Flipcart Minutes | फ्लिपकार्ट ही भारतातील एक प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी आहे. ऑनलाइन सेवा पुरवण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांना नेहमीच नवनवीन गोष्टी लॉन्च करत असते. अशातच आता फ्लिपकार्ट भारतात आपले ई कॉमर्स व्हर्टीकल लॉन्च करू शकते. याचे नाव व्हर्टिकल मिनिसट्स ठेवले जाऊ शकते. त्यांनी चालू केलेले हे कॉमर्स व्हर्टीकल जुलै महिन्यात लॉन्च करून जाऊ शकते. फ्लिपकार्ट हे झटपट कॉमर्समध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. परंतु या आधी देखील फ्लिपकार्टने असे प्रयत्न केलेले आहेत. झटपट कॉमर्स मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा फ्लिपकार्टचा हा तिसरा प्रयत्न आहे.
कंपनीने गेल्या काही वर्षात असे दोन प्रयत्न केले होते. त्यात फारसे त्यांना यश मिळाले नव्हते. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार फ्लिपकार्टच्या(Flipcart Minutes) माध्यमातून आता कंपनीने 15 मिनिटात त्यांच्या वस्तू डिलिव्हर करण्याचे टार्गेट समोर ठेवलेले आहेत. कंपनी त्यांची ही नवीन सेवा 15 जुलैपासून सुरू करू शकते. आणि फ्लिपकार्ट या सुविधेचा ग्राहकांना चांगलाच लाभ होणार आहे.
फ्लिपकार्ट मिनिट्सच्या माध्यमातून कंपनी किराणा माल तसेच इतर आवश्यक गोष्टींसह ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा देखील यामध्ये समावेश करणार आहे. याआधी कंपनीने फ्लिपकार्ट क्विक या नावाने ही आपली सेवा सुरू केली होती. ज्यामध्ये त्यांनी 90 मिनिटांनी पोहोचवण्याचे टार्गेट समोर ठेवलेले होते. परंतु त्यांची ही सेवा यशस्वी होऊ शकली नाही. परंतु कंपनीने अजूनही फ्लिपकार्ड मिनिट्स बाबत कोणती अधिकृत घोषणा केली नाही. परंतु याबाबत अनेक अंदाज देखील बांधले जात आहेत.
कोविडच्या महामारीनंतर ई-कॉमर्स मार्केटमध्ये बरीच वाढ झालेली आहे. ब्लिंकिट या प्लॅटफॉर्मचा देखील मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. त्यामुळे आता फ्लिपकार्ट सोबत रिलायन्स देखील या बाजारात प्रवेश करण्याची शक्यता आहे. रिलायन्स देखील लवकरच आपली क्विक सेवा लाँच करेल, असे काही अहवालात सांगण्यात आलेले होते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या हाडांसाठी कॅल्शियम खूप गरजेचे असते. कॅल्शियममुळेच आपल्या हाडांमध्ये कठीणपणा प्राप्त होतो. आणि ते जास्त दणकट होतात. त्याचप्रमाणे आपल्या हृदयाचे फंक्शन यांसारखे कार्य व्यवस्थित होण्यासाठी देखील कॅल्शियमचा आहारात समावेश असणे खूप गरजेचे असते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील रक्तदाब आणि हार्मोन्स इत्यादी गोष्टी बॅलन्स करण्यासाठी देखील कॅल्शियम गरजेचे असते. आपल्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली, तर आरोग्य संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. आपण कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी असे काही पदार्थ खाणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियम टिकून राहते आणि वाढते देखील. अनेकवेळा पण असे ऐकले आहे की चिकन मटन यांसारख्या गोष्टींमधून कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळते. परंतु आता आपण काही व्हेज पदार्थ जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियम पातळी नियंत्रित राहते. आता हे कोणते पदार्थ आहेत ते आपण जाणून घेऊया.
