Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 649

Geranium Business Idea | शेतकऱ्यांनी शेतात करा ‘या’ फुलझाडाची लागवड; होईल बक्कळ कमाई

Geranium Business Idea

Geranium Business Idea | आज काल शेतीमध्ये नवनवीन प्रकारचे उत्पन्न घेतले जाते. शेतकरी देखील आता पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. अनेक शेतकरी हे नगदी पिके करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील खूप फायदा होतो. कारण बाजारात आजकाल नवनवीन उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एका फुलाच्या शेती बद्दल सांगणार आहोत.

ज्या फुलाची शेती करून शेतकरी अगदी कमी वेळामध्ये श्रीमंत होतील. या फुलाचे नाव जिरेनियम (Geranium Business Idea) असे आहे. आपल्या देशात या सुगंधी फुलाची लागवड करण्यासाठी सरकारकडून देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. यासाठी सरकार अरोमा मिशन अंतर्गत काम करत आहे. या झाडाला तांबड्या आणि पांढऱ्या रंगाची फुले येतात. हे फुलझाड अत्यंत सुवासिक असे आहे. त्यामुळे या वनस्पतीला गरिबांचा गुलाब असे देखील म्हटले जाते.

या फुलझाडांपासून तेल देखील काढले जाते. त्याचप्रमाणे अनेक औषधांमध्ये देखील याचा वापर केला जातो. या झाडाला तांबडी आणि पांढऱ्या रंगाची फुले येतात. त्याचप्रमाणे गुलाबासारखा या झाडाच्या तेलाचा सुवास येतो. अनेक सौंदर्य उत्पादने, सुगंधित साबणे,परफ्युम यांसारखी उत्पादने बनवण्यासाठी या झाडाचा वापर केला जातो.

तांबडी किंवा पांढरी फुले येणारे एक फुलझाड वनस्पती कुठेही वाढू शकते. वालुकामय चिकणमाती माती त्यासाठी चांगली मानली जाते. या झाडांना खूप कमी पाणी लागते. म्हणजे कमी पाऊस असलेल्या ठिकाणी लागवड करता येते. प्रत्येक प्रकारचे हवामान त्याच्या लागवडीसाठी चांगले मानले जाते. परंतु कमी आर्द्रता असलेले सौम्य हवामान त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी सर्वोत्तम मानले जाते. तुम्ही सेंट्रल मेडिसिनल अँड प्लांट इन्स्टिट्यूटमधून तांबडी किंवा पांढरी फुले येणारे एक फुलझाड वनस्पती खरेदी करू शकता आणि ते तुमच्या शेतात लावू शकता. हे कोणत्याही परिस्थितीत घेतले जाऊ शकते. त्याची लागवड करून शेतकरी कमी पैशात सहज नफा वाढवू शकतात.

कमाई किती होईल ? | Geranium Business Idea

तांबडी किंवा पांढरी फुले येणारे एक फुलझाड पीक लावण्यासाठी एक लाख रुपये खर्च येतो. त्याचे तेल खूप महाग विकले जाते. बाजारात ते सुमारे 20,000 रुपये प्रति लीटर दराने विकले जाते. त्याची झाडे 4 ते 5 वर्षे उत्पादन देतात. अशा परिस्थितीत तुम्ही दरवर्षी लाखो रुपये कमवू शकता. उत्तर प्रदेशातील बदायूं, कासगंज, संभल यांसारख्या अनेक जिल्ह्यांतील शेतकरी त्याची लागवड करतात.

SSC CGL Bharati 2024 | ‘या’ ठिकाणी सरकारी नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

SSC CGL Bharati 2024

SSC CGL Bharati 2024 | जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुम्हाला नोकरीच्या विविध संधी देत असतो. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होतो. अशातच आया कर्मचारी निवड आयोगाने SSC CGL 2024 या परीक्षेची अधिसूचना जारी केलेली आहे. त्यामुळे आता या भरती अंतर्गत गट B आणि गट C यांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत तब्बल 17 हजार 727 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे? | SSC CGL Bharati 2024

या भरतीची अर्ज प्रक्रिया 24 जून पासून सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे 24 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक पूर्ण महिना आहे. त्याचप्रमाणे अर्जामध्ये दुरुस्ती तुम्हाला 10 आणि 11 ऑगस्ट रोजी करण्यात करता येणार आहे.

अर्ज कुठे करायचा ?

