Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 651

Women Fighting : केस ओढले, कानफाडात दिली..!! बसमधील फ्री सीटसाठी दोन बायकांमध्ये मारामारी; VIDEO व्हायरल

Women Fighting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Women Fighting) जगभरातील बरेच लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून अनेक ठिकाणी प्रवास करत असतात. आपल्या देशात सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीत मारामारीच्या कित्येक घटना दररोज घडत असतात. अशा ट्रेन, बस किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक वाहनांमध्ये अशा घटना घडतात. ज्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतात. दरम्यान, सीटवरून भांडणे तुम्ही पाहिली असतील. अशाच एका भांडणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ (Women Fighting)

बरेच लोक रोज बस आणि ट्रेनने प्रवास करतात. हे प्रवास गर्दीचे असल्यामुळे अनेकदा बसायला जागा मिळवण्यावरून वाद होत असतात. बाचाबाचीपासून सुरु होणारी ही भांडणं कधी हाणामारीवर पोहोचतात समजतसुद्धा नाही. असेच काहीसे या व्हिडिओत पहायला मिळत आहे. भरधाव येणाऱ्या बसमध्ये दोन महिलांमध्ये चांगलीच जुंपल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. माहितीनुसार, या दोन्ही महिला ‘मोफत बस सीट’वरून भांडत आहेत. दोघीही तारतम्य सोडून एकमेकींना भिडल्याचे यात दिसत आहे.

बसमधील मोफत सीटवरून राडा

सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडीओ तेलंगणातील असून एका मोफत सीटसाठी दोन महिला प्रवासी एकमेकींसोबत भांडताना दिसत आहेत. या व्हिडीओत दिसतंय, बसमधील फ्री सीटवर बसण्यासाठी या महिलांमध्ये वाद सुरू आहेत. यावेळी भांडताना दोन्ही महिलांचा पारा प्रचंड चढला आहे. एकमेकींचे केस ओढणे, कानफाडात लगावणे ते कपडे ओढण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचे आपण पाहू शकतो. (Women Fighting) दोघींचा संताप इतका जास्त होता की, बसमधील ड्रायव्हर, कंडक्टर आणि अगदी सह प्रवाशांनीसुद्धा हस्तक्षेप करण्याची तसदी घेतली नाही. मात्र, उभ्या उभ्याने नुसता ड्रामा काय पहायचा? म्हणून काही प्रवाशांनी सदर घटनेचा व्हिडीओ केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

युजर्सचे मत

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ TeluguScribe नावाच्या X हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला असून यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Women Fighting) आतापर्यंत एक लाख ७३ हजारांहून जास्त व्ह्युज मिळालेल्या या व्हिडिओवर अनेक युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘कोणतीही सुविधा एकतर्फी असता काम नये.. प्रत्येक सुविधेवर प्रत्येकाचा समान हक्क हवा’. तर आणखी एकाने म्हटले, ‘मुळात महिलांना मोफत सीटची सुविधा नसावी, म्हणजे असे प्रकार घडण्याची शक्यता कमी होईल’.

Sunita Williams Trapped | सुनीता विल्यम्स अडकल्या अंतराळात, यानाच्या तांत्रिक बिघाडामुळे पृथ्वीवर येण्यास अडचण

Sunita Williams Trapped

Sunita Williams Trapped | भारताची अनुभवी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 5 जून 2024 रोजी त्यांच्या सहकाऱ्यांसह अंतराळवीरात झेप घेतली. त्यांनी बच विल्मोर हे बॉइंग स्टार लाइनर या अंतराळातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहचल्या होत्या. परंतु नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार सुनीता विल्यम्स (Sunita Williams Trapped) अंतराळात अडकलेल्या आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांना आणि त्यांना पृथ्वीवर परत येण्यात अडचणी येत आहे.

स्टार लाइनर या यानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांना पृथ्वीवर येण्यास अडचणी येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या यानामध्ये हेलियम गळती झालेली आहे. आणि काही इंजिन देखील बंद पडलेली आहे. त्यामुळे ते पृथ्वीवर परत येऊ शकत नाही. या बातमीमुळे सगळ्याच भारतीयांना काळजी लागलेली आहे. परंतु आता तज्ञांनी या समस्येवर तोडगा काढून त्यांना पृथ्वीवर सुखरूप आणण्याचे आश्वासन दिलेले आहे.

सोशल मीडियावर देखील याबाबत खूप जास्त चर्चा चालू आहे. तसेच सोशल मीडियावर अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेस एक्सचा ड्रॅगन या नावाचा वापर करावा अशी देखील चर्चा सुरू आहे. परंतु तज्ञांच्या मते हा एक छोटासा बिघाड पृथ्वीवर आणण्यासाठी धोकादायक ठरेलच असे नाही.

