Monday, December 22, 2025
Home Blog Page 657

ऑफिसला जायला 15 मिनिटे उशीर झाला तरी होणार कारवाई; थेट केंद्र सरकारने घेतला निर्णय

Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऑफिस वर्क करणाऱ्यांसाठी त्यांचा कामाचा वेळ हा ठरलेला असतो. परंतु आता देशातील सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची सूचना आलेली आहे. आता ऑफिसला उशिरा पोहोचल्यावर केंद्र सरकार कारवाई करणार असल्याचा आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला ऑफिसला यायला पंधरा मिनिटापेक्षा जास्त उशीर झाला, तर माफ केले जाणार नाही. त्यांना कारवाईसाठी तयार राहावे लागेल. असे सांगण्यात आलेले आहे.

देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये कामासाठी उपस्थित राहायचे असते. आणि आपल्या हजेरी लावायची असते. आता केंद्र सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक स्क्रीनचा वापर करण्यास सांगितलेले आहे. कोरोना काळापासून ही बायोमेट्रिक सिस्टीम बंद करण्यात आली होती. परंतु आता ही पुन्हा एकदा चालू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे

केंद्र सरकारच्या डीओपीटी विभागाने जास्तीत जास्त 15 मिनिट उशीर झाल्यावर माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल म्हणजे सव्वा नऊ नंतर ऑफिसला येणाऱ्यांना अर्धा दिवस जाणार आहे.

केंद्र सरकारची ऑफिसची सकाळी 9 ते सायंकाळी 5 : 30 वाजेपर्यंत आहे. परंतु कर्मचारी उशिरा येणे आणि लवकर जाण्याचे प्रकार सुरू असतात. त्यामुळे आता ऑफिसची ही वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता साडेनऊ नंतर उपस्थित राहणाऱ्यांचा सर्रास हाफ डे लागणार आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑफिसची वेळ तंतोतंत पाळावी लागणार आहे. अन्यथा त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

भाविकांसाठी आनंदाची बातमी!! या तारखेपासून 24 तास विठुरायाचे दर्शन मिळणार

Ashadhi Wari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या एका महिन्यापासूनच पंढरपुरात आषाढी वारीची (Ashadi Wari) जल्लत तयारी सुरू झाली आहे. याच आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. याचं बैठकीमध्ये येत्या 17 जुलै रोजी आषाढी वारी सोहळा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासह 7 जुलैपासून भाविकांसाठी पांडुरंगाचे दर्शन 24 तासांसाठी खुले हे देखील सांगण्यात आले. म्हणजेच 7 जुलैपासून भाविकांना 24 तासात कधीही पांडुरंगाचे दर्शन घेता येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, पार पडलेल्या या बैठकीत पालखी प्रमुखांच्या शासकीय पूजेत बसण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे पालखी प्रमुखांना महापूजेत बसण्याची परवानगी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले जात आहे. आता या बैठकीनंतर लवकरच राज्याच्या मु्ख्यमंत्र्यांना विठुरायाच्या पूजेचे निमंत्रण दिले जाणार आहे. यासह आषाढी वारीसाठीची पुढील कामे ही उरकण्यात येतील.

दरम्यान, विठ्ठल मंदिर ट्रस्टने विठुरायाचे दर्शन 24 तास खुले केल्यामुळे भाविकांच्या आनंदात आणखीन वाढ झाली आहे. कारण की, अनेकवेळा आषाढी वारीत असलेल्या गर्दीमुळे आणि मर्यादित वेळेमुळे अनेक भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता येत नाही. ज्यामुळे त्यांची मोठी निराशा होते. परंतु आता हीच बाब लक्षात घेऊन ट्रस्टने भाविकांसाठी विठुरायाचे दर्शन चोवीस तास खुले केले आहे.

Skin Care Tips : पावसाळ्यात ‘या’ गोष्टी टाळा; नाहीतर, चेहरा होईल खराब

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) पावसाळ्याच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या शारीरिक आरोग्यासह त्वचेचे आरोग्य देखील खराब होत असते. पावसाळ्यात वातावरणामध्ये असलेली आर्द्रता त्वचेला तेलकट आणि चिकट बनवते. ज्यामुळे हवेतील धुळीचे कां अगदी सहज आपल्या त्वचेवर चिकटतात आणि यामुळे चेहरा हळूहळू खराब होऊ लागतो.

