Monday, December 22, 2025
Home Blog Page 659

या झाडापासून बनतात माचिसच्या काड्या, खुर्च्या, टेबल; लागवड केल्यास व्हाल मालामाल

Malabar Neem Tree cultivation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या काळात पैसा कमवण्याचा मार्ग म्हणून लोक नोकरीऐवजी बिजनेस हा पर्याय निवडताना दिसत आहेत. खास म्हणजे कमी काळामध्ये जास्त पैसा कसा कमवता येईल, यावर सर्वाधिक जोर दिला जात आहे. यामुळे आम्ही तुम्हाला अशी 1 बिजनेसची आयडिया देणार आहोत, ज्यात तुम्ही फक्त 5 वर्षांमध्ये श्रीमंत बनाल. या बिझनेसमध्ये तुम्हाला फक्त एका झाडाची लागवड करायची आहे आणि त्या लाकडाला बाजारात जाऊन विकायचे आहे. ज्यामुळे तुम्हाला बक्कळ नफा मिळेल.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मलबार कडुनिंब झाडाची (Malabar Neem Tree) लागवड करणे अत्यंत फायदेशीर ठरत आहे. कारण की, मलबार कडुलिंबाचे लाकूड बाजारात चांगल्या किमतीमध्ये विकले जात आहेत. या झाडाच्या लाकडापासूनच माचिसच्या काड्या, खुर्च्या, टेबल, सोफा आणि इतर गोष्टी बनवल्या जातात. या झाडाची लागवड करून शेतकरी आज लाखो रुपये कमवत आहेत. परंतु हे झाड सामान्य कडुलिंबापेक्षा थोडे वेगळे आहे. याची लागवड देखील व्यवस्थित करावी लागते.

झाडाची लागवड

मलबार कडुलिंबाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीवर करता येते. यासाठी जास्त पाणी लागत नाही. मार्च आणि एप्रिल महिन्यात त्याची बियाणे पेरणे चांगले मानले जाते. तुम्ही मलबार कडुनिंबाची 4 एकरात 5000 झाडे लावू शकता. या झाडाची याची रोपे लावल्याबरोबर 2 वर्षांत ती 40 फूट उंच वाढतात. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमधील शेतकरी याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. महत्वाचे म्हणजे, या झाडाचे लाकूड 5 वर्षांनंतर प्लायवूड बनवण्यासाठी आणि 8 वर्षांनंतर ते फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते.

नफा किती मिळेल??

लक्षात घ्या की, मलबार कडुलिंबाचे लाकूड 8 वर्षांनंतर विकता येते. तुम्ही 4 एकरात लागवड करून 50 लाख रुपये सहज कमवू शकता. याच्या एका झाडाचे वजन दीड ते दोन टन असते. ते बाजारात किमान 500 रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जाते. म्हणजेच एक रोप 6000-7000 रुपयांना विकले तरी शेतकऱ्यांना लाखो रुपये सहज मिळू शकतात. थोडक्यात, हे झाड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Indian Railway Jobs 2024 | रेल्वे विभागात तब्बल 18799 पदांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज

Indian Railway Jobs 2024 

Indian Railway Jobs 2024  | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी मिळण्याची संधी आहे. या भरतीची आधीसूचना देखील प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात वेळ न दवडता लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. ही भरती असिस्टंट लोको पायलट या पदासाठी होणार आहे. रेल्वे भरती (Indian Railway Jobs 2024 ) बोर्डाने ही भरती काढलेली आहे. नवीन जाहिरातीत रिक्त पदांची संख्या देखील वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ही एक प्रकारची मेगा भरतीच असणार आहे.

या भरती अंतर्गत तब्बल 18 हजार 799 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघालेली आहे. याआधी केवळ 5696 रिक्त जागा होत्या. परंतु या रिक्त जागांची संख्या आता वाढवली आहे या भरतीची अधिसूचना देखील जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही चंदीगड आरआरबीच्या (Indian Railway Jobs 2024 ) अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती पाहू शकता.

