Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 650

Revised Pension Scheme | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; जुनी पेन्शन योजनेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Revised Pension Scheme

Revised Pension Scheme | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी सरकारकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केलेली होती. आता याच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना (Revised Pension Scheme) 1 मार्च 2024 पासून लागू होणार आहे. याबाबतची माहिती राज्याच्या सचिवांनी दिलेली आहे. याबाबत सोमवारी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जुनी पेन्शन योजनेच्या निगडित सर्व विभागांचे सचिव उपस्थित होते. त्यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्यामुळे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ 1 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे. असे देखील आदेश निघालेले आहेत. त्याचप्रमाणे केंद्राप्रमाणे 4 टक्के महागाई भत्ता देखील वाढ होण्यास मंजुरी दिलेली आहे. तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला. तसेच निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत भागाची देय रक्कम 20 वर्षांनी पुर्नस्थापित करण्यात येईल असे देखील सांगितलेले आहे.

राज्य सरकारच्या झालेल्या या बैठकीमध्ये सेवानिवृत्त उपदान 14 लाख ऐवजी 25 लाख रुपये निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील रिक्त पदे देखील भरण्यात येणार आहेत. तसेच कामासाठी आगाऊ वेतन वाढ देण्याबाबतचा निर्णय देखील सांगितलेला आहे.

वाढीव बाल संगोपन रजेबाबत निर्णय | Revised Pension Scheme

सरकारी महिला कर्मचाऱ्यांना आता बाल संगोपनाची रजा वाढवून देता येईल आणि याबाबतचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. कंत्राटी आणि योजना कामगारांना त्यांच्या मागणीनुसार सेवा नियमित करण्याचे धोरण देखील राबवले जात आहे.

IRCTC : बिनधास्त करा अभ्यास…! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना IRCTC देते तिकिटात खास सवलत

IRCTC students

IRCTC : जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असल्याने, भारतीय रेल्वे दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वाहतूक करते. रेल्वेचा प्रवास ते स्वस्त आणि सोपा असल्यामुळे भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा देत असते. तुम्हाला कदाचित माहित नसेल की रेल्वे प्रवासी खर्चापैकी फक्त 50 टक्के रक्कम प्रवाशांकडून वसूल करते. विद्यर्थ्यांसाठी IRCTC कडून विशेष सवलत दिली जाते. ही सवलत नेमकी कोणाला आणि कशा प्रकारे मिळते चला जाणून घेऊया…

विद्यार्थी सवलत ( IRCTC )

भारतीय रेल्वे विद्यार्थ्यांना स्लीपर क्लासमध्ये सवलत देते. तिकीट भाड्याचा परतावा IRCTC द्वारे दुसऱ्या दिवशी परत केला जातो. हा परतावा डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. मात्र ही सवलत ई-तिकिटांसाठी वैध नाही.

किती मिळते सूट ? ( IRCTC )

सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना ( IRCTC ) द्वितीय श्रेणी आणि स्लीपर क्लासमध्ये 50 टक्के सवलत दिली जाते आणि MST (मासिक हंगामी तिकीट) आणि QST (त्रमासिक हंगामी तिकीट) मध्ये 50 टक्के सवलत दिली जाते. SC/ST श्रेणीतील विद्यार्थ्यांना द्वितीय आणि स्लीपर वर्गात 75 टक्के आणि MST आणि QST मध्ये 75 टक्के सूट मिळते.

या’ परीक्षांवर देखील सवलत ( IRCTC )

UPSC आणि केंद्रीय कर्मचारी निवड आयोगाच्या मुख्य परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीत 50 टक्के सूट मिळते. याशिवाय 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे संशोधक संशोधन कामासाठी प्रवास करत असतील तर त्यांना द्वितीय आणि स्लीपर क्लासच्या तिकिटांवर 50 टक्के सवलत दिली जाते.