सुनिता विल्यम्स (Sunita Williams Trapped) यांनी तिसऱ्यांदा अंतराळात झेप घेतलेली आहे. त्यांनी यापूर्वी दोन प्रयत्न केले होते. परंतु ते दोन प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर, आता 5 जून रोजी स्टार लाईनद्वारे त्यांनी अंतराळात झेप घेतलेली आहे. परंतु 25 तासांच्या प्रवासात या यानात हेलियमची गळती झाली आहे. आणि इंजिन देखील बंद पडलेली आहे. त्यामुळे त्यांना परत पृथ्वीवर येण्यास समस्या निर्माण होत आहेत. परंतु इंजीनियरिंग टीम या समस्येचे मूळ कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे तज्ञांनी सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्याला पृथ्वीवर आणण्याचे आश्वासन दिले आहे.

बाप रे ! समुद्राखाली सापडलं एक नवं जग, एकेकाळी दफन केलेले हजारो लोक

Viral News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोकांना समुद्र खूप आवडतो. समुद्र जरी वरून अगदी शांत आणि नितळ दिसत असला, तरी समुद्राच्या आत अनेक रहस्य दडलेली आहेत. खोलवर पसरलेला हा समुद्र अनेक रहस्यांनी भरलेला आहे. समुद्राच्या खोलावर काय असेल? याचा शोध आजपर्यंत अनेक लोक लावू शकलेले नाहीयेत. आणि त्याबाबत कोणाला काही कल्पना देखील नाहीये.

समुद्रात डुबकी मारल्यानंतर त्यात तेथील एक वेगळेच जग आपल्याला पाहायला मिळते. तेथील सागरी प्राणी, वनस्पती, शंख शिंपले, दगडी या सगळ्या गोष्टी या बाहेरील जगापेक्षा खूप वेगळ्या दिसतात. आणि ज्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण जाते. समद्राबाबत एक प्रकार पुरातत्त्व शास्त्रज्ञ सोबत घडला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील फ्लोरीडो येथील लेख ओकीचोबीमध्ये समुद्रात एका वेगळ्या जगाचा शोध लागलेला आहे.

समुद्राखाली थडग्यांचे जग

मे 2024 मध्ये ट्राय नॅशनल पार्कने असे घोषित केले आहे की, गार्डन की जवळील एका बेटावर हॉस्पिटल आणि स्मशानभूमी सापडलेली आहे. त्याविषयी शास्त्रज्ञांनी असे देखील सांगितले होते की ऐतिहासिक काळातील हे एक कब्रस्तान आहे. जिथे अनेक लोक दफन केलेले असावेत. परंतु ही स्मशानभूमी केवळ जमिनीच्या वरच नाही तर पाण्याखाली आहे. अशा अनेक कथा आणि रहस्य याबाबत जोडलेले आहेत. त्यातील असेच एक रहस्यमय आणि भीतीदायक गोष्ट म्हणजे हे ठिकाण थडग्यांनी भरलेले असल्याचे बोलले जाते.

या कबर कुख्यात कैद्यांच्या असू शकतात, ज्यांच्या कथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पुरातत्व तज्ज्ञांनी म्हटले आहे. जोश मॅरानो म्हणतात की या कबरी फोर्ट जेफरसन येथे तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांच्या देखील असू शकतात. याच हॉस्पिटलमध्ये 1890-1900 दरम्यान पिवळ्या तापाच्या रूग्णांवर उपचार केले जात होते. हे तेच ठिकाण आहे ज्याचा उपयोग अमेरिकन गृहयुद्धादरम्यान कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात होता. अशा परिस्थितीत त्यांच्या यातना आणि वेदनादायक मृत्यूच्या कथाही या ठिकाणी आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेला प्रस्थापितांच्या राजकारणाला धक्का बसणार

Ahmednagar Assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणजे नगर (Ahmednagar) … राजकारणाचाच विचार करायचा झाला तर याच नगरचं राजकारण भल्याभल्यांना पाणी पाजणारं…. विखे, थोरात, गडाख, पाचपुते यांसारखी दिग्गज राजकारणी याच जिल्ह्यातील… या जिल्ह्यानं राजकारणातील अनेक बदल पाहिले आणि विखेंसारख्या प्रस्थापितांचा लंकेसारख्या सर्वसामान्य नेत्याने लोकसभेला केलेला पराभवही… त्यामुळे नगरमध्ये राजकारणात बदलाचे वारे वाहत असताना जिल्ह्यातील तब्बल 12 विधानसभा मतदारसंघात निकाल कोणाच्या बाजूने लागतोय? शिर्डी पासून ते कर्जत जामखेड पर्यंत नगरचे संभाव्य बारा आमदार कोण असतील? विधानसभा निवडणुकीला जिल्ह्यातील वारं कुणाच्या दिशेने वाहतंय? महाविकास आघाडी की महायुती? त्याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग…

