Indian Railway | रेल्वेचा प्रवास हा सगळ्यात सुखद आरामदायी आणि कमी खर्चात होणारा प्रवास आहे. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात विश्वासहार्य सेवा आहे. देशभरात दररोज अडीच कोटींपेक्षा जास्त लोक हे रेल्वेतून प्रवास करतात. रेल्वे आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा देखील देत असते. परंतु लोकांना या सुविधांची माहिती नसते. रेल्वे संबंधित देखील अनेक नियम केलेले आहेत. अनेक लोकांना हे नियम माहिती नसतात. लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य देत असतात.
लांब जायचं असेल तर लोक रेल्वेतून आधीच रिझर्वेशन करून प्रवास करतात. कारण त्यांना आरामदायी प्रवास करता येतो. परंतु अनेकदा त्या लोकांची ट्रेन (Indian Railway) चुकते पण अशावेळी नेमके काय करायचे? हे त्यांना माहीत नसते. ट्रेन चुकल्यानंतर पैसे वाया जातात. आणि हे तिकीट रद्द देखील करता येत नाही. परंतु यासाठी भारतीय रेल्वे तुम्हाला अशी एक सुविधा देते. त्यामुळे तुमचे कमी नुकसान होते. आता ही नक्की कोणती सुविधा आहे आपण जाणून घेणार आहोत.
टीडीआर फाईल करा | Indian Railway
तुम्ही जर भारतीय रेल्वेतून प्रवास करत असाल आणि प्रवासाची ट्रेन तिकीट बुक केली असेल आणि तुमची ट्रेन सुटली तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण टीडीआरच्या माध्यमातून तुम्ही तुमचे हे नुकसान टाळू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमचा रिफंड मिळेल आणि तुम्ही ऑफलाइन तिकीट देखील बुक केले असेल, तरी तुम्ही तिकीट काउंटवर जाऊन हा टीडीआर फाईल करू शकता. किंवा आणि जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केले असेल, तर तुम्ही आयआरसीटीच्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे लागेल आणि त्यावेळी तुम्हाला टीडीआर फाईल करता येतो.
यासाठी तुम्हाला त्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला ट्रेनच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला टीडीआरचा ऑप्शन दिसेल. आणि टीडीआर फाईल करण्यासाठी तिकीट ऑप्शन मिळेल. त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. तुम्हाला दिलेल्या कारणांपैकी एक कारण निवडावे लागेल. तुम्ही हे केल्यानंतर 60 दिवसानंतर तुम्हाला हा रिफंड मिळेल. त्यामुळे आता जर तुमची ट्रेन चुकली, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण तुमचे तिकिटाचे पैसे वाया जाणार नाही.
Couple Mansoon Places | महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि पावसाळा सुरू झाली की, सर्वत्र निसर्ग एकदम हिरवा गार होऊन जातो. आणि सगळ्यांना पावसात फिरायला जायचे वेध लागतात. जर तुम्ही देखील आता तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत पावसाळ्यात फिरायला जायचे प्लॅनिंग करत असाल, तर अनेक लोक हे सगळ्यात आधी महाबळेश्वरला जातात. परंतु महाबळेश्वर व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या अनेक ठिकाण आहे. जिथे पावसाळ्यामध्ये खूप चांगले वातावरण असते. एका कपलसाठी खूप चांगले ठिकाण असते. आता आपण महाराष्ट्रातील अशाच काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.
महाबळेश्वर (Couple Mansoon Places) हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे हिल स्टेशन आहे. अनेक जोडपी ही लग्नानंतर त्याचप्रमाणे पावसाळ्यात देखील महाबळेश्वरला भेट देतात. कारण इथला निसर्ग देखील खूप छान असतो. त्यामुळे तुम्ही महाबळेश्वरला देखील या पावसाळ्यात तुमच्या पार्टनर सोबत जाऊ शकता.
यावर्षी तुम्ही लोणावळा खंडाळामध्ये देखील पावसाळ्याची भेट देऊ शकता. लोणावळा खंडाळ्याला निसर्गाने वेढलेले आहे. या ठिकाणी विविध ठिकाणे देखील आहे. त्याचप्रमाणे या परिसरात अनेक रिसॉर्ट आणि व्हीलादेखील आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत कॉलिटी टाईम स्पेंड करण्यासाठी इथे जाऊ शकता.
माथेरान (Couple Mansoon Places) हे ठिकाण मुंबई आणि पुण्यापासून अत्यंत जवळचे ठिकाण आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अत्यंत कमी वेळात आणि कमी पैशात देखील जाऊ शकता. या ठिकाणी तुम्ही पर्यटनाचा आनंद देखील होऊ शकता. माथेरानमध्ये अनेक चांगले चांगले पॉईंट्स आहेत.
या पावसाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही सहलीचा प्लॅन करत असाल, तर अलिबाग हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये ही ट्री प्लान करू शकता. या ठिकाणी तुम्हाला विविध गोष्टी देखील पाहायला मिळतील..
