात शिवसेनेचा शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे पैठणचा… छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून संदिपान भुमरे खासदार झाल्यामुळे पैठणची जागा सध्या रिक्त आहे. तब्बल पाच टर्म पैठण विधानसभेवर संदिपान भुमरे निवडून जात होते… मावळत्या विधानसभेला भाजपसोबत बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या दत्ता गोर्डे यांच्यामुळे भुमरे अडचणीत येतील, असं बोललं गेलं… पण भुमरे दणक्यात पाचव्यांदा आमदार झाले… लोकसभेला तर अनपेक्षितपणे भुमरेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली… आणि ते जिंकले सुद्धा… पण पैठण विधानसभा हा लोकसभेला छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही तर तो येतो जालना लोकसभेत… भूमरेंच्या याच पैठणमध्ये महायुतीचे रावसाहेब दानवे हे पिछाडीवर असल्याने भुमरे आणि शिवसेना शिंदे गटाची चांगलीच तारांबळ झाली आहे. भुमरे खासदार झाल्याने भाजपकडून डझनभर इच्छुकांची भाऊगर्दी असल्यामुळे भाजप पैठण आपल्यालाच मिळावा, यासाठी जोरदार बुलिंग करू शकतो… पण शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटल्यास दानवे आणि भाजपचे कार्यकर्तेच विरोधात गेले तर इथे महायुतीच महायुतीचा काट्याने काटा काढू शकते… त्यामुळे या सगळ्या गदारोळात सध्यातरी महाविकास आघाडीला उभारी घेण्याचा फुल टू स्कोप आहे… त्यामुळे शिंदे गटाचे पाच आणि ठाकरेंच्या बाजूने अवघा एक आमदार राहिलेल्या…लोकसभेला खासदारकीही गमावलेल्या…ठाकरे गटाला शिंदे गट आमदारकीलाही वरचढ ठरेल का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…बाकी छत्रपती संभाजीनगर मध्ये कुणाची हवा? ठाकरे की शिंदे? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा….

उद्धव ठाकरे CM पदाचा चेहरा?? राऊतांचे स्पष्ट संकेत; काँग्रेस- पवार गटाची भूमिका काय?

Uddhav Thackeray as CM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात येत्या ३ महिन्यात विधानसभा निवडणुका होतील. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सुद्धा विधानसभेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत देदीप्यमान यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा विश्वास सुद्धा वाढला आहे. मात्र मुख्यमंत्री कोण असेल यावर मात्र महाविकास आघाडीत एकमत दिसत नाही. ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव सुचवलं आहे. तसा स्पष्ट संदेश त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.

संजय राऊत म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम बघितलं आहे. लोकसभेतील अनेक घटकांचे मतदान उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे बघूनच झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद महत्व्वाची आहेच मात्र बिन चेहऱ्याचे सरकार अजिबात चालणार नाही असं राऊतांनी सांगितलं. संजय राऊतांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदासाठी समोर केलं आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीची सावध भूमिका –

दरम्यान, मुख्यमंत्री कोण व्हावा याच्यात मविआच्या कुठल्याही नेत्याने स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आले पाहिजे हे स्वारस्य ठेवले पाहिजे. मविआत निवडून आलेले आमदार ठरवतील की मुख्यमंत्री कोण त्यामुळे महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षातील नेत्याने मुख्यमंत्री कोण होणार अशी भाषा करणे टाळले पाहिजे असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोण यावर आम्ही चर्चा करत नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत असं म्हणत काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी अधिक बोलणं टाळलं.

दक्षिण आफ्रिकेने पुसला ‘चोकर्सचा’ शिक्का; अफगाणिस्तानला नमवून फायनलमध्ये धडक

SA Vs AFG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा (SA Vs AFG) 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा डाव 11.5 षटकांत 56 धावांत गारद झाला. या सोप्प्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 8.5 षटकांत 1 गडी गमावून 60 धावा करून सामना जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने त्यांच्यावरील चोकर्सचा शिक्का पुसला आहे. तब्बल २६ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे.

