Monday, December 22, 2025
Home Blog Page 658

Shocking Video : धक्कादायक!! सांबारच्या वाटीत आढळला उंदीर; प्रसिद्ध फूड सेंटरचा निष्काळजीपणा उघड

Shocking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) गेल्या काही दिवसांपासून एकापेक्षा एक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अलीकडेच बंगळुरुत अॅमेझॉन कंपनीने डिलिव्हरी केलेल्या पार्सल बॉक्समध्ये जिवंत साप आढळल्याची गंभीर घटना घडली होती. तर एका ठिकाणी हर्षी चॉकलेटमध्ये मेलेला उंदीर सापडला होता. इतकेच नव्हे तर अलीकडेच आईस्क्रीममध्ये माणसाचे बोट आढळल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला होता. या घटना अत्यंत ताज्या असतानाच आता गुजरातमधील एक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध फूड सेंटरमध्ये सांबाराच्या वाटीत मृत उंदीर आढळल्याचे हे वृत्त आहे.

गुजरातमधील प्रसिद्ध फूड सेंटरमध्ये घडला प्रकार (Shocking Video)

गुजरातच्या अहमदाबाद येथील देवी डोसा सेंटर हे अत्यंत प्रसिद्ध फूड सेंटर आहे. या ठिकाणी बरेच खवय्ये मोठ्या आवडीने वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. दरम्यान, या ठिकाणी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. देवी डोसा सेंटरमध्ये एका ग्राहकाला सांबाराच्या वाटीत मृत उंदीर आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. खरंतर हे ठिकाण दाक्षिणात्य पदार्थांसाठी एक सर्वोत्तम स्पॉट मानले जाते. मात्र या घटनेनंतर इथे कुणी खवय्या फिरकेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

अहमदाबादच्या प्रसिद्ध देवी डोसा सेंटरमध्ये एका ग्राहकाने डोसा आणि ईडली मागवली होती. त्यासोबत वाटीत सांबार आले होते. त्या सांबारच्या वाटीत ग्राहकाला मृत उंदीर आढळला आणि यानंतर त्या ग्राहकाने अहमदाबाद महापालिकेत धाव घेतली. या संदर्भात त्याने अन्न आणि औषध प्रशासन व आरोग्य विभागाकडे तक्रार नोंदवली आहे.

आरोग्य विभागाची तडक कारवाई

ग्राहकाच्या तक्रारीची नोंद घेऊन आरोग्य विभागाने अहमदाबादच्या प्रसिद्ध देवी डोसा सेंटरला नोटीस बजावली आहे. त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन स्वतः पाहणी केली. यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की, डोसा सेंटरमध्ये सांबार आणि चटणी यांसारखे पदार्थ चक्क उघड्यावर ठेवले आहेत. (Shocking Video) जिथे ग्राहकांना पदार्थ सर्व्ह केले जातात त्या ठिकाणी पदार्थ उघडे ठेवल्याने यात उंदीर पडला असेल, अशी लोकांकडून शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ अहमदाबाद अपडेट्स नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

ज्या ग्राहकासोबत हा धक्कादायक प्रकार घडला त्याने स्वतः या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सांबारात पडलेल्या या उंदराचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर त्यावर बऱ्याच युजर्सच्या विविध प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. (Shocking Video) यावर संताप व्यक्त करताना एका युजरने म्हटले आहे की, ‘टेबलाखालून पैसे घेऊन असल्या हॉटेल्सना संमती देऊ नका’, तर आणखी एकाने लिहिलं, ‘बंद करा हे हॉटेल.. लोकांच्या जिवाशी खेळ चालवला आहे’. तर आणखी एकाने म्हटले, ‘खाण्याचा दर्जा दिवसेंदिवस बिघडत चालला आहे… यावर काहीतरी लवकर ऍक्शन घ्या’.