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे ठिकाण देखील पावसाळ्यात सहलीच्या दृष्टीने अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे. या ठिकाणी सुंदर असा समुद्रकिनारा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी जाऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला कोकणातील दृश्य देखील बघायला.
रत्नागिरी हा देखील तुम्हाला पावसातील सहलीसाठी एक चांगला पर्याय आहे. या ठिकाणी शांत असा समुद्र आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरीचे सौंदर्य देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच गणपतीपुळे, दापोली, हरिहरेश्वर या ठिकाणी देखील तुम्ही रत्नागिरीमध्ये जाऊन भेट देऊ शकता.
शेतीमध्ये आजकाल अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात. शेतकरी देखील नवनवीन कल्पनांचे स्वागत करत आहेत. आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. अशातच आता अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक पेरणीचा नवा प्रयोग केलेला आहे. ते म्हणजे अकोल्यातील राजू वरोकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ड्रायव्हर शिवाय ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केलेली आहे. या जर्मन तंत्रज्ञानाचा वापर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच केला गेलेला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका सरळ रेषेमध्ये पेरणी होत असते. आणि शेतकऱ्यांसाठी ते अत्यंत सोयीस्कर ठरते.
सुरुवातीच्या काळात पेरणी म्हटलं की, खूप गडबड असायची त्यासाठी बैल तीफन त्यामागे पेरणारी माणसं लागायची परंतु आता कृषी क्षेत्रात देखील खूप क्रांती झालेली आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण जग तंत्रज्ञानाने वेढलेले आहे. या तंत्रज्ञानाचा परिणाम शेतीवर देखील झालेला आहे. त्यामुळे अनेक शेती संबंधित यंत्र देखील आलेली आहे. ट्रॅक्टर चालवायला आधी माणूस लागायचा. परंतु आता तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, ड्रायव्हर शिवाय आता ट्रॅक्टर शेतात काम करू लागले आहेत. हे आता ऑटो पायलेट सोईंग टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेले आहे. अकोल्यातील एका कुटुंबीयांनी हा प्रयोग केलेला आहे आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी देखील.
या तंत्रज्ञानाद्वारे अगदी सरळ रेषेत पेरणी होते. आणि ट्रॅक्टर चालवण्यासाठी चालकाची देखील गरज लागत नाही. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाच्या आर्टिके हे उपकरण लावण्यात आलेले आहे. हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवले जाते. आणि जीपीएस कनेक्टद्वारे ते उपकरण ट्रॅक्टरची जोडले जाते. याबाबतची माहिती इंजिनियर आणि अभ्यासक हांडे यांनी दिलेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे येणाऱ्या काळात या जीपीएस टेक्निकचा वापर करून अनेक शेतकरी याला तंत्रज्ञानाचा वापर करतील अशी भावना व्यक्त केली जात आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपलं नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार बँक आता नवीन आर्थिक वर्षात 400 नवीन शाखा उघडणार आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 137 शाखा उघडल्या आहेत. त्यापैकी ५९ नवीन ग्रामीण शाखांचा समावेश आहे. त्यात आता नवीन 400 शाखा उघडल्यानंतर बँकेचा व्यवहार आणि अन्य गोष्टी आणखी सोप्प्या होतील.
याबाबत SBI चे अध्यक्ष दिनेश खारा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला कोणीतरी विचारले की 89 टक्के डिजिटल आणि 98 टक्के व्यवहार शाखेच्या बाहेर होत आहेत, आता शाखेची गरज आहे का? तर होय… शाखांची आणखी गरज आहे. कारण नवीन क्षेत्रे उदयास येत आहेत. बहुतेक सल्लागार आणि संपत्ती सेवा यासारख्या काही सेवा आहेत ज्या केवळ शाखेतून दिल्या जाऊ शकतात असं ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात देशभरात 400 नवीन शाखा उघडण्याची आमची योजना आहे. मार्च 2024 पर्यंत SBI च्या देशभरात 22,542 शाखा होत्या असं दिनेश खारा यांनी सांगितलं.
