Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 647

PM Kisan Sanman Nidhi Yojana | पोस्ट ऑफिसमधूनही काढू शकता PM किसान योजनेचे पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

PM Kisan Sanman Nidhi Yojana

PM Kisan Sanman Nidhi Yojana | केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आणलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असतो. त्याचप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा केले जातात. नुकत्याच या योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. यामध्ये 5. 49 लाख पेक्षा अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांची मदत सत्कार करून मिळालेली आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जवळपास 5.49 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Sanman Nidhi Yojana ) 17 वा हप्ता देण्यात आलेला आहे.

17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा | PM Kisan Sanman Nidhi Yojana

याबाबत उपसंचालक एस पी श्रीवास्तव यांनी सांगितले की, “आत्तापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत 17 हप्ते मिळालेले आहेत. परंतु काही कारणांमुळे पात्र शेतकरी देखील या हप्त्यापासून वंचित राहिलेली आहे. त्यांचा देखील या योजनेचा पुन्हा एकदा समावेश करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या डीबीटी द्वारे देखील मिळणार आहे.”

पंतप्रधान पोस्ट ऑफिसमधूनही शेतकऱ्यांचे पैसे घेऊ शकता

वाराणसी आणि प्रयागराज विभागाचे पोस्टमास्टर जनरल केके यादव म्हणाले की, यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या आधार सक्षम पेमेंट सिस्टमद्वारे, देशातील कोणत्याही बँकेत मोबाईल फोन आणि आधार लिंक केलेल्या खात्यातून पैसे काढता येतात. यासाठी टपाल विभाग कोणतेही शुल्क आकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मदत मिळेल

अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या देशात सर्वाधिक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मर्यादित उत्पन्नामुळे अनेकवेळा या आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना शेती करताना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागले आणि ते कर्जाच्या खाईत पडले. या समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने 2 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली.

शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात | PM Kisan Sanman Nidhi Yojana

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 जून 2024 रोजी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या भेटीदरम्यान, सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर प्रथमच, 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या PM-किसान सन्मान निधीच्या 17 व्या टप्प्याचे प्रकाशन केले. वेळ देशभरातील 92.6 दशलक्ष लाभार्थी शेतकऱ्यांना. पीएम किसान ही केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे ज्या अंतर्गत ती सर्व नोंदणीकृत लहान जमीनधारक शेतकरी कुटुंबांना वार्षिक 6,००० रुपये ही 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये उत्पन्न समर्थन प्रदान करते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वीपर्यंत शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती सोडून देत होते. मात्र पीएम किसान सन्मान निधी योजना लागू झाल्यानंतर परिस्थिती बदलली. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांचा शेतीकडे कल वाढल्याचे ते सांगतात.

मोठी बातमी!! सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड

Om Birla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज सभागृहामध्ये लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत NDA चे उमेदवार ओम बिर्ला (Om Birla) निवडून आले आहेत. ओम बिर्ला यांना एकूण 13 पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश हे उभे राहिले होते. के. सुरेश (K. Suresh) यांच्या नावाचा प्रस्ताव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडला होता. मात्र 13 पक्षांनी ओम बिर्ला यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे आता पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवड झाली आहे.

आज ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन करत त्यांचे अभिनंदन केले. यानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आसनापर्यंत पोहचवले. महत्त्वाचे म्हणजे, NDA कडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

या दोन्ही नावांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ओम बिर्ला यांच्या नावाला अधिक मते मिळाली असल्याची घोषणा
अध्यक्ष बर्तृहारी महताब यांनी केली. यानंतर 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली असल्याचे जाहीर झाले. दरम्यान, ओम बिर्ला यांच्या अर्जाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, ललन सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान त्यांच्यासह इतर मंडळींनी अनुमोदन दिले होते.