IRCTC अंतर्गत ‘पर्यटन मॉनिटर्स’ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात आहात का?? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि अंतर्गत (IRCTC) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत पर्यटन मॉनिटर्स पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांना 3 जुलैपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. या तारखेच्या पुढील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पदाचे नाव – पर्यटन मॉनिटर्स

रिक्त जागा – एकूण 02

शैक्षणिक पात्रता – पदवीधर उमेदवार

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – वयोमर्यादा 28 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे निवड होईल

मुलाखतीची तारीख – 03 जुलै 2024

मुलाखतीचा पत्ता – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई 400 028

अधिकृत वेबसाईट – https://www.irctc.com/

Kitchen Tips : FSSAI ने सांगितली दुधातील भेसळ ओळखण्याची ट्रिक ; घराच्या घरी करा दुधाची क्वालिटी टेस्ट

milk

Kitchen Tips : दूध म्हणजे प्रोटीनचा महत्वपूर्ण सोर्स दुधामुळे शरीराला अनेक पोषकतत्व मिळतात. लहान मुलांना तर दूध द्यायला नक्की सांगितले जाते. पण पूर्वीचा काळ आणि आत्ताचा हा वेगळा आहे. इतर गोष्टींप्रमाणे दुधातही भेसळ केली जाते. त्यामुळे असे भेसळयुक्त दूध शरीरासाठी हानिकारक ठरते. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही FSSAI ने सांगितलेली दुधातील भेसळ ओळखण्याची ट्रिक (Kitchen Tips) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी दुधाची क्वॅलिटी टेस्ट करू शकता.

दुधात केमिकल्सची भेसळ (Kitchen Tips)

हल्ली दुधात भेसळ असल्याच्या बातम्या आपण पाहत असतो. दुधात केवळ पाण्याची नाही तर दूध घट्ट राहण्यासाठी त्यामध्ये युरिया, आरारोट, अमोनिया नायट्रेट, फर्टीलायझर, शुगर, मीठ, ग्लुकोज यासारखे पदार्थ आणि केमिकल्स मिसळले जातात जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायी ठरतात.

तुम्हीच सुद्धा तुमच्या घरामध्ये येणाऱ्या दुधाची गुणवत्ता (Kitchen Tips) तपासू शकता जर तुमच्या दुधामध्ये भेसळ असेल तर काही ट्रिक वापरल्यास तुम्ही वापरात असलेले दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे तपासू शकता.

हा प्रयोग करण्यासाठी करण्यासाठी सगळ्यात आधी काचेचा एक लांब तुकडा घ्या आणि खाली पाडा त्यावर दुधाचे काही थेंब घाला जर दूध शुद्ध असेल तर त्यातून हळूहळू वाहिलं जाईल आणि मागे पांढरे डाग सोडत राहील. पण दुधात जर पाणी मिसळले असेल तर त्यावर कोणताही डाग दिसणार नाही.

कधीकधी दुधामध्ये साबणाची सुद्धा भेसळ केली जाते त्यामुळे तुम्ही विकत घेतलेले दूध हाताच्या बोटांवर घेऊन घासलं तर त्यातून फेस तयार होतो त्यामुळे हे दूध अस्सल नाही तर भेसळयुक्त (KitchenTips) आहे आणि या साबणाचे भेसळ असल्याचे दिसून येईल.

दुधातील पोषकतत्व (Kitchen Tips)

अनेक दृष्टिकोनातून दूध हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन डी, विटामिन ई, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं त्यामुळे इम्युनिटी सिस्टीम देखील चांगले राहते. हाड आणि दात मजबूत होण्यासाठी दूध हे फायदेशीर ठरतं. याशिवाय दुधामुळे (Kitchen Tips) पचनक्रिया चांगली राहते. वजन कमी होते. हृदयाचे आरोग्य सुधारते. त्वचा आणि केसांचा आरोग्य देखील सुधारते, झोपेची गुणवत्ता सुधारते.

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या 5 चुका नक्की टाळा!! भविष्यात येणार नाही कोणतीही अडचण

income tax returns

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरले नाही तर दंड आकारला जाणार आहे. या कारणामुळेच सध्या करदाते ITR भरण्यासाठी घाई करत आहेत. परंतु ही घाई करत असतानाच करदात्यांकडून पुढील चुका देखील होऊ शकतात. या चुकांमुळे त्यांना आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे ITR भरताना पुढील चुका आपल्या बाबतीत होणार नाही याची काळजी घ्यावी.