त्याचप्रमाणे या भरतीसाठी ज्या लोकांनी आधीच अर्ज केलेले आहेत. त्यांना अर्ज करण्याची गरज नसल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. या भरतीचा अर्ज केल्यानंतर उमेदवारांना RRB ने दिलेल्या पाच टप्प्यातील परीक्षांसाठी हजर राहावे लागणार आहे. या भरतीसाठीचे हे टप्पे पार केल्यानंतर त्यांची निवड होणार आहे.

या भरतीच्या पहिल्या प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात सीबीटी म्हणजे संगणक सर्वोत्तम चाचणी असेल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सीबीटी असेल. तिसऱ्या टप्प्यात सीबीएटी म्हणजे संगणक आधारित अभियोग्यता चाचणी होईल आणि चौथ्या टप्प्यात कागदपत्रांची पडताळणी होईल. आणि शेवटच्या टप्प्यात वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतरच उमेदवाराची निवड केली जाईल. याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील पाहू शकता. अधिकृत वेबसाईटची लिंक खाली देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माहिती पाहू शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

बॉलीवूडचा भाईजान महाबळेश्वरमध्ये वाधवानच्या बंगल्यात वास्तव्यास

salman khan in Wadhawan's bungalow

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यात बुधवारी रात्री सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) ताफ्यासह पाहुणा म्हणून दाखल झाला आहे. विशेष म्हणजे सलमान ज्या बंगल्यात थांबला आहे तो देशातील मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी येस बँक घोटाळ्याचे डीएचएफएल उद्योग समूहाचे उद्योगपती कपिल वाधवान व धीरज वाधवान बंधूंचा आहे. या घटनेमुळे चर्चाना उधाण आलं आहे. महाबळेश्वरमध्ये राहण्यासाठी सलमाननं हाच बंगला का निवडला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

देशभरातील पर्यटकांसह दिग्गज राजकीय नेत्यांपासून कलाकारांना भुरळ घालणाऱ्या या निसर्गरम्य महाबळेश्वर नगरीमध्ये उद्योगपती वाधवान यांचा दिवाण व्हिला हा आलिशान बंगला गेली अनेक वर्षे आहे. हा ‘दिवाण व्हिला’ बंगला कोरोना काळात वाधवान बंधूंचे शेवटचे एकत्रित वास्तव्य ठरले महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेपासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर वाधवान कुटुंबीयांच्या मालकीचा ‘दिवाण व्हिला’ हा आलिशान बंगला आहे.सध्या महाबळेश्वर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून, धुक्याचे प्रमाण देखील जास्त आहे. अशा वेळी सुपरस्टार सलमान खान शूटिंगसाठी वाधवान यांच्या बंगल्यात फौजफाट्यासह पाहुणचार घेत आहे. दरम्यान, वाधवान यांच्या बंगल्यात सलमान खान थांबला कसा? सलमान खान व वाधवान यांचे काय संबंध?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सलमान खान अजून किती दिवस त्या बंगल्यात किंवा महाबळेश्वरला आहे याची देखील माहिती मिळालेली नाही

वाधवनचा नेमका वाद काय?

डीएचएफएल प्रकरणात वाधवान बंधू वादाच्या भोवऱ्यात अडकले. 17 बँकांचे 34 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप या दोन्ही भावंडांवर करण्यात आला आहे. त्यानंतर वाधवान बंधूंना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये या भावंडांचा मुंबई ते महाबळेश्वर प्रवास वादात आला होता.

Netflix : मनोरंजनासोबत पेटपूजाही ! Netflix ने लॉन्च केला पॉपकॉर्न ब्रँड ; किती आहे किंमत ?

netflix

Netflix : नेटफ्लिक्सच्या व्हर्च्युअल जगात तुम्ही अनेकदा डुबकी घेतली असेल. नेटफ्लिक्स वरच्या सिरीज आणि चित्रपटांनी तुमचे भरपूर मनोरंजन केले असेलच मात्र आता नेटिक्सफिक्सने रीअल लाईफ मध्ये एंट्री घेतली आहे. नेटफ्लिक्सने आता स्वात:चा पोकॉर्न ब्रँड तयार केला असून लवकरच बाजारात “रेडी टू इट” पॉपकॉर्न पाहायला मिळतील. हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्यासाठी नेटफ्लिक्सने (Netflix) पॉपकॉर्न कंपनी पॉपकॉर्न इंडियन सोबत “नाऊ पॉपिंग” साठी हात मिळवणी केली आहे. यांतर्गत नेटफ्लिक्स ब्रँडेड पॉपकॉर्न ची नवीन रेडी टू इट लाईन ऑफर करणार आहे.