दरम्यान, सहाय्यक कंपन्यांच्या कमाईबद्दल विचारले असता, खारा म्हणाले की, SBI त्यांची यादी करण्यापूर्वी त्यांचे कार्य आणखी वाढवण्याची प्रतीक्षा करेल. त्यांचे ऑपरेशन वाढवल्याने मूल्यांकन वाढेल आणि पॅरेन्ट एसबीआयसाठी चांगले परतावा सुनिश्चित होईल. उपकंपन्यांचा विचार केला तर त्यांची कमाई भांडवली बाजारातून होईल. कदाचित, आम्हाला ते थोडे अधिक वाढवायचे आहे, आणि नंतर आम्ही या कंपन्यांमधील आमची होल्डिंग कमाई करण्यासाठी भांडवली बाजारात जाण्याचा विचार करू. परंतु चालू आर्थिक वर्षात नाही असं दिनेश खारा यांनी म्हंटल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी काही यशवंतराव चव्हाण (Yashwant Chavan) यांचा मानसपुत्र नाही. जे मानसपुत्र आहेत, त्यांच्याकडे सत्ता असताना, त्यांनी आजपर्यंत यशवंतराव चव्हाण याना भारतरत्न पुरस्काराची का मागणी केली नाही? असा सवाल करत भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. यंदा खासदार झाल्यानंतर उदयनराजे यांनी कराड येथील प्रीतिसंगमावरील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यावेळी उदयनराजे भोसलेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. मी मागणी केली नाही म्हणून विरोधक टीका करत असतील तर ज्यावेळी पुरस्कार मिळेल त्यावेळी कळेल. मी काही यशवंतराव चव्हाण यांचा मानसपुत्र नाही. जे मानसपुत्र आहेत, त्यांच्याकडे सत्ता असताना, त्यांनी आजपर्यंत पुरस्काराची का मागणी केली नाही? असा सवाल उदयनराजेंनी केला . अजित पवार गटाने आपल्या जाहीरनाम्यात आम्ही सत्ता येताच यशवंतराव चव्हाण याना भारतरत्न देऊ असं आश्वासन दिले होते, त्यानंतर हा भारतरत्न चा मुद्दा चर्चेत राहिला. तर दुसरीकडे शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र मानले जातात, त्यामुळे आत्तापर्यंत पवारांनी सत्ता असूनही यशवंतरावांना भारतरत्न का दिला नाही असा सवाल विरोधक करत असतात. नेमका हाच धागा पकडत उदयनराजेंनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली.
दरम्यान, यावेळी कराड शहरात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. सुरेश (बाबा) भोसले, भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, श्री. मदनराव मोहिते, श्री. विनायकबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, विक्रमजी पावसकर, लोकसभा समन्वयक श्री सुनील काटकर, कराड दक्षिण शिवसेना नेते श्री. राजेंद्र यादव, कराड दक्षिण विधानसभा निवडणूक प्रमुख धनाजी काका पाटील, श्री. राजेश पाटील, श्री. विजय यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर लोकसभेचा निकाल अपेक्षित असाच लागला… काँग्रेसच्या शाहू छत्रपतींनी शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांच्या विरोधात तब्बल दीड लाखांचं लीड मिळवत दणक्यात विजय मिळवला… कोल्हापूरच्या जनतेनं पुन्हा एकदा पुरोगामी काँग्रेसी वारसा या निकालातून पुढे चालवला…अनेक जाती-जमातींचं मिश्रण असणाऱ्या कोल्हापुरात निवडणुकीसाठी अनेक खाचाखुणा महत्त्वाच्या ठरतात… इथलं गटातटांचं राजकारण कधी कुठे झुकेल याचा आपल्यालाही अंदाज लागत नाही… कारखानदारी वाढलेल्या या पाणीदार पट्ट्यात लोकसभेपेक्षा जास्त चर्चा असते ती विधानसभेची… एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल 10 आमदार निवडून जात विधिमंडळात प्रतिनिधित्व करतात… दोन लोकसभांनी म्हणजेच कोल्हापूर आणि हातकणंगले या दोघांनी मिळून कोल्हापूर जिल्हा तयार होतो…यात सुरुवातीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी आणि इतर काही स्थानिक पक्ष आपलं वजन ठेवून आहेत…पक्षात पडलेल्या फाटा फुटींमुळे आता कोल्हापूरमधल्या अनेक मतदारसंघाच्या लढती इंटरेस्टिंग ठरतील… बाकी भाजपला यंदाही कोल्हापुरात आपला आमदार निवडून आणण्यासाठी चाचपडतच राहावे लागणार का? याचंही उत्तर विधानसभेमुळे मिळणार आहे… त्यामुळे चंदगड ते शिरोळ कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत आमदार म्हणून कोण जिंकून येतोय? स्थानिक जनतेचा कौल कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे? आणि लोकसभेचा विधानसभेच्या निवडणुकीवर कोल्हापुरात कसा इम्पॅक्ट पाहायला मिळेल? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…
सर्वात पहिला मतदारसंघ येतो तो कोल्हापूर दक्षिण विधानसभा