डेअरी प्रोडक्ट्स
डेअरी प्रॉडक्ट्समध्ये म्हणजेच दही, दूध, पनीर यांसारख्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. या पदार्थांचे जर तुम्ही रेग्युलर सेवन केले, तर तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी देखील नियंत्रित राहील आणि हाडे देखील मजबूत होतील
फोर्टीफाईड अन्न
फोर्टीफाईड अन्नामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियमची मात्रा असते. त्यामुळे जर या पदार्थांचे सेवन तुम्ही केले, तर तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये जवळपास 100 मिलिग्राम एवढे कॅल्शियम असते. त्यामुळे याचे सेवन करणे गरजेचे आहे.
कडधान्य
कडधान्यांमध्ये देखील जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. तसेच विटामिन डी देखील जास्त प्रमाणात असते. तुम्ही जर या कडधान्यांना मोड आल्यानंतर त्याचे सेवन केले, तर यामुळे तुमच्या शरीराला चांगला फायदा होईल. यामध्ये जवळपास 60 मिलीग्राम पेक्षाही जास्त कॅल्शियम असते.
अंजीर
अंजीर हे साधारणपणे ड्रायफ्रूट्समध्ये येतात. अनेक लोक अंजीरचे सेवन करतात. अंजिरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतात. दोन अंजीरमध्ये जवळपास 27 मिलीग्राम एवढे कॅल्शियम असते. हे एक नैसर्गिक स्वीटनर आहे. त्याचप्रमाणे रिफाईंड शुगरसाठी देखील अंजीर हे चांगले आहे.
पिकलेली केळी
पिकलेली केळी, पालक यांसारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतात. दुधाच्या तुलनेत पिकलेल्या केळीमध्ये जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे पिकलेल्या केळीचे सेवन केल्याने देखील शरीरातील कॅल्शियमची मात्रा वाढते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीला सांगली महाराष्ट्राच्या चर्चेचा सेंटर पॉईंट ठरला… त्याला कारण ठरलं ते म्हणजे विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी… महाविकास आघाडीत तिकीट न मिळाल्यानं विशाल पाटलांनी शेवटी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला… आणि निवडणूक जिंकली देखील… शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना चितपट करत मैदान मारलं ते विशाल पाटलांनीच… ठाकरेंच्या उमेदवाराचं इथून डिपॉझिट जप्त झालं…तर भाजपच्या दोन टर्म खासदाराचा सांगलीत दारुण पराभव झाला…या निकालानं एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि यापुढेही राहील…लोकसभेचा हा सगळा धुराळा पार पडल्यानंतर आता वेळ आलीये ती विधानसभेची… त्यामुळे मिरज पासून ते तासगाव कवठेमहाकाळपर्यंत सांगली जिल्ह्यात आमदार म्हणून जनता कुणाला कौल देतेय? जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात विधानसभेचं गणित नेमकं कसं कसं राहील? त्याचं केलेलं हे सविस्तर विश्लेषण…
सांगलीतला पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो पलूस कडेगावचा…
काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचा हा अभेद्य बालेकिल्ला… संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण हलवणाऱ्या कदमांना पलूस कडेगावची जनता आरामात आमदारकीला निवडून देते… पतंगराव कदमांनी भक्कम बांधणी केलेल्या पलूस कडेगावमध्ये आजही विश्वजीत कदमांवर जनता भरभरून प्रेम करते…मावळत्या विधानसभेला शिवसेनेच्या संजय विभुते यांनी विश्वजीत कदमांच्या विरोधात मैदानात उतरण्याची हिम्मत दाखवली. पण प्रत्यक्ष निकालात विभूतेंपेक्षा नोटाला मत जास्त मिळाल्याने विश्वजीत कदमांचा विजय वन साईट ठरला…. मागच्या पाच वर्षांपासून भाजपचं केडर मतदार संघात स्ट्रॉंग झालं आहे…भाजपकडून यंदा आमदारकीला पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख यांची नावं चर्चेत असली तरी विश्वजीत कदमांचा 2024 चा गुलालही फिक्स समजला जातोय…