आता तुम्ही म्हणाल नेटफ्लिक्सचे (Netflix) हे पॉपकॉर्न आपल्याकडे केव्हा मिळतील ? किंवा आपल्याला केव्हा खाता येईल? पण महत्त्वाची बाब अशी की हे पॉपकॉर्न सध्या अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअर्स मध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत. म्हणजेच आपल्याकडे हे पॉपकॉर्न सध्या उपलब्ध नाहीत. नेटफ्लिक्सच्या 226 ग्रॅम पेक्षा जास्त पॅकेट ची किंमत 4.49 डॉलर म्हणजेच 375 रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. आता यामध्ये कुठले फ्लेवर आहेत ? तर नेटफ्लिक्सने (Netflix) पॉपकॉर्न सध्या कर्ड क्लासिक शेडर केडल कॉर्न आणि स्नूनवार्थीं सिनेमन कॅटल कॉर्न या दोन फ्लेवर मध्ये उपलब्ध केले आहेत.

यापूर्वी 2020 मध्ये नेटफ्लिक्सने (Netflix) बेन अँड जेरीजशी करार केला होता ज्यामध्ये नेटफ्लिक्स आणि चिल्ड फ्लेवर्स सादर केले होते. हे फ्लेवर्सही स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.

नेटफ्लेक्स च्या म्हणण्यानुसार नेटवर्कला यामधून भरपूर पैसे कमवायचे असा उद्देश नाही. मात्र हजारो स्टोअर मध्ये त्यांचा हा ब्रँड किरकोळ विक्रेत्यांमध्ये सुद्धा दिसावा अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणजेच लोक नेटफ्लिक्सवर (Netflix) सिरीज आणि चित्रपट पाहण्याचा आनंद घेताना नेटफ्लिक्सचे पॉपकॉर्नही एंजॉय करू शकतील. याबाबत बोलताना सांगितलं की नेटफ्लिक्स आणि पॉपकॉर्न इंडियाना नऊ पॉपिंग मध्ये पदार्पण करण्यासाठी एकत्र आलेत. नवीन पॉपकॉर्न लाईन आता स्नॅक्स साठी उपलब्ध असेल.

Swiss Bank : स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींना गळती; कुठे गेला एव्हढा पैसा?

Swiss Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Swiss Bank) स्विस बँकांमधील भारतीय नागरिक आणि कंपन्यांच्या ठेवींमध्ये मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. भारतीयांनी स्विस बँकांमध्ये केलेल्या ठेवींना गळती लागली असून एकूण जमा रक्कम ही ४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरल्याचे समजत आहे. याचा संबंध ब्लॅक मनीसोबत जोडला जातोय. काही तज्ञांनी म्हटल्यानुसार, काळा पैसा कमी झाल्यामुळे ही घसरण पहायला मिळते आहे. रोखे, सिक्युरिटीज आणि इतर विविध आर्थिक साधनांद्वारे ठेवलेल्या निधीमधील तीव्र घटदेखील यामागील एक मुख्य कारण असू शकते. याविषयी अधिक सविस्तर माहिती घेऊया.

भारतीयांचा स्विस बँकेतील पैसा झाला कमी (Swiss Bank)

गतवर्षी २०२३ सालामध्ये या फंदात एकूण ७०% घट झाल्याचे समोर आले होते. त्यानुसार, जमा निधी हा १.०४ अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे ९,७७१ कोटी रुपये इतका राहिल्याचे समजते. ही रक्कम गेल्या ४ वर्षातील सर्वात कमी असल्याचे, सेंट्रल बँक ऑफ स्वित्झर्लंडचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या बँकांमधील भारतीय ग्राहकांच्या ठेवींमध्ये सलग दुसऱ्या वर्षी ही घट नोंदवण्यात आली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, आता भारतीय या बँकांमध्ये पैसे जमा करत नाहीत. तर, इतरत्र गुंतवणूक करत आहेत.