त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगलती आला. मार्को जेन्सन, कागिसो रबाडा, आणि नॉरकिया यांच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर एकही अफगाणी फलंदाज तिगू शकला नाही. अवघ्या 11.5 षटकांत 56 धावांत अफगाणिस्तानचा डाव आटोपला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने ९ षटकात या धावांचा पाठलाग केला आणि फायनलमध्ये धडक मारली. दक्षिण आफ्रिकेचा संघ महत्वाच्या सामन्यात कच खातो म्हणून त्यांना चोकर्स म्हणतात, मात्र यंदा त्यांनी हा शिक्का पुसून काढण्यात यश मिळवलं असून तब्बल २६ वर्षानंतर कोणत्याही विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषकातील सर्व उपांत्य फेरी

1992 एकदिवसीय विश्वचषक: इंग्लंडविरुद्ध 19 धावांनी पराभव
1999 एकदिवसीय विश्वचषक: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना बरोबरीत सुटला (ऑस्ट्रेलिया सुपर-6 टेबलमध्ये अव्वल असल्यामुळे अंतिम फेरीत पोहोचला)
२००७ एकदिवसीय विश्वचषक: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ गडी राखून पराभव
2009 T20 विश्वचषक: पाकिस्तानविरुद्ध 7 धावांनी पराभव
2014 T20 विश्वचषक: भारताविरुद्ध 6 गडी राखून पराभव
2015 एकदिवसीय विश्वचषक: न्यूझीलंडविरुद्ध 4 गडी राखून पराभव
2023 एकदिवसीय विश्वचषक: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 गडी राखून पराभव
2024 T20 विश्वचषक: अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

हा चौकीदार चोर नाही!! राहुल गांधींचे अभिनंदन करताना सामनातून मोदींना टोले

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकशाही, संविधान व लोकसभेचा चौकीदार म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्य म्हणजे हा चौकीदार चोर नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत झालेल्या देशातील चोऱ्यांचा हिशेब सरकारला संसदेत द्यावा लागेल व मोदी आणि त्यांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीस नव्याने चोऱ्यामाऱ्या करता येणार नाहीत. यापुढे मोदी-शहांची अवस्था ‘सरकार नको, पण राहुल गांधींना आवरा’ अशीच होईल असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून राहुल गांधींचे अभिनंदन करताना सामनातून मोदींना टोले लगावले आहेत.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल ?

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. फॅसिस्ट प्रवृत्तीच्या नरेंद्र मोदी यांच्यावर बहुमत गमावण्याची वेळ राहुल गांधींमुळेच आली. भारतीय राजकारणाचे खरे जननायक म्हणून ते पुढे आले. दोन ‘भारत जोडो’ यात्रांमुळे त्यांना संपूर्ण देशाचे पायी भ्रमण करून जनतेचे व देशाचे प्रश्न समजून घेता आले. 2024 ची निवडणूक हेराफेरी व हातचलाखी करून मोदी आणि त्यांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीने खिशात घातली, पण आता राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले असून पंतप्रधान मोदी यांची अवस्था कठीण होणार आहे. एकतर मोदी यांना स्क्रिप्ट व टेलिप्रॉम्पटरशिवाय धड बोलता येत नाही. प्रश्नापासून पळ काढण्याची त्यांची वृत्ती आहे. संसदेच्या सभागृहात त्यांचे बूड टिकत नाही. कारण गेली दहा वर्षे लोकसभेत विरोधी पक्षनेता असा नव्हताच. गुजरातची धर्मशाळा असल्याप्रमाणे मोदी-शहा हे लोकसभा चालवत होते. आता मोदी यांनी कितीही ठरवले तरी त्यांना लोकसभेतून पळता येणार नाही. लोकशाही, संविधान व लोकसभेचा चौकीदार म्हणून राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्य म्हणजे हा चौकीदार चोर नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत झालेल्या देशातील चोऱ्यांचा हिशेब सरकारला संसदेत द्यावा लागेल व मोदी आणि त्यांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीस नव्याने चोऱ्यामाऱ्या करता येणार नाहीत. यापुढे मोदी-शहांची अवस्था ‘सरकार नको, पण राहुल गांधींना आवरा’ अशीच होईल.