पुरळ येणे, रॅशेस येणे, मुरुमांचा त्रास आणि चेहऱ्यावरील चमक निघून जाणे. अशा बऱ्याच गोष्टी पावसाळ्यात होऊ शकतात. त्यामुळे या काळात आपल्याला स्किन केअर रुटीन बदलणे फार आवश्यक आहे. (Skin Care Tips) आपल्या रोजच्या रुटीनमधील बऱ्याच गोष्टींमुळे त्वचेचे नुकसान होत असते आणि ते आपल्या लक्षातही येत नाही. मग अशावेळी पावसाच्या दिवसांमध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे तुमचा चेहरा खराब होणार नाही.

ग्रीसी मॉइश्चरायझरचा वापर टाळा (Skin Care Tips)

आपल्या त्वचेला कोणत्याही ऋतूमध्ये मॉइश्चरायझरची गरज असते. यात काही शंकाच नाही. मात्र, पावसाळ्यात हेवी आणि ग्रीसी मॉइश्चरायझर्सचा वापर अजिबात करू नका. यामुळे त्वचा खूप जसेच्या चिकट होते आणि यामुळे धूळ व मातीचे कण चेहऱ्यावर जमा होतात. परिणामी चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होते. तुमच्या त्वचेवर मुरूम, पुरळ येऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेला मॉइश्चराइज करायचे असेल तर लाइट वेट आणि नॉन कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर्सचा वापर करा.

हार्श एक्सफोलिएटर वापरू नका

आपल्या त्वचेला स्क्रबची गरज असते आणि म्हणून जर तुम्ही हार्श एक्सफोलिएटर वापरत असाल तर तुम्ही फार मोठी चूक करताय. कारण असे एक्सफोलिएटर आपल्या त्वचेचे नैसर्गिक तेल काढून टाकतात आणि यामुळे त्वचा कोरडी व निस्तेज होते. (Skin Care Tips) त्यामुळे स्क्रब खरेदी करताना त्यावर लिहिलेली माहिती नीट वाचा. ज्यामुळे तुम्ही विकत घेत असलेल्या स्क्रबमध्ये कोणकोणते घटक तसेच रसायने वापरली आहेत? हे तुम्हाला कळेल.

ऑईली प्रोडक्ट्सचा वापर नकोच

जस ऋतू बदलतो तसं स्किन केअर रुटीन बदलायला हवं. त्यामुळे पावसाळ्यात स्किन केअर रुटीनमध्ये बदल करणे गरजेचे असते. या दिवसात त्वचेची योग्य काळजी घेताना ऑईली प्रोडक्ट्सचा वापर अजिबात करू नका. (Skin Care Tips) आधीच हवेतील आद्रतेमुळे आपला चेहरा ऑईली होत असतो. त्यात तुम्ही ऑईली प्रोडक्ट्सचा वापर केल्याने चेहरा आणखी ऑईली होऊन त्वचेवर पुरळ येऊ शकतात. त्यामुळे या दिवसात पाणी आणि मिनरल बेस्ड गोष्टींचा वापर करावा.

हेवी मेकअप अजिबात करू नका

बऱ्याच मुलींना घरातून बाहेर पडताना हेवी मेकअप करायची सवय असते. मात्र, पावसाळ्यात हेवी मेकअप करणे त्रासदायी ठरू शकते. कारण, हवामानातील आर्द्रतेमुळे मेक- अप सहज मेल्ट होतो आणि आपली त्वचा खराब करतो. अशा मेकअपमुळे त्वचेची छिद्र बंद होतात आणि यामुळे ब्रेकआउट होऊन त्वचेचे नुकसान होते. (Skin Care Tips) त्यामुळे पावसाळ्यात हलका मेकअप करा आणि झोपण्यापूर्वी मेकअप आठवणीने काढा.

