Monday, December 22, 2025
Home Blog Page 667

कोणी म्हणतो गोळ्या घालीन, सरकारलाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे; जरांगेंच्या विधानाने खळबळ

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी जरांगे यांच्या निधनाची बातमी व्हायरल होत होत्या, याबाबत विचारलं असता जरांगे पाटलांनी सरकारवरच आरोप केला आहे. सरकारलाही माझा घातपात व्हावं असं वाटत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. पण मी भीत नाही. समोर ये.. कचका दाखवतो असा इशाराही जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला.

आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितलं कि, अंतरवलीमधून मला हलू देत नाहीत. मी तिथे आंदोलन करतो. कुणी मला मारून टाकीन म्हणतो. कुणी गोळ्या घालीन म्हणतो… सरकार, पोलीस मराठ्यांच्या विरोधात आहे. सोशल मीडियावर कोणी काहीही लिहितं. सरकार, पोलीसही मराठ्यांविरोधात असल्यासारखे वागतात. त्यांच्या हातात आहे सारं. ते अशा गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. सरकारलाही, पोलिसांनाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे, म्हणून आमच्याकडे लक्ष देत नाही. पण मी भीत नाही. समोर ये.. कचका दाखवतो. आमचे लई हल आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, पोलीस तसेच सरकार इतर प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करतं मात्र मराठ्यांसंदर्भातील प्रकरणांमध्ये एवढी तत्परता दाखवली जात नाही . उलट दुसऱ्यांच थोडं काही झालं की लगेच पोलीस कारवाई करतात . मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं, यासाठी प्रयत्न करा. इकडे मराठा आमदार खासदार येतंय. पत्र द्यायला लागले आहे. महाराष्ट्र समाज बघत आहे. जे येत नाही ते विरोधी आहे का? असा प्रश्न पडतो. मात्र मी ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Indian Bank Special FD | इंडियन बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर; FD वरील व्याजदरात झाली एवढी वाढ

Indian Bank Special FD

Indian Bank Special FD | भविष्याचा विचार करून अनेक लोक त्यांच्या पगारातील काही भाग हा गुंतवणूक करत असतात. जेणेकरून भविष्यात जाऊन त्यांना कोणतीही आर्थिक अडचण आली तरी त्यांना ते पैसे वापरता येतील. बाजारामध्ये आता गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु अजूनही बरेच लोक एफडीला प्राधान्य देतात. कारण मधील त्यांचे पैसे हे सेफ असतात. त्याचप्रमाणे परतावा देखील चांगला देतात. आता एफडीवरील व्याजदर हे प्रत्येक बँकेमध्ये वेगवेगळे असते.

अशातच आता इंडियन बँकेने (Indian Bank Special FD) त्यांच्या ग्राहकांना एक मोठी भेट दिलेली आहे. ती म्हणजे आता बँकेने एफडीवरील मुदत ठेवीच्या व्याजदरात सुधारणा केलेली आहे. इंडियन बँकेने 10 लाख ते 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी वरील व्याजदरात सुधारणा केलेली आहे. बँकेने केलेले हे नवीन व्याजदर 12 जून 2024 पासून लागू.

400 दिवसांची एफडी योजना | Indian Bank Special FD

इंडियन बँके त्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी योजना उपलब्ध करून देत असतात. इंडियन बँकेचे सुपर एफडी 400 दिवसांची ही योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही 10 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या बँकेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर सर्वसामान्य नागरिकांना एफडीवर 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के एवढा व्याजदर मिळतो. त्याचप्रमाणे अति ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याज मिळतात तुम्ही या एफडी योजनेत 30 जून 2024 पर्यंत गुंतवणूक करू शकता.

इंड सुपर ३०० दिवस

इंडियन बँकेच्या वेबसाइटनुसार, विशेष मुदत ठेव उत्पादन Ind Super 300 days 1 जुलै 2023 रोजी लाँच करण्यात आले. तुम्ही या FD वर 300 दिवसांसाठी 5000 रुपयांपासून ते 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करू शकता. यावर बँक 7.05 टक्के ते 7.80 टक्के व्याज देत आहे. इंडियन बँक आता सर्वसामान्यांसाठी ७.०५%, ज्येष्ठ नागरिकांना ७.५५% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.८०% व्याजदर देत आहे.

मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाचा घोळ नेमका काय आहे?

Ravindra Waikar EVM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेचा मुंबई उत्तर पश्चिमचा (Mumbai North East Lok Sabha 2024 Result) निकाल लागला… ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्या विरोधात शिंदेंच्या रवींद्र वायकरांचा (Ravindra Waikar) अवघ्या 48 मतांनी विजय झाला… पण प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी आणि मतमोजणीनंतर अशा काही गोष्टी एका मागून एक घडायला लागल्या…ज्यामुळे ईव्हीएम पासून ते निवडणूक प्रक्रियेवरच एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं? त्यात मतमोजणी केंद्रावर वायकरांच्या मेव्हण्यानं मोबाईल फोन वापरल्याचा प्रकार समोर आल्यानं ‘दाल में कुछ तो काला है’ असं म्हणत या प्रकरणात एका मागून एक ट्विस्ट घडत आलेत… वायकर, त्यांचा मेव्हणा आणि त्याने वापरलेला मोबाईल फोन यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस यंत्रणा, ईव्हीएम मशीन, जिल्हाधिकारी ते थेट निवडणूक आयोग अशी भली मोठी सिस्टीमच कशी अडचणीत आलीये? एका छोट्याशा मोबाईलवरून अमोल कीर्तीकरांच्या बाजूने असणारा निकाल फिरवण्यात आला का? मुंबई उत्तर पश्चिमचा खराखुरा खासदार कोण? याच सगळ्या घटनांचं केलेलं हे डिकोडींग…

तर विषय सुरू झाला तो चार जूनला…मुंबई उत्तर पश्चिमच्या मतदानाची मोजणी गोरेगाव नेस्को मैदानाच्या मतमोजणी केंद्रावर सुरू झाली…अमोल कीर्तीकरांच्या बाजूने असणारं वारं पाहता वायकर इथून निसटती लढत देतील असा अंदाज होता… पण मतमोजणीच्या पहिल्याच कलांपासून कीर्तीकर वर्सेस वायकर या लढतीत कट टू कट फाईट पाहायला मिळाली… एका मागून एक फेऱ्या मागे पडत गेल्या आणि शेवटच्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर अमोल कीर्तीकरांना 681 मतांच्या लिडने विजयी घोषित करण्यात आलं…पण वायकरांना हा निकाल काही पटला नाही.. त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली…आणि या मतमोजणीत वायकरांना 75 मतांची आघाडी मिळाली… यावर आक्षेप घेत आता कीर्तीकरांनी फेर मतमोजणीची मागणी केली…आणि यात इंटरेस्टिंग रित्या ट्विस्ट येत किर्तीकर एका मताने विजयी झाले…

ईव्हीएम मशीन मधला हा सगळा घोळ पाहता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल बॅलेट मतांची मोजणी करण्याचा निर्णय घेतला… हा सगळा प्रकार रात्री दहापर्यंत चालला… आणि शेवटी मोजणीनंतर रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून 48 मतांच्या लीडने विजयी घोषित करण्यात आलं… एकदाचा काय तो निकाल लागला, म्हणत सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला…पण पराभूत झालेल्या कीर्तीकरांना निकालात काहीतरी घोळ असल्याचा संशय आला… निकालाच्या दिवशी काही संशयास्पद गोष्टी घडल्या आहेत…असं म्हणत त्यांनी मतमोजणी ज्या ठिकाणी झाली तिथल्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली…तसा अर्ज नगर जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांवर बोट ठेवत फुटेज द्यायला साफ नाकारलं… आरोप प्रत्यारोप होत राहिले… पण प्रकरण शांत झालं होतं… या सगळ्यात अचानक मोठा बॉम्ब पडला… आणि तो टाकला मतदानात अवघी 937 मत पडलेल्या हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी…

