Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 653

Konkan Railway : कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करा; कोकण विकास समितीचे आमदारांना पत्र

Konkan Railway : कोकणची राणी, कोकण रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली आहे. दररोज हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करत असतात. 1990 साली कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway) ची स्थापना झाली होती. त्यानंतर आतापर्यंत कोकण रेल्वेची आगेकुच सुरूच आहे. मात्र आता कोकण रेल्वे कार्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीकडून करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र कोकण विकास समितीने कोकणातील सर्व आमदारांना पाठवले आहे.

काय आहे समितीचे म्हणणे ?(Konkan Railway)

खरंतर 1990 मध्ये बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड ची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये भारतीय रेल्वे 51%, महाराष्ट्र राज्य शासन 22 टक्के आणि कर्नाटक राज्य शासन 15%, गोवा राज्य शासन सहा आणि केरळ राज्य शासन 6% असा आर्थिक वाटा होता. जवळपास दहा वर्षांच्या कामकाजा नंतर कॉपरेशन भारतीय रेल्वेमध्ये विलिन होईल या अटीसह रोहा आणि मंगरूळ दरम्यान अस्तित्वात नसलेला रेल्वे मार्ग नियोजित भेद पूर्ण करण्याच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली होती. मात्र आता 25 वर्षानंतर ही कोकण रेल्वेचा (Konkan Railway) कारभार वेगळाच सुरू असून केवळ नफ्याच्या जोरावर हे महामंडळ रेल्वे चालवण्यात इतर पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी लक्षणीय कामगिरी करू शकत नाही असं कोकण विकास समितीने म्हटलं आहे.

याबाबत माहिती देताना कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी सांगितले की भारतीय रेल्वेवरच जास्त प्रवासी वाहतूक असणाऱ्या मार्गांचे उच्च घनता मार्ग आणि अति गर्दीचा मार्ग असे वर्गीकरण केले जाते. यामध्ये मुंबई दिल्ली, मुंबई चेन्नई यासारख्या मार्गांचा समावेश होतो परंतु वर्षभर प्रवाशांची गर्दी असूनही कोकण रेल्वे मार्ग केवळ स्वतंत्र कारभारनमुळे या वर्गीकरणापासून मुकला आहे ज्यामुळे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना अडथळा निर्माण होतो आहे.

म्हणून हवे विलीनिकरण…(Konkan Railway)

विलीनीकरण करण्याची मागणी करताना समितीकडून काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत:

  • कोकण रेल्वेला विकास कामांसाठी इतर संस्थांकडून कर्ज घ्यावे लागते त्यामुळे महामंडळ त्यावर असलेल्या कर्जासहित भारतीय रेल्वेत विलीने करण्याची गरज आहे.
  • कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतुकीवर 40% आणि मालवाहतुकीवर 50% आधीभार आहे. कोकणातील प्रवास या इतर मार्गांवरील प्रवाशांपेक्षा जास्त भाडे देत असूनही हा प्रवासी सुविधांपासून वंचित आहे.
  • आर्थिक मर्यादांमुळे मार्गाचे दुहेरीकरण सुविधा नवीनस्थानकस्थानकांवर फलाट (Konkan Railway) उभारणं यासारखे कामे करता येत नसल्यामुळे विलीनीकरण करणे आवश्यक आहे.

मी एकटा पडलोय, जात संकटात आहे, एकजूट व्हा; मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

manoj jarange patil

मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय. एकीकडे ओबीसी नेते त्यांच्या आरक्षणासाठी एकवटले असताना मराठा समाजातील नेते मात्र गप्प आहेत. मराठ्यांचे नेते मतांचा विचार करतात आरक्षणाचा नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी खंत व्यक्त केली. तसेच आपली जात संकटात आहे, एकजूट व्हा असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी होतील, ते मोठे अधिकारी होतील, अशी भीती सगळ्यांना वाटते. त्यामुळे मी आरक्षणाच्या बाजूने उभं राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरले आहे. मी एकटा पडलो आहे. सत्ताधारी पक्षातील मराठे नेते माझ्या बाजूने बोलत नाही, त्यांनी मला उघडं पाडलं आहे. पण मराठा समाजाने एकजूट राहावे अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली. कायद्याने मराठ्यांना आरक्षण दिलं आहे. मराठा हा कुणबी असल्याच्या सरकारी नोंदी आहेत. मी नेमकं महत्त्वाच्या विषयावर बोट ठेवल्याने सगळ्यांना पोटदुखी होऊ लागली असं जरांगे पाटलांनी सांगितलं.