‘या’ चुका करू नका

1) पावसाळ्याच्या दिवसात चुकूनही गरम पाण्याने चेहरा धुवू नका. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी होते. त्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा.

2) पावसात भिजल्यावर चेहऱ्याला सतत हात लावू नका. घाणेरड्या हातांमुळे चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. चेहऱ्यावर फोड येऊ शकतात. त्यामुळे टिश्यू किंवा रुमालचा वापर करा. (Skin Care Tips)

3) पावसाळा सुरु आहे म्हणून सनस्क्रीन वापरणे बंद करू नका. ऋतू कोणताही असो हवामान कसेही असो सनस्क्रीनचा वापर करायला हवा.

पेपरलीक प्रकरणानंतर देशात सार्वजनिक परीक्षा कायदा लागू; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Public Examination Act

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| NEET परीक्षा आणि NET परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणामुळे (Paper Leak) राज्यभरात गोंधळ उडाला आहे. आशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सर्व पेपरफुटी प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत सरकारने 21 जूनपासून देशात सार्वजनिक परीक्षा कायद्याच्या तरतुदी (Public Examination Act) लागू केल्या आहेत. या कायद्याच्या अंतर्गत या प्रकरणांमध्ये दोषी आढळलेल्या आरोपीला 3 ते 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात येईल. तर पेपर लीक करणाऱ्यांना 5 ते 10 वर्षे तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, नीट परीक्षा आणि नेट परीक्षेचे पेपर लीक झाल्यामुळे राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. आता या सर्व प्रकरणांचे सखोल चौकशी करण्यात येणार आहे. असे प्रकार भविष्यात घडू नये त्यामुळेच केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा कायदा लागू केला आहे. या कायद्याच्या अंतर्गतच फसवणुकीला आळा घालण्यासाठी 3 ते 5 वर्षांच्या कारावासाची सुनावण्यात येणार आहे तर पेपर लेख करण्यात येणाऱ्या व्यक्तीला पाच ते दहा वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल. यासह एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागेल. यापूर्वी हा कायदा 2024 च्या महिन्यातच मंजुर करण्यात आला होता.

महत्त्वाचे म्हणजे अशा परीक्षा आयोजित करणारी संस्था सेवा पुरवठादार किंवा इतर कोणत्याही संस्थेने संघटित गुन्हा केल्यास त्यांना कमीत कमी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाईल. या शिक्षेत दहा वर्षांपर्यंत वाढ होऊ शकते. तसेच त्यांना एक कोटींचा दंड भरावा लागेल. या कायद्याचे उद्दिष्टच केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), रेल्वे, बँकिंग भरती परीक्षा आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना रोखण्याचे आहे.

दरम्यान, सार्वजनिक परीक्षेच्या वेळी कोणत्याही उमेदवार चुकीच्या मार्गाने गैर कृत्या करताना दिसला तर त्याच्यावर देखील संस्थेच्या वतीने कारवाई केली जाईल. या कायद्यातच, संस्थाकडून आकारला जाणारा दंड एक कोटी रुपयांपेक्षा कमी नसावा असे म्हटले आहे. तसेच कोणतेही संस्था पेपर लीकच्या पुण्यात आढळून आल्यास त्यांची मालमत्ता ही जप्त करण्याची तरतूद कायद्यात दिली आहे.

Ayurvedic Kadha : पावसाळ्यात प्या ‘हा’ इम्युनिटी बूस्टर काढा; जो संसर्गांना ठेवतो चार हात दूर

Ayurvedic Kadha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayurvedic Kadha) पावसाळा सुरु झाला की, सोबत आनंद, हर्ष घेऊन येतो. पण यासोबत आजारपणसुद्धा आणतो. पावसाळ्यात बदलते वातावरण आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम करत असते. अशा वातावरणामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. परिणामी विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता बळावते. पावसाळ्यात हवा दमट असते आणि या दिवसांमध्ये अनेक रोगजंतू हवेतून पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात बरेच लोक सतत आजारी पडताना दिसतात.