तर प्रकरण असं होतं की ईव्हीएम मशीन आणि पोस्टल बॅलेट मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपीचा वापर करण्यात येतो… त्यामुळे मतदान मोजणीच्या ठिकाणी फक्त निवडणूक कर्मचाऱ्यांनाच मोबाईल फोन वापरण्याची परवानगी असते… आता याच निस्को गार्डनवर मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे इनकोर ऑपरेटर दिनेश गुरव याच कामासाठी मोबाईल फोन वापरत होते…पण याच दरम्यान मतमोजणी केंद्रावर उपस्थित असणाऱ्या रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांनी दिनेश गुरव यांच्याकडचा ईव्हीएम अनलॉक करण्याचा फोन आपल्याकडे घेत कुणालातरी कॉल केल्याचा आरोप भरत शाह यांच्याकडून करण्यात आला.. आणि यानंतर पुन्हा एकदा मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाच्या गोंधळाचा रान उठलं…

या सगळ्या प्रकारावर पोलिसांनी आपली बाजू मीडियासमोर मांडली ते म्हणाले, आरोपी मंगेश पंडीलकर आणि दिनेश गुरव यांना सीआरपीसी ‘41 अ’ अंतर्गत नोटीस बजावण्यात आलीय. पंडीलकरचा मोबाईल ४ जूनलाच जप्त करण्यात आला होता. तसंच त्यानं त्या मोबाईलवरून नेमकं काय केलं हे चेक करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलाय…आता या सगळ्या घटनाक्रमामुळे काही प्रश्न स्वाभाविकपणे विचारले जाऊ शकतात.. त्यातला पहिला म्हणजे पंडीलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता? एवढी मोठी सिक्युरिटी असतानाही त्याला निवडणूक कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोन दिलाच कसा? एन्ट्री पॉईंट्स, स्ट्राँग रुम आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये नेमक्या कोणत्या संशयास्पद हालचाली पाहायला मिळाल्या?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यथावकाश मिळतीलच…पण या प्रकरणामुळे निवडणूक घेण्याच्या आयोगाच्या संपूर्ण सिस्टीमवरच भलं मोठ प्रश्नचिन्ह उपस्थित झालय… आदित्य ठाकरेंनीही या सगळ्या प्रकरणावर भाष्य करत निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज देत नाही, यातून आयोगाचा सुद्धा यात सहभाग असल्याचे दिसून येतय… चंडीगड प्रकरणात आयोगाची प्रतिमा मलीन झाली होती, तसं पुन्हा घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून सीसीटीव्ही फुटेज देण्यात टाळाटाळ करण्यात येतेय, असा आरोप त्यांनी लगावला… हे कमी होतं की काय म्हणून रवींद्र वायकर यांच्या या ईव्हीएम घोटाळ्यासंबंधीच्या एका बातमीचं कात्रण ट्वीट करत राहुल गांधींनीही हा प्रकार धक्कादायक असल्याचं स्पष्ट केलं…EVM हा भारतातील ‘ब्लॅक बॉक्स’ आहे… त्याची तपासणी करण्यास कोणालाही परवानगी नाही. देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबतच यामुळे गंभीर चिंता व्यक्त करता येऊ शकते… असं म्हणून राहुल गांधींनी ईव्हीएम मध्ये काहीतरी छेडछाड केली गेलीय… या होत असलेल्या आरोपांना दुजोरा दिलाय…नेमकं उत्तर पश्चिम मधून कोण जिंकलय? मोबाईल डिव्हाईस चा वापर करून निकालात काही फेरफार करण्यात आला का? हे तपासानंतर समोर येईलच…पण मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालामुळे… रवींद्र वायकरांच्या खासदारकीमुळे… पोलीस प्रशासनापासून ते थेट निवडणूक आयोगापर्यंत सगळेजण अडचणीत आलेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Nicholas Pooran : एकाच ओव्हरमध्ये 36 धावा… निकोलस पुरनच्या वादळात अफगाणिस्तान ढेर (Video)

Nicholas Pooran 36 Runs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात विकेटकिपर फलंदाज निकोलस पुरनने (Nicholas Pooran) अवघ्या ५३ चेंडूत ९८ धावांची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले. खास गोष्ट म्हणजे अजमतुल्ला ओमरझाईने टाकलेल्या डावाच्या चौथ्या ओव्हरमध्ये पूरनने चांगलाच तडाखा देत तब्बल ३६ धावा चोपल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एका षटकात 36 धावा करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 36 धावा ठोकल्या होत्या.