मोदी यांनी स्वतःचे बहुमत गमावले आहे. नायडू, नितीश, चिराग पासवान वगैरे लोकांच्या पाठिंब्यावर ते सरकार चालवत आहेत. त्यामुळे मोदी-शहांच्या चोऱ्या, दरोडय़ांचा हिशेब त्यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्यांकडेही मागितला जाईल. निवडणुकांच्या दरम्यान राहुल गांधी यांनी मोदी यांच्या अनेक फसव्या योजनांवर प्रहार केले. अग्निवीर, जातीय जनगणना, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, भाजपच्या संविधानविरोधी कृतीवर प्रहार केले. निवडणुकीची दिशा व हवा बदलण्याचे काम या निवडणुकीत राहुल गांधी यांनी केले. मणिपूर जळत असताना मोदी यांनी पंतप्रधान म्हणून त्यांचे कर्तव्य बजावले नाही, पण राहुल गांधी हे बेडरपणे मणिपुरात गेले व लोकांना भेटले. या सगळय़ाचा परिणाम झाला व मोदी यांचा मुखवटाच गळून पडला. राहुल गांधी हे गांभीर्याने राजकारण करीत नाहीत, परिवारवादामुळे ते नेते आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला, पण ‘भारत जोडो’ यात्रेने एक प्रगल्भ नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मोदी यांच्या हुकूमशाहीचा आपण पराभव करू शकतो हा आत्मविश्वास त्यांनी लोकांत निर्माण केला व आता विरोधी पक्षनेतेपद स्वीकारून आपण गांभीर्यपूर्वक राजकारण करीत आहोत हे दाखवून दिले.

मोदी-शहांचे राजकारण हे भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या पैशांचे बुडबुडे आहेत. हे बुडबुडे फुटायला आता सुरुवात होईल. मोदी-शहांचा खोटारडेपणा व क्रौर्य यांचा समाचार घेण्याची ताकद राहुल गांधी यांच्या प्रामाणिकपणात आहे. सरकारच्या अनेक नेमणुकांसाठी एक पेंद्रीय समिती असते. त्यात पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असतो. निवडणूक आयोग, लोकपाल, सीव्हीसी, सीबीआय, ईडी प्रमुखपदी सध्या भाजपचे ‘घरगडी’ नेमले जातात. आता राहुल गांधी यांचे मत व आवाज तेथे असेल, विरोधी पक्षनेता हा देशातील जनतेचा खरा बुलंद आवाज आहे. सरकारच्या चुका दाखविण्याचे काम विरोधी पक्षनेता करतो व तीच टीका मार्गदर्शन म्हणून स्वीकारून पुढे जाणारा पंतप्रधान खरा लोकनायक बनतो. मोदी हे नेमके या परंपरेच्या उलट वागले, मोदी-शहांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीने लोकसभा वेठीस धरली व या कृतीस काही जणांनी चाणक्य नीतीची उपमा दिली. देशाची न्यायालये, मीडिया आज गुदमरलेले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे गुजरात ईस्ट इंडिया कंपनीच्या भाडोत्री मारेकऱ्यांच्या टोळय़ांप्रमाणे काम करीत आहेत.

देशभरात मांडलेला हा उच्छाद भयंकर आहे. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांना अशा प्रकारे देश चालवणे मान्य आहे काय? लोकसभेत आता टोकदार प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता मिळाला आहे. संसद सुरू असताना पंतप्रधान मोदी यांना विदेश पर्यटन करता येणार नाही. कारण त्यांचा कर्दनकाळ राहुल गांधी त्या वेळी संसदेत बसलेला असेल. राहुल गांधी यांनी मोदी यांना अनेक विषयांवर खुल्या मंचावरील चर्चेचे आव्हान दिले व मोदी यांनी पळ काढला. लोकसभेच्या मंचावर आता ही चर्चा घडेल व जग टाळया वाजवील, राहुल गांधी यांना शिष्टाचाराचे ‘राम राम’ करूनच पंतप्रधान मोदी यांना आसनस्थ व्हावे लागेल. संसदेत ‘मोदी मोदी’चे फालतू नारेही बंद होतील. देशाची हवा बदलली आहे. लोकशाहीचा नवा चौकीदार लोकसभेत रुजू झाला आहे. राहुल गांधी यांचे अभिनंदन

लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; एम्स रुग्णालयात दाखल

L K Advani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची प्रकृती बिघडली असून त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वयोमानानुसार त्यांना प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर देखरेख केली जात आहे.