मराठा नेत्यांवर हल्लाबोल –

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या नेत्यांनी फक्त निवडून येण्यापेक्षा किंवा आपल्या पदाची चिंता करण्यापेक्षा जातीचं आरक्षण महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यावी. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी ही गोष्ट सिद्ध करुन दाखवली आहे. ओबीसी नेत्यांसाठी निवडणुकीपेक्षा जातीचं आरक्षण महत्त्वाचे आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आता आपली जात संकटात सापडली आहे. मराठा समाजाला आवाहन आहे की, 6 ते 13 जुलैपर्यंत होणाऱ्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आपल्या डोळ्यांदेखत लेकरांचं वाटोळं होऊन देऊ नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

भारताचे तुरुंगात रूपांतर झाले.., लोकसभेच्या अधिवेशनापूर्वीच मोदींकडून आणीबाणीचा उल्लेख

Loksabha Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून देशाच्या 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळेच या अधिवेशनाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. महत्वाचे म्हणजे, हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित केले. याबरोबर, विरोधकांवर जोरदार टीका करत आणीबाणीचाही उल्लेख केला. यासह ’18वी लोकसभा नवीन ठराव घेऊन काम करेल.’ असे आश्वासन दिले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवाचा आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या नवीन संसदेत ही शपथ घेतली जात आहे. आतापर्यंत ही प्रक्रिया जुन्या संसदेत होत होती. या महत्त्वाच्या दिवशी मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि अतिशय गौरवशाली पद्धतीने पार पडली ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.”

त्याचबरोबर, “उद्या २५ जून तारीख आहे. ज्यांचा भारताच्या लोकशाही परंपरांवर विश्वास आहे, त्यांच्यासाठी 25 जून हा दिवस अविस्मरणीय आहे. 25 जूनला भारताच्या लोकशाही वर काळा डाग पडून 50 वर्षे पूर्ण होतील. भारताची नवी पिढी हे कधीही विसरणार नाही की त्यावेळी राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली, भारताचे तुरुंगात रूपांतर झाले, लोकशाही पूर्णपणे दडपली गेली.” अशा शब्दात नरेंद्र मोदींनी 25 जून 1975 ला लागू झालेल्या आणीबाणीचा उल्लेख केला.

पुढे बोलताना, “विकसित भारताचा संकल्प पूर्ण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण मिळून ती जबाबदारी पार पाडू आणि जनतेचा विश्वास आणखी दृढ करू” असे नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आज सकाळी 11 वाजता सुरू झाले आहे. या अधिवेशनात नवीन खासदार 24 आणि 25 जून रोजी शपथ घेतील. दोन दिवसांच्या शपथविधी सोहळ्यानंतर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू 27 जून रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील.

Multani Mitti Side Effect | तुम्हीही रोज मुलतानी मातीचा वापर करत असाल; तर जाणून घ्या त्वचेला होणारे नुकसान

Multani Mitti Side Effect

Multani Mitti Side Effect | प्रत्येकाची इच्छा असते की आपण सुंदर दिसाव. अगदी मुलगा असो किंवा मुलगी असो. सुंदर दिसण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात. चेहऱ्यावरील काळेपणा आणि डाग दूर करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा देखील वापर करत असतात. त्याचप्रमाणे अनेक लोक हे रोज मुलतानी मातीचा वापर करतात. मुलतानी मातीने आपल्या चेहऱ्यावर उजळपणा येतो. परंतु जर तुम्ही रोज मुलतानी मातीचा वापर करत असाल, तर तुम्हाला त्वचेची संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. आता मुलतानी मातीचा सातत्याने वापर केल्यावर आपल्याला काय तोटे होतात? हे आपण जाणून घेणार आहोत.