ओमरझाईने टाकलेल्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर निकोलस पुरनने षटकार ठोकला. त्यानंतर दुसरा चेंडू नो बॉल ठरला, ज्यावर चौकार मारला गेला. सलग मारलेल्या चौकार- षट्कारामुळे अजमतुल्ला उमरझाई दबावात आला आणि त्यातच त्याने तिसरा चेंडू वाईड टाकला. आणि तो इतक्या लांबचा वाईड होता कि त्यावर चौकार गेला. म्हणजेच एकाच चेंडूवर अझमतुल्लाह ओमरझाईने 16 धावा दिल्या. दुसऱ्या कायदेशीर चेंडूवर फ्री हिट होता मात्र पूरना धाव काढता आली नाही. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर लागोपाठ २ चौकार मारले. यानंतर निकोलस पुरनने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर २ षटकार मारले. अशा प्रकारे या षटकात एकूण 36 धावा झाल्या. निकोलस पुरनच्या वादळात अफगाणिस्तानचे गोलंदाज पुरते ढेर पाहायला मिळाले.

दरम्यान, निकोलस पूरनच्या या वादळी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने २० षटकात २१८ धावांचा डोंगर उभारला. पूरनशिवाय जॉन्सन चार्लने ४६, शाई होप २५, आणि रोवमन पॉवेलने २६ धावांची उपयुक्त खेळी केली. प्रत्यतर २१९ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ गडबडला… अवघ्या ११४ धावांतच त्यांचा संघ गुंडाळला आणि वेस्ट इंडिजने १०४ धावांनी मोठा विजय मिळवला.

RRC- North Eastern Railway Bharti 2024 | रेल्वे विभागात 1104 पदांची भरती; 10वी पास करू शकतात अर्ज

RRC- North Eastern Railway Bharti 2024

RRC- North Eastern Railway Bharti 2024 | जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता उत्तर पूर्व गोरखपूर अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदासाठी जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या पदाच्या एकूण 1104 रिक्त जागा आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे 11 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेच्या आधीचा अर्ज भरावे. त्यानंतर गेलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | RRC- North Eastern Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – अप्रेंटिस
  • पदसंख्या – 1104 जागा
  • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्ष
  • अर्ज शुल्क – 100 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2024
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी मध्ये कमीत कमी 50% गुणांनी पास असावा.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • माहितीपूर्ण असल्यास तुमचे अर्ज नाकारले जातील.
  • ११ जुलै २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Police Bharti | राज्यात 19 जूनपासून पोलीस भरतीला सुरुवात; 17 लाखांपेक्षाही जास्त अर्ज दाखल

Maharashtra Police Bharti

Maharashtra Police Bharti | पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे. आणि याबाबतची अर्ज प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्र पोलीस दल आतापर्यंत 17,471 पदांसाठी तब्बल 17,76,256 झालेल्या आहेत. कारागृह विभागात 1800 पद रिक्त होती. आणि त्यासाठी तब्बल 3 लाख 72 हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल झालेले आहे. आता ही प्रक्रिया भरती प्रक्रिया 19 जून पासून सुरू होणार आहे. याबद्दलची माहिती अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार वटकर यांनी दिलेली आहे.