दुसरा मतदारसंघ आहे इस्लामपूर विधानसभेचा…
इस्लामपुरात वन मॅन शो जयंत पाटलांचं राजकारण चालतं… 1990 पासून तब्बल तीन दशकं ते या मतदारसंघाचं निर्विवाद प्रतिनिधित्व करत आले आहेत…मात्र नगरपालिकेतील राष्ट्रवादीची तीस वर्षांची सत्ता भाजपने संपुष्टात आणली.. हा पाटलांसाठी मोठा धक्का होता…त्यासोबतच अजित पवार गटापासून ते स्वाभिमानी पर्यंत प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे… पण असं असलं तरी इस्लामपुरात जयंत पाटील यांचंच पारड सध्या तरी जड दिसतय… विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी इस्लामपूर संदर्भात केलेली काही सूचक वक्तव्य पाहता इथे काही बिग गेम पाहायला मिळणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…
तिसरा मतदार संघ आहे तासगाव कवठेमहाकाळचा…
आर. आर. आबा यांच्या पत्नी सुमनताई पाटील इथल्या विद्यमान आमदार.. २०१९ ला त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी… शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या या पाटील घरण्याकडून सध्या रोहित पाटील यांना उमेदवारी मिळण्याचे फुल चान्सेस आहेत… नगरपंचायतीतील विजयापासूनच रोहित पाटील य़ांचं नेतृत्व मतदारसंघात प्रस्थापीत झालय… आमदारकीसाठी त्यांनी मागील काही वर्षांपासून मतदार संघात चांगलाच जम बसवलाय…त्यांच्या विरोधात महायुतीकडून संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे…त्यासाठी संजय काकांनी आत्तापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचेही बोललं जातंय… अजित घोरपडे सरकार यांसारखे पारंपारिक विरोधक मतदार संघात असले तरी तासगावात यंग ब्रिगेड मध्ये आमदारकीसाठी लढत होऊन रोहित पाटील यांच्या विजयाचे चान्सेस सध्या जास्त आहेत…
चौथा मतदारसंघ आहे मिरजचा…
भाजपचे सुरेश खाडे इथले विद्यमान आमदार. अबकी बार एक लाख पार’ म्हणत त्यांनी 2019 ची निवडणूक लढवली… आपण ठरवलं तसं झालं नसलं तरी मिरजमध्ये आमदारकीची हॅट्रिक त्यांनी मारली… त्यामुळे भाजपची पाळंमुळं चांगलीच घट्ट रोवली गेली… मात्र प्रतिस्पर्धी लढत दिलेल्या स्वाभिमानीच्या बाळासाहेब होनमोरे यांनीही चांगली मतं घेतल्याने येणाऱ्या विधानसभेला विरोधकही इथून स्ट्रॉंग पोझिशनला आहेत… मुस्लिम आणि दलित समाजाची भाजपच्या विरोधात गेलेली मत पाहता येणाऱ्या विधानसभेला मिरजची लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे…
पाचवा मतदार संघ येतो तो सांगलीचा…
भाजपचे सुधीर गाडगीळ सांगली विधानसभेचे विद्यमान आमदार…मागील दोन टर्म त्यांनी सांगलीवर होल्ड मिळवला असला तरी लोकसभेच्या निकालामुळे आणि त्यांच्या विरोधातील अँटी इनकंबनसीचा काँग्रेसच्या उमेदवाराला फायदा मिळण्याची शक्यता जास्त आहे…पृथ्वीराज पाटील, जयश्री मदन पाटील यांसारख्या उमेदवारांची नावे यंदा महाविकास आघाडी कडून चर्चेत असून काँग्रेसच्या विजयाचे चान्सेस सांगली विधानसभेत वाढलेले आहेत…
सहावा मतदारसंघ आहे शिराळा विधानसभा…