या भरती अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला केवळ 100 रुपये एवढी फी असणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, जमाती, अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ करण्यात आलेली आहे.

परीक्षा कधी होणार ? | SSC CGL Bharati 2024

या भरतीसाठी टीयर 1 ची परीक्षा सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये होणार आहे तर टियर 2 ची परीक्षा डिसेंबरमध्ये घेतली जाणार आहे.

अर्ज कसा करायचा ?

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर होम वरील आपला या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर सगळी माहिती भरा आणि नोंदणी करून अर्ज करा.
  • त्यानंतर कागदपत्र आणि फी जमा करा.
  • फॉर्म एकदा चेक करून सबमिट करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपला मोठा धक्का!! सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश

Suryakanta Patil, Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नांदेड मतदारसंघामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण की, भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) नेते जयंत पाटील आणि इतर मंडळी देखील उपस्थित होते. सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटातील पक्षप्रवेश भाजप साठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण गेल्या १० वर्षांपासून सूर्यकांता पाटील भाजपसोबत काम करत होत्या. मात्र आता त्यांनी भाजपची साथ सोडली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वीच सूर्यकांता पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांच्याकडे भाजपच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी, “माझ्या मनात कोणती कटूता नाही. मी भारतीय जनता पार्टीची आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे” असे म्हणले होते. दरम्यान, गेल्या दहा वर्षांपूर्वी सूर्यकांता यांनी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांनी तब्बल दहा वर्षे भाजप सोबत राहून हिंगोली नांदेड मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं.

खरे तर, देशामध्ये भाजपची सत्ता आल्यामुळे सूर्यकांता यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला होता. परंतु भाजपातील प्रवेशानंतर भाजपने त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी दिली नाही. तसेच कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात त्यांना सहभागी करून घेतले नाही. त्यामुळेच आता सूर्यकांता यांनी भाजपशी साथ सोडली आहे. तर पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे पक्ष प्रवेश केला आहे.

Pune News : पुण्यात संकष्टी निमित्त वाहतुकीत बदल ; पहा काय आहे पर्यायी मार्ग ?

Pune News : आज मंगळवार दिनांक २५ जून २०२४ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे पुण्यातील शिवाजी रोड वरील श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपतीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या आणि आसपासच्या रस्त्यांवर ट्राफिक जॅम ची समस्या निर्मण होऊ शकते म्हणूनच पुणे वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. हा बदल (Pune News) तात्पुरत्या स्वरूपाचा असणार आहे.

या रोड वरून पीएमपी बसेस, जड वाहन तसंच चार चाकी वाहनांना (Pune News) शिवाजी रस्त्यावर मंगळवारी गर्दी संपेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसेच आवश्यकतेनुसार चार चाकी आणि दुचाकी वाहनांवर लाल महल चौकापासून निर्बंध घालण्यात आले आहेत, वाहतुकीची परिस्थिती पाहून वाहतूक वळवण्यात येणार आहे. या कालावधीत कोणत्या पर्यायांचा वापर करावा याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिले आहेत.

काय असतील पर्यायी मार्ग (Pune News)

  • पुरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगर कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी पुरम चौकातून टिळक रस्त्याने (Pune News) अलका टॉकीज चौक आणि पुढे इनामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याने इच्छित स्थळी जावे.
  • शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहन चालकांनी स गो बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने (Pune News) खंडोजी बाबा चौक, टिळक चौकातून टिळक रस्त्यांना इच्छित स्थळी जावे.
  • स गो बर्वे चौकातून पुणे मनपा भावनाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी सगो बरवे चौकातून जंगली महाराज रस्त्यांना झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.
  • आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी बाजीराव रस्त्याने (Pune News) सरळ पुढे इच्छित स्थळी जावे.

Weather Update | महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी; हवामान विभागाने दिली माहिती

Weather Update

Weather Update | राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी आपल्याला अगदी हलक्या पावसाचे (Weather Update) दृश्य पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान विभागाकडून पावसाबाबत काही ना काही अंदाज समोर येत असतो. अशातच आता आजही मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. यामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. तसेच विदर्भात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

या विभागाला दिला ऑरेंज अलर्ट | Weather Update

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणामध्ये आज अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे कोकणामधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याची देखील आवाहन प्रशासनाच्या वतीने दिलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

या भागात पावसाचा येल्लो अलर्ट

हवामान खात्याने विदर्भातील काही भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना देखील पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.

Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी; महिना मिळणार एवढा पगार

Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता एक मोठी भरती निघालेली आहे. ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत (Bombay High Court Bharti 2024) एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत .या पदाची एकूण 1 रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याप्रमाणे 9 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | Bombay High Court Bharti 2024

  • पदाचे नाव – महाव्यवस्थापक
  • पदसंख्या -1 जागा
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जुलै 2024
  • वेतन दरमहा – 76 हजार 600 रुपये

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
  • नाव जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

New Rule For Simcard | सिमकार्ड वापराच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल; 1 जुलैपासून पाळा ‘हे’ नियम

New Rule For Simcard

New Rule For Simcard | अनेकवेळा आपणआपले सिम कार्ड दुसऱ्या नेटवर्कमध्ये स्वॅप करतो. या प्रक्रियेला MNP म्हणतात. परंतु आता ज्या लोकांना त्यांचे सिम स्विच करायचे आहे. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता 1 जुलैपासून नवीन मार्गदर्शक तत्त्वावर सिम स्विच किंवा मोबाईल नंबर बदलण्यासाठी युजर्सना किमान सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजेच तुम्ही नवीन सिम कार्ड विकत घेतल्यास किंवा सिम पोर्ट केले असल्यास ते चालू होण्यासाठी तुम्हाला सात दिवस वाट पहावी लागणार आहे.

मोबाईल नंबर पोर्टिबिलिटी म्हणजे काय? | New Rule For Simcard

मोबाईल नंबर पोर्टिबिलिटी ही एक अशी सेवा आहे. ज्यामध्ये मोबाईल फोन युजर्स त्यांचा फोन नंबर तोच ठेवून नवीन नेटवर्कमध्ये स्विच करण्याची परवानगी घेते. युजर्स कोणत्याही ठिकाणी एका ऑपरेटरवरून सिम एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये स्विच करू शकतात. म्हणजेच तुम्ही जिओचे सिम कार्ड एअरटेलमध्ये स्विच करू शकता. किंवा एअरटेलचे सिम कार्ड जिओमध्ये स्विच करू शकता. परंतु तुमचा फोन नंबर बदलत नाही तोच राहतो.

इथून पुढे तुम्हाला तुमचा नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये स्विच करायचा असेल, तर तुम्हाला सात दिवसाची वाट पहावी लागणार आहे. परंतु हा नियम कधीपासून चालू होणार आहे. याची निश्चितच तारीख सांगितली नाही तरी देखील ट्रायने आधीसूचना दिली आहे. आणि त्यात सांगितलेले आहे की, सार्वत्रिक निवडणुकानंतर हा नवीन कायदा लागू होणार आहे. तसेच बायोमेट्रिक वेरिफिकेशन शिवाय तुम्हाला कोणतीही नवीन सिम कार्ड खरेदी करता येणार नाही. हे नियम फिजिकल सिम आणि ईसीमरही लागू होतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही 90 दिवस तुमच्या सिम कार्ड वापरले नाही, तर तुमचे सिम कार्ड कायमचे ब्लॉक होऊ शकते. सायबर फ्रॉड आणि कॉल्सपासून सुटका मिळवण्यासाठी हे नियम केलेले आहेत.

विद्यार्थ्यांना दर वर्षाला मिळणार 60 हजार रुपये, ‘ही’ आहे नवी योजना

Students Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गावाकडून आलेल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहरात जाऊन शिकणे खूप अवघड होऊन जाते. कारण शिक्षणासाठी लागणारा खर्च, वस्तीगृहाचा खर्च, जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. परंतु अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण करता यावे. आणि त्यांच्या आयुष्यात भरभराट करता यावी. यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत होते.

अशातच आता उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी भाड्याने खोली घेण्यासाठी आणि जेवणासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना ओबीसी कल्याण विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षाला 60 हजार रुपये दिले जातात.

विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये

ओबीसी कल्याण विभागाच्या माध्यमातून ही पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षाला 60 हजार रुपये पर्यंत रक्कम दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी राहून शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना दरवर्षाला भोजन भत्ता 32 हजार रुपये आणि निवासी भत्ता 20 हजार रुपये दिले जाणार आहेत. आणि निर्वाह भत्ता 8000 रुपये असे 60 हजार रुपये दिले जाणार आहेत.