महाडिक विरुद्ध पाटील असा इथला कडवा संघर्ष. २००९ साली सतेज पाटील इथून आमदार झाले… पण २०१४ च्या मोदी लाटेत नव्या नवख्या अमल महाडिकांकडून त्यांचा पराभव झाला. याचाच वचपा सतेज पाटलांनी २०१९ च्या निवडणुकीत काढला आपला पुतण्या ऋतुराज पाटील याला मैदानात उतरवत सतेज पाटील यांनी निवडून आणलं… त्यामुळे येणाऱ्या विधानसभेलाही कोल्हापुर दक्षीणमधून पाटील विरुद्ध महाडिक यांच्यातला राजकीय विस्तव पहायला मिळेलच. पण महाडिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला पिंजून काढलेल्या मतदारसंघाचा परिणाम म्हणूनच की काय कोल्हापूर दक्षिणमधून शाहूंना अवघं ६ हजारांचं निसटतं मताधिक्य मिळवलं.. त्यामुळे येणाऱ्या आमदारकीला इथे पाटील अन् महाडिक यांच्यात काटाजोड लढत होण्याची शक्यता जास्त आहे… पण सतेज पाटलांच्या किलर इंस्टींटमुळे ऋतुराज सलग दुसरी टर्म निवडून येतील, असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे…
दुसरा मतदारसंघ आहे कोल्हापूर उत्तरचा…
उत्तर कोल्हापुर मतदारसंघात पेठांची भूमिका निर्णायक ठरते… यामध्ये शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ येथील मतदारांच्या हातात ही शेवटची मतं असतात, असं बोललं जातं.. २०१९ मधील निवडणुकीत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करून हा मतदारसंघ काँग्रेसने ताब्यात घेतला… तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी इथून विजय मिळवला… कसबा बावड्यातील एकगठ्ठा मतदान, काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची ताकद आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याबद्दल असणारी लोकांमधील आपुलकी यामुळे काँग्रेसला यंदाही विधानसभा सोपी जाईल असं बोललं जातंय…पण पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार नाना कदम यांनी तब्बल ७८ हजार मते घेतली होती. त्यामुळे भाजपची कोल्हापूर उत्तर मधील ताकद वाढल्याचंही दिसतंय… महायुतीकडून कदम की क्षिरसागर असा तीढा कायम असताना काँग्रेसकडून मात्र जयश्री जाधव यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त आहेत…
तिसरा मतदारसंघ आहे तो करवीर विधानसभा
नुकतंच निधन झालेले काँग्रेसचे पी.एन. पाटील हे करवीरचे सर्वाधिक काळ आमदार राहीले. लोकसभेला शाहू छत्रपतींना कोल्हापूरातून सर्वाधिक लीड मिळालं ते याच करवीर मतदारसंघातून… पण निकालाच्या आधीच पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इथून त्यांचे पारंपारिक विरोधक आहेत चंद्रदीप नरके. ते सध्या शिवसेना शिंदे गटात असल्यानं इथून राहुल पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके असा आमदारकीला सामना होण्याची शक्यता आहे.. पण सहानुभूतीची लाट, काँग्रेसची मजबूत पक्षबांधणी आणि शाहूंनी जो लावलाच तर येणाऱ्या विधानसभेला करवीरमधून काँग्रेसचा आमदार आरामात निवडून येऊ शकतो..
आता येतो चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कागल विधानसभा..
हा राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मतदारसंघ. इथलं राजकारण राजकीय पक्षांपेक्षा गटातटांच्या राजकारणावर अधीक अवलंबून असतं.. हसन मुश्रीफ यांनी कागलमधून तब्बल सहा वेळा बाजी मारलीय. त्यामुळे कागल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो… विक्रमसिंह घाटगे यांनी तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनीधीत्व केलेलं आहे.. पण त्यांचे सुपुत्र समरजितसिंग घाटगे यांनी मुश्रीफांच्या विरोधात अनेकदा लझत देऊनही त्यांना या मतदारसंघात उभारी घेता आलेली नाहीये.. पण आता प्रोब्लेम असा झालाय की कागल मधील हे दोन्ही राजकीय प्रतिस्पर्धीच महायुतीत असल्याने तिकीट वाटपात कागलसाठी जोरदार लॉबिंग होण्याची शक्यता आहे. मुश्रीफांना जर तिकीट मिळालं तर घाटगे यांच्यासाठी शरद पवार गटाचा पर्यायही खुला राहतो.. पण सध्यातरी इथे मुश्रीफांचीच ताकद जास्त असल्याने तेच यंदाही आमदार असतील, असं राजकीय जाणकार सांगतायत..
पाचवा मतदारसंघ आहे तो राधानगरीचा…
काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा राधानगरी मतदारसंघ 2014 पासून शिवसेनेकडे शिफ्ट झाला… शिवसेनेचे प्रकाश आबिटकर इथून सलग दोनदा निवडून आले… मात्र शिवसेना फुटीनंतर शिंदे गटासोबत गेल्यामुळे आबिटकरांच्या विरोधात सामान्य शिवसैनिक नाराज आहेत… त्यात त्यांचे पारंपारिक विरोधक असणारे के. पी. पाटील हे अजित दादा गटात असले तरी त्यांची शरद पवार गटाशी जवळिक वाढली आहे. त्यामुळे जर का पाटील यांनी तुतारी हातात घेतली तर इथून आबिटकर विरुद्ध के. पी पाटील अशी अटीतटीची लढत होईल. बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे मात्र इथून कोण सरशी मारेल याचा अंदाज आत्ताच बांधता येणार नाही..
