Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 648

RBI चा नवीन नियम लागू!! 1 जुलैपासून या बँक ग्राहकांना करता येणार नाही क्रेडिट कार्ड पेमेंट

credit card payment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 1 जुलैपासून भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवे नियम लागू होणार आहेत. RBI च्या या नव्या नियमांमुळे क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामुळे क्रेडिट कार्डची सर्व पेमेंट BBPS द्वारे करावी लागणार आहेत. पेमेंट इकोसिस्टममध्ये कार्यक्षमता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी आरबीआयकडून हे नियम लागू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलैपासून लागू होणाऱ्या नियमांमुळे क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्ये काही बदल होणार आहेत. ज्याचा PhonePe, Cred, BillDesk आणि Infibeam Avenues सारख्या प्लॅटफॉर्मवर परिणाम होईल. सध्या क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी 34 बँकांपैकी फक्त 8 बँकांनी BBPS वर बिल पेमेंट सक्रिय केले आहे. ज्यात एसबीआय कार्ड, BOB कार्ड, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, फेडरल बँकांचा समावेश आहे.

महत्वाचे म्हणजे, ग्राहकांना क्रेडिट कार्ड देणाऱ्या HDFC बँक, ICICI बँक आणि Axis अशा महत्त्वाच्या बँकांनी BBPS सक्रिय केलेले नाही. या बँकांनी BBPS सक्रिय न केल्यामुळे PhonePe आणि Cred सारख्या 30 जूननंतर बँकांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड पेमेंट्द्वारे व्यवहाराची प्रक्रिया करू शकणार नाहीत. आतापर्यंत याच बँकांनी तब्बल 5.1 कोटी क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. परंतु त्यांनी BBPS प्रकिया पुर्ण केलेली नाही.

Cleaning Tips : अग्गबाई भारीच की…! ना पाणी, ना साबण 2 मिनिटात कंगवा होईल स्वच्छ

cleaning Hacks

Cleaning Tips : कंगवा ही रोज वापरात येणारी वस्तू आहे. छोटासा कंगवा आपले केस विंचरण्यासोबत आपल्याला डोक्याच्या त्वाचेला रक्ताभीसरितही करतो. कंगवा रोज रोज वापरल्यामुळे त्यामध्ये केसातील धूळ, घाण, तुटलेले केस राहून जातात. हे कंगवे साफ करणे म्हणजे वेळखाऊ (Cleaning Tips) काम जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा कंगवा अगदी दोनच मिनिटात विना पाणी आणि साबण स्वच्छ होईल. चला तर मग जाणून घेऊया…

खरंतर केस विंचरण्याचा कंगवा अस्वछ असेल तर डोक्यामध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते. असे म्हणतात की केसांच्या (Cleaning Tips) आरोग्याच्या दृष्टीने एकमेकांचे कंगवे वापरू नयेत. घरात प्रत्येकाचा वेगळा कंगवा असावा.

आजच्या लेखात आपण पाणी आणि शाम्पू यांचा वापर न करता कशा पद्धतीने कंगवे (Cleaning Tips) साफ करू शकतो हे पाहणार आहोत. याबाबतची माहिती एका यूट्यूब चैनल द्वारे देण्यात आली आहे. ही ट्रिक वापरण्यासाठी सर्वात आधी घाण झालेल्या कंगवा घ्या त्यावर टेलकम पावडर शिंपडा. कंगव्याला पावडरने कोट केल्यानंतर खराब टूथब्रशच्या आणि टूथब्रशने (Cleaning Tips) कंगव्याच्या दातामध्ये अडकलेली घाण काढा. या सोप्या ट्रिक मुळे कंगवा चुटकी सरशी स्वच्छ होईल. शिवाय पाणी आणि साबण शिवाय अधिक मेहनतही लागणार नाही.

