Monday, December 22, 2025
Home Blog Page 656

Pat Cummins चा धडाका!! World Cup मध्ये सलग दुसरी हॅट्रिक

Pat Cummins Hattrick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने क्रिकेट इतिहासात नवा विक्रम रचलाय…. . अफगाणिस्तानच्या सुपर ८ सामन्यात पॅट कमिन्सने हॅट्रिक साजरी केली. विशेष म्हणजे मागील सामन्यात बांगलादेश विरुद्व त्याला हॅट्रिक मिळाली होती. म्हणजेच सलग २ सामन्यात पॅट कमिन्सने २ वेळा हॅट्रिक केली आहे. वर्ल्ड कप मध्ये सलग २ सामन्यात २ वेळा हॅट्रिक घेणारा पॅट कमिन्स पहिला आणि एकमेव गोलंदाज ठरला आहे.

आजच्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रहमतुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी ११५ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानचा डाव गडगडला.. पॅट कमिन्सने १७. ६ षटकात राशिद खानला आऊट केलं. त्यानंतर पुढच्या ओव्हर मधील पहिल्या चेंडूवर करीम जनत आणि गुलबद्दीन नैब याना बाद करत सलग दुसऱ्या सामन्यात हॅट्रिक घेतली. बांगलादेश विरुद्ध सुद्धा कमिन्सने २ ओव्हर मध्ये हॅट्रिक घेतली होती. बांगलादेश विरुद्ध त्याने डावाच्या १८ व्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर महमदुल्ला आणि मेहंदी हसन याना बाद केलं. त्यानंतर २० व्या षटकात कमिन्स पुन्हा गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर रिदोयला माघारी धाडलं आणि विश्वचषकातील आपली पहिली हॅट्रिक (Pat Cummins Hat Trick) साजरी केली होती.

T20 World Cup मध्ये हॅट्रिक घेणारे गोलंदाज

ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, 2007
कर्टिस कॅम्फर (आयर्लंड ) विरुद्ध नेदरलँड्स, अबू धाबी, 2021
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह, 2021
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, शारजाह, २०२१
कार्तिक मयप्पन (UAE) विरुद्ध श्रीलंका, गिलॉन्ग, 2022
जोशुआ लिटल (आयर) विरुद्ध न्यूझीलंड, ॲडलेड, 2022
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, 2024

Mumbai Pune Travel : अटल सेतूवरून इलेक्ट्रीक शिवनेरी धावणार सुसाट; मंत्रालय ते स्वारगेट प्रवास सुखकर

shivaneri electrical

Mumbai Pune Travel : शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरत आहेच पण हा सेतू मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी देखील मह्तवपूर्ण ठरतो आहे. कारण या पुलामुळे वेळ वाचतो आहे शी प्रवासही आरामदायी होतो आहे. त्यामुळे या मार्गावरन धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवनेरी गाडीला (Mumbai Pune Travel) देखील चांगला फायदा होतो आहे. शिवाय या गाडयांना देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हीच बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने स्वारगेट मंत्रालय – स्वारगेट अशी इलेक्ट्रीक शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे. चला जाणून घेऊया एस टी महामंडळाच्या या सेवेबद्दल …

आठवड्यातून दोन वेळा धावणार (Mumbai Pune Travel)

यापूर्वी देखील एसटी महामंडळाकडून शिवनेरीची सेवा सुरु करण्यात आली आहे. या एस टी बस ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. म्हणूनच एसटी महामंडळाने स्वारगेट मंत्रालय – स्वारगेट (Mumbai Pune Travel) अशी इलेक्ट्रीक शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे. आठवड्यातून दोन दिवस म्हणजे दर सोमवारी आणि शुक्रवारी ही बस धावणार आहे.

मुंबई पुणे प्रवास कमी वेळात (Mumbai Pune Travel)

एसटी महामंडळाच्या अधिकऱ्याने याबाबत मध्यमनाशी बोलताना सांगितले की, अटल सागरी सेतूमुळे मुंबई-पुणे प्रवास 40 मिनिटांनी कमी होत असल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी मंत्रालय-स्वारगेट शिवनेरी बस सेवेची मागणी केली होती. त्यानुसार ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

काय असेल तिकीट दर ?