8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव आला

8th Pay Commission

8th Pay Commission | जे लोक सरकारी नोकरी करतात, त्या सगळ्या लोकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता केंद्र सरकारला 2024 चा अर्थसंकल्प पूर्वी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. या आठव्या वेतन आयोगाचा (8th Pay Commission) प्रस्ताव मोदी सरकारकडे देखील पाठवण्यात आलेला आहे. जेणेकरून सरकार कर्मचारी निवृत्ती वेतनधारक मूळ वेतन यांचे भत्ते, पेन्शन आणि इतर गोष्टींचा देखील आढावा घेऊ शकतील. हाती आलेल्या माहितीनुसार जुलै शेवटपर्यंत हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाबाबत निर्णय घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

मोदी सरकारला आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव | 8th Pay Commission

अनेकांनी कॅबिनेट सचिवांना एक पत्र लिहून आजच्या वेतन आयोगाचा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती देखील केलेली आहे. दर दहा वर्षांनी केंद्रीय वेतन आयोग स्थापन केला जातो. यावेळी केंद्र सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार, भत्ते आणि आणि फायदे या सगळ्या गोष्टींचा तपशील घेतात. आणि महागाईनुसार आवश्यकते बदल केले जातात.

याआधी 28 फेब्रुवारी 2014 रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सातवा वेतन आयोग आणला होता. त्यांनी केलेल्या शिफारसी या 2016 पासून लागू करण्यात आलेल्या होत्या. मोदी सरकारच्या काळात हा पहिलाच वेतन आयोग स्थापन होण्याची वेळ आहे. हा आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून दहा वर्षाच्या अंतराप्रमाणे सुरू होण्याचा प्रस्ताव आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुका संपल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पुनरागमन करत असताना, 1 कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अद्यतनाच्या प्रतीक्षेत आहेत. मिश्रा म्हणाले की, महागाई आधी 4 ते 7 टक्के होती, कोविडनंतर ती सरासरी 5.5 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. मिश्रा म्हणाले की, कोविड नंतरची महागाई कोविडपूर्व पातळीपेक्षा जास्त आहे. जर आपण 2016 ते 2023 पर्यंत दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू आणि वस्तूंच्या किरकोळ किमतींची तुलना केली, तर स्थानिक बाजारपेठेनुसार त्या 80% पेक्षा जास्त वाढल्या आहेत. 1/7/2023 पर्यंत केवळ 46% महागाई भत्ता दिला. तो सध्या 50 टक्क्यांवर आहे.

असा असेल पगार

मिश्रा यांनी दशकभर प्रतीक्षा करण्याऐवजी वेतन मॅट्रिक्सचे नियतकालिक पुनरावलोकन करण्याची शिफारस केली आहे. आता महागाई पाहता वेतन आयोगात बदल करण्याची गरज आहे. मिश्रा यांनी 1 जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी डीए कुठे 50% पर्यंत पोहोचेल यावर प्रकाश टाकला. त्याच वेळी, 1 जानेवारी 2004 नंतर भरती झालेल्यांना CCS (पेन्शन) नियम, 1972 (आता 2021) अंतर्गत पेन्शन पुनर्संचयित करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 8व्या वेतन आयोगाच्या वेतन रचनेवरही चर्चा होणार आहे.

Fake Lychees And Watermelons | बाजारातील बनावट लिची आणी टरबूज कसे ओळखायचे ? वापरा ही ट्रिक

Fake Lychees And Watermelons

Fake Lychees And Watermelons | बाजारामध्ये सध्या टरबूज आणि लिची या दोन फळांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. नुकतेच पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील ही फळे आता मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. आणि ही फळे सध्या स्वस्त दरात देखील मिळत असल्याने अनेक लोक ही फळे खातात. परंतु सध्या ही फळे खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. बाजारांमध्ये सध्या बनावट फळांची त्याचप्रमाणे भेसळयुक्त फळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि हीच भेसळ सध्या लिची आणि टरबूज (Fake Lychees And Watermelons) या फळांमध्ये केली जात आहे. त्यामुळे ही फळे विकत घेताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

बनावट लिची आणि टरबूज | Fake Lychees And Watermelons

ही फळे चुकीच्या पद्धतीने कृत्रिमरित्या पिकवली जातात. ही फळे चांगली आणि लाल दिसण्यासाठी यामध्ये वेगवेगळ्या हानिकारक रंगांचा वापर केला जातो. ज्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टरबूज आतून लाल दिसावे यासाठी इंजेक्शन देऊन त्याचा रंग लाल केला जातो. त्यामध्ये रासायनिक रंग टाकला जातो. आणि गोड बनवण्यासाठी साखरेच्या पाकाचा देखील वापर केला जातो.