यातला पहिला मतदारसंघ पाहुयात तो संगमनेरचा…काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते बाळासाहेब थोरात यांचा हा बालेकिल्ला… संगमनेरवर त्यांची पकड अशी की आत्तापर्यंत सात वेळा ते याच मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करतायत… त्यांच्या विरोधात प्रत्येक टर्मला शिवसेना लढत देत असते पण विजय होतो तो थोरातांचाच…कारखाना, शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरील एक हाती होल्डमुळे यंदाही महायुतीकडून इच्छुकांची भाऊ गर्दी असली तरी थोरातच आरामात निवडून येतील…दुसरा मतदारसंघ आहे शिर्डी …… संगमनेर थोरातांचा तसा शिर्डी विखेंचा बालेकिल्ला…1995 पासून पक्ष बदलले पण राधाकृष्ण विखेच इथले परमनंट आमदार राहिले… शिर्डीत विखेंना विरोधक नसणं हेच त्यांच्या राजकारणाला नेहमी पोषक राहीलं… ग्रामपंचायतींपासून ते सहकारी संस्थांपर्यंत ‘सब कुछ विखे’ असा शिर्डीत पॅटर्न पाहायला मिळतो…पण लोकसभेतील पराभवानं विखेंच्या प्रस्थापित राजकारणाला सुरुंग बसला… आणि त्याचाच इम्पॅक्ट शिर्डीतही पाहायला मिळू शकतो…मात्र सध्या तरी महाविकास आघाडीकडे प्रबळ दावेदार नसल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदारकी सेफ झोन मध्ये आहे…

तिसरा मतदारसंघ आहे कर्जत जामखेडचा….. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार इथले विद्यमान आमदार… खरं म्हणजे 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार जायंट किलर ठरले. शिंदेंनी आपल्या या पराभवाचं खापर विखे पिता पुत्रांवर फोडलं होतं. पण आता विधानसभेला पुन्हा एकदा रोहित पवार आणि राम शिंदे एकमेकांच्या विरोधात आमने-सामने पाहायला मिळतील… पण अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केल्याने तिकीट वाटपात महायुतीत मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो. अजितदादा गटातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंजुषा गुंड आणि त्यांचे पती राजेंद्र गुंड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत… त्यासोबत भाजपकडून प्रवीण घुले देखील उमेदवारीसाठी अडून बसल्याचं समजतंय… पण मागील पाच वर्षांत रोहित पवारांनी कर्जत जामखेड मध्ये केलेली विकास कामं आणि पक्षबांधणी बघता याही टर्मला त्यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त आहेत…

चौथा मतदारसंघ आहे तो शेवगाव पाथर्डीचा…भाजपच्या विद्यमान आमदार मोनिकाताई रांजळे या सलग दोन टर्म शेवगाव पाथर्डीची आमदारकी राखून आहेत… वंजारी समाजाची या मतदारसंघात मोठी ताकद आहे… म्हणूनच की काय आता पंकजाताई मुंडे यांच्या पराभवानंतर प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा या मतदारसंघासाठी होतेय. मुंडे यांचे कार्यकर्तेही प्रीतम मुंडे यांना या मतदारसंघातून निवडणुकीसाठी गळ घालतायत… मोनिका रांजळे यांच्या डोक्यावर मुंडे कुटुंबाचा हात असल्यानं त्या इथून दोन टर्म सहज निवडून आल्या. पण त्या मुंडे कुटुंबातील उमेदवारासाठी जागा खाली करतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यात विधानसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे हेच पुन्हा तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असून खासदार निलेश लंके यांनी ढाकणेंना आमदार बनवण्याचा शब्द देऊनआमदार बनवण्याचा शब्द देऊन शेवगावच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणलाय…पाचवा मतदारसंघ येतो तो राहुरीचा…तसं पाहायला गेलं तर भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांचा हा बालेकिल्ला… पण 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे हे जायंट किलर ठरत त्यांनी कर्डिलेंच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लावला…नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही प्राजक्त तनपुरे यांनी निलेश लंकेच्या पाठीशी आपली सारी यंत्रणा लावली होती… त्याचाच इम्पॅक्ट म्हणून लंके आज खासदार आहेत…त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला राहुरीतून पुन्हा एकदा कर्डिले विरुद्ध तनपुरे अशी लढत होणार असून यंदा ‘राहुरीत फक्त आपणच!’ हे कोण सिद्ध करून दाखवणार? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…