जर विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असतील, तर त्यांना भोजन भत्ता म्हणून 23 हजार रुपये निवासी भट्ट 10 हजार रुपये आणि निर्वाह भत्ता पण 5000 रुपये 38 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील 600विद्यार्थ्यांना दरवर्षी लाभ मिळतो. त्याचप्रमाणे 21000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये 60% गुण आहे त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ही रक्कम दिली जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

Eastern Railway Bharti 2024 | पूर्व रेल्वे अंतर्गत नोकरीची संधी; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

Eastern Railway Bharti 2024

Eastern Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण पूर्व रेल्वे अंतर्गत मोठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत गुड्स ट्रेन मॅनेजर (Eastern Railway Bharti 2024)या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 108 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांवर अर्ज मागविण्यात आलेले आहेत हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागतील. तसेच 27 मे 2024 पासून हे अर्ज सुरू झालेले आहे, तर 25 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | Eastern Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – गुड्स ट्रेन मॅनेजर
  • पदसंख्या – 108 जागा
  • वयोमर्यादा – 47 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 मे 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2024
  • वेतनश्रेणी – level 5 नुसार वेतन दिले जाईल

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
  • 25 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Walking Barefoot | तुम्हीही घरी अनवाणी चालत असाल तर सावधान ! होऊ शकतात हे आजार

Walking Barefoot

Walking Barefoot | घराच्या बाहेर जाताना नेहमीच आपण पायामध्ये चप्पल घालून जातो. परंतु आपण घरात फिरताना सहसा चप्पल घालत नाही. अगदी काहीच लोक असे आहेत, ज्यांना पायाचा किंवा वाताचा त्रास आहे. ते लोक घरात चप्पल घालतात. परंतु तुम्ही जर घरात देखील अनवानी फिरत असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. घरातही अनवाणी चालल्याने अनेक आजार होतात. फरशीमुळे आपल्या त्वचेवर अनेक वाईट परिणाम होतात. त्यामुळे घरातही चप्पल घालणे गरजेचे आहे. परंतु जर तुम्ही घरातही अनवाणी चालत असाल, तर तुम्ही त्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. आता घरात अनवाणी चालण्याने (Walking Barefoot) कोणते आजार होतात. हे आपण जाणून घेऊया.

फंगल इन्फेक्शन | Walking Barefoot

तुम्ही जर घरात अनवाणी चालत असाल, तर तुम्हाला फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. कारण आंघोळीनंतर बाथरूममध्ये किंवा जमिनीवर साचलेल्या आद्रतेमुळे बुरशीची वाढ होते. तुम्ही जर अनवाणी चालत असाल, तर ही बुरशी तुमच्या पायाच्या त्वचेत प्रवेश करते. आणि तुम्हाला अनेक आजार होतात.

बॅक्टेरिया संक्रमण

तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील, तर त्यांच्याद्वारे सोडलेल्या बॅक्टेरिया या जमिनीवर जाऊन स्थित होतात. आणि जेव्हा तुम्ही अनवाणी चालता. त्यावेळी हे बॅक्टेरिया तुमच्या पायात प्रवेश करतात. त्यामुळे तुमच्या पायाला जखमा होणे, त्याचप्रमाणे इतर अनेक आजार होतात.

कीटक आणि परजीवी

घरामध्ये फरशीवर अनेक प्रकारचे कीटक आणि परजीवी असतातm जे आपल्याला दिसत नाहीत. परंतु जेव्हा आपण अनवाणी चालतो. तेव्हा हे कीटक तुमच्या पायामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे पायांना खाज सुटणे, वेदना होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

पाय दुखणे

घरातील फरशी खूप कठोर असते.त्याचप्रमाणे असमान असते. त्यामुळे तुमच्या पायाच्या तळव्यावर जास्त दाब येतो. आणि त्यामुळे तुम्हाला वेदना होतात. म्हणून जर तुम्ही फरशीवर अनवाणी चालत असाल, तर तुमचे पाय दुखू शकतात.

धोका टाळण्यासाठी काय करावे ? | Walking Barefoot

  • घरात नेहमी चप्पल किंवा मोजे घाला.
  • तुमच्या घरातील जागा नेहमी स्वच्छ आणि जंतुनाशकाने धुवून घ्या.
  • तुमचे पाय नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
  • तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग जाणवत असेल वेदना होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.