खास करून सर्दी – पडसं, खोकला, ताप हे आजार पावसाळ्यात डोकं वर काढतात. जे थेट आपल्या रोग प्रतिकारक शक्तीवर हल्ला करून आपल्याला आतून कमजोर करतात. अशावेळी आपल्याला इम्युनिटी बूस्ट करण्याची गरज असते आणि यासाठी पावसाळ्याच्या दिवसात सर्वात प्रभावीपणे आयुर्वेदिक काढे काम करतात. (Ayurvedic Kadha) ज्यामध्ये तुळस आणि हळदीचा काढा आपली रोगप्रतिकारक शक्ती अनेक पटींनी मजबूत करण्यास मदत करते. आज आपण हा काढा कसा बनवायचा आणि त्याचे सेवन कसे करायचे? याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

तुळस – हळदीचा आयुर्वेदिक काढा (Ayurvedic Kadha)

पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून आपल्याला संरक्षण हवे असेल तर त्यासाठी आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत असायला हवी. याकरता तुळस आणि हळदीचा काढा मदत करतो. कारण तुळशीमध्ये अँटी- बॅक्टेरियल, अँटी- फंगल आणि अँटी- बायोटिक गुणधर्म असतात. तर हळदीमध्ये अँटी- बॅक्टेरियल, अँटी- फंगल गुणधर्म असतात. हळदीतील इम्युनोमोड्यूलेटरी प्रभावामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. शिवाय संक्रमण, विषाणू आणि जीवाणूंपासूनदेखील आपल्याला रक्षण मिळते. तुळस आणि हळद आपल्या औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदातही फायदेशीर मानले जातात. असे हे दोन्ही पदार्थ काढ्याच्या निमित्ताने एकत्र आल्यास अधिक गुणकारी लाभ मिळतात.

काढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • पाणी – १ ग्लास
  • हळद – १/२ चमचा
  • तुळशीची पाने – ८ ते १२
  • गूळ – २ चमचे (पावडर) किंवा १ छोटा खडा
  • लवंग – ३ ते ४
  • दालचिनी – १ छोटा तुकडा

काढा बनवण्याची कृती

तुळस आणि हळदीचा काढा बवण्यासाठी सर्वात आधी एक पॅन घ्या. (Ayurvedic Kadha) यामध्ये १ ग्लास पाणी घाला. यानंतर त्यामध्ये हळद, तुळशीची पाने, लवंगा आणि दालचिनीचा तुकडा टाका. साधारण १५ मिनिटे पाण्याला चांगले उकळू द्या. यानंतर पाण्याचा रंग सोनेरी होईल. मग हे मिश्रण गाळून घ्या आणि कोमट करा. आता यात गूळ मिसळा. तुमचा आयुर्वेदिक तुळस – हळदीचा काढा तयार.

‘असे’ करा सेवन

तुळस – हळदीचा काढा आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात हा काढा या जरूर प्या. (Ayurvedic Kadha) जर तुम्ही सर्दी किंवा फ्लूमूळे त्रस्त झाले असाल तर हा काढा तुम्हाला दिवसातून २ वेळा आणि किमान २ दिवस पिणे गरजेचे आहे. शिवाय हा काढा नियमित प्यायल्यास आजारी पडण्याची शक्यता मिटेल.

RBI New Rule | RBI ने बदलली क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची पद्धत; 30 जूननंतर येणार ‘या’ अडचणी

RBI New Rule

RBI New Rule | आपल्या देशामध्ये कितीतरी लोक क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर त्यांचे बिल भरावे लागतात. हे बिल तुम्ही याआधी कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरू शकत होतात. परंतु अशातच आता RBI ने क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासंदर्भात एक नवीन नियम जारी केलेला आहे. या आधीचे नियम बदललेले आहेत. या नियमानुसार आता क्रेडिट कार्डचे बिल हे RBI च्या प्रणालीच्या माध्यमातूनच भरावे लागणार आहे. RBI काढलेल्या या नव्या नियमाचा परिणाम मात्र इतर फोन पे, क्रिएट बिल्डर्स यांसारख्या गोष्टींवर होणार आहे. RBI ने (RBI New Rule) काढलेला हा नियम आता 1 जुलैपासून लागू होणार आहे. म्हणजेच 30 जून नंतर इतर कुठल्याही माध्यमातून तुम्हाला एक क्रेडिट कार्डचे बिल भरता येणार नाहीये. तुम्हाला 30 जून नंतर सर्व क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी BBPS च्या माध्यमातूनच भरावे लागेल. ही सूचना भारतीय रिझर्व बँकेने देखील दिली होती.