ठेवींमध्ये घट होण्याचे कारण

समोर आलेल्या आकडेवारीनुसार समजते की, भारतीय किंवा अनिवासी भारतीयांनी स्विस बँकांमध्ये गुंतवणूक करणे पूर्ण बंद केले आहे. (Swiss Bank) शिवाय आता या बँकांमध्ये संस्थांमार्फत गुंतवलेल्या पैशांचादेखील समावेश नाही. त्यामुळे स्विस बँकेत भारतीयांचा पैसा हा आत्ताच्या घडीला केवळ १०३.९८ कोटी स्विस फ्रँक इतका शिल्ल्क आहे. यातील बँक खात्यांमध्ये जमा झालेली एकूण रोकड ही ३१ कोटी स्विस फ्रँक एवढी आहे. ही रक्कम २०२२ वर्षाच्या शेवटी ३९४ दशलक्ष स्विस फ्रँक इतकी होती.

याशिवाय स्विस बँकेत भारतीयांनी इतर बँकांच्या माध्यमातून जमा केलेले ४२७ दशलक्ष स्विस फ्रँक वर्षभरापूर्वी १११ कोटी स्विस फ्रँक इतके होते. मात्र, आता भारतीयांनी ट्रस्टच्या माध्यमातून या बँकांमध्ये जमा केलेली एकूण रक्कम फक्त १ कोटी स्विस फ्रँक इतकी राहिली आहे. जी वर्षभरापूर्वी २४ दशलक्ष स्विस फ्रँक इतकी होती. (Swiss Bank) तसेच भारतीय नागरिकांनी रोखे आणि इतर माध्यमातून एकूण ३०२ दशलक्ष स्विस फ्रँक इतकी गुंतवणूक केली होती. जी २०२१ नंतर लक्षणीयरीत्या कमी होताना दिसल्याचे, बँकेने म्हटले आहे.

Airtel ग्राहकांसाठी खुशखबर!! आता फक्त 9 रूपयात मिळणार अनलिमिटेड डेटा; पहा ऑफर

Airtel plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एअरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. खास म्हणजे, या प्लॅनची किंमत फक्त 9 रुपये आहे. परंतु या 9 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनसह कंपनीकडून मोफत अमर्यादित कॉलिंग किंवा एसएमएसचा लाभ दिला जाणार नाही. त्याऐवजी अनलिमिटेड हाय स्पीड डेटा दिला जात आहे. त्यामुळेच सध्या ग्राहकांना हा प्लॅन चांगला परवडत आहे.

ऑफर काय आहे??

एअरटेलने आपल्या अधिकृत साइटवर रिचार्जसाठी लिस्ट जाहीर केली आहे. ज्यात हा 9 रुपयाचा रिचार्ज प्लॅन दाखवण्यात आला. एअरटेलकडून हा 9 रुपयांचा प्लॅन 10 GB च्या FUP मर्यादेसह लॉन्च करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, या प्लॅनमध्ये तुम्हाला 10 GB पर्यंत चांगल्या हाय-स्पीड डेटाचा लाभ घेता येईल. परंतु ठराविक मर्यादा पूर्ण झाल्यानंतर वेग 64kbps पर्यंत कमी होईल. तोपर्यंत तुम्ही या प्लॅनचा कोणत्याही अडथळ्याशिवाय लाभ घेऊ शकता.

प्लॅनची वैधता

9 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनसह एअरटेल ग्राहकांना फक्त 1 तासाची वैधता दिली जात आहे. म्हणजेच ग्राहक या प्लॅनमध्ये 60 मिनिटांसाठी अमर्यादित डेटा वापरू शकतात. लक्षात घ्या की, या 9 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला मोफत अमर्यादित कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा देत नाहीये. त्यामुळे या प्लॅनमध्ये फक्त डेटाचा वापर करता येऊ शकतो. ज्यात तुम्ही आवडता मूव्ही, सिरीयल व इतर मनोरंजनाच्या गोष्टी पाहू शकता.