सांगली जिल्ह्याचा डोंगरी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शरद पवार गटाचे मानसिंग नाईक… मतदार संघातील कामांची पोचपावती यामुळे शिराळ्यात त्यांच्या नावाची हक्काची वोट बँक आहे… डोंगरी भागात केलेली विकासकामं आणि मतदारांसाठी धावून जाणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख… तसं पाहिला गेला तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी महायुतीच्या सर्वच पक्षांची तयारी आहे…. शिवाजी नाईक, भाजपचे सत्यजित देशमुख यांच्या नावाची सध्या विधानसभेसाठी चर्चा आहे… त्यामुळे मानसिंग नाईक विरुद्ध सत्यजित देशमुख असा संघर्ष शिराळ्यात पाहायला मिळू शकतो…
सातवा मतदारसंघ आहे जत विधानसभेचा…
गतवर्षीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचा दारुण पराभव करत काँग्रेसला मतदारसंघात पुन्हा नवसंजीवनी मिळवून दिली होती… विक्रमसिंह सावंत यांना 87 हजार 184 मते तर विलासराव जगताप यांना 52 हजार 510 मते मिळाली होती…तसं पाहायला गेलं तर विक्रमसिंह सावंत हे विश्वजीत कदम यांचे जवळचे समजले जातात… त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही सावंतांना कदमांच्या नेटवर्कचं बळ मिळू शकतं…त्यात विलासराव जगताप यांनी लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात उघडपणे काम केल्यामुळे त्यांना यंदा तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे… बाकी महायुतीतर्फे गोपीचंद पडळकर यांच्या नावाची या मतदारसंघासाठी चर्चा आहे…त्यामुळे उमेदवारी मिळाल्यानंतरच इथलं चित्र क्लियर होणार असला तरी सध्या काँग्रेस जतमध्ये स्ट्रॉंग पोझिशनला आहे…
आठवा आणि शेवटचा मतदारसंघ आहे खानापूर विधानसभेचा…
विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर हा मतदारसंघ तसा गुंतागुंतीचा राहिला आहे… शिवसेना शिंदे गटात असणारे अनिल बाबर हे आधी राष्ट्रवादीत होते… खानापुरात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात नक्कीच सहानुभूती असेल…त्यामुळे त्यांचे चिरंजीव सुहास बाबर हे शिवसेना शिंदे गटाकडून सध्या विधानसभेची तयारी देखील करत आहेत…जर त्यांना तिकीट मिळालं तर इमोशनल फॅक्टर खानापूरच्या विधानसभेला महत्त्वाचा ठरू शकतो… दुसरीकडे अजित पवार गटातील सदाशिव पाटील किंवा वैभव पाटील हे निवडणुकीपूर्वी तुतारी हातात घेऊन शिंदे गटाच्या उमेदवाराला आव्हान देऊ शकतात… तर असा आहे सांगली विधानसभेचा हा निवडणुकीपूर्व आढावा… सद्यस्थितीत जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे… त्यात लोकसभेला भाजपच्या दोन टर्मच्या आमदाराला पाय उतार व्हायला लागल्याने महाविकास आघाडीला सध्या इथून अप्पर हॅण्ड आहे…एवढं मात्र नक्की…बाकी सांगली विधानसभेला आमदारांचं कसं कसं असेल? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…
Maratha Vidya Prasarak Samaj Nashik Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदांचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 437 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. 28 जून 2024 रोजी ही मुलाखत होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | Maratha Vidya Prasarak Samaj Nashik Bharti 2024
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
पदसंख्या – 437 जागा
नोकरीचे ठिकाण – नाशिक
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – मराठा विद्या प्रसारक समाजाचे अँड विठ्ठलराव हांडे शिक्षण महाविद्यालय शिवाजीनगर गंगापूर रोड नाशिक 422002
भरती प्रक्रिया
या भरतीचे आयोजन मुलाखती द्वारे करण्यात आलेले आहे.
त्यामुळे इच्छुकानी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.
28 जून 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.