अजूनही ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकने ही BBPS प्रक्रिया सक्रिय केलेली नाहीये. आतापर्यंत त्यांच्या अनेक कोटी ग्राहकांना क्रेडिट कार्ड दिलेले आहे. परंतु आता त्या ग्राहकांना इथून पुढे इतर ॲप्सवरून क्रेडिट कार्ड भरताना अडचण येऊ शकते. तोपर्यंत या बँका BBPS प्रणाली सक्रिय करणार नाही. तोपर्यंत त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डचे बिल भरता येणार नाही.

आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना 1.7 कोटी क्रेडिट कार्ड केलेले आहेत ॲक्सिस बँकेने 1.4 कोटी क्रेडिट आहे. परंतु या बँकांनी अजूनही बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही. त्यांनी जर ही प्रणाली सक्रिय केली नाही तर 30 जून नंतर क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी अडचण येणार आहे.

त्याचप्रमाणे ही BBPS प्रणाली चालू करण्यासाठी बँकांना आणखी 90 दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी देखील आरबीआयकडे (RBI New Rule) करण्यात आलेली आहे. एकूण 34 बँकांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी आहे. परंतु आत्तापर्यंत फक्त आठ बँकांनी BBPS प्रणाली सक्रिय केलेली आहे. यामध्ये एसबीआय बँक, ओबीओ कार्ड, इंडस्ट्रीज बँक, फेडरल बँक, कोटक बँक, महिंद्रा बँक या बँकांचा समावेश आहे.

Viral Video : हृदयद्रावक!! समुद्राच्या लाटांमध्ये रोमान्स करताना प्रेयसी गेली वाहून; क्षणात होत्याच नव्हतं झालं

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) समुद्र जितका शांत आणि सुंदर दिसतो तितकाच तो रुद्र देखील होतो. त्यामुळे पावसाच्या दिवसात शक्यतो समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना वारंवार दिल्या जातात. असे असूनही बरेच तरुण मुलं- मुली, प्रेमी युगल समुद्रकिनाऱ्याच्या मोह टाळण्यास असमर्थ ठरतात आणि भावनेच्या आहारी जाऊन मोठे नुकसान करून घेतात. बऱ्याचवेळा समुद्राच्या लाटांचा अंदाज येत नाही आणि अशावेळी होत्याच नव्हतं व्हायला एक क्षण देखील पुरेसा ठरतो. असेच काहीसे एका कपलसोबत घडल्याचा एक हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हालाही दुःख होईल.

लाटांमध्ये रोमान्स करणे पडले महागात (Viral Video)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक जोडपे भरपावसात समुद्रातील उंच लाटांमध्ये उभे राहून रोमान्स करताना आपण पाहू शकतो. यावेळी अचानक एक उंच लाट आली आणि पुढे जे काही घडले ते फारच भयानक होते. सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडीओ अगदी धडकी भरवणारा ठरतोय. समुद्रात वादळ सुरू असताना मध्यभागी रोमान्स करत असलेलं हे जोडपं उंच उंच लाटांचा आनंद घेत होतं. दरम्यान, एक भली मोठी लआत आली आणि त्या लाटेमध्ये प्रेयसी ओढली गेली.

प्रियकराच्या डोळ्यासमोर वाहून गेली प्रेयसी

ही लाट इतकी भयानक होती की, क्षणार्धात प्रियकराच्या डोळ्यांसमोर त्याची प्रेयसी समुद्रात ओढली गेली आणि त्यांनतर दिसेनाशी झाली. माहितीनुसार, ही दुर्घटना रशियातील सोचीत घडली आहे. जी या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video) या घटनेचा व्हिडीओ पाहून कुणालाही धक्का बसेल. समुद्राच्या लाटांमध्ये रोमान्स करताना आल्या प्रेयसीला डोळ्यासमोर वाहून जाताना पाहून प्रियकर अस्वस्थ झाला होता. त्यांनी लाटांमध्ये तिला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही केल्या ती काही सापडली नाही.