सहावा मतदारसंघ आहे तो चंदगडचा…
अजित पवार गटात असणारे राजेश पाटील हे इथले विद्यमान आमदार आहेत.. २०१९ च्या निवडणुकीत फडणवीसांच्या जवळच्या गोटातील समजल्या जाणाऱ्या शिवाजी पाटील यांनी कडवी झुंज दिली होती… यंदा लोकसभेला केलेल्या कामाची पावती म्हणून राजेश पाटील यांना संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफ मदतीचा हात देतील… त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी गटाकडून नंदिनी बाभुळकर तर काँग्रेसकडून विनायक पाटील निवडणुकीत उतरु पाहतायत.. पण ग्राऊंडचा अभ्यास करुन पाहिल्यास राजेश पाटील यांचंच पारडं इ़थं जड असल्याचं सध्यातरी बोललं जातंय..
सातवा मतदारसंघ आहे शाहुवाडी विधानसभा
शाहुवाडीचे विद्यमान आमदार आहेत जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे. त्यांच्या विरोधात यंदाही पारंपारिक विरोधक आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्याजित आबा सरुडकरच लढत देताना दिसतील… मागील चार टर्मचा विचार केला तर प्रत्येकी दोन टर्म या दोन्ही नेत्यांनी गाजवल्या आहेत… मात्र यंदा लोकसभेला लढत दिल्यामुळे सत्यजित आबा पाटील यांना मिळालेली सहानुभुती, शिवसेना फुटीचा परिणाम आणि ठाकरेंनी ताकद लावली तर इथून सत्यजित आबा पाटील यांचे जिंकण्याचे चांसेस वाढतायत..
आठवा मतदारसंघ आहे तो हातकणंगले विधानसभा…
काँग्रेसचे राजू आवळे हातकणंगले मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.. २००९ आणि २०१४ मध्ये इथून सुजित मिंचेकर यांनी शिवसेनेकडून सलग विजय मिळवला होता. मात्र २०१९ मध्ये आवळे यांनी त्यांना मात देत आमदारकी पटकावली… सद्यस्थितीचा विचार करायचा झाल्यास मिंचेकर शिवसेनेच्या नेमक्या कोणत्या गटात आहेत याचा खुलासा झालेला नाहीये. त्यामुळे महायुती इथून कुणाला उमेदवारी देईल. हा मोठा प्रश्न आहे… पण आवळे यांचा मतदारसंघातील जनसंपर्क आणि आघाडीची मिळणारी साथ पाहता यंदाही त्यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त आहेत…
नववा मतदारसंघ आहे तो इचलकरंजीचा….
अपक्ष म्हणून निवडून आलेले प्रकाश आवाडे हे इथले विद्यमान आमदार. काँग्रेस पक्षाकडून आवाडे सलग तीन टर्म आमदार राहीले. पण २०२९ मध्ये ताराराणी आघाडीकडूनच निवडणुक लढवत ते अपक्ष आमदार झाले… भाजपच्या सुरेश हाळवणकर यांनी २००९ ते २०१९ मध्ये आवाडे यांच्या राजकारणाला आवर घातला होता. पण ही कोंडी त्यांनी २०१९ मध्ये फोडलीच.. सध्या आवाडे येणाऱ्या विधानसबेला कुणाकडे जातील हे आत्ताच सांगता येणारं नसलं तरी आमदारककीचा चेहरा म्हणून इचलकरंजीकर त्यांच्याच नावाला पसंती देतील…
आता पाहुयात शेवटचा दहावा मतदारसंघ तो म्हणजे शिरोळचा…
शिवसेनेचे उल्हास पाटील हे सध्या शिरोळचे विद्यमान आमदार आहेत. चार निवडणुक चार वेगळे आमदार म्हणून शिरोळची ओळख. ऊसपट्टा म्हणून ओळख असणाऱ्या शिरोळच्या जनतेनं राजू शेट्टी, आप्पासाहेब पाटील. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि उल्हास पाटील अशा लोकप्रतिनीधींना निवडून दिलं… स्वाभिमानीची या पट्ट्यात ताकद आहे… पण शिवसेनेनं इथे चांगला जम बसवला. सध्याचे विद्यमान आमदार उल्हास पाटील हे ठाकरे गटात असल्याने तेच इथून महाविकाास आघाडीचे उमेदवार असतील. तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून राजेंद्र पाटील निवडणुकीच्या मैदानात असण्याची शक्यता आहे. हातकणंगलेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने याच मतदारसंघात येत असल्याने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असले..तर असे आहेत कोल्हापुरातील विधानसभेचे संभाव्य दहा आमदार.. बाकी कोल्हापुरात कुठला उमेदवार कोणत्या जागेवरुन निवडून येईल? याबद्धल तुमचाा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल ब्रँड Xiaomi ने आपला Redmi Note 13 Pro 5G हा स्मार्टफोन नवीन कलर व्हॅरियंट मध्ये लाँच केला आहे. यापूर्वी हा मोबाईल पांढऱ्या, काळ्या आणि पर्पल रंगात बाजारात आणला होता, आता हा स्मार्टफोन ऑलिव्ह ग्रीन कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Xiaomi ने त्यांच्या अधिकृत X हँडलवरून या नवीन कलर अपडेटबाबत माहिती दिली आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात….