सहावा मतदारसंघ आहे तो श्रीगोंदा…भाजपचे दिग्गज बबनराव पाचपुते हे श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल जगताप यांच्याच नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. यासोबत अनुराधा नागवडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार यांनीही उमेदवारीसाठी दंड थोपटल्याने श्रीगोंद्याचे चित्र सध्यातरी अस्पष्टच म्हणावं लागेल.. पण लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने लागलेला रिझल्ट पाहता श्रीगोंद्यातही त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे…सातवा मतदारसंघ येतो तो कोपरगावचा सहकाराचा बालेकिल्ला समजला जाणारा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ… कोपरगाव मतदार संघात सत्तेसाठी काळे आणि कोल्हे या दोन परिवारातील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिलाय… या मतदार संघात काळे आणि कोल्हे यांच्यातली लढत परंपरागत असते. कधी कोल्हे तर कधी काळेंकडे सत्ता… मावळत्या विधानसभेलाही भाजपकडून स्नेहलता कोल्हे तर राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे यांच्यात लढत झाली पण बाजी मारली ती काळे यांनी…पण राष्ट्रवादीच्या फुटीत काळे अजितदादांसोबत आल्यानं काळे आणि कोल्हे हे दोघेही परस्पर कट्टर विरोधक आता एकाच महायुतीचे भाग झालेत… पण विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनाच तिकीट मिळण्याचे चान्सेस जास्त असल्यानं कोल्हे शरद पवारांची तुतारी हातात घेतील का? यावर इथल्या निकालाचं गणित ठरणार आहे…

आठवा मतदारसंघ येतो तो अहमदनगर शहर विधानसभेचा….. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप इथले विद्यमान आमदार. नगर शहर हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला… पण 2014 पासून सलग दोन टर्म शिवसेनेच्या अनिल राठोडांना असमान दाखवत संग्राम जगताप आमदार झाले… राष्ट्रवादी फुटीत त्यांनी अजितदादांना साथ दिल्यानं महायुतीकडून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे सर्वाधिक चान्सेस आहेत… मात्र अनिल राठोड यांच्या निधनानंतर जगतापांना कडवं आव्हान देईल, असा प्रतिस्पर्धी सध्या तरी मतदारसंघात दिसत नाहीये. मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे किरण काळे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी संग्राम जगताप यांना आव्हान देण्यासाठी तयारी दाखवली आहे… मात्र सध्यातरी अहमदनगर शहरमध्ये संग्राम जगताप यांचंच पारडं जड दिसतय…नववा मतदारसंघ आहे पारनेरचा…आमदारकीला शिवसेनेचे विजय औटी तर खासदारकीला सुजय विखेंचा पराभव करत नगरच्या राजकारणात निलेश लंके नावाचा ब्रँड तयार झालाय… पण त्यांची पाळमूळ रुजली ती याच पारनेर मतदारसंघात… निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्या नावाची पारनेरसाठी चर्चा होतेय… पण महाविकास आघाडीकडून कोण हे अद्याप क्लियर नाहीये. बाकी काहीही झालं तरी निलेश लंकेचा अप्पर हँड असल्यामुळे पारनेरमध्ये आघाडीचाच उमेदवार सरशी मारेल, अशी चर्चा आहे…

दहावा मतदार संघ येतो तो अकोले विधानसभा…आदिवासी बहुल असणाऱ्या या मतदारसंघात सध्या किरण लहामटे हे विद्यमान आमदार आहेत… भाजपच्या वैभव पिचड यांना मात देत ते 2019 ला गेम चेंजर ठरले… पण पुढे ते अजितदादा गटात आल्यानं लहामटे आणि पिचड दोघेही महायुतीचे भाग बनलेत…महायुतीकडून उमेदवारीचा शब्द मिळाल्यामुळेच लहामटे यांनी आधी घड्याळ मग तुतारी आणि पुन्हा घड्याळ अशी भूमिका बदलली… पण जर लहामटे यांना शब्द दिला गेला असेल तर वैभव पिचड पुन्हा शरद पवारांकडे परतणार का? यावर इथला निकाल कसा लागेल ते ठरणार आहे…अकरावा मतदारसंघ आहे श्रीरामपूरचा…काँग्रेसचे लहू कानडे इथले विद्यमान आमदार. श्रीरामपूर तालुका हा ऊस आणि कांदा उत्पादकांचा तालुका…जितके नेते तितके गट असले तरीही श्रीरामपुरात विखेंच्या हातात आमदारकीची चावी असते, असं बोललं जातं… यंदाही आघाडीकडून लहू कानडे यांच्याच नावाची चर्चा असताना विरोधात कोण याचा अंदाज अजूनही मतदारसंघाला लागलेला नाही…