1) ITR फॉर्ममध्ये चुकीची वैयक्तिक माहिती भरणे – ITR दाखल करताना चुकीची माहिती भरू नये. वैयक्तिक वा कोणतीही माहिती भरताना करदात्याने मूल्यांकन वर्ष निवडले पाहिजे. चुकीचे मूल्यांकन वर्ष निवडल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. हा फॉर्म भरताना व्यवस्थित काळजी देऊन तो भरावा. कारण कोणतीही माहिती चुकीची भरल्यास तुमचे रिटर्न नाकारले जाऊ शकते.

2) चुकीच्या ITR फॉर्मची निवड – जर करदात्याने योग्य ITR फॉर्म निवडला नाही तर त्याचे नुकसान होऊ शकते. लक्षात घ्या की, आयकर विभागाचे आयटीआर फॉर्म विविध प्रकारचे असतात. करदात्याने स्वत:साठी योग्य आयटीआर फॉर्म निवडणे महत्त्वाचे आहे. जर करदात्याला यात अडचण येत असेल तर तो एखाद्या तज्ज्ञाची मदत घेऊ शकतो.

3) उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची माहिती न देणे – अनेक करदाते फॉर्म भरताना त्यांच्या उत्पन्नाच्या मुख्य स्त्रोताविषयी माहिती देतात. परंतु, बचत खात्यात जमा केलेल्या पैशांवरील व्याज, भाड्याचे उत्पन्न इत्यादी माहिती ते देत नाहीत. परंतु, करदात्यांनी त्यांच्या रिटर्नमध्ये प्रत्येक लहान आणि मोठे उत्पन्न लिहायला हवे.

4) परताव्याची पडताळणी न करणे – आयकर विवरणपत्र भरल्यानंतर त्याची पडताळणी करणे बंधनकारक आहे. असे न केल्यास तुमचा रिटर्न आयकर अधिकाऱ्यांकडून विचारात घेतला जात नाही. यामुळे तुमची सगळी मेहनत वाया जाते. त्यामुळे रिटर्न भरताना त्याची पडताळणी करावी.

5) फॉर्म 26AS च्या डेटाकडे दुर्लक्ष करणे – फॉर्म 26AS मध्ये करदात्यांच्या TDS आणि TCS बद्दल माहिती असते. हे तुमच्या स्वतःच्या रेकॉर्डशी जुळणे महत्त्वाचे आहे. तुम्ही असे न केल्यास तुम्हाला याचा फटका बसू शकतो. जर तुम्ही पगारदार करदाते असाल तर फॉर्म 16 चा डेटा फॉर्म 26AS च्या डेटाशी जुळवा.

Viral Video : वाह रे पठ्ठ्या …! कुलरला बनवले फ्रिज , रूम घेऊन राहणाऱ्या विदयार्थ्यांनी पाहिलंच पाहिजे

viral video cooler

Viral Video : आपल्या देशात जुगाडू लोकांची आजीबात काही कमी नाही. अशा जुगाडू लोकांची डोक्यालिटी कुठे आणि कशी चालेल काही सांगता येत नाही. आपल्याला सोशल मीडियावर असे बरेच जुगाडू लोकांचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जुगाडू व्हायरल व्हिडीओ विषयी सांगणार आहोत ज्यात एका विद्यार्थ्याने (Viral Video) चक्कं कुलरलाच फ्रिज बनवला आहे . आता हे कसं काय ? चला पाहुयात

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

या व्हिडीओ मध्ये तुम्हाला एक विद्यार्थी दिसेल तो आपल्या रूम मध्ये फळं भाज्या बॅग मधून घेऊन येतो. नंतर हा विद्यार्थी रुम मधून बाहेर येतो आणि अगदी सहजपणे जसे आपण किचनमधला फ्रिज उघडून भाजी बाहेर काढतो त्याचप्रमाणे चक्क कुलरच्या मागच्या बाजूने (Viral Video) त्याचा दरवाजा उघडतो. त्याने कुलरमध्ये वेगवगळ्या पिशव्यांमध्ये काकडी आणि इतर भाज्या आणि फळे लटकवलेली दिसतात. एवढेच नाही तर कुलरमधून थंड हवा येण्यासाठी असणाऱ्या पाण्याच्या ट्रे मध्ये देखील त्याने पाण्याच्या बाटल्या,कोल्डड्रींक्स ठेवलेल्या दिसत आहेत. गर्मीमध्ये फ्रिज शिवाय फळे आणि भाज्या टिकवण्याचा विद्यार्थ्यांचा हा देशी जुगाड सध्या सोशल मीडियावर (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