तसेच लीचीचा रंग लाल दिसावा आणि पिकलेली दिसावी त्यासाठी त्यावर लाल रंगाची फवारणी केली जाते. तसेच लीचीची चव गोड लागावी, यासाठी त्यावर लहान छिद्रे करून त्यात साखरेचा पाक सोडला जातो.

बनावट फळे ओळखायची कशी?

आता तुम्ही म्हणाल की, ही फळे पिकलेल्या फळांसारखी दिसत असतील, तर खरी आणि खोटी फळे ओळखायची कशी? यातील फरक जाणून घेण्यासाठी तुम्हाला कापसाचा वापर करायचा आहे. तुम्ही कापूस घ्या आणि लीचीवर घासा. त्यावर जर लाल रंग येत असेल, तर त्यावर लाल रंगाची फवारणी केलेली आहे असे समजा. त्याचप्रमाणे टरबूज विकत घेतल्यावर तो कापा आणि त्यावर कापूस फिरवा. जर त्या कापसाला लाल रंग लागला तर त्यामध्ये इंजेक्शनने लाल रंग टाकलेला असतो.

हे रंग रासायनिक असल्याने तुमच्या आरोग्यासाठी घातक असतात. दुकानदार केवळ त्यांच्या फळांची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी या पदार्थांचा वापर करत असतात. परंतु आपण वेळीच त्यापासून सावध होऊन आपल्या आरोग्याचे रक्षण करणे गरजेचे आहे.

Weight Loss Drinks | वजन कमी करण्यासाठी ‘ही’ 5 पेय ठरतील फायदेशीर; महिन्याभरातच व्हाल सडपातळ

Weight Loss Drinks

Weight Loss Drinks | आज काल लोकांची अयोग्य जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढतच चाललेली आहे. लठ्ठपणा वाढल्यामुळे माणसांना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाऱ्यांसारख्या अनेक आजारांचा देखील त्रास होतो. आज-काल लोकांना निम्म्यापेक्षा जास्त आजार हे लठ्ठपणामुळे होतात. परंतु सगळे काही करूनही त्यांचे वजन काही कमी होत नाही.

तुम्हाला या आजारांपासून दूर राहायचे असेल आणि लठ्ठपणा कमी करायचा असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणे, खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही पौष्टिक अन्न खाणे. त्याचप्रमाणे चरबी कमी होणारे पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे असते. आता आम्ही अशा काही पेयांबद्दल सांगणार आहोत. जे पिल्याने (Weight Loss Drinks) तुमची चरबी झपाट्याने कमी होईल आणि वजन कमी होण्यासाठी हा अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. आता हे पेय कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया.

जिरे पाणी | Weight Loss Drinks

एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात भिजवून सकाळी उकळून घ्या, त्यात लिंबाचा रस घालून चहाप्रमाणे प्या. वजन कमी करण्यासाठी जिरे पाणी हा नैसर्गिक उपाय आहे. हे पाणी सकाळी प्यायल्याने चयापचय वाढतो, ज्यामुळे पचन सुधारते आणि चरबी कमी होण्यास मदत होते.

दालचिनी पाणी

एका ग्लास पाण्यात एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा टाकून रात्रभर ठेवा. सकाळी उकडलेले दालचिनीचे पाणी रात्रभर पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि चयापचय वाढतो, ज्यामुळे वजन कमी होते.

आले पाणी

आल्याचा एक छोटा तुकडा आणि दालचिनीचा तुकडा एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी उकळून घ्या आणि लिंबाचा रस आणि मधासह चहाप्रमाणे सेवन करा. सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

मेथीचे पाणी

एक चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी ते उकळा आणि नंतर चहासारखे प्या. मेथीचे पाणी रात्रभर भिजवल्याने पोट भरल्याची भावना येते, ज्यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी करणे सोपे होते.

बडीशेप पाणी | Weight Loss Drinks

एका ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप रात्रभर भिजत ठेवा आणि त्यात लिंबाचा रस आणि मध घालून चहाप्रमाणे प्या. एका जातीची बडीशेपमध्ये असलेले पाचक एंझाइम पचन सुधारतात आणि चरबी कमी करण्यास मदत करतात.