Vegetable Farming | पावसाळ्यात ‘या’ भाज्यांची करा लागवड; 4 महिन्यातच व्हाल मालामाल

Vegetable Farming

Vegetable Farming | देशातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि खरीप हंगामाला देखील सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात देखील करत आहेत. या हंगामात अशा काही भाज्या आहेत. त्या खूप वेगाने वाढतात आणि त्यांना मागणी देखील खूप गरजेचे असते. या भाज्या करण्यासाठी सिंचनाची गरज नसते. त्यामुळे आता आपण अशा पिकांबद्दल (Vegetable Farming) जाणून घेऊया. ज्या कमी वेळेत येतात आणि चांगला नफा देखील देतात.

या हंगामामध्ये (Vegetable Farming) तुम्ही शेतकरी मिरची किंवा कोथिंबिरीची लागवड करू शकता. पावसाळ्याची दोन्ही पिके खूप चांगली वाढतात. तसेच त्यांची देखभाल करण्याची देखील आवश्यकता नसते. ज्या ठिकाणी वालुकामय माती आणि लाल माती असते. तिथे तुम्ही याची लागवड करू शकता. त्याचप्रमाणे पावसाळ्यात काकडी आणि मुळ्याची लागवड करून देखील शेतकरी खूप चांगला नफा मिळू शकतात. या दोन्ही पिकांसाठी जास्ती जागा लागत नाही. तीन ते चार आठवड्यात ही पिके तयार होतात. आणि शेतकऱ्यांना त्याचा नफा मिळतो.

त्याचप्रमाणे या हंगामात तुम्ही वांगी आणि टोमॅटोची लागवड देखील करू शकता. पावसाळ्यात देखील वांगी आणि टोमॅटोची खूप चांगली चांगले उत्पन्न होते. त्याशिवाय सोयाबीनच्या लागवडीसाठी देखील जुलै आणि ऑगस्ट चे महिने उत्पन्न खूप चांगले आहेत. तसेच पालक आणि कडबा या भाज्या देखील पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे येतात. तुम्ही कमी खर्चामध्ये या भागावर ज्यांची लागवड करू शकता. या भाज्यांसाठी चिकन मातीची आवश्यकता असते.

या गोष्टींकडे लक्ष द्या | Vegetable Farming

  • तुमच्या पिकासाठी योग्य बियाणे निवडा.
  • शेती करण्यापूर्वी मातीचे परीक्षण करा.
  • तन आणि सिंचनाची काळजी घ्या.
  • पिकांचा विमा काढा.
  • पिकाची वेळोवेळी कापणी करा.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारकीला ‘हे’ शिलेदार लढत देतील

sharad pawar vidhansabha candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला तुतारी दणक्यात वाजली.. तुतारीचा स्ट्राईक रेटही ८० टक्के राहीला.. १० पैकी तब्बल ८ खासदार निवडून आणत शरद पवारांनी दाखवून दिलं आपल्यालाच तेल लावलेला पैलवान का म्हणतात ते… पक्ष गेला, चिन्हाृ गेलं, निष्ठावान गेले … पण नव्या चिन्ह आणि जिद्दीसह पवारांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा नव्यानं सारं काही उभं केलं… लोकसभेला ताकद दाखवून दिल्यानंतर आता वेळ आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याची… शरद पवारांनी त्यासाठी विधानसभेच्या तयारीलाही जोर आणलाय… विधानसभेला अवघे काही महिनेच शिल्लक असताना.. जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नसताना शरद पवार गटाच्या १६ मतदारसंघातील उमेदवार कन्फर्म समजले जातायत.. हे सोळा मतदारसंघ आणि तिथून पवारांची तुतारी फुंकणारे ते १६ शिलेदार कोण असतील? त्याचाच हा रिपोर्ट…