आता पाहूयात शेवटचा आणि बारावा मतदारसंघ तो म्हणजे नेवासा विधानसभा… नेवासा ही संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी… भाजपच्या बाळासाहेब मुरकुटेंनी राष्ट्रवादीच्या शंकरराव गडाख यांचा मोदी लाटेत पराभव केला… त्याचाच वचपा गडाखांनी 2019 मध्ये काढला… अपक्ष म्हणून ते आमदार झाले… पण यानंतर ठाकरे गटाने नेवासातील त्यांची ताकद लक्षात घेत गडाखांना आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपद दिलं… त्यामुळे शंकरराव गडाख यंदा मशाल या चिन्हावर त्यांच्या विरोधात बाळासाहेब मुरकुटे महायुतीकडून मैदानात असतील, असं सध्या मतदार संघातील चित्र आहे. मात्र गडाखांची स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते सहकारापर्यंत असणारी पकड पाहता यंदा तेच पुन्हा नेवासाचे ठाकरे गटाचे आमदार असतील, असं बोललं जातंय…तर असं आहे सध्याचं अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांचं संभाव्य राजकीय गणित…. बाकी नगरच्या राजकारणात विधानसभेला कोणते राजकीय फॅक्टर महत्त्वाचे ठरतील? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा….

Easy Kitchen Tips : तुमचा सिलेंडर लवकर संपतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा, दरवेळेपेक्षा जास्त चालेल

Easy Kitchen Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Easy Kitchen Tips) प्रत्येकाच्या घरात अन्न शिजवण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. सकाळचा नाश्ता ते रात्रीचे जेवण असा अख्खा दिवस गॅसचा वापर काही ना काही कारणामुळे सुरूच असतो. प्रत्यके सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात गॅस सिलेंडर अधिक काळ चालवण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु असतो. मात्र तरीही बऱ्याचवेळा गॅस सिलेंडर वेळेआधीच संपतो. गॅस सिलेंडर लवकर संपल्यामुळे ऐनवेळी गृहिणींची मात्र चांगलीच भांबेरी उडते. तुमचाही गॅस सिलेंडर वेळेआधीच संपतो का? तर आजची बातमी तुमच्यासाठी आहे असे समजा.

कारण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकवू शकता. (Easy Kitchen Tips) अगदी छोट्या आणि सोप्या अशा या टिप्स तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे चुकूनही ही बातमी स्किप करू नका. चला तर जाणून घेऊया गॅस सिलेंडर बराच काळ टिकवण्याच्या टिप्स.

‘असा’ वाचवा सिलेंडर गॅस (Easy Kitchen Tips)

टिप 1 – अन्न शिजवताना मध्यम आचेवर शिजवावे. मोठ्या आचेवर स्वयंपाक केल्यानेही खूप गॅस वापरला जातो आणि यामुळे अनेकदा पाईपमधून गॅस गळतीची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी सिलिंडरची तपासणी करा आणि गॅसची बचत करा.

टिप 2 – कोणताही पदार्थ शिजवताना शक्यतो प्रेशर कुकरचा वापर करा किंवा भांड्यावर झाकण ठेऊन अन्न शिजवा. एकतर कुकरमध्ये लवकर अन्न शिजते आणि त्यामुळे गॅसची बचत होते. (Easy Kitchen Tips) तसेच भांड्यावर नेहमी झाकण ठेवल्यानेसुद्धा अन्न लवकर शिजते. ज्यामुळे गॅसचा वापर कमी होतो आणि तो जास्त काळ टिकतो.

टिप 3 – जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ बनवण्यासाठी भांडे गॅसवर ठेवाल, तेव्हा ते भांडे ओले नसेल याची काळजी घ्या. कारण, ओली भांडी गॅसवर ठेवल्याने ती सुकायला बराच गॅस वाया जातो. त्यामुळे भांडे गॅसवर ठेवताना स्वच्छ कापडाने कोरडे करून मग ठेवा.

टिप 4 – कोणतेही अन्न फ्रिजमधून काढून थेट गॅसवर ठेवू नका. (Easy Kitchen Tips) असे अन्न गरम करण्यासाठी गॅसचा जास्त वापर होतो आणि त्यामुळे गॅस लवकर संपू शकतो. अशावेळी, आधी अन्न फ्रिजबाहेर काढून ठेवा आणि रम तापमान नॉर्मल झाल्यानंतर गॅसवर गरम करा.

टिप 5 – तुम्ही जी गॅस शेगडी वापरता त्याचे बर्नर वेळोवेळी स्वच्छ करा. कारण साफसफाई न केल्याने गॅस बर्नरमध्ये घाण जमा होते. परिणामी गॅस नीट जळत नाही आणि तो वाया जातो. बर्नरमध्ये ज्योतीचा रंग बदलल्याचे दिसल्यास बर्नरला स्वच्छतेची आवश्यकता आहे हे समजून घ्या. (Easy Kitchen Tips)

Viral Video : रेल्वेचे डॅशिंग कर्मचारी…! स्वतःचा जीव धोक्यात घालून दुरुस्त केली रेल्वे

viral video train staff

Viral Video : कधी कधी आपल्यासमोर अशा काही घटना घडतात ज्या पाहून आपल्याला शाबासकी देण्याचे मन होते. अशीच शाबासकी मिळवण्यासाठी पात्र ठरले आहेत दोन रेल्वे क्रमाचारी. आपल्या जीवाची आजिबात पर्वा न करता या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुलाच्या मध्यभागी थांबलेली रेल्वे सुरु केली. याबाबतचा व्हडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असून या दोन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. चला जाणून घेऊया नेमकी काय आहे ही घटना ?