Row Or Dry Coconut | ओला की सुका ! आरोग्यासाठी कोणता नारळ फायदेशीर?

Row Or Dry Coconut

Row Or Dry Coconut | आजारी असल्यावर किंवा अगदी दैनंदिन आयुष्यात देखील डॉक्टर आपल्याला नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. कारण नारळाचे पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काही लोकांना ओला नारळ आवडतो, तर काही लोकांना पाळलेला नारळ आवडतो. नारळ जरी एकच असला तरी ओल्या आणि वाळलेल्या नारळामध्ये (Row Or Dry Coconut ) खूप फरक आहे . आपल्याला हे माहीत असणे खूप गरजेचे असते. त्यानंतर तुम्ही ते दोन्हीही खाऊ शकता. नारळ ओला असताना त्याची चव पोषण तत्त्व आणि गुणधर्म वेगळे असतात. आणि नारळ वाळल्यानंतर त्यातले गुणधर्म बदलतात आता आपल्या आरोग्यासाठी ओला नारळ योग्य आहे की वाळलेल्या नारळ हे आपण जाणून घेऊया.

ओला नारळ | Row Or Dry Coconut

ओला नारळ हा चवीला थोडासा गोड आणि खमंग असा असतो. तर सुके खोबरे हे जास्त गोड नसते आणि ते चावायला देखील खूप वेळ लागते. वाळल्यानंतर नारळाची चव ही कच्च्या नारळापेक्षा थोडी वेगळी लागते. ओल्या नारळामध्ये पाणी असते, तर वाळलेल्या नारळामध्ये पाणी नसते. त्यामुळे ओला नारळ हाइड्रेशनसाठी आणि आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो.

त्याचप्रमाणे नारळ वाळल्यानंतर त्यातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. तसेच वाळलेल्या जास्त साखर, कॅलरीज आणि फॅट्स देखील आढळतात. त्याचप्रमाणे सुके खोबरे जास्त दिवस टिकावे म्हणून त्यावर प्रिझर्वेटिव्ह आणि व्हाइटनर टाकले जातात. त्यामुळे ते जास्त दिवस टिकतात.

ओल्या नारळामध्ये (Row Or Dry Coconut ) अनेक जीवनसत्व आणि खनिज असतात. आणि पुरेशा प्रमाणात प्रथिने देखील आढळतात. यामध्ये कॅलरीज, हेल्दी फॅट आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड आढळतात. यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण देखील कमी असते. त्यामुळे हे उत्तम इलेक्ट्रोलाईट म्हणून देखील काम करते.

ओला नारळ की सुका नारळ शरीरासाठी योग्य काय ?

सुक्या नारळामध्ये ओलावा नसल्यामुळे त्यात चरबी जास्त प्रमाणात असते. त्याचप्रमाणे वाळलेल्या नारळात कॅलरीचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामध्ये चरबी प्रथिने आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण देखील जास्त असते. कच्च्या नारळापेक्षा ओला सुका नारळा जास्त टिकतो. परंतु पौष्टिक मूल्य आणि गुणधर्माच्या आधारावर ओला नारळ हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

Strawberry Moon : आज आकाशात ‘स्ट्रॉबेरी मून’चे दर्शन घडणार; ज्याचा लग्नानंतरच्या ‘HoneyMoon’शी आहे खास संबंध

Strawberry Moon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strawberry Moon) चंद्राकडे पाहिलं की, अत्यंत शांत आणि शितल वाटतं. कितीही डागाळलेला असला तरीही आकर्षक आणि सुंदर दिसणारा चंद्र रोज आकाराने बदलत असतो. ज्याला ‘चंद्रकला’ म्हणतात. मात्र, चंद्राची काही रुपं डोळ्यात साठवून घ्यावी इतकी सुंदर असतात. जसे की, ‘स्ट्रॉबेरी मून’. होय. तुम्ही अगदी बरोबर वाचताय ‘स्ट्रॉबेरी मून’. चंद्राच्या विविध रूपांची विविध नावे आहेत. यांपैकी एक म्हणजे ‘स्ट्रॉबेरी मून’. हा चंद्र आज आकाशात पाहता येणार आहे.