कंगवे साफ करण्यासाठी दुसरी एक सोपी ट्रिक आहे पण यासाठी तुम्हाला पाणी आणि साबण म्हणजेच शाम्पूचा देखील वापर करावा (Cleaning Tips) लागणार आहे. तर ही पद्धत वापरण्यासाठी एका छोट्या बादलीमध्ये कोमट पाणी घ्या त्यामध्ये शाम्पू घालून मिक्स करा. शाम्पूच्या पाण्यात कंगवा भिजत ठेवा आणि काही वेळानंतर ब्रश न हा कंगवा घासून साफ करा त्यामुळे काही मिनिटांमध्ये कंगवा स्वच्छ होईल.

भारतातील हा किल्ला लांबून दिसतो अन् जवळ जाताच गायब होतो!! गावकऱ्यांवर आजही भीतीचे सावट

Gharkundal Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील हजारो किल्ले स्थापित आहे. परंतु यातील गडकुंदरचा किल्ला (Gharkundal Fort) अतिशय रहस्यमय असल्याचे आजवर सांगण्यात आले आहे. हा किल्ला उत्तर प्रदेशातील झाशी येथे वसलेला आहे. या किल्ल्यावर जायला देखील लोक घाबरतात. कारण की हा किल्ला भुतांनी पछाडलेला आहे असे गावकऱ्यांकडून सांगितले जाते. खरे तर, ऐतिहासिक पुस्तकांमध्ये देखील या किल्ल्याविषयी फारशी माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे मोजक्याच माहितीवर सर्वजण विश्वास ठेवतात.

असे म्हटले जाते की, हा किल्ला अकराव्या शतकात बांधण्यात आला होता. या किल्ल्यात एकूण पाच मजले आहेत. परंतु यातील तीन मजले किल्ल्यावरती दिसतात. तर इतर दोन मजले जमिनीखाली बांधलेले आहेत. गावकऱ्यांच्या मध्ये हा किल्ला 1500 ते 2000 वर्षे जुना आहे. हा किल्ला भुलभुलैयासारखा बांधण्यात आला होता. त्यामुळे या किल्ल्यात प्रवेश करणारा प्रत्येकजण गोंधळून जातो. अनेकजण तर या किल्ल्याच्या आतमध्येच अडकून बसतात.

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, गडकुंदर किल्ला चार ते पाच किलोमीटर अंतरावरून दिसतो. परंतु जसजसे या किल्ल्याच्या जवळ जाईल तस तसे हा किल्ला दिसत नाही. तसेच, या किल्ल्यावर तुम्ही रस्त्याच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तिथे पोहोचू शकणार नाही. कारण, किल्ल्यावर पोचण्याचा मार्ग देखील वेगळा आहे. त्यामुळे सहसा या किल्ल्यावर कोणीही जात नाही.

गडकुंदर किल्ल्याविषयी बोलताना स्थानिक लोक सांगतात, एकदा या किल्ल्याजवळून मिरवणूक गेली होती. त्यावेळी 50 ते 60 लोक या किल्ल्यावर गेली होती. परंतु ही लोक पुन्हा परत आली नाही. असे म्हणतात की या किल्ल्यावर हिरे आणि सोने लपवण्यात आले आहेत. यामुळे अनेकजण हे सोने शोधण्यासाठी किल्ल्यावर येतात. परंतु प्रत्येक व्यक्तीला येथे वेगवेगळा भास होतो.

आजपासून HDFC बँकेची ही सेवा होणार बंद; या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकते नुकसान

HDFC bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुमचे बँक खाते जर HDFC बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की, HDFC बँक आजपासून आपली अत्यंत महत्त्वाची सेवा बंद करणार आहे. यामुळे ग्राहकांना नुकसान देखील सहन करावे लागू शकते. HDFC बँकेने नुकतेच जाहीर केली आहे की, आता बँक कमी-मूल्याच्या UPI व्यवहारांसाठी मेसेज पाठवणे थांबवणार आहे. म्हणजेच बँकेतील ग्राहकांनी यूपीआय पेमेंटद्वारे शंभर रुपयांपेक्षा कमी रुपयांचे व्यवहार केले तर त्यांना मेसेज मिळणार नाही.