मुलतानी मातीचे तोटे | Multani Mitti Side Effect

  • मुलतानी माती त्वचेतून नैसर्गिक तेल शोषण्याचे काम करते. अशा परिस्थितीत ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी मुलतानी मातीचा जास्त वापर करू नये, कारण जर तुम्ही रोज मुलतानी मातीचा वापर केला तर तुमची त्वचा कोरडी आणि खडबडीत होऊ लागते.
  • काही लोकांना मुलतानी मातीची ऍलर्जी असू शकते, म्हणून ते वापरण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा आणि दररोज वापरणे टाळा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही दररोज मुलतानी माती वापरू नये. त्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो.
  • मुलतानी मातीचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे जेव्हाही तुम्ही तुमच्या त्वचेवर मुलतानी माती लावाल तेव्हा तुमच्या त्वचेनुसार मुलतानी मातीची निवड करा, कारण चुकीची मुलतानी माती निवडल्याने तुमच्या त्वचेवर सूज, लालसरपणा आणि पुरळ येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
  • चुकीच्या मुलतानी मातीचा वापर केल्याने देखील चेहऱ्यावर लाल पिंपल्स येतात, ज्यामुळे चेहरा खराब होतो. त्यामुळे चेहऱ्यावर मुलतानी माती वापरण्यापूर्वी योग्य मुलतानी माती निवडण्याची खात्री करा.

सूर्यप्रकाशाचा संपर्क टाळा

काही लोक असे आहेत जे चेहऱ्यावर मुलतानी माती लावतात आणि उन्हात बाहेर जातात. जर तुम्ही उन्हात बाहेर गेलात तर त्याचा तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्वचेनुसार मुलतानी मातीचा वापर करावा आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच त्वचेसाठी मुलतानी मातीचा वापर करावा हे लक्षात ठेवा.

Travel : आहो खरंच…! कोकणातही आहे मिनी महाबळेश्वर ; पावसाळ्यात एकदा पहाच

travel machal

Travel : कोकण म्हंटलं की आपल्याला सुंदर निळ्याशार समुद्राची आठवण येते. सुंदर स्वच्छ पाणी समुद्र किनारे , नारळ ,आंबा फणसाच्या बागा असं सगळं बरंचसं चित्र डोळ्यासमोर उभे राहते मात्र तुम्हाला माहिती आहे का सुमद्राशिवाय कोकणात एक असं ठिकाण दडलंय ज्याला मिनी महाबळेश्वर (Travel) म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. आजूबाजूला सुंदर डोंगर दऱ्या , थंडगार हवा , ढगांचं जमिनीवर येणं , दाट धुक्यात हरवलेल्या वाटा … असं मनोहारी दृश्य इथे तुम्हला अनुभवायला मिळते.

कोकणातलं थंड हवेच ठिकाण(Travel)

आम्ही ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत ते ठिकाण आहे ‘माचाळ’. रत्नागिरी जिल्ह्यातलया लांजा तालुक्यात हे छोटसं माचाळ नावाचं गाव येतं. हे गाव समुद्रसपाटीपासून जवळपास चार हजार फुटांवर वसलं आहे. जेमतेम 300-400 लोकवस्ती असलेलं हे माचाळ. मात्र या माचाळ गावाला निसर्गाने भरभरून दिलंय असं आपण म्हणू शकतो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणाला थंड (Travel) हवेचे ठिकाण अर्थात पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.

पुण्या मुंबईच्या पर्यटकांना आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक मोकळा श्वास हवा असेल, एक रिफ्रेश होण्यासाठी ठिकाण हवं असेल तर पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी भेट द्यायला हरकत नाही. अल्हाददायक स्वच्छ हवा तुम्हाला ताजतवानं करून जाईल. या वातावरणातला प्रवास तुम्हाला नेहमी स्मरणात राहील असा आहे. पावसाळ्यात हे गाव अधिक सुंदर होतं आणि पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. डोंगराच्या कुशीत वसलेलं माचाळ हे गाव घनदाट जंगलांनी समृद्ध (Travel) तर आहेच पण इथल्या जंगलाचा दुसरा एक असं वैशिष्ट्य आहे की या जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणूनच इथे आल्यानंतर इथला निसर्ग पाहिल्यानंतर पर्यटकांना या ठिकाणाबद्दल शब्दात वर्णन करणं कठीण जातं.