मिळालेल्या माहितीनुसार, बगाहामध्ये पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलट आणि को-लोको पायलटने आपला जीव धोक्यात घालून पुलाच्या मध्यभागी उभी असलेली ट्रेन दुरुस्त केली. यादरम्यान, लोको पायलट ट्रेन आणि ट्रॅकच्या मध्ये घसरत गेला आणि बिघाडाच्या ठिकाणी पोहोचला. तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने पुलावरून लटकून वायर ओढली, त्यामुळे ट्रेन पुन्हा सुरू होऊ शकली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.

नक्की काय घडले ? (Viral Video)

गोरखपूरहून नरकटियागंजला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेन ०५४९७ च्या इंजिनमध्ये एअर लिकेज झाली. त्यामुळे वाल्मिकी नगर ते पाणीहवा दरम्यानच्या पुलावर गाडी थांबली. वाल्मिकी नगर रोड स्टेशनवरून ट्रेन सुरू होताच यूएल व्हॉल्व्हमधून गळती सुरू झाली आणि ट्रेन KM-298/20 पुल क्रमांक 382 वर थांबली.पुलाच्या मध्यभागी गाडी थांबल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण होते. पुलाच्या (Viral Video) मध्यभागी यूएल व्हॉल्व्हला गळती लागली होती. अशा स्थितीत गळती बंद करणे हे मोठे आव्हान होते.

या आपत्कालीन परिस्थितीत ट्रेनचे लोको पायलट अजय यादव आणि सहाय्यक लोको पायलट रणजीत कुमार यांनी जीवाची पर्वा न करता पुलावरून ट्रेनखाली पोहोचलेआणि व्हॉल्व्ह दुरुस्त केला. ट्रेनची दुरुस्ती केल्यानंतर ती पुढे गेली. इंजिनमध्ये हवा गळतीची समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. या ट्रेनची दुरुस्ती होईपर्यंत प्रवाशांनी आपला जीव मुठीत धरला होता. कारण दुसरी गाडी त्या ट्रॅक वर येण्यापूर्वी दुरुसती होणे गरजेचे होते. ट्रेनचे लोको पायलट अजय यादव आणि सहाय्यक लोको पायलट रणजीत कुमार यांनी मोठ्या धाडसाने ट्रेनची दुरुस्ती केली. त्यांचा व्हडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

रेल्वे विभागाकडून मिळणार बक्षीस (Viral Video)

त्यांच्या या धाडसी कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून दोघांनाही बक्षीस देण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना डीआरएम बीना श्रीवास्तव यांनी सांगितले की, गुरुवारी ट्रेनचा व्हॉल्व्ह खराब झाला होता, जो लोको पायलट आणि असिस्टंटने ट्रेनमधून (Viral Video) खाली उतरवून दुरुस्त केला. या कामासाठी रेल्वे त्यांना 10,000 रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे.

Viral Video | नदीमध्ये आढळले पाण्यात पोहणाऱ्या हत्तीचे दृश्य; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे. जिथे क्षणार्धात सगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर अनेक चांगल्या कामाच्या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात. अनेक जनावरांचे फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे हत्तीचे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोकांना हत्तीच्या वेगवेगळ्या कृती पाहायला देखील आवडतात. कधी कुटुंबासोबत शांत झोपलेला हत्ती, त्याचप्रमाणे कधी पाण्यात खेळणारा हत्ती या सगळ्या गोष्टी लोक पाहतात. सध्या हत्तीच्या कळपाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) चांगलाच चर्चेत आलेला आहे.

सध्या हत्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आसाममधून व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हत्तीचे कौशल्य दिसून येत आहे. फोटोग्राफर सचिन भरारी यांनी हे फोटो काढलेले आहेत. या ड्रोन फुटेजमध्ये हत्तीचा कळप आसाममधील ब्रह्मपुत्रा या नदीच्या खोल पाण्यात पोहताना दिसत आहे. नदीमध्ये पोहणाऱ्या या हत्तीच्या शरीराचा फक्त वरचा भाग दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/C8cTe1pST8H/?utm_source=ig_embed&ig_rid=01d0e80e-f479-4120-ad86-f90cae039c20

हत्ती पोहण्याचा आनंद घेतानाचा हा व्हिडिओ (Viral Video ) सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेत आलेला आहे. या व्हिडिओने अनेक लोकांना मंत्रमुग्ध देखील केले आहे. अनेक लोकांना वाटते की हत्तींना पाण्यात पोहता येत नाही. परंतु या व्हिडिओमध्ये हत्ती पोहोताना दिसत आहेस. instagram वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि आत्तापर्यंत या व्हिडिओला 4.2 दशलक्ष व्ह्युज आलेले आहेत. सोशल मीडियावर वायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहेत. आणि या दृश्याचे कौतुक करत आहे.