सध्या HDFC बँक आपल्या ग्राहकांसाठी अनेक विविध सुविधा आणत आहे. तर काही सुविधांमध्ये बदलही करत आहे. यातीलच एक भाग म्हणून बँकेने कमी रकमेच्या व्यवहारांसाठी पाठवण्यात येणारे मेसेज थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता इथून पुढे बँकेच्या ग्राहकांनी पाचशे रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवली किंवा देय केली तर याचं व्यवहारांचे मेसेज ग्राहकांना दिले जातील. तर किरकोळ रकमांच्या व्यवहाराची माहिती इमेलद्वारे दिली जाईल. त्यामुळे ग्राहकांना आपले ई-मेल अपडेट करणे आवश्यक आहे

अशा पद्धतीने करा Email Update

1) प्रथम https://www.hdfcbank.com/ या वेबसाईटवर जावा.
2) पुढे Insta Service पर्याय निवडा.
3) नंतर मेनू स्क्रोल करत अपडेट ईमेल आयडीचा पर्याय शोधा.
4) पुढे लेट्स बिगिन वर क्लिक करा.
5) येथे बँकेत दिलेला मोबाईल नंबर टाका.
6) यानंतर डीओबी, पॅन किंवा ग्राहक आयडी ही माहिती भरा.
7) पुढे Get OTP वर क्लिक करा.
8) यानंतर आलेला OTP टाका आणि पुढील सूचना वाचा.

Pune Mahanagarpalika 2024 | पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; इतक्या पदांची होणार भरती

Pune Mahanagarpalika 2024

Pune Mahanagarpalika 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्याच लोकांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता पुणे महानगरपालिका अंतर्गत (Pune Mahanagarpalika 2024) विविध पदांसाठी मोठी भरती निघालेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरती अंतर्गत समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 12 रिक्त जागा आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना पोस्टाने अर्ज पाठवायचे आहे. त्याचप्रमाणे 29 जून 2019 चे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे

पदाचे नाव | Pune Mahanagarpalika 2024

या भरती अंतर्गत समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदांची संख्या

या भरती अंतर्गत 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा त्याचप्रमाणे मास्टर ऑफ सोशल वर्क पदवीधर असावा.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती | Pune Mahanagarpalika 2024

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, 1 ला मजला, 663 शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे 411002 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे.

अधिकृत वेबसाईटला वेळ देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Mhada Lottery 2024 : स्वस्तात घर हवंय ? मग अशा पद्धतीने भरा म्हाडाचा फॉर्म

Mhada Lottery 2024 : सध्यच्या महागाईच्या जमान्यात सर्वसामान्य व्यक्तींना घर घेणे म्हणजे एखाद्या स्वप्नासारखे आहे. त्यातही पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपले हक्काचे घर घेणे मोठे जिकिरीचे होऊन बसले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या वाढलेल्या किंमती. मागच्या काही वर्षात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा स्थितीत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘म्हाडा ‘ची योजना वरदान ठरते. पण म्हाडा (Mhada Lottery 2024) चा अर्ज भरायचा कसा ? त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ? चला पाहूया…

नोंदणी करण्यासाठी (Mhada Lottery 2024)

तुम्हाला जर म्हाडा साठी सर्जा करायचा असेल तर सर्वात आधीच रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करावी लागेल. यासाठी तुम्ही म्हाडा ची अधिकृत वेबसाईट housingmhada.gov.in वर जाऊ शकता. ही नोंदणी करत असताना तुम्हाला या नोंदणीसाठी आधार आणि पॅन कार्ड ची आवश्यकता लागेल. याशिवाय तुम्हाला इतर माहिती देखील भरावी लागेल त्यानंतर तुम्ही म्हाडा (Mhada Lottery 2024) मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र ठराल.

म्हाडासाठी अर्ज करताना तुम्ही कोणत्या कोट्यातून आणि गटातून फॉर्म भरणार आहात हे आधी ठरवा कारण सर्वांना न्याय मिळावा म्हणून म्हाडामध्ये विभाग वारी करण्यात आली आहे. पत्रकार कोटा, डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक इत्यादी अनेक विभाग आहेत. मग तुमच्या पगाराच्या (Mhada Lottery 2024) उत्पन्नानुसार त्या गटामध्ये तुम्ही अर्ज करू शकता.

कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • कॅन्सल चेक
  • अधिवास प्रमाणपत्र
  • वाहन चालवण्याचा परवाना
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जन्म प्रमाणपत्र
  • अर्जदाराच्या संपर्काचे तपशील.

कोण करू शकते अर्ज? (Mhada Lottery 2024)

म्हाडाच्या घरासाठी अठरा वर्षावरील कोणताही नागरिक अर्ज करू शकतो. शिवाय त्यांनी महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्यास असणे गरजेचे आहे. म्हाडाचे अर्ज करताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो अशावेळी तुमचे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 02226598924/9834637538 या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता शिवाय,18004250018 या क्रमांकावर ही संपर्क साधू शकता. लॉटरीमध्ये तुमचे नाव दिसल्यास तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागतील. आधी कागदपत्रे नसल्यास म्हाडा तुम्हाला वेळ द्यायचा परंतु नवीन नियमानुसार तुम्हाला दिलेल्या तारखेला सर्व कागदपत्र जमा करावे लागतील.

या चुका टाळा (Mhada Lottery 2024)

तुमचं नाव पत्ता आणि कामाची माहिती अचूकपणे द्या कागदपत्र तपासताना काही तफावत आढळल्यास तुमचा फॉर्म रद्द केला जातो. नोंदणी आणि पेमेंट पावत्या दोन्ही डाऊनलोड करा आणि जपून ठेवा. या पावत्या हरवल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. म्हाडाची फाईल करताना नेहमी चार फाईल तयार करा. एक बँकेसाठी दुसरी म्हाडा कार्यालयासाठी आणि दोन तुमच्यासाठी कारण फाईल गहाळ होण्याची अनेक प्रकरण समोर आली आहेत

महत्वाची गोष्ट

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला म्हाडाचे (Mhada Lottery 2024) घर मिळाले नाही तर अर्ज भरून दाराने भरलेली रक्कम सात दिवसात परत केले जाते तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटवर तुमच्या प्रोफाईल मध्ये लॉगिन करून ते तपासू शकता.

ITR फॉर्म भरताना ज्येष्ठ नागरिकांनी हे नियम लक्षात घ्यावेत; लाखो रुपयांची होईल बचत

ITR form

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| इन्कम टॅक्स रिटर्नचा (ITR) फॉर्म भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. त्यामुळेच या फॉर्म बाबत ज्येष्ठ आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी आखून दिलेले महत्त्वाचे नियम समजून घेणे, आवश्यक आहेत. हे नियम समजले तर ज्येष्ठ नागरिकांची लाखो रुपयांची बचत होऊ शकते. लक्षात घ्या की, आयकर विभाग ज्येष्ठ नागरिकांना कर विवरणपत्र भरण्यासाठी एक विशेष प्राप्तिकर रिटर्न (ITR) फॉर्म प्रदान करते. ज्यामध्ये ते कर सूट मिळवू शकतात. हा फॉर्म ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाच्या श्रेणीनुसार आयटीआर फॉर्म भरावा लागतो. आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले पेन्शनधारक कर भरण्यासाठी ITR 1 वापरू शकतात. परंतु मालमत्ता, इतर स्रोत किंवा भांडवली नफा यातून उत्पन्न असणाऱ्यांनी ITR-2 चा पर्याय निवडला पाहिजे. व्यवसायातून कमावणाऱ्या पेन्शनधारकांनी ITR-3 किंवा ITR-4 फॉर्म भरावा.

कर मर्यादा – महत्वाचे म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांना 3 लाख रुपयांची मूलभूत मर्यादा आहे. तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादा 5 लाख रुपये आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत समाविष्ट असलेल्यांसाठी देखील मूळ मर्यादा 3 लाख रुपये आहे.

फॉर्म 16 – ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनच्या स्वरूपात उत्पन्न मिळत असेल तर त्यानंफॉर्म 16 भरण्याचा अधिकार आहे. फॉर्म 16 मध्ये त्यांच्या पगाराचे घटक समाविष्ट आहेत. यात त्यांच्या टीडीएसचीही माहिती असते. ज्येष्ठ नागरिक फॉर्म 26AS मध्ये सर्व माहिती असते.