लालकृष्ण अडवाणी यांचे वय सध्या ९६ वर्ष असून एम्स येथील खाजगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. युरॉलॉजी अर्थात मूत्रविकारासंबंधी आजारांवर डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांना नेमका कसला त्रास होत आहे, याविषयी माहिती मिळालेली नाही. अडवाणी यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.

लालकृष्ण अडवाणी यांचं मेडिकल बुलेटिन एम्सचे डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञ लवकरच जारी करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, याच वर्षी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारनं देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच, भारतरत्न प्रदान केला होता. अडवाणींचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची (आता पाकिस्तानात) येथे झाला. १९४२ मध्ये अडवाणींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. अल्पावधीतच ते भारतीय राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व ठरले. प्रतिकूल काळात त्यांनी संपूर्ण देशभरात भाजपचा प्रचार प्रसार केला.

Gut Health : आतड्यांमधील घाण काढून टाकतात ‘हे’ पदार्थ; पचनसंस्थाही करतात मजबूत

Gut Health

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gut Health) बऱ्याच लोकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या असतात. अपचन, बद्धकोष्ठता, गॅस होणे आणि अजून बऱ्याच समस्या आपल्याला त्रास देतात. आतड्यांमध्ये जमलेली घाण यामागील मुख्य कारण असू शकते. कारण, लहान आतडे आणि मोठे आतडे हे आपल्या पचनसंस्थेतील महत्त्वाचे अवयव आहेत. त्यांच्यात किंचितही बिघाड झाला तर साहजिक आहे त्यांच्या कार्यात अडथळा येणार. परिणामी, शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित न झाल्याने आतड्यांवर ताण येतो. मग अशावेळी आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी काय खावे? ज्यामुळे आतड्या निरोगी आणि पचनसंस्था मजबूत राहिल, याची माहिती आज आपण घेणार आहोत.

आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे? हे माहित असेल तर पोटाशी संबंधित समस्या कधीच होत नाहीत. शिवाय आपल्या काही सवयी देखील आतड्यांचे आरोग्य खराब करण्यास कारणीभूत असतात. (Gut Health) जसे की, यावेळी आणि चुकीचे अन्नपदार्थ खाणे, मद्यपान आणि धूम्रपान करणे. अशा सवयींमुळे आतड्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. असे होऊ नये म्हणून तुमच्या नियमित आहारात खालील पदार्थांचा समावेश करावा.

कच्ची केळी (Gut Health)

कच्च्या केल्याचे सेवन केल्यास आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत मिळते. कारण, कच्ची केळी खाल्ल्याने आरोग्यदायी आंत मायक्रोबायोम वाढते. हे प्रतिरोधक स्टार्चने समृद्ध असल्यामुळे याचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर संतुलित राहते. यासह इन्सुलिन संवेदनशीलतादेखील सुधारते.

दही

दही प्रो- बायोटिक आहार असल्यामुळे याचे नियमित सेवन करणे आपल्या आतड्यांसाठी फायदेशीर ठरते. दह्यातील अनुकूल जीवाणू हे आतड्यांतील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढवतात. (Gut Health) परिणामी पचन सुधारते. इतकेच नव्हे तर, दह्याचे नियमित सेवन केल्यास आरोग्याचे नुकसान करणारे जीवाणू शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठीही मदत करते.

अळशी

अळशीमध्ये असणारे फायबर हे विरघळणारे असते. तसेच यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड आपल्या आतड्यांमधील जळजळ कमी करण्यास सहाय्यक ठरते. त्यामुळे नियमित आपल्या आहारात १ ते २ चमचे अळशीचा समावेश करणे पचनसंस्थेला फायदेशीर ठरते.

ग्लुटेनमुक्त ओट्स

ग्लुटेनमुक्त ओट्सदेखील विरघळणाऱ्या फायबरचा चांगला स्रोत आहे. (Gut Health) त्यामुळे आतड्यांच्या आरोग्यासाठी ग्लुटेनमुक्त ओट्सचे सेवन करणे अत्यंत चांगले मानले जाते.