हा व्हिडीओ its_rohit_yadav8948 या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. खरंतर जेव्हा विद्यार्थी शिक्षणासाठी रूम घेऊन एकत्र राहत असतात तेव्हा त्यांना घरच्यासारखे फळं, भाज्या ठेवण्यासाठी फ्रिज उपलब्ध नसतो (Viral Video) म्हणूनच या विद्यार्थ्यांनी आपली ओक्यालिटी चालवत देशी जुगाड केला आहे. सध्या उत्तर प्रदेश मधील प्रयागराज इथे गर्मी असल्यामुळे तेथील रहिवासी गर्मीचा सामना करीत आहेत. तेथीलच एका विद्यार्थ्याने हा जुगाड केला असून सध्या हा जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. काही म्हणा पण या विद्यार्थ्यांच्या जुगाड मुळे दूध , फळे भाजी टिकून राहत आहेत शिवाय थंड पाणी आणि कोल्डड्रिंक सुद्धा थंड राहत आहेत.

Child Care : पावसाळ्यात लहान मुलांना असतो इन्फेक्शनचा सर्वाधिक धोका; कशी घ्याल काळजी?

Child Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Child Care) पावसाळा म्हटलं की, त्यासोबत संसर्गजन्य आजार आपोआपच डोकं वर काढू लागतात. खास करून लहान मुलं संसर्गांमुळे लवकर आजारी पडतात. त्यात शाळा सुरु झाल्यामुळे कितीही पाऊस असला तरी मुलांना घराबाहेर पडावं लागतं. परिणामी, साचलेलं पाणी, पावसात भिजणे यामुळे मुलं आजारी पडतात. पावसाळ्याच्या दिवसात हवामानात आद्रता वाढते. परिणामी जीवजंतूंची अमर्याद वाढ होते.

हे विषाणू हवेतून अनेक आजार पसरवतात. अशा संसर्गजन्य आजारांमुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते आणि इतर आजार देखील आपल्या शरीरावर अगदी सहज हल्ला करू शकतात. म्हणूनच अशा इन्फेक्शनपासून मुलांचे संरक्षण करणे (Child Care) गरजेचे असते. पण कसे? याचेच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

पावसाळ्याच्या दिवसात डास चावणे, दूषित पाणी पिणे, दूषित अन्न खाणे, अस्वच्छता यामुळे विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. अगदी ताप, सर्दी, खोकला यांसह त्वचा रोग, गॅस्ट्रो, कावीळ असा अनेक समस्या होण्याचा धोका वाढलेला असते. त्यामुळे अशावेळी मुलांची काळजी कशी घ्यावी? असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतो. आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

1) ओले कपडे घालू नका (Child Care)

पावसाच्या दिवसात कपडे लवकर सुकत नाहीत. त्यामुळे बरेच लोक घाईच्या वेळेत असेच ओले कपडे परिधान करतात. लहान मुलांच्या शाळेचे ड्रेस सुकले नसतानाही परिधान केल्याने मुलांना त्वचारोग होण्याची शक्यता असते. एकतर पावसाळ्यात हवेमध्ये आद्रता असते. ज्यामुळे कपड्यांमध्ये ओलावा कायम राहतो. शिवाय पावसात भिजल्याने आणखी कपडे ओले होतात. असे ओले कपडे अंगावर अधिक वेळ राहिल्यास मुलांना गजकर्ण, चिखल्या, फंगल इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे ओले कपडे घालू नये आणि अंग ओले झाल्यास त्वरित कोरडे करावे.

2) फ्लूचे लसीकरण करून घ्या

पावसाळ्यात मुलांना फ्लू होण्याची शक्यता सर्वाधिक असते. (Child Care) चुकीचे अन्न वा दूषित पाणी प्यायल्याने मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि अशा मुलांच्या शरीरावर इन्फ्लुएंझा जिवाणू हल्ला करतात. यामुळे जो ताप येतो त्याला फ्लू म्हणतात. हा ताप संसर्गजन्य असल्याने एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे जाऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान मुलांसाठी फ्लूचे लसीकरण करून घ्या. असे केल्यास मुलांचे फ्लूपासून रक्षण होईल.