मुलाखतीला जाण्यापूर्वी pdf जाहिरात सविस्तरपणे वाचावी.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 World Cup मध्ये सर्वात मोठा उलटफेर आज सुपर ८ सामन्यात पाहायला मिळाला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानच्या संघाने लोळवलं आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला. गुलबद्दीन नैब हा अफगाणिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने ४ बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे कंबरडं मोडलं. या विजयासह अफगाणिस्तानची उपांत्य फेरीची आशा कायम राहिली आहे.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाने २० षटकात १४८ धावा केल्या. सलामीवीर रहमतुल्ला गुरबाज आणि इब्राहिम जाद्रन यांनी ११५ धावांची दमदार सलामी दिली. मात्र दोघे बाद होताच अफगाणिस्तानचा डाव कोसळला. चांगली ओपनिंग पार्टनरशिप होऊनही अफगाणिस्तानला मोठ्या धावा उभारता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलिया कडून जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने सलग दुसऱ्या सामन्यात हॅट्रिक घेतली. त्याच्याशिवाय ऍडम झम्पाने २ आणि मार्क्स स्टोइनीसने १ बळी घेतला.
प्रत्युत्तरात , ऑस्ट्रलियाला हे सोप्प आव्हान सुद्धा पेलवल नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेव्हिड हेड स्वस्तात बाद झाले, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला मिचेल मार्श सुद्धा अवघ्या १२ धावा करू शकला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने एकाकी झुंज देत अवघ्या ४१ चेंडूत ५९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. मॅक्सवेल मैदानात असेपर्यंत ऑस्ट्रेलियाचा विजय नक्की मानला जात होता. मात्र गुलबुद्दीन नैबने १५ व्या षटकात त्याला बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सुद्धा गडगडला. टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अफगाणिस्तानकडून गुलबुडीयन नैबने सर्वाधिक ४ बळी घेतले तर नवीन उल हकने ३ विकेट्स घेतल्या. या ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानची उपांत्य फेरीची आशा कायम राहिली आहे.
Mahavitaran Bharti 2024 | जे लोक नोकरीच्या शोधात आहे. त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच नवनवीन सध्या घेऊन येत असतो. त्यामुळे अनेक लोकांना फायदा होतोm आज देखील आम्ही तुमच्यासाठी नोकरीचे अशीच एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ही तुमच्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी असणार आहे. कारण आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत ( Mahavitaran Bharti 2024) एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रादेशिक संचालक /कार्यकारी संचालक या पदांच्या जागा आहेत. या पदाच्या दोन रिक्त जागा आहेत आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 27 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | Mahavitaran Bharti 2024
पदाचे नाव – प्रादेशिक संचालक / कार्यकारी संचालक
पदसंख्या – 2 जागा
वयोमर्यादा – 57 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज शुल्क – 354 रुपये
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड चौथा मजला प्रकाश गड वांद्रे पूर्व मुंबई 51
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जून 2024
शैक्षणिक पात्रता – अर्ज करणाऱ्या उमेदवाराची इलेक्ट्रिक इंजीनियरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री असणे गरजेचे आहे.
अर्ज कसा करावा ? | Mahavitaran Bharti 2024
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
त्यामुळे उमेदवारांना जाहिरातीतील अर्ज भरणे गरजेचे आहे
दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
27 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्या आधी अर्ज करा.
Black Tea Benefits | काळा चहा हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. इतर कोणत्याही चहापेक्षा हा चहा आपल्या आरोग्याला अनेक फायदे पुरवतो. कारण या चहामध्ये जास्त ऑक्सिडाईज असतात. पाश्चिमात्य संस्कृती पासून लोक काळ्या चहाचे सेवन करतात. यामुळे अनेक रोगांचे विषाणू आपल्यापासून दूर होतात. आणि आपले शरीर निरोगी राहते. यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे आपली त्वचा देखील चांगली होते. या काळ्या चहामुळे (Black Tea Benefits ) आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आता हे कोणते फायदे होतात. हे आज आपण जाणून घेणार आहोत.
काळ्या चहाचे फायदे | Black Tea Benefits
काळ्या चहामध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटी-ऑक्सिडंट असतात, जे त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतात.
काळ्या चहामध्ये असलेले कॅटेचिन्स आणि फ्लेव्होनॉइड्स त्वचेच्या संसर्गास प्रतिबंध करतात.
हे कोरोनरी रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारून हृदयाच्या समस्या दूर करते.
यामुळे आतड्यांसंबंधी समस्या दूर होतात.
हे अरुंद हवा नलिका उघडते, ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि दम्याच्या रुग्णाला फायदा होतो.
यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात.
हे प्री-मेनोपॉजच्या काळात स्तनाच्या कर्करोगाच्या धोक्यापासून संरक्षण करते.
तेलकट त्वचेसाठी ब्लॅक टी खूप फायदेशीर आहे.
किरणोत्सर्गामुळे होणारे त्वचेचे नुकसान भरून काढण्यास मदत होते.
तसेच तोंडाचे आरोग्य सुधारते.
किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते.
हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करते.
त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हे शरीराला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते.
तसेच वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
काळ्या चहामध्ये थेफ्लाविन आणि थेअरुबिगिन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळतात.
ब्लॅक टी हाडांची खनिज घनता सुधारते.
तसेच नैराश्य दूर होण्यास मदत होते.
काळ्या चहामध्ये कॅफिनचे प्रमाण सर्वाधिक असते, त्यामुळे सकाळी लवकर सेवन केल्याने दिवसभर ऊर्जा वाढते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात आणखी एक भीषण अपघाताची (Pune Accident) घटना समोर आली आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात एका कारचालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडलं आहे. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सदर कार चालक हा अजित दादा गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांचा पुतण्या असल्याची माहिती समोर येत आहे. मयुर मोहिते (Mayur Mohite) असं आमदार पुतण्याचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी रात्री उशीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मयुर मोहिते कार विरुद्ध दिशेने चालवत होता– (Pune Accident)
आंबेगाव तालुक्यातील एकालहरे गावाजवळ ही अपघाताची घटना घडली. प्रथमिक माहितीनुसार मयुर मोहिते कार विरुद्ध दिशेने चालवत होता. मयुर मोहितेच्या कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिली. हा अपघात (Pune Accident) इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओम सुनिल भालेराव असे अपघातात मृत्यू झालेल्याचं नाव आहे. याबाबत मंचर पोलीस स्टेशनमध्ये नितीन रामचंद्र भालेराव यांनी फिर्याद दिली असून मंचर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या ठिकाणी आता सीसीटीव्ही उपलब्ध आहे का पोलीस याची चाचपणी करत आहे.
दरम्यान, पुणे पोर्शे अपघातानंतर झालेल्या पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात आणखी एका आमदाराचं कनेक्शन समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पुणे पोर्शे अपघातात आमदार सुनील टिंगरे यांचं नाव समोर आलं होतं. आता रविवारी झालेल्या पुणे-नाशिक अपघातात आमदार दिलीप मोहिते पाटलांचं नाव समोर आलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या खाण्यापिणीच्या सवयी तसेच आपली जीवनशैली ही आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करते. त्यामुळे आपल्या सवयी चांगल्या असणे खूप गरजेचे असते. त्यातही सकाळची वेळ आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची मानले जाते. या काळात अनेक लोक ध्यान धारणा करतात आणि व्यायाम, योगासने करतात. परंतु काही लोक असे असतात, ते झोपेतून उठल्या उठल्या काही ना काही खातात. काही ना काही पेय पितात. परंतु सकाळी रिकाम्यापोटी काही गोष्टी खाणे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात ज्यातून आपल्या शरीरामध्ये विषारी पदार्थ तयार होतात. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या काही पदार्थ खाणे चुकीचे आहे. आता आपण जाणून घेऊया की, असे कोणते पदार्थ आहेत? जे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने आपल्या शरीरावर त्याचा चुकीचा परिणाम होतो.
साखर
सकाळी उठल्याबरोबर दूध, साखरेचा चहा, चॉकलेट किंवा बिस्किटे खाणे चुकीचे आहे. साखर शरीरात आणि रक्तप्रवाहात वेगाने प्रवेश करते. त्याच वेळी, जेव्हा आपण काही खाल्ल्यानंतर साखर खातो तेव्हा त्यातून डोपामाइन बाहेर पडतात. याशिवाय, इतर गोष्टी देखील पोटात होतात, ज्यामुळे ग्लुकोज सहजपणे आतड्यांमधून आणि नंतर रक्तप्रवाहात जाते. यामुळे साखरेची पातळी अचानक वाढू शकत नाही.