या बसच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचं झाल्यास सोमवारी सकाळी सहा वाजता स्वारगेट होऊन मंत्रालयासाठी ही बस निघणार आहे. तर शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता मंत्रालयाहून स्वारगेट साठी ही गाडी निघेल. या गाडीसाठी महिलांना (Mumbai Pune Travel) आणि 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये 50% सवलत देण्यात आली आहे. तर 75 वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत असणार आहे. आता या गाडीच्या तिकिटा बद्दल बोलायचं झालं तर याचं पूर्ण तिकीट 565 रुपये आहेत तर अर्धा तिकीट 295 रुपये आहे.

Kitchen Tips : पावसाळ्यात कितीही स्वच्छता केली तरी माशा करतात हैराण ? झटपट करा ‘हे’ उपाय

get rid from house fly

Kitchen Tips : पावसाळा हा ऋतू सर्वांना हवाहवासा वाटतो. निसर्गाचे देखणे रूप सर्व मरगळ दूर करून टाकते. पण पावसाळा अनेक आजार देखील घेऊन येतो. या आजारांचे वाहक म्हणजे पावसाळ्यात हमखास उद्भवणाऱ्या माशा आणि डास. पावसाळयात कितीही स्वच्छता केली तरी घरात माशांचा शिरकाव होतोच. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात तुम्हाला अशा (Kitchen Tips ) काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे घरात माशांचा शिरकाव होणार नाही. शिवाय माशा घरातून निघून जातील. ह्या ट्रिक्स एका यु ट्यूब चॅनल वर प्रसारित करण्यात आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया …

मिरचीचा स्प्रे (Kitchen Tips )

पावसात उद्भवणाऱ्या माशा आणि डास यांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपायांमधला हा एक चांगला उपाय आहे. मिरचीचा स्प्रे तुम्ही तयार करून माशा आणि डास पळवू शकता. मिरचीचा स्प्रे हा तीव्र गंधाचा असतो त्यामुळे डास आणि माशा (Kitchen Tips ) घरात प्रवेश करत नाही आणि घरात असलेल्या माशा देखील बाहेर पळ काढतात. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये लाल तिखट आणि पाणी घालून मिक्स करा ज्या ठिकाणी माशा आहेत त्या ठिकाणी ते शिंपडा. पण घरात लहान मुले आणि आजारी मंडळी असतील त्यांच्यापासून हा स्प्रे दूर ठेवा.

आल्याचा स्प्रे (Kitchen Tips )

जिंजर म्हणजेच आलं. आलं सुद्धा स्ट्रॉंग असतं. शिवाय त्याचा गंधही तिखट असतो. जर तुम्ही घरामध्ये जिंजर स्प्रे वापरला तर घरात माशा राहत नाहीत. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये चार चमचे आल्याची पेस्ट घाला त्यानंतर चार कप पाणी मिसळा ज्या ठिकाणी माशांचा (Kitchen Tips ) वावर जास्त आहे त्या ठिकाणी हा स्प्रे करा.

कापूर (Kitchen Tips )

कापराचा गंध इतका तीव्र असतो की माशा या गंधामुळे पळून जातात. हा उपाय करण्यासाठी कापराचे गोळे बारीक करून त्याची पावडर तयार करा त्यानंतर पाण्यात मिसळा. तयार पाणी हे स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि जिथे जिथे माशा दिसतील तिथे स्प्रे करा म्हणजे माशा (Kitchen Tips ) पळून जातील

ॲपल साइडर विनेगर

एप्पल साइडर विनेगर चा वापर खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. याचा वापर तुम्ही माशांना पळवून लावण्यासाठी सुद्धा करू शकता. यासाठी एका स्प्रे (Kitchen Tips ) बॉटलमध्ये कपभर एप्पल साइडर विनेगर घाला. त्यामध्ये निलगिरीचे तेल घाला आणि मिक्स करा. हा तयार स्प्रे स्वयंपाक घरात स्प्रे करा यामुळे माशा सहज पळून जातील.

छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी; म्हणाले की, जर असेच सुरु राहिले तर…

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| OBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, या मागणीला घेऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Wagmare) गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत होते. परंतु आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्या मागण्यांबद्दल सकारात्मक भूमिका दाखवल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. याचवेळी मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठी मागणी केली आहे. ज्यात त्यांनी ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मागितले आहे.