Mushroom Farming | केवळ 5 हजारात करा मशरूमची लागवड; महिन्याभरातच होईल कमाई सुरु

Mushroom Farming

Mushroom Farming | तुम्ही देखील स्वतःचा एक व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, आणि तुमच्याकडे नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा याची काहीच आयडिया नसेल. तर आज आम्ही तुमच्यासाठी एक चांगली बिझनेस आयडी घेऊन आलेलो आहोत. कोणताही बिझनेस करायचा म्हटल्यावर त्या बिजनेसला बाजारात किती मागणी आहे?त्यासाठी किती भांडवल लागेल? किती कष्ट करावे लागतील? या सगळ्याची माहिती घ्यावी लागते. आणि नंतरच तुम्हाला हा व्यवसाय चालू करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. जो तुम्ही एका छोट्या खोली सुद्धा सुरू करू शकता. तसेच कमीत कमी गुंतवणुकीत तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्यवसाय शेतीच्या संबंधित आहे. त्यामुळे तुम्हाला अत्यंत सहज पद्धतीने हा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही मशरूमची शेती (Mushroom Farming) करून चांगला नफा मिळवू शकतात. तुम्ही केवळ 5 हजार रुपयांची गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करू शकता.

त्याचप्रमाणे तुम्हाला मशरूम पिकवण्यासाठी जमिनीची गरज लागत नाही. तुम्ही एका खोलीत किंवा बांबूची झोपडी बनवून देखील मशरूमची लागवड करू शकता. सध्या बाजारात मशरूमला खूप जास्त मागणी आहे. त्यामुळे भारतात दरवर्षी सुमारे 1.44 लाख मॅट्रिक टन मशरूमचे उत्पादन होते. आणि मशरूमची ही मागणी वाढतच आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मशरूमचे उत्पादन घेऊन चांगल्या नफा कमवू शकता.

मशरूमची लागवड कशी करावी? | Mushroom Farming

मशरुमची लागवड ऑक्टोबर ते मार्च दरम्यान केली जाते. मशरूम तयार करण्यासाठी गहू किंवा तांदळाच्या पेंढ्यामध्ये काही रसायन मिसळून कंपोस्ट तयार केले जाते. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी एक महिना लागतो. यानंतर, मशरूमच्या बिया एका कठीण जागेवर 6-8 इंच जाडीचा थर पसरवून लावल्या जातात, ज्याला स्पॉनिंग देखील म्हणतात. बिया कंपोस्टने झाकल्या सुमारे 40-50 दिवसांत तुमचे मशरूम कापून विकण्यासाठी तयार होते. मशरूम दररोज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. मशरूमची लागवड उघड्यावर केली जात नाही, त्यासाठी छायांकित क्षेत्र आवश्यक आहे. जे तुम्ही एका खोलीतही करू शकता.

मशरूम लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवा

मशरूम शेती व्यवसाय खूप फायदेशीर आहे. यामध्ये मशरूम शेतीमध्ये खर्चाच्या 10 पट नफा मिळू शकतो. गेल्या काही वर्षांत मशरूमची मागणीही वाढली आहे. अशा परिस्थितीत मशरूम शेती व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये तुम्ही लवकरच करोडपती होऊ शकता.

मशरूम लागवडीसाठी या गोष्टी लक्षात ठेवा

मशरूम लागवडीसाठी खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यात फारशी स्पर्धा नाही. त्याच्या लागवडीसाठी तापमान सर्वात महत्वाचे आहे. हे 15-22 अंश सेल्सिअस दरम्यान घेतले जाते. जास्त तापमानामुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका आहे. शेतीसाठी आर्द्रता 80-90 टक्के असावी. चांगले मशरूम वाढवण्यासाठी, चांगले कंपोस्ट असणे महत्वाचे आहे. फार जुने बियाणे शेतीसाठी घेऊ नका, त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. ताज्या मशरूमची किंमत जास्त आहे. त्यामुळे ते तयार होताच विक्रीसाठी न्या.

मशरूम लागवडीचे प्रशिक्षण घेऊ शकता

सर्व कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरूम लागवडीचे प्रशिक्षण दिले जाते. जर तुम्ही त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचा विचार करत असाल, तर एकदा योग्यरित्या प्रशिक्षित करणे चांगले होईल. जागेबद्दल बोलायचे झाले तर प्रति चौरस मीटर 10 किलो मशरूम सहज पिकवता येते. किमान 40×30 फूट जागेत तीन फूट रुंद रॅक बनवून मशरूमची लागवड करता येते.