अॅव्होकॅडो

अॅव्होकॅडो हे एक असे फळ आहे ज्यामध्ये विरघळणारे फायबर आणि निरोगी चरबीचा समावेश आहे. त्यामुळे अॅव्होकॅडो आरोग्यासाठी प्रचंड लाभदायक सिद्ध होते. अॅव्होकॅडोमधील पोषक घटक आतड्यांची शोषण क्षमता सुधारते आणि पचनक्रिया सुलभ करते. (Gut Health)

STSS Bacteria : माणसांत वेगाने पसरतोय ‘हा’ जीवघेणा आजार; जखमेतून मांस खाणाऱ्या विषाणूचा जगभरात हाहाकार

STSS Bacteria

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (STSS Bacteria) पावसाळ्याच्या दिवसात संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात. हवेतील आद्रता आणि त्यात मिसळले जाणारे धुळीचे कण हे घातक विषाणूंच्या वाढीस कारणीभूत असतात. हे विषाणू जसजसे सक्रिय होतात तसतसे विविध संसर्ग पसरू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात बरीच लोक सतत आजारी पडताना दिसतात. कोरोनानंतर नुसतं विषाणूबद्दल बोलायचं झालं तरी कित्येकांच्या अंगावर काटा उभा राहताना दिसतोय. अशातच एका नव्या बॅक्टेरियाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. हा बॅक्टेरिया आपल्या शरीरावरील जखमेतून आतमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे होणाऱ्या आजराचे नाव स्ट्रेप्टो- कॉकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम असे असून हा आजार इतका घातक आहे की, त्याच्या प्रभावामुळे एखादी व्यक्ती दगावू शकते. याविषयी अधिक जाणून घेऊया.

स्ट्रेप्टो-कॉकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (STSS Bacteria)

वृत्तानुसार, कोव्हीडनंतर मानवी जीवावर उठलेल्या या नव्या रोगाचे रुग्ण जपानमध्ये आढळले आहेत. या आजाराचे नाव स्ट्रेप्टो-कॉकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम अर्थात एसटीएसएस असे आहे. हा आजार मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे होतो असे बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात हा जीवाणू शरीरावरील जखमांमध्ये शिरून आपले मांस खात नाही. तर शरीरातील ऊतींचा नाश करतो. जे रुग्णासाठी अतिशय धोकादायक स्थिती निर्माण करते आणि यामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो.

संसर्ग झाल्यास ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू

एसटीएसएसने संक्रमित व्यक्तीचा केवळ ४८ तासांच्या आत मृत्यू होतो, असे जपानमधील प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. वृत्तानुसार, २०२४ या सालात आतापर्यंत जपानमध्ये एकूण १ हजार प्रकरणे समोर आली आहेत. (STSS Bacteria) या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मानवी जीवन संपुष्टात येऊ शकते. दरम्यान, काही तज्ञांनी ही रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. या रोगाचा मृत्यू दर हा ३०% असून रुग्णांची वाढती संख्या मोठे संकट असल्याचे भासत आहे.

STSS चा संसर्ग कसा होतो?

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा जीवघेणा आजार स्ट्रेप्टो- कोकस नामक बॅक्टेरियामुळे होतो. या बॅक्टेरियाचे एकूण २ प्रकार आहेत. यापैकी एक ग्रुप- ए स्ट्रेप्टो-कोकस तर दुसरा ग्रुप- बी स्ट्रेप्टो- कोकस म्हणून ओळखला जातो. यातील ग्रुप- ए स्ट्रेप्टो- कोकस हा अत्यंत गंभीर बॅक्टेरिया समजला जातो. या विषाणूचा संसर्ग झाल्यास उद्भवणाऱ्या लक्षणांना ‘टॉक्सिक शॉक सिंड्रोम’ म्हणतात. (STSS Bacteria) हा एक जीवघेणा आजार असून वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो.