यातला पहिला मतदारसंघ येतो तो तासगाव कवठे महाकाळचा… आर. आर. आबा यांच्या पत्नी सुमनताई पाटील इथल्या विद्यमान आमदार.. २०१९ ला त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी… शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या या पाटील घराण्ययाकडून सध्या रोहित पाटील यांना उमेदवारी मिळण्याचे फुल चान्सेस आहेत… नगरपंचायतीतील विजयापासूनच रोहित पाटील य़ांचं नेतृत्व मतदारसंघात प्रस्थापीत झालं.. आमदारकीसाठी त्यांची तयारीही झा्लेली असून ते कवठे महांकाळ मधून ते आरामात तुतारी वाजवतील असं बोललं जातंय..दुसरा मतदारसंघ आहे नगर श्रीगोंदा… भाजपचे बबनराव पाचपुते हे इथले सध्याचे आमदार.. प्रस्थापीत असणाऱ्या पाचपुतेंना इथून राष्ट्रवादीचे राहुल जगताप फाईट देत असतात.. २०१४ ला जगताप, २०१९ ला पाचपुते अशी आलटून पालटून नगर श्रीगोंदाच्या जनतेनं आमदार बदलल्याने यंदा तुतारीच्या चिन्हावर राहुल जगताप आमदार होतील असा अंदाज आहे. पण पाचपुते इथून यंदाही तगडं आव्हान उभं करतील यात शंका नाही..

तिसरा मतदारसंघ आहे पाथर्डी शेवगाव…… शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या मतदारसंघातून लढत देतील प्रतापकाका ढाकणे. खरं म्हणजे भाजपच्या मोनिका राजळे मोदीलाटेत २०१४ ला निवडून आल्या ते त्यांनी परत माघारी वळून कधीच बघीतलं नाही.. पण यंदा निष्ठावान प्रतापकाका ढाकणे यांच्या पाठिशी शरद पवारांनी ताकद लावली तर जातीय समीकरणं, सहानुभुतीची लाट हे फॅक्टर महत्वाचे ठरुन ढाकणे पार्थडीतून तुतारी वाजवतील हे नक्की..चौथा मतदारंसघ येतो तो बारामतीचा…राष्ट्रवादीची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात अजितदादांचा शब्द अंतिम चालतो. पण पक्षफुटीनंतर आता शरद पवार इथून युगेंद्र पवार यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी करतायत… त्यात अजितदादांच्याच मतदारसंघात तुतारीला ४५ हजारांचं लीड मिळाल्यानं युगेेंद्र पवारांच्या आमदारकीच्या महत्वकांक्षा चांगल्याच वाढल्यात.. त्यामुळे समोर बिग बॉस दादा असताना युगेंद्र पवार इथून तुतारी वाजवतील का, हे पाहणं इंटरेस्टींग असणारय..

पाचवा मतदारसंघ आहे नगर – राहुरी… 2019 च्या विधानसभेला भाजपच्या शिवाजीराव कर्डीलेंसारख्या मातब्बर नेत्याला आसमान दाखवत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे जायंट किलर ठरेल… त्यात राष्ट्रवादीतील फुटीत ते शरद पवारांशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांनी लोकसभेलाही लंकेंना विजयातील महत्वाचा हात दिला. त्यामुळे तनपुरेच इथून तुतारी वाजवतील, असं सध्या मतदारसंघातलं जनमत आहे..सहावा मतदारसंघ येतो तो पारनेरचा… पहिल्याच टर्ममध्ये आमदार आणि खासदार झालेले निलेश लंके यांचा हा विधानसभा मतदारसंघ.. दादांचा विश्वासू माणूस म्हणून ओळख असणारे लंके साहेबांसोबत आले आणि खासदार झाले.. त्यामुळे आता मोकळ्या झालेल्या या जागेतून तुतारीकडून पारनेरचा उमेदवार कोण? हा मोठा प्रश्न शरद पवारांसमोर असणारय.. पण त्याला एक उत्तर असू शकतं ते म्हणजे राणी लंके यांचं… राणी लंके लोक प्रतिनीधी बनण्यासाठी इच्छुक आहेत… आणि दुसरीकडे पक्षाकडे पारनेरमधून म्हणावा असा आमदारकीसाठी चेहरा नसल्याने राणी लंकेच इथून तुतारी फुंकतील…