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसने महिलांसाठी आणली खास योजना; वर्षाला मिळणार 7.5 टक्के व्याजदर

Post Office Scheme

Post Office Scheme | आपल्या भविष्याचा आणि महागाईचा विचार करता आपण भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. कारण येत्या काळात महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. सध्या गुंतवणूक करण्यासाठी आता बाजारात अनेक योजना देखील उपलब्ध आहेत. बँक आणि पोस्ट ऑफिसच्या देखील गुंतवणुकीच्या काही योजना आहे. कारण यामध्ये पैसे सुरक्षित राहतात आणि चांगला परतावा देखील मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) अनेक अल्प बचत योजना आहेत. त्यामुळे अनेक लोक हे पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण पोस्ट ऑफिस ही एक विश्वासहार्य योजना आहे. गेले कित्येक वर्षापासून लाखो लोकांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. आणि त्यांना चांगला परतावा देखील मिळालेला आहे. पोस्ट ऑफिस एक सरकारी बचत योजना आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खास करून महिला आणि मुलींसाठी वेगवेगळ्या योजना असतात

पोस्ट ऑफिसची एक योजना आहे. ती खूप लोकप्रिय आहे. या योजनेचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना असे आहेत. 2023- 24 या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केलेली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये कोणतीही महिला किंवा मुली गुंतवणूक करू शकते. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळू शकता. यामध्ये तुम्हाला वर्षाला 1 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत व्याज मिळते. तसेच दोन लाखापर्यंत तुम्हाला यामध्ये पैसे जमा करून शकता. या योजनेचा कालावधी 2 वर्ष एवढा आहे.

या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.5% एवढे व्याज मिळते. ही योजना सरकारने दोन वर्षासाठी चालू केलेली आहे. म्हणजेच मार्च 2025 पर्यंत या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. तुम्ही भारत सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून पोस्ट जर खाते उघडले, तर त्यावर तुम्हाला निश्चित 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. महिलांना गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यात प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

या योजनेत खाते उघडण्यासाठी पात्रता | Post Office Scheme

  • या योजनेसाठी अर्ज करणारी महिला किंवा मुलगी ही भारताची नागरिक असावी.
  • त्या महिलेच्या वार्षिक उत्पन्न सात लाखापेक्षा कमी असावे.
  • किशोरवयीन मुली ते ज्येष्ठ नागरिक या गटातील महिला अर्ज करू शकतात.

कोणती कागदपत्रा आवश्यक

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, ओळख कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, जातीचा दाखला, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्र असणे गरजेचे आहे.

Travel : महाराष्ट्रातील ‘ही’ दरी म्हणजे मोस्ट थ्रिलिंग एक्सपीरिअन्स ! अनुभवा निसर्गाचा चमत्कार

sandhan vally

Travel : महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणजे निसर्गसौंदर्याचा खजीनाच ! पावसाळ्यात तरी या सह्याद्रीचे रूप अतिशय मनमोहक होते. पावसाळयात अशा सह्याद्रीच्या वाटा धुंडाळायला अनेकांना आवडते. अनेक निसर्गप्रेमी पावसाळयात आवर्जून सह्याद्रीचे ट्रेक करतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अद्भुत ट्रेक विषयी सांगणार आहोत जिथला अनुभव नक्कीच तुमच्यासाठी मोस्ट थ्रिलिंग एक्सपीरिअन्स (Travel) असेल यात शंका नाही. चला तर मग जाणून घेऊया या निसर्गाचं देणं लाभलेल्या अनोख्या ठिकाणाबद्दल…

आशिया खंडातील खोल दऱ्यांमधील दुसरा क्रमांक (Travel)

आम्ही ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातलं साम्रद या गावातील सांधण व्हॅली हे आहे. आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये सांधण व्हॅलीचा दुसरा क्रमांक लागतो. म्हणजे विचार करा जवळपास 200 ते 400 फूट खोल आणि जवळजवळ चार किलोमीटर लांबीवर ही व्हॅली पसरलेली आहे त्यामुळे इथे ट्रेकिंग करताना एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर ते ट्रेकर्सच्या (Travel) जीवावर बेतू शकतं.