वृत्तानुसार, रेस्क्यू टीम गेल्या ३ दिवसांपासून या मुलीचा शोध घेत होती. परंतु त्यांना कोणतीही अपडेट मिळाली नाही. या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. (Viral Video) यापैकी एकाने लिहिलं, ‘समुद्रात वादळ असेल तर चुकूनही मर्यादा ओलांडायच्या नसतात.. अन्यथा पोहायला येत असलं तरीही समुद्र आपल्याला आत ओढतो’. आणखी एकाने लिहिलं, ‘किती भयानक आहे हे. मी यापूर्वी असं कधीही पाहिलं नव्हतं. मला वाटतं त्याने तिला वाचविण्याचे फार काही कष्ट घेतले नाहीत’.

LIC New Scheme | LIC ने आणली नवी योजना, जमिनी आणि इमारती विकून मिळवणार 58 हजार कोटी रुपये

LIC New Scheme

LIC New Scheme | आपल्या देशामध्ये अनेक विमा कंपन्या आहेत. परंतु त्यात LIC ही सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC ने सुमारे 58 हजार कोटी रुपयांची एक योजना बनवलेली आहे. यासाठी LIC त्यांच्या मालकीच्या जमिनी आणि इमारती विकणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार LIC (LIC New Scheme) ही कंपनी त्यांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये असलेली मालमत्ता विकण्याच्या विचारात आहे. यामुळे त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. या कंपनीच्या अनेक ठिकाणी विविध इमारती देखील आहेत. भारतातील श्रीमंतीच्याबाबत विचार केला तर रेल्वे आणि लष्करानंतर LIC कडे सगळ्यात जास्त प्रॉपर्टी आहे. परंतु आता LIC ला ही मालमत्ता का विकायची आहे?असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. ते आपण जाणून घेणार आहोत. LIC ची देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये मालमत्ता आहे. दिल्ली, कोलकत्ता त्याचप्रमाणे मुंबई या ठिकाणी LIC ची मोठी मालमत्ता आहे. LIC कडे एकूण तब्बल 51 ट्रिलियन रुपयांची मालमत्ता आहे.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा एकूण 36,397 कोटी रुपये एवढा होता. परंतु जर LIC ने त्यांची मालमत्ता विकली, तर त्यांच्या कंपनीच्या नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. LIC ने ही मालमत्ता विकली, तर त्या नवीन मालकास इमारतीचा पुनर्विकास करण्याची देखील परवानगी दिली जाऊ शकते. त्यामुळे मालमत्तेचे व्यवस्थापन आणि कमाई करण्यासाठी नवीन कंपनी देखील बनवू शकते. या कंपनीच्या काही इमारती अगदी प्राईम लोकेशनवर आहे. परंतु कंपनीला त्यांच्या कायद्यांमध्ये काही बदल करावे लागतील.

LIC या कंपनीने या आधी देखील एकदा ही मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची ही योजना यशस्वी झाली नाही LIC च्या अनेक इमारती आणि मालमत्ता कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्यातून सुटका मिळवण्यासाठी LIC ही योजना आणत आहे.

Gold Price Today: ग्राहकांनो सोनं-चांदी झालंय स्वस्त; खरेदीसाठी लगेच भाव तपासा

Gold Price Today

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घट होण्यासाठी ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या किमतींनी उच्चांकांची पातळी काढली होती. त्यामुळे सराफ बाजारातही गर्दी फार कमी झाली होती. मात्र आता हेच सोन्या-चांदीचे भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. याचा फायदा ग्राहकांना होत आहे. आज बऱ्याच काळानंतर सोन्याबरोबर चांदीच्या ही किमती घटल्या आहेत.