फॉर्म 15H – जेव्हा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने मिळवलेले व्याज एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांच्या लागू मर्यादेपेक्षा जास्त असते तेव्हा बँका TDS कापतात. परंतु ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या बँकांना त्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असल्यास TDS कापून न घेण्याची विनंती करू शकतात. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बँकांमध्ये फॉर्म 15H भरावा लागतो.

Real Estate : देशात अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी सुद्धा ‘वजनात’…! घरांच्या किंमतीत मोठी वाढ

real estate magicbricks

Real Estate : मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात जबरदस्त वाढ झाली आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये तर घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य कुटुंबाना घर घेणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच घर खरेदीदार अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी मध्ये सुद्धा अधिक रस दाखवत असल्यामुळे अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी च्या (Real Estate) दरात देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घर घेणे डोकेदुखी ठरू शकते. माजिकब्रिक्स ने सादर केलेल्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे . नक्की काय आहे या अहवालात चला पाहूया…

या शहरांचा समावेश (Real Estate)

एप्रिल-जून 2024 च्या मॅजिकब्रिक्स प्रॉपइंडेक्स अहवालाने भारतातील टॉप 13 शहरांमधील बांधकामाधीन मालमत्तांच्या किमतींमध्ये तिमाही-दर-तिमाही (QoQ) 15 टक्के वाढ दर्शविली आहे. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, ग्रा. नोएडा, गुरुग्राम, हैदराबाद, मुंबई, नवी मुंबई, नोएडा, पुणे आणि ठाणे. अशा शहरांचा समावेश आहे. या अहवालानुसार एप्रिल ते जून दरम्यान बांधकामाधीन मालमत्तांच्या पुरवठ्यात 11.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गुरुग्राम, मुंबई, नोएडा आणि ठाणे यांसारख्या शहरांमधील बांधकामाधीन (Real Estate) मालमत्तांच्या किमती रेडी टू मूव्ह प्रॉपर्टीपेक्षा जास्त झाल्या आहेत.

भारतीय रिअल इस्टेट क्षेत्र सलग तिसऱ्या वर्षीही मजबूत (Real Estate)

याबाबत माहिती देताना मॅजिकब्रिक्सचे रिसर्च विभाग प्रमुख अभिषेक भद्रा यांनी या ट्रेंडवर भाष्य केले, ते म्हणाले, “जसे आम्ही 2024 मध्ये नेव्हिगेट करत आहोत, भारतीय रिअल इस्टेट मार्केटने मजबूत बुल रनच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश केला आहे. यावेळी पुरवठा कमी आणि मागणी जास्त. त्यामुळे बांधकामाधीन मालमत्तेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. बांधकामाधीन मालमत्तेबाबत लोकांची भीतीही (Real Estate) दूर झाली आहे. सुमारे 2 कोटी ग्राहकांच्या पसंतींच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

महागाई कमी झाली तरी घरांच्या मागणीत वाढ (Real Estate)

मॅजिक ब्रिक्सच्या अहवालानुसार उत्तर भारतातील गुरुग्राम दिल्ली आणि नोएडा या भागामध्ये सर्वाधिक डिमांड आहे. बँकांचे व्याजदर चढे असले तरीही घरांची डिमांड ही काही कमी नाहीये. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने यावेळी आठव्या वेळा रिपोरेट बदललेला नाही. त्यामुळे एकूणच मार्केटमध्ये स्थिरता असल्याचे दिसून येत आहे. रिपोर्टनुसार जर महागाई कमी झाली तरी देखील घरांच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे. यामुळे स्वस्तातल्या घरांची सुद्धा डिमांड वाढणार आहे. शिवाय मोठ्या शहरांमध्ये देखील घरांच्या मागणीमध्ये वाढ होण्याची (Real Estate) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

…. म्हणून राम मंदिराच्या छतातून गळत आहे पाणी; निर्माण समितीच्या अध्यक्षांनी सांगितले खरे कारण

Ram temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. परंतु या मंदिराचे बांधकाम जुने होण्यापूर्वीच मंदिराच्या शेतातून पाणी गळत असल्याचा दावा मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Satyendra Das) यांनी केला होता. परंतु त्यांचा हाच दावा राम मंदिराच्या निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र (Nripendra Mishra) यांनी फेटाळून लावला आहे. मंदिराच्या छतातून पाणी गळण्याला दुसरे कारण आहे, असे नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले आहे.