स्पेसिफिकेशन्स-
Redmi Note 13 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1800nits पीक ब्राइटनेस आणि – 2712 x 1220 रिझोल्यूशन पिक्सल रिसोल्युशन सह येतो. कंपनीने मोबाईल मध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर बसवला असून हा स्मार्टफोन GB/12GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजसह येतो.
कॅमेरा – Redmi Note 13 Pro 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi Note 13 Pro 5G मध्ये 200MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड अँगल आणि 2MP मॅक्रो कॅमेरा मिळतोय तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी रेडमीच्या या स्मार्टफोन मध्ये 5100mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 67W टर्बो चार्जरला सपोर्ट करते.
किंमत किती?
Redmi Note 13 Pro 5G च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्ट्राईक रेटच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नाशिक येथे बोलताना आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट जास्त आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. यावर उत्तर देताना होय तुमचा स्ट्राईक रेट जास्त आहे, बेईमानी आणि खोक्यांचा तुमचा स्ट्राईक रेट जास्त आहे असा टोला संजय राऊतांनी लगावला.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणतात, त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. परंतु त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यांचा थैल्या आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे. त्यांनी पैशाने स्ट्राईक रेट विकत घेतला आहे. त्यांनी मुंबईची जागा अक्षरशः लुटली हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली. तर दुसरीकडे भाजपाचे संजय राऊतांचा महिलांना शिव्या देण्याचा स्ट्राईक रेट जास्त आहे, लोकांमधून निवडणूक लढविण्याची हिंम्मत कर मग समजेल असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केला आहे.
दरम्यान महाविकास आघाडीत आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. आम्ही जास्त जागा लढवयला हव्या होत्या, परंतु महाविकास आघाडीत बिघाड होऊ नये, म्हणून दोन पावले मागे आलो, असे विधान शरद पवार यांनी केलं होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, शरद पवार यांचा स्ट्राईक जास्त हे खरे आहे. पण सांगलीच्या जागी काँग्रेसने काम केले नाही. या जागेवर राष्ट्रवादीने काम केले नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने सगळ्यात जास्त आम्हाला टार्गेट केले. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्हाला जर सातत्याने फाईटने प्रवास करावा लागत, असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता तुम्ही फ्लाईटचे तिकीट अगदी सहजपणे घर बसल्या बुकिंग करू शकता. आणि सुलभ स्लाईड तिकीट बुकिंगचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही अगदी घर असल्यामुळे व्हाट्सअपवरून हे तिकीट बुक करू शकता. भारतातील लोकप्रिय लाईन कंपनी इंडिगो ने whatsapp साठी नवीन AI बुकिंग असिस्टंट 6EsKai लॉन्च केलेले आहे.
इंडिगोचा हे असिस्टंट काही साधारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फीचर नाही. याच्या मदतीने तुम्ही वैशिष्ट्य गुगलच्या भागीदार Riafy द्वारे तयार केलेल्या अतिशय खास AI प्लॅटफॉर्मवर कार्यकर्ते तुमची तिकीट बुकिंग करण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ झालेली आहे.
अनेक भाषांसाठी उपलब्ध असेल
6EsKai द्वारे, तुम्ही फ्लाइट तिकीट बुक करू शकता, चेक इन करू शकता, फ्लाइटची स्थिती तपासू शकता, बोर्डिंग पास मिळवू शकता किंवा प्रवासाशी संबंधित इतर प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपच्या माध्यमातून करू शकता. इंडिगोचे नवीन 6EsKai वैशिष्ट्य हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये काम करते.