गुड रिटर्न्सनुसार सोन्याचे आजचे भाव पाहिला गेलो तर, 22 कॅरेट दहा ग्रॅम सोने बाजारात 66350 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासह 24 कॅरेट दहा ग्रॅम सोने 72380 रुपयांवर येऊन पोहोचले आहे. तसेच 100 ग्रॅम 22 कॅरेट सोने 6,63,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोने हे 7,23,800 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच पूर्वीच्या भावांपेक्षा आजच्या सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66350 रुपये
मुंबई – 66350 रुपये
नागपूर – 66350 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72380 रूपये
मुंबई – 72380 रूपये
नागपूर – 72380 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज फक्त सोन्याचेच नाही तर चांदीचे भावही घडले आहेत. Good Return नुसार, शनिवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 920 रुपयांनी व्यवहार करत आहे. (Gold Price Today) तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 9200 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 92,000 रूपये अशी आहे. यापूर्वी चांदीच्या किमती 93 हजारांवर येऊन स्थिर झाल्या होत्या.

Dangerous Stunt Video : प्रसिद्धीसाठी जीवघेणी स्टंटबाजी!! तरुणाच्या डोक्यावरून नेली बाईक; VIDEO पाहून बसेल हादरा

Dangerous Stunt Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dangerous Stunt Video) सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करणे हे काही आता नवीन राहिलेले नाही. बरेच लोक जीवावर उदार होऊन वाट्टेल ते करताना दिसतात. कशासाठी? तर केवळ आणि केवळ रीलसाठी व प्रसिद्धीसाठी. यामध्ये बाईकवर स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या जरा जास्त आहे. बऱ्याच लोकांना बाईकवर जीवघेणे स्टंट करण्यात काही भलतीच मजा येते. त्यांना आपल्या जीवाची काडीभर चिंता नसते. सध्या असाच एक जीवाची पर्वा न करता स्टंट करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

व्हायरल व्हिडीओ (Dangerous Stunt Video)

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी हा एक व्हिडीओ आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की, इथे बाईकस्वार तरुण आणि त्याच्या आसपास खूप लोक बसलेले आहेत. त्यांच्या मधोमध एक मुलगा दोन विटांच्या मध्यभागी डोके ठेवून पडला आहे. हा सगळा प्रकार सर्कशीतल्या खेळासारखा वाटतो आहे. पण ही सर्कस जीवाशी खेळ करणारी आहे. कारण, बाईकस्वर तरुण जमिनीवर पडलेल्या मुलाच्या दिशेने बाईक नेतो आणि त्याच्या डोक्यावरून बाईक पुढे सरकताना यात दिसत आहे. त्यावेळी डोक्यावरून बाईक गेल्याने हा मुलगा वेदनांनी कळवळून उठतो आणि हातांनी डोकं धरतो. हा व्हिडीओ पाहून त्या मुलाची कवटी फुटली असेल असेच वाटत आहे.



या व्हिडिओत पुढे दिसतंय की, डोकं धरून उठलेल्या मुळाजवळ एक लहान मुलगी आणि एक तरुण धावत येतात. तर बाईकस्वारदेखील क्षणभर थबकतो आणि घाबरलेला दिसतोय. या व्हिडिओत पुढे काय झाले ते दाखवलेले नाही. शिवाय ही घटना कुठली आहे? याबाबतदेखील काही माहिती दिलेली नाही. (Dangerous Stunt Video)मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यावर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्याचे आपण पाहू शकतो. आतापर्यंत हा व्हिडीओ ३० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

नेटकरी भडकले

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डल biki_sk83777 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यावर मोठ्या प्रमाणात युजर्सच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. अनेकांनी यावर संताप दर्शवला आहे तर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. (Dangerous Stunt Video)एकाने कमेंट करत लिहिलंय, ‘अरे भाऊ, लाइक्स आणि फेमस होण्यासाठी असला धोका पत्करू नका.. यामुळे तुमचा जीव जाऊ शकतो’. तर अन्य एकाने लिहिले, ‘असे नाटक करू नका. कुठेतरी दुकानात काम करा. म्हणजे मरायची गरज पडणार नाही’.