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांसाठी खास योजना, केवळ व्याजातूनच व्हाल श्रीमंत

Post Office Scheme

Post Office Scheme | अनेक लोक हे भविष्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी आजच गुंतवणूक करून ठेवत असतात. त्यांच्या पगारातील काही रक्कम ते गुंतवत असतात. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील अनेक योजना आहेत. ज्याचा फायदा अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना होतो. कारण पोस्ट ऑफिस ही एक विश्वासहार्य योजना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोक यामध्ये गुंतवणूक करत आहेत. तुम्ही अगदी लहान बचत देखील करू शकता. आणि त्यातून तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये (Post Office Scheme) महिलांसाठी खूप खास योजना असतात. त्यातीलच एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यामध्ये तुम्हाला कमी वेळात तुमच्या गुंतवणुकीवर जास्त व्याज दिले जाते. आता या योजनेची गुंतवणूक आणि त्यापासून मिळणारे फायदे याची माहिती आपण जाणून घेऊया.

पोस्ट ऑफिस देते 7.5 टक्के व्याज | Post Office Scheme

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही पोस्ट ऑफिस द्वारे चालवणारी एक योजना आहे. महिलांसाठी ही एक विशेष योजना आहे. यावर खूप चांगले व्याज देखील मिळते. या योजनेमध्ये तुम्हाला कमी कालावधीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देखील मिळतो. या योजनेतून तुम्हाला 7.5% पर्यंत व्याज मिळते.

दोन वर्षांसाठी पैसे गुंतवावे

ही एक अल्पबचत योजना आहे. या योजनेमध्ये महिला केवळ दोन वर्षासाठीच गुंतवणूक करू शकतात. त्याचप्रमाणे यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा ही दोन लाख रुपये एवढी आहे. ही योजना खूप लोकप्रिय आणि महिलांच्या फायद्याची योजना आहे.

10 वर्षांखालील मुलींचाही समावेश | Post Office Scheme

महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशातून ही सरकारी पोस्ट ऑफिसची योजना अमलात आणलेली आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर 7.5 टक्के दराने व्याज मिळते. तसेच प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 c अंतर्गत कर सवलतीचा देखील लाभ मिळतो. या योजनेची खास वैशिष्ट्य म्हणजे दहा वर्षे किंवा त्या वयापेक्षा कमी वयाच्या मुलीचे देखील खाते यामध्ये उघडता येते.

घोटाळा, दहशतवादी हल्ले, जलसंकट.. राहुल गांधींनी NDA च्या पहिल्या 15 दिवसांचा पाढाच वाचला

rahul gandhi naredra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा NDA सत्ता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र मोदी सरकार सत्तेत येऊन १५ दिवस होत नाहीत तोच देशात अनेक वेगवगेळ्या घटना घडल्या. पश्चिम बंगाल मध्ये रेल्वे अपघात झाला, NEET परीक्षा घोटाळा प्रकरण ताजे आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले पाहायला मिळाले. या सर्व घटनांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींवर आणि NDA सरकारवर निशाणा साधला. NDA सरकारच्या पहिल्या १५ दिवसात नेमक्या कोणकोणत्या घटना घडल्या याचा पाढाच राहुल गांधी यांनी वाचला. राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

NDA चे पहिले १५ दिवस!

  1. भीषण रेल्वे अपघात
  2. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले
  3. गाड्यांमधील प्रवाशांची दुर्दशा
  4. NEET घोटाळा
  5. NEET PG रद्द
  6. UGC NET चा पेपर लीक झाला
  7. दूध, डाळी, गॅस, टोल आणि महाग
  8. आगीने जळणारे जंगल
  9. जलसंकट
  10. उष्णतेच्या लाटेत व्यवस्था नसल्यामुळे मृत्यू

मानसशास्त्रीयदृष्ट्या नरेंद्र मोदी बॅकफूटवर आहेत आणि आपले सरकार वाचवण्यात व्यस्त आहेत. नरेंद्र मोदी जी आणि त्यांच्या सरकारचा संविधानावर झालेला हल्ला आम्हाला मान्य नाही आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. भारताचा प्रबळ विरोधक आपला दबाव कायम ठेवेल, जनतेचा आवाज उठवेल आणि पंतप्रधानांना जबाबदारीशिवाय सोडणार नाही असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

दरम्यान, आज १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारकीची शपथ घेतली. मात्र पंतप्रधान मोदी शपथ घेण्यासाठी जात असतानाच राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी हात वर केला. राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधकांनाही यावेळी हात वर केले होते. राहुल गांधींच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा संविधानावर जो हल्ला करत आहेत, तो आम्हाला मान्य नाही आणि आम्ही ते होऊ देणार नाही, त्यामुळेच आम्ही संविधानाची प्रत हातात घेतली होती असं राहुल गांधी यांनी म्हंटल.