आता ही दरी निर्माण कशी झाली तर जमिनीला भेग पडल्यामुळे ही दरी निर्माण झाली. ही दरी म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे. हे तुम्हाला पाहिल्यावर नक्की समजेल.

ही व्हॅली पार करणं एक आव्हान (Travel)

अतिशय अरुंद असे घळ कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जिमतेम (Travel) एक माणूस जाईल एवढी तीन फुटाची रुंदी आणि दोन्ही बाजूला अंगावर येणाऱ्या चारशे फूट उंच पाषाणाच्या कडा इथं आहेत त्यामुळे त्याच्या भव्यतेमुळेच ही व्हॅली पार करणे एक आव्हान बनून जातं.

पावसाळ्यात या व्हॅलीला भेट देणे शक्य नाही कारण पावसाचे पाणी याच दरीमधून वेगाने खाली कोसळते. त्यामुळे इथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा किंवा पावसाळ्या संपल्यानंतर येणारा हिवाळा आहे. भर दुपारच्या प्रहरात देखील ऊन सावल्यांचा (Travel) खेळ बघण्याचा प्रवास हा उत्तम अनुभवतुम्हाला देऊन जाईल. दरीत गेल्यानंतर पाण्याचे दोन पूल लागतात. पहिला पूल दोन ते चार फूट आणि दुसरा पूल हा चार ते सहा फूट पाण्यात असतो. हिवाळ्यात या पाण्याची पातळी थोडी अधिक असू शकते.

पावसाळ्यात ही दरी आणखी थ्रिलिंग होते खरंतर पावसाळ्याचे चार महिने सोडले की इतर वेळेमध्ये इथं पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात सांधण व्हॅलीतल्या निमुळत्या वाटेवरून पुढे जात रात्री तेथेच मुक्काम करायचा हा इथल्या आलेल्या अनेकांचा (Travel) प्लॅन असतो. ही चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की प्रत्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही. समोर आजोबा पर्वत ,रतनगड आणि मागे अलंग-मदन-कुलंगगड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण व्हॅली सर करणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही.

इथे कसे पोहचाल ? (Travel)

आता इथं पोहोचायचं कसं ? तर सांधण व्हॅलीला पोहोचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा (Travel) धरणाच्या जलाशयाच्या काठाने साम्रद या गावी जावं लागले. पुण्यावरून पोहोचण्यासाठी आळेफाटा संगमनेर- अकोले- राजुर- शेंडी- उडदावणे- साम्रद असा रस्ता आहे. तर मुंबईहून इथे पोहोचण्यासाठी कल्याण -कासरा घाट- इगतपुरी- खोटी मार्गे शेंडीला पोहोचता येतं तर नाशिक होऊनही घोटी मार्गे इथे पोहोचता येईल.

Zika Virus | पुण्यात 2 रुग्णांना झिका व्हायरसचा संसर्ग; आरोग्य यंत्रणेने केला अलर्ट मोड जारी

Zika Virus

Zika Virus | संपूर्ण जगात काही वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर एक नवीन व्हायरस उदयास येत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे पुण्यामध्ये झिका या व्हायरसचे रुग्ण देखील आढळून आलेले आहेत. या दोन रुग्णांमध्ये झिका व्हायरसची लक्षणे आढळून आल्याने आता आरोग्य विभागाकडून पुण्यामध्ये अलर्ट जारी केलेला आहे.

आरोग्य विभागाने जारी केला अलर्ट | Zika Virus

पुण्यातील दोन रुग्णांमध्ये झिका व्हायरसचे (Zika Virus) सौम्य लक्षण आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे या दोघांनाही विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आलेले आहे. आता आरोग्य विभागाने देखील सगळीकडे अलर्ट मोड जारी केलेला आहे. झिका व्हायरसचे रुग्ण ज्या परिसरात आढळले आहेत. त्या परिसरात पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. आणि या परिसरातील अनेक लोकांचे रक्तांचे नमुने देखील घेण्यात आलेले आहेत.

झिका व्हायरसची उत्पत्ती कुठे झाली ?