सातवा मतदारसंघ आहे कर्जत जामखेडचा..रोहित पवार इथले विद्यमान आमदार.. कॅबिनेट मंत्री राहिलेल्या आणि शरद पवारांच्या अत्यांत जवळच्या समजल्या जाणाऱ्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहितदादा आमदार झाले.. त्यानंतर त्यांनी संघर्ष यात्रा, एमआयडीसीचा प्रश्न आणि विविध सामाजिक प्रश्वांवरुन विधीमडळ गाजवलं.. त्यामुळे रोहित पवार हे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असतील हे तर कन्फर्म आहेच.. पण त्यांना राम शिंदे यंदा कसं आव्हान देतील, हे पहावं लागेल…आठवा मतदारसंघ येतो तो शिरुरचा..शिरुरच्या पट्ट्यातून सगळे अजितदादांच्या पाठिशी गेले उरले फक्त निष्ठावान शिरुरचे आमदार अशोक पवार.. त्यामुळे यंदाही तेच राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात दिसतील, यात शंका नाही.. भाजपच्या बाबुराव पाचुर्णेंविरोधात ते परंपरागत लढत देतील.. शिरुरुनं खासदारकीला तुतारीला कौल दिला आहेच, आता आमदारकीला काय होईल, हे पाहणं महत्वाचं ठरेल..

नववा मतदारसंघ येतो काटोळचा.. महाविकास आघाडीत सर्वाधिक जास्त चर्चेत राहिलेले अनिल देशमुख याच काटोळचं विधीमंडळात प्रतिनीधीत्व करतात… राष्ट्रवादीची दिग्गज आणि प्रस्थापित नेत्यांची फळी अजितदादांसोबत गेलेली असताना काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नाव साहेबांसोबत थांबली.. त्यापैकीच एक अनिल देशमुख.. काटोळ हा देशमुखांचा बालेकिल्ला असल्याने ते इथून तुतारी आरामात वाजवतील, असा सध्या ट्रेंड दिसतोय..दहावा मतदारसंघ आहे मुंब्रा … पवारांच्या राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्र वगळता मुंबईच्या ज्या कुठल्या पट्ट्यावर प्रभाव राहीला असेल तर तो मुंब्राच्या.. जितेंद्र आव्हाड इथले फायरब्रँड आमदार.. शरद पवारांच्या पाठीशी नेहमीच सावलीप्रमाणे उभे असणारे आव्हाड इथून सलग अनेक टर्म इथून निवडून जातायत.. मुस्लिम, दलित आणि अल्पसंख्यांक बहुल सामाजावर आव्हाडांची असणारी पकड पाहता मुंब्रा कळव्याला तुतारीचा आवाज ऐकायला मिळेलच, हे निश्चित…

अकरावा मतदारसंघ येतो तो इस्लामपुरचा…… राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा हा मतदारसंघ. त्यामुळे स्वाभाविकपणे यंदाही तेच इथून तुतारीचे उमेदवार असतील… तब्बल तीन दशकं ते आमदार असल्याने त्यांच्या जिंकण्या हारण्याची चर्चा आपण न केलेलीच बरी…बारावा मतदारसंघ आहे बीडचा…बजरंग बाप्पांच्या विजयासाठी बीडात ज्यांनी फिल्डींग लावली होती ते संदीप क्षीरसागर हे या मतदारसंघाचे पहिल्या टर्मचे आमदार.. आपल्याच काकाला म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांना मात देत संदीप हे विधीमंडळात गेले. पक्षातील आपली पोजिशनही स्ट्रोंग बनवली. यंदाच्या होऊ घातलेल्या विधानसभेला संदीप क्षीरसागर यांना तगडा विरोधकच नसल्याने त्यांचा विजय जवळजवळ निश्चित समजला जातोय…

तेरावा मतदारसंघ आहे घनसावंगीचा… पवार साहेबांसोबतच निष्ठा दाखवणाऱ्या काही मोजक्या वरिष्ठ नेत्यांपैकीच एक असणारे राजेश टोपे या मतदारसंघाचे प्रतिनीधीत्व करतात. शांत, सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यात कोरोनाच्या काळात आरोग्यमंत्रीपद मोठ्या धाडसानं पेलल्यामुळे त्यांची उभ्या महाराष्ट्रात चर्चा झाली होती.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला टोपे तुतारीच्या चिन्हावर विधीमंडळात येतील, यात शंका नाही….. चौदावा विधानसभा मतदारसंघ आहे विक्रमगड… सुनिल भुसारा हे इथले विद्यमान आमदार.. भाजपचा बालेकिल्ला भुसारा यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदाच ताब्यात घेतला.. त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांनाच विक्रमगडची उमेदवारी निश्चित आहे. फक्त भाजपने इथं ताकद लावली तर ही जागा अटीतटीची होऊ शकते…