लिंबूवर्गीय फळे
सकाळी रिकाम्या पोटी संत्र्यासारख्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने आम्लपित्त आणि अपचन होऊ शकते.
कॅफिन
बहुतेक लोक सकाळचा चहा आणि कॉफी चुकवत नाहीत. अशा लोकांना ॲसिडीटी, छातीत जळजळ, सूज येणे, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
बेकरी उत्पादने
यीस्टने बनवलेल्या ब्रेड, कुकीज, पेस्ट्री यासारख्या गोष्टी खाल्ल्याने पोटातील अस्तर खराब होऊ शकते, ज्यामुळे पोट फुगणे किंवा गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात.
औषधे
जिथे काही औषधे सकाळी रिकाम्या पोटी घेतली जातात. त्याच वेळी, सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास काही औषधे द्यावी लागतील. त्यामुळे डॉक्टरांच्या सूचनेनुसारच औषधे घ्यावीत.
खरबूज
खरबूज असो की टरबूज, या गोष्टी फळांच्या नावाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने अपचन, गॅस, बद्धकोष्ठता आणि सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्प मतात आला व दोन कुबड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले. मुंबईसह देशात किमान 60 ते 70 ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवले. तसे झाले नसते तर भाजप 110 ते 120 पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नसते. या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे,” असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून केला आहे. कुंपणानेच शेत गिळले या मथळ्याखाली ससंजय राऊत यांनी भाजपसह निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
2024 च्या निवडणुकीत भारताच्या निवडणूक आयोगाचे वर्तन सरळ पक्षपाती होते. भाजपची घोडदौड 110 ते 120 वरच थांबणार होती. आयोगाच्या पक्षपातामुळे 240 चा आकडा गाठता आला. धनुष्यबाण, घड्याळ ही चिन्हे गोठवायलाच हवी होती, पण फुटिरांना ही चिन्हे देण्याचे काम आयोगाने केले. मशाल, तुतारी वाजवणाऱ्या माणसालाही आव्हान उभे करण्याचा प्रयत्न झाला. कुंपणानेच शेत खाल्ले असेच हे घडले. पैसा, गुन्हेगारी आणि घोटाळे या तीन भयानक चक्रातून भारतीय निवडणुका बाहेर याव्यात, असे प्रत्येकाला वाटत असते. ते यावेळीही घडू शकले नाही, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते,” असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्प मतात आला व दोन कुबड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले. मुंबईसह देशात किमान 60 ते 70 ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवले. तसे झाले नसते तर भाजप 110 ते 120 पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नसते. या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे, असा थेट आरोप संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर केला.
“मुंबईतील (उत्तर पश्चिम) मतदारसंघात शिवसेनेचे अमोल कीर्तिकर हे विजयी झाले. मात्र शेवटच्या दोन फेऱ्यांत साधारण सातशे मतांवर दरोडा टाकला व पोस्टल मतांच्या फेरमोजणीचे नाटक करून फक्त 48 मतांनी शिंदे गटाचे वायकर यांना विजयी घोषित करण्याचा पराक्रम या क्षेत्रातील निवडणूक अधिकाऱ्यांनी केला. संपूर्ण देशात हे प्रकरण गाजते आहे व देशाचा निवडणूक आयोग तोंडावर बोट ठेवून नेहमीप्रमाणे मौन बाळगून बसला आहे. देशभरातील निकाल पाहता 500 ते 1000 मतांच्या फरकाने भाजपने 130 च्या आसपास जागा जिंकल्या. या विजयावर संशय आहे. कमी फरकाने जिंकलेल्या जागांवर मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्यांत घोटाळे झाले व अशा जागांवर अमित शहांचे विशेष लक्ष होते. ज्या जागा काठावर आहेत त्या अशा पद्धतीने खेचून आणायच्या योजना जणू आधीच ठरल्या होत्या. 500-1000 चे मताधिक्य लोकसभेत नगण्य आहे. म्हणजे भाजप केवळ 110 जागांवरच जिंकला आहे असा दावा संजय राऊतांनी केला.