या क्रमांकावर संदेश पाठवावा लागेल
जर तुम्हाला 6EsKai वापरायचे असेल तर तुम्हाला तुमच्या WhatsApp वरून +917065145858 वर मेसेज पाठवावा लागेल. 6EsKai सर्वात खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याचे भाषा मॉडेल तंत्रज्ञान. तुम्ही वारंवार फ्लाइट बुक करत असल्यास, यामुळे तुमची प्रक्रिया आणखी सोपी होईल. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रवासाचे नियोजन अगदी सहज करू शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाप्पा.. बाप्पा कामच झालं ना.. टप्प्यात कार्यक्रम कसा करायचा हे लोकसभेला शिकायला मिळालं ते बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून… मातब्बर पंकजा मुंडे आणि भाजपची मोठी ताकद पाठिशी असतानाही बजरंग बाप्पा अटीतटीच्या लढतीत जायंट किलर ठरले.. तुतारी वाजवत खासदार झाले… पण इथं निवडणुकीच्या निम्मिताने पाहायला मिळाला तो टोकाचा जातीयवाद. मराठा विरुद्ध ओबिसी संघर्षाची झळ ज्या काही राजकारण्यांना बसली त्यात आता बीडमधील पंकजा मुंडेच्या पराभवाचाही करावा लागेल… विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात तसतसा हा मराठा विरुद्ध ओबिसी समाजातील विस्तव आणखीनच वाढत चालल्याचं आपण पाहत आहोतच. पण जातीय अस्मिता टोकदार झाल्यानं माजलगाव, केज, परळी, आष्टी यांसारख्या हॉटस्पॉट असणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा निकाल नेंमका कसा लागेल? जिल्ह्यातल्या सहा विद्यमान आमदारांना यंदाही गुलाल लागणार का? की कोणते नवे चेहरे या आमदारकीच्या रेसमध्ये आपल्याला बघायला मिळतील? त्याचंच केलेलं हे पॉलिटीकल डिकोडींग…
पहिला येतो तो बीड विधानसभा…
२०१९ ला काका विरुद्ध पुतण्या म्हणजे जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर या लढतीत काकाला पाणी पाजून संदीप क्षीरसागर घड्याळाच्या चिन्हावर आमदार झाले… पुढे राष्ट्रवादीच्या फुटीत शरद पवारांशी एकनिष्ठ राहत त्यांनी खासदारकीला मुंडे कुटूंबाला चॅलेंजही दिलं.. बजरंग बाप्पांच्या पाठिशी संदीपभैयांचीच यंत्रणा लागल्यानं बीडातून तुतारी वाजली…त्यामुळे विधानसभेसाठी संदीप क्षीरसागरांची आमदारकी यंदा आणखीनच फिक्स समजली जातेय. तसं बघायला गेलं तर बीड मतदारसंघावर क्षीरसागर घराण्याचं एकहाती वर्चस्व राहिलंय… साखर कारखाने, शिक्षण आणि सहकारी संस्थाच्या जोरावर क्षीरसागर कुटूंबानं राजकारणवर आपला दबदबा ठेवला… बीड विधानसभा, मागील २५ वर्षापासून, क्षीरसागर कुटुंबाकडेच राहिलीय.. त्यात संदीप क्षीरसागरांना मतदारसंघातून कडवा विरोधकच राहीला नसल्याने यंदाही संदीप क्षीरसागरच आमदार होतील, असं बोललं जातंय…
दुसरा मतदारसंघ आहे केज विधानसभा…
मुंदडा कुटूंबाचा हा पारंपारिक बालेकिल्ला… 1990 पासून विमल मुंदडा दोन वेळा भाजपकडून तीन वेळा राष्ट्रवादीकडून असा सलग पाच वेळा केजच्या आमदार राहिल्या. 2012 साली मुदंडा यांचं दीर्घकालीन आजारानं निधन झालं त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज साठे निवडून आले…2014 च्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आला… भाजपच्या प्रा. संगिता ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नमिता मुंदडा यांच्या विरोधात मोठं लीड घेत निवडणूक जिंकली…मात्र 2019 मध्ये इथे मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला राष्ट्रवादीकडून नमिता मुंदडा यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर होऊनही त्यांनी भाजपात जात कमळाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरल्या… त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात पृथ्वीराज साठे यांना मैदानात उतरवलं… या अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत अखेर मुंदडा आमदार झाल्या… पण 2024 उजाडताना वातावरण बरच फिरलय… केजमध्ये, मुंदडा कुटुंबाच्या वर्चस्वाला धक्के बसतायत.. केज नगरपालिका, त्यांच्या ताब्यात नसून लोकसभा निवडणुकीतही तब्बल 20 हजारांचं लीड बजरंग बाप्पांनी घेतलंय…याच्याच जीवावर ते सध्या खासदार झालेत… जनतेमधील कमी झालेला संपर्क, विकासाची न झालेली काम, यामुळे नमिता मुंदडा, यांना यावेळी निवडणूक सोपी असणार नाही. त्यात पवारांच्या सहानुभूतीवर पृथ्वीराज साठे हे आमदारकीचं मैदान मारतील, अशी सध्या केजची परिस्थिती आहे..