पावसाळ्यात या ठिकाणी ढग पूर्णपणे खाली येते त्यामुळे इथं कायम धुके असते. म्हणूनच इथल्या कौलारू घरांच्या चहू बाजूला झाडांच्या पानांनी पूर्णपणे शाकारणी (Travel) करावी लागते.

या ठिकाणची आणखी एक खासियत म्हणजे याच भागातून विशाळगडावर एक ते दीड तासात पोहोचता येते. माचाळचे ग्रामस्थ विशाळगडावर पाणी, दूध इतर गोष्टी पुरवण्यासह आणि कामांसाठी सतत येत जा करत असतात. माचाळ गावातून मुचकुंडी नदीचा उगम होतो. खरंतर या गावात मुचकुंदी ऋषींची गुहा आहे याच ठिकाणाहून नदीचा उगम झाल्याचा सांगितलं जात आहे त्यामुळेच या नदीला मुचकुंदी नदी असं संबोधले जाते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या सुंदर ठिकाणाला भेट (Travel) द्यायला काहीही हरकत नाही.

Electric Scooter : अवघ्या 64 हजार रुपयांत लाँच झाली ‘ही’ Electric Scooter; देतेय 80 KM रेंज

Electric Scooter Zelio X Men

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षापासून आपल्या भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Scooter) क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदीला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. वाढती मागणी पाहता अनेक वाहन उतपदक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Zelio Ebikes ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. Zelio X Men असं या स्कुटरचे नाव असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ती 80 किलोमीटर अंतर आरामात पार करेल. महत्वाची बाब म्हणजे या स्कुटरची किंमत फक्त 64 हजार 543 रुपये आहे.

रेंज किती ?

Zelio Ebikes या इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Electric Scooter) बेस व्हेरिएंटमध्ये 60V/32AH लीड-ऍसिड बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 7 ते 8 तासांचा वेळ लागतो. मात्र एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि स्कुटर 55 ते 60 किलोमीटरचे अंतर पार करू शकते. यानंतर या इलेक्ट्रिक स्कुटरचा दुसरा व्हेरियंट 72V/32AH लीड-ऍसिड बॅटरीसह येतो. हि बॅटरी सुद्धा फुल्ल चार्ज होण्यासाठी सुमारे 7 ते 9 तास वेळ ;लागतो मात्र फुल्ल चार्जनंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर 70 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. तर यातील टॉप मॉडेल 60V/32AH लिथियम-आयन बॅटरीसह येते, ज्याला पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ग्राहक 80 किलोमीटरपर्यंतचे अंतर आरामात पार करू शकतात.

अन्य फीचर्स – Electric Scooter

कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक स्कुटर पांढरा, काळा, लाल आणि फिकट हिरव्या रंगात लाँच केली आहे. ही स्कूटर वजनाने खूपच हलकी असल्याचा कंपनीचा दावा आहे. स्कुटरचे वजन 80 किलो आहे परंतु ही स्कूटर 180 किलोपर्यंत लोड उचलू शकते.या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हायड्रोलिक शॉक ॲब्सॉर्बर, अँटी थेफ्ट अलार्म, पार्किंग स्विच, रिअर ड्रम ब्रेक, फ्रंट डिस्क ब्रेक, अलॉय व्हील्स, रिव्हर्स गिअर, यूएसबी चार्जर, सेंट्रल लॉकिंग आणि डिजिटल डिस्प्ले यासारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती?

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 64 हजार 543 रुपये आहे. तर तिच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 87 हजार 573 रुपये आहे.