दिनांक २० जून ते २२ जून दरम्यान अर्थात आज २१ जून रोजी आकाशात स्ट्रॉबेरी मूनचे (Strawberry Moon) दर्शन घडणार आहे. हे चंद्राचे सर्वोत्तम रूप आहे जे पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळेल. माहितीनुसार हा चंद्र धनु राशीत चमकणार आहे आणि याचा थेट ‘हनीमून’सोबत संबंध आहे. चला या ‘स्ट्रॉबेरी मून’विषयी अधिक माहिती घेऊया.

‘स्ट्रॉबेरी मून’ नाव कसे पडले?

उत्तर अमेरिकेत या काळात स्ट्रॉबेरीची फळे काढली जातात. त्यामुळे, उत्तर अमेरिकेतील अल्गोनक्वीन जमातीच्या लोकांनी या चंद्राला ‘स्ट्रॉबेरी मून’ असे नाव दिले आहे. त्यामुळे चंद्राच्या या अत्यंत सुंदर रुपाला बरीच लोक ‘स्ट्रॉबेरी मून’ (Strawberry Moon) म्हणून ओळखतात. तर काही ठिकाणी या स्ट्रॉबेरी मूनला हॉट मून, हनी मून आणि रोज मून असेही म्हणतात.

स्ट्रॉबेरी मून दिसतो कसा? (Strawberry Moon)

आजपर्यंत अनेक तज्ञांनी या चंद्राचे निरीक्षण केले आहे. त्यानुसार या तज्ञांचे म्हणणे आहे की, हा चंद्र सोनेरी म्हणजेच सोन्याच्या रंगासारखा पिवळा दिसतो. मात्र त्यावर हलका लाल रंगाचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. मात्र, यावेळी वातावरणाचा वरील पट्ट्यात कोणती रसायने अधिक प्रमाणात आहेत यांचा प्रभाव यावर दिसून येतो. याशिवाय तज्ञांनी म्हटले, कोणत्याही पौर्णिमेला चंद्राचे रूप पाहणे फारच मनमोहक आणि अलौकिक असते. मात्र, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा त्याच्यावरील खड्डे, पर्वत, दऱ्या, इम्पॅक्ट क्रेटर दिसून येतात.

स्ट्रॉबेरी मूनचा ‘हनीमून’शी खास संबंध

युरोपीय लोक स्ट्रॉबेरी मूनला ‘हनी मून’ असे संबोधतात. याचे कारण असे की, यावेळी मधाचे पोळे तयार झालेले असते आणि त्यातून मध काढण्याची वेळ आलेली असते. आता लग्ना नंतरच्या ‘हनीमून’बद्दल बोलायचं झालं तर त्यासोबत देखील या चंद्राचा संबंध आहे. हनीमून हा शब्द १५०० च्या दशकापासून वापरला जात आहे. (Strawberry Moon) या कालावधीत जगभरातील अनेक देशांमध्ये जंगी विवाह सोहळे पार पडतात. त्यामुळे लोक लग्नानंतर हनिमूनसाठी बाहेर कुठेतरी फिरायला जातात. त्यानुसार या चंद्राला ‘हनी मून’ म्हणूनही ओळखले जाते.

Monsoon Tips : पावसाळ्यात वीज कोसळताना कसे कराल स्वतःचे रक्षण? जाणून घ्या

Monsoon Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Tips) राज्यभरात ठिकठिकाणी धुवाँधार पाऊस सुरु आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर अखेर वरुणराजा प्रसन्न झाला आहे. राज्यभरात मान्सूनला जबरदस्त सुरुवात झाली असून अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजासुद्धा सुखावला आहे. अनेक गावात पेरणीला सुद्धा सुरुवात झाली आहे. एकीकडे पावसाच्या येण्याने सर्वत्र आनंदी आनंद झाला आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात कोसळणाऱ्या वीजेमुळे दुर्घटना घडत असल्याचे काही वृत्त समोर आले आहेत. पावसाळ्यात वीज कोसळणे ही नैसर्गिक घटना असली तरीही यामध्ये वित्तहानीच नव्हे तर जीवितहानी देखील होऊ शकते.