टॉक्सिक शॉक सिंड्रोमची कारणे

स्टॅफिलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकससारख्या भयंकर बॅक्टेरियाच्या प्रभावामुळे हा आजार होतो. रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तीला हा संसर्ग लगेच होतो. एखाद्या दुखापतीत झालेली जखम उघडी राहिली असेल किंवा एखादी शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा लोकांना हा संसर्ग लगेच होऊ शकतो. (STSS Bacteria) वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

टॉक्सिक शॉक सिंड्रोमची लक्षणे

  • ताप
  • जखम ओली राहणे
  • मुरुम फुटून रक्त वाहणे
  • शस्त्रक्रिया झाली असेल तर खूप वेदना होणे
  • रक्तदाब अचानक कमी होणे
  • चक्कर येणे
  • मळमळ, उलट्या होणे
  • हाता- पायांना सूज येणे

प्रतिबंध आणि उपचार

तसे पाहिले तर, भारतात या सिंड्रोमची प्रकरणे जास्त नाहीत. मात्र, असे असले तरीही आपल्याला आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे सतत हात धूत राहा. (STSS Bacteria) व्हायरल इन्फेक्शन असल्यास मास्कचा वापर करावा. कोणतीही जखम चिघळत असेल, वाढत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Kitchen Tips : खिडकीच्या जाळ्या झाल्यात धुळकट ? केवळ 3 गोष्टी आणि खिडक्या होतील चकाचक

window cleaning hacks

Kitchen Tips : घराची स्वच्छता करणे म्हणजे मोठे वेळखाऊ आणि मेहनतीचे काम. त्यातही खिडक्यांची स्वच्छता करणे म्हणजे जास्त मेहनत. खिडक्यांना जाळ्या बसवल्या असतील तर त्यामध्ये अधिकच घाण अडकून (Kitchen Tips) बसते.

घरात डास, माशा, पाली कीटक येऊ नयेत म्हणून घरांच्या खिडक्यांना जाळया लावल्या जातात. किचनच्या खिडकीची जाळी तर साफ करताना खुप मेहनत घ्यावी लागते. कारण त्यावर फोडणीचा चिकट धूर जमा झालेला असतो. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात अशा काही सोप्या ट्रिक्स (Kitchen Tips) सांगणार आहोत ज्यामुळे खिडक्यांची जाळी आरामात स्वच्छ होईल चला तर मग जाणून घेऊया…

किचनची जाळी साफ करण्यासाठी बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि डिश वॉश लिक्विड ह्या तीन गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. किचनची जाळी साफ (Kitchen Tips) करण्यासाठी तुम्हाला एक प्रकारचा स्प्रे तयार करायचा आहे हा स्प्रे तयार करण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये पाणी घ्या त्यात एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा लिक्विड डिश वॉश घालून मिक्स करा. आता तयार मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा अशाप्रकारे क्लीनर लिक्विड वापरण्यासाठी तयार आहे

खिडकीच्या जाळीवरची धूळ आधी साफ (Kitchen Tips) करून घ्या त्यानंतर त्यावर क्लीनर लिक्विड स्प्रे करा एक्सपंच घ्या खिडकीची जाळी घासून काढा. धूळ पुसून काढा या क्लीनर लिक्विड चा वापर खिडक्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी हे तुम्ही वापरू शकता.

अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांना पक्षात घेण्यासाठी शरद पवारांनी ठेवली अट; म्हणाले…

Sharad pawar
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्याचा फटका अजित पवार गटाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसला आहे. तर याच निवडणुकीत शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) मैदान गाजवले आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर गेलेले 18 ते 19 आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटात परत येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु पुन्हा घरवापसी करणाऱ्या आमदारांना शरद पवार पक्षात घेतील का असा प्रश्न सगळ्यात विचारला जात आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.

मधल्या काळात अजित पवारांबरोबर गेलेले आमदार पुन्हा पक्षात आले तर शरद पवार गटाची भूमिका काय राहील याबाबत स्वतः शरद पवार यांनी माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “जो कोणी पक्षाच्या हितासाठी कार्य करेल, त्याला आम्ही परत घेऊ” त्याचबरोबर, “पक्षाच्याही त्याला धोका निर्माण करणाऱ्यांना आम्ही परत घेणार नाही” असे शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे.