3) पाण्याचे निर्जंतुकीकरण करा

आपण घरात जे पाणी पितो ते स्वच्छ आणि निर्जंतुक असायला हवे. (Child Care) बऱ्याचदा पावसाळ्यात पाणी खराब येते आणि असे पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या होतात. मुलांना कावीळ, गॅस्ट्रोसारख्या संसर्गांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी गाळून घ्या आणि गरम करून प्या.

4) उघड्यावरील अन्न खाऊ नका

लहान मुलांच्या घरच्या जेवण्यापेक्षा बाहेरचे चमचमीत, तळलेले पदार्थ खाण्याची भारी हौस असते. पण पावसाच्या दिवसात असे बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ तसेच घरात शिळे अन्नपदार्थ खाल्ल्यास मुलांना टायफॉईड, गॅस्ट्रो, कावीळ (पिवळी कावीळ) चा संसर्ग होऊ शकतो. (Child Care) त्यामुळे आपली मुलं बाहेरचे पदार्थ आणि घरात शिळे अन्न खाणार नाहीत याची काळजी घ्या.

5) अस्वच्छता नको

जिथे अस्वच्छता असते तिथे डासांचा प्रभाव असतो. खा करून पावसाच्या दिवसात घराच्या आसपास किंवा कुंड्यांमध्ये पाणी साचले तर लगेच डास होतात. त्यामुळे एकतर घरात किंवा घराच्या आसपास पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा, डासांच्या प्रभावाने मुलांना डेंग्यू, मलेरियाचा संसर्ग होऊ शकतो.

6) सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा

पावसाळ्याच्या दिवसात मुलांना सार्वजनिक ठिकाणी फिरायला नेताना किंवा बागेत नेतेवेळी मास्क घालावा. (Child Care) ज्यामुळे मुलांच्या शरीरात हवेतील जंतू प्रवेश करण्यास असमर्थ ठरतील आणि मुलांचा संसर्गापासून बचाव होईल.

विधानसभेत पिपाणी नाहीतर तुतारीच वाजणार!!उमेदवारांच्या विजयासाठी शरद पवारांची नवी खेळी

Sharad Pawar Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीनंतर आता शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यात शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) अनेक मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आले आहे. या उमेदवारांनी पिपाणी चिन्हावर लाखभर मते घेतली आहे. परंतु आता यानंतर निवडणुकीसाठी पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली आहे. याबाबत गटाने आयोगाला पत्र लिहिले आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार घडाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. परंतु निवडणुकीत या चिन्हाला जुळणारे पिपाणी चिन्ह काही अपक्ष उमेदवारांना देण्यात आले आहे. याचाच फटका पवारांच्या उमेदवारांना बसला आहे. कारण की, पिपाणी चिन्हामुळे साताऱ्यात संजय गाडे यांचा विजय झाला तर शशिकांत शिंदे यांचा पराभूत झाला. शशिकांत शिंदेंच्या साताऱ्यात झालेल्या पराभवाचे कारणच तुतारी आणि पिपाणी चिन्हात झालेला गोंधळ आहे.

त्यामुळेच पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत याच कारणामुळे शरद पवार गटाला फटका बसू नये म्हणून शरद पवार गटारे पिपाणी चिन्ह वगळण्यात यावे, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. आता शरद पवार गटाची ही विनंती आयोगाने मान्य केल्यास पिपाणी चिन्ह वगळण्यात येईल. यामुळे याचा थेट फायदा शरद पवार गटाला होईल.

BMC Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत चौथी पास उमेदवारांना नोकरीची संधी; असा करा अर्ज

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024  | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. अनेक लोकांचे मुंबईमध्ये काम करण्याचे स्वप्न असते. आता त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Bharti 2024 ) यांच्या अंतर्गत एक भरती प्रक्रिया निघालेली आहे. यासाठी आता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. या भरती अंतर्गत सफाई कामगार या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 2 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा आता या भरतीची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | BMC Bharti 2024 

  • पदाचे नाव – सफाई कर्मचारी
  • शैक्षणिक पात्रता – चौथी पास
  • वयोमर्यादा – 22 ते 45 वर्ष
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -2 जुलै 2024
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता आरोग्य अधिकारी 76 श्रीकांत पालेकर मार्ग चंदनवाडी मरीन लाईन्स मुंबई 400002