राज्यामध्ये पोलीस भरतीला (Maharashtra Police Bharti ) 19 जून 2024 पासून सुरुवात होणार आहे. आणि त्यासाठी 17471 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी आत्तापर्यंत तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज आलेले आहेत. बॅट्समन या पदाच्या एकूण 41 रिक्त जागा आहेत आणि त्यासाठी 32 हजार 26 लोकांनी अर्ज केलेले आहेत. तुरुंग विभागातील शिपाई या पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून 3 लाख 72 हजार 354 अर्ज आलेले आहेत. चालक या पदासाठी 1686 रिक्त जागा आहेत आणि त्यासाठी 1 लाख 98 हजार 300 अर्ज आलेले आहेत. पोलीस शिपाई या पदासाठी 9595 जागा आहेत आणि या जागा भरण्यासाठी तब्बल 8 लाख 22 हजार 984 अर्ज आलेले आहेत.

अर्ज केलेल्या अर्जदारांपैकी 40 टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत. अशी माहिती देखील आलेली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झालेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या परीक्षेदरम्यान जर पाऊस पडला तर विद्यार्थ्यांना पुढील तारीख दिली जाईल. अशी देखील माहिती समोर आलेली आहे. एका उमेदवारांना एकाच पदासाठी अर्ज करणे अपेक्षित होते. परंतु जर त्या उमेदवाराने विविध पदासाठी अर्ज केला असता, दोन्ही ठिकाणच्या मैदानी परीक्षेत एक तारीख येणार नाही. याची देखील काळजी घेतली जाणार आहे.

राज्यात यावर्षी एकूण 17471 पोलीस भरतीसाठी रिक्त पदे आहेत. त्यातच आता वाशिम जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये 68 रिक्त जागा आहेत. आणि त्यासाठी 4178 अर्ज आलेले आहेत. त्यामुळे आता पोलीस मुख्यालय येथील प्रांगणामध्ये पोलीस शिपाई भरतीसाठीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी 50 अधिकारी आणि अडीचशे कर्मचारी उपस्थित राहणार आहे. 15 जून रोजी या ठिकाणची मैदानी परीक्षा चालू होणार आहे. त्यासाठी एकूण 1000 उमेदवार असणार आहे. परंतु जर पावसामुळे त्यांची मैदानी चाचणी होऊ शकली नाही, तर त्यांना पुढील तारीख देण्यात येणार आहे.

राहुल गांधींनी वायनाड सोडून रायबरेलीची निवड का केली? ही आहेत कारणे

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वायनाड (Wayanad) आणि रायबरेली (Raebareli) या दोन्ही मतदारसंघतून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी मोठ्या मताधिक्याने राहुल गांधींचा विजय झाला. मात्र आता त्यांनी वायनाडची खासदारकी सोडण्याचा निर्णय घेतला असून, तेथून प्रियांका गांधी पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहणार आहेत. राहुल गांधींच्या या निर्णयावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. राहुल गांधींनी वायनाड सोडून रायबरेलीची निवड का केली? यामागे कोणती कारणे आहेत? काँग्रेस या निर्णयाच्या माध्यमातून मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे का? चला याबाबत सविस्तर जाणून घेउयात….

१) रायबरेली हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला-

रायबरेली ही गांधी घराण्याची परंपरागत जागा आहे. काँग्रेससाठी देशातील सरावात सेफ जागा म्हणून आधीपासूनच रायबरेलीकडे बघितलं जात होते. एकार्थाने रायबरेलीला गांधी घराण्याचा बालेकिल्लाही म्हणता येईल. 1967 ते 1977 पर्यंत रायबरेलीची जागा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे होती. त्यानंतर 2004 पासून 2024 मध्ये राज्यसभेवर त्यांची नियुक्ती होईपर्यंत ही जागा सोनिया गांधी यांच्याकडे होती. अशा परिस्थितीत राहुल गांधींनी रायबरेली कायम ठेवण्याचे हेही एक कारण असू शकते.

२) उत्तर प्रदेशात काँग्रेसला मजबूत करणे –

केंद्रात सत्ता काबीज करायची असेल तर त्यासाठी आधी उत्तरप्रदेश जिकावी लागते, 80 लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तरप्रदेशातूनच केंद्रातील सत्तेचा मार्ग जातो. २०१९ च्या लोकसभेत काँग्रेसने उत्तर प्रदेशात सपाटून मार खाल्ला होता, मात्र २०२४ च्या लोकसभेत काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला मिळून 43 जागा जिंकता आल्या. यामध्ये काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळवला. आता आगामी काळात उत्तरप्रदेशात काँग्रेसची ताकद आणखी वाढवून दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा काँग्रेसचा प्लॅन असू शकतो.

३) प्रियंका गांधींसाठी सुरक्षित जागा वायनाड –

तिसरं कारण म्हणजे प्रियंका गांधींसाठी सुरक्षित जागा म्हणून वायनाड ठरू शकते. 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाडमधून मोठा विजय मिळवला आहे. आता प्रियांका गांधी प्रथमच लोकसभा निवडणूक लढणार आहेत, अशावेळी राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रियंका गांधींच्या निवडणूक पदार्पणासाठी वायनाड पेक्षा सुरक्षित जागा असू शकत नाही.

Weather Update | पुढील 5 दिवस महत्वाचे ! कोकणासह ‘या’ शहरांना दिला पावसाचा येलो अलर्ट

Weather Update

Weather Update | यावर्षी पावसाने वेळेआधीच आगमन केले होते. परंतु मध्यंतरी पुन्हा एकदा खंड पडल्यानंतर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून नव्याने सक्रिय झालेला आहे. जवळपास आठवडाभर पावसामध्ये खंड पडला होता. आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. अरबी समुद्रात मोसमी वारे वाहू लागल्याने आता महाराष्ट्रात पावसासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाल्याने महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तासात राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये पाऊस (Weather Update) बंद झाला होता.. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना मेमधील उन्हासारखा चटका सहन करावा लागत होता. परंतु आता पुन्हा एकदा पावसाने मुंबईमध्ये हजेरी लावलेली आहे. मुंबई सह कोकणातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आला आहे. तर पुढील काही दिवस कोकणात मुसळधार पावसाचा येलो हवामान विभागाने जारी केलेला आहे.

या ठिकाणी देण्यात आला येल्लो अलर्ट | Weather Update

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या ठिकाणी देखील पावसाचा येल्लो अलर्ट जारी केलेला आहे. आणि विदर्भात देखील पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे.

विदर्भात पडणार मुसळधार पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार इथून पुढे पाच दिवस मराठवाड्यासह इतर ठिकाणी मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यातील जालना, नांदेड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर तर विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर या ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

भाजपला अजित पवार नकोसे? आमदारांमध्ये खदखद; महायुतीत मोठं काहीतरी घडणार??

Ajit Pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुतीला आता अजित पवार (Ajit Pawar) नकोसे झाले आहेत अशा चर्चा आहेत. अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे भाजप आमदारांचे मत असून आता अजित पवारांना सोबत ठेवावं कि नको याबाबत फेरविचार करण्याची मागणी भाजपच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे लोकसभेतील पराभवाचे खापर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापूर्वी अजित पवार गटावर फोडलं होते. आता भाजप आमदारांनी सुद्धा दादा गटबाबत नाराजी दर्शवल्याने महायुतीत पुढे काय होणार ते आता बघावं लागणार आहे.

अजित पवार गटाची मते भाजप (BJP) आणि शिंदे गटाचे ट्रान्सफर न झाल्याचा भाजप आमदारांचा दावा आहे. त्यासाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघांची यादीच समोर केली आहे. खास करून सोलापूर, माढा, मावळ, दिंडोरी, शिरूर इत्यादी मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाची ताकद असूनही महायुतीच्या उमेदवाराला अपेक्षित मतदान झालं नाही. इतर मतदारसंघातही अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि नेते सक्रिय नसल्याचा दावा भाजप आमदारांकडून करण्यात येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड विधानसभा मतदार संघात दिलीप मोहिते पाटील, जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दिलीप ळळसे पाटील आणि हडपसर येथे चेतन तुपे हे चारही आमदार दादा गटाचे असताना सुद्धा त्याठिकाणी आढळराव पाटील पराभूत झाल्याचे मत भाजप आमदारांनी व्यक्त केले आहे.

यापूर्वी संघाने उपटले कान-

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या ऑर्गनायझर साप्ताहिकात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपच्या पराभवावरून अजित पवार गटावर खापर फोडण्यात आलं होते. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली, अशी टीका ऑर्गनायझर मधून करण्यात आली होती. यानंतर दादा गटाने या टीकेला प्रत्युत्तर सुद्धा दिले. मात्र आता खुद्द भाजप आमदारांमध्येच नाराजी असल्याने आगामी काळात महायुतीत काय काय घडामोडी घडतात ते पाहायला हवं .

Travel Insurance | रेल्वेच्या तिकिटासोबत खरेदी करा 45 पैशांचा प्रीमियम इन्शुरन्स; मिळते एवढी मदत

Travel Insurance

Travel Insurance | रेल्वे अपघाताच्या अनेक बातम्या आपण ऐकत असतो. अशातच आता पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये एका मालगाडीने एक्सप्रेसला मागून धडक दिली. आणि या अपघातात तब्बल 15 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. या घटना अत्यंत अनपेक्षित असतात. आणि कधीही कोणासोबत घडतील हे कुणालाही माहित नव्हत त्यावेळी तुम्ही जर तिकीट बुक करताना 45 पैसे भरून ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केली, तर ती तुमच्यासाठी खूप मदतीची होईल. जर असा दुर्दैवी प्रसंग चुकून कोणाच्याही वाट्याला आला, तर ही विमा पॉलिसी (Travel Insurance) तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या पॉलिसी अंतर्गत विमा संरक्षण विभाग कंपनीकडून जखमी किंवा पिडीत प्रवाशाला दिले जाते.

ट्रॅव्हल इन्शुरन्स कव्हरेजची किंमत किती ? | Travel Insurance

तुम्ही जर 45 पैशांची ट्रॅव्हल पॉलिसी असलेला प्रवाशाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला, तर या बिमा कंपनीकडून त्या प्रवाशाच्या कुटुंबाला म्हणजेच नॉमिनीला 10 लाख रुपये दिले जाते. जर प्रवाशाचे एकूण अपंगत्व कायम राहिले तरीही 10 लाख रुपये उपलब्ध केले जातात. कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 7 लाख पन्नास 50 हजार रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे दुखापत झाल्यास रुग्णालयात नेण्यासाठी 2 लाख रुपयांनी वाहतुकीसाठी 10 हजार रुपये दिले जातात.

दाव्याबद्दल समजून घेणे महत्त्वाचे

IRCTC नुसार या प्रवास धोरणे अंतर्गत एकूण देय लाभ साठी अंतिम आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत दिले जाते. जर त्या गोष्टींच्या उल्लंघन झाल्यास कोणत्याही बंधनासाठी विमा कंपनी जबाबदार राहणार नाही. या पॉलिसी अंतर्गत सर्व दावे भारतीय चलनात दिले जातात.

विमा कंपनीने, विमाधारकाने सेटलमेंट ऑफर स्वीकारल्यानंतर, परंतु स्वीकृतीच्या तारखेपासून 7 दिवसांपेक्षा जास्त विलंब, या पॉलिसी अंतर्गत दाव्याचे पुनरावलोकन केलेल्या आर्थिक वर्षात देय किंवा देय रकमेसाठी, प्रचलित बँक दरापेक्षा 2% वर व्याज देण्यास जबाबदार आहे. पॉलिसीच्या समाप्तीच्या तारखेपासून 365 दिवसांपेक्षा जास्त कालावधीत हॉस्पिटलायझेशनच्या संदर्भात कोणताही दावा स्वीकारता येणार नाही. तसेच दावा फसवा असल्यास किंवा फसव्या मार्गाने समर्थित असल्यास, पॉलिसी अंतर्गत कोणतेही दायित्व स्वीकारले जात नाही.