आज माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “आम्ही लोकसभेवर जायचे नाही, विधानसभेवर जायचे नाही. जर असेच सुरु राहिले तर विधानसभा आणि लोकसभेतही आम्हाला आरक्षण हवं, अशी मागणी करावी लागेल. लढाई अजून संपलेली नाही. तर ती सुरु झाली आहे. त्यामुळे आता घरी बसून चालणार नाही. आपल्या हक्कांसाठी वणवा पेटवावा लागेल”

त्याचबरोबर, “आम्ही कुणालाही धमक्या देत नाही. आपली लढाई अजून संपलेली नाही. त्यांना दुसरे ताट द्या, आमच्या ताटातले देऊ नका. लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होईल. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या आम्ही पाठींबा देतो. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. अन्याय झालेले समाज हळूहळू पुढे यावे, यासाठी आरक्षण आहे” असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.

दरम्यान, आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जालन्यातील वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी आम्ही लक्ष्मण हाकेंच्या सर्व मागण्या मान्य करत असल्याचे सांगितलं. त्यानंतर आपले उपोषण स्थगित करत लक्ष्मण हाके म्हणाले की, “आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याने आम्ही आंदोलन तात्पुरते उपोषण मागे घेत आहोत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मैदानात उतरु”

शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल राहील नियंत्रणात!! फक्त दररोज प्या हे खास पाणी

Turmeric water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयीमुळे आणि सगळ्यात बाहेरचे खाल्ल्यामुळे लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू लागली आहे. अनेक लोक खूप कमी वयात हाय कोलेस्ट्रॉलचे (High Cholesterol) शिकार होत आहेत. त्यामुळेच अशा लोकांमध्ये हार्ट अटॅक, ब्लॉकेज, स्ट्रोक आणि कोरोनरी आर्टरी असे गंभीर आजार उद्भवत आहेत. परंतु तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलचे शिकार व्हायचे नसेल तर तुमची लाईफस्टाईल बदलावी लागेल. यासह पुढे देण्यात आलेला घरगुती उपाय दररोज करावा लागेल. ज्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहील.

आपल्याला बाहेरच आहे की घरगुती मसाल्यांमध्ये हळद सर्वात आयुर्वेदिक औषध आहे. हळदीमुळे जशी जखम बरी होते तसेच शरीराच्या आतील आजार आणि समस्या ही दूर होतात. त्यामुळेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर हळदीचे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. हळदीचे गाणे शरीरातील रक्त शुद्ध करते आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर फेकते. याच हळदीमध्ये अनेक गुणकारी तत्वे असतात. त्यामुळे हळदीचे पाणी पिल्याने आरोग्य चांगले राहते.

असे प्या हळदीचे पाणी

दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्या पाण्यात चिमूटभर हळदीची पावडर टाका. त्यानंतर हे पाणी चांगले ढवळून त्याचे सेवन करा. लक्षात घ्या की या पाण्याचे सेवन रोज रिकाम्या पोटी करावे लागेल. यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतील. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण ही वाढणार नाही. शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू नये म्हणून तुम्ही अति तेलकट पदार्थ खाणे देखील टाळावे. यासह पालेभाज्या आणि कडधान्य आहारात घ्यावीत.

Central Bank Of India Bharati 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, 8 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

Central Bank Of India Bharati 2024

Central Bank Of India Bharati 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही असेच एक संधी घेऊन गेलेलो आहोत. बँकेत नोकरी करण्याची आणि त्यांची इच्छा असते. परंतु त्यांची ती इच्छा पूर्ण होत नाही. परंतु आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India Bharati 2024) मध्ये एक बंपर भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जाणाऱ्या आहेत. या पदाच्या एकूण 484 रिक्त जागा आहेत. त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा 21 जून पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Central Bank Of India Bharati 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या मुख्य कार्यालयात मुंबई येथे भरती होणार आहेत. या भरती अंतर्गत सफाई या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 484 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरती अंतर्गत उमेदवारांचे वय 18 ते 26 दरम्यान असणे गरजेचे आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार आठवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये शुल्क असणार आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क असणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

SEBI Recruitment 2024 | सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये नोकरी संधी, असा करा अर्ज

SEBI Recruitment 2024

SEBI Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण एका भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. या भरतीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे. आता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कडून ही भरती प्रक्रिया राबवलेली जाणार आहे. या भरती अंतर्गत कार्यकारी संचालक पदासाठी जागा निघालेल्या आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागणार आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | SEBI Recruitment 2024