झिका व्हायरस हा आजार एडिस इजिप्ति डासामुळे होणारा आजार आहे. हेच डास डेंगू देखील पसरवतात. साठलेल्या पाण्यांवर हे डास आढळतात. आणि घरात देखील हे डास अधिक प्रमाणात सापडतात. झिका व्हायरस हा पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातील झिका जंगलात राहणाऱ्या माकडामध्ये आढळला होता. त्यानंतर 1952 साली हा विषाणू माणसाच्या शरीरात देखील सक्रिय झाला. त्याचप्रमाणे आफ्रिका आणि आशियाच्या विषुवृत्तीय प्रदेशात 1950 पर्यंत हा होता.

झिका व्हायरसची लक्षणे | Zika Virus

झिका व्हायरसने आता मानवी शरीरात देखील आक्रमण करण्यास सुरुवात केलेली आहे. या व्हायरसचे आपल्या शरीरात आक्रमण झाल्यानंतर लोकांना अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे उठणे, डोळे येणे यांसारखी लक्षणे दिसतात. जर तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण सौम्य प्रमाणात जरी आढळत असले, तरी तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीककर्ज घेताना ‘ही’ अट नसणार सक्तीची; मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

Government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यामध्ये सर्वत्र पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या बाबत सरकारकडून नवनवीन माहिती आणि योजना येतच असतात. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आणलेली आहे. महाराष्ट्रात बहुतांश लोक हे शेती हा व्यवसाय करतात. त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांना नेहमीच पाठिंबा देत असते. त्याचप्रमाणे बँक देखील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करत असते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना बँकेने चांगले कर्ज द्यावे, असे आव्हान देखील एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे.

बँकांच्या समिती बाबत 163 व्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना त्यांच्या सिबिल स्कोरबाबत कोणतीही सक्ती केली जाऊ नये. त्याचप्रमाणे राज्यातील जिल्हा सहकारी बँका प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण करण्याकडे प्राधान्य दिले जावे. हा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे.

यावेळी 2024 – 25 साठीच्या 41 हजार 286 कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखडा देण्यास मान्यता देखील दिलेली आहे. तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आरबीआय तसेच नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठवण्यात यावे, असे देखील सांगण्यात आलेले आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “शेती हे महाराष्ट्राचे बलस्थान आहे. महाराष्ट्र कृषी प्रधान आणि प्रगतशील आहे. महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग केलेले आहेत. आमचा शेतकरी प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे. परंतु निसर्गाच्या कोपामुळे त्यांच्यावर संकट येते. अशावेळी आम्ही शासन म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो. बँकांना त्यांना संकट काळात आर्थिक पाठबळ न दिल्यास त्यांना अन्न मार्गाने पैसा उभा करावा लागतो. त्यामुळे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. शेतकरी जगला तरच आपण सगळे जाऊ असे मुख्यमंत्री म्हणाले.”

या बैठकीत फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार, महसूल मंत्री विखे पाटील, सहकार मंत्री वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची मांडणी केली. यावेळी सहकारी बँकांचे बळकटीकरण शेतकऱ्यांना कर्ज देताना सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे.

Side Effect Of Tea | तुम्हीही रिकाम्या पोटी ‘बेड टी’ पीत असाल तर आजच बंद करा; होतात हे गंभीर परिणाम

Side Effect Of Tea

Side Effect Of Tea | भारतामध्ये बहुतांश लोक एक सकाळी उठल्यानंतर चहा पितात. आपल्या देशात चहा पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, सगळ्याच घरांमध्ये सकाळी चहा बनवला जातो. अनेक लोकांची दिवसाची सुरुवात ही चहा पिल्याशिवाय होत नाही. चहा पिल्याने फ्रेश वाटते. पण सकाळी उठून जर तुम्ही रिकाम्या पोटी लगेच चहा पीत असाल, तर ही सवय चांगली नाही. यामुळे आपल्या आरोग्याला अनेक तोटे होतात. रिकाम्या पोटी चहा पिल्याने (Side Effect Of Tea) आता नेमके कोणते तोटे होतात? हे आपण जाणून घेऊया.