आचार्य सत्येंद्र दास यांच्या दाव्याला फेटाळत नृपेंद्र मिश्र यांनी माहिती दिली आहे की, “राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पाणी पडत आहे ही बाब सत्य आहे. कारण की, मंदिराचा दुसरा मजला पूर्णपणे उघडा आहे. मी देखील मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पावसाचे पाणी पडताना पाहिले आहे. असे काहीतरी घडेल याची आम्हालाही कल्पना होती. याला कारण की दुसरा मजला पूर्णपणे उडला आहे. त्यामुळेच पावसाचे पाणी थेट पहिल्या मजल्यावर पडत आहे”

त्याचबरोबर, “सध्या राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम सुरू आहे. या मजल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या मजल्याचे काम हाती घेतले जाईल. त्यानंतर यावर्षीच्या शेवटापर्यंत तेही काम पूर्ण होईल. पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू असल्यामुळे मंदिराच्या गर्भगृहात नाली बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिरातले पाणी हाताने काढले जात आहे. परंतु, पाणी गळण्याचा मंदिराच्या डिझाईनशी काहीही संबंध नाही. फ्लोअर उघडा असल्याने पाणी खाली पडतच असते” अशी माहिती देखील नृपेंद्र मिश्र यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या शनिवारी-रविवारी अयोध्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. यामुळे शहरातही पाणी साचले होते. अशातच राम मंदिराच्या उद्घाटनाला सहा महिने पूर्ण झाले नसतानाही पहिल्याच पावसात मंदिराच्या छतातून पाणी गळत असल्याचे बाब समोर आली. तसेच राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती ज्या गर्भगृहात आहे, तेथे देखील पाणी साचल्याची माहिती सत्येंद्र दास यांनी दिली. परंतु, हे पाणी साचण्यामागे वेगळेच कारण असल्याचे नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले आहे.

Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या भावात मोठे बदल; पहा तुमच्या शहरातील दर

Gold Price Today

Gold Price Today: सध्या सोने-चांदीच्या भावांमध्ये दररोज बदल होताना पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच सोन्यासह चांदीचे भाव घसरले होते. मात्र आता फक्त चांदीच्या भावात घसरण दिसून येत आहे. तर सोन्याचे आजचे भाव स्थिर आहेत. म्हणजेच आज ग्राहकांना चांदीची खरेदी मनसोक्त करता येणार आहे. परंतु सोन्याचे भाव कमी होण्यासाठी पुन्हा एकदा वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील खरेदीपूर्वी आजचे सोन्याचे भाव तपासा. (Gold Price Today)

गुड रिटर्न्सनुसार सोन्याचे आजचे भाव पाहिला गेलो तर, 22 कॅरेट दहा ग्रॅम सोने बाजारात 66250 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासह 24 कॅरेट दहा ग्रॅम सोने 72,230 रुपयांवर येऊन पोहोचले आहे. तसेच 100 ग्रॅम 22 कॅरेट सोने 6,62,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोने हे 7,22,300 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच पूर्वीपेक्षा सोन्याच्या भावात किंचित घट झाली आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66250 रुपये
मुंबई – 66250 रुपये
नागपूर – 66250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,230 रूपये
मुंबई – 72,230 रूपये
नागपूर – 72,230 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज म्हणजेच 25 जून रोजी चांदीचे भाव घटले आहेत. Good Return नुसार, मंगळवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 910 रुपयांनी व्यवहार करत आहे. (Gold Price Today) तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 9100 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 91,000 रूपये अशी आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांना चांदीची खरेदी करणे परवडू शकते.