सेबीअंतर्गत कार्यकारी संचालक या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यासाठी उमेदवार CA/CS/CFA/CWA/LLB उत्तीर्ण असणे गरजेचे असावे त्याच बरोबर अर्थशास्त्रात पदवीत्तर असावा

अर्ज पद्धती

या भरती अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 40 ते 55 दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्या अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

अखेर लक्ष्मण हाकेंचे उपोषण मागे; सरकारने केल्या सर्व मागण्या मान्य

Laxman hake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मागणीला घेऊन गेल्या 9 दिवसांपासून
ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते. यादरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन हे उपोषण मागे घेण्यात यावे अशी विनंती केली होती. परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा निर्धार लक्ष्मण हाके यांनी केला होता. अखेर आज सरकारने लक्ष्मण हाके यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने पुन्हा जालन्यातील वडीगोद्री येथे येऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी आम्ही लक्ष्मण हाकेंच्या सर्व मागण्या मान्य करत असल्याचे सांगितलं. त्यानंतर आपले उपोषण स्थगित करत लक्ष्मण हाके म्हणाले की, “आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याने आम्ही आंदोलन तात्पुरते उपोषण मागे घेत आहोत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मैदानात उतरु”

दरम्यान, सुरुवातीला मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये याला छगन भुजबळ यांनी सर्वात जास्त विरोध दर्शवला होता. त्यावेळी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर लक्ष्मण हाके मैदानात उतरले आणि त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. लक्ष्मण हाके यांच्यावरही टीका करण्यास मनोज जरांगे अग्रस्थानी होते. परंतु आता स्वतः सरकारने लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दाखवली आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Weather Update | जूनच्या शेवटच्या आठवड्यात कोसळणार मुसळधार पाऊस; मुंबईसाठी पुढील 2 दिवस महत्वाचे

Weather Update

Weather Update | मान्सूनला महाराष्ट्रात सुरुवात झाल्यानंतर काही काळ मान्सूनने विश्रांती घेतली होती. परंतु आता जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस पुन्हा एकदा मुंबईसह संपूर्ण राज्याभरात सक्रिय झालेला आहे. यावर्षी महाराष्ट्रात नेहमीपेक्षा लवकर पाऊस आला. परंतु मध्यंतरी पुन्हा एकदा पाऊस थांबला होता. परंतु आता मौसमी वाऱ्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याने पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी आता चांगला पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता मान्सूनला (Weather Update) सुरुवात झालेली आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार पुढील चार आठवडे मान्सूनचा अंदाज देण्यात आलेला आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहर, उपनगरसह पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 आणि 25 जून रोजी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाने सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील शेतीची कामे करण्यासाठी हवाहन विभागाकडून इशारा आलेला आहे.

मुंबई-पुणे प्रवाशांनो ऐका!! येत्या 28 ते 30 जूनदरम्यान या महत्वाच्या ट्रेन रद्द राहणार

Mumbai Pune Trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबई पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे बातमी आली आहे. येत्या 28 ते 30 जून दरम्यान मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. ज्यामध्ये इंटरसिटी एक्स्प्रेस (Intercity Express) आणि डेक्कन एक्स्प्रेस (Deccan Express) या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. या दोन्ही ट्रेन दुहेरीकरणाच्या कामामुळे बंद राहणार आहेत. त्यामुळे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणतांबा कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात दुहेरीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळेच येत्या 28 ते 30 जून दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, 28 जून रोजी पुणे- मुंबई इंटरसिटी ट्रेन रद्द असेल. 29 जून रोजी मुंबई- पुणे डेक्कन ट्रेन तर 30 जून रोजी मुंबई-पुणे इंटरसिटी ट्रेन रद्द असणार आहे.

दरम्यान, रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या दुहेरीकरणामुळे इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस तीन दिवस रद्द राहिल्यामुळे मुंबईवरून पुण्याकडे आणि पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होऊ शकतात. या दोन्ही ट्रेन खूप कमी वेळेमध्ये प्रवाशांना पोहचवत असते. यामुळे नोकरीला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचतो. परंतु आता या ट्रेन तीन दिवस बंद राहणार असल्यामुळे प्रवाशांना दुसरा पर्याय निवडावा लागणार आहे.