पचनाशी संबंधित समस्या | Side Effect Of Tea

तुम्ही तर सकाळी रिकाम्या पोटी चहा पीत असाल, तर तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यामध्ये कॅफिन आणि टॅनिन असते, ज्यामुळे पोटातील ऍसिडिटी वाढते आणि पोटात जळजळ, गॅस, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.

दातांच्या समस्या

चहामध्ये टॅनिन आणि ऍसिड असते. ज्यामुळे आपले दातांना नुकसान पोहोचते. यामुळे आपल्या दातांवर पिवळे डाग पडणे, कॅविटीची समस्या उद्भवते.

कॅफिनची सवय | Side Effect Of Tea

सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही चहा पीत असाल, तर तुम्हाला कॅफिनची सवय लागते. कॅफिन हे एक उत्तेजक आहे. त्यामुळे आपले शरीर एकदम फ्रेश होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या जाग होण्याच्या चक्रात अडथळा होतो.

डिहायड्रेशन

सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. तुम्ही जर रात्रभर उपवास केला, तर शरीरामध्ये सकाळी डीहायड्रेशन होते. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या चहा पीत असेल तर शरीराला ते हायड्रोजन मिळत नाही. आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.

Weather Update | राज्यात आज होणार मुसळधार पाऊस; कोकणासह ‘या’ भागांना केला हाय अलर्ट जारी

Weather Update

Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्याचप्रमाणे आजही आणि जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आता अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कोकण विभागात आज अति मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यातही पाऊस कोसळणार आहे.

कोकणात पावसाची शक्यता | Weather Update

कोकणामध्ये पावसाने चांगली जोरदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह अनेक जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या विभागाला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तसेच सोसायट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता आहे. झाडे कोसळण्याचे आणि वीज पुरवठा खंडित होण्याचे देखील संकट येऊ शकते. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आव्हान देण्यात आलेले आहे.

मुंबईतील हवामान

आज मुंबई आणि उपनगरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच ठाणे, रायगड,पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या विभागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडू शकतो.

मराठवाड्यामध्ये तुलनेने आज हवामान हलके आणि मध्यम स्वरूपाचे असणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भात मात्र मुसळधार पाऊस आहे होणार आहे. अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, वाशिम, वर्धा यांसारख्या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागामध्ये वादळी वारा आणि विजादेखील कडकडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

Maternity Health Insurance | मातृत्व विमा कसा घ्यायचा? जाणून घ्या विम्याचे फायदे

Maternity Health Insurance

Maternity Health Insurance | आजकाल अनेक गोष्टींचा विमा काढला जातो. आपण आत्तापर्यंत हेल्थ विमाबद्दल ऐकले आहे. परंतु तुम्ही कधी प्रसूती विमाबद्दल ऐकले आहे का? आज काल प्रसूतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जवळपास 50% हून अधिक महिलांची प्रसूती ही सिजेरियन पद्धतीने केली जाते. त्यामुळे जास्त प्रमाणात खर्च होतो. या सिजेरियनमध्ये 50000 पर्यंत नक्कीच खर्च होतो. त्यामुळे आर्थिक ताण देखील वाढतो. अशावेळी तुम्ही प्रसूतीच्या काळातील विमा (Maternity Health Insurance) काढून तुमचे सगळे पैसे कव्हर करू शकता. आणि तुम्हाला आर्थिक ताण देखील येणार नाही.

मातृत्व विम्याचे कोणते लाभ होतात? | Maternity Health Insurance

  • मातृत्व विमामध्ये प्रसूतीपूर्व प्रसूती आणि प्रसूती नंतरच्या काळातले सगळे खर्च कव्हर केले जातात.
  • त्याचप्रमाणे या विम्यामध्ये प्रसूतीच्या काळात करण्याचे सगळे लसीकरण, इन्फर्टिलिटी बाबतचे उपचार देखील केले जातात.
  • या मातृत्व विम्यामध्ये सरोगसी आणि आयवीएफ उपचारांचा देखील खर्च दिला जातो.