केदार जाधव राजकारणात उतरणार; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

kedar jadhav politics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचा खेळाडू आणि आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळलेला केदार जाधव (Kedar Jadhav) आता राजकारणाच्या मैदानात पॅड बांधून उतरणार आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी राजकारणात उतरायला सुद्धा आपण तयार आहे असं केदार जाधव याने सांगितलं. तो एका वृत्तवाहिनीशी बोलत होता. परंतु आपण कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत मात्र केदार जाधवने कोणतीही माहिती दिली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केदार जाधवने भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तेव्हापासून तो भाजपमध्ये प्रवेश करणार किंवा राजकारणात तरी उतरणार अशा चर्चा सुरु होत्या. त्याच पार्श्वभूमीवर त्याला भाजप प्रवेशाबद्दल विचारलं असता मी कुठल्या पक्षात जाणार हे सांगणे खूप लवकर होईल. परंतु नक्कीच मला राजकारणात काम करायला आवडेल. हे काम महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी असेल. माझा वेळ त्यासाठी द्यायलाही मी तयार आहे असं केदार जाधवने म्हंटल.

केदार जाधव पुढे म्हणाला, जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा सर्व पक्षातील नेते तुम्हाला ओळखतात. सगळ्यांनी तुम्हाला आपुलकीने वागवलेले असते. मी सोलापूरच्या माढा तालुक्यातील जाधववाडी गावासारख्या ग्रामीण भागातून आलो. आधी महाराष्ट्र आणि नंतर भारतासाठी मी खेळलो असल्याने राजकीय पक्षांना माझ्याबद्दल आदर आहेच. त्यामुळे जर राजकारणात संधी आली तर मी तयार आहेच असं म्हणत केदार जाधवने राजकारणातील आपल्या प्रवेशाबद्दल सूचक विधान केलं आहे. आता तो कोणत्या पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करतो ते पाहायला लागेल. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत केदार उतरतो का याकडे सुद्धा त्याच्या चाहत्यांचे लक्ष्य असेल.

Over boiling of Milk Tea | दुधाचा चहा जास्त उकळणे आहे हानिकारक; आरोग्याला होते हे नुकसान

Over boiling of Milk Tea

Over boiling of Milk Tea | चहा हे आपल्या भारतातील एका असे पेय आहे. ज्याने अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. चहाचे वेगवेगळे ब्रँड्स देखील भारतामध्ये आहे. अनेकांना कोणत्याही वेळेला चहा लागतो. चहाचे अनेक प्रकार देखील आहे. ग्रीन टी, ब्लॅक टी लेमन टी, दुधाचा चहा त्याचप्रमाणे प्रत्येक जण त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या गोष्टी चहामध्ये घालून चहा पितात. परंतु दुधाचा चहा हा सगळ्यांना जास्त प्रमाणात आवडतो.

अनेक लोक दुधात चहा पावडर टाकून जास्त वेळ तो उकळतात आणि मग पितात. परंतु दुधामध्ये चहा पावडर टाकून जास्त वेळ उकळकेला चहा (Over boiling of Milk Tea) हा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. हा चहा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतो. दुधाचा चहा एका ठराविक वेळेपर्यंत उकळला गेला पाहिजे. जर चहा जास्त उकळला तर त्याने तुमच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. तुम्हाला जर चहाची योग्य चव आणि निरोगी चहा प्यायचा असेल, तर तो केवळ चार ते पाच मिनिटे उकळला पाहिजे. आता चहा जास्त वेळ उकळल्याने आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.

शरीरात लोह आणि कॅल्शियमची कमतरता | Over boiling of Milk Tea

दुधाचा चहा जास्त वेळ उकळल्याने त्यात टॅनिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोषक तत्वांचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो. यासोबतच टॅनिनचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते, त्यामुळे ॲनिमिया होण्याची भीती असते.

चहाची आम्लता वाढते

दुधाचा चहा जास्त उकळल्याने त्याचा पीएच बदलतो, ज्यामुळे चहा अधिक अम्लीय बनतो.

कर्करोगाचा धोका

दुधाचा चहा जास्त उकळल्याने कर्करोगजन्य पदार्थ ऍक्रिलामाइड तयार होतो, जो आरोग्यासाठी हानिकारक आहे.

पचन समस्या

जास्त उकळलेल्या दुधाचा चहा प्यायल्याने आम्लपित्त, पोटदुखी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

रक्तदाब वाढवते

आधीच उकळलेला चहा आणखी उकळल्याने त्यात टॅनिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.

पोषक तत्वांचे नुकसान

दुधाचा चहा जास्त उकळल्याने दुधामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमसारखे अनेक पोषक घटक नष्ट होतात.