तिसरा मतदार संघ आहे गेवराईचा…
भाजपचे लक्ष्मण पवार गेवराई मतदार संघातून सलग दोन टर्मचे आमदार राहिले आहेत… राष्ट्रवादीनं इथून दोन्ही वेळेला विजयसिंह पंडित यांना उमेदवारी दिली.. पण दोन्ही निवडणुकीत पंडितांचा पराभव झाला… 2014 ला गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची सहानुभूती तर 2019 ला मोदी लाटेमुळे लक्ष्मण पवार यांचा विजय सोपा झाला.. प्रत्येक वेळेस पंकजा मुंडेंनी लक्ष घातल्याने पवार इथून आरामात निवडून आले… पण याच भाजपच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीला बजरंग बाप्पांना निसटती का होईना लीड मिळाल्याने या मतदारसंघातली पवारांची आमदारकी धोक्यात आली आहे… थोडक्यात येणाऱ्या विधानसभेला गेवराईत पवार विरुद्ध पंडीत यांच्यात तुंबळ संघर्ष पहायला मिळणार आहे…
पुढचा आहे तो माजलगाव विधानसभेचा…
माजलगाव विधानसभा 2014 च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आर. टी. देशमुख यांनी राष्ट्रवादीचे निकटचे प्रतिस्पर्धी, प्रकाश सोळंके दादा, यांना 37,145 मतांनी पराभूत केलं होतं.. नंतर २०१९ मध्ये सोळुंके यांनी भाजपच्या रमेश आडसकर यांचा पराभव केला.. पण नंतर राष्ट्रवादीच्या फुटीत त्यांनी अजितदादांना साथ दिल्यानं रमेश आडसकर आणि प्रकाश सोळुंके हे दोघेही विरोधक महायुतीचे भाग झालेत… या विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक आमदार म्हणून निवडून येण्याचा मान प्रकाश सोळंके यांना मिळतो. साखर कारखानांचं राजकारण इथल्या विधानसभेला निर्णायक ठरत आलंय.. मात्र मराठा समाजाचा असलेला रोष, व मनोज जरांगे फॅक्टर, यामुळे प्रकाश सोळुंके यांची विधानसभेची वाट सध्यातरी बिकट दिसतेय.. मात्र रमेश आडसकर हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.. त्यामुळे त्यांनी जर का तुतारी हातात घेतली तर तुतारी चिन्हावर त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो..
आता येतो तो हायव्होल्टेज परळी विधानसभा मतदारसंघ…
परळी आणि मुंडे हे न तुटणारं नातं. इथं चालतं ते फक्त आणि फक्त मुंडे घराण्याचं.. बीड हा जिल्हा जरी असला तरी त्याचं सेंटर पॉइंट हा परळीच राहीला आणि त्याला कारण ठरलं ते मुंडे कुटुंब. २००९ ला मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी या मतदारसंघाची आमदारकी पटकावली. पुढे २०१४ ला बंधू धनंजय मुंडे यांचा पराभव करत त्यांनी परळी आपलीच हे ठासून सांगितलं.. या टर्ममध्ये गोपिनाथ मुंडे यांच्या निधनामुळे पंकजा मुंडेंची मंत्रीपदावर वर्णी लागली. पण चिक्की घोटाळ्यामुळे मंत्रीपद सोडण्याची नामुष्की ओढवल्यापासून पंकजाताईंचा डाऊन फॉल सुरु झाला तो काही थांबायचं नाव घेत नाहीये… यानंतर झालेल्या २०१९ च्या विधानसभेला धनुभाऊ जायंट किलर ठरले आणि पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला. पुढे अनेक संधीतून डावलण्यात आल्यानंतर त्यांच्यासाठी शेवटची संधी चालून आली ती लोकसभेची… पण तिथेही बजरंग बाप्पा यांनी गुलाल उधळल्याने पंकजा मुंडे यांच्यासाठी राजकारण आणखीनच किचकट होऊन बसलंय. कारण येणाऱ्या विधानसभेला आपण लढणार नसल्याचं सांगून महायुतीकडून ही जागा धनंजय मुंडे यांच्यासाठी सोडल्यात जमा आहे.. धनजंय मुंडे यांचं परळीतील पारडं जड असलं तरी शरद पवारांनी फिल्डींग लावली तर विधानसभेचा निकालही फिरु शकतो.. सध्या महाविकास आघाडीकडून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूकीसाठी तयारी करतायत.. तर बबन गित्ते यांच्याही नावाची इथं अधूनमधून चर्चा होतेय. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्यपाठोपाठ धनंजय मुंडे यांना खिंडीत गाठण्यासाठी आघाडी काय फिल्डींग लावतेय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे…
आता पाहुयात, शेवटच्या आष्टी विधानसभा मतदारसंघाबद्धल..
आष्टी हा एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री सुरेश धस यांचा बालेकिल्ला.. धस आता भाजपचे विधानपरिषदेतील सदस्य असून बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते इथले विद्यमान आमदार आहेत… लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना तीस हजार मतांची आघाडी आष्टी विधानसभेनं मिळवून दिलीय… त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला इथून जिंकण्याचे जास्त चान्सेस असले तरी तिकीट कुणाला मिळतंय, यावर इथलं गणित अवलंबून असणार आहे… विद्यमान आमदारांनाच तिकीट वाटप करण्याचा फॉर्मुला ठरला तर आजबे यांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी धस हे ऐनवेळी शरद पवारांची तुतारी हाती घेऊ शकतात.. मात्र सध्यातरी आजबे या मतदारसंघात प्लसमध्ये आहेत… तर अशी आहे बीड जिल्ह्यातील विधानसभेची राजकीय परिस्थिती… त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही भाजपचा गड उध्वस्त करायला महायुतीला यश येतंय का? परळी आणि माजलगाव सारख्या अटीतटीच्या मतदारसंघात आमदार कोण होतंय.. तुमचा अंदाज काय सांगतोय ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा..