Monday, December 22, 2025
Home Blog Page 666

सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील 1900 रूग्णालयात प्रत्येकालाच मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार

State Government

हॅलो महाराष्ट्र | सरकार हे समाजातील प्रत्येक गटाचा विचार करून नवनवीन योजना आणत असतात. समाजातील गरीब आणि गरजू लोकांना आरोग्यसेवा चांगल्या मिळाव्यात आणि त्यांचे आरोग्य निरोगी राहावे. यासाठी सरकार वेगवेगळे प्रयत्न करत असतात यासाठी सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना आणली होती. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या धारकांना लाभ मिळत होता. परंतु आता सरकारने हा निर्णय बदलून समाजातील सगळ्या व्यक्तींना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच आता अंतोदय, पिवळे, केशरी रेशनकार्डसह शुभ्र रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत त्यांचा पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च दरवर्षी मोफत होणार आहे. या योजनेमध्ये आता तीन कोटी लाभार्थ्यांची वाढ झालेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे एकूण लाभार्थ्यांना 9 कोटी 62 लाख 7 हजार 743 एवढे लाभार्थी झालेले आहेत.

जनतेला घरपोच आरोग्य सेवा मिळाव्यात आणि त्यांचा आर्थिक भार कमी होण्यासाठी, सरकारने ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केलेली होती. गेल्या वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतील विमा संरक्षित रक्कम अडीच लाखांवरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नागरिकांना रेशन कार्ड अधिवास प्रमाणपत्र गरजेचे आहे. या योजनेमध्ये अनेक कर्करोग, हृदयरोग, शस्त्रक्रिया, सांधेदुखी आणि विविध आजारांचे निदान केले जाते. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आयुष्यमान गोल्डन कार्ड असणे गरजेचे आहे.

दरवर्षी करणार 3000 कोटी रुपयांचा खर्च

सरकारच्या या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आतापर्यंत दरवर्षी अडीच लाख रुपयांचा लाभ मिळत होता. परंतु आता सरकार विमा कंपनीला प्रतिकुटुंब 1300 रुपये प्रीमियम म्हणून देणार आहे. त्यासाठी सरकार दरवर्षी 3000 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

1900 रुग्णालयात मिळणार मोफत उपचार

राज्यातील 1900 रुग्णालयांमध्ये आता नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी रुग्णालयाच्या संलग्नित रुग्णालयात जावे लागेल. यासाठी आम्ही एक वेबसाईट देत आहोत. त्या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्या रुग्णालयांची नावे पाहू शकता.

भारतात ‘या’ ठिकाणी आहे भिंत नसलेला राजवाडा; फक्त सेल्फीसाठी परदेशातून येतात पर्यटक

Toran

आपल्या भारताला एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशात असणाऱ्या वास्तू त्याचप्रमाणे इतर अनेक असे ठिकाण आहेत. जे पाहिल्यावर आपल्याला ऐतिहासिक गोष्टी समजतात. काही वास्तू या खूपच छान आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. असाच जयपुरमध्ये एक अद्भुतपूर्व वाडा आहे. ज्याला भिंती नाही. हा वाडा फक्त दरवाजातच बांधला आहे. म्हणजेच या वाड्याला फक्त दरवाजा आहेत. हे ऐकून तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल पण हे अगदी खरे आहे.

त्याचप्रमाणे हा वाडा अजूनही अस्तित्वात आहे. हा महल जयपुरमध्ये आहे. जयपुरमधील जवाहर सर्कस जवळ बांधलेला हा वाडा आहे. त्याला तोरण असे म्हणतात. पर्यटकांचे हे अगदी आकर्षण स्थळ आहे. जयपुरमध्ये प्रवेश करताच पर्यटकांना हा तोरण दिसतो. पर्यटकांच्या स्वागतासाठी तो बांधण्यात आलेला आहे. जयपुर विमानतळावरून शहरात प्रवेश करतात या वाड्याची कमान दिसते.

हा तोरण पाहिल्यावर अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, ही वास्तू अशी का बांधली आहे. याची रचना ही एका पांढऱ्या महालासारखी दिसते. ही रचना राजस्थानी परंपरा दर्शवते. राजस्थानमध्ये जेव्हा वर आणि वधू लग्न करतात. तेव्हा त्यांच्या लग्नाची मिरवणूक घेऊन मुलीच्या घरी जातात. तेथे प्रथम तोरणला स्पर्श केला जातो. आणि नंतर पाहुणे घरात जाऊ शकतात. येथे सर्व पर्यटकांचे वरासारखे स्वागत केले जाते.

या तोरण महालाची सर्वत्र खूप चर्चा आहे. परंतु काही लोकांनी या ठिकाणी रिल्स देखील बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी चढून फोटो देखील काढलेले आहेत. परंतु येथे फोटो काढण्याास किंवा रिल्स काढण्यास पूर्णपणे मनाई आहे.

Flesh Eating Bacteria | जपानमध्ये Flesh Eating Bacteria चा कहर, उपचार न केल्यास 48 तासात होऊ शकतो मृत्यू

Flesh Eating Bacteria

Flesh Eating Bacteria | जगभरात कोविड-19 या विषाणू अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता. यामुळे अनेक लोकांना त्यांचा जीव देखील गमावा लागला होता. आता या विषाणूचा प्रभाव कमी झालेला आहे. अशातच आता एक नवीन जीवाणू उदयास झालेला आहे. ज्यामुळे मानवाला मोठा धोका आहे. हा बॅक्टेरिया धोकादायक मानला जातो. सध्या जपानमध्ये याचा फायदा मोठ्या प्रमाणात होत आहे. या जिवाणूचे नाव ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस असे आहे. या जिवाणूच्या संसर्गामुळे स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम नावाचा एक गंभीरजण होऊ शकतो. जो मानवासाठी घातक आहे.

हा बॅक्टेरिया जपानमध्ये मोठ्या प्रमाणात पसरू लागलेला आहे. हा आजारात अत्यंत धोकादायक आहे याच्यामुळे 48 तासात मृत्यू देखील होऊ शकतो. हाती आलेल्या माहितीनुसार 2 जूनपर्यंत जपानमध्ये या आजाराच्या रुग्णांची संख्या 977 वर पोहोचली आहे. गेल्यावर्षी ही संख्या 940 एवढी होती. या संसर्गाची वाढती प्रेस करणे आणि उच्च दर लक्षात घेतला, तर हा आजार खूप घातक ठरू शकतो. त्यामुळे आता या आजाराचा संसर्ग कशाप्रकारे टाळता येईल हे आपण जाणून घेऊया.

स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोमची लक्षणे | Flesh Eating Bacteria

या आजाराची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे मुलांमध्ये सूज येणे आणि घसा खवखवणे, ज्याला स्ट्रेप थ्रोट असेही म्हणतात. या व्यतिरिक्त, या रोगामुळे हात आणि पाय दुखणे, ताप, रक्तदाब कमी होणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नेक्रोसिस (ऊतकांचा मृत्यू), सूज, अवयव निकामी होणे आणि मृत्यू होऊ शकतो. हा रोग खूप वेगाने पसरतो. पायापासून गुडघ्यापर्यंत पसरण्यास काही तास लागतात आणि योग्य उपचार न केल्यास पुढील ४८ तासांत मृत्यू होऊ शकतो. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या आजाराचा धोका जास्त असतो. म्हणून, लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांशी संपर्क साधणे फार महत्वाचे आहे, कारण हा रोग व्यक्तीला जास्त वेळ देत नाही.

स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो?

स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. संरक्षणासाठी, बाहेरून आल्यानंतर हात पाय साबणाने किमान दोन मिनिटे धुवा. त्याचप्रमाणे शौचालयातून आल्यानंतर हात धुवा. खाण्यापूर्वी आणि अन्न तयार करण्यापूर्वी हात धुणे महत्वाचे आहे. आपल्या चेहऱ्याला घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नका, विशेषत: डोळे, नाक किंवा तोंड. त्वचेवर काही जखमा असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यावर उपचार करा आणि स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोमची लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय, तुम्ही आंतरराष्ट्रीय सहलीवर जात असाल तरीही, देखरेख आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्या.

Moto Edge 50 Ultra : 12GB RAM, 50MP कॅमेरासह Moto Edge 50 Ultra लाँच; किंमत पहा

Moto Edge 50 Ultra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाने भारतीय बाजारात नवा मोबाईल लाँच केला आहे. Moto Edge 50 Ultra असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 12GB RAM, 50MP कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. 59,999 रुपयांत हा मोबाईल ग्राहक खरेदी करू शकतील. 24 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून मोबाईलची विक्री सुरु होईल. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

6.7 इंचाचा डिस्प्ले

Motorola Edge 50 Ultra मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा सुपर 1.5K (1220p) poOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2500 nits पीक ब्राईटनेस आणि HDR 10+ सपोर्ट मिळतो. मोबाईलमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर बसवण्यात आला असून हा स्मार्टफोन एंड्राइड 14 OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोटोच्या या मोबाईल मध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळते.

कॅमेरा – Moto Edge 50 Ultra

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Motorola Edge 50 Ultra मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 64MP टेलिफोटो सेन्सर आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला AI सपोर्ट सह 50MP चा सेल्फी कॅमेरा मिळतोय. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 4500mAh भात्रेयी बसवण्यात आली असून हि बॅटरी 50W वायरलेस चार्जर आणि 10W वायरलेस चार्जरला सपोर्ट करते.

किंमत किती?

Moto Edge 50 Ultra ची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मोबाईल खरेदीवर कंपनीकडून 5 हजार रुपयांची प्रास्ताविक सूटही देण्यात आली आहे. ICICI, HDFC बँक कार्ड वापरकर्त्यांना आणखी 5 हजार रुपयांची सवलत मिळतेय. 24 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून या स्मार्टफोनची पहिली विक्री सुरु होईल.

राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर खासदारकीसाठी लढत होते; सदाभाऊ खोतांचा घणाघात

sadabhau raju shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजू शेट्टी (Raju Shetti) याना शेतकऱ्यांचं काही देणघेणं नव्हतं. ते शेतकऱ्यांसाठी नव्हे तर खासदारकीसाठी लढत होते असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राजू शेट्टी यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी राजू शेट्टी यांनी सतेज पाटील आणि जयंत पाटील यांना लिहून दिलं होतं की, मी तुमचा गुलाम राहणार आहे अशा शब्दात सदाभाऊंनी राजू शेट्टींवर तोंडसुख घेतलं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार सोहळा शिराळमध्ये आयोजीत केली होता, त्यावेळी आपल्या भाषणात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर घणाघात केला.

जो माणूस म्हणत होता की मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. मी कोणत्याही आघाडीत जाणार नाही. मी शेतकऱ्यांसाठी लढत असून मी शेतकऱ्यांचाच उमेदवार असणार आहे. पण त्याच माणसाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना लिहून दिलं होतं की, मी तुमचा गुलाम राहणार आहे. फक्त मला पाठिंबा द्या”,असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं.

सदाभाऊ पुढे म्हणाले, राजू शेट्टी शेतकऱ्यांना सांगायचे की त्यांच्याविरोधात लढायचं. हे ते उघड बोलले आहेत. त्यामुळे निश्चितपणे राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढत नव्हते, तर ते फक्त खासदारकीसाठी लढत होते. हे आता स्पष्ट झालं आहे”, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सदाभाऊ खोत यांच्या या टीकेला राजू शेट्टी नेमकं कोणत्या शब्दात प्रत्युत्तर देतात ते पाहायला हवं. मात्र आगामी काळात या दोन्ही शेतकरी नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीडच्या राजकारणात संदीप क्षीरसागर हे मुंडे कुटुंबाला जड गेलेच

Sandeep Kshirsagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांनी मला प्रश्न विचारला… सत्ता की साहेब? त्यांचा प्रश्न संपायच्या आत मी उत्तर दिलं साहेब… भर सभेत स्टेजवर हे स्टेटमेंट करणारा कुणी उत्साही कार्यकर्ता नाहीये… तर हे आहेत संदीपभैया… उर्फ संदीप क्षीरसागर… बीडच्या राजकारणात तसा दोनच घराण्यांचा दबदबा राहिला… एक म्हणजे क्षीरसागर घराणं तर दुसरं म्हणजे मुंडे घराणं… पण काळ पुढे सरकत गेला तशा जिल्ह्याच्या राजकारणाच्या चाव्या क्षीरसागर घराण्याकडून मुंडेंकडे गेल्या… आणि मुंडे कुटुंबानं कार्यकर्त्यांच्या, समाजाच्या पाठिंब्यावर असा काही जनाधार मिळवला की बीडमध्ये सब कुछ मुंडे असं सगळेजण बोलू लागले… त्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बहिण भाऊ एकत्र आल्याने त्यांच्या प्रस्थापित राजकारणाला आणखीनच बळकट हात मिळाले… लोकसभा निवडणूक आली… बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाली… अन् त्याच दिवशी त्यांचा विजय झाल्याप्रमाणे जिल्ह्यात जल्लोष झाला… पण या सगळ्यात एका चेहऱ्याचा सगळ्यांना विसर पडला होता… तो म्हणजे संदीप भैया…

राजकारण करायचं तर फांद्या तोडत बसायचं नाही, डायरेक्ट मुळावरच घाव घालायचा… अशी या संदीप क्षीरसागरांच्या राजकारणाची पद्धत… शरद पवार साहेबांना दैवत मानणाऱ्या या पहिल्याच टर्मच्या आमदाराने मनावर घेतलं… आणि पंकजा मुंडेंचा पराभव करत बजरंग बाप्पांसारख्या एका साध्या सुध्या नेत्याला निवडून आणण्यात हुकमी एक्क्याची भूमिका बजावली… नक्की हा संदीप भैय्या आहे कोण? आणि बीडच्या राजकारणात मुंडेंना टक्कर देण्याची हिम्मत त्याच्यात आली कुठून? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

4 जून ची सायंकाळ… कार्यकर्ते, प्रशासकीय मंडळी आणि स्वतः उमेदवार या सगळ्यांचीच धाकधूक वाढली होती… बीडची मतमोजणी काट्याला काटा लागावा तशी चालली होती… कधी पंकजा मुंडे पुढे जायच्या… तर कधी बजरंग बाप्पांना लीड मिळायची…पण शेवटी निकाल लागला आणि बजरंग बाप्पा जायंट किलर ठरत बीडचे खासदार झाले… पण मतमोजणीच्या वेळी काहीसा गोंधळ झाला… शहरात जामर बसवण्यात आले… हातापायी सुद्धा झाल्याची चर्चा झाली… मुंडेंच्या बाजूने धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते सोबत होते… पण दुसरीकडे बजरंग बाप्पांच्या पाठीशी एकच व्यक्ती उभा होता तो म्हणजे संदीप क्षीरसागर…

यंदाच्या लोकसभेला मुंडे कुटुंबाचा विजय जवळजवळ पक्का मानला जात होता… पंकजा मुंडेंच्या पाठीशी धनंजय मुंडेही सोबत आल्याने आता फक्त लीड मोजायचं, अशा चर्चा होऊ लागल्या… पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार होते बजरंग बाप्पा सोनवणे… अनेक टर्म निवडणूक लढवूनही मुंडे कुटुंबाकडून होणारा सातत्याने पराभव आणि त्यात पक्षफुटीनं राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद… यामुळे बीडची लोकसभा म्हणजे नुसती फॉरमॅलिटीच होतेय की काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता… पण एक्स्पिरियंटमध्ये जेव्हा सगळं काही संपत तेव्हा पाठीशी संदीप भैया उभा राहतो…अगदी त्याचप्रमाणे बजरंग बाप्पांच्या पाठीशी शरद पवारांना दैवत मानणारा राजकारणातला संदीप भैया उभा राहतो… बजरंग बाप्पांच्या प्रचाराची सगळी सूत्र संदीप क्षीरसागर हातात घेतात… सभा असोत, वा मतदार संघातील गाठीभेटी…सगळं काही नियोजन क्लिअर कट संदीप क्षीरसागरांच्या हातात असायचं…

मुंडेंसारख्या राजकारणातील प्रस्थापित चेहरे समोर असताना संदीप क्षीरसागरांनी आपणही काही ऐरेगैरे नसून निवडणूक लढवण्याची…आणि ती जिंकून दाखवण्याची…आपल्या धमक असल्याचा इशाराच मुंडेंना दिला होता…त्यामुळेच राष्ट्रवादीत सोबत असताना मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांनी लोकसभेच्या प्रचारात एकमेकांच्या विरोधात आग ओकली… मुंडे कुटुंबाच्या विरोधात बीडमधून कसलीही भीड न बाळगता बोलण्याची हिंमत दाखवली तीही संदीप क्षीरसागर यांनीच…

बजरंग बाप्पांच्या विजयात मराठा मतं निर्णायक ठरलीच…पण त्यासोबत निकालात सर्वात जास्त प्रभाव टाकला असेल तर तो स्थानिक समीकरणांनी… संदीप क्षीरसागर यांना मानणारा एक मोठा जनसमुदाय जिल्ह्यात आहे…त्यात मुस्लिम समाज आणि दलित समाजाची मतं बजरंग बाप्पांच्या पाठीशी कशी उभी राहतील? याचं फुल टू प्लॅनिंग संदीप क्षीरसागर यांनी केलं होतं…म्हणूनच वंचितचा उमेदवार मैदानात असूनही दलित समाजाची मतं मोठ्या प्रमाणात बजरंग बाप्पांच्या पाठीशी खेचून आणण्यात क्षीरसागरांना यश आलं… मुंडे विरुद्ध क्षीरसागर हा बीड मधला तसा जुना संघर्ष… पण सध्याच्या घडीला राजकारणात एकवटलेल्या मुंडे कुटुंबाला राजकारणात एकट्या पडलेल्या संदीप क्षीरसागरांनी आव्हान दिलं…आणि नुसतं आव्हानच नाही तर लोकसभेला चितपट करत ते पूर्णही करून दाखवलं…

खरंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील धनंजय मुंडेंसोबत अनेक मातब्बर नेत्यांनी अजितदादांची वाट धरली…मुंडे कुटुंबाची…आणि अजितदादांची धास्ती हे त्यामागचं कारण होतं, असं बोललं जातं… पण कुणालाही न घाबरता संदीप क्षीरसागर यांनी मात्र साहेबांसोबतची निष्ठा कायम ठेवली…कुणी कुठेही गेले तरी चालेल, पण मी आयुष्यभर साहेबांच्या सोबतच राहिल… असं खुलं वचन देऊन संदीप भैय्यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादा आणि धनंजय मुंडे यांना जिल्ह्यातून आव्हान दिलं…नुसतं आव्हान नाही तर खासदारकीला पाणी पाजून जिल्ह्याच्या राजकारणातली आपली ताकदही दाखवून दिलीये…

क्षीरसागर कुटुंबाच्या तीन पिढ्या राजकारणात आहेत. केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या. जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही त्यांची तीन मुलं…आईसह तिघाही भावांची कारकीर्द आधी काँग्रेसमध्ये गेली आणि नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर तिघेही राष्ट्रवादीत दाखल झाले. मात्र राष्ट्रवादीत असतानाच या तिन्ही भावांमध्ये विसंवाद सुरू झाला आणि त्याला कारण ठरलं सत्तेतील वाटा…

राष्ट्रवादी काँग्रेसमधलं संदीप क्षीरसागर यांचं वजन वाढल्याने जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले. पण त्यांचे सगळे विरोधक त्यांच्या विरुद्ध एकवटले आणि या सगळ्यांनी संदीपची पाठराखण केली…त्यात 2019 ला आपल्या काकाला चीतपट करत संदीप क्षीरसागर जायंट किलर ठरले… पुढे जयदत्त क्षीरसागरांची शिवसेनेतून हकालपट्टी केली…आणि ते राजकीय अज्ञातवासात गेले…पण संदीप क्षीरसागर यांनी आपल्या घराण्याच्या राजकारणाला जिल्ह्यात चांगलं मजबूत केलं…त्यात राष्ट्रवादीतील फुटीमुळे शरद पवार गटात असणारी नेतृत्वाची पोकळी भरून काढत लोकसभेला त्याचा ट्रेलरही दाखवून दिलाय… येणारी विधानसभा आणि पुढच्या सगळ्याच निवडणुकांना हा संदीप भैय्या मुंडे कुटुंबाला चांगला जड जाणार, ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे… लोकसभा तर आटोपली… आता विधानसभेला जिल्ह्याच्या राजकारणात हा संदीपभैया किती आणि कसा धुडगूस घालतोय…हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…बाकी बीड जिल्ह्याच्या राजकारणात नेमकी ताकद कुणाची जास्त आहे? क्षीरसागर की मुंडे कुटुंबाची? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या!! डोक्यात लोखंडी पाना घालून जीव घेतला (Video)

VASAI MURDER (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला हादरवणारी घटना वसईमध्ये घडली आहे. डोक्यात लोखंडी पाणा घालून एका सायको प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या (Vasai Murder) केली आहे. त्यावेळी आसपास उपस्थित लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली हे सुद्धा लाज आणणार आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भररस्त्यात केलेल्या या हत्येचा विडिओ व्हायरल झाला आहे.

वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती यादव (वय 20) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. लोखंडी पाना डोक्यात मारून ही हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा विडिओ समोर आला असून किती निर्घृणपणे हि हत्या करण्यात आली हे दिसत आहे. रस्त्यावर लोकांची गर्दी असतानाची सदर प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी पाणा घातला. यानंतर प्रेयसी खाली जमिनीवर कोसळली असता त्याने तब्बल १० वेळा तरी तिच्या डोक्यात पाणा घातला. शरमेची गोष्ट म्हणजे सदर आरोपी प्रेयसीचा खून करत असताना रस्त्यावरील लोक मात्र बघ्याच्या भूमिकेत होती. यावेळी एक तरुण तिला वाचवायला समोर आला मात्र सायको आरोपीने त्याच्यावर सुद्धा पाणा उगारल्याने भीतीपोटी तो सुद्धा तिथून निघून गेला.

सध्या आरोपीला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेकअपच्या रागातून आरोपीने प्रेयसीची हत्या केली आहे. अगदी रस्त्याच्या मधोमधच आरोपीने तिच्यावर वार केले. तिच्यावर वार करत असताना तो सतत माझ्यासोबत असं का केलं? असा प्रश्न विचारत होता, असं प्रत्यशदर्शींनी सांगितले आहे. मात्र आरोपी जेव्हा तरुणीवर निर्घृणपणे वार करत होता तेव्हा तिथील एकाही नागरिकांची पुढे यायची हिंमत झाली नाही हि गोष्ट नक्कीच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची लाज काढणारी आहे.

वायनाडमध्ये प्रियांका गांधी VS स्मृती इराणी लढत?? भाजप 1999 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार?

Priyanka gandhi vs smriti irani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) वायनाडची (Wayanad) जागा सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याठिकाणी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता वायनाडच्या जागेवर भाजप कोणाला उमेदवारी देणार याची सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यामध्ये स्मृती इराणी (Smruti Irani) यांचं नाव आघाडीवर दिसत आहे. सोशल मीडियावर तशा चर्चा सुरु आहेत. 1999 मध्ये अशाच पद्धतीने जेव्हा सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांनी सोनियांविरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजप आता 1999 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य आहे.

२०१९ मध्ये अमेठी मधून राहुल गांधींना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी याना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या केएल शर्मा यांच्याकडून अमेठीतच पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत भाजप त्यांना वायनाड जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.असं झाल्यास 1999 मध्ये ज्याप्रमाणे सोनिया गांधी विरुद्व सुषमा स्वराज अशी लढत झाली होती त्याचप्रमाणे आता प्रियांका गांधी विरुद्ध स्मृती इराणी असा रंगतदार सामना पाहायला मिळेल.

1999 मध्ये नेमकं काय घडलं होते?

सोनिया गांधीं यांनी कर्नाटकातील बेल्लारीतून पहिली पोटनिवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी भाजपने आश्चर्यकारकपणे सुषमा स्वराज यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी दिली. सुषमा स्वराज यांनीही सोनिया गांधीला तगडी फाईट दिली. त्या पोटनिवडणुकीत सोनिया गांधींना 414000 मते मिळाली. तर सुषमा स्वराज यांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. सोनिया गांधींना ही निवडणूक जवळपास 56000 मतांनी जिंकता आली.

Women’s Health | निरोगी आरोग्यासाठी वयाच्या 30 नंतर महिलांनी आहारात करा ‘या’ पदार्थ्यांचा समावेश

Women's Health

Women’s Health | वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. त्यात हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे आपल्या बदलत्या वयानुसार आपण आपल्या आहारात त्याचप्रमाणे आपले जीवनशैलीत देखील बदल करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे या वयात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते..वयाच्या तिशी नंतर महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक समस्या देखील सुरू होतात. जर तुम्हाला निरोगी राहायची असेल, तर तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणे. खूप गरजेचे आहे आता ते पदार्थ कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया.

दूध

अनेकवेळा स्त्रिया स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही.त्यामुळे त्यांच्या शरीरात कॅल्शियम आणि विटामिनची कमतरता आढळते. त्यामुळे शरीरात आवश्यक पोषक तत्वांची पूर्तता होणे खूप गरजेचे असते. यासाठी तुम्हाला आहारात दुधाचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या हाडातील कॅल्शियम वाढेल आणि शरीराची वाढ योग्य होईल.

टोमॅटो | Women’s Health

निरोगी आयुष्यासाठी आहारात टोमॅटोचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. टोमॅटोचा नियमित सेवन केल्याने स्तनाच्या कर्करोगांपासून बचाव होतो. त्याचप्रमाणे टोमॅटोमध्ये अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडंट असतात. म्हणून तुम्ही हृदयाच्या संबंधित आजारांपासून देखील लांब राहता.

दही

अनेक वेळा अनेक आजारांवर डॉक्टर आपल्याला दही खाण्याचा सल्ला देतात. कारण दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे आहारात समावेश नक्की करावा. दह्याचे सेवन केल्याने स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. त्याचप्रमाणे पोटाशी संबंधित आजार देखील दूर होतात आणि पचन संस्था सुधारते.

Alka Yagnik | गायिका अलका याज्ञिक झाली ‘या’ गंभीर आजाराची शिकार; दोन्ही कानांनी ऐकू येणे झाले बंद

Alka Yagnik

Alka Yagnik | प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिकबाबत मोठी बातमी येत आहे. अलका व्हायरल अटॅकची बळी झाली आहे. त्यामुळे त्यांना अचानक ऐकायला येणे बंद झाले आहे. ही बातमी तिने स्वतः तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या बातमीने तिचे सगळे चाहते चिंतेत आहे. परंतु हे कसे झाले या बद्दलची माहिती तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अलका याज्ञिकने (Alka Yagnik) तिच्या इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे चाहत्यांना ही बातमी दिली आहे. पोस्ट करताना, अलका याज्ञिकने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “मी माझ्या सर्व चाहते, मित्र, फॉलोअर्स आणि हितचिंतकांना सांगू इच्छिते की व्हायरल हल्ल्यानंतर मला ऐकण्यात अडचण येत आहे. सिंगरने लिहिले की, एके दिवशी मी फ्लाइटमधून बाहेर पडत असताना मला ऐकू येत नव्हते. यासोबतच गायकाने लोकांना मोठ्या आवाजातील संगीतापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे.”

पुढे ती म्हणाली की, “सगळे मला विचारतात की मी कुठे आहे?” माहिती देताना अलकाने पुढे लिहिले की, “माझ्या डॉक्टरांनी या आजाराचे वर्णन दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह हियरिंग लॉस डायग्नोसिस असे केले आहे, जो व्हायरल अटॅकमुळे होतो. या अचानक झालेल्या आजाराने मला खरोखरच आश्चर्यचकित केले आहे आणि मी यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.”

अलकाची ही पोस्ट पाहून तिचे चाहते आणि यूजर्स काळजीत पडले आहेत. यावर एका युजरने कमेंट केली की, “हे जाणून खूप वाईट वाटतं, स्वतःची काळजी घ्या.” दुसऱ्या युजरने लिहिले की,: आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तुम्ही लवकर बरे व्हाल.”अशा कमेंट्स करून, चाहते आणि युजर्स ती लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

अलका याज्ञिक एक अप्रतिम गायिका आहे. लोक तिच्या आवाजाचे खूप वेडे आहेत, फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर देशभरात अलकाचे स्वतःचे वेगळे स्थान आहे. तिची गाणी सर्वांनाच खूप आवडतात. आत्तापर्यंत अलकाने २५ हून अधिक भाषांमध्ये २१ हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.