..तर मी रोहित, विराटला संघाच्या बाहेर काढणार; गंभीरने BCCI ला स्पष्टच सांगितलं

GAMBHIR VIRAT ROHIT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आला असून टीम इंडिया नव्या प्रशिक्षकाच्या तयारीत आहे. भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) एकमेव अर्ज प्रशिक्षक पदासाठी दाखल झाला असून काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी गौतम गंभीरची मुलाखत सुद्धा घेतली होती. या मुलाखतीमध्ये गौतम गंभीरने १-२ नव्हे तर तब्बल ५ अटी बीसीसीआयला घातल्या आहेत. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जर २०२५ च्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाला जिंकवू शकले नाहीत तर आपण या दोन्ही खेळाडूंना संघाबाहेर काढू असं गंभीरने बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितलं आहे.

गंभीरच्या 5 मुख्य अटी कोणत्या ?

बोर्डाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय संघाच्या क्रिकेट ऑपरेशन्सवर त्याचे पूर्ण नियंत्रण असेल, अशी मागणी गंभीरने केली.

गौतम गंभीर स्वतः फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी प्रशिक्षकांसह स्वतःचा सपोर्ट स्टाफ निवडेल.

तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, पाकिस्तानमधील 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या चार वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची संधी असू शकते. जर हे खेळाडू भारताला जिंकवू शकले नाहीत तर त्यांना संघातून वगळण्यात येईल. मात्र, तिन्ही फॉरमॅटमधून खेळाडूंना वगळण्यात येईल कि नाही याबाबत स्पष्ट माहिती नाही.

गंभीरची चौथी अट म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये वेगळा संघ असेल.

पाचवी अट म्हणजे तो स्वतः 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी रोडमॅप तयार करण्यास सुरुवात करेल.

दरम्यान, विराट, रोहित, जडेजा आणि शमी या चार वरिष्ठ खेळाडूंनी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कामगिरी न केल्यास त्यांना संघातून वगळले जाईल हे अगदी स्पष्ट असले तरी, हे सर्व खेळाडू कसोटी संघात कायम राहतील का? हा प्रश्न कायम आहे. ३५ पेक्षा जास्त वय झालेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा या वरिष्ठ खेळाडूंचे भविष्य आधीच अनिश्चित आहे. त्यातच गंभीरचे नाव भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदाशी जोडले गेल्यानंतर या दोन दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवल्यास आश्चर्य वाटणार नाही.

विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत; मग शिंदे-दादा गटाला किती??

mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा आगामी विधासभा निवडणुकीकडे (Maharashtra Assembly Election 2024) लागल्या आहेत. येत्या सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. राज्यात शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांची महायुती असा थेट सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मात्र तत्पूर्वी महायुतीच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे भाजपला इतक्या जागा सोडलं शिंदे आणि दादा गटाला मान्य असणार का ते पाहायला हवं.

सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 155 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेसाठी 60 ते 65 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी 50 ते 55 जागा सोडण्याची तयारी भाजपची असल्याचे समजते. तर महायुतीमधील अन्य तीन मित्रपक्षांना उरलेल्या 15 जागा मिळतील.. या ३ मित्रपक्षांमध्ये आरपीआय आठवले गट, मनसे, रयत क्रांती संघटना यांचा समावेश असू शकतो. भाजपला सर्वाधिक जागा देणे अजित पवार आणि एकनाथ शिंदे याना मान्य असणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे कारण यापूर्वी अजित पवार गट आणि शिंदे गटाने भाजपकडे प्रत्येकी ९० जागांची मागणी केली होती.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघडीचे महायुतीचा दारुण पराभव केला होता. राज्यातील एकूण ४८ मतदारसंघापैकी महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या तर दुसरीकडे महायुतीला अवघ्या १७ जागांवर यश मिळालं. यात भाजपला ९, शिंदेंच्या शिवसेनेला ७ आणि अजित पवार गटाला एका जागेवर विजय मिळाला. त्यामुळे लवकरात लवकर विधानसभेचं जागावाटप करून कामाला लागण्याचा महायुतीचा विचार आहे.