मातृत्व विमा कसा घ्यायचा ?

तुम्ही कोणत्याही कंपनीतून जेव्हा मातृत्व विमा घेता, त्यावेळी त्या पॉलिसीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर केल्या जातात. हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
यामध्ये ब्लड टेस्ट, अल्ट्रा साऊंड टेस्ट इत्यादी चाचण्यांचा समावेश असावा. त्याचप्रमाणे प्रसूतीनंतरच्या काळातील बालकाचे सगळे उपचार असले पाहिजे.
त्याचप्रमाणे प्रसूतीपूर्व लसीकरण त्याचप्रमाणे बाळाचे लसीकरण या गोष्टीचाही त्यात समावेश असणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे बाळाचे आजार आणि उपचार या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून कव्हर होणार आहेत की नाही हे पाहणे देखील गरजेचे आहे.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या रूमचे भाडे, कॅशलेस हॉस्पिटललायझेशन तसेच इतर आजार देखील त्यात आहे का हे जाणून घेणे गरजेचे आहे.
या पॉलिसीची प्रतीक्षा कालावधी किती आहे हे पाहावे. हा कालावधी दोन ते सहा वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे तुम्ही मातृत्व विमा घेऊन तुमची प्रसूती अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकता. कारण यामध्ये तुम्हाला खर्चाचे जास्त टेन्शन राहणार नाही. प्रसूतीपूर्व आणि प्रसूती नंतरचे सगळे खर्च कव्हर केले जातील.

Side Effects of Cold Coffee | कोल्ड कॉफी रोज पीत असाल तर सावधान ! होऊ शकते ‘हे’ गंभीर नुकसान

Side Effects of Cold Coffee

Side Effects of Cold Coffee | आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक लोकांना कोल्ड कॉफी खूप आवडते. कोल्ड कॉफी पिण्याची एक प्रकारे सवय झाली आहे. कोल्ड कॉफीची पिल्यावर आपल्याला कितीही चांगले वाटले असले, तरी कोल्ड कॉफीच्या अतिसेवनाने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे तुम्हाला थकवा, अशक्तपणा येतो. त्याचप्रमाणे पचनसंस्थेसाठी देखील कोल्ड कॉफी चांगली नसते. अनेक लोक हे रोज कोल्ड कॉफी (Side Effects of Cold Coffee) पितात. परंतु या कोल्ड कॉफीचा आपल्या शरीरावर नक्की कोणते परिणाम होतात. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

निर्जलीकरणाने ग्रस्त | Side Effects of Cold Coffee

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ज्यूस किंवा लस्सी वगैरे पिणे योग्य आहे, पण या बाबतीत तुम्ही कोल्ड कॉफी अधिक चांगली मानत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. याच्या अति प्रमाणात सेवन केल्याने शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळेच कॅफिनचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.

रक्तातील साखर वाढणे

कोल्ड कॉफीमध्ये असलेल्या साखरेमुळे तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या देखील असू शकते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि त्याचे सेवन करायला आवडत असाल तर तुम्ही साखर टाळू शकता.

पाचन तंत्रासाठी वाईट

कोल्ड कॉफीचे सेवन देखील पचनशक्तीच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही. यामुळे आतड्याचे आरोग्य बिघडू शकते, म्हणूनच कोल्ड कॉफी प्यायल्यानंतर अनेकांना गॅस आणि ॲसिडिटी सारख्या समस्या येतात.

थकवा आणि अशक्तपणा | Side Effects of Cold Coffee

कोल्ड कॉफीच्या अतिसेवनामुळेही डोकेदुखी आणि थकवा येतो. कॅफीनच्या अति प्रमाणात सेवन केल्याने रात्रीची निद्रानाश होऊ शकते, त्यामुळे दिवसभर शरीरातील एनर्जी स्तर कमी राहते.