अर्ज कसा करावा ? | BMC Bharti 2024 

  • या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • हे अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचे आहेत.
  • दिलेल्या पत्त्यावरच हे अर्ज पाठवा.
  • 2 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही; NEET प्रकरणावरून किरण मानेंनी सरकारचे वाभाडे काढले

NEET Kiran Mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील अनेक दिवसांपासून देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजे नीटच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरु आहे. आधी पेपरफुटी आणि त्यानंतर अचानक रद्द केलेली पीजी परीक्षा, यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून मोठा संताप व्यक्त केला जातोय. त्यातच विरोधक सुद्धा सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. आता या वादात प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी उडी मारली आहे. किरण माने यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट शेअर करत सरकारचे वाभाडे काढलेत. देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही ! जमत नसेल तर सरळ राजीनामा देऊन हिमालयात ध्यान करायला जा असं म्हणत किरण माने यांनी संताप व्यक्त केलाय.

किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी –

केंद्रात कशीबशी सत्ता आली म्हणून कितीही टणाटणा उड्या मारूद्यात… या टग्यांना महाराष्ट्रात ठाकरे, पवारांची आणि देशात राहुल गांधींची जबरदस्त दहशत बसलेली आहे. इलेक्शन कमिशनपास्नं इव्हीएमपर्यन्त सगळे हाताशी घेऊनही जनतेनं लाथ घातल्यामुळे या हुकूमशहांचा माज ठेचला गेलाय. एरवी, मणिपूर धिंड आणि कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्यांकडे माजोरडेपणानं डोळेझाक करणारे हे दगडाच्या काळजाचे लोक… NEET परीक्षेमधल्या घोटाळ्याला या कोडग्यांनी भिकसुद्धा घातली नसती. उडवुन लावलं असतं. पण केंद्रात कुबड्या घेऊन सत्तेत आलेत. न ऐकून सांगतायत कुणाला??

इकडे आदित्य ठाकरेंनी ‘ॲॅंटी पेपर लीक कायदा आणून सीईटी आयुक्तांवर कारवाई करावी’ असा इशारा देणारी दणदणीत प्रेस काॅन्फरन्स घेतली… तिकडे राहुल गांधींनीही असं रान पेटवलं… लगेच अनाजीपंतांपास्नं रंगाबिल्लापर्यंत सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली !आदित्य ठाकरेंच्या आग्रही मागणीपुढे केंद्रसरकारला नाक घासावं लागलं. ‘ॲॅंटी पेपर लीक’ कायद्याला शेवटी मंजुरी द्यावीच लागली. आता पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. डायरेक्टर जनरल सुबोधकुमारलाही हाकलावं लागलं. राहुल गांधींनी केलेल्या गंभीर आरोपांपुढे झुकून युजीसी नेटची आणि NEET ची सीबीआय चौकशीही केली जाणार आहे. पण… एवढंच पुरेसं आहे का?

विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत झालेलं नुकसान कोण भरुन देणार??? या परीक्षा रद्द करून तरूण पोरापोरींच्या करीयरशी जीवघेणा खेळ खेळला जातोय. मागच्या दहा वर्षांत जवळजवळ पन्नास पेपर लीक झालेत. कितीतरी हुशार, प्रतिभावान पोरापोरींचे आयुष्य उद्धवस्त झालंय. काहींनी आत्महत्या केल्यात. काहींनी गुणवत्तेला मुरड घालून कमी दर्जाच्या नोकर्‍या स्विकारल्यात. याचा जाब सरकारला हडसून-खडसुन विचारायला हवा. या देशात शिक्षण व्यवस्थेचा पुर्णपणे सत्यानाश झालेला आहे. सत्ताधार्‍यांना ‘हिंदु-मुस्लीम, मराठा-ओबीसी, दलित-सवर्ण, मंदिर-मस्जीद’ यापलीकडे काहीही दिसत नाहीये. देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही ! जमत नसेल तर सरळ राजीनामा देऊन हिमालयात ध्यान करायला जा. ‘काबिल’ माणूस बसवा खुर्चीवर.