पंधरावा मतदारसंघ आहे अकोले…अकोल्यातील विधानसभा ही अटीतटीची असते.. कारण जागा एक आणि उमेदवार फार अशी इथली परिस्थिती.. राष्ट्रवादीचे किरण लहामटे हे इथले विद्यमान आमदार.. हे सध्या अजितदादा गटासोबत असल्याने त्यांचे राजकीय पंख झाटण्यासाठी शरद पवार गटाकडून अमित भांगरे यांना उमेदवारी मिळण्याचे फुस चान्सेेस आहेत…आता बोलूयात शेवटच्या सोळाव्या नगर शहर मतदारसंघाबद्धल …. अजित पवार गटात गेलेले दोन टर्म निवडून आलेले संग्राम जगताप हे इथले विद्यमान आमदार… जगतापांना मात देण्यासाठी इथे अभिषेक कळमकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.. पण इथली लढत अटीतटीची होणार असून जिंकणारा घासून पण ठासून येईल एवढं मात्र निश्चित..तर हे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य १६ उमेदवार.. बाकी या १६ उमेदवारांपैकी कोण आमदार होईल आणि कुणासाठी घोडेमैदान लांब आहे? ते आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.

Infinix Note 40 5G मोबाईल 108MP कॅमेरासह लाँच; किंमत पहा

Infinix Note 40 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Infinix ने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Infinix Note 40 5G असं या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल मागील वर्षी लाँच झालेल्या Infinix Note 40 Pro 5G और Infinix Note Pro+ 4G चे पुढचं व्हर्जन आहे. यामध्ये 108MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि 8GB रॅमसह अनेक भन्नाट फीचर्स मिळत आहेत. मोबाईलला AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

6.78 इंच डिस्प्ले –

Infinix Note 40 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 1300 nits पीक ब्राइटनेस आणि PWM dimming 2160Hz मिळतो. याचा डोळ्यांवर कमीत कमी परिणाम होतो. कंपनीने मोबाईल मध्ये octa-core MediaTek Dimensity 7020 चिपसेट बसवली असून इनफिनिक्सचा हा नवा स्मार्टफोन एंड्रॉयड 14 वर आधारित आहे.

कॅमेरा – Infinix Note 40 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Infinix Note 40 5G मध्ये पाठीमागील बाजूला 108MP चा मुख्य कॅमेरा मिळतोय तर समोरील बाजूला विडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे. हि बॅटरी हे 33 वॅट फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत आणि ऑफर

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Infinix Note 40 5G हा स्मार्टफोन 8GB रॅम+ 256GB स्टोरेज मध्ये उपलब्ध असून त्याची किंमत 19,999 रुपये आहे. . हा स्मार्टफोन काळ्या आणि सोनेरी रंगात लाँच करण्यात आला असून प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर तो उपलब्ध आहे. मोबाईल खरेदीवर 2,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी!! या संस्थेत विविध पदांच्या 07 जागांसाठी होणार भरती

Job Requirment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. कारण की, पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्थेअंतर्गत विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. (Job Requirment) त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून संस्था अर्ज मागवून घेत आहे. तरी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांनी त्वरित मुख्य वेबसाईटला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी संपूर्ण बातमी वाचावी.

अर्जाची अंतिम तारीख

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरणार आहे. त्यामुळे पदाकरिता पात्र आणि इच्छूक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. हे अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जून 2024 आहे. जे उमेदवार या तारखेच्या पुढे अर्ज करणार नाहीत त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता

लक्षात घ्या की, या पदांसाठी शैक्षणिक पात्रता Bachelor’s or Master’s Degree, Ph.D. Degree असायला हवी. तसेच दहा वर्षांचा अनुभव ही असायला हवा. निवडलेल्या उमेदवारांना पुण्यातून नोकरी करावी लागेल. त्यासाठी 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील. त्यामुळे या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास www.coep.org.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. तसेच, भरतीसंदर्भात जाहिरात पहावे.