दरवर्षी मान्सून सुरु झाला की, अनेक भागांमध्ये वीज कोसळण्याच्या घटना घडतात. आकाशात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊ लागला की, आपोआपच मन चलबिचल होऊ लागतं. कारण, वीज कोसळल्याने प्रत्येक वर्षी कुणाचा ना कुणाचा जीव गेल्याचे वृत्त आपल्या कानावर येत असतं. (Monsoon Tips) आकाशातून कोसळणाऱ्या विजेच्या ताकदीचा अंदाज लावणे जरा अवघडंच. कारण, ही वीज क्षणात राखरांगोळी करण्याचे सामर्थ्य ठेवते. तुम्हाला माहितेय का? ही वीज कशी तयार होते? ती जेव्हा कोसळते तेव्हा आपण आपला बचाव कसा करू शकतो? चला याविषयी जाणून घेऊ.

वीज कशी तयार होते? (Monsoon Tips)

जेव्हा आकाशात थंड आणि उष्ण हवा एकत्र येताना हवा जसजशी वर जाऊ लागते तसतशी आणखीच थंड होते. काही वेळात तिचे बर्फाच्या लहान लहान कणांमध्ये रुपांतर होते. हे कण एकमेकांवर आपटतात आणि हवेत तरंगायला लागतात. या कणांचे घर्षण झाल्याने त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज डीफरन्स तयार होतो आणि आपल्याला वीज कडाडताना दिसते.आकाशात लख्ख चमकणाऱ्या वीजेचे मोजमाप करता येत नाही. मात्र, ही वीज लाखो मेगावॅटची असते. आकाशात आधी वीजेचा लखलखाट दिसतो आणि त्यानंतर आवाज ऐकू येतो. याचे कारण म्हणजे, प्रकाशाचा वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असतो.

वीज कोसळताना ‘असा’ करा स्वतःचा बचाव

1) सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोरदार पाऊस आला किंवा ढगांचा गडगडाट सुरु झाला की, त्या ठिकाणी हमखास वीज कडाडणार हे लक्षात घ्या. घरातून बाहेर पडायचे असेल तर आधी हवामान विभागाचा अंदाज पाहा. (Monsoon Tips) घराबाहेर डोकावून आकाशात काळे ढग किंवा विजा कडकडताना दिसत असतील तर घराबाहेर पडणे टाळा.

2) जर तुम्ही घराबाहेर असाल आणि आकाशात वीज कडाडण्याची चिन्ह दिसू लागली तर त्वरित एखाद्या इमारतीत शिरा किंवा थेट घर गाठा. मात्र, कोणत्याही झाडाखाली वा गुरांच्या गोठ्यात थांबू नका. अशा ठिकाणी वीज आकर्षित होण्याची शक्यता असते.

3) तसेच जर आभाळात वीज कडाडू लागली तर सगळ्यात आधी वीजेच्या उपकरणांपासून लांब राहा. (Monsoon Tips) शिवाय नळाचे कुठलेही काम करू नका आणि दारं- खिडक्यांपासून अंतर ठेवा.

4) वीज चमकताना दिसली तर लोखंड किंवा पितळच्या वस्तूंपासून लगेच लांब व्हा. (Monsoon Tips) कारण, लोखंडाकडे वीज आकर्षित होते.

5) वीज चमकताना पाण्यातही जाऊ नका. जर तुम्ही पोहत असाल तर ताबडतोब पाण्याबाहेर या. शिवाय इलेक्ट्रीक तारा, उपकरणांपासून लांब राहा. सगळ्यात आधी अंग कोरडे करा.

6)बाहेर वीज चमकत असेल आणि विजेचा गडगडाट होत असेल तर सगळ्यात आधी घरातील विद्युत उपकरणे बंद करा. जसे की, टी.व्ही., एसी, फ्रिज. तसेच या उपकरणांचे प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा. (Monsoon Tips)

Mumbai News : बेस्टचा प्रवास महागणार ; काय असेल नवा दर ?