इतकेच नव्हे तर, “आम्ही आधी निवडणुका पार पाडू, आणि त्यानंतर पक्षाच्या हिताचे विचार करु. आमच्या पक्षात सहकार्याचा आणि विश्वासाचा महत्त्वाचा आधार आहे. जे सहकाऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरतील, त्यांनाच परत घेण्यात येईल” असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळेच शरद पवार हे अजित पवारांसोबत गेलेल्या समर्थकांना परत घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे म्हणले जात आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक पार पडल्यापासून राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. यात अजित पवारांबरोबर गेलेले आमदार पुन्हा शरद पवार गटात येतील, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच सध्या अजित पवार गटातील अनेक नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे, अजित पवार गटातील समर्थक पुन्हा घर वापसी करतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Special FD Scheme : ‘या’ बँकांच्या खास FD वर मिळतंय 8% व्याज; गुंतवणुकीसाठी फक्त 4 दिवस बाकी

Special FD Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Special FD Scheme) देशभरात गुंतवणूकदारांची संख्या चांगलीच मोठी आहे. कोणताही गुंतवणूकदार आपला पैसे गुंतवताना सुरक्षा आणि निश्चित परतावा या दोन गोष्टी आवर्जून लक्षात घेतो. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार सरकारी योजना तसेच बँकेच्या विविध योजनांचा एक भाग होताना दिसतात. दरम्यान, इंडियन बँक व पंजाब आणि सिंध बँक या दोन बँकांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

या दोन्ही बँक आपल्या ग्राहकांना विशेष FD योजना ऑफर करत आहेत. (Special FD Scheme) ज्यामध्ये ८% व्याज दिले जात आहे. त्यामुळे सार्वधिक परतावा मिळू शकतो. मात्र, यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी फक्त ४ दिवस शिल्लक आहेत. येत्या ३० जून २०२४ रोजी ही स्कीम बंद केली जाईल आणि यानंतर तुमची ईच्छा झाली तरीही तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही. चला तर या दोन विशेष एफडी योजनांविषयी अधिक जाणून घेऊया.

इंडियन बँक विशेष FD योजना (Special FD Scheme)

सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने आपल्या ग्राहकांना विशेष एफडी योजना ऑफर केली आहे. यात ग्राहकांना ३०० दिवस आणि ४०० दिवसांची FD करता येईल. यातील ३०० दिवस कालावधीची FD इंड सुप्रीम तर ४०० दिवस कालावधीची FD इंड सुपर म्हणून ओळखली जात आहे. यामध्ये केवळ ३० जून २०२४ पर्यंत गुंतवणूक करता येईल.

इंड सुपर ४०० दिवस – ही इंडियन बँकेची विशेष एफडी आहे. जी कॉल करण्यायोग्य आहे. म्हणजेच यातून तुम्हाला वेळेपूर्वी पैसे काढण्याचा पर्याय दिला जाईल. (Special FD Scheme) या एफडीचा कालावधी ४०० दिवसांचा असून यामध्ये १०,००० रुपये ते २ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या एफडीवर सर्वसामान्यांना ७.२५%, ज्येष्ठ नागरिकांना ७.७५% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ८% व्याजदर दिला जात आहे.

इंड सुपर ३०० दिवस – हीसुद्धा इंडियन बँकेची विशेष एफडी आहे. जिचा कालावधी ३०० दिवस असून यामध्ये ५००० रुपयांपासून ते २ कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करता येईल. या एफडीवर सर्वसामान्यांना ७.०५%, ज्येष्ठ नागरिकांना ७.५५% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.८०% व्याजदर दिला जात आहे.

पंजाब आणि सिंध बँक विशेष FD योजना

पंजाब आणि सिंध बँकदेखील आपल्या ग्राहकांना विशेष एफडी योजना ऑफर करत आहेत. यामध्ये ग्राहकांना २२२ दिवस, ३३३ दिवस आणि ४४४ दिवसांची विशेष एफडी करता येईल. या एफडीवर कमाल ८.०५% व्याज उपलब्ध आहे. (Special FD Scheme) पंजाब आणि सिंध बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२२ दिवस कालावधीच्या एफडीवर ७.०५%, ३३३ दिवस कालावधीच्या एफडीवर ७.१०% आणि ४४४ दिवस कालावधीच्या एफडीवर ७.२५% व्याजदर दिला जात आहे. ही बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना ४४४ दिवस कालावधीच्या एफडीवर ८.०५% इतका व्याजदर देत आहे.