Mumbai News : 24 तास धावपळीत असणाऱ्या मुंबईकरांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी लोकल बरोबरच ‘बेस्ट’चा पर्याय हा उत्तम आहे. आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी हजारो प्रवासी दररोज ‘बेस्ट’ चा वापर करतात. मात्र आगामी काळामध्ये बेस्टच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण बेस्टच्या भाडे दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बस सेवा पुरवणाऱ्या बेस्ट (Mumbai News) कडून तिकीट दरात वाढ केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

काय आहे कारण ? (Mumbai News)

मुंबई महानगरपालिकेकडून बेस्ट साठी अर्थसहाय्य देण्यास नकार मिळाल्यामुळे बेस्टच्या भाडे दरात वाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहे. आर्थिक तूट भरून काढण्यासाठी केवळ तिकीट दरात वाढ करणे पर्याय असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे. ही दरवाढ किती असेल तर सध्याच्या किमान पाच रुपये भाड्यामध्ये येत्या काळामध्ये किमान दोन रुपये वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान 2019 मध्ये बेस्ट ने पाच किलोमीटरच्या अंतरासाठी किमान भाडे सात रुपये वरून पाच रुपयांवर आणले होते तर एसी बसेस साठी किमान दर सहा रुपये ते दहा रुपये ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना तर मोठा दिलासा मिळाला मात्र बेस्ट (Mumbai News) ला तोटा सहन करावा लागला. बेस्टला होणाऱ्या नुकसानातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा महिन्यांच्या तत्वावर सहाशे कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र पालिकेने बेस्ट ला आर्थिक हातभार लावण्यापासून माघार घेतल्यामुळे बेस्टच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच येत्या काळात बेस्ट (Mumbai News) कडून भाडेवाढचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची वातावरण निर्मिती होत आहे. त्या धरतीवर हे दर वाढ लांबण्याची चिन्ह आहेत. मात्र ही दरवाढ अटळ असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बेस्टच्या (Mumbai News) प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे.

एलआयसी की पोस्ट ऑफिसच्या स्कीम सर्वात बेस्ट? वाचा कशात गुंतवणूक केल्यावर होईल फायदा

LIC AND POST OFFICE SCHEME

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या काळामध्ये गुंतवणुकीचा सर्वात चांगला पर्याय म्हणून LIC आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांकडे पाहिले जात आहे. कारण की सुरक्षित गुंतवणूक आणि उत्कृष्ट परतावा देणाऱ्या स्कीममध्ये एलआयसी आणि पोस्ट ऑफिस केंद्रस्थानी आहे. परंतु, अनेकवेळा या दोन्ही पर्यायांमधील नेमका कोणता पर्याय निवडावा?? यामध्ये गुंतवणूकदारांचा गोंधळ उडताना दिसतो. तसेच कोणत्या पर्यायात सुरक्षितेची हमी दिली जाते? हा प्रश्न देखील सतत विचारला जातो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला या दोन्ही पर्यायांमधील फरक सांगणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या स्कीमचे फायदे (Post Office Scheme)

पोस्ट ऑफिसकडून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे विविध 9 पर्याय दिले जातात. ज्यात तुम्ही वार्षिक 8 टक्के व्याज मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये बचत खाते, टाइम डिपॉझिट खाते ते SCSS, PPF, KVP, NSC, MIS आणि सुकन्या समृद्धी खाते (SSY) उघडता येते. या खात्यांमध्ये तुम्हाला 8 टक्क्यांपर्यंत उत्तम परतावा दिला जातो. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांची स्वतः सरकार हमी घेते. सध्याच्या घडीला पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना लोकप्रिय ठरत आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा समावेश आहे.

एलआयसीच्या स्कीमचे फायदे (LIC Scheme)

सध्याच्या घडीला गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून एलआयसीकडे देखील पाहिले जात आहे. एलआयसी चांगल्या परताव्यासह सुरक्षतेची हमी देखील देते. LIC मध्ये मनीबॅक, गॅरंटीड बोनस आणि डेथ बेनिफिट्स सारखे अनेक फायदे देखील मिळतात. इतर बचत पर्यायांच्या तुलनेत एलआयसी जोखीममुक्त आहे. तुम्हाला जर कमी कालावधीत अधिक नफा हवा असेल तर एलआयसी तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. सध्या नवीन जीवन आनंद, जीवन उमंग, एलआयसी जीवन अमर, टेक टर्म प्लॅन या स्कीम सर्वात